गेला आठवडाभर फक्त मळभ होत. पाऊस येईल असं वाटून नेहा छत्री घेऊन निघायची पण पाऊस मात्र यायचा नाही. पंचविसाव्या मजल्यावरील ऑफिसाच्या काचेतून बाहेर दिसत असलेली शहराची स्काय लाईन बघत वाफाळती कॉफी पीत असताना समोर दिसत असलेले काळे ढग पाहिल्यावर तिला बाहेर जाऊन हळूच हेअर पीन ढगाला टोचून पाऊस पडावा असा विचार अनेकदा मनात यायचा आणि स्वतःशीच हसून ती डेस्कवर परत जाऊन बसायची! आसमंतात भरलेल्या पावसाने स्मिथ ब्रदर्स ह्या मल्टिनॅशनल फर्मचं ते सेंट्रली एसी ऑफिस देखील कुंद झाल्यासारखं नेहाला भासत असे. ८.३७ ची बोरीवली फास्ट चुकली की गोंधळ होणार हे माहीत असल्याने नेहा नियमित तीच गाडी पकडून ऑफिस टाईमच्या अर्धा तास आधी ऑफिसात पोहोचून काचेतून बाहेर बघत कॉफी घेत असे!
साधारण एक महिन्यापूर्वीची गोष्ट. मालाड स्टेशन वरून माईंड स्पेसला शेयर रिक्षाने पोहोचून पुढे दोनशे मीटरवर असलेल्या ऑफिसच्या इमारतीत शिरेपर्यंत ती घमेजून गेली होती. घामाच्या धारा तिच्या कपड्यांच्या आतून नळ लावल्यासारख्या अंगभर वहात होत्या. इमारतीच्या लॉबीत शिरल्यावर तिथल्या थंडाव्याने अंगाची काहिली दूर झाली. नेहा लिफ्ट पकडून पंचविसाव्या मजल्यावर आली आणि बायोमेट्रिक एक्सेस घेऊन ऑफिसात डेस्कवर आली. लॅपटॉप डेस्कवर ठेऊन रेस्टरूम मध्ये जाऊन जरा घाम टिपून, मेकअप नीट करून बाहेर आली आणि सवयीनुसार कॉफीचा मग हातात धरून काचेतून बाहेर पाहू लागली!
समोर तिला उंच उंच काचेच्या इमारतींबरोबर कित्येक एकर पसरलेली झोपडपट्टी दिसत होती. तिला हे बघून नेहमी वाटून जायचं की हे शहर काही वर्षांनी फक्त गरीब आणि श्रीमंत असंच उरेल. एका बाजूला गरजेपेक्षा कित्येक पट जास्त धन कमवून सुखात लोळत असलेले धनिक आणि दुसऱ्या बाजूला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा देखील पूर्ण न होऊ शकणारे गरीब! हे रोजचं दृश्य आणि विचार सुरू असताना अचानक तिला त्याच समोरच्या काचेतून हिरवा कच्चं, झाडांनी लवडलेला कोंडीबाचा डोंगर दिसू लागला. त्याच्या शिखरावर असलेलं मयुरेश्वराच मंदिर दिसू लागलं. मंत्र म्हणत डोंगराच्या पायऱ्या चढत असलेले रघुशास्त्री दिसू लागले. डोक्याचा गोटा, लांब शेंडी, जाड मिश्या, गोरा गोरा उघडा देह, त्यावर असलेलं जानवं, कानात भिकबाळी, खाली लाल कद, हातात पूजेची थाळी, टकलावर आणि अंगावर पायऱ्या चढून जमलेले घामाचे बिंदू आणि मयुरेश्वराच्या कळसावर रोखलेले घारे डोळे! झपझप पायऱ्या चढणारे साठीचे रघुशास्त्री चाळिशीचे देखील वाटतं नसत!
ते अर्ध्या वाटेवर असताना खालून त्यांच्यामागे त्यांना हाका मारत पायऱ्या चढत असलेली यमुना नेहाला दिसली. जेमतेम अठरा वर्षांची उफाड्याची यमुना तिच्या तेल लावून घट्ट बांधलेल्या दोन लांबसडक वेण्या उडवत, परकर पोलक्यात “बाबा बाबा” अश्या हाका मारत एकेक पायरी सोडून वर धावत होती. यमुनेच्या हातात तिचे वडील, रघुशास्त्री घरी विसरलेल्या बेलाच्या पानांची परडी होती! ती वेगाने धावत होती. नजर वर असल्याने एक पायरी चुकून यमुनाचा तोल गेला आणि ती शेजारच्या उतारावरच्या झाडीच्या जाळीतून दोनशे फूट खाली पडणार होती. इतक्यात तिचा हात कोणीतरी घट्ट धरला. आपण पडणार ह्या भीतीने तिने मिटून घेतलेले डोळे उघडून आपण पडलेले नाही ही जाणीव तिला व्हायला चार क्षण गेले. यमुनाने आपले टप्पोरे पाणीदार घारे डोळे उघडले तेव्हा तिचा हात त्याच्या राकट पीळदार हातात होता. त्याच्या गहुवर्णी चेहऱ्यावर एक आश्वासक स्मित होतं. यमुना त्याच्या गहिऱ्या, भावुक डोळ्यात, त्याच्या वाऱ्यावर उडत असलेल्या जुल्फात हरवून गेली. त्याच्या हाताच्या आधाराने लटकत असलेल्या तिला सरळ उभं राहायचं भान येत नव्हतं. तो पण तिच्या अल्लड टपोऱ्या डोळ्यात, गोऱ्या गोबर्या गालात, गुलाबी रसाळ ओठात आणि मऊ हाताच्या स्पर्शात हरवला होता. इतक्यात यमुनेची किंकाळी ऐकून खाली धावत आलेले रघुशास्त्री तिथे पोहोचले! त्यांची “यमे” अशी जरबेची हाक ऐकुन यमुना भानावर आली. आपला त्याच्या हातात असलेला हात घाईने सोडवत अंग चोरून उभी राहिली. पटकन खाली पडलेली परडी उचलून विखुरलेले बेल गोळा करू लागली. तेवढ्यात रघुशास्त्री कडाडले “आता जमिनीवर पडलेले बेल वाहू का मी मयुरेश्वराला? जा घरी जाऊन नवीन बेल घेऊन ये!” “हो बाबा आलेच!” इतकं बोलून, “त्या”च्याकडे वर्क चोरटा कटाक्ष टाकून यमुना यांत्रिकपणे धावत पायऱ्या उतरू लागली. रघुशास्त्री सावकाश पायऱ्या चढू लागले. तो मात्र तिथेच थिजला होता!
इतक्यात नेहच्या मोबाईल मध्ये आजच्या कॉन्फरन्स कॉलचा अलार्म वाजला आणि ती दचकून भानावर आली. घाईत वळून निघाली आणि मागेच उभ्या असलेल्या त्याच्या अंगावर आदळून तोल जाऊन पडणार होती. आपण पडणार ह्या भीतीने तिने मिटून घेतलेले डोळे उघडून आपण पडलेले नाही ही जाणीव तिला व्हायला चार क्षण गेले. नेहाने आपले टप्पोरे पाणीदार घारे डोळे उघडले तेव्हा तिचा हात त्याच्या राकट पीळदार हातात होता. त्याच्या गहुवर्णी चेहऱ्यावर एक आधार देणारं स्मित होतं. नेहा त्याच्या गहिऱ्या, भावुक डोळ्यात, त्याच्या कपाळावर येत असलेल्या जुल्फात हरवून गेली. त्याच्या हाताच्या आधाराने लटकत असलेल्या तिला सरळ उभं राहायचं भान येत नव्हतं. तो पण तिच्या अल्लड टपोऱ्या डोळ्यात, गोऱ्या गोबर्या गालात, गुलाबी रसाळ ओठात आणि मऊ हाताच्या स्पर्शात हरवला होता. तेवढ्यात अलार्म वाजत असल्याची जाणीव होऊन नेहा सावरून उभी राहिली. त्याला ओझरतं “थँक्स” म्हणून आपल्या डेस्ककडे धावली. तो ती गेली त्या दिशेने बघत होता. तिच्या सांडलेल्या कॉफीचा डाग त्याच्या पांढऱ्या शुभ्र शर्टात मुरत होता. एक नवीन डाव सुरू करायला सोकावलेला काळ हसत दिवसांचे पत्ते पिसत होता!
क्रमशः
भाग २
………. त्याच्या हाताच्या आधाराने लटकत असलेल्या नेहाला सरळ उभं राहायचं भान येत नव्हतं. तो पण तिच्या अल्लड टपोऱ्या डोळ्यात, गोऱ्या गोबर्या गालात, गुलाबी रसाळ ओठात आणि मऊ हाताच्या स्पर्शात हरवला होता. तेवढ्यात अलार्म वाजत असल्याची जाणीव होऊन नेहा सावरून उभी राहिली. त्याला ओझरतं “थँक्स” म्हणून आपल्या डेस्ककडे धावली. तो ती गेली त्या दिशेने बघत होता. तिच्या सांडलेल्या कॉफीचा डाग त्याच्या पांढऱ्या शुभ्र शर्टात मुरत होता. काही क्षण तो नेहा गेली त्या दिशेने बघत उभा राहिला. मग पोटाला कॉफीचा चिकट स्पर्श जाणवल्यावर त्याने त्या डागाकडे बघितल आणि कॉफीचा मग ठेऊन तो “जेन्ट्स” च्या दिशेने धावला.
इथे आपल्या डेस्कवर परतलेल्या नेहाला गिल्टी वाटत होत. आपला धक्का लागून त्याची कॉफी सांडली, त्याच्या शर्ट वर डाग पडला ह्या जाणीवेने तिला अस्वस्थ वाटत होत. आता परत दिसला तर त्याला अगदी मनापासून सॉरी म्हणायचं. एक नवीन पांढरा शर्ट विकत घेऊन द्यायची ऑफर द्यायचा तिने निर्णय घेतला. पण कोण होता तो? ह्या आधी ऑफिसात कधीच दिसला नव्हता. आणि इतक्या मोठ्या ऑफिसात तो परत दिसायचा म्हणजे त्याला शोधायला लागला असता आणि नेहाला त्यासाठी वेळ नव्हता. नेहाला कॉन्फरन्स कॉल खुणावत होता. ती आपला laptop सांभाळत small meeting room मध्ये गेली. तिथे अनु, वेंकट, पांडे आधीपासून येऊन बसले होते. हे असे क्लायंत कॉल त्यांच्या टीमला रुटीन झाले होते. ह्यात क्लाएन्त टीम त्यांच्या अवास्तव अपेक्षा, वेळ कसा फुकट जातो आहे ह्याचे पाढे वाचणार आणि आपण ते सर्व हल्ले शांत भाषेत, परफेक्ट data पोइंत्स देऊन परतवून लावायचे ह्याची सर्वांना सवय झाली होतो. नेहा आत येऊन बसली.
नेहा- हाय फोक्स…
अनु- (नेहाची खास मैत्रीण) हाय बेब्स…कुठे होतीस?
नेहा- कॉफी घेत होते यार…और पांडे क्या हाल?
पांडे- हाल खराब है. ट्रेन में सफर पाप है…लेकीन क्या करू? मीरा रोड से बाय रोड तो आ नही सकता ना?
वेंकट- तो on site जा. मी जा रहा हुं नेक्स्ट मंथ युगांडा.
अनु- युगांडा?
वेंकट- हां.
अनु- all the best. आम्हाला जंगल सफरीचे फोटो पाठव.
सगळे हसले इतक्यात हर्षद आला. रूम मध्ये सायलेन्स झाला. हर्षद म्हणजे हर्षद केतकर. ह्यांचा टीम लीडर. वकूब फारसा नसला तरी प्रोजेक्ट डायरेक्टरची कशी चाटायची आणि आपला फायदा कसा करून घ्यायचा हे स्कील त्याला आत्मसात होत. फार काही न करता आपण किती प्रचंड काम करतो ह्याचा गाजावाजा करून अटेन्शन सीकिंग करण्यात तो वाकबगार होता. ह्या सर्वाना माहित होत की चाटुगिरी करून तो आता आहे त्याच्या पुढल्या लेव्हलला ग्रो करू शकणार नाहीये. त्याला त्याच्या समोर प्रचंड रिस्पेक्ट देण्याच नाटक करणारी त्याची टीम आणि ओफिसातील बहुतेक लोक त्याला मागे हसत असत. हर्षदचा नेहावर विशेष जीव होता. नेहा समोर असली कि त्याची नजर तिच्या अंगांगावर फिरत असे. नेहाला ह्याची जाणीव होती. पण त्याने न्याहाळण्या पलीकडे काहीच केलेले नसल्याने नेहा काही action घेऊ शकत नव्हती.
हर्षद- सो….are we ready?
वेंकट- for what?
हर्षद- for the call.
अनु- yes.
हर्षद- ओके. पांडे तू डायल in कर आणि स्पीकर वर ठेव.
पांडेने avaya मशीन मधून कॉल डायल केला. ब्रिज नंबर टाकला. सर्वांच लक्ष फोनकडे होत. इतक्यात नेहाला काचेतून बाहेर ऑफिसात फिरत असलेला “तो” दिसला. सहा फुटांच्या आत बाहेर उंची, दणकट शरीरयष्टी, trim केलेली काळीभोर दाढी, केसांची जुल्फ, चेहऱ्यावर एक प्रेमळ स्मित….
“तो” समोर आगीने रसरसलेल्या लोखंडावर हातोडीचे घाव घालत होता. गीता पठणाच्या वर्गातून घरी परत निघालेली यमुना त्याला बघून तिथेच थिजली होती. त्याचे गोळीदार दंड, पिळदार शरीर, त्यावर जमलेले घामाचे थेंब बघत असलेल्या यामुनच हृदय त्याच्या ऐरणीच्या भात्यापेक्षा जास्त वेगाने धडधडत होत. यमुनाला परवाचा कोंडीबाच्या डोंगरावरचा, मयुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी घडलेला प्रसंग आठवला. ती पडत असताना त्यने दिलेला घट्ट आधार, त्याची ती पकड, त्याचे गहिरे डोळे, तरतरीत नाक, काळीभोर दाढी, उडणारी जुल्फ आणि चेहऱ्यावर असलेल ते प्रसन्न स्मित….यमुना तो प्रसंग आठवत त्याला बघण्यात हरवून गेली होती. समोर लोखंडातून हत्यार बनवत असलेल्या त्याला ह्याची कल्पना देखील नव्हती. त्याने कपाळावर आलेला घाम पुसायला कपडा उचलायला मान फिरवली तेव्हा त्याला त्याच्याकडे बघत असलेली यमुना दिसली. परकर पोलक्यात असलेली, गोबर्या गालांची, घाऱ्या डोळ्यांची, अपर्या नाकाची, उफाड्याची, रघु भटाची गोरी गोरी लेक यमुना. तिला समोर बघून त्यालाही तोच प्रसंग आठवला ज्यात यमुना हरवली होती. तो घाम पुसायचा विसरून समोर दिसत असलेल्या यमुनाकडे बघत बसला. तो जणू लोखंडाचा गरम तवा आणि यमुना म्हणजे त्यावर टाकलेला पांढराशुभ्र लोण्याचा गोळा अशी अवस्था झाली होती. तो नकळत तिच्या दिशेने चालू लागला. आता दोघांची नजरबंदी झाली होती. त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर यमुनाच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तो आता त्याच्या झोपडयाच्या हद्दीतून बाहेर पडून मातीच्या रस्त्यापर्यंत पोहोचला. यमुना तशीच उभी होती….भूल दिल्यासारखी….इतक्यात त्याच्या उजव्या बाजूने एक बैलगाडी जोरात आली. गाडीवान ओरडला-
गाडीवान- अरे ए भूसनळ्या आंधळा झालास काय? हो बाजूला.
त्याला हे कळायच्या आधी गाडी त्याच्या समोरून निघून गेली आणि जाताना त्याच्या पुढ्यात असलेल्या खड्ड्यात साचलेला चिखल त्याच्या अंगावर आणि चेहऱ्यावर उडवून गेली. त्याच ते रूप पाहून यमुनाला प्रचंड हसू येऊ लागलं. ती जोरजोरात हसू लागली. तो तिथेच उभा राहून तिला हसताना बघत होता. तिला हसताना बघून त्याला त्या भर दुपारी चांदण पडल्याचा अनुभव येत होता. अचानक यमुनाच्या लक्षात आल की नक्की काय सुरु आहे. “हा कोण कुठला अनोळखी लोहार. मी का उभी आहे इथे? बाबांनी बघितल तर?” हा विचार मानस आल्यावर यमुना अचानक पळून गेली.
नेहाचं कॉल मध्ये लक्ष नाहीये हे हर्षदच्या लक्षात आलं होत. हर्षद त्याकडे संधी म्हणून बघत होता. पाच मिनिटांचा कॉल संपला. हर्षद नेहाला म्हणाला-
हर्षद- नेहा तू थांब. The rest can go.
बाकीचे गेले. नेहा आणि हर्षद दोघंच उरले. हर्षद म्हणाला-
हर्षद- नेहा प्लीज मला समोर असलेल्या बोर्डवर आजच्या कॉल मधले कि पोइंत्स लिहून दाखव. मग आपण डीसकस करू.
नेहा उठली. तिला आज काय डीसकस झालं ते खरच आठवत नव्हत. कारण तिचं लक्षच नव्हत. नेहा व्हाईट बोर्ड जवळ आली. हर्षद तिला न्याहाळू लागला. स्कर्ट खाली दिसणारे तिचे घोटीव पाय, बारीक कंबर, तिच्या शरीराच्या सगळ्या कर्व्ह, तिचा नजर खिळवून ठेवणारा चेहरा, लांब सडक केस हे सर्व हर्षद आपल्या नजरेत साठवून घेत होता. हे नेहाला कळत असूनही नेहा फार काही करू शकत नव्हती. आज तिची चूक होती. नेहा helpless होऊन उभी होती आणि तेवढ्यात रूमच दार उघडलं. हर्षद आणि नेहाने दाराकडे बघितलं. दारात “तो” होता. चेहर्यावर तेच हास्य आणि शर्टवर कॉफीचा डाग.
तो- may i come in?
क्रमश:
भाग ३
हर्षद तिला न्याहाळू लागला. स्कर्ट खाली दिसणारे तिचे घोटीव पाय, बारीक कंबर, तिच्या शरीराच्या सगळ्या कर्व्ह, तिचा नजर खिळवून ठेवणारा चेहरा, लांब सडक केस हे सर्व हर्षद आपल्या नजरेत साठवून घेत होता. हे नेहाला कळत असूनही नेहा फार काही करू शकत नव्हती. आज तिची चूक होती. नेहा helpless होऊन उभी होती आणि तेवढ्यात रूमच दार उघडलं. हर्षद आणि नेहाने दाराकडे बघितलं. दारात “तो” होता. चेहर्यावर तेच हास्य आणि शर्टवर कॉफीचा डाग.
तो- may i come in?
त्याचा आवाज ऐकून हर्षद आणि नेहाने एकाच वेळी वळून बघितलं. त्याला दारात बघून हर्षद चपापून उभा राहिला. चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला-
हर्षद- हाय निरंजन…प्लीज कम इन…..
नेहा- (मनातल्या मनात) अच्छा….निरंजन नाव आहे तर….
निरंजन- हर्षद मला india मधल्या सगळ्या लीड्स ची एक off site करायची आहे. मी इंडिया मध्ये असे पर्यंत. मला वाटत येता वीकेंड बेस्ट असेल. साधारण दीडशे लोक आहेत. गोवा ठीक राहील. विवांता बुक करूया. मी vp अद्मीन जोयसी बरोबर बोललो आहे. पण ऑप्स च्या बाजूने तू लीड कर. जमेल ना?
हर्षद- येस निरंजन…नक्की…
इतकावेळ डोळे विस्फारून निरंजन कडे बघत असलेल्या नेहाकडे निरंजन च लक्ष गेलं. ते हर्षदच्या लक्षात आल्यावर हर्षद म्हणाला-
हर्षद- she is नेहा. माझी जुनियर आहे आणि नेहा this is Niranjan…निरंजन चक्रदेव. The youngest partner of our company.
निरंजन ने shake hand साठी हात पुढे केला. नेहाने आपला नाजूक हात त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात हात दिल्यावर नेहाला तो स्पर्श उगाच ओळखीचा वाटला. खर तर निरंजन अमेरिकेत जन्मलेला आणि तिथेच स्थाईक झालेला. आई वडिलांनी घरी मराठी वातावरण अजूनही ठेवलं असल्याने मराठी संस्कृती आणि संस्कार माहित असलेला, जपत असलेला. पण बाकी नेहाशी त्याचा काहीच संबंध नव्हता. फक्त प्रोजेक्ट हायरारकी मध्ये निरंजन हा शेवटचा शब्द होता आणि सर्व एस्कलेषन तिथे जाऊन संपतात हे तिला माहित होत. तिच्या दृष्टीने निरंजन हा फक्त एक इमेल आयडी होता. मग त्याचा स्पर्श ओळखीचा का वाटला असावा? नेहा आणि निरंजन हातात हात धरून तसेच statue केल्यासारखे उभे होते. इतक्यात हर्षदला शिंक आली. त्या आवाजाने दोघे भानावर आले आणि एकमेकांचे धरलेले हात त्यांनी सोडले.
निरंजन- आय सी…आमची ओळख मगाशीच झाली आहे हर्षद.
आपल्या जुनियर मुलीची पार्टनर बरोबर डायरेक्ट ओळख झाली हे कळल्यावर इंसिक्युरीटीचा प्रचंड attack येऊन हर्षद म्हणाला-
हर्षद- तुमची ओळख? पण ते कस शक्य आहे?
निरंजन- (नेहाकडे बघत) काही गोष्टी घडून येतात हर्षद. तुला नाही कळणार. Anyway….नेहा nice to meet you.
असं म्हणून निरंजन ने हळूच त्याच एक बोट शर्टवर पडलेल्या डागावर ठेवलं आणि रडका चेहरा केला. नेहाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ऑफ साईट च्या टेन्शन मध्ये गेलेल्या हर्षदला ही मजा दिसत नव्हती. तो निरंजनला इम्प्रेस कसं करायचं आणि त्याचा अप्रेजल मध्ये उपयोग कसा करायचा, एखादी युएस ट्रीप निरंजनच्या कृपेने कशी पदरात पडून घ्यायची ह्याच्या विचारात होता!
नेहा तिच्या डेस्कवर येऊन बसली. डोळ्यासमोर निरंजन आणि मनात त्याचा स्पर्श होते. तेवढ्यात अनु तिथे आली आणि काळजीपूर्वक स्वरात नेहाला म्हणाली-
अनु- काय म्हणाला हर्षद?
नेहा- काही नाही. तो काही बोलायच्या आत निरंजन आला रूम मध्ये. तो आल्यावर हर्षदला बघायला हव होतस तू अनु. अक्षरशः थरथरत होता.
अनु- म्हणजे काय? निरंजन सुपर बॉस आहे. मिलियन डॉलर छापतो. आणि किती हुशार आहे. सर्वात तरुण पार्टनर आहे तो. APAC आणि अर्धा युरोप चा बिझनेस त्याच्या under येतो. आणि हर्षद काय आहे? साधा प्रोजेक्ट लीड. तो पण मठ्ठ.
नेहा- हम्म…निरंजन खरच सॉलिड आणि dashing वाटतो यार.
अनु- ए तू नको पडू त्यात. स्मिथ ब्रदर्स मधल्या ७५% बायका त्याच्यावर नजर ठेऊन आहेत पण तो इतका वाईट आहे ना की कोणालाही भाव देत नाही.
नेहा- हम्म…
अनु- नक्की लफड असणार अमेरिकेत त्याचं.
नेहा- हम्म…असेल किंवा नसेलही….
अनु- नसेल कशावरून? अग सगळे पुरुष सारखेच असतात. काही बिनधास्त करतात आणि काही लपवून.
नेहा- आणि काही असतात जे सांगायचं असूनही सांगू शकत नाहीत आणि लपवायचं असूनही लपवू शकत नाहीत….
अनु- कधी कधी तू काय बोलतेस ना ते मलाच कळत नाही. चल मी जाते. बाय…
अनु निघून गेली पण नेहाची केव्हाच तंद्री लागली होती. नेहाला कोंडीबाचा हिरवा गच्च डोंगर दिसू लागला. त्यावर मयुरेश्वराला जाण्यासाठी दगडात कोरलेली वळणा वळणाची पायवाट दिसू लागली. झाडावर फिरत असलेल्या खारी, पायर्यांवर धावणारे सरडे, काही ठिकाणी पडलेला प्राजक्ताचा सडा, पक्ष्यांचे आवाज, नुकताच पाऊस पडून गेल्याने झाडांच्या फांद्या आणि पानांवरून निथळत पडत असलेले पाण्याचे थेंब आणि आज मुद्दाम “त्या” च्या झोपडी समोरून, त्याला दिसेल ह्याची खात्री करून, त्याच्या समोर जोरात मैत्रिणीला “मी मयुरेश्वराला जाते आहे ग” अस सांगून अर्धा डोंगर चढून त्याची वाट बघत प्राजक्ताची फुल वेचत असलेली यमुना दिसत होती.
“तो” धावत धावत एक एक पायरी सोडून डोंगर चढत वर येत होता. यमुना त्याची वाट बघत होती. त्याने वळणाच्या पायऱ्या चढल्या आणि पुढे आला तर प्राजक्ताच्या सड्यात फुललेल्या गुलाबासारखी भासणारी यमुना त्याला दिसली. ती प्राजक्ताने डवरलेली एक फांदी धरायला उड्या मारत होती पण तिचा हात पोहोचत नव्हता. ते लोभस दृश्य “तो” कौतुकाने बघत होता. अशीच जाऊन यामुनाला मिठीत घेऊन चुरून टाकावी असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. यमुना दिसायचीच तशी आकर्षक. टवटवीत लाल गुलाबासारखी. तो पुढे झाला. यमुनाच लक्ष नव्हत. तो तिच्या दिशेने सरकत होता. अचानक तो यमुनाच्या समोर येऊन उभा राहिला. यमुनाला काय करायचं कळत नव्हत. ती थिजून गेली होती. तो दोन पावलं पुढे झाला. आता यामुनाच्या पोटात फुलपाखर उडत असल्याचा तिला भास होऊ लागला. तिने डोळे बंद करून घेतले. अचानक तिला अंगावर काहीतरी पडत असल्याची जाणीव झाली. तिने डोळे उघडले तर तो छान स्मित करत प्राजक्ताची फांदी जोरजोरात हलवत होता आणि त्यावरची फुलं यामुनाला न्हाऊ घालत होती. यमुना खुश झाली होती. मोहरून गेली होती. ती त्याच्या दिशेने पुढे झाली. त्याने फांदी हलवण बंद केल आणि शांत उभा राहिला.
यमुना- तुझं नाव काय आहे?
तो काही बोलला नाही.
यमुना- अरे नाव सांग की…
तो अचानक निघाला आणि झापाझाप पायर्या उतरू लागला. यामुनाला आश्चर्य वाटलं. ती ओरडून म्हणाली-
यमुना- मला तुला काहीतरी विचारायचं आहे…..
निरंजन ने खांद्यावर tap केल्यावर नेहा भानावर आली. निरंजनला समोर बघून घाबरून उभी राहिली.
नेहा- स…सॉरी…मी जरा एका घरच्या प्रॉब्लेम बद्दल विचार करत होते…सॉरी.
निरंजन- (तिच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन) इट्स ओके. रीलाक्स. Are you alright?
नेहा- (पाणी पिऊन) हम्म..yes….thanks…
निरंजन- नेहा… मला तुला काहीतरी विचारायचं आहे…..
हे ऐकून नेहाला परत कोंडीबाच्या डोंगराच्या पायऱ्या उतरत जात असलेला तो आणि ” मला तुला काहीतरी विचारायचं आहे…..” अस ओरडून सांगणारी यमुना क्षणभर डोळ्यासमोर आली आणि नेहा निरंजनकडे अविश्वासाने बघू लागली.
क्रमशः
भाग ४
निरंजन ने खांद्यावर tap केल्यावर नेहा भानावर आली. निरंजनला समोर बघून घाबरून उभी राहिली.
नेहा- स…सॉरी…मी जरा एका घरच्या प्रॉब्लेम बद्दल विचार करत होते…सॉरी.
निरंजन- (तिच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन) इट्स ओके. रीलाक्स. Are you alright?
नेहा- (पाणी पिऊन) हम्म..yes….thanks…
निरंजन- नेहा… मला तुला काहीतरी विचारायचं आहे…..
हे ऐकून नेहाला परत कोंडीबाच्या डोंगराच्या पायऱ्या उतरत जात असलेला तो आणि ” मला तुला काहीतरी विचारायचं आहे…..” अस ओरडून सांगणारी यमुना क्षणभर डोळ्यासमोर आली आणि नेहा निरंजनकडे अविश्वासाने बघू लागली.
निरंजन- काय झालं नेहा? Where are you?
नेहा भानावर आली. म्हणाली-
नेहा- क..काही नाही….क..काय विचारायचं आहे?
निरंजन- हेच की ग्लोबल इंजिनियर्स प्रोजेक्टच lesson learnt डॉक्युमेंट तू बनवते आहेस ना?
नेहा- हो…
निरंजन- मग सिंगापूर ऑफिस मधल्या chang शी बोलून घे एकदा. त्याच्याकडे काही चांगले inputs आहेत.
नेहा- ओके.
निरंजन- बाय…
निरंजन गेला आणि नेहा तिच्याच विचारात हरवली. तिचे पुढले दोन दिवस असेच निरंजनला बघण्यात, त्याच्या कामाचा आवाका, त्याची लीडरशीप स्कील, त्याचे व्यक्तिमत्व ह्यांनी भारावून जाण्यात गेले. उद्या गोव्याला ऑफ साईट. आज नेहा काम उरकून निघाली. ऑफ साईटला होस्ट तीच होती. शिवाय सगळ्या co- ordination ची जबाबदारी तिच्यावर आणि अनुवर ढकलून हर्षद निरंजनच शेपूट बनायला मोकळा झाला होता. सगळ काम संपवायला नेहाला दहा वाजले. नेहा निघाली. काम करत असलेल्या काही कलीग्सची क्युबिकल फक्त चकाकत होती बाकी ओफिसातील दिवे आता डीम झाले होते. नेहा निघाली. तिच्या लक्षात आल की कॉन्फरन्स रूम मध्ये अजून दिवा होता. नेहाने नकळत दरवाजा किलकिला करून बघितलं. आत निरंजन कॉल वर होता. नेहाला दारात बघून त्याने हाताने आत ये असा इशारा केला. आधीच उशीर झालेल्या नेहाला नाही पण म्हणता आल नाही. नेहा आत येऊन बसली. परदेशातील अनेक लोक त्या कॉलवर होते. निरंजन सर्वांना इंस्त्रक्षन देत होता. नेहा इम्प्रेस होत होती. दहा मिनिटात कॉल संपला. निरंजन म्हणाला-
निरंजन- एस नेहा. बोल…
नेहा- काय बोलू?
निरंजन- तेच जे बोलायला तू आत आलीस.
नेहा- मी काहीच बोलायला आले नाही. लाईट सुरु होता म्हणून सहज आत डोकावले आणि तुम्ही मला आत बोलावलं म्हणून येऊन बसले.
निरंजन- ओह…I am so sorry…कॉल वर असताना कोणी आल की त्याला हाताने बस अशी खून करायची सवय लागली आहे मला. तुझी दहा मिनिट मी वेस्ट केली.
नेहा- इट्स ओके. मला निघायला हव. उद्या सकाळची फ्लाईट आहे आणि मला ग्रांट रोडला घरी पोहोचून उद्या परत लवकर निघायचं आहे. Its late already.
निरंजन- (घड्याळ बघत) ओह…इथे दहा वाजून गेले ना. माझ्या लक्षातच आल नाही. एक तर काम आणि सतत travel मुळे हल्ली वेळ लक्षात यायला वेळ लागतो.
नेहा- पण आम्हाला वेळ लक्षात ठेवावी लागते. इथे ट्रेन्स मिनिटांच्या होशोबात धावतात.
निरंजन- तू ट्रेन ने जाणार? You mean Mumbai local? That’s scary.
नेहा- हो. पण ती आमची लाईफ लाईन आहे.
निरंजन- आता उशीर पण झालाय. तू एक काम कर. कॅब करून जा. उद्या voucher मला दे. मी approve करतो.
नेहाला त्याच्या डोळ्यात जेन्युईन काळजी दिसली.
नेहा- thanks निरंजन. Good night….
निरंजन- बाय….
नेहा निघाली. खाली येईपर्यंत कॅब बुक पण झाली होती. चार मिनिटात कॅब आली. नेहा कॅब मध्ये बसली. थंड वातावरण आणि रेडीओ वर RD. नेहाचा डोळा लागला. तिला मयुरेश्वराचा पौर्णिमा अभिषेक सोहळा डोळ्यासमोर दिसू लागला. मयुरेश्वराचा मुखवटा पालखीत ठेऊन आज रात्री गावात फिरवत होते. गावकरी लाल पिवळा गुलाल उधळत होते. मयुरेश्वराचा जयघोष सुरु होता. त्याची जड सागवानी पालखी एका बाजूला आपल्या बळकट खांद्यावर घेतलेला तो गुलालात न्हाऊन निघाला होता. पालखी रघु शास्त्रीच्या वाड्यासमोर आली. टाळ मृदुंगांचा गजर वाड्यात घुमू लागला. लाल कद नेसलेले गोरे गोरे पान रघु शास्त्री वाड्यातून बाहेर आले. त्यांच्या हातात पूजेच जड ताम्हन होत आणि त्यांच्या मागे यमुना पंचारती घेऊन सावकाश चालत येत होती. पंचारातीच्या प्रकाशात यमुनाचा चेहरा उजळून निघाला होता. खांद्यावर पालखी धरलेल्या त्याची नजर त्याच्या दिशेने चालत येत असलेल्या यमुनेच्या चेहर्यात हरवली. रघु शास्त्रींनी पालखीपुढे नारळ वाढवला. बेल आणि फुल उधळून शंभो हर हर असे म्हणून हात जोडून डोळे मिटून घेतले. यमुना रिवाजाप्रमाणे मयुरेश्वराला ओवाळू लागली. तो तिला बघण्यात हरवून गेला. घाम पुसायला म्हणून त्याने डोक्यावर बांधलेला फडका काढून चेहऱ्यावर फिरवला. सगळा गुलाल पुसला जाऊन त्याचा चेहरा पंचारातीच्या उजेडात यमुनाला दिसला. यमुना त्याच्याकडे बघत पालखीला ओवाळू लागली. इथे रघु शास्त्रींनी डोळे उघडले. त्यांच्या हातात मानाचा दंड देण्यात आला. रघु शास्त्री तो चांदीचा भरीव दंड हातात धरून कोंडीबाच्या डोंगराकडे निघाले. बाकी मंडळी निघाली पण पालकी हलत नव्हती. तो यमुनेत अडकला होता आणि यमुना त्याला डोळ्यात साठवत मयुरेश्वराला अजूनही ओवाळत होती. तेवढ्यात रघु शास्त्रींचा धीर गंभीर आवाज आला-
रघु शास्त्री- ए शिरप्या..पाय उचल पटापट….यमे वाडयात हो.
तो आवाज ऐकून तो पालखी घेऊन झपाझप पावलं टाकू लागला. यमुना वाड्यात आली. खुश होती. स्वतःशी बोलत होती.
यमुना- अच्छा तर त्याच नाव शिरप्या काय? पण शिरप्या म्हणजे नक्की काय असेल? श्रीपाद? की श्रीपत? की श्रीपती? काहीही असो. पण शिरप्या बरोबर नाही वाटत म्हणायला. नुसतं श्री म्हणाले तर?
ह्या कल्पनेने यमुना खुश झाली. धावत वाड्याच्या गच्चीवर गेली. आकाशात पौर्णिमेचा चंद्र लोभस दिसत होता. आता पालखी गावाची वेस ओलांडून कोंडीबाच्या डोंगराच्या दिशेने निघाली होती. चांदण्याने न्हाऊन निघालेल्या अंधारात फक्त पालखी बरोबर जाणार्या गावकर्यांच्या हातातील मशालींचा उजेड लांबवर दिसत होता. टाळ मृदुंगांचा आवाज आता अगदी क्षीण ऐकू येत होता. सबंध पालखीची मिरवणूक आता काजवे दिसावे इतकी छोटी दिसत होती. पण यमुनाला तो स्पष्ट दिसत होता. अर्धवट रंगलेल्या चेहऱ्याचा, बळकट बाहुंचा, अश्राप हास्य असलेला आणि आता नाव कळलेला…श्री…यमुना त्या उजेडाच्या पुंजक्याकडे बघून जोरात ओरडली-
यमुना-
शिरप्याला कोणीतरी हाक मारल्याचा भास होऊन त्याने खान्भर थबकून मागे वळून बघितल आणि तो डोंगराच्या पायर्या चढू लागला.
कॅब बिल्डींगच्या दारात थांबली आणि ड्रायव्हर म्हणाला-
ड्रायव्हर- सहाशे चाळीस….
नेहाची तंद्री तुटली. ती मयूरेश्वराच्या पालखीतून रत्नेश्वर सोसायटी मध्ये परत आली. कॅबला पैसे देऊन ती यंत्रवत लिफ्ट मध्ये चढली. घर पाचव्या मजल्यावर असूनही तिने top floor च बटण दाबल. लिफ्टमधून बाहेर पडून ती गच्चीवर आली. चारी बाजूला मुंबईच्या अंगावरचे लाखो दिवे लुकलुकत होते. गच्चीच्या कठड्याजवळ जाऊन नेहा नकळत श्रीsss असं जोरात ओरडली.
इथे हॉटेल रूमच्या खिडकीतून बाहेर बघत सिंगल मॉल्त सिप करत असलेल्या निरंजनला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. त्याने चमकून मागे बघितलं. पण त्याच्या सूट मध्ये कोणीच नव्हतं. त्याने वळून काचेबाहेर पाहिलं तेव्हा शेजारी असलेल्या शंकराच्या मंदिराच्या दिशेने जात असलेली पालकी त्याला दिसली. निरंजनच्या अंगावर नकळत शहारा आला.
क्रमश:
भाग ५
………. इथे हॉटेल रूमच्या खिडकीतून बाहेर बघत सिंगल मॉल्त सिप करत असलेल्या निरंजनला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. त्याने चमकून मागे बघितलं. पण त्याच्या सूट मध्ये कोणीच नव्हतं. त्याने वळून काचेबाहेर पाहिलं तेव्हा शेजारी असलेल्या शंकराच्या मंदिराच्या दिशेने जात असलेली पालखी त्याला दिसली. निरंजनच्या अंगावर नकळत शहारा आला. निरंजन तो सगळा पालखी सोहळा काचेतून खरोखर समोर दिसत असल्यासारखा बघत होता. पालखी देवळात पोहोचली आणि निरंजन त्या स्वप्नातून बाहेर आला. आपल्याला हे काय दिसलं आणि का ह्याचा विचार करत त्याने अजून एक ड्रिंक भरलं आणि डोळे मिटून घेतले. त्याला श्री…ए श्री….अश्या हाका मारत शिरप्याच्या मागे धावत असलेली यमुना दिसली. शिरप्याला हाका ऐकू येत होत्या. पण समोर रघु शास्त्रींचा चेहरा पण दिसत होता. शिरप्याला त्याची औकाद आणि रघु शास्त्रींच गावातल वजन दोन्हीची कल्पना होती. त्यांच्या पोरीशी मैत्री झाल्याच त्यांना कळल तर आपली चामडी लोळवतील गाववाले हे तो जाणून होता. म्हणूनच मन मारून यामुनाच्या हाकांना न जुमानता तो वेगाने डोंगर उतरत होता. यमुना त्याला हाका मारत मागे धावत होती. शेवटी यमुना ओरडली-
यमुना- श्री थांब तुला माझी शपथ आहे….
हे ऐकून शिर्प्याच पाऊल थबकल. काही क्षणात यामुनाने त्याला गाठला. धावून भात्यासारखा वर खाली होणारा यमुनाचा उर पाहून शिरप्याच्या शरीरात शिरशिरी आली. त्याने नजर जमिनीकडे वळवली.
यमुना- काय रे श्री? इतक्या हाका मारते आहे पण तू आपला धावतोच आहेस. ऐकू आल्या नाही का हाका?
शिरप्या- नाही…तसं काय नाही…
यमुना- मग थांबला का नाहीस? मी इतकी भयानक दिसते का घाबरायला?
शिरप्या- काहीही काय?
यमुना- काहीही म्हणजे मी भयानक नाही का दिसत?
शिरप्या- …न…नाही….
यमुना- मग कशी दिसते? सांग की….
शिरप्या- ……….
यमुना पुढे झाली. त्याचे हात हातात घेऊन म्हणाली-
यमुना- बोल ना रे श्री. इतके दिवस आपण एकमेकांना बघतोय पण संवाद नाही. तू इतका का घाबरतोस? तुला आवडत नाही का मी? तस असेल तर सांग. मी जातेच कशी.
अस म्हणून यमुना निघाली. शिरप्याने प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तिचा हात धरला आणि म्हणाला-
शिरप्या- नको जाऊ तू…..
यमुना थांबली. म्हणाली-
यमुना- काय करू मी थांबून? तू तर असा पळत राहणार. एक शब्द पण बोलणार नाही. मग काय उपयोग?
शिरप्या- त…तस न्हाई….पण काय बोलू मी? तुम्ही इतक्या मोठ्या घरातल्या आन मी हा असां….
यमुना- असा म्हणजे कसा?
शिरप्या- जाऊ दे ना….आपली मैत्री नकोच….
यमुना- का रे?
शिरप्या मान खाली घालून उभा राहिला. यमुनाला काय झाल ते तिलाच कळल नाही. यमुना पुढे झाली आणि तिने शिरप्याच्या ओठांवर आपले ओठ टेकले. तिच्या ओल्या रसरशीत ओठांच्या स्पर्शाने शिरप्या वितळला. नकळत त्याच्या पोलादी हातांची पकड तिच्या कमरेभोवती पडली. दोन्ही शरीर एकमेकांना भिडली. गोरीपान उफाड्याची यमुना तिच्या शरीराला होत असलेल्या पहिल्याच पुरुष स्पर्शाने वेडी होत होती. शिरप्याने तिला उचलून घेतली होती. इतक्यात पाउस सुरु झाला. दोघांच्या शरीरात लागलेया आगीला पावसाच्या थेंबांनी विझवल. इतकावेळ एकमेकांच्या मिठीत हरवलेले दोघे भानावर आले. यमुना शिरप्याच्या डोळ्यात बघत होती. शिरप्या वास्तवाची जाणीव होऊन धावत डोंगर उतरू लागला. यमुना मात्र गात्रा गात्रात अजूनही उरलेली आग पावसाने विझवत उतारावर चिंब भिजत, अंगावर झालेला शिरप्याचा स्पर्श आठवत चिंब भिजत उभी होती.
निरंजनचा दुसरा पेग संपला आणि जागेपणी दिसणार हे स्वप्न देखील. त्याला कळत नव्हत की हे काय आहे आणि त्याला हे लोक का दिसत आहेत. कोण ही यमुना? कोण शिरप्या? कोण रघु शास्र्ती? कोणत हे गाव आणि हे मला का दिसतय? निरंजन ने उद्या लवकर उठायचं असल्याने ग्लास बाजूला ठेऊन लाईट बंद केला आणि तो झोपी गेला.
सकाळी एअर पोर्टवर नेहाची धावपळ सुरु होती. आलेल्यांची चेकीन, न पोहोचलेल्यांना फोन करणे, एक्सेस लगेज असलेल्या लोकांना समजावणे आणि अशी अनेक काम नेहा व्यवस्थित करत होती. अनु आणि वेंकट तिला शक्य ती मदत करत होते. हर्षद मात्र फोनमध्ये गेम खेळत निवांत बसलेल्या निरंजनच्या शेजारी बसून त्याला इम्प्रेस करता येईल अस काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता. सगळ्याच देशाच्या टीम्समध्ये असा किमान एक नग पहायची सवय असलेला निरंजन त्याच्याकडे दुर्लक्ष करत शांतपणे गेम खेळत होता. हळू हळू बोर्डिंग होऊन विमान हवेत झेपावलं. गोव्याला रिसोर्ट मध्ये सर्वांच्या रूम्स allocate होऊन सगळे फ्रेश होऊन लंचला जमले. लंच नंतर हर्षदच सेशन होत. तो साधारण काय बोलणार हे सर्वांना माहित असल्याने सगळेच जरा डुलक्या काढायची संधी म्हणून त्याकडे बघत होते.
बंक्वेट मध्ये सगळे जमले. नेहाने निरंजनच्या स्वागतच लहानस भासःन केल. ह्या ऑफ साईट चा हेतू स्पष्ट केला आणि हर्षदला त्याच सेशन सुरु करायची विनंती केली. हर्षद ने गेल्या दोन क्वार्टर मध्ये टीमची अचिव्हमेंट, त्यात त्याने स्वतः किती आणि कशी मेहेनत घेतली ह्याचे पाढे वाचायला सुरुवात केली. सगळे बोअर होत ऐकत होते. ह्या दरम्यान निरंजनशी एकदोनदा नजरानजर झाल्यावर नेहाने एक स्मित दिल होत. निरंजन पण आता बोअर होत होता. एकदाच हर्षदच प्रेझेन्टेशन संपल. सर्वांनी औपचारिक टाळ्या वाजवल्या. मग निरंजन बोलायला उभा राहिला. त्याच एकंदर व्यक्तिमत्व, कॉन्फिडन्स, ज्ञान ह्याची प्रचीती सर्वांना त्याच्या प्रेझेन्टेशन मधून येत होती. नेहा सकट सगळेच इम्प्रेस होत होते. नेहाच्या शेजारी बसलेली अनु म्हणाली पण-
अनु- नेहा यार आज रात्री गोवा, इथली दारू, आपल्या हॉटेलचा प्रायव्हेट बीच, चंद्र आणि त्यात स्विमिंग ट्रंक घातलेला निरंजन बरोबर असेल तर मी रात्रभर झोपणार नाही.
नेहा- हो का? काय करशील?
अनु- नको ते विचार डोक्यात नको आणू. कामावर लक्ष लागणार नाही दिवसभर यार….निरंजन काय सेक्सी आहे यार. तुला नाही का आवडला?
नेहाने तिला फक्त एक स्माईल दिल आणि म्हणाली-
नेहा- त्याच्या प्रेझेन्टेशन कडे लक्ष दे. ते सत्य आहे. बाकी तो बीच, दारू, चंद्र आणि स्विमिंग ट्रंक मधला निरंजन हे स्वप्न आहे….
अनु चेहरा वाकडा करून निरंजन च प्रेझेन्टेशन बघू लागली. त्याच्या सेशन नंतर टीम बिल्डींग गेम्स आणि work life balance वर एक सेशन झाल. सगळे आपापल्या रूम मध्ये गेले. रात्री गार्डन मध्ये पार्टी होती.
रात्री गार्डन रेस्तोरंत छान दिव्यांनी सजवलं होत. शिवासचा बुधला नळ लावून बार कौन्तर वर ठेवला होता. इतर स्टफने बार जय्यत तयार होता. हळू हळू एक एक जण जमू लागले. बार भोवतालची टेबल्स लगेच भरली. पोरं नळातून शिवास ह्या कल्पनेनेच येडी झाली होती. सगळे जीवाचा गोवा करण्यात मश्गुल झाले. DJ कडक नंबर्स लावत होता. पोर पोरींनी डान्स फ्लोअर गाठला. सगळ्यांचे पाय थिरकू लागले. हातात ग्लास धरून शांत उभ्या असलेल्या नेहाला दोन ड्रिंक्स नंतर जरा हवेत असलेली अनु डान्स फ्लोअर वर ओढत होती. नेहा नको म्हणून शांत उभी होती. बीचवरून येणाऱ्या खार्या आणि ओलसर वाऱ्याचा आनंद घेत होती. नेहा ह्या गोंगाटाला कंटाळून मागच्या दाराने हॉटेलच्या प्रायव्हेट बीच वर आली. नारळाच्या झाडांनी आच्छादित किनारा ओलांडून ती वाळूत आली. आकाशात चंद्र होता आणि समोर अथांग समुद्र. त्याची गाज मनात धडकी भरवत होती. तो समुद्र नेहाला आपल्याकडे आकर्षित करत होता. गाजेतून साद घालत होता. नेहा भुरळ पडल्यासारखी समुद्राकडे बघत होती. तेवढ्यात समुद्रातून बाहेर येत असलेला पिळदार शरीराचा, फक्त स्विमिंग ट्रंक ल्यालेला निरंजन तिच्या नजरेस पडला. नेहाला अचानक मयूरेश्वराच्या देवळातील घंटानाद आणि कोंडीबाच्या डोंगरावर यमुनेला शिरप्याने केलेला पहिला स्पर्श आठवू लागला. निरंजन तिच्याच दिशेने चालत येत होता. त्याला नेहाच्या जागी रघु शास्त्रींची यमुना दिसत होती. समुद्र आपली गाज वाढवत होता. चंद्र झावळ्यातून वाकून पुढे काय होणार हे बघायला उत्सुक होता. काळ पत्ते पिसत हसत होता.
क्रमश:
भाग ६
तेवढ्यात समुद्रातून बाहेर येत असलेला पिळदार शरीराचा, फक्त स्विमिंग ट्रंक ल्यालेला निरंजन तिच्या नजरेस पडला. नेहाला अचानक मयूरेश्वराच्या देवळातील घंटानाद आणि कोंडीबाच्या डोंगरावर यमुनेला शिरप्याने केलेला पहिला स्पर्श आठवू लागला. निरंजन तिच्याच दिशेने चालत येत होता. त्याला नेहाच्या जागी रघु शास्त्रींची यमुना दिसत होती. समुद्र आपली गाज वाढवत होता. चंद्र झावळ्यातून वाकून पुढे काय होणार हे बघायला उत्सुक होता. काळ पत्ते पिसत हसत होता. निरंजनाला बघून नेहा जगाच्या जागी जणू गोठली होती. निरंजन ने बाहेर येऊन तिच्या शेजारी असलेल्या बेंच वर ठेवलेला रोब अंगावर चढवला आणि म्हणाला-
निरंजन- हाय नेहा…पार्टी सोडून तू इथे कशी?
नेहा- स…सहज…बोअर झाले….इथे बीचवर वारा, चांदण, समुद्राची गाज आणि शांतता आहे. मला गोव्यात तेच जास्त आवडत.
निरंजन- हम्म…बीच वर काय आणि कसं एन्जॉय करायचं हे बहुतेक लोकांना कळत नाही. समुद्र म्हणजे खूप गंभीर, matured गोष्ट आहे. त्यावर होड्या चालवून स्पोर्ट वगैरे करण्यात मजा नाही. मजा आहे त्याच्या आत शिरून, त्याला अनुभवण्यात. समुद्र इतका बलवान असून आपल्याला बुडू देत नाही. फक्त आपला स्वतःवर आणि त्याच्यावर विश्वास हवा. तू गेली आहेस कधी समुद्रात पोहायला?
नेहा- न..नाही…पोहायला as such नाही….पण पाय भिजवायला, डुंबायला गेले आहे अनेकदा…
निरंजन- मग चल…आज समुद्रात पोहायचा आनंद घे…
नेहा- (आश्चर्याने) क…काय?
निरंजन- तेच जे मी म्हणालो. येतेस का समुद्रात?
नेहा- न…नको…
निरंजन- का?
नेहा- म..मला भीती वाटते…
निरंजन – अग मी आहे ना? भीती कसली त्यात? तुला बुडून देणार नाही मी. माझ्यावर विश्वास आहे ना?
त्याने तो प्रश्न इतक्या मनापासून विचारला की नेहा बोलून गेली-
नेहा- तुमच्यावर विश्वास आहे…no doubt…पण…पण मी prepared नाहीये…बघा ना हा पार्टीचा ड्रेस…
निरंजन- ड्रेस वगैरे लोकांसाठी. समुद्राला काहीच फरक पडत नाही. ये बिनधास्त हाच ड्रेस घालून. पार्टीचा ड्रेस घालून समुद्रात उतरणारी तू जगातील दहा लोकांपैकी एक असशील…
नेहाला आता नाही म्हणण शक्य नव्हत. आपले हाय हिल शूज काढून, क्लच आणि मोबाईल तिथेच बेंचवर ठेऊन नेहा निरंजनच्या मागोमाग चालू लागली. निरंजनच्या मागोमाग समुद्रात शिरली. समुद्राच्या थंड पाण्याने तिच्या अंगावर शिरशिरी आली. पाणी कंबरेच्या वर आल्यावर पाय जमिनीवर ठेवण कठीण होऊन नेहा पोहू लागली. अचानक निरंजन तिच्या जवळ येईन म्हणाला-
निरंजन- नेहा पोहू नको. फक्त पालथी पडून फ्लोट हो…
निरंजन फ्लोट होऊ लागला. नेहा पण पालथी पडून फ्लोट होऊ लागली. दोघांना आकाशात असंख्य चांदण्या आणि गोल गोल पिठूर चंद्र दिसत होते. नेहाला मयूरेश्वराच्या मागच्या मैदानात आकाशात चंद्र बघत पालथे झोपलेले यमुना आणि शिरप्या दिसू लागले. यामुनेने वळून शिरप्याच्या छातीवर डोक ठेवलं आणि त्याच्या छातीवरच्या केसांशी खेळत म्हणाली-
यमुना- श्री मी घरी सांगू का? आपण लगेच लग्न करू…
शिरप्या- तू येडी आहेस का? घरी सांगितल तर शास्त्रीजी मला वेशीवर टांगून सोलून काढतील.
यमुना- मग काय करायचं? हे असचं किती दिवस भेटायचं? मला भीती अजिबात वाटत नाही. तूच घाबरतोस.
शिरप्या- आग येडे आपल्या दोघात जमीन आसमानाचा फरक आहे. चार दोन वेळा असे भेटू आणि तुझ्या बापाने पोरगा शोधला की तू जा लगीन करून आणि मी जातो माझ्या रस्त्याने. उगाच वेडी स्वप्न बघू नको आणि कोणाला दाखवू पण नको.
यमुना- मी प्रेम करते तुझ्यावर श्री….ते फक्त मजा मारायला नाही. मी मनातून तुला वरला आहे. आता दुसरा कोणीही माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही.
शिरप्या उठून बसला. म्हणाला-
शिरप्या- यमे, उद्यापासून आपण नाही भेटायचं. मला विसर.
यमुना- ते शक्य नाहीये आता श्री….
शिरप्या- अशी वेड्यागत नको वागू यमे…आपण एकत्र येण शक्य नाहीये…ऐक माझं…
यमुना पुढे झाली. शिरप्याची हनुवटी धरून म्हणाली-
यमुना- श्री…हेच माझ्या डोळ्यात बघून सांग….
शिरप्याने खाली असलेली नजर वर केली. यमुनेच्या डोळ्यात आणि स्पर्शात ओढ होती, आवाहन होत…नजरानजर झाल्यावर यमुनेने शिरप्याचे ओठ आपल्या ओठांनी करकचून बंद करून टाकले. शिरप्या काहीही बोलायच्या मन:स्थितीत राहिला नाही. दोघे बेभान होऊन एकमेकांच्या मिठीत विरघळत होते. देवळाच्या भिंती आडून गुरवाचा हणम्या त्या दोघांना त्या अवस्थेत बघून धोतरात होत निर्माण झालेले वादळ सांभाळत आता गावात ही बातमी किती तिखट मीठ लावून सांगितली की रघु शास्त्र्याची जास्तीतजास्त बदनामी होईल ह्याचा विचार करत होता!
हे दृश्य डोळ्यासमोर दिसत असलेला निरंजन विचार करत होता की हे लोक कोण आहेत आणि मला का दिसतात? ते पण जागेपणी? हणम्याला बघून घाबरलेल्या नेहाच्या पायात अचानक गोळा आला. दोघे तरंगत बरेच आत पर्यंत आले होते. नेहाने पाय टेकायचा प्रयत्न केला पण पाणी डोक्याच्या वर होत. तिने पोहायचा प्रयत्न केला पण पायात गोळा आल्यामुळे तिला पोहोता येत नव्हत. तिने निरंजनच्या खांद्याचा आधार घेतला. निरंजन तिला धरून किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला. लाटांच पाणी नेहाच्या नाकातोंडात जात होत. फक्त निरंजनचा आधार असल्याने ती बुडत नव्हती. निरंजन ने तिला कशीबशी किनार्यावर आणली. नाकातोंडात पाणी जाऊन नेहाची शुद्ध हरपली होती. निरंजन प्रचंड घाबरला होता. त्याने नेहाला वाळूवर झोपबून तिच्या पोटावर वजन देत तोंडावाटे पाणी बाहेत काढलं. तरी नेहा शुद्धीवर येत नव्हती. त्याने तिच्या तळ हाताला आणि पावलांना मसाज केला. तरीरी नेहा बेशुद्ध होती. शेवटी निरंजन ने तिला तोंडावाटे श्वास द्यायला तिच्या ओठावर ओठ टेकले. दोन तीन वेळा श्वास दिल्यानंतर नेहाला ठसका लागला आणि नेहा शुद्धीवर आली. निरंजन ने शेवटचा श्वास द्यायला तिच्या ओठांवर ओठ टेकले आणि नेहाला काहीतरी ओळखीची जाणीव झाली. इतका वेळ काहीच हालचाल नसलेल्या नेहाच्या ओठांनी निरंजनचा ओठ हलकेच धरला. निरंजनला काहीतरी ओळखीची जाणीव झाली. त्याने आपल्या ओठांची पकड घट्ट केली. नेहाचा एक हात त्याच्या केसात आणि दुसरा त्याच्या उघड्या पाठीवर फिरू लागला. दोघे चुंबनात हरवून गेले. इतक्यात बीचवर फेरी मारायला आलेल्या हर्षदला ते दृश्य दिसलं! त्या दोघांना त्या अवस्थेत बघून विजारीत निर्माण झालेले वादळ सांभाळत हर्षद ने मोबाईल सरसावून व्हिडीओ काढायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर पण तोच आसुरी आनंद होता जो हणम्याच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षांपूर्वी होता. निरंजन आणि नेहा चुंबनात बेभान होते. हर्षद चवीने व्हिडीओ काढत होता. चंद्र काळाचा महिमा एक साक्षीदार म्हणून बघत होता. समुद्र धीरगंभीर गाजेच्या आवाजात हसत होता.
क्रमश:
भाग ७
…….. नेहाचा एक हात त्याच्या केसात आणि दुसरा त्याच्या उघड्या पाठीवर फिरू लागला. दोघे चुंबनात हरवून गेले. इतक्यात बीचवर फेरी मारायला आलेल्या हर्षदला ते दृश्य दिसलं! त्या दोघांना त्या अवस्थेत बघून विजारीत निर्माण झालेले वादळ सांभाळत हर्षद ने मोबाईल सरसावून व्हिडीओ काढायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर पण तोच आसुरी आनंद होता जो हणम्याच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षांपूर्वी होता. निरंजन आणि नेहा चुंबनात बेभान होते. हर्षद चवीने व्हिडीओ काढत होता. काही मिनिटात नेहा भानावर आली. आपल्या अंगावर झोपलेल्या उघड्या देहाच्या निरंजनला तिने मागे लोटला. तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. ती उभी राहून धावत हॉटेलच्या दिशेने निघाली. तिला येताना पाहून हर्षद झाडामागे लपला. नेहा हॉटेलात गेली. वाळूत पडलेला निरंजन नेहा गेली त्या दिशेने बघत प्रचंड गोंधळात पडला होता.
नेहा वाटेत कुठेही न थांबता रूमवर आली. दार बंद करून बाथरूम मध्ये गेली. थंड पाण्याचा शावर सुरु करून बाथ टब मध्ये बसली. तिच्या डोळ्यासमोर तो बीच, निरंजन, तिचं समुद्रात जाण आणि मग तिच्या अंगावर झोपलेला निरंजन आणि त्यांच चुंबन दिसू लागल. नेहाला प्रचंड रडू येऊ लागल. तिने शावर फुल जोरात सुरु केला. गरम पाणी सुरु केल. समोरच्या आरशात दिसत असलेल तिचं प्रतिबिंब आरशावर जमा होणार्या वाफेत विरून गेल. बाथरूम मध्ये आता वाफ पसरली होती. नेहा डोळे मिटून टब मध्ये बसून होती.
चार पाच ड्रिंक नंतर हाय झालेला हर्षद त्याच्या रूम मध्ये बसून त्यानेच काढलेला निरंजन आणि नेहाचा व्हिडीओ डोळे विस्फारून बघत होता. चार पाच पारायण झाल्यावर अजून एक पेग भरून हर्षद विचार करू लागला की ह्या व्हिडीओचा उपयोग कशाकशासाठी करता येईल? निरंजनला blackmail करून डबल प्रमोशन आणि तिप्पट पगार मिळवता येईल? की नेहाला blackmail करून तिच्याबरोबर झोपायचं जून स्वप्न पूर्ण करता येईल?….की की दोन्ही करता येईल? वाट्टेल तेव्हा वाट्टेल तस? ह्या विचाराबरोबर हर्षदने तो व्हिडीओ ऑफिसच्या ग्रुप्स मध्ये व्हायरल करायचा विचार सोडून दिला. सार्वजनिक नेत्रासुख वाटण्यापेक्षा फक्त स्वतःसाठी आर्थिक आणि शारीरिक सुख मिळवणार होता तो. हर्षद प्रचंड खुश होता. त्याला त्या व्हिडीओ मध्ये निरंजनच्या जागी तो स्वतः दिसत होता. त्याच्या पोटात त्या विचारानेच गुदगुल्या होत होत्या. उद्या निरंजन आणि नेहाशी बोलून सौदा तोडायचा त्याचा विचार होता. इथून परत जाताना तो एका खिशात प्रमोशन आणि दुसर्या खिशात नेहा घेऊन निघायच्या तयारीत होता. त्याने उरलेली शिवास एका घोटात घशात ओतली आणि दिवा बंद केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे एक एक करत ब्रेकफास्ट साठी रेस्तोरंत मध्ये येत होते. कंपनीच्या पैशाने फुकट आणि ती पण स्कॉच मिळाल्यावर काल हावरटपणाने ढोसलेल्या काही लोकांच्या डोक्याची शीर तडतडत होती. मग तू यार जेवला नाहीस ना ते बरोबर नाही, आधी जेऊन पोटात लेयर करून मग प्यायची ..त्रास होत नाही, आता फक्त लिंबू पाणी घे अश्या दारूबद्दल चर्चा सुरु होत्या तश्याच एका दोघांनी ऑफिसातल्या कलीगला सर्वांच्या नकळत रूमवर नेऊन केलेल्या मजेचे किस्से पण रूमवर नेणारी मुल आणि रूमवर गेलेल्या मुली आपापल्या खास फ्रेंड्सना रंगवून सांगत होते. इतर वेळी ऑफिसच्या गॉसिप मध्ये रमणाऱ्या हर्षदला आज त्यात अजिबात रस नव्हता. तो त्याची सावज यायची वाट बघत होता.
इतक्यात त्याला निरंजन येताना दिसला. काल पर्यंत निरंजन पाठमोरा दिसला तरी टरकून उभा राहणारा हर्षद आज निरंजन त्याच्या टेबल जवळ येऊन हाय हर्षद म्हणाल्यावर त्याला हाय म्हणायला देखील उभा राहिला नाही. आपल्या प्लेट मधल्या ham sandwich चा चावा घेत फक्त हाताने निरंजनला थम्स अप करून तो ज्यूस पिऊ लागला. ही गोष्ट जराशी खटकलेला निरंजन त्याला पडलेल्या इतर टीम मेम्बेर्सच्या घोळक्यात, त्यांच्याशी बोलण्यात हे विसरून गेला. पोरांना पण इतका मोठा साहेब, आपल्या फर्मचा पार्टनर आपल्या बरोबर ब्रेकफास्ट करतोय ह्यात आनंद वाटत होता. मुलांचे अनेक प्रश्न होते. कंपनी, ग्रोथ, करियर, निरंजन कसा ग्रो झाला, त्याचा सल्ला असे अनेक. निरंजन ला सगळ्या देशात हेच प्रश्न विचारले जात असल्याने उत्तर पाठ होती. सर्वांना उत्तर देऊन त्याने शेवटी विचारलं “आता मी थोडा ब्रेकफास्ट करू का? बाकी प्रश्न आजच्या सेशन मध्ये विचारा.” सगळे हसले आणि बाजूला झाले. निरंजन प्लेट घेऊन स्प्रेडजवळ येऊन काय काय आहे बघू लागला. त्याला हव असलेलं त्याने सर्व्ह करून घेतलं. एका सनी साईड अप ची ऑर्डर शेफला प्लेस करून तो एका कोपऱ्यातल्या टेबल वर येऊन बसला. काचेतून स्वच्छ दिवस दिसत होता. रात्री बहुतेक पाउस पडल्याने अजूनही झाडांच्या पानांवर जमा झालेले पाण्याचे थेंब दिसत होते. निरंजनला अचानक निहाची आठवण आली. ती ब्रेकफास्टला आली की नाही हा विचार मनात आला. त्याने हर्षदला हाक मारली. हर्षद येऊन त्याच्या समोर बसला.
निरंजन- हर्षद, नेहा दिसत नाहीये. ती आली नाही का ब्रेकफास्टला? आय मी तब्बेत बरी आहे ना तिची?
हर्षद निरंजनच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला-
हर्षद- ते तुलाच माहित असेल. काल बीच वरून नंतर तिच्या रूम मध्ये गेला नाहीस का तू?
हे ऐकून निरंजन हादरला.
निरंजन- what? तू कोणासमोर बोलतो आहेस माहित्येय ना हर्षद? आणि हे काय बोलतो आहेस तू?
हर्षद- जे पाहिलं ते बोलतोय मी निरंजन…
निरंजन- काय पाहिलस तू?
हर्षद- काल तुमची बीच वरची रासलीला बघितली मी.
निरंजन- मूर्ख आहेस तू. नेहा बुडत होती. नाकातोंडात पाणी जाऊन बेशुद्ध झाली होती. मी तिला कृत्रिम श्वास देत होतो आणि….
हर्षद- आणि काय?
निरंजन- आ…आणि we got carried away for a minute and that’s it…
हर्षद- करेक्ट…आणि ते carried away नेमक मी बघितलं.
निरंजन- so what? तुला काय वाटत तू जाऊन हे ऑफिसात सांगशील आणि लोक विश्वास ठेवशील? Grow up dude. तुला मी ह्या misbehaviour बद्दल आत्ता ह्या क्षणी sack करू शकतो.
हर्षद- नाही निरंजन. तू मला ऑफिसात गेल्यावर माझ्या outstanding and exceptional performance साठी डबल प्रमोशन देणार आहेस आणि माझा पगार तिप्पट करणार आहेस.
निरंजन आता मात्र चिडला आहे.
निरंजन- हर्षद तुला वेड लागल आहे. आणि anyway you are fired हर्षद. तुझी bag pack करून निघ. तुझ termination letter दहा मिनिटात तुझ्या इनबॉक्स मध्ये असेल.
हर्षद जोरात हसला आणि म्हणाला-
हर्षद- ज्या क्षणी माझ्या इनबॉक्स मध्ये termination letter येईल त्याच्या दुसऱ्या क्षणाला एक व्हिडीओ आपल्या जगभरच्या सर्व कलीग्सच्या आणि जगातील करोडो लोकांच्या इनबॉक्स आणि whatsapp वर पोहोचेल हे लक्षात ठेव.
निरंजन- what video?
हर्षद ने तो व्हिडीओ निरंजनला पाठवला. निरंजन तो व्हिडीओ बघून हादरला. त्याची एक्स्प्रेशन बघून हर्षदाला हसू आल.
हर्षद- माझ्या ह्या अचानक प्रमोशन साठी तुला काय काय करावं लागेल ह्याचा विचार करून ठेव निरंजन. मला प्रमोशन लगेच हवंय. (मोबाईल मध्ये बघत) व्हिडीओ सेंट….
निरंजन- (घाबरून) को…कोणाला पाठवलास तू व्हिडीओ?
हर्षद- घाबरू नको. बाहेरच्या कोणाला नाही. आपल्या नेहा डार्लिंगला पाठवला आहे. तू प्रमोशन दिलंस. आता ती पण काहीतरी देईल ना मला? आलोच मी. बाय…
हर्षद तिथून निघाला. निरंजनच्या पायाखाली जमीन हलली होती. तो प्रचंड टेन्स होता. इथे रात्रभर जागरण झाल्याने डोळे लाल झालेल्या नेहाला ब्रेकफास्ट करायचा मूड नव्हता. मुख्य म्हणजे निरंजन समोर आल्यावर त्याला कसं फेस करायचं हा विचार तिचं मन पोखरत होता. तेवढ्यात तिच्या फोनचा मेसेज टोन वाजला. नेहाने बघितल तर हर्षद्चा मेसेज. तिने व्हिडीओ डाउनलोड केला. तो व्हिडीओ बघून नेहा प्रचंड घाबरली. त्याखाली आलेला हर्षदचा मेसेज होता. दार उघड ठेव. मी येतोय. निरंजन परदेशातून येऊन मेवा खाणार आणि आम्ही असेच उपाशी काय? आज पोटभर नाश्ता करणार आहे. नाही म्हणालीस तर तुझ्या मेनू कार्डचा हा व्हिडीओ व्हायरल करेन. हे वाचून नेहाच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने पडू लागले आणि तितक्यात रूमची डोअर बेल वाजली. त्या एसी रूम मध्ये काही क्षणात घामाने भिजलेल्या नेहाने घाबरून दाराकडे बघितल.
क्रमश:
भाग ८
तो व्हिडीओ बघून नेहा प्रचंड घाबरली. त्याखाली आलेला हर्षदचा मेसेज होता. दार उघड ठेव. मी येतोय. निरंजन परदेशातून येऊन मेवा खाणार आणि आम्ही असेच उपाशी काय? आज पोटभर नाश्ता करणार आहे. नाही म्हणालीस तर तुझ्या मेनू कार्डचा हा व्हिडीओ व्हायरल करेन. हे वाचून नीच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने पडू लागले आणि तितक्यात रूमची डोअर बेल वाजली. त्या एसी रूम मध्ये काही क्षणात घामाने भिजलेल्या नेहाने घाबरून दाराकडे बघितल. बेल परत वाजली. नेहाला दार उघडायची हिम्मत होत नव्हती. बेल परत परत वाजत होती. नेहा घाबरत एक एक पाउल टाकत दारापर्यंत गेली आणि तिने दाराच्या मुठीला हात लावला. दार उघडल्यावर काय होईल ह्याच्या विचाराने तिला शिसारी आली. बेल परत वाजली. नेहाने दार उघडलं. दारात निरंजन उभा होता. त्याला बघताच नेहाने त्याला दारातच घट्ट मिठी मारली. निरंजन तिला आधार देत आत घेऊन आला. त्याने मागे दार लावून घेतलं.
नेहा ओक्साबोक्शी रडत होती. तिच्या अश्रूंनी निरंजनच्या शर्टची बाही ओळी झाली. दोघे बेडवर बसले. निरंजन तिच्या पाठीवर हात फिरवत होता. रडण्याचा भार ओसरल्यावर नेहाने फोन हातात घेऊन निरंजनला हर्षद ने पाठवलेला व्हिडीओ आणि मेसेज दाखवला. निरंजन म्हणाला-
निरंजन- माहित आहे मला. हर्षद मला सकाळीच भेटला आणि मला हा व्हिडीओ दाखवून डबल प्रमोशन डिमांड केल आहे त्याने.
हे ऐकून नेहा त्याच्याकडे अविश्वासाने बघू लागली.
नेहा- मग…आता काय करायचं आपण? निरंजन त्याने हा व्हिडीओ चुकून देखील कोणाशी शेयर केला ना तर I will be ruined….
निरंजन- तो तसं करणार नाही.
नेहा- कशावरून?
निरंजन- नेहा, मी बिझनेसमन आहे. आपल्या फर्मचा पार्टनर आहे. मला लोक वाचता आणि ओळखता येतात. हर्षदाला माहित आहे की त्याने हा व्हिडीओ शेयर केला तर त्याला काहीच मिळणार नाहीये. पुढली नोकरी पण नाही. मी त्याला आयुष्यातून उठवेन. लहानात लहान कंपनी पण त्याला नोकरीवर ठेवणार नाही. त्याचं करियर आणि तो संपतील. त्या बदल्यात आपल्या दोघांची बदनामी होईल. पण त्यानंतर हर्षद संपेल आणि हे तो ओळून आहे.
नेहा- मग काय करायचं आपण? निरंजन तो व्हिडीओ त्याच्या मोबाईल मधून काहीही करून डिलीट करा…प्लीज….
निरंजन- मी त्यासाठीच इथे आलोय. Are you okay now?
नेहा- हम्म…
निरंजन- ओके. मी हर्षदला इथे बोलावतो. तू फक्त शांत रहा.
नेहा- ओके…पण मला भीती वाटते आहे.
निरंजन- do you trust me?
नेहा- हो निरंजन.
निरंजन- मग शांत रहा आणि मजा बघ आता.
निरंजनने हर्षदाला फोन लावून नेहाच्या रूम मध्ये बोलावून घेतला. दोनच मिनिटात हर्षद आला.
हर्षद- अरे वा. मजनू आता खुले आम लैलाच्या रूमवर? बर आहे.
निरंजन- हर्षद कामच बोलूया?
हर्षद- हो. वेळ कमी आहे….तुमच्याकडे.
हे बोलून हर्षद निर्लज्ज हसला.
निरंजन- तो व्हिडीओ डिलीट करायच्या बदल्यात तुला काय हवय?
हर्षद- सांगितल ना मी मगाशी? डबल प्रमोशन, ट्रिपल पगार आणि नेहा बरोबर किमान एक रात्र.
निरंजन- पहिल्या दोन अटी मान्य आहेत. तिसरी मान्य नाही.
हर्षद- हेलो निरंजन मी तुम्हाला चोईस देत नाहीये. माझ्या अटी सांगतोय. तुम्ही negotiation च्या पोझिशन मध्ये नाही आहात.
निरंजन- मी तिसर्या अटीच्या बदल्यात दहा लाख रुपये द्यायला तयार आहे. आणि ते तुला मान्य नसेल तर तो व्हिडीओ लगेच व्हायरल कर आणि मग आयुष्यभर तोच बघत बस. कारण नंतर मी तुला एक स्मार्ट फोन घ्यायच्या लायकीचा देखील ठेवणार नाही. आणि मी हे करू शकतो हे तुला माहित आहे हर्षद. लवकर बोल. पुढल सेशन माझ आहे. सगळे माझी वाट बघत असतील.
हर्षदला काय रीएक्त करायचं कळत नव्हत. निरंजन अस काही बोलेल ही त्यच्या बालबुद्धीला अपेक्षाच नव्हती.
निरंजन- हर्षद I am waiting. वेळ नाहीये माझ्याकडे.
हर्षद- ओके. मी तयार आहे. पण प्रमोशन लेटर आणि इन्क्रिमेंट मला लगेच लागेल आणि तू ते लगेच देऊ शकतोस हे तुला माहित आहे.
निरंजन- (हसून) हुशार आहेस.
इतक बोलून निरंजन ने इंडिया एचआर हेडला फोन करून हर्षदच प्रमोशन आणि इन्क्रिमेंट लेटर द्यायला सांगितल. त्यावर तो स्वतः सही करेल अस म्हणाला. आता रूम मध्ये ते तिघे होते. एक ओक्वर्द सायलेन्स होता. हर्षदच्या मनात उकळ्या फुटत होत्या.
हर्षद- आणि माझे दहा लाख रुपये?
निरंजन- चेक किंवा बँक ट्रान्स्फर केले तर तुला ३ लाख tax भरावा लागेल. मी कॅश देऊ?
हर्षद- मला कॅशच हवी आहे.
निरंजन- आज संध्याकाळी मिळेल.
इक्यात निरंजनच्या मेल बॉक्स मध्ये हर्षदच लेटर आल. निरंजन ने ते हॉटेलला मेल करून हर्षद्लाच त्याचा प्रिंट आउट काढायला पाठवला. तो गेल्यावर एचआर हेड ला फोन करून नेहाला हर्षदच्या वरची पोझिशन देऊन हर्षदच रिपोर्टिंग नेहाला करायची तजवीज केली. नेहा अविश्वासाने हे बघत होती. इतक्यात हर्षद आला. त्याने लेटर निरंजनला दिल. निरंजन ने सही करायला पेन काढाल आणि म्हणाला-
निरंजन- हर्षद तुझा मोबाईल दे. मला खात्री आहे कि तू ह्या व्हिडीओचा कोणताही back up वगैरे घेतलेला नाहीयेस. कारण तू जाणतोस की ही अशी नाणी बाजारात एकदाच चालतात. परत चालवायला गेल तर त्यांची किंमत शून्य असते.
हर्षद- right…
हर्षद ने त्याचा मोबाईल निरंजनच्या हातात दिला. निरंजन ने तो व्हिडीओ स्वतःच्या हाताने डिलीट केला. त्या लेटरवर सही केली आणि ते हर्षदच्या हातात दिल.
हर्षद- thanks निरंजन. आता मी निघतो. आणि नेहा ते दहा लाख द्यायची आठवण कर निरंजनला नाही तर आज रात्री आपण….
हर्षद निर्लज्ज हसून निघून गेला. निरंजन ने त्याच्या आणि नेहाच्या मोबाईल मधून तो व्हिडीओ डिलीट केला. त्याने फ्रीज उघडून नेहाला पाण्याची बाटली दिली. नेहा अजूनही सुन्न होती.
निरंजन- नेहा आता शांत हो. तो व्हिडीओ आता नष्ट झालाय.
निरंजन ने नेहाचा हात हातात घेतला आणि तो तिचा हात थोपटू लागला. नेहाच्या डोळ्यात बघता बघता त्याला कोंडीबाच्या डोंगरावर धपापत्या उराने धावत आलेली यमुना दिसू लागली…
यमुना- श्री…अरे बाबांना कळलय आपल्या बद्दल….
शिरप्या- पण कस?
यमुना- त्या गुरवाच्या हणम्याने आपल्याला बघितलं आणि गावात बोभाटा केलाय.
हे ऐकून शिरप्या घाबरला. म्हणाला-
शिरप्या- आता माझी खैर नाही…
यमुना- अस का म्हणतोस? आपण पळून जाऊ. चल आत्ता लगेच…लांब कुठेतरी जाऊ आणि आपल चान जग वसवू.
शिरप्या- तुला वाटतं तितक सोप नाहीये ते. शास्त्री आपल्याला कुठूम बी हुडकून काढतील आणि मग मला लोक ठेचून ठेचून मारतील.
हे ऐकून यामुंच्या डोळ्यात पाणी आल. ती शिरप्याला बिलगली. म्हणाली- यमुना- नाही श्री… मी जिवंत असे पर्यंत मी अस होऊ देणार नाही.
इतक्यात मागून रघुशास्त्रींचा आवाज आला-
रघुशास्त्री- मग यमे तुला आधी मराव लागेल. मारा रे…वात काय बघताय?
त्यांच्या बरोबर आलेले सात आठ लोक यामुनाच्या अंगावर चालून आले. एकाने तिच्या डोक्यात घालायला काठी उगारली. ते पाहून तिला मागे करून शिरप्या पुढे झाला आणि त्याने तो वार आपल्या कपाळावर झेलला. कपाळ फुटून रक्ताची चिळकांडी यामुनच्या चेहऱ्यावर उडाली…ते पाहून यमुना किंचाळली आणि इथे नेहा अचानक किंचाळली-
नेहा- श्रीssssss…..बाबा नका मारू श्री ला….मी पाया पडते तुमच्या….
नेहा निरंजनच्या डोक्यावरून हात फिरवत रडत होती. म्हणाली-
नेहा- किती रक्त येतंय रे श्री….कोणीतरी ह्याला वैद्यांकडे न्या….
इतकावेळ तिच्याकडे अविश्वासाने बघत असलेल्या निरंजनने आपल्या डोक्यावर असलेला तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला-
निरंजन- नाही यमे….मी असा मारणार नाही. तुझी साथ कधीच सोडणार नाही…
हे ऐकून नेहा त्याच्याकडे डोळे विस्फारून बघू लागली. इतक्यात हॉटेल रूमची बेल वाजली. ते दोघे भानावर आले. पण आत्ता काय झालं ते दोघांना व्यवस्थित आठवत होते. दोघांचा जे झाल त्यावर विश्वास बसण अशक्य होत. दाराची बेल वाजत होती. हे दोघे भूतकाळ आणि वर्तमान ह्यांच्या मधे एका अनाकलनीय विवरात खोल खोल जात होते. काळ पत्ते पिसून पुढली पानं वाटत हसत होता.
क्रमश:
भाग ९
निरंजन- नाही यमे….मी असा मरणार नाही. तुझी साथ कधीच सोडणार नाही…
हे ऐकून नेहा त्याच्याकडे डोळे विस्फारून बघू लागली. इतक्यात हॉटेल रूमची बेल वाजली. ते दोघे भानावर आले. पण आत्ता काय झालं ते दोघांना व्यवस्थित आठवत होत. दोघांचा जे झाल त्यावर विश्वास बसण अशक्य होत. दाराची बेल वाजत होती. हे दोघे भूतकाळ आणि वर्तमान ह्यांच्या मधे एका अनाकलनीय विवरात खोल खोल जात होते. बेल परत वाजली. भानावर येत ड्रेस सारखा करत दार उघडलं. दारात अनु आणि वेंकट होते. निरंजन आत असलेला माहित नसल्याने दोघे बडबड करत आत घुसले. आत बेडवर बसलेल्या निरंजनला बघून दोघंही दचकले. शांत झाले.
अनु- सर तू…तुम्ही इथे?
निरंजन- हो. माझ्या प्रेझेन्टेशन साठी काही डेटा हवा होता. तो नेहाकडून घ्यायला आलो होतो. तुमचा ब्रेकफास्ट झाला का?
वेंकट- हो सर…
निरंजन- कसं वाटतय रिसोर्ट?
अनु- अमेझिंग सर. खूप मस्त आहे.
निरंजन- वेंकट काल रात्रीच्या पार्टीत तू काराओके गाण गायलास ते मस्त होत. साउथ इंडियन होत त्यामुळे बोल कळले नाही. पण चाल मस्त होती.
वेंकट- thanks सर…
निरंजन- ओके नेहा..मी निघतो. कॉन्फरन्स हॉल मध्ये भेटू. Take care.
नेहा- हो..बाय…
निरंजन गेला.
अनु- आयला नेहा तू सोलिड आहेस. निरंजन सर तुझ्या खोलीत?
नेहा- आता त्यांना डेटा हवा होता आणि तो माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये होता आणि पेन ड्राईव्ह रूम मध्ये. मग रूम मध्ये नाही येणार ते तर काय टेरेस वर जातील का?
अनु- एनी वे आम्ही तुला बरोबर न्यायलाच आलो होतो. चल. आज हाफ डे सेशन आहे आणि मग साईट सीइंग आहे लक्षात आहे ना?
नेहा- आहे. सगळ लक्षात आहे. चला.
कॉन्फरन्स हॉल मध्ये सगळे जमले होते. निरंजन प्रेझेन्टेशन करत होता. सगळे इम्प्रेस होऊन ऐकत होते. हर्षद निर्लज्ज हसत एकदा निरंजन आणि एकदा नेहाकडे बघत होता. लंच नंतर सगळे परत जमल्यावर निरंजन ने हर्षदच्या प्रमोशनची घोषणा केली. हर्षद खुश झाला. निरंजन पुढे म्हणाला-
निरंजन- अजून एक महत्वाची अनौन्स्मेंत करायची आहे. हर्षद उद्यापासून नेहाला रिपोर्ट करेल. नेहाला त्याची बॉस म्हणून प्रमोशन देण्यात आल आहे.
सर्वांना आश्चर्य वाटलं. हर्षद तर भडकला.
निरंजन- ही दोन्ही प्रमोशन एक महिन्यासाठी आहेत. त्यांचा नव्या रोल मधला पर्फोर्मंस बघून त्यांना त्या रोल मध्ये कन्फर्म करण्याचा निर्णय घेतला जाईल. कंपनीच्या नव्या strategy चा एक भाग म्हणून ही प्रमोशन एक प्रयोग म्हणून करण्यात येत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
निरंजन- ओके गाईज. ऑफ साईट वरच हे शेवटच ओफिशियल सेशन होत. आता सगळे चेंज करून तयार व्हा. बाहेर बसेस वाट बघत आहेत. आपल्याला साईट सीईंगला जायचं आहे. सगळे पटापट पांगले. हर्षद निरंजन कडे येऊन म्हणाला-
हर्षद- ही माझी फसवणूक आहे.
निरंजन- का? तुला प्रमोशन हव होत ते दिल ना मी? मी कधी म्हणालो की तुला आयुष्यभर त्याच जागेवर ठेवेन म्हणून? आणि नेहाच्या प्रमोशनचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये. कंपनी आता सगळी प्रमोशन तुझी परमिशन घेऊन करणार का?
हर्षद- आणि माझे दहा लाख रुपये?
निरंजन- कसले दहा लाख?
हर्षद- अच्छा? माझ्याकडे त्या व्हिडीओचा back up आहे. मी तो आत्ता व्हायरल करू शकतो.
निरंजन- करच तू तो व्हिडीओ व्हायरल. मगाशी नेहा समोर होती म्हणून मी काही बोललो नाही. पण हर्षद एक लक्षात घे. तुझ्याकडे त्या व्हिडीओची कॉपी नाहीये हे मला माहित आहे. कारण तुला तितका बिझनेस सेन्स नाहीये. नेगोसिएशन स्किल्स मध्ये तू शून्य आहेस. म्हणून तर इतका मागे राहिला आहेस करियर मध्ये. आणि दुसरी गोष्ट. चुकून तुझ्याकडे त्याची कॉपी असेल, तर डिलीट कर. कारण तो व्हिडीओ लिक झाला तर तुझे हातपाय कापून डोळे काढत असलेला व्हिडीओ पण बारा तासात व्हायरल होईल आणि तो बघायला तू जगात नसशील. हर्षद मी ह्या फर्मचा पार्टनर आहे. लाखो डॉलर मध्ये कमाई आहे माझी. पैसे फेकल्यावर मी भाडोत्री लोक खरेदी करू शकतो आणि इतर सर्व यंत्रणा विकत घेऊ शकतो. तू माझ्यापुढे हरशील. हे लक्षात ठेव आणि गुपचूप तयार होऊन बसेस रेडी आहेत का ते बघून मला सांग. चल निघ.
हे ऐकून छातीत धडधडू लागलेल्या हर्षदने तिथून काढता पाय घेतला. दारामागे उभी राहून हे सर्व ऐकत असलेल्या नेहाला खूप बर वाटल. Laptop वर काम करत असलेल्या निरंजनला धावत जाऊन घट्ट मिठी मारावी असा विचार मनात आला. पण तिने मनावर नियंत्रण मिळवलं आणि ती चेंज करायला गेली.
तिन्ही बसेस आता एका डोंगराच्या पायथ्याशी येऊन थांबल्या. सगळे उतरले. लोकल गाईड म्हणाला-
गाईड- हा कोंडीबाचा डोंगर आहे. ह्याच्या वर मयुरेश्वराच पुरातन मंदिर आहे.
त्याच्या तोंडून हे ऐकून नेहा आणि निरंजन आवाक झाले. सगळे कोंडीबाचा डोंगर चढू लागले. निरंजन आणि नेहा एक एक पायरी वर चढताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडून विव्हळत असलेल्या शिरप्याचा आवाज ऐकू येत होता. रघु शास्त्री फरफटत खाली आणत असलेली, गुरासारखी ओरडत असलेली यमुना दिसत होती. आवाक होऊन बघणारे गावकरी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते. जमिनीवर घासून फाटलेल्या यमुनाच्या परकरातून दिसत असलेली तिची गोरी मांडी बघून चेकाळेला, दात कोरत असलेला हणम्या दिसला.
नेहा आणि निरंजन मंदिराच्या दाराशी आले. देवळातील घंटा प्रत्येक जण वाजवत होता. दोघे गाभाऱ्यात शिरले. मयुरेश्वराची पिंड आणि गाभारा वर्षानुवर्ष तसेच गंभीर आणि पवित्र होते. दोघांनी देवासमोर डोक टेकल तेव्हा कोणीतरी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचा भास दोघांनाही झाला. दोघे दचकून उठून बसले. दोघेही काहीच बोलत नव्हते. बाहेर सभा मंडपात येऊन दोघे डोळे मिटून ध्यान लावून बसले. दोघांना आता रघु शास्त्र्यांच घर दिसू लागल. रागाने लालबुंद झालेले उघडे रघुशास्त्री झोपाळ्यावर बसून सुपारीवर राग काढत अडकित्त्याने ती कातरत होते. यमुना वाड्याच्या पायऱ्यांवर हंबरडा फोडून रडत होती. तेवढ्यात रघुशास्त्री ज्याची वाट बघत होते तो विद्याधर आला. विद्याधर म्हणजे शेजारच्या गावातील कुलकर्ण्यांचा मुलगा. घराची भिक्षुकी उत्तम चालवणारा. शिवाय कुलकर्ण्यांकडे गावातील चार देवळांची मालकी होती. घरात पैसा अडका भरपूर होता. विद्याधरचे वडील रामोजी गेल्याच साप चावून गेल्याच वर्षी वारले. ते रघु शास्त्र्यांचे बालपणापासूनचे मित्र. शिरप्याला तुडवल्यावर रघु शास्त्र्यांनी नोकर धाडून विद्याधरला तातडीने बोलावून घेतलं होत. विद्याधर आल्या आल्या त्यांच्या पाया पडला.
विद्याधर- काका अस अचानक का बोलावलत?
शास्त्री- रामोजीची इच्छा होती आमच्या यमिला स्नुषा करून घ्यायची. बापाची इच्छा पूर्ण करणार का तू? हीचं पाउल वाकड पडत होत पण आमच्या ते वेळीच लक्षात आलाय. आता तू जबाबदारी घे तिची आणि आम्हाला मोकळ कर.
विद्याधर ने यमुनावर नजर टाकली. उफाड्याची, गोरी गोमटी यमुना त्याला आवडली.
विद्याधर – काका मी तुमच्या आणि बाबांच्या इच्छेबाहेर नाही. तुम्ही मुहूर्त सांगा काका. मी तयार आहे.
शास्त्री- उद्याच उत्तम मुहूर्त आहे. आल्यासारखा आज रात्री रहा आणि उद्या लग्न करून यमिला बरोबर घेऊन जा.
हे ऐकून यमी मूर्च्छित झाली. रात्री उशिरा वैद्यांच्या काढ्याने तिला शुद्ध आली. शेजारी नात्यातल्या बायका बसल्या होत्या.
यमुना- मला हे लग्न मान्य नाहीये.
मावशी- यमे वेडेपणा करू नको.
यमुना- पण मला श्री आवडतो. मी त्याला मनाने वरला आहे.
दुसरी मावशी- मग कुंकू पूस त्याच्या नावच कारण तुझ्या लग्नाची बातमी कळल्यावर त्याने कोंडीबाच्या डोंगराच्या मागच्या सुळक्यावरून उडी मारून जीव दिलाय. एव्हाना त्चियाचा आत्तामा उडूनही गेला असेल.
हे ऐकून यमुना रात्रभर ओक्साबोक्शी रडली. सकाळी मावश्या नटवतील तशी नटून यंत्रवत लग्नाला उभी राहिली. मोजके नातेवाईक आणि गावातील ज्येष्ठ लोकांच्या साक्षीने लग्न पार पडलं. रघु शास्त्र्यांच्या सजवलेल्या बैलगाडीतून विध्याधर आणि यमुना निघाले. विद्याधरला कधी एकदा घरी जाऊन यमुनाला आपली करतो ह्याची घाई लागली होती. सूर्य आता कलला होता. रस्ता अंधुक झाला होता. यमुना शिरप्याच्या आठवणीत शांत बसून होती. विद्याधर बैलांना चाबकाने फटकावत धावडवत होता. इतक्यात अचानक शेजारच्या शेतातून शिरप्या बाहेर आला. कपडे फाटलेले अस्ताव्यस्त, डोक्याची जखम अजूनही वहात होती. तो गाडीच्या मागे धावत ओरडला-
शिरप्या- का यमे…का जीव लावलास? का फसवलस मला? का?
त्याला बघून यमुना म्हणाली-
यमुना- अहो गाडी थांबवा.
विद्याधर – का?
यमुना- मी म्हणाले ना गाडी थांबवा.
विद्याधर ने गाडी थांबवली. यमुना खाली उतरली. शिरप्या तिच्या समोर उभा होता. यमुना पुढे झाली. शिरप्याचा तोल गेला. यमुने त्याला सावरला. ती त्याच डोक आपल्या मांडीवर घेऊन बोलू लागली-
यमुना- मला माफ कर श्री. पण मला तर मावशी म्हणाली की तू डोंगरावरून उडी मारून ….मग तू इथे कसा?
एकटीच जमिनीवर बसून बोलत असलेल्या यमुनाला बघून विद्याधरला आश्चर्य वाटत होत. समोरच्या माळावर शिरप्याच प्रेत जळत होत. इथे यमुना शिरप्याच्या केसातून हात फिरवत एकटीच बोलत होती. सूर्य आता अस्ताला गेला होता.
क्रमश:
भाग १०
…… एकटीच जमिनीवर बसून बोलत असलेल्या यमुनाला बघून विद्याधरला आश्चर्य वाटत होत. समोरच्या माळावर शिरप्याच प्रेत जळत होत. इथे यमुना शिरप्याच्या केसातून हात फिरवत एकटीच बोलत होती. सूर्य आता अस्ताला गेला होता. विद्याधारला कळत नव्हत की ती कोणाशी बोलते आहे. तो पुढे होऊन म्हणाला-
विद्याधर- काय ग यमे. एकटीच काय बोलते आहेस?
यमुना- एकटी नाही हो. हा बघा ना. श्री…किती लागलंय बघा त्याला.
विद्याधर- कुठाय श्री? इथे तर कोणीच नाहीये.
यमुना- अहो अस काय करताय. हा बघा ना. आपण त्याला वैद्यांकडे नेऊया का? त्याची पट्टी झाली की मी येते तुमच्याबरोबर. परत नाही भेटणार त्याला कधीच.
विद्याधर- ए यमे…डोक्यावर परिणाम झालय का तुझ्या? काय बोलते आहेस तू? कोण श्री? कुठे आहे तो? चल आता काळोख होईल.
विद्याधरने यमीला दंडाला धरून उठवली. ओढत गाडीत बसवली आणि गाडी हाकू लागला. गाडीच्या मागे रडत धावणारा शिरप्या काही वेळात धूर होऊन हवेत विरून गेला. घरी येईपर्यंत यमुना गोठून गेली होती. घरी आल्याआल्या सर्वांनी केलेल्या स्वागताला तिने साध स्मित देऊन देखील प्रतिसाद दिला नाही. लोक गेल्यावर विद्याधर तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. स्वतःचा झब्बा आणि धोतर खुंटीला टांगून आखाड्यात उतरवा तसा फक्त लंगोट अंगावर ठेऊन पलंगावर येऊन बसला. यमुना हरवलेली होती. तिला शिरप्या धूर होऊन हवेत विरताना अजूनही डोळ्यासमोर दिसत होता. पण विद्याधरला आता धीर निघत नव्हता.
त्याने कंदिलाची ज्योत अगदी बारीक केली. खिडकीतून चंद्रप्रकाश यमुनाच्या गोर्या कांतीवर पडून तिला उजळून टाकत होता. विद्याधर आधाशीपणाने पुढे झाला. त्याने यमुनाचा हात आपल्या हातात घेतला. जोरात चुरला. तिच्या हिरव्या चुड्यातील दोन बांगड्या फुटून काच हाताला लागून रक्त आल. यमुनाला त्याचा पत्ताही नव्हता.
विद्याधर- दुखल नाही ना? पण काळजी नको करू. असंच दुखेल सुरुवातीला आणि मग खूप मजा येईल.
त्या मजेच्या कल्पनेने पेटलेल्या विद्याधरने एक एक करत यमुनाचे सर्व दागिने काढून ठेवले. तिचा अंबाडा सोडून केस मोकळे केले. तिच्या लांबसडक दाट केसांचा सुवास त्याच्या नाकात शिरल्यावर तो बेभान झाला. एक एक करत तो यमुनाचे कपडे काढत होता. यमुना पुतळ्यासारखी शांत बसून होती. आता विद्याधर तिच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. तिला पलंगावर पालथी विवस्त्र झोपवून तिला भोगू लागला. पण यमुना कडून कसलाच प्रतिसाद नव्हता. काही वेळात विद्याधर प्रतिसाद नसल्याने वैतागला. म्हणाला-
विद्याधर- काय ग यमे…तू इतकी थंड का? काय झाल?
यमुना- काही नाही.
विद्याधर- मग तू अशी थंड का? ते पण लग्नाच्या पहिल्या रात्री?
यमुना- माहित नाही.
विद्याधर- हरकत नाही. येशील तू मूड मध्ये. मी सोडणार नाहीये. पहिली रात्र पूर्ण उपभोगणार आहे.
मग पहाटे पर्यंत विद्याधर यमुनाच्या शरीराशी यथेच्छ खेळत होता. दमून पहाटे त्याला झोप लागली. यमुना उठून मागीलदारी असलेल्या आडोशाच्या न्हाणी घरात गेली. दुखऱ्या अंगावर, ओरखड्यांवर थंड पाणी ओतून तिने अंघोळ केली. मग देवासमोर दिवा लावून ती स्वयंपाक घरात गेली. तिथे तिची चुलत सासू होती. सासूशी ओळख झाली आणि यमुना कामाला लागली. त्या रात्री विद्याधर परत तिच्या जवळ आला. पण काहीच प्रतिसाद नसल्याने वैतागून झोपून गेला. असेच अनेक दिवस, महिने वर्ष गेली. रात्रीचा दुरावा विद्याधर आणि यमुनच्या आयुष्यात देखील त्यांना एकमेकांपासून खूप लांब घेऊन गेला. क्वचित अगदीच असह्य झाल की विद्याधर तिला भोगत असे. पण त्याला समाधान कधीच नाही मिळालं. विद्याधरला बाहेरच्या बायका आणि दारूचा नाद लागला. काही महिन्यात तो बाहेरच्या बायका स्वतःच्या खोलीत घेऊन येऊ लागला. यमुनाला खोलीच्या बाहेर काढून त्या बायकांबरोबर रात्री रंगवू लागला. त्यातलीच एक बाई विद्याधराच्या गळ्यात पडली. त्याच्याशी लग्न करायची इच्छा तिने बोलून दाखवली. पण यमुना हा त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा होता. विद्याधर तो अडथळा कसा हटवायचा ह्याचा विचार करू लागला होता.
त्या दिवशी अमावास्या होती. विद्याधर ने यामुनाला शेजारच्या गावात जत्रेला न्यायाचा घाट घातला. बैल गाडीतून दोघंच जत्रेला गेले. दिवसभर फिरून झाल्यावर घराकडे निघाले तोवर सूर्य कलला होता. विद्याधर ने गाडी जोरात हाकायला सुरुवात केली. दोन्ही गावांच्या मध्ये एक डोंगर आणि कच्ची वळणा वळणाची सडक. अमावस्या होती म्हणून पूर्ण अंधार. गाडी आता घाटात आली. लांबवर विद्याधरला कंदिलाचा प्रकाश दिसला. त्याने गाडीचा वेग कमी केला. एक बाई कंदील घेऊन उभी होतो. तीच…विद्याधरला नादी लावणारी. ती घाबरी घुबरी होत म्हणाली-
बाई- माझी बहिण तिथ त्या झाडामागे आहे. केव्हाही बाळंत होईल. तुमच्याकडे कोणी बाई माणूस आहे का? मला मदत हवी आहे.
विद्याधर- हो आहे ना? यमे जरा मदत कर ह्या बाईंची.
यमुना गाडीतून उतरली. त्या बाईच्या मागे कंदिलाच्या प्रकाशात जाऊ लागली. त्यांच्या मागे विद्याधर होता. यमुनाला कल्पना नव्हती की ती एका कड्याच्या टोकाला जाते आहे. टोकाला पोहोचल्यावर वाऱ्याने बाईच्या हातातला कंदील विझला. यमुनेने वळून बघितल तर विद्याधर तिच्या पुढ्यात होता. विद्याधर ने आपल्या दणकट बाहुनी यमुनाला धक्का दिला. यमुना त्या प्रचंड दरीत वेगाने कोसळू लागली. इतक्यात तिला कोणीतरी धरल्याचा भास झाला. तिने मिटलेले डोळे उघडले. समोर शिरप्या होता. पारदर्शक, हवेत उडत असलेला, बर्फासारख्या थंड स्पर्शाचा. चेहऱ्यावर हास्य.
यमुना- श्री तू?
शिरप्या- हो मी…तुला न्यायला आलोय.
यमुना- म्हणजे?
शिरप्या- म्हणजे अजून काही क्षण हवेत. मग खाली एक टोकदार दगड आहे. त्यावर तुझ डोक आपटून मेंदू बाहेर पडणार आणि तू ह्या देहातून मुक्त होणार. आणि मग आपण दोघे परत एकदा जन्म घ्यायला त्या चक्रात अडकणार.
यमुना- पण श्री का अडकायचं त्या चक्रात. मला नकोय ते काही. मला तू हवा आहेस फक्त.
शिरप्या- यमे आत्मा अमर आहे. पण आपल्याला मुक्ती हवी आहे आणि ती आपण मनुष्य म्हणून एकत्र आलो तरच मिळेल. आणि ह्या जन्मी जमल नाही ते आपण पुढल्या जन्मी जमवू. मी वाट बघतोय इथेच. ये तू लवकर.
अस म्हणून शिरप्याने यमुनाचा देह सोडून दिला आणि एका झाडाला उलटा लटकून खाली बघू लागला. यमुना एका टोकदार दगडावर डोक आपटून मृत्यू पावली. तिचा आत्मा उडत उडत झाडावर आला. त्या दोघांना आता अनेक वर्षाचं अंतर कापून मुक्तीसाठी परत जन्म घेऊन एकत्र यायचं होते. दोघेही एकमेकांचा हात धरून उडून गेले. दरीत काळोख, शांतता आणि कोल्हे तरस तुटून पडत असलेला यमुनाचा देह होता. काळ एका झाडावर उलटा लटकून खी खी हसत होता.
क्रमश:
भाग ११
…… अस म्हणून शिरप्याने यमुनाचा देह सोडून दिला आणि एका झाडाला उलटा लटकून खाली बघू लागला. यमुना एका टोकदार दगडावर डोक आपटून मृत्यू पावली. तिचा आत्मा उडत उडत झाडावर आला. त्या दोघांना आता अनेक वर्षाचं अंतर कापून मुक्तीसाठी परत जन्म घेऊन एकत्र यायचं होते. दोघेही एकमेकांचा हात धरून उडून गेले. दरीत काळोख, शांतता आणि कोल्हे तरस तुटून पडत असलेला यमुनाचा देह होता.
इतक्यात देवळात आरती सुरु झाली. निरंजन आणि नेहा भानावार आले. दोघांनी यमुना आणि शिरप्याची गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. दोघे उभे राहून आरती करू लागले. त्यांना गाभाऱ्यात शिरप्या आणि यमुना आरती करायला उभे असलेले दिसत होते. तो भास खरा वाटावा इतका खरा होता. आरती संपल्यावर सगळेच खाली निघाले. निरंजन आणि नेहाची आजूबाजूच्या झाडीत बघायची हिम्मत होत नव्हती. त्यांच पाऊल डोंगरावरून निघत नव्हत. सगळे पटापट डोंगर उतरून खाली गेले तरी हे दोघे हळू हळू रेंगाळत , ते वातावरण मनात भरून घेत, कधी आठवणीत कधी वर्तमानात असे खाली उतरत होते. निरंजन पुढे होता आणि त्याच्या पाच पायर्या मागे नेहा होती. चालताना नेहाची पायरी चुकली आणि ती भेलकांडली. तिच्या तोंडून निरंजन अशी हाक आली. निरंजन सर्रकन मागे वळला आणि दरीत पडू शकत असलेल्या नेहाचा हात त्याने आपल्या पिळदार हाताने धरला. काही क्षण दोघे एकमेकांच्या नजरेत नजर अडकवून तसेच होते. निरंजन ने नेहाला वर ओढली. वर आल्यावर नेहा अचानक निरंजनच्या खूप जवळ आली. त्याचा श्वास तिला जाणवत होता. नेहाचे उभार निरंजनला स्पर्श करत होते. नेहा भीतीने आणि लाजेने थरथरत होती. निरंजनने तिचे दोन्ही दंड घट्ट धरले. नेहा खाली बघू लागली. त्याने हळूच आपल्या हाताने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. तिने डोळे मिटून घेतले होते.
नेहाचा आरस्पानी चेहरा, तरतरीत नाक, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ निरंजनला अस्वस्थ करत होते. तेवढ्यात पावसाची एक मोठी सर आली. दोघे तसेच भिजत उभे होते. निरंजन नेहाच्या रुपात हरवला होता आणि ती त्याच्या स्पर्शात बुडाली होती. निरंजन ने एका हाताने तिचे केस मागून धरले आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकणार इतक्यात त्यांच्या मागे असलेल एक जुनं झाड मुळासकट उन्मळून मोठा आवाज करत कोसळल. आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट झाला. भानावर आलेली नेहा स्वतःला सोडवून पायर्या उतरत खाली जाऊ लागली. तिच्या अश्या जाण्याने निरंजनला आश्चर्य वाटलं.
संध्याकाळी परत पार्टी होती. निरंजन साधा शर्ट आणि pant घालून आला होता. ओफिसातील जनता पार्टीचा आनंद घेत होती. हर्षद एका कोपर्यात बसून पीत होता. नेहा मात्र दिसत नव्हती. निरंजन ने वेंकट बरोबर डान्स करत असलेल्या अनुकडे नेहाची चौकशी केली.
निरंजन- हाय अनु..काय ग नेहा दिसत नाही कुठे?
अनु- सर तिची तब्बेत जरा खराब आहे म्हणाली. रूम मधेच झोपली आहे.
निरंजन- ओह…ओके…
अनु- मी बोलावू का तिला?
निरंजन- नको. मी सहज विचारलं…
अनु आणि वेंकट परत डान्स फ्लोअर वर गेले. निरंजन ने ग्लेनफिडीच चा एक पेग on the rocks घेतला आणि तो तडक नेहाच्या रूमकडे निघाला. रूमच्या बाहेर पोहोचून त्याने बेल वाजवली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने परत दोन तीन वेळा बेल वाजवली. पाच मिनिट निरंजन तिथेच उभा होता. शेवटी त्याने फोन लावला. नेहाने फोन पण उचलला नाही. निरंजनला आता काळजी वाटू लागली. इतक्यात रूम सर्व्हिसचा माणूस आला. निरंजनला बाहेर उभा बघून तो म्हणाला-
माणूस- सर, ह्या madam beach वर गेल्या मगाशीच.
निरंजन- thanks.
त्या माणसाच्या हातात पाचशेची नोट कोंबून निरंजन बीचकडे निघाला. त्याच्या मागावर असलेला हर्षद देखील त्याच्या मागे लपत छपत निघाला.
त्या स्वच्छ प्रायव्हेट बीचवर चांदण पडल होत. नारळाच्या उंच झाडांच्या सावल्या पांढर्या वाळूवर रांगोळी काढल्यासारख्या पसरल्या होत्या. निरंजन मागच्या बाजूच गेट उघडून बीचवर आला. समुद्राची गाज वातावरण भरून टाकत होती. किनार्यावर येऊन फुटणार्या लाटांचा पांढरा शुभ्र फेस चांदण्यात चमकत होता. लांबवर असलेल्या दीप स्तंभातील दिवा सोडल्यास संपूर्ण समुद्रावर अंधारच राज्य होत. त्या अंधाराकडे तोंड करून लाटा पायावर घेत उभी असलेली नेहा निरंजनच्या दृष्टीला पडली. निरंजन वाळू तुडवत तिच्याकडे जाऊ लागला. त्याच वेळी मागच गेट हळूच उघडून बाहेर आलेला हर्षद एका झाडामागे लपला. निरंजन जाऊन नेहाच्या शेजारी उभा राहिला. नेहाने डेनिम हॉट pants आणि पांढऱ्या रंगाचा spaghetti top घातला होता. तिचे मोकळे केस वाऱ्यावर उडत होते. ती त्यांना सावरायचा प्रयत्न अजिबात करत नव्हती. ती शांतपणे समुद्राकडे बघत उभी होती. निरंजन तिच्या बाजूला उभा राहून समुद्राकडे बघू लागला.
निरंजन- नेहा हे सर्व काय आहे?
नेहा- मला माहित नाही निरंजन…
निरंजन- पण काहीतरी आहे हे नक्की ना?
नेहा- मला हे सगळे लोक, ते गाव कित्येक वर्ष दिसतात.
निरंजन- मला आज तो डोंगर, ते मंदिर, ते वातावरण, तुझं पडण आधी कधीतरी पाहिल्यासारखं वाटलं. पण ते कस शक्य आहे. मी ह्या देशातच राहत नाही…
नेहा- मला ती कहाणी जागेपणी पण दिसते.
निरंजन- कदाचित ते स्वप्न असेल.
नेहा- हो. जागेपणी दिसणार स्वप्न…
निरंजन- पण आज जे घडल ते स्वप्नवत असाल तरी सत्य होत नेहा….आणि ते सत्य खूप छान होत.
नेहा- काय?
निरंजन- ते झाड पडायच्या आधी जे घडलं आणि जे घडणार होत पण घडल नाही ते….
नेहाने आश्चर्याने निरंजनकडे वळून बघितलं.
निरंजन- हो नेहा….मी मनापासून बोलतोय.
निरंजन पुढे झाला. त्याने नेहाचा हात हातात घेतला. हे बघत असलेल्या हर्षद ने सरसावून मोबाईल बाहेर काढला आणि निरंजन काय म्हणाला होता ते आठवून घाबरून परत आत ठेवला. तो डोळे विस्फारून बघू लागला. निरंजन ने परत एकदा नेहाच्या दंडाला धरल.
निरंजन- नेहा तू मला आवडली आहेस. मी इंडिया मध्ये आल्यावर जो सहवास मिळाला, आपण ज्या प्रसंगातून गेलो त्या नंतर तू मला आवडू लागली आहेस नेहा. हे आकर्षण नक्की आहे. कदाचित ह्यालाच प्रेम म्हणत असतील. मला ह्या क्षणी तुला मिठीत घ्यावीशी वाटते आहे. ते नक्कीच आकर्षण आहे. पण मी तुला वर पार्टीत मिस केली. मग तुझ्या रूमच्या बाहेर दहा मिनिट बेल वाजवत बसलो. मला सारखी तुझीच आठवण येते, तुझी काळजी वाटते, तू माझ्या बरोबर कायम असाव अस वाटत…हे जर प्रेम असेल तर मी तुझ्या प्रेमात पडलोय नेहा.
नेहा आवक होऊन निरंजनकडे बघत होती. निरंजन पुढे झाला. त्याने नेहाचे दोन्ही गाल आपल्या हातात धरले. तिला आपल्या घट्ट मिठीत घेतली. नेहाने डोळे मिटले. नारळाच्या झावळ्यांच्या आडून चंद्र वाकून वाकून त्यांच्या शृंगार बघायचा प्रयत्न करत होता. हे बघत असलेला हर्षद आता “गेम” बघायला मिळणार म्हणून पेटला होता. निरंजनच्या ओठांचा स्पर्श नेहाच्या स्निग्ध, ओलसर, रसरशीत ओठांना झाला आणि नेहाचा फोन वाजला. नेहा भानावर आली. तिने फोन खिशातून काढून बघितला. फोनवर निशिकांत असं नाव दिसत होत. नेहाला कळत नव्हत फोन घ्यायचा की नाही ते. इतक्यात फोन कट झाला. नेहा अचानक खूप डिस्टर्ब झाली. निरंजनने तिला जवळ घेत, केसात हलके हात फिरवत विचारलं-
निरंजन- काय झाल नेहा?
नेहा- न…निशिकांतचा फोन होता.
निरंजन- कोण निशिकांत?
नेहा- माझा नवरा…निशिकांत…
नेहाला अचानक रडू फुटलं. ती ओक्साबोक्शी रडत निरंजनला म्हणाली-
नेहा- सॉरी श्री….i am married…आपली भेट उशिरा झाली ह्या जन्मातही…I am sorry…
हे बोलून नेहा वाळूत पाय रुतवत रोसोर्टच्या दिशेने धावत निघून गेली. निरंजनच्या कानात मात्र तिचे शब्द तसेच थिजले होते. “सॉरी श्री….i am married…आपली भेट उशिरा झाली ह्या जन्मातही…I am sorry…”
निरंजनच्या मनात विचार आला की ही मला श्री का म्हणते आहे? मी जर श्री आहे तर मग ही कोण आहे? निरंजनला शिरप्या आणि यमुनाची गोष्ट एका flash मध्ये आठवली आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले-
निरंजन- (नेहा गेली त्या दिशेने बघत) य…यमुना? नेहा म्यहणजे मी…आणि मी शिरप्या?
निरंजन अविश्वासाने रिसोर्टकडे बघत होता. अचानक समुद्रात एक मोठी लाट उसळली. निरंजनला पूर्ण भिजवून गेली. निरंजन स्तब्ध उभा होता. काळ नारळाच्या झावळ्यात लपंडाव खेळत येणार्या उद्याची वाट बघत होता.
क्रमश:
भाग १२
हे बोलून नेहा वाळूत पाय रुतवत रिसोर्टच्या दिशेने धावत निघून गेली. निरंजनच्या कानात मात्र तिचे शब्द तसेच थिजले होते. “सॉरी श्री….i am married…आपली भेट उशिरा झाली ह्या जन्मातही…I am sorry…”
निरंजनच्या मनात विचार आला की ही मला श्री का म्हणते आहे? मी जर श्री आहे तर मग ही कोण आहे? निरंजनला शिरप्या आणि यमुनाची गोष्ट एका flash मध्ये आठवली आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले-
निरंजन- (नेहा गेली त्या दिशेने बघत) य…यमुना? यमी…आणि मी शिरप्या?
निरंजन अविश्वासाने रिसोर्टकडे बघत होता. अचानक समुद्रात एक मोठी लाट उसळली. निरंजनला पूर्ण भिजवून गेली. निरंजन स्तब्ध उभा होता.
नेहा तिच्या रूम मध्ये आली. बेडवर पडून जोरजोरात रडू लागली. निरंजनला भेटल्यावर तिला दिसणाऱ्या जुन्या घटना आणि पात्र ह्यांचा अर्थ तिच्या लक्षात येत होता. गेल्या जन्मी एकत्र न येऊ शकलेले यमुना आणि शिरप्या ह्या जन्मात परत एकमेकांच्या समोर उभे राहिले होते. नियतीने जुनी ओळख पटवून दिली होती. पण…
नेहा उशीत तोंड खुपसून रडत होती. तिला तशीच झोप लागली. सकाळी आलार्म वाजल्यावर उठून ती तयार झाली. सगळे एअर पोर्टवर आले. नेहा तशी गुपचूप होती. निरंजनशी eye contact टाळत होती. विमानाने रन वे सोडला. नेहा आणि निरंजन काही सुंदर आठवणी आणि काही कठीण प्रश्न घेऊन परत मुंबई कडे झेपावले. विमानात सगळ्यांची मस्ती सुरु होती. फक्त हे दोघेच शांत बसून होते. निरंजन डोळे मिटून बसला होता तर नेहा खिडकीतून दिसणारी विमानाच्या पंखांची हालचाल बघत होती. खाली दिसणारी जमीन बघत होती. विमान जस अधांतरी होत तसच तिचं आयुष्य देखील अधांतरी असल्याच फिलिंग तिला येत होत. विमान मुंबईत land झालं. सगळे आपापल्या घरी निघाले. निरंजन तसाच उभा होता. नेहाचा पाय पण निघत नव्हता. तेवढ्यात arrival गेटच्या बाहेर निशिकांतची गाडी येऊन उभी राहिली. ती बघून नेहा पटापट चालत गाडीत जाऊन बसली. गाडी दिसेनाशी झाली. निरंजनची cab आली. निरंजन बसला. गाडी Hyatt कडे निघाली.
नेहा आणि निशिकांत गाडीत होते. रिपरिप पाउस पडत होता. निशिकांत शांतपणे गाडी चालवत होता. पाउस थांबला. निशिकांत ने गाडीची काच खाली केली आणि एक सिगारेट पेटवली.
निशिकांत- कशी झाली ऑफ साईट?
नेहा- good…
निशिकांत- किती लोक होते?
नेहा- around 50.
निशिकांत- ओह ग्रेट…
त्याच्या सिगारेटचा धूर नेहाच्या नाकात जाऊ लागला. तिला तो अजिबात सहन होत नसे. तिने तिच्या बाजूची काच थोडी खाली केली.
निशिकांत- नेहा come on. अग लग्नाला वर्ष होईल आपल्या पुढल्या महिन्यात. आता तरी सवय लावून घे ह्या धुराची. In fact मी तर म्हणतो की तू पण स्मोकिंग सुरु कर. मग प्रश्नच मिटला.
नेहा- नको. मला कोणत्याही वाईट सवयी लावून घ्यायची इच्छा नाहीये.
निशिकांतने त्याचा डावा हात नेहाच्या मांडीवर ठेऊन तिची मांडी जोरात दाबली आणि म्हणाला-
निशिकांत- पण माझी काय इच्छा आहे हे तर तुला माहीतच आहे. काय?
नेहाने त्याच्या हात बाजूला झिडकारला. ती डोक सीटवर टेकून डोळे बंद करून बसून राहिली. निशिकांत सिगारेट ओढत, मध्येच तिच्या तोंडावर धूर सोडत गाडी चालवत होता.
निरंजन हॉटेलात आल्यावर त्याने मस्त शावर घेतला. टीव्हीवर NYC च, त्याच्या गावच न्यूज channel लावून तो बेडवर पहुडला. त्याला नेहाची आठवण झाली. गोव्यात घडलेले सर्व प्रसंग आठवले. त्याने तिला सहज फोन लावला. नेहाचा फोन वाजला. नेहा दचकून जागी झाली. निशिकांत गाडी चालवत होता. आज ट्राफिक खूप असल्याने घरी पोहोचायला वेळ लागणार होता. नेहाने फोन बघितला. निरंजनचा फोन बघून तो घ्यावा की नाही ह्या विचारात नेहा अडकली. तिची चल बिचल पाहून निशिकांत म्हणाला-
निशिकांत- काय ग काय झालं? कोणाचा फोन?
नेहा- आमच्या बॉस चा.
निशिकांत- मग घे की…
नेहा- हम..हो…घेते ना…
इतक्यात फोन कट झाला.
निशिकांत- बॉस म्हणजे हर्षद का?
ते नाव ऐकून नेहाच्या अंगावर काटा आला. ती सारवासारव करत म्हणाली-
नेहा- न…नाही. आमचा सुपर बॉस…निरंजन..
निशिकांत- सुपर बॉस? मग तो मधले सगळे वगळून तुला कसा फोन करतोय?
नेहा- म..माहित नाही…म्हणून तर नाही घेतला ना फोन. उ..उद्या बोलू ऑफिसात…
इतक्यात निरंजनचा फोन परत आला.
निशिकांत- निरंजन का?
नेहा- हो…
निशिकांत- घे फोन…आणि हो स्पीकर वर टाक…ऐकू दे सुपर बॉस मधली सगळी हायरारकी ओलांडून तुला कशासाठी फोन करतो ते…
नेहा- स्प…स्पीकर वर कशाला?
निशिकांत- नेहा मी काय म्हणालो? ऐकलंस ना तू?
हे बोलून निशिकांत ने नेहाचा फोन स्वतःच्या हातात घेतला आणि रीसीव्ह करून स्पीकर वर ठेवला. नेहाला इशारा केला बोल म्हणून. नेहा प्रचंड घाबरली होती.
नेहा-ह…हेलो…
निरंजन- हेलो नेहा…पोहोचलीस का घरी?
नेहा- न..नाही…अजून गाडीतच आहे. खूप ट्राफिक आहे ना…सो…
तिचा डिस्टर्बड आवाज आणि “अजून गाडीतच आहे” हे अधोरेखित केलेलं वाक्य निशिकांतच्या लक्षात आल नसलं तरी निरंजनच्या लक्षात आल.
निरंजन- ओके. बर ऐक. ह्या ऑफ साईट चे हाय पोइंत्स, key take away ह्याच एक डॉक्युमेंट तू उद्या बनव आणि मला मेल कर. मला ते L&D हेड ला पाठवायचं आहे.
नेहा- ओके. मी उद्या तयार करते ते.
निरंजन- ग्रेट. सावकाश जा. बाय….
फोन कट झाला. नेहाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता ट्राफिक कमी झाला होता. निशिकांत वेगाने गाडी चालवत होता. दोघे घरी आले. आज सुट्टीचा दिवस होता. निशिकांत ने टीव्ही लावला. नेहा बाथरूम मध्ये शावर घ्यायला गेली. आज निरंजनचा फोन स्पीकरवर ठेवल्यावर तिला इतक प्रचंड दडपण आल होत जे आत्ता पर्यंत जाणवत होत. नेहाने गरम पाण्याचा शावर अंगावर घेतला आणि तिला जरा हलक वाटलं. इथे निशिकांत ने बियर उघडली होती. टीव्हीवर कुठलीशी जुनी क्रिकेट match बघण्यात तो मग्न होता. नेहा गाऊन घालून, ओले केस पंचाला बांधून बाहेर आली. निशिकांतला तिची चाहूल लागली.
निशिकांत- अरे वा आलीस तू? ये ना बस…
नेहा सोफ्यावर जाऊन बसली. निशिकांत सिगारेट पेटवणार हे बघून ती उठून निघाली. निशिकांत ने तिचा हात धरला. म्हणाला-
निशिकांत- नाही ओढत बास? पण तू जाऊ नको.
नेहा तिथेच परत बसली. निशिकांत ग्लास उचलून तिच्या शेजारी येऊन बसला. नेहा शांत बसून होती.
निशिकांत- सचिन ची match सुरु आहे. पाकिस्तान ची पहिली सिरीज…
नेहा- हम्म…
निशिकांत- सचिन माझा सर्वात फेव्हरेट आहे आणि नंबर दोन कोण आहे माहित्येय?
नेहा- कोण?
निशिकांत- तू…
हे ऐकून नेहा उठून जाऊ लागली. निशिकांत ने तिचा हात धाला आणि तिला सोफ्यावर बसवली. तिच्या खांद्यावर हात ठेऊन तो तिच्या जवळ आला. त्याच्या तोंडाला येत असलेल्या बियरच्या आंबूस शिळ्या वासाने नेहाला मळमळल.
निशिकांत- तू अस का करतेस नेहा?
नेहा- निशिकांत प्लीज लांब व्हा…
निशिकांत- पण का? मी तुझा नवरा आहे ना?
नेहा- निशिकांत ह्यावर आपलं अनेकदा बोलण झाल आहे आणि आता त्यावर परत बोलायची मला तरी इच्छा नाहीये. तुम्ही प्या आरामात. मी जाते.
निशिकांत तिला आवळून म्हणाला-
निशिकांत- नको ना नेहा…प्लीज…मला राहवत नाहीये. लग्न होऊन वर्ष व्हायला आल आणि मी तुला अजून एकदाही स्पर्श केला नाहीये…in fact तू मला तो करून दिला नाहीयेस…आज नको थांबवू प्लीज….
नेहा- निशिकांत प्लीज…control yourself…
निशिकांत- no I cant and I wont…आज मला कोणीच थांबवू शकणार नाही…
नेहा स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून बेडरूम मध्ये पळाली. निशिकांत तिच्या मागे गेला. नेहा थरथरत उभी होती. निशिकांतच्या डोळ्यात आज वासना तांडव करत होती. त्याने नेहावर झडप घालून तिला बेडवर झोपवली आणि ती तिच्या अंगावर झोपला. नेहा प्रतिकार करत होती पण त्याच्या पुरुषी ताकदीसमोर नेहाचा प्रतिकार दुबळा ठरत होता….
इथे निरंजन बेडवर शांत झोपला होता. त्याला झोपेत यमुनेच शरीर भोगणारा विद्याधर आणि निश्चल पडून राहून त्याला भोगू देत असलेली यमुना दिसले. निरंजन दचकून जागा झाला. काय झाल कुणास ठावूक. निरंजन ने नेहाचा फोन लावला. फोन बेडरूमच्या साईड टेबलवर वाजत होता. बेडवर नेहाच्या अंगावर आरूढ झालेला निशिकांत तिला चावत आणि चाटत होता. फोनची रिंग ऐकून तो क्षणभर थबकला आणि ती संधी साधून नेहाने सर्व शक्ती एकवटून त्याला मागे लोटला. निशिकांत बेडवरून भेलकांडत खाली पडला. बेडच्या आधाराने उठत तो म्हणाला-
निशिकांत- मादर#$ बायको असून देत नाही काय? आज बघतोच तुला. नाटकं बास झाली तुझी. अस म्हणून निशिकांत तिच्या अंगावर झेपावला. नेहाने उजव्या पायाची लाथ निशिकांतच्या दोन पायांच्या मधोमध मारली. निशिकांत कळवळत खाली बसला. नेहा रागाने लालबुंद झाली होती.
नेहा- मी सांगितलं होत माझ्यावर जबरदस्ती करायची नाही….लक्षात ठेवा ह्यापुढेही…नाहीतर….
फोन अजूनही वाजत होता. नेहाने फोन बघितला. त्यावर निरंजन नाव दिसत होत. नेहाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आज तो फोन आला नसता तर ह्या विचाराने तिच्या अंगावर शहरा आला. ह्या जन्मात शिरप्या हार मानणार नव्हता? तो तिच्या बरोबर होता की नियती समोरच्याची दोन प्यादी मारून वझीराचा होऊ शकणारा हल्ला लपवत होती? आपल्या उदरात सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन काळ पुढे सरकत होता.
क्रमश:
भाग १३
निरंजन आज ऑफिसात लवकर आला होता. तसाही तो अमेरिकेच्या सवयी नुसार ऑफिसात लवकर येऊन लवकर निघत असे. ऑफ साईट मध्ये घडलेल्या घटना, त्याला इतकी वर्ष पछाडलेल्या स्वप्नाचा उलगडलेला अर्थ ह्यांचा विचार करत तो समोर असलेली इमेल्स डोळ्याखालून घालत होता. नेहाच लग्न झालं आहे हा विचार त्याला अस्वस्थ करत होता. त्याला तरीही हरकत नव्हती. प्रोब्लेम नेहाचा होता. त्याला त्याच्या कॅलिफोर्नियाच्या घरापासून जवळ असलेल्या सुंदर बीचवर तो आणि नेहा हातात हात घालून दूरवर फिरत असल्याच दृश्य डोळ्यासमोर येऊ लागल. समोरची इमेल्स अंधुक झाली. त्या वाळूवर हळुवार पणे टीशर्ट आणि shorts काढून टाकून समुद्राकडे बिकिनी घालून धावत जाणारी नेहा त्याला दिसू लागली. तो देखील तिच्या मागे धावला. दोघे समुद्रात डुंबत होते. निरंजनला नेहा जणू जलपरी वाटत होती. सुळकन त्याच्या हातातून निसटून जाणारी मासोळी जणू. दोघेही दुंबण्यात दंग होते.
तेवढ्यात डेस्कवर ठेवलेला निरंजनचा फोन वाजला. त्याची तंद्री तुटली. फोन दुसऱ्या पार्टनरचा होता. तो चार दिवसांनी सिंगापूरला येणार होता. एक महत्वाच प्रेझेन्टेशन होत. त्याने नवीन बिझनेस मिळवणे ही खासियत असलेल्या निरंजनला तीन दिवस सिंगापूरला यायची विनंती केली. प्रपोजल बद्दल ब्रीफ केलं आणि डीटेल्स मेल करतो म्हणून फोन ठेवला. आता तीन दिवस नेहाला भेटता येणार नाही ह्या विचाराने निरंजन अस्वस्थ झाला. इतक्यात पार्टनरच मेल आलं पण. निरंजन प्रपोजल वाचू लागला आणि त्यात हरवला.
नेहा ऑफिसला जायला तयार होत होती. निशिकांत बेडवर बसून तिला बघत होता. काल तिने मारलेल्या लाथेचा परिणाम आजही त्याला जाणवत होता. नेहा त्याला पहिल्याच भेटीत आवडली होती. म्हणजे ती कोणत्याही पुरुषाला आवडेल अशी आकर्षक होतीच. मग निशिकांत ने तिची माहिती काढायला सुरुवात केली. तिच्या ऑफिसला जायच्या यायच्या वेळेवर तो पाळत ठेऊ लागला. निशिकांत स्वतः शेयर बाजारात ट्रेडिंग करत असे. खात्रीशीर उत्पन्नाचा स्त्रोत नव्हता. आये वडील गेल्यावर त्यांची जागा निशिकांतला अनायासे मिळाली होती. त्यामुळे घर घेणे, लोन काढणे हे विषय त्याच्या आयुष्यात नव्हते. त्याला दारू आणि सिगारेटच व्यसन प्रिय होत. कधीकधी मित्रांच्या संगतीत रोकडा प्यार मिळवायला त्याच्या फोरास रोड सदृश भागात फेर्या होत असत. तो वाईट नव्हता पण सज्जनही नव्हता. बेजाबदार होता. हट्टी होता. पण त्याला नेहा प्रचंड आवडली होती. हिला कशी मिळवायची ह्या विचारात त्याला झोप लागेनाशी झाली.
काही दिवस पाळत ठेऊन माहिती काढल्यावर त्याच्या लक्षात आल की नेहा गोराई जवळ एका बैठ्या घरात राहते. आई नाहीये. फक्त म्ह्नातारे वडील. ते जून घर आता मोडकळीला आल होत. निशिकांतचे डोळे चमकले. एक दिवस नेहा घरी नसताना तो तिच्या वडिलांना भेटला. घराबद्दल बोलून त्याने आपल्या बिल्डर मित्राच्या मार्फत त्या घराची री डेव्हालपमेंट करून त्यांना काही पैसे आणि टेरेस flat द्यायची ऑफर दिली. नेहाचे वडील खुश झाले. घर पडल्यावर रस्त्यावर याव लागेल ह्या विचाराने पछाडलेल्या त्यांना खूप दिलासा वाटला. निशिकांत तर त्यांना देव वाटला. ते म्हणाले परवा रविवारी या. माझी मुलगी पण असेल घरी. तेव्हा निवांत बोलू. निशिकांत =च काम झाल होत. तो निघाला. नेहाच्या वाटेवर स्टेशन जवळ त्याच्या नेहमीच्या स्पॉट वर उभा राहून तिची वाट बघू लागला. नेहा स्टेशन मधून बाहेर येऊन बसच्या लायनीत उभी राहिली. निशिकांत धावत जाऊन तिच्या मागे उभा राहिला. तिला स्पर्श न करता देखील तिच्या शरीराची ऊब, तिच्या मानेला येणारा परफ्युमचा वास तो अनुभवू लागला. हल्ली बरेचदा तो हे करत असे. नेहाच्या लक्षात पण आलं नव्हत ते. तो अगदी जवळ उभा राहून नेहाचे अंगांग डोळ्यात साठवून घेत असे. आज पण तेच सुरु असताना बस आली. लोक घाईघाईत आत चढू लागली. नेहा पण चढली. ती चढत असताना पायरीवर पाय ठेवल्यावर तिचा शोर्ट स्कर्ट वर सरकून दिसणाऱ्या तिच्या मांडीत निशिकांत हरवला असताना त्याच्या मागच्या माणसाने “ए चढ ना लवकर” अस म्हटल्यावर तो भानावर आला. तो बस मध्ये कधीच चढायचा नाही. आजही तो बाजूला झाला. मागचा माणूस आत चढत म्हणाला “बस पकडायची नाही मग लायनीत कशाला उभा राहतो तेच कळत नाही. हे ऐकून नेहाने खिडकीतून बाहेर पाहिलं. कंडक्टर ने घंटी मारून बस सुरु झाली. नेहाला stop वर उभा असलेला निशिकांत ओझरता दिसला.
निशिकांत जुन्या आठवणीत हरवलेला असताना नेहा ऑफिसला निघाली.
निशिकांत- तू काल जे वागलीस ते बरोबर नाहीये नेहा.
नेहा- आणि तुम्ही वागलात ते बरोबर होत का? लग्नाआधी आपल जे ठरलं आहे ते तुम्ही का विसरता. मी तुमच्या आयुष्यात येते का ढवळा ढवळ करायला? तुम्ही तुमचं जागा आणि मला माझ जगू द्या.
निशिकांत- पण नेहा मी तुझा नवरा आहे.
नेहा- हो. आहात ना. आणि ते कसे झालात ते पण तुम्हाला माहित आहे. मला विषय वाढवायचा नाहीये. येते मी.
निशिकांत- पण नवरा बायको म्हणून आपण जवळ यायचं नाही हे मला पटत नाही.
नेहा- मला आपण नवरा बायको आहोत हेच पटत नाही निशिकांत. आणि तुम्हाला ते मी पहिल्याच रात्री सांगितल आहे. मग आपण त्यावर बोलून काहीच उपयोग नाहीये. जे जस ठरलं आहे तसं चालू दे. नाहीतर उगाच complication निर्माण होतील. चला मी निघते. ऑफिसला उशीर होईल.
नेहा निघाली. निशिकांतची प्रचंड चिडचिड झाली होती. त्याला नेहा मिळून देखील त्याची झाली नव्हती ह्याची सल त्याच्या मनात सतत होती. त्यामुळे नेहा इतर कुठल्याही पुरुषाशी बोलताना दिसली की त्याला खूप insecure वाटत असे. त्याने विचारांच्या तंद्रीत एक सिगारेट पेटवली.
निरंजनने प्रपोजल वाचल होत. किमान दोन मिलियन डॉलरच contract मिळू शकत होत. त्याला ही संधी हातून घालवायची नव्हती. त्याने त्या प्रपोजलवर त्याच्या पद्धतीने काम सुरु केलं. इतक्यात त्याला ऑस्ट्रेलिया ऑफिसातून फोन आला. तिथल्या प्रोजेक्ट लीडला अपघात झाला होता. Client डिलिव्हरी दोन दिवसांवर आली होती. त्याची रिप्लेसमेंट शोधून त्याला ट्रेन करण्याइतका वेळ हाताशी नव्हता. निरंजन ने लगेच सिडनीला जायचा निर्णय घेतला. Travel desk ला तिकीट, हॉटेल आणि व्हिसाची व्यवस्था करायला सांगितली. आता त्याच्या लक्षात आल की तिथे अडकल्यावर सिंगापूरच प्रेझेन्टेशन तयार करण अशक्य आहे. त्याला सिडनी वरून सिंगापूरला जाव लागणार होत. निरंजन डोक्याला हात लावून विचार करू लागला. सकाळी शांत असलेल्या दिवसात अचानक फायर निर्माण झाला होता. तो बसलेला असतानाच नेहा आली. तिने निरंजनने सांगितल्यानुसार ऑफ साईटच्या हाय पोइंत्स आणि key take away ह्याच एक डॉक्युमेंट तयार केल होत आणि ते त्याला द्यायला ती आली होती.
नेहा- हाय…डॉक्युमेंट रेडी आहे.
तिला बघून निरंजनला जरा बर वाटलं.
निरंजन- ओह ग्रेट. तू घरीच तयार केलसं वाटत?
नेहा- हो…
निरंजन- बघू…
तो डॉक्युमेंट वाचू लागला. नेहाने तयार केलेलं डॉक्युमेंट त्याने स्वतः तयार केल आहे की काय अस वाटावं इतक त्याला आवडलं. बारीक बारीक डीटेल्स, महत्वाचे मुद्दे सर्व विचारात घेत तिने अत्यंत छान फ्लो असलेल डॉक्युमेंट तयार केलं होत. अगदी निरंजनच्या स्टाईल मधल डॉक्युमेंट. सगळे मुद्दे कव्हर करणार आणि मुख्य म्हणजे कोणालाही सहज समजेल इतकी सोपी रचना असलेलं. निरंजन ते वाचत होता आणि नेहा जरा टेन्स होती. ऑफ साईट मध्ये जे झाल त्या नंतर दोघे आजच भेटत होते. त्यात डॉक्युमेंट नीट झालं असेल की नाही ह्याच तिला टेन्शन होत. निरंजन ने फाईल बंद केली.
निरंजन- नेहा this is brilliant.
नेहा- thanks… येऊ मी?
नेहा उठून निघाली. निरंजनतिला बघत होता आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. निरंजनला खूप रिलीफ वाटला. त्याने नेहाला हाक मारली.
निरंजन- नेहा…
नेहा वळली.
नेहा- yes…
निरंजन- नेहा एक प्रोब्लेम आहे आणी मला तुझी मदत हवी आहे.
नेहा- sure काय झालं?
निरंजनने तिला तो सिगापूर आणि सिडनी मध्ये कसा अडकला आहे हे सांगितल.
नेहा- मग माझ्याकडून काय अपेक्षा आहे?
निरंजन- नेहा, तुझी प्रेझेन्टेशनची स्टाईल थेट माझ्यासारखी आहे. मी तुला सिंगापूरच प्रपोजल मेल करतो. आणि ह्या आधीची माझी काही client प्रेझेन्टेशन देखील मेल करतो. ती नीट बघ, फ्लो समजून घे आणि सिंगापूर प्रपोजलसाठी तू एक प्रेझेन्टेशन तयार कर जे मी प्रेझेंट करेन.
नेहा- ओह…शुअर…
निरंजन- आणि हो. एक काम कर. तीन दिवसांनी तू सिंगापूरला ये.
नेहा- (चकित होऊन) मी?
निरंजन- हो नेहा. कारण प्रेझेन्टेशन तू बनवणार आहेस. मी ते प्रेझेंट करताना काही पोइंत अडले तर तू तिथे असण आवश्यक आहे.
नेहा- पण…
निरंजन- काळजी नको करू. मी travel desk ला सांगून सगळी व्यवस्था करतो. तुझा पासपोर्ट उद्या सबमिट कर.
नेहा- ओके.
नेहा आश्चर्य आणि आनंद अश्या संमिश्र भावनेने केबिनच्या बाहेर गेली. निरंजन खुश होता. त्याला आणि नेहाला एकत्र वेळ मिळण्याची एक संधी नशिबाने अचानक समोर आणून ठेवली होती. त्याने travel desk ला फोन करून सुचना दिल्या.
निरंजन- नेहा पाच तारखेला सिंगापूरला येते आहे. तिचा व्हिसा आणि तिकीट लगेच अरेंज करा. ती उद्या पासपोर्ट देईल. आणि तिची रहायची व्यवस्था मरीना बे मध्ये माझ्याच हॉटेलात करा.
त्याने फोन खाली ठेवला आणि उठून त्याच्या केबिनच्या प्रशस्त काचेतून तो क्षितीज बघू लागला. त्याला आत्ताच टेक ऑफ केलेलं विमान दिसत होत आणि तो मानाने सिंगापूरला पोहोचला होता.
क्रमशः
भाग १४
……. नेहा आश्चर्य आणि आनंद अश्या संमिश्र भावनेने केबिनच्या बाहेर गेली. निरंजन खुश होता. त्याला आणि नेहाला एकत्र वेळ मिळण्याची एक संधी नशिबाने अचानक समोर आणून ठेवली होती. त्याने travel desk ला फोन करून सुचना दिल्या.
निरंजन- नेहा पाच तारखेला सिंगापूरला येते आहे. तिचा व्हिसा आणि तिकीट लगेच अरेंज करा. ती उद्या पासपोर्ट देईल. आणि तिची रहायची व्यवस्था मरीना बे मध्ये माझ्याच हॉटेलात करा.
त्याने फोन खाली ठेवला आणि उठून त्याच्या केबिनच्या प्रशस्त काचेतून तो क्षितीज बघू लागला. त्याला आत्ताच टेक ऑफ केलेलं विमान दिसत होत आणि तो मानाने सिंगापूरला पोहोचला होता.
नेहाने डेस्कवर येऊन प्रेझेन्टेशन तयार करायला सुरुवात केली. निरंजनची मेल्स बघून ती प्रपोजल समजून घेत होती. निरंजन ने पाठवलेली काही प्रेझेन्टेशन बघत होती. ती बघताना तिला निरंजनच्या हुशारीचा, knowledge चा अंदाज येऊ लागला. इतक्या तरुण वयात तो पार्टनर का बनला असेल ह्याच कारण लक्षात येऊ लागलं. त्या ppt मध्ये तिला निरंजन दिसू लागला. प्रपोजल आणि ppt बघून तिने काही नोट्स तयार केल्या. तोवर चार वाजले देखील. तिची कॉफीची वेळ टळून गेली होती. लंच पण स्किप झाला होता इतकी ती त्या कामात हरवून गेली होती. बराच वेळ laptop बघून शिणलेल्या डोळ्यांवरून नेहाने हात फिरवला. डोळे चोळल्यावर तिला खूप बर वाटल. इतका वेळ बांधलेले केस नेहाने सोडले आणि मस्त आळस दिला. ती कॉफी घ्यायला कॅफेटेरियाकडे निघाली.
Travel desk वरची रिटा हर्षद्ची खबरी होती. तिला प्रोजेक्ट्स मध्ये घेऊन कंपनीच्या पे रोल वर घेण्याच्या आमिषाने हर्षद अनेकदा मढ, गोराईच्या चादर बदलू हॉटेलात नेत असे. ती देखील हर्षद देत असलेली तिला न परवडणारी गिफ्ट घेऊन खुश होती. कंपनी रोल्स वर येऊ तेव्हा येऊ. पण तोवर हर्षदला तर कापू ह्या विचाराने ती त्याला लागू होऊन मजेत होती. कॅफेटेरिया मध्ये रिटा ने हर्षदला नेहा सिंगापूरला जात असल्याची खबर दिली होती. हर्षद जळून कोळसा झाला होता.
हर्षद- साला हिची लायकी आहे का ओव्हर सीज travel करायची? आम्ही इतकी वर्ष घासतोय पण भूतानला पण नाही पाठवलं कंपनीने आणि ही…
रिटा- सोड ना. आपल्याला काय? ह्या Sunday ला तुला एका मस्त रिसोर्ट मध्ये नेते मी. नवीन आहे. फक्त कपल्ससाठी. पण note ७ pro घेऊन देशील ना?
हर्षद- ए गप ग तू. मी काय बोलतोय आणि तू काय बोलते आहेस? गेल्या महिन्यात दिला ना तुला फोन? मग परत काय?
रिटा- तो जुना झाला ना आता? हे बघ नव्या फोनच्या बदल्यात तुला पण मी काहीतरी नवीन देईन. खुश होशील.
हर्षद- ए रीटा तू डोक्यात नको हा जाऊ. हे ऑफिस आहे. संध्याकाळी घरी जाताना गाडीत बोलू.
रिटा- पण तू गाडीत बोलायला कुठे देतोस. गाडीत तर…
हर्षद- आता जरा गप्प बस आणि मला विचार करू दे.
हर्षद विचार करू लागला इतक्यात नेहा तिथे आली. मशीन मधून कॉफी घेऊन एका टेबल वर बसून सिप करू लागली. हर्षद आणि रिटा शी फोर्माल स्माईल एक्स्चेंज केल. रिटा बसल्या जागेवरून ओरडली-
रिटा- नेहा मजा आहे हां. सिंगापूर and all….
नेहाने फक्त एक स्माईल दिल. हर्षदला टोमणा मारायचा होता पण त्याला निरंजन ने दिलेला हग्या दम आठवला आणि तो मूग गिळून गप्प बसला. नेहा विचार करत होती की निशिकांत ह्यावर कसा रीएक्त होईल. म्हणजे त्याच्या परवानगीची तिला गरज नव्हती पण उगाच घरात दोन शब्द तिला नको होते. ती कॉफी सिप करत विचार करत असताना तिला निशिकांतचा फोन आला.
निशिकांत- ऐक. आपल्याला परवा गावाला जायचं आहे. नलू ताईच्या मुलाची मुंज आहे. आत्ताच फोन आला होता तिचा.
नेहा- पण…
निशिकांत- पण काय? तुला रजेच अप्लिकेशन वेळेत करता याव म्हणून तर आत्ता लगेच सांगतो आहे.
नेहा- तस नाही निशिकांत. पण मला कदाचित सिंगापूरला जाव लागणार आहे परवा.
निशिकांत- what? तुला? सिंगापूरला? कशाला?
नेहा- निरंजनला सिडनीला जाव लागतंय आणि सिंगापूर मध्ये महत्वाच प्रेझेन्टेशन आहे. सो…
निशिकांत- मग त्याच्याशी तुझा काय संबंध? आणि हा निरंजन समजतो काय स्वतःला? मी येऊ का त्याला भेटायला एकदा?
नेहा- (घाबरून) नको…त्याची काहीच गरज नाहीये.
निशिकांत- गरज आहे की नाही ते मी ठरवेन. पण आपण मुंजीला जातोय. गरज पडल्यास नोकरी सोड. नाहीतरी फार वेळ जातो तुझा त्या नोकरीत. हजार मिळतील नोकऱ्या. पण ही गुलामी नको. आलय का लक्षात?
नेहा- ह..हो…बघते मी…
नेहाने फोन कट केला. डोक्यात विचारांचं वादळ. त्यात अजूनही अपूर्ण राहिलेल्या प्रेझेन्टेशन मधल्या points ची गर्दी. नेहा कॉफीचा कप तसाच ठेऊन उठली, wash room मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारल्यावर तिला बर वाटलं. नेहा जागेवर येऊन बसली. सध्या तरी प्रेझेन्टेशन वर पूर्ण लक्ष द्यायचा निर्णय तिने घेतला आणि ती त्यात गुंगून गेली.
संध्याकाळी गाडीतून जात असताना रिटा नेहमीप्रमाणे हर्षदला चिकटली. त्याच्या अंगावर हात फिरवत आपल्या note ७ प्रो साठी फिल्डिंग करू लागली. हर्षदच्या डोक्यात वेगळेच विचार होते. त्याने त्याच्या मांडीवर फिरत असलेला रिटाचा हात झटकला आणि म्हणाला-
हर्षद- बेबी ऐक…
रिटा- आज काय झालय तुला?
हर्षद- listen to me. फालतू बडबड नको करू.
रिटा- ओके बोल.
हर्षद- हे बघ नेहा तिचा पासपोर्ट तुझ्याकडे उद्या देईल. तिकीट काढ, तिचा visa करून घे पण नंतर तिचा पासपोर्ट गुल कर.
रिटा- what? अरे माझी नोकरी जाईल. वेडा आहेस का तू?
हर्षद- नोकरी मी मिळवून देईन दुसरी. आणि note ७ प्रो परवा मिळेल तुला आणि त्याच बरोबर डीझेलची एक जीन्स पण…
रिटा- पण हर्षद…
हर्षदने गाडी एका आडोशाला उभी केली आणि रिटाला आपल्या मिठीत ओढली. तिने हो म्हणेपर्यंत हर्षद तिला कीस करत होता. शेवटी गुदमरून रिटा हम्म म्हणाली आणि हर्षद ने तिला सोडली.
रिटा- (जोरात श्वास घेत) यु डॉग…
हर्षद- yes I am you bitch…
रिटा त्याच्याकडे बघून हसली आणि त्याला आपल्या जवळ ओढला. अंधारात गाडी तिथेच अर्धा तास उभी होती. दोघे निघाले तेव्हा रिटा खुश होऊन हर्षद ने सांगितलेलं काम करायला तयार झाली होती.
नेहा जेवण उरकून ऑफिसात पूर्ण न झालेलं प्रेझेन्टेशन पूर्ण करायला बसली होती. निशिकांत घरी आला. तो बाहेरच जेऊन आला होता. थोडा वेळ टीव्ही बघून तो बेडरूम मध्ये आला. नेहा काम करत होती.
निशिकांत- काय करते आहेस?
नेहा- काम.
निशिकांत- ऑफीसच काम?
नेहा- हो.
निशिकांत- ह्या कामाचे वेगळे पैसे देणार का ऑफिस?
नेहा- नाही.
निशिकांत- मग घरी काम का करतेस? त्यांच्या वेळेत होईल तितकंच करायचं.
नेहा- हम्म…
निशिकांत- आणि हे सिंगापूरच काय खूळ आहे? आपण गावाला जातोय. ऑफिसात नाही सांगितलस ना?
नेहा- नाही. मला सिंगापूरला जाव लागेल.
निशिकांत- मी नको म्हणतो आहे तरी? तो निरंजन तुला माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटतो का? एकदा बघतोच त्याला मी.
नेहा- त्याचा इथे काही संबंध नाहीये.
निशिकांत – नेहा तू जायचं नाहीयेस.
नेहा- मी जाणार आहे.
निशिकांत – माझ्या बहिणीच्या घरच कार्य सोडून तू जाणार? ती पण एकटी? परदेशात?
नेहा- हो…मला जावं लागेल.
निशिकांत- नेहा मी तुझा नवरा आहे आणि माझा अधिकार आहे तुला नाही म्हणायचा. मी तुला सांगतोय तू जाऊ शकत नाहीस.
नेहाने laptop बाजूला ठेवला आणि ती शांतपणे म्हणाली-
नेहा- निशिकांत आपलं लग्न झाल आहे, तुम्ही माझा नवरा आहात हे सर्व मान्य. पण अधिकार वगैरे गोष्टी आपण नाही बोललो तर बर होईल. कारण आपल लग्न कोणत्या परिस्थिती मध्ये झालं, तेव्हा आपल्यात काय understanding आहे ते आपल्याला माहित आहे. सो आपण जे ठरवलं आहे आणि स्वीकार केल आहे त्यात राहूया. ह्या नात्याला कॉम्प्लीकेट नको करुया. प्लीज…
एवढ बोलून नेहा उठून दुसऱ्या रूम मध्ये गेली. निशिकांतला डोळ्यासमोर भूतकाळ दिसू लागला. त्या रविवारी निशिकांत नेहाच्या घरी ठरल्यानुसार गेला. नेहाच्या बाबांनी त्याच स्वागत केल. नेहा घरी होतीच. तिला बघून निशिकांत खुश झाला. त्याने नेहाच्या बाबांना ऑफर दिली होती ती तपशीत सांगितली. नेहाला देखील बाबांचं टेन्शन कोणीतरी दूर करतोय हे पाहून बर वाटल. ती चहा आणायला आत गेली असताना निशिकांत ने वडिलांना ऑफर दिली. त्या दोघांच लग्न लावून दिलं तरच हे काम होऊ शकेल असं सांगितल. वडिलांना त्यात देखील वावग वाटलं नाही. निशिकांतमध्ये बोट ठेवायला जागा नव्हती. दिसायला बारा होता. इतका मोठा प्रोजेक्ट करणार होता. वर संशोधनाची धावपळ करायची गरज नव्हती. मुलगा आयता दाराशी चालत आला होता. नेहा बाहेर यायच्या आत वडिलांनी होकार दिला.
वडिलांच्या हट्टासमोर नेहाला झुकावं लागलं. पत्रिका वाटल्या गेल्या. लग्न झालं की दुसर्या दिवसापासून घराचं काम सुरु करायचा वायदा होता निशिकांतचा. नेहाला का कुणास ठावूक ह्या लग्नात अडकू नये अस झालं होतं. पण वेळ आता निघून गेली होती. ठरल्या दिवशी लग्न लागलं. नेहाला लग्नात देखील ते नेहमीच स्वप्न डोळ्यासमोर दिसत होतं. लग्न लागल्यावर निशिकांतच्या घरी त्या रात्री निशिकांत अधाशीपणाने तिच्या जवळ आला. तेव्हा नेहाने त्याला निक्षून सांगितल की हे लग्न तिने वडिलांच्या मर्जीखातर केल आहे. त्यामुळे तिला comfortable वाटल्याशिवाय ती त्याला जवळ येऊ देणार नाही आणि त्यानेही प्रयत्न करू नये. हे बोलून नेहा दुसर्या खोलीत जाऊन झोपली ती आजतागायत. पुढे त्या रागातून निशिकांत ने त्यांच्या घराच काम केल नाही. म्हणजे ते कधीच होणार नव्हत. पण नेहाला सांगायला त्याला तिच्या वागण्याच कारण मिळालं होतं.
दुसर्या दिवशी नेहा पासपोर्ट घेऊन ऑफिसला आली. हर्षद लक्ष ठेऊन होता. नेहाने पासपोर्ट रिटाकडे दिला आणि ती कामात गर्क झाली. रिटा ने तिच तिकीट आणि व्हिसाची तयारी सुरु केली. नेहाला सिंगापूरला जाता येऊ नये म्हणून काय गोष्टी तिच्या मागे घडत आहेत ह्याची नेहाला कल्पना नव्हती. तिचं जाणं अशक्य होत. त्याच वेळी Airbus A380 च्या बिझनेस क्लासच्या सीट मध्ये सुखावलेला निरंजन नेहा नक्की येणार ह्या विश्वासाने खुश होता. नेहा इथे संकटात अडकणार होती आणि तिथे निरंजन बसलेल्या त्या अजस्त्र यंत्राने हवेत झेप घेतली होती.
क्रमश:
भाग १५
……दुसर्या दिवशी नेहा पासपोर्ट घेऊन ऑफिसला आली. हर्षद लक्ष ठेऊन होता. नेहाने पासपोर्ट रिटाकडे दिला आणि ती कामात गर्क झाली. रिटा ने तिच तिकीट आणि व्हिसाची तयारी सुरु केली. नेहाला सिंगापूरला जाता येऊ नये म्हणून काय गोष्टी तिच्या मागे घडत आहेत ह्याची नेहाला कल्पना नव्हती. तिचं जाणं अशक्य होत. त्याच वेळी Airbus A380 च्या बिझनेस क्लासच्या सीट मध्ये सुखावलेला निरंजन नेहा नक्की येणार ह्या विश्वासाने खुश होता. नेहा इथे संकटात अडकणार होती आणि तिथे निरंजन बसलेल्या त्या अजस्त्र यंत्राने आदल्या रात्रीच झेप घेतली होती. काही क्षणात शहरातल्या टोलेजंग इमारती काडेपेटी इतक्या लहान दिसू लागल्या. एकरावी अवाढव्य वाटणारे ब्रिज खेळण्यातले वाटू लागते. निरंजनच्या डोळ्यासमोर कोंडीबाच्या डोंगरावरून खूप छोटे दिसणारे जत्रेचे तंबू आले.
मयुरेश्वराच दर्शन घेऊन यमुना पायर्या उतरून खालच्या अंगाला आली. झाडीत लपलेला शिरप्या पुढे झाला. आता सूर्य पश्चिमेला दिसेनासा होत होता. कोंडीबाच्या डोंगरावरची पूर्व दिशा झाडांच्या आडोशात अंधारली होती. त्याच अंधारात शिरप्या आणि यमुना भेटत होते. यमुनाने पुढे होऊन त्याचा हात हातात घेतला आणि दोघे त्या कड्याच्या दिशेने चालू लागते. कड्यावर एक मोठा काताळ होता. त्यावर बसून दोघांनी दरीत पाय सोडले. डोंगरावर आता छान गारवा पसरत होता पण तो काताळ अजूनही गरम होता. दोघे तिथे बसल्यावर यमुनाने शिरप्याच्या राकट बोटात आपली लांबसडक नाजूक बोट गुंफली आणि ती त्याला खेटून बसली. तिच्या मऊ, उबदार स्पर्शाने शिरप्या अस्वस्थ होत होता. समोर खाली देवीच्या मैदानात अजूनही उजेड होता. सध्या देवीची जत्रा भरली होती तिथे. खेळाची, वस्तूंची, फुलांची आणि खाउची दुकान लागली होती. वेगवेगळ्या आकाराचे पाळणे फिरत होते. बाया पोरांची झुंबड उडाली होती. जत्रेत गेल्यावर मोठी वाटणारी ती दुकान, मैदानच्या बाजूला असलेल देवीचं मंदिर डोंगरावरून खूप लहान वाटत होत.
शिरप्या- यमे हे सगळ किती लहान वाटत ना इथून पाहिल्यावर?
यमुना- हम्म…आपण आयुष्यात इतकी प्रगती करायची ना की त्या शिखरावरून सगळी दु:ख अशीच लहान वाटायला हवी.
शिरप्या- आता मी काय प्रगती करणार अजून? जे आहे ते हेच आहे बघ.
यमुना- का? तू पण प्रगती करू शकतोस. हे बघ मुळात शिक्षण हव. शिकलं की माणसाची विचार करायची पद्धत बदलते.
शिरप्या- ठीक आहे. पुढल्या जन्मी शिकतो मी नक्की.
यमुना- पुढला जन्म का? ह्या जन्मी शिक.
शिरप्या- आता ह्या वयात काम करू की बुक शिकू?
यमुना- ह्या वयात म्हणजे? म्ह्नातारा झालास की काय तू? शी बाई. म्हणजे मी म्हाताऱ्याच्या प्रेमात पडले. कस व्हायचं माझ आता.
शिरप्याने तिला जवळ ओढली आणि म्हणाला-
शिरप्या- दाखवू का किती जवान आहे मी ते?
यमुना- नको बाई. मला माहिती आहे. पण श्री माझी इच्छा आहे की तू शिकावस. अजूनही वेळ गेलेली नाही. मी शिकवेन तुला. शिकशील ना?
शिरप्या- तुला गुरु केली तर प्रेम कोणावर करू? एक तर कमी भेटतो आपण. तो वेळ पण बुक वाचण्यात गेला तर मग बाकी काम कधी करायचं?
यमुना- बाकी काम महत्वाच नाहीये. शिक्षण महत्वाच आहे. पुढल्या वेळी भेटू तेव्हा अभ्यास सुरु.
शिरप्या- पुढल्या वेळी ना? मग आज वेळ का फुकट घालवतोय आपण?
अस म्हणून शिरप्याने तिला त्या कातळावर आडवी झोपवली. यमुनाने डोळे मिटून घेतले. शिर्प्याने तिच्या ओठांवर ओठ टेकले. यमुनानी आवेगाने त्याला जवळ ओढला. आता देवीच्या मैदानात अंधार झाल्यामुळे जत्रेतील दुकानांचे दिवे चमचमताना दिसत होते. पूर्वेच्या आकाशात चंद्राची कोर उगवली होती. शिरप्याच्या स्पर्शाने यमुना वेडीपिशी झाली होती.
हे आठवून निरंजनच्या चेहऱ्यावर हसू आलं. ठाशीव आणि ताशीव एअर होस्टेस ने दिलेला अजून एक शिवास on the rocks हातात घेत त्याने हसत “thanks” म्हणून तिला कटवलं. इतक्या फ्लाईटस चा अनुभव गाठीशी असल्याने कोणती एअर होस्टेस काम करते आहे आणि कोणती आमंत्रण देते आहे हे त्याला व्यवस्थित माहित झाले होते. त्यांच्याच जर्मन पार्टनर पैज लावून एअर होस्टेसना पटवत असे. त्याच्या बहुतांश प्रवासात एअरपोर्ट वरून हॉटेलात तो एखाद्या एअर होस्टेसला बरोबर घेऊनच जात असे. पण निरंजनला त्यात अजिबात रस नव्हता. तो शिवास सिप करत नेहाचा विचार करत होता.
इथे नेहा नेटाने प्रेझेन्टेशन पूर्ण करत होती. ती त्यात इतकी गुंतून गेली होती की लंच टाईम सरून गेल्याच देखील तिच्या लक्षात आल नाही. नेहा तीन वाजता जाऊन जेऊन आली. परत येताना रिटाला स्टेटस विचारून आली. रिटा ने तिचं उद्या रात्रीच्या फ्लाईटच तिकीट काढाल होत. रात्री ११.४० ची फ्लाईट. नेहाने विचार केला की bag घेऊन ओफिसात याव आणि इथून डायरेक्त एअर पोर्टला जावं. नेहा डेस्कवर परत आली आणि कामात बुडून गेली. प्रेझेन्टेशन पूर्ण झाल तेव्हा साडेदहा वाजून गेले होते. नेहाला थोडा थकवा जाणवत होता. आता स्टेशन, मग ट्रेन ह्या कल्पनेने तिला धडकी भरली. पण ते अटळ होत. नेहाने laptop बंद केला. बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन मेकप नीट करून ती डेस्कवर आली. ती निघणार इतक्यात निरंजनचा फोन आला.
नेहा- हाय…
निरंजन- हाय..
नेहा- पोहोचलात ना नीट? Hope you had a good flight.
निरंजन- yes I did…thanks…तू? तू अजून ऑफिसात कशी?
नेहा- तुम्हाला काय माहित?
निरंजन- नेहा मी ह्या फर्मचा पार्टनर आहे. जगातल्या कुठल्याही ऑफिसात कोणत्याही क्षणी काय सुरु आहे हे मला माझ्या फोनवर दिसत.
नेहा- हम्म..प्रेझेन्टेशन बनवत होते आपलं. तुम्हाला just मेल केल आणि आता निघते आहे.
निरंजन- हम्म…उद्या रात्रीची फ्लाईट आहे ना तुझी?
नेहा- हम्म…
निरंजन- कशी जाणार तू घरी?
नेहा- इथून स्टेशन बस किंवा शेयर रिक्षा आणि तिथून ट्रेन. As usual.
निरंजन- एक काम कर नेहा. You take a cab. कंपनी पे करेल. In fact मी बुक करतो. पाच मिनिटात येईल कॅब आपल्या बिल्डींगच्या पोर्च मध्ये. आरामात घरी जा.
नेहा- पण कशाला निरंजन?
निरंजन- हे बघ तू ऑफिसच्या कामासाठी चार तास जास्त बसलीस ना? ह्या प्रेझेन्टेशन मुळे कदाचित कंपनीला काही मिलियन डॉलरच प्रोजेक्ट मिळेल. मग त्या समोर तुझ्यासाठी कंपनी काही शे रुपये नाही खर्च करू शकत? Come on यमु…
त्याच्या तोंडून यमु हे नाव ऐकून नेहाच्या अंगावर शहरा आला. नेहा म्हणली-
नेहा- क…काय म्हणलात तुम्ही आत्ता?
निरंजन- काय? मी म्हणालो बिनधास्त cab घे आणि जा. तू लिफ्ट मध्ये असशील तेव्हा फोन कट होईल. तेवढ्या वेळात मी cab बुक करतो.
नेहा- ते नाही. तुम्ही मला वेगळ्या नावाने हाक मारली…
निरंजन- हो? काय नाव?
नेहा- क..काही नाही…मला तसं वाटलं असेल. जाऊ दे.
निरंजन- हम्म…आता निघ पटकन. मी कॅब बोलावतो आणि परत फोन करतो. मस्त गप्पा मारू….
नेहा- हम्म…
निरंजन- करू ना परत फोन? गप्पा मारायचा मूड आहे ना?
नेहा- हम्म…
निरंजन- ओके बाय. निघ तू.
निरंजन ने फोन कट केला. त्याच्या तोंडून यमु ऐकून नेहाला परत मागच्या जन्मीच्या सर्व घटना डोळ्यांसमोर दिसू लागल्या. त्यातच ती लिफ्ट मध्ये चढून यांत्रिकपणे lobby मध्ये आली. पोर्च मध्ये cab आल्यावर तिच्या नावाची घोषणा झाली. नेहा कॅब मध्ये बसली. निरंजन ने छान प्रीमियम सेदान बुक केली होती तिच्यासाठी. नेहा रीलाक्स बसली. हेड रेस्टवर डोक टेकून तिने डोळे मिटून घेतले. इतक्यात निरंजनचा फोन आला.
नेहा- हेलो…
निरंजन- मिळाली ना कॅब?
नेहा- हम्म…
निरंजन- चांगली आहे ना कॅब? आय मीन काही इश्यू नाही ना?
नेहा- नाही.
निरंजन- ग्रेट. So परवा सकाळी आपण भेटतोय. Right?
नेहा- yes…
निरंजन- मी फोन ठेऊ का?
नेहा- का काय झाल?
निरंजन- तू फक्त हम्म, हो, नाही येस हेच बोलणार असशील तर मला वाटत की मी तुला बोअर करतोय किंवा डिस्टर्ब करतोय. आणि मला ह्यातलं काहीच करायचं नाहीये. सो…
नेहा- नाही निरंजन…तास काहीच नाहीये. बोलते आहे ना मी.
निरंजन- that’s better…तू सिंगापूरला येणार म्हणून घरी काही प्रॉब्लेम नाहीये ना?
नेहा- काही खास नाही.
निरंजन- म्हणजे काहीतरी आहे. काय झालय सांग मला.
नेहा- आमच्या नात्यातील एका प्रोग्राम साठी गावाला जायचं होत…पण I said no…
निरंजन- म्हणजे तुझा नवरा रागावला असणार. ओह…मग cancel करुया का तुझं travel?
नेहा- नाही. Its okay. मी manage केलं आहे.
निरंजन- नेहा मला तुझ्या नवऱ्याबद्दल सांगशील जरा…
नेहा- निरंजन प्लीज आपण ह्या विषयावर नाही बोललो तर चालेल का?
निरंजन- चालेल. तुला आवडेल त्या विषयावर बोलूया पण तू इथे आलीस की. I think you need rest right now. तुझा आवाज सांगतो आहे मला की तू खूप दमली आहेस. सो बाय. मस्त दोन तास झोप काढ cab मध्ये. सी यु. बाय.
निरंजन ने फोन कट केला. आपल्या आवाजावरून आपण दमलो आहोत हे ओळखणाऱ्या, आपल्यासाठी cab बुक करणाऱ्या निरंजनच नेहा कौतुक वाटत होत. त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणत नेहाला झोप लागली ती ड्रायव्हर च्या आवाजाने जाग आली.
ड्रायव्हर- आप का ठिकाना आ गया madam.
नेहा दचकून उठली. त्याला thanks म्हणून बाहेर पडली. घरी आली. जेऊन, शावर घेऊन तिने उद्याची bag भरली. निशिकांत तिला bag भरताना बघत होता. त्याचा प्रचंड संताप होत होता पण तो काहीच करू शकत नसल्याने फक्त आतल्या आत चिडत होता. त्या रागात त्याने दोन पेग जास्त घेतले. नेहा bag भरून आपल्या बेडवर शांत झोपली. पण बाहेर निशिकांत नेहाला काय करून अडवता येईल ह्याचा विचार करत सिगारेटच्या धुराने घर भरून टाकत होता.
रात्रीचे अकरा वाजले असतील. हॉटेल लव्हबर्डस च्या तिसर्या मजल्या वरील कोपऱ्यातल्या खोलीत चुरगळलेल्या बेडवर रिटा निर्वस्त्र, अस्ताव्यस्त पहुडली होती. समोर टीव्हीवर कुठला तरी इंग्रजी सिनेमा सुरु होता. इतक्यात त्या रूमच्या चिंचोळ्या बाथरूम मधून हर्षद आपली अंडरवेअर सारखी करत बाहेर आला. रीटाच्या पोटाची पापी घेऊन तिच्या अंगावर डोक ठेऊन बेडवर पडला.
रिटा- माझा फोन कुठाय? मी नेहाचा पासपोर्ट गुल करणार आहे उद्या.
हर्षद बेडवरून उठला. त्याच्या sack मध्ये असलेला नवा कोरा फोन काढून त्याने रीटाच्या समोर धरला. रिटा तो घ्यायला उठली. हर्षदने फोन लांब नेला आणि म्हणाला इतक्यात नाही. अजून रात्र बाकी आहे. रिटा थांबली. तिने हर्षदकडे एक मादक कटाक्ष टाकला. त्याला बेडवर ढकलला. हर्षद पालथा पडला. नेहा त्याच्या पोटावर बसली आणि काही सेकंदात त्याचा चेहरा तिच्या केसांच्या आड झाकला गेला.
निरंजनला आज पहाटे जाग आली. का कोणास ठावूक पण त्याला अस्वस्थ वाटत होत. आज खर तर सिडनी ऑफिसात असलेला प्रॉब्लेम सोडवून त्याला सिंगापूरला रवाना व्हायचं होत. पण something is not right अस त्याच अंतर्मन त्याला सांगत होत. त्याने काळजीने नेहाला मेसेज केला “hope all goes well आणि तू सिंगापूरला व्यवस्थित येशील. काही प्रॉब्लेम झाला तर मला कळव. सी यु.”
असा मेसेज केल्यावर त्याला बर वाटलं. निरंजन ने पहाटेच हॉटेलच जिम गाठलं. नियमित योगा झाल्यावर त्याने इतर ठरलेले व्यायाम केले. रूम मध्ये येऊन ब्रेकफास्ट करून ती सिडनी ऑफिसला रवाना झाला. त्याच वेळी इथे पहाटे नेहा उठली. निरंजनचा मेसेज बघून तिला बर वाटलं. दिवसाची सुरुवात छान झाली होती. नेहा किचन मध्ये आली आणि तिने चहा टाकला. तिची चाहूल लागल्यावर अचानक निशिकांत ओरडला-
निशिकांत- नेहा…नेहा…
नेहा त्याचा आवाज ऐकून धावत त्याच्या रूम मध्ये गेली. निशिकांत छातीवर हात घट्ट धरून नेहाला हाका मारत होता. तिला आलेली बघून तो बेडवर पडला. त्याची ती अवस्था बघून नेहा घाबरली. तिने डॉक्टरना फोन केला. निशिकांतचा प्लान यशस्वी होत होता. इथे हॉटेल लव्ह बर्डस मधून बाहेर पडलेले हर्षद आणि रिटा त्यांचा प्लान यशस्वी करणार होते.नेहाला समोर अंधार दिसत होता आणि ह्या पासून अनभिज्ञ असलेला निरंजन सिडनी ऑफिसात कामात गुरफटला होता.
क्रमश:
भाग १६
नेहा त्याचा आवाज ऐकून धावत त्याच्या रूम मध्ये गेली. निशिकांत छातीवर हात घट्ट धरून नेहाला हाका मारत होता. तिला आलेली बघून तो बेडवर पडला. त्याची ती अवस्था बघून नेहा घाबरली. तिने डॉक्टरना फोन केला. निशिकांतचा प्लान यशस्वी होत होता. नेहा डॉक्टर ना फोन करून निशिकांत जवळ आली. निशिकांत छातीवर हात धरून झोपला होता. छातीत दुखत असल्याच नाटक करत होता. नेहा त्याच्या छातीवर चोळत म्हणाली-
नेहा- काय होतय निशिकांत?
निशिकांत- नेहा…नेहा….
त्याने नेहात्च्या हातावर हात ठेवला. नेहाच्या मऊ हाताचा स्पर्श त्याला आवडत होता.
नेहा- थांबा. मी बाम लाऊ का छातीला?
निशिकांत- हो प्लीज लाव.
नेहाने धावत जाऊन बामची डबी आणली आणि ती त्याच्या छातीवर बाम चोळू लागली. निशिकांत तिच्या स्पर्शाने सुखावत होता. नेहाला त्याची जराही कल्पना नव्हती. इतक्यात दाराची बेल वाजली. नेहाने दार उघडलं. डॉक्टर आले होते. त्यांनी निशिकांतला तपासलं. बीपी आणि पल्स पाहिली. म्हणाले-
डॉक्टर- बीपी आणि पल्स ठीक आहे. मस्क्युलर पेन असेल. मी पेन किलर देतो. बरे होतील हे संध्याकाळ पर्यंत.
हे ऐकून डॉक्टरला त्या क्षणी मारून टाकावा असा विचार निशिकांतच्या मनात आला.
निशिकांत- पण डॉक्टर हार्टच काही नसेल ना?
डॉक्टर- अहो हार्टच काही असत तर तुम्ही असे बोलू शकला नसतात.
निशिकांत- पण डॉक्टर अस म्हणतात ना कधीकधी हार्ट attack आलेला कळत पण नाही.
डॉक्टर- तो पेशंटला कळत नाही. मी डॉक्टर आहे. मला कळत हार्ट attack आहे की नाही ते. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. येतो मी.
डॉक्टर निघाले. नेहा त्यांना दारापर्यंत सोडायला गेली.
नेहा- डॉक्टर काळजी करण्यासारख काही नाहीये ना?
डॉक्टर- अजिबात नाही.
नेहा- तस नाही. मी काही दिवस नाहीये. हे एकटेच असतील म्हणून विचारते आहे.
डॉक्टर- जा तुम्ही बिनधास्त. ह्यांना फक्त दारू आणि सिगारेट कमी करायला सांगा. बाकी काही नाही.
नेहा- ओके डॉक्टर thanks.
नेहाने डॉक्टरना पाचशेची नोट दिली. डॉक्टर गेले. नेहाने दार लावलं आणि ती वळली. वळताच निशिकांत समोर उभा होता. त्याने नेहाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला-
निशिकांत- नेहा प्लीज मला सोडून नको ना जाऊ. मला खूप भीती वाटते नेहा.
नेहा स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत म्हणाली-
नेहा- निशिकांत प्लीज सोडा मला.
निशिकांत- नको ना नेहा. हे बघ…तुला जायचं तर जा. पण तुझ्या गोड आठवणी मला देऊन जा./ मी त्या आठवणीत तुझ्या शिवायचे दिवस काढेन.
नेहा- निशिकांत प्लीज. आपल्यात काय ठरलं आहे ते विसरू नका.
नेहाच्या स्पर्शाने निशिकांतच्या अंगात आता सैतान जागा झाला होता. त्याने नेहाचा top हातात धरून फाडला. तो नेहाच्या पाप्या घेय लागला. आपले सिगारेट ओढून काळे झालेले ओठ नेहाच्या ओठांजवळ नेऊन तिचा कीस घ्यायचा प्रयत्न करू लागला. त्याच्या घट्ट पकडीत नेहा पूर्ण अडकली होती.
नेहा- निशिकांत प्लीज मला सोडा. हे बरोबर नाहीये.
निशिकांत- माझी लग्नाची बायको आहेस तू आणि आज मी मला हव ते मिळवणार. मग तुला काय करायचं ते करून घे.
निशिकांत ने तिला बेडवर ढकलली आणि स्वतः तिच्या अंगावर आरूढ झाला. नेहा किंचाळत होती. पण निशिकांत ऐकायला तयार नव्हता. इतक्यात नेहाच्या हाताला साईड टेबलवर असलेली निशिकांतची बीयरची रिकामी बाटली लागली. नेहाने पलंगाच्या चौकटीवर आपटून ती बाटली फोडली. आवाजाने निशिकांत दचकला. नेहा म्हणाली-
नेहा- हरामखोर माणसा बाजूला हो नाहीतर ही बाटली चेहऱ्यावर खुपसेन.
निशिकांत घाबरून बाजूला झाला. नेहा उभी रहात म्हणाली-
नेहा- आज ह्या क्षणी मी तुझ्याशी झालेलं लग्न आणि नात मोडते आहे. मी आज bag घेऊन कायमची ह्या घरातून बाहेर पडते आहे. माझ्या जवळपास जरी आलास तरी ही बाटली मी तुझ्या अंगात शंभर वेळा खुपसेन. मी फासावर जैन पण तुला संपवून टाकेन. इथेच बस गपचूप.
नेहा रूम मधून बाहेर पडली. तिने बेडरूम बाहेरून lock केली. आपल्या रूम मध्ये येऊन कपडे बदलले. चेहऱ्यावर लागलेली निशिकांतची थुंकी चेहरा खसखस धुवून पुसून टाकली. आरशात स्वतःचा चेहरा बघून नेहा अगतिकपणे ढसा ढसा रडली. मग परत चेहरा धुवून कपडे बदलून, bag भरू घरातून बाहेर पडली. लिफ्टमध्ये चढताना घराचं दार आणि त्यावर लिहिलेली “निशिकांत- नेहा” ही पाती बघून आलेला आवंढा तिने गिळला. घराची चावी मागे येऊन घराच्या उंबर्यावर ठेवली. घरातील देवाना बाहेरूनच नमस्कार करून नेहा निघाली.
हर्षद नेहाचा पासपोर्ट आणि विसा हातात घेऊन रिटाच्या डेस्क जवळ उभा होता. ते घेऊन हर्षद निघाला.
रीटा- हर्षद ते कुठे नेतो आहेस?
हर्षद- destroy करायला.
रिटा- हर्षद प्लीज. Let me handle it. नेहाने मला विचारलं तर काय सांगू?
हर्षद- सांग की इथेच ठेवले होते, हरवले म्हणून. शोधायचं नाटक कर.
रिटा- पण हर्षद….
हर्षद- do as I say….
रिटा हर्षद समोर काही बोलू शकत नव्हती. हर्षद ऑफिसच्या पेपर श्रेडींग मशीन जवळ आला. तो विसा आणि पासपोर्ट त्यात टाकणार इतक्यात त्याच्या मनात विचार आला की आजची ट्रीप avoid झाली की उद्या आपण नेहाला विसा आणि पासपोर्ट ऑफिसात मिळाला अस सांगून देऊ. तेवढाच एक brownie पोइंत मिळेल. त्याने विचार बदलला. आणि पासपोर्ट आणि विसा श्रेडींग मशीनच्या मागे सरकवून ठेवले. तिथे कोणीच बघायचा प्रश्न नव्हता. हर्षद त्याच्या डेस्कवर येऊन नेहा यायची वाट बघत होता. आज नेहाला उशीर झाला तरी ती ऑफिसला नक्की येणार ह्याची त्याला खात्री होती.
नेहा bag घेऊन ऑफिसच्या इमारतीत शिरली. Lobby मधील त्या थंडाव्याने तिला जरा बर वाटलं. तिला पोहोचेपर्यंत बारा वाजले होते. ती लिफ्टकडे जाणार इतक्यात निरांजनाचा फोन आला.
नेहा- हेलो…
निरंजन- काय झाल नेहा. Anything wrong?
नेहा- छे…काही नाही.
निरंजन- मला तुझ्या आवाजावरून तस वाटलं. All okay ना?
नेहा- हो…
निरंजन- माझं इथलं काम संपल आहे. आता हॉटेलवर जाऊन चेक आउट करून एअर पोर्टला जातो. सिंगापूर फ्लाईट घेतो. उद्या भेटूया. तुझा विसा मिळाला ना? Priority वर प्रोसेस करायला सांगितला होता मी.
नेहा- ह..हो..मिळेल. मी लिफ्ट जवळच आहे.
निरंजन- ओह..तुला उशीर झाला का? Any problem नेहा?
नेहा- नाही. काही प्रॉब्लेम नाही. येते मी उद्या.
निरंजन- ओके. वाट बघतोय मी. बाय…
नेहा- बाय….
नेहा लिफ्ट मध्ये शिरली. ऑफिसच्या फ्लोअर वर आल्यावर तिने bag रिसेप्शन वर ठेवली आणि ती ऑफिसात गेली. लगेच रिटाच्या डेस्कवर जाऊन तिने विसा विषयी विचारणा केली.
नेहा- हाय रिटा माझा सिंगापूर विसा आला ना?
रिटा- हो आला आहे.
नेहा- ग्रेट. दे ना मग.
रिटा- तू बस डेस्क वर. मी आणून देते.
नेहा- ओके. Thanks.
नेहा तिच्या डेस्कवर येऊन बसली. उद्याच्या प्रेझेन्टेशनला फायनल टचेस देऊ लागली. ते करताना तिला सकाळचा प्रसंग आठवत होता. सिंगापूर वरून परत आल्यावर कुठे राहायचं हा प्रश्न भेडसावत होता आणि त्या नकारात्मक विचारात “नेहा all okay ना?” हे नुसता तिचा आवाज ऐकून विचारणारा निरंजन आठवून त्याला भेटायला मिळणार हा विचार सुखावून टाकत होता. नेहा कामात इतकी गढून गेली की तिला संध्याकाळचे पाच वाजलेले कळले पण नाही. तिने प्रेझेन्टेशन फायनल सेव्ह करून वर बघितलं तेव्हा तिच्या किती वाजले ते लक्षात आल. ती उठून घाईने रीटाच्या डेस्क जवळ गेली. मुंबईचा ट्राफिक जमेस धरता तिला सहाला निघावं लागणार होत. थोडं लवकर पोहोचू पण उशीर नको अस तिला वाटत होत. पहिलाच प्रदेश प्रवास. कस जमेल. काही चुकणार तर नाही ना ही भीती मनात होती. रीटाच्या डेस्कवर जाऊन नेहाने विचारलं-
नेहा- रिटा माझा विसा आणि पासपोर्ट?
रिटा- ओह शुअर. थांब.
हे बोलून रिटा ने स्वतःचा drawer उघडला. आतील फोल्डर्स मध्ये ती शोधू लागली. नेहा अस्वस्थ होत होती.
रिटा- इथेच तर ठेवला होता तुझा विसा आणि पासपोर्ट. कुठे बर गेला?
नेहा- what do you mean की कुठे गेला?
इतक्यात हर्षद तिथे आला.
हर्षद- any problem नेहा?
नेहा- रिटा म्हणते आहे की माझा पासपोर्ट आणि विसा सापडत नाहीये.
हर्षद- हे काय आहे रिटा?
रिटा- सर मी इथेच ठेवला होता. पण आता दिसत नाहीये. नेहा मी इथे नसताना तू नेला नाहीस ना?
नेहा- काहीही काय? मी माझ काम करत होते.
हर्षद- पण तरीही नेहा नीट आठव. तूच नेला असशील आणि विसरत असशील.
नेहा- मी इथे आलेच नाहीये. आणि मी नेला असेल तर हिच्याकडे का मागेन परत?
हर्षद- तेच तर. तू नेला असशील तर हिच्याकडे परत का मागते आहेस?
नेहा- पण मी नेलाच नाहीये.
हर्षद- मग पासपोर्ट का पक्षी आहे का की उघडले पंख आणि उडून गेला? हे बघ रिटा ह्या travel desk वर बरीच वर्ष काम करते आहे आणि ती खूप एफिशियंट आहे. Lets not doubt her efficiency.
तिथून जात असलेल्या एक दोन कलीग्सना हर्षद ने बोलावलं.
हर्षद- भूषण तू सांग. तुला रिटा inefficient वाटते का?
भूषण- नाही. का?
हर्षद- बर नितीन तुला काय वाटत?
नितीन- रिटा कामात perfect आहे. पण काय झाल?
हर्षद- काही नाही. नेहाला वाटतं की रिटा काम नीट करत नाही.
नेहा- हर्षद मी अस काहीही म्हणाले नाहीये. माझा विसा आणि पासपोर्ट रिटाने मिस्प्लेस केला इतकाच म्हणते आहे मी.
हर्षद- पण रिटा अस का करेल? तिचे ऑफिसात ओफिशियाल शिवाय चांगले किंवा वाईट, कोणतेही personal संबंध नाहीयेत. काही लोकांचे असतात म्हणा.
नेहा- हर्षद प्लीज. मला भांडायला वेळ नाहीये. रिटा प्लीज माझा पासपोर्ट आणि विसा शोध. मला निघायचं आहे तासाभरात.
रिटा शोधायचं नाटक करू लागली. हर्षद नेहाची तगमग एन्जॉय करत तिथेच तिला न्याहाळत उभा होता. त्यात अर्धा तास गेल्यावर रिटा म्हणाली सॉरी नेहा. तुझा पासपोर्ट आणि विसा मिळत नाहीये. नेहाला काय रीएक्त करायचं कळत नव्हत. ती विषण्ण अवस्थेत स्वतःच्या डेस्कवर येऊन बसली. आता निरंजनला काय सांगायचं, त्याच प्रेझेन्टेशन कस होईल ह्या काळजीने तिला रडू आलं. ती उठून बाथरूम मध्ये गेली. चेहरा नित करून परत आली तर मोबाईल मध्ये मेसेज होता की फ्लाईट दोन तास delay आहे. आता तास काय आणि दोन तास काय. नेहाला काहीच फरक पडत नव्हता. ती चेयर वर डोक मागे टेकून बसून राहिली. त्यातच तिला स्ट्रेस मुळे झोप लागली. अचानक दचकून ती जागी झाली तेव्हा सात वाजले होते. ओफिसातील बहुतेक लोक निघून गेले होते. नेहा हताशपणे उठली. कुठे जायचं हे माहित नव्हत. इतक्यात श्रेडर मशीन जवळून ओरडा ऐकू आला. एक कलीग श्रेडींग करत असताना मशीन मधून स्पार्किंग झाल होत. त्वरित electrician आला आणि त्याने स्वीच बंद करायला मशीन पुढे ओढलं. ते ओढून स्वीच बंद करताना त्याला नेहाचा पासपोर्ट आणि विसा दिसला. उचलून पाहिल्यावर तो नेहाचा आहे हे लक्षात आल्यावर त्याने नेहाला हाक मारून तिच्या वस्तू तिच्या हवाली केल्या. नेहा विसा आणि पासपोर्ट बघून खुश झाली. तिने धावत रिसेप्शन गाठलं. लिफ्टची वात बघत असताना cab बुक केली. लॉबी मध्ये cab ची वाट बघत असताना निरंजनला मेसेज केला starting from the office now.
नेहा cab मधून उतरली. सिक्युरीटी, चेकीन, इमिग्रेशन करून ती आत गेली. तिथल्या ड्युटी फ्री शॉप मध्ये तिने का कुणास ठावूक एक वाईनची बाटली घेतली. फ्लाईट बोर्ड करताना नेहा खूप आनंदी होती. तिला कल्पना देखील नव्हती की ती आयुष्यातील एका नव्या पर्वाकडे वाटचाल करते आहे. विमानाने टेक ऑफ केला. नेहा खिडकीबाहेर दिसत असलेली दिव्यांनी गच्च भरलेली मुंबई वरून बघत होती. आता विमान खूप उंचावर आलं. बाहेर फक्त अंधार दिसत होता. नेहा काचेला नाक लावून बाहेर बघत होती. इतक्यात तिला विमानाच्या पंखावर दोन पांढर्या धुरकट आकृत्या दिसल्या. तिने निरखून पाहिलं तर त्या यमी आणि शिरप्याशी खूप साम्य असलेल्या होत्या. नेहा त्यांच्याकडे बघत होती. त्यांनी तिथूनच नेहाला टाटा केला आणि त्या आकृत्या हवेत विरून गेल्या. नेहाच्या डोळ्यावर झोप येऊ लागली होती. नेहा झोपली. तिला जाग आली तेव्हा विमानाने सिंगापूर मध्ये डिसेंड सुरु केला होता. आयुष्यातील काही महत्वाचे दिवस नेहाची वाट बघत होते. नेहा खिडकीबाहेर दिसणार सिंगापूर डोळ्यात साठवून घेऊ लागली आणि विमानाने अलगद landing केलं होत. नेहा सिंगापूरला पोहोचली होती.
क्रमश:
भाग १७
…… नेहाच्या डोळ्यावर झोप येऊ लागली होती. नेहा झोपली. तिला जाग आली तेव्हा विमानाने सिंगापूर मध्ये डिसेंड सुरु केला होता. आयुष्यातील काही महत्वाचे दिवस नेहाची वाट बघत होते. नेहा खिडकीबाहेर दिसणार सिंगापूर डोळ्यात साठवून घेऊ लागली आणि विमानाने अलगद landing केलं होत. नेहा सिंगापूरला पोहोचली होती. नेहा सिंगापूरचा अवाढव्य एअर पोर्ट बघून थोडी धास्तावली. ती बघत असलेला अवाढव्य भाग हा त्या पसार्याचा एक लहानसा हिस्सा आहे हे तिला माहित नव्हत. कव्हेयर बेल्ट वरून सरकत आलेली आपली bag उचलून नेहा अराईवल गेट मधून बाहेर आली. कॅब तिची वाट बघतच होती. सिंगापुरचे चकचकीत रस्ते, शिस्तबद्ध ट्राफिक, स्वच्छता नेहा डोळ्यात साठवून घेत होती. सकाळचे नऊ वाजले होते. ऑफिसला जाणार्या लोकांची रस्त्यावर लगबग सुरु होती. नेहाची कॅब हॉटेलच्या पोर्च मध्ये थांबली. पिकप हॉटेलचा असल्याने पैसे वगैरे द्यायचा प्रश्न नव्हता. नेहा रिसेप्शन वर आली. स्वागतिकेने तिचे हस्त स्वागत केले. आयुष्यात कधीही इतक्या posh हॉटेलात राहणे सोडा. गेलेली देखील नसल्याने नेहाला थोड बुजायला होत होत. तिने आपलं नाव सांगून पासपोर्ट रिसेप्शन वर दिला. स्वागतिकेने तिला रूम अलोट केली. नेहा सावकाश चालत लिफ्ट मध्ये शिरली. मंद, आल्हाददायक मुझिक लिफ्ट मध्ये ऐकू येत होत. नेहाने सहज मागे असलेल्या आरशात बघितलं. ती स्वतःला न्याहाळू लागली. आपण खरच आकर्षक दिसतो ह्याची तिला परत एकदा जाणीव झाली. ती आपली आकर्षण स्थळ आरशात बघत मनातून खुश होऊ लागली. इतक्यात बाविसावा मजला आला देखील. नेहा लिफ्टमधून बाहेर पडून तिच्या रूम मध्ये शिरली. ती प्रशस्त रूम, तिथले फर्निचर, मऊ बेड, तिथे भिंतीवर टांगलेली पेंटिंग, रूम मधला गालिचा, छतावरचे दिवे, प्रशस्त बाथरूम, बाथ टब, आकर्षक पडदे आणि त्या रूम मध्ये असलेला एक कोझी रोमांटिक फील नेहाला आवडला. नेहाने bag मधील कपडे कपाटात नीट लावून ठेवले. मग रात्रभर घातलेले कपडे काढून साधा टीशर्ट घालावा ह्या विचाराने तिने रात्रीचे विमानात घातलेले कपडे काढून ठेवले आणि ती कपाटात ठेवलेल्या कपड्यांची चळत बघू लागली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. त्या अवस्थेत नुसत्या मोबाईलच्या रिंगने ती दचकली आणि पटकन काढून ठेवलेले कपडे तिने अंगाशी कवटाळले. मग तिच्या लक्षात आल की हे हॉटेल आहे, आपण सिंगापूर मध्ये आहोत आणि फोन वाजतो आहे. घाबरण्यासारख काही नाहीये. आपण सेफ आहोत. “आपण सेफ आहोत” ह्या विचाराने तिला खूप बर वाटलं. तिने हातात घेतलेले कपडे तसेच टाकून नेहा तशीच बाहेर आली आणि सोफ्यावर ठेवलेला फोन बघितला. फोन निरंजनचा होता. त्याच नाव वाचून उगाच तिच्या उघड्या अंगावर काटा आला. तिने फोन घेतला.
नेहा- हेलो…
निरंजन- पोहोचलीस ना हॉटेलला? रिसेप्शन ने मला फोन करून सांगितल तू पोहोचल्याच.
नेहा- हो….
निरंजन- how was the flight? काही त्रास नाही ना झाला?
ह्या इतक्या आपुलकीच्या प्रश्नाने नेहा खूप सुखावली. फोन कानाला लावून आत येऊन बेडवर आडवी पडून बोलू लागली.
नेहा- नाही. काही त्रास नाही.
निरंजन- बर ऐक, तू फ्रेश हो आणि टेरेसला पूल साईडला ब्रेकफास्टला ये..मी वाट बघतोय. तिथे बाकी बोलू ओके?
नेहा- ओके.
नेहाने खुश होत फोन बेडवर भिरकावला. उठून आरशात आपल्या देहाच दर्शन घेतलं. आरशासमोर गोल गोल फिरत आपल सौंदर्य न्याहाळत ती स्वतःवर खुश झाली. धावत बाथरूम मध्ये जाऊन तिने टब चा नळ सुरु केला. त्यात पाणी जमा होऊ लागल. नेहाने तिथेच शेजारी ठेवलेली सुगंधी द्रव्य पाण्यात ओतली, नेहा टबात बसली. तिला एकदम लक्सच्या जाहिरातीत दिसणार्या नट्या आठवल्या आणि ती आणखी खुश झाली.
मरीना बे हॉटेलच्या टेरेसवर असलेल्या प्रचंड स्विमिंग पूलच्या बाजूला एका शांत कोपर्यात निरंजन नेहाची वाट बघत कॉफी घेत होता. कॉफीचा कप ओठाला लावल्यावर त्यातून निघणारी वाफ समोरचे दृश्य धुरकट करत होती. त्या वाफेच्या पलीकडून त्या वाफेपेक्षाही हॉट दिसत असलेली नेहा निरंजनला येताना दिसली. निरंजन ने डोळे चोळले. त्याला सिनेमातील नायिका स्लो मोशन मध्ये येताना दाखवतात तसा फील आला. नेहाने हाय हिल शूज, त्यावर एक काळा फोर्मल मिनी स्कर्ट. त्यावर पांढरा स्लीव्हलेस एलीगंट top घातला होता. तिचे मोकळे केस वार्याने उडत होते. काळ्या गोगल मागे तिचे डोळे लपले होते. अंगाला घट्ट बसणार्या त्या स्कर्ट मधून तिची फिगर कमाल वाटत होती. निरंजन तिला आपादमस्तक बघण्यात इतका हरवला की तिने समोर येऊन हाय निरंजन म्हणत पुढे केलेला हात त्याच्या लक्षात आला नाही.
नेहा- हाय निरंजन काय झाल?
आपण डायरेक्ट तिच्याकडे रोखून बघत आहोत हे तिच्या लक्षात येऊ शकेल हे लक्षात येत निरंजन भानावर आला आणि तो शेक hand साठी पुढे आलेला तिचा हात हातात घेत म्हणाला-
निरंजन- झाल काही नाही. आज सिंगापूर मध्ये इंडियात न झालेलं एका ब्युटीच स्पेशल दर्शन झाल त्यात हरवून गेलो होतो. बस ना.
नेहा खळखळून हसली. आज तिचं हसू पण खूप मोकळ आणि मोहक वाटत होत निरंजनला. नेहा समोर बसल्यावर तिचा स्कर्ट आणखी वर झाला. मधल्या टेबलाच्या काचेतून निरंजनला नेहाचे लांबसडक ताशीव पाय दिसत होते. त्या सौंदर्याने निरंजन थोडा डिस्टर्ब होत होता. इतक्यात वेटर आला. नेहाने ब्रेकफास्ट ऑर्डर केला. वेटर गेला.
निरंजन- सो नेहा. कस वाटल सिंगापूर?
नेहा- अमेझिंग आहे. आय मी मी फक्त एअर पोर्ट वरून इथे येताना बघितल त्या बद्दल बोलते आहे. बाकी काही बघितल नाहीये अजून.
निरंजन- ओके. एक काम करू. आजची क्लाएन्त मिटिंग लंचला संपेल. मग आपण फ्री आहोत. आपण मस्त लंच करू आणि साईट सीइंग करू. आवडेल तुला?
नेहा- ओह. That will be great. मला खूप आवडेल.
निरंजन- ओके. आता कामच बोलूया. हे बघ. हा जो क्लाएन्त आहे तो लोडेड आहे पण त्यांच्या अपेक्षा पण खूप असतात. माझ्या प्रेझेन्टेशनच्या आठ नंबर स्लाईड मध्ये….
त्या दोघांच कामच डिस्कशन सुरु झाल. नेहा मन लावून ऐकत होती. निरंजनच्या बुद्धी आणि प्लानिंगच कौतुक करत होती. “अश्या प्रकारच्या माणसाने प्रेझेन्टेशन केल्यावर क्लाएन्त प्रेमात नाही पडणार तर काय? ह्याच्या तर कोणीही प्रेमात पडेल.” असे विचार करत ती त्याला न्याहाळात होती. सहा फुट उंच, देखणा, सावळा, पिळदार शरीराचा वेल ग्रूम्ड निरंजन कोणत्याही मुलीला भुरळ घालू शकेल इतका handsome होता. कामाविषयी बोलताना त्याच्या सेक्सी डोळ्यात हुशारीची जी झलक दिसत असे ती आणि प्रेझेन्टेशन करत असताना त्याचा सिंहाच्या रुबाबात असलेला वावर म्हणजे आईसिंग on the cake होते. ह्या विचारांनी नेहाला हसू आल.
निरंजन- काय झालं? Anything funny?
नेहा- नाही sorry…
निरंजन- its okay. मी सहज विचारलं. काही जोक आठवल असेल तर मलाही सांग. मी पण हसेन म्हणून.
नेहा- नाही काही जोक नाही. सहज हसू आल मला.
निरंजन- अशीच हसत रहा. खूप छान दिसतेस तू हसताना पण…
नेहाने त्याचा शब्द पकडला. मनात विचार आला हसताना “पण”….म्हणजे? इथे जरा जास्तच खुलला आहे निरंजन…हम्म…आणि काय सेक्सी दिसतोय सकाळी सकाळी. सेक्सी आणि त्यात हुशार…मी खल्लास….हम्म…नेहा त्याच्या चेहऱ्याकडे बघत स्वतःशी बोलत होती. निरंजन म्हणाला-
निरंजन- हेलो…ब्रेकफास्ट झाला असेल तर निघूया का?
नेहा- (भानावर येत) हो येस….निघूया ना…
दोघे निघाले. लिफ्ट हळू हळू खाली येत होती. ते हॉटेलच्या पोर्च मध्ये पोहोचल्यावर एक लांब आकाराची मर्सिडीज येऊन थांबली. निरंजन सराईतपणे गाडीत बसला. नेहा थोडी अवघडून त्याच्या शेजारी बसली. ती आयुष्यात पहिल्यांदा मर्सिडीज मध्ये बसली होती. आत बसल्यावर ती गाडी आतून न्याहाळात होतो.
नेहा- मी आज पहिल्यांदाच बसले मर्सिडीज मध्ये. काय मस्त आहे हो ही आतून.
निरंजन- पण हे दोन वर्ष जून मॉडेल आहे. युएस मध्ये माझ्याकडे ह्याच सिरीजच लेटेस्ट मॉडेल आहे. गेल्याच महिन्यात घेतली मी. It’s a beast. तू आलीस युएसला कि बघ.
नेहा- हम्म…
नेहा आता खिडकीतून दिसणार सिंगापूर बघू लागली. निरंजन काचेतून लहान मुलासारख बघत सिंगापूर डोळ्यात साठवून घेत असलेल्या नेहाला डोळ्यात साठवून घेत होता. तिच्या आकर्षक परफ्युमचा वास आता गाडीत पसरला होता. निरंजन नेहाला न्याहाळण्यात पुरता अडकला होता. हायवे वर गाडीने १२० ते १४० चा वेग घेतला होता. समोर असलेला बोगदा वेगाने जवळ येत होता. गाडी बोगद्यात शिरली. त्याच वेळी समोरून येत सलेल्या एका अवाढव्य कंटेनर कॅरीयरच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ते धूड डीव्हायडर ओलांडून ह्यांच्या गाडीच्या दिशेने फरफटत येऊ लागल. ते बघून भेदरलेल्या नेहाने निरंजन अशी जोरात किंकाळी मारून निरंजनला घट्ट मिठी मारली. समोरून येत असलेल्या मृत्यूकडे एक नजर बघून निरंजन ने त्याला कवटाळायला नेहाला मिठीत घट्ट धरून डोळे मिटून घेतले.
क्रमश:
भाग १८
गाडी बोगद्यात शिरली. त्याच वेळी समोरून येत सलेल्या एका अवाढव्य कंटेनर कॅरीयरच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ते धूड डीव्हायडर ओलांडून ह्यांच्या गाडीच्या दिशेने फरफटत येऊ लागल. ते बघून भेदरलेल्या नेहाने निरंजन अशी जोरात किंकाळी मारून निरंजनला घट्ट मिठी मारली. समोरून येत असलेल्या मृत्यूकडे एक नजर बघून निरंजन ने त्याला कवटाळायला आलेल्या नेहाला मिठीत घट्ट धरून डोळे मिटून घेतले. दोन क्षण तसेच गेले आणि त्यांच्या मागे काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज आला. निरंजनने डोळे उघडले. त्यांची गाडी सावकाश पुढे जात होती. तो कंटेनर कॅरियर काही इंचांवरून ह्यांच्या गाडीला स्पर्श न करता पुढे जाऊन बोगद्याच्या भिंतीवर आदळला होता. ड्रायव्हर कडून हे ऐकल्यावर निरंजनच्या जीवात जीव आला. मग अचानक नेहा अजूनही त्याच्या मिठीत असल्याच त्याच्या लक्षात आलं आणि त्याला हसू आलं. त्याने हळूच नेहाला हाक मारली.
निरंजन- नेहा….
नेहाला ती हाक ऐकून आपण जिवंत असल्याच लक्षात आलं. आपण निरंजनला मिठी मारून बसलोय ह्याची जाणीव झाली. नेहा भानावर आली. पण तिला निरंजन पासून लांब जायची इच्छा होत नव्हती. त्याच्या कुशीत तिला खूप छान वाटत होत.
निरंजन- नेहा…we are safe…..
निरंजन बे त्याच्या दंड बाजूला घेत नेहाचा चेहरा दोन्ही हातात धरून तिला सरळ बसवली आणि म्हणाला-
निरंजन- नेहा काहीही झालेलं नाहीये. आपण सेफ आहोत ओके?
नेहा त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती.
निरंजन- are you okay?
नेहा- हम्म…
थोडी घाबरलेली, थोडी बावरलेली, बरीचशी vulnerable दिसत असलेली नेहा निरंजनला खूप आकर्षक वाटत होती. तिला घट्ट मिठीत घ्यावी असे विचार त्याच्या मनात येत होते. इतक्यात client च्या ऑफिसातून फोन आला आणि निरंजन नेहाचे विचार झटकून प्रोफेशनल माणूस म्हणून बोलू लागला. त्याने आम्ही पाच मिनिटात पोहोचत आहोत अस सांगून फोन कट केला आणि नेहाला म्हणाला-
निरंजन- तू तयार आहेस ना? आजच डील मिळायलाच पाहिजे.
नेहा- yes….मी तयार आहे.
क्षणार्धात त्या गाडीत परत एकदा फर्मचा सर्वात यशस्वी पार्टनर आणि त्याची एक कलीग हे नात निर्माण झालं. दोघेही सावरून बसले. त्यांची गाडी client च्या ऑफिसच्या पोर्च मध्ये थांबली. निरंजन दमदार पावलं टाकत लिफ्टजवळ आला. नेहा त्याच्या शेजारी होतीच. नेहाला आता निरंजन म्हणजे शिकार करायला सरसावलेल्या सिंहासारखा भासत होता. त्याची body language बदलली होती. सत्ताविसाव्या मजल्यावरील आलिशान ऑफिसात दोघे आले. client च्या स्वागतिकेने अदबीने त्यांच स्वागत करून त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवलं. निरंजन स्वतः प्रेझेन्टेशन साठी येणार हे ठावूक असल्याने वाट बघायला न लावता client ची सिनियर लगेचच त्यांना जॉईन झाली. निरंजन ने त्यांची फार्म, त्याचा इतिहास, मैलाचे दगड, आजवरची वाटचाल ह्याविषयी महत्वाची माहिती देऊन client टिम इम्प्रेस झाल्याची खात्री करत मुख्य विचायाला हात घातला. client ची टीम आणि नेहा पण निरंजनला बोलताना ऐकून हरवून गेली होती. निरंजनच प्रेझेन्टेशन संपल. client टीम ने काही जुजबी टेक्निकल प्रश्न विचारले. त्यांच्या प्रेसिडेंटला ह्याचं प्रपोजल आवडलं होत. किंमत आणि वेळ ह्यावर चर्चा झाली. काही महत्वाचे पोइंत्स डिस्कस झाले. ते include करून फायनल डोक्युमेंट पाठवलं की पुढे नेहाच्या सिंगापूर ऑफिसची टीम प्रोजेक्ट सुरु करू शकत होती. पण निरंजन ने आज मोठी शिकार केली होती. नेहाला त्याचा प्रचंड अभिमान वाटत होता. अश्या यशस्वी पुरुषाला घट्ट मिठी मारून, त्याची पापी घेऊन कौतुक कराव हा विचार तिच्या मनात आल्यावर पोटात गुदगुल्या झाल्याचा तिला भास झाला. नेहा आणि निरंजन ते डील seal करून निघाले. लिफ्ट मध्ये ते दोघंच होते. आता कौतुक कराव का ह्या विचाराने नेहा लाजली. स्वतःशीच हसली. लिफ्ट लॉबीत आली. दोघे चालू लागले. इतक्यात निरंजन अचानक थांबला आणि म्हणाला-
निरंजन- नेहा आजच्या ह्या यशात तुझा खूप महत्वाचा रोल आहे. तू इतक सुंदर प्रेझेन्टेशन तयार केलसं म्हणून मी ते मांडू शकलो सर्वांसमोर.
अस म्हणून निरंजन ने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या गालाची छान पापी घेऊन तो म्हणाला-
निरंजन- thanks नेहा. तुझ्या contribution साठी तुझं हे अस कौतुक करावस वाटल मला. आज मस्त सेलिब्रेट करुया.
हे बोलून निरंजन बाहेर जायच्या दाराकडे चालू लागला. आपल्या जे मनात होत तेच निरंजनच्या देखील मनात आलं आणि त्याने ते करून देखील टाकल हे लक्षात येऊन नेहा खुदकन हसली आणि निरंजनच्या मागे निघाली.
गाडीत बसल्यावर निरंजन म्हणाला-
निरंजन- आता भटकूया ना?
नेहा- हो…
निरंजन- ग्रेट. पण साईट सीइंगला हे फोर्मल कपडे नको. आपण चेंज करू.
नेहा- ओके.
निरंजन- पण हॉटेलला जाऊन परत बाहेर पाडण्यात वेळ जाईल. इथेच एक किलोमीटरवर एक मॉल आहे. तिथे आपण कपडे खरेदी करू आणि तेच घालून जाऊ.
नेहा- ओके….
आज नेहा कशालाच नाही म्हणण्याच्या मनस्थितीत नव्हती इतकी ती इम्प्रेस झाली होती. दोघे मॉल मध्ये गेले. कपडे खरेदी केले. नेहाने तिच्या खिशाला जेमतेम परवडतील असा एक top आणि shorts घेतले होते. ते बघून निरंजन म्हणाला-
निरंजन- हे काय? एक top आणी फक्त एक shorts?
नेहा- हम्म…सिंगापूर महाग आहे तसं….सो…आणि माझ्याकडे कपडे आहेत ना हॉटेलात. आत्ता घालायला एक पेयर घेतली.
निरंजनला खूप हसू आल. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. निरंजन नेहाचा हात धरून तिला कपड्यांच्या दालनात घेऊन गेला. त्याने स्वतः सहा western tops, चार जीन्स आणि तीन formal ड्रेस नेहासाठी सिलेक्ट केले. आणि म्हणाला-
निरंजन- हे सगळे तू घेते आहेस. फक्त ह्यात तुझी साईझ घे. हे सगळे ड्रेस तुला शोभून दिसतील. आणि हो. आत्ता घालायला तू सर्वात आधी सिलेक्ट केलेला टी शर्ट आणि shorts परफेक्ट आहेत.
नेहा- पण निरंजन….
निरंजन- नेहा हे माझ्याकडून किंवा कंपनीकडून तुझ्या कामच बक्षीस समज. आजची ऑर्डर किती value ची आहे त्याचा विचार कर. त्यालाही पन्नास ने गुण आणि रुपयात त्याची किंमत काय होते ह्याचा विचार कर. जा पटकन ह्या सर्व ड्रेस मध्ये तुझी साईज घेऊन ये. आपण निघूया लगेच.
नेहा खुश होऊन त्या सर्व स्टाईल्स मध्ये तिची साईज शोधू लागली. निरंजनचा चोइस तिला आवडला होता. त्यातील एकही ड्रेस अंगावर घालून ट्राय न करता देखील ते सर्व तिला छान दिसतील ह्याची खात्री वाटत होती. तिने पटापट तिची साईज शोधायला सुरुवात केली.
कपडे बदलून आता ते दोघंही जीवाच सिंगापूर करायला निघाले होते. ह्या आधी असंख्य वेळा सिंगापूरला येऊनही कधीही साईट सीइंग न केलेल्या निरंजनला पण टुरिस्ट म्हणून सिंगापूर भटकायचा अनुभव वेगळाच होता. दोघे शक्य तितक्या ठिकाणी फिरले. संध्याकाळी हॉटेलवर परतले. आपापल्या रूमकडे जात असताना निरंजन म्हणाला-
निरंजन- नेहा डिनर एकत्र करुया का आज? रूफ top रेस्तोरंत मध्ये?
नेहा- चालेल…
निरंजन- ९ वाजता भेटूया? मी तिथे वाट बघतो.
नेहा- ओके…
दोघे आपापल्या रूम मध्ये गेले. फ्रेश होऊन बरोबर नऊ वाजता रूफ top रेस्तोरंत मध्ये दोघ भेटले. निरंजनने कठड्याजवळच टेबल बुक केलं होत. टेबलावर बसल्यानंतर दिव्यांनी झळाळलेल संपूर्ण सिंगापूर दिसत होत. टेबलवर मधोमध काचेच्या कंदिलात मेणबत्ती लावली होती. तिच्या उजेडात नेहाचा चेहरा सुंदर सोनेरी दिसत होता. निरंजन तिलाच न्याहाळत होता. नेहा खाली दिसणार सिंगापूर नजरेत साठवत होती. निरंजन ने विचारलं-
निरंजन- काय करतो तुझा नवरा?
ह्या अनपेक्षित प्रश्नाने नेहा थोडी अदखळली…
नेहा- क..काय?
निरंजन- मी विचारलं काय करतो तुझा नवरा? नाव काय आहे त्याच? मला वाटत तू सांगितल होतस, पण मी विसरलो.
नेहा- निशिकांत…
निरंजन- wow आपण तिघंही न वाले. निरंजन, नेहा आणि निशिकांत. ग्रेट…सो काय करतो निशिकांत?
इतक्यात त्यांनी ऑर्डर केलेलं फूड आल. वेटर ते अदबीने वाढत होता. नेहाला ह्या प्रसंगी निशिकांतचा उल्लेख किंवा त्याची आठवण, त्याचा विचार हे काही नको होत. तिला ह्या स्वप्नवत क्षणात फक्त आणि फक्त निरंजन हवा होता. त्याचा सहवास, त्याची साथ, त्याच्याशी गप्पा हव्या होत्या. पण त्यानेच निशिकांतचा विषय काढल्यावर नेहा हेल्पलेस होती. ती खाली दिसत असलेल्या शहराकडे एक टक बघत होती. निशिकांत आणि त्या आयुष्याच्या त्रासदायक आठवणीनी तिचे डोळे भरून आले. तिने हळूच डोळे पुसले. तेवढ्यात वेटरच सर्व्ह करून झाल होत. निरंजनने त्याला thanks म्हणून नेहाकडे बघितल आणि म्हणाला-
निरंजन- नेहा, फूड इज सर्व्ह्ड. प्लीज स्टार्ट…
नेहा यंत्रवत जेऊ लागली. निरंजनला तिच्या अचानक झालेला बदल लक्षात आला. जेवताना तिला डिस्टर्ब नको म्हणून तो काही बोलला नाही. जेवताना ते दोघेही काहीच बोलले नाही. जेवण झाल्यावर दोघे शांतपणे आपल्या मजल्यावर आले. निरंजन नेहाला गुड नाईट म्हणून त्याच्या रूम मध्ये गेला. नेहा तिच्या रूम मध्ये आली आणि इतकावेळ कंट्रोल केलेलं रडू बांध फोडून बाहेर पडलं. नेहा बेडवर पडून ओक्साबोक्शी रडू लागली. निशिकांत बरोबर लग्न करून आयुष्याची झालेली माती, इथे यायच्या आधी झालेलं भांडण, इथून परत गेल्यावर कुठे राहायचं हा दाहक प्रश्न तिला ह्या स्वप्नवत सफरीतून तिला तिच्या वास्तवात घेऊन गेले. इतक्यात तिचा फोन वाजला. नेहाने डोळे पुसून फोन हातात घेतला. त्यावर दिसत असलेल नाव बघून तिच्या चेहर्यावरचे भाव बदलले.
क्रमश:
भाग १९
….नेहा बेडवर पडून ओक्साबोक्शी रडू लागली. निशिकांत बरोबर लग्न करून आयुष्याची झालेली माती, इथे यायच्या आधी झालेलं भांडण, इथून परत गेल्यावर कुठे राहायचं हा दाहक प्रश्न तिला ह्या स्वप्नवत सफरीतून तिला तिच्या वास्तवात घेऊन गेले. इतक्यात तिचा फोन वाजला. नेहाने डोळे पुसून फोन हातात घेतला. त्यावर दिसत असलेल नाव बघून तिच्या चेहर्यावरचे भाव बदलले. फोन निरंजनचा होता. नेहाने फोन घेतला.
निरंजन- कशी आहेस?
नेहा- म..मी ठीक आहे…
निरंजन- काय प्रोब्लेम आहे?
नेहा- काही नाही. All okay.
निरंजन- मी तिथे येऊ की तू येतेस?
नेहा- न…नाही. त्याची काहीच गरज नाहीये. I am fine….
निरंजन- मी काय विचारलं नेहा? मी तिथे येऊ की तू येतेस? थांब तू. मीच येतो.
नेहा- पण…
निरंजन- बाय. दार उघड.
फोन कट झाला. निहाने घाईत डोळे पुसले आणि दार उघडलं. दारात निरंजन उभा होता.
निरंजन- आत येऊ का?
नेहाने बाजूला होऊन त्याला वाट करून दिली. निरंजन आत आला. रूम नीट न्याहाळून म्हणाला-
निरंजन- सुंदर मुलींच्या रूम देखील किती सुंदर, नीटनेटक्या आणि सुगंधी असतात…अगदी त्यांच्या सारख्याच.
एक खोल श्वास घेत निरंजन तिथल्या मऊ सोफ्यावर बसला. नेहा समोर बेडवर बसली. निरंजन उठून फ्रीज जवळ गेला. फ्रीज उघडून त्याने एक बियर काढली.
निरंजन- नेहा तू बियर?
नेहा- ……..
निरंजन- ओके…
निरंजन दोन कॅन घेऊन आला. एक कॅन उघडून त्याने नेहाला दिला. नेहाने तो यंत्रवत घेतला. निरंजन परत सोफ्यावर बसला. एक सिप घेऊन त्याने नेहाला विचारलं-
निरंजन- सो नेहा काय प्रॉब्लेम आहे?
नेहा- काहीच नाही.
निरंजन- नेहा मी प्रॉब्लेम आहे की नाही अस विचारलं नाहीये. प्रोब्लेम आहे हे अध्यारुत आहे. तो काय आहे हे विचारतो आहे मी.
नेहा- ……..
निरंजन- तू मला निशिकांत बद्दल सांगत होतीस ना? मी ऐकायला आतुर आहे. शूट.
नेहा- पण का? का विचारताय तुम्ही मला माझ्या नवऱ्याबद्दल? दुसरा विषय नाही का बोलू शकत आपण?
निरंजन- मी कधीच विचारलं नसत तुला नेहा. पण प्रोब्लेम हा आहे की तुझ्या प्रत्येक दुसर्या विषयात देखील तो मला कुठेतरी दिसतो. तो तुला थांबवत असतो किंवा मागे खेचत असतो किंवा त्रास नक्की देत असतो. माझा अंदाज चुकत असेल तर सांग…
नेहा-……
निरंजन- आता का? बरोबर आहे ना माझा अंदाज? हे बघ नेहा, अप्रिय किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी किंवा लोक ह्यांच्याबद्दल येणारा राग, तिटकारा, नैराश्य हे मनात ठेवलं ना की अजून त्रास होतो. ते बोलून मोकळ व्हावं. आपलाच त्रास कमी होतो. म्हणून मी तुला बोलायला सांगतोय. कोण आहे निशिकांत? तुमची ओळख कशी झाली? लव्ह म्यारेज की अरेंज्ड म्यारेज?
नेहाने बियरचा एक घोट घेतला आणि ती बोलू लागली. बोलत बोलत बोलतच राहिली. निरंजन ऐकत होता. बोलून होईपर्यंत नेहा हमसून हमसून रडू लागली. तिने अगदी यायच्या आधी झालेल्या भांडणापर्यंत सर्व गोष्टी निरंजनला कोणताही आडपडदा न ठेवता सांगितल्या होत्या. तिला रडताना बघून निरंजन म्हणाला-
निरंजन- नेहा…प्लीज…कंट्रोल युअरसेल्फ…
नेहा अजूनही रडत होती. मनातल्या भावना, राग, भीती, फ्रस्ट्रेशन आज बाहेर निघत होत. निरंजन उठून तिच्या शेजारी बसला. तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. नेहा रडत त्याच्या दंडाला धरून त्याच्या कुशीत शिरली. जोरजोरात रडत म्हणाली-
नेहा- मला नकोय ते आयुष्य…मला प्लीज त्यातून बाहेर काढ श्री….
निरंजन ते ऐकून नकळत म्हणून गेला-
निरंजन- तू काळजी नको करू यमे…मी तुला काढेन बाहेर…
मग अचानक आपण काय बोलून गेलो हे दोघांच्याही लक्षात आल. नेहा सावरून बाजूला झाली. निरंजन म्हणाला-
निरंजन- नेहा तू काय म्हणालीस मला? श्री? आणि मी काय म्हणालो तुला यमे? Right?
नेहाच्या लक्षात आल की बियर संपली आहे. तिला आत्ता बीयरची नितांत गरज भासली. नेहाने फ्रीज उघडून अजून एक कॅन काढला.
निरंजन- नेहा मी काय विचारतोय? आपण एकमेकांना श्री आणि यमी का म्हणतो अचानक? को आहेत हे लोक?
नेहाला आता ती सर्व स्वप्न परत आठवू लागली. ते गाव, शास्त्री, तो डोंगर, मंदिर, यमुना आणि शिरप्या….नेहाने एक मोठा घोट घेतला आणि तिला जोरात ठसका लागला. निरंजन ने उठून तिला पाणी पाजल. नेहा शांत बसली. निरंजन म्हणाला-
निरंजन- नेहा आपण ह्या विषयावर अनेकदा बोलायचा प्रयत्न केला. इच्छा पण होती पण राहून गेल. आज बोलूया का?
नेहा- …….
निरंजन- नेहा मला शिरप्या आणि यमुनाची स्वप्न दिसतात. तो गाव, डोंगर, मंदिर आणि शिरप्या यमुनाची कहाणी डोळ्यासमोर दिसते. माझी खात्री आहे की गेल्या जन्मी मी ते आयुष्य जगलो आहे….आणि तू पण….
नेहा शून्यात नजर लावून विचार करत होती. निरंजन पुढे झाला. तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला-
निरंजन- तूच यमुना आहेस ना ह्या शिरप्याची? खर सांग?
हे ऐकून नेहा त्याच्याकडे वळली. तिने आवेगाने त्याला जवळ घेतला आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागली. निरंजनला पण डोळ्यासमोर परकर पोलक्यातली त्याची यमुना दिसू लागली आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतली. दोघे हरवून गेले. नेहा आता बेडवर आडवी झाली आणि निरंजन तिच्या अंगावर झोपून तिच्यावर चुंबनांची बरसात करू लागला. दोघे आता एकमेकात हरवणार इतक्यात निरंजनचा फोन वाजला आणि दोघे भानावार आले. निरंजन बाजूला झाला. नेहा आपले कपडे सारखे करत उभी राहिली. टेबलवर असलेला फोन वाजत होता. निरंजनने फोन घेतला.
निरंजन- हेलो….ओके…ठीक आहे….बाय….
निरंजन ने फोन कट केला. कॅन मध्ये उरलेली बियर एका घोटात संपवली आणि तो सोफ्यावर शांत बसला. त्याच्यात अचानक झालेला बदल नेहाच्या लक्षात आला.
नेहा- काय झालं? काही टेन्शन?
निरंजन- नाही. काही नाही.
नेहा- काय प्रोब्लेम आहे?
निरंजन- काही नाही.
नेहा- मी प्रोब्लेम आहे की नाही विचारत नाहीये. तो आहे हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय. तो काय आहे हे मला सांगा. प्लीज….
निरंजन- नैना….
नेहा- नैना? कोण नैना?
निरंजन- नैना चक्रदेव….
नेहा- कोण नैना चक्रदेव?
निरंजन- माझी बायको. ती आत्ताच सिंगापूरला land झाली आहे आणि आपल्या हॉटेलवर येते आहे.
हे ऐकून नेहाला प्रचंड धक्का बसला. नैनाच्या तिच्या आयुष्यातील अनपेक्षित एन्ट्रीनी नेहाच आयुष्य आता किती बदलत हे येणारा काळच ठरवणार होता.
क्रमश:
भाग २०
नेहा- मी प्रोब्लेम आहे की नाही विचारत नाहीये. तो आहे हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय. तो काय आहे हे मला सांगा. प्लीज….
निरंजन- नैना….
नेहा- नैना? कोण नैना?
निरंजन- नैना चक्रदेव….
नेहा- कोण नैना चक्रदेव?
निरंजन- माझी बायको. ती आत्ताच सिंगापूरला land झाली आहे आणि आपल्या हॉटेलवर येते आहे.
हे ऐकून नेहाला प्रचंड धक्का बसला. नैनाच्या तिच्या आयुष्यातील अनपेक्षित एन्ट्रीनी नेहाच आयुष्य आता किती बदलत हे येणारा काळच ठरवणार होता. नैना अमेरिकेत जन्मलेली, अमेरिकेत वाढलेली आधुनिक मुलगी होती. कॉमन फ्रेंड्स मार्फत निरंजनशी ओळख झाल्यावर ती त्याच्या प्रेमात पडली. मग मैत्री, सहवास सगळ घडत गेलं आणि त्यांनी नात्याला लग्न हे लेबल देखील लावलं. नैना दिसायला सुंदरच्या व्याख्येत बसणारी नसली तरी प्रचंड आकर्षक होती. मुळात आपण आकर्षक कसे दिसतो ह्याची प्रचंड जाण होती. आणि का नसणार? तिचा स्वतःचा ब्युटी प्रोडक्ट्स चा ब्रांड होता नैनाज म्हणून.
नैना तिच्या कामात आणि व्यवसायात व्यस्त असे आणि निरंजन ग्लोब हॉपिंग करत असे. एका छताखाली राहात असून दोघांच्या भेटी मात्र दुरापास्त होत्या. पण जेव्हा जेव्हा निरंजन तावडीत सापडेल तेव्हा मात्र नैना त्याचा पुरेपूर उपभोग घेत असे. नैना सेक्स मध्ये प्रचंड aggressive होती आणि तिच्या तसं असण्याचा तिला अभिमान होता. ती म्हणायची देखील “You need to be a real MAN to make me happy and Niranjan you are a Superman!” ह्या वाक्यावर प्रचंड हसत ती निरंजनला आपल्या मिठीत कुस्करून टाकत असे. पण तिला कुठेतरी जाणवायच की निरंजन चांगला नवरा असला तरी आपला सखा नाही झालेला अजून. काहीतरी आहे जे त्याच्या आणि माझ्या मध्ये आहे. आम्हाला एकत्र आल्यावरही एकरूप होऊ न देणार अस काहीतरी. तिने निरंजनला विचारायचा प्रयत्न देखील केला. पण निरंजनला स्वतःला उत्तर माहित नसल्याने त्याने “छे अस काही नाहीये.” अस म्हणून वेळ मारून नेली होती.
नैना हॉटेलच्या रिसेप्शनवर आली. निरंजनच नाव सांगून, formality पूर्ण करून ती लिफ्ट मध्ये शिरली. लिफ्ट मधून बाहेर पडल्यावर passage मधून चालत ती निरंजनच्या रूमच्या बाहेर आली. बेल वाजवावी की access चावीने दार उघडावे ह्या संभ्रमात दोन क्षण गेल्यावर तिने पर्स मधून access चावी बाहेर काढली. इथे नेहा कोणत्याही क्षणी येईल ह्या जाणीवेने निरंजन नेहाच्या कपाळाचं चुंबन घेऊन निघाला. त्याने शेजारीच असलेल्या नेहाच्या रूमच्या दाराच handle फिरवल. त्याच वेळी नैना ने access कार्ड त्यांच्या रूमच्या रीडर समोर धरलं. लगेच दार किलकिल झाल. नैना आत जाणार इतक्यात निरंजन नेहाच्या रूम मधून बाहेर पडला. नैनाच्या तो दृष्टीस पडणार इतक्यात हॉटेलचा बॉय येऊन नैनाला म्हणाला mam तुमचा मोबाईल लिफ्ट मध्ये पडला का? नैना मोबाईल शोधू लागली. Boy म्हणाला प्लीज counter ला येऊन ओळख पटवून घेऊन जा. नैना रूम बंद करून घाईत निघाली. तिला बघून जागीच फ्रीज झालेल्या निरंजन ने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि तो पटकन त्याच्या रूम मध्ये शिरला. आज नशिबाने तो वाचला होता. जर इतक्या रात्री तो रूम मध्ये सापडला नसता किंवा त्याहून भयानक म्हणजे नेहाच्या रूम मधून बाहेर येताना नैनाला सापडला असता तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. निरंजन शांतपणे बेडवर आडवा झाला.
पाच मिनिटात नैना रूम मध्ये आली. निरंजनला झोपलेला बघून त्याच्या जवळ गेली. त्याच्या कपाळाच चुंबन घेऊन कपडे काढून बाथरूम मध्ये गेली. परत आल्यावर निरंजनला हळुवार पणे जागा करून तिने पुढले दोन तास त्याला जागा ठेवला. मग ती शांत झोपून गेली आणि निरंजन मात्र नंतर झोपू शकला नाही. त्याच्या मनात असंख्य विचारांचं वादळ होत.
दुसर्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना रेस्तोरंत मध्ये निरंजन ने नेहा आणि नैनाची ओळख करून दिली. नैना मनापासून, भरभरून बोलत होती. निरंजन आणि नेहा मात्र जरा गप्प होते, मोजून मापून बोलत होते. मनात गिल्ट आणि भीती होती. नेहाच खाऊन झालं. ती म्हणाली-
नेहा- I am done…
नैना- oh great. You carry on. मला माझ्या नवर्या बरोबर जरा वेळ घालवू दे ना. माझ्या हातांनी त्याला भरवू दे.
अस म्हणत नैनाने ज्युसचा ग्लास निरंजनच्या तोंडाला लावला. नेहा कसनुस हसून तिथून निघून गेली. आपल्या रूम मध्ये आल्यावर नेहा हमसून हमसून रडू लागली. सगळ संपल्याची भावना तिला प्रचंड निराश करत होती. तिचा निशिकांत निदान माणूस म्हणून नालायक तरी होता. पण नैना तर बिचारी किती मोकळ्या स्वभावाची छान मुलगी होती. आणि निरंजन गेल्या जन्मी शिरप्या असला तरी आता तो निरंजन आहे, नैनाचा नवरा आहे. मी त्याच्याकडून कसलीही अपेक्षा करण चूक आहे. माझ्या नशिबात जे आहे ते मी भोगेन. पण…पण ह्यापुढे निरंजनला माझ्यापासून नक्की लांब ठेवेन. हा विचार करून नेहा निग्रहाने उठली. तिने bag आवरायला सुरुवात केली. आज संध्याकाळच्या flight ने तिला भारतात परत यायचं होत. एअर पोर्टवर बाहेर पडल्यावर कुठे जायचं हे तिला माहित नव्हत. पण परत जाण भाग होत…नैना आल्यावर तर ते आवश्यक झालं होत. नेहाने डोळे पुसले आणि ती कामाला लागली.
निरंजन आणि नैना रूमवर आले. नैना त्याला म्हणाली-
नैना- नेहा मस्त मुलगी आहे नाही?
निरंजन- हम्म..
नैना- and she is hot…
निरंजन- हम्म…
नैना- तू तिला मुंबई वरून मुद्दाम इथे फ्लाय केलीस?
निरंजन- हो. मला ऑस्ट्रेलियात वेळ नव्हता प्रेझेन्टेशन वर काम करायला. सो ते नेहाने बनवलं. सो मी तिला बोलावून घेतलं रेफरन्स साठी.
नैना- कूल. सो नेहा ब्युटी विथ ब्रेन आहे तर. ग्रेट. एक सांगू?
निरंजन- काय?
नैना- तिला तुझ्याबद्दल थोडं आकर्षण आहे.
हे ऐकून निरंजनच्या हातात असलेला शेव्हर खाली पडला. तो घाईत उचलून निरंजन म्हणाला-
निरंजन- what? Are you mad?
नैना- (हसून) तुला काय झालं अचानक? तिला तुझ्याबद्दल आकर्षण आहे अस म्हणाले मी. तुला तिच्याबद्दल आहे अस नाही.
निरंजन- नैना…will you प्लीज stop this? हे काय बोलते आहेस तू?
नैना- जे दिसलं ते बोलते आहे. निरंजन आम्हा बायकांचा सिक्स्थ सेन्स फक्त पुरुषांपुरता मर्यादित नसतो. आम्हाला इतर बायकांच्या मनातलं देखील कळत. आणि आपल्या आवडत्या पुरुषाच्या बाबतीत ते असेल तर नक्कीच कळत.
निरंजन- नैना come on…नेहा माझी कलीग आहे आणि तू हे काय बोलते आहेस?
नैना- अरे यार. मी जे दिसलं ते बोलते आहे आणि I don’t mind it. In fact, I feel proud की माझा नवरा इतका attractive आहे की इतर बायका त्याला बघून घायाळ होतात.
निरंजन- anyway…ती आज जाणार आहे परत आणि उद्या सकाळी मी पण जातोय. तू किती दिवस आहेस इथे?
नैना- मी पण उद्या जाते आहे.
निरंजन- what? म्हणजे फक्त एक रात्र माझ्याबरोबर घालवायला तू अमेरिकेहून all the way इथे आलीस? आणि उद्या अमेरिकेला परत?
नैना- नाही. मी इंडिया मध्ये एका एक्झिबिशन मध्ये भाग घेणार आहे. काही लोकांशी फ़्रेन्चाईज बद्दल मिटींग्स आहेत. सो मी उद्या तुझ्या बरोबर इंडियाला येते आहे. चांगले पंधरा दिवस तुझ्या कुशीत राहणार आहे. अस म्हणून नैनाने निरंजनला बेडवर ढकलला. इथे नेहाला तिच्या रूमच्या काचेबाहेर तिच्यापासून लांब उडून जाणारा शिरप्या जागेपणी दिसत होता.
क्रमश:
भाग २१
नैना- नाही. मी इंडिया मध्ये एका एक्झिबिशन मध्ये भाग घेणार आहे. काही लोकांशी फ़्रेन्चाईज बद्दल मिटींग्स आहेत. सो मी उद्या तुझ्या बरोबर इंडियाला येते आहे. चांगले पंधरा दिवस तुझ्या कुशीत राहणार आहे.
अस म्हणून नैनाने निरंजनला बेडवर ढकलला. इथे नेहाला तिच्या रूमच्या काचेबाहेर तिच्यापासून लांब उडून जाणारा शिरप्या जागेपणी दिसत होता. नेहाने अनुला फोन लावला. अनु भाड्याच्या घरात एकटी रहात होती. नेहाने निशिकांत बरोबर झालेलं भांडण वगैरेची कल्पना देऊन आपली सोय होईपर्यंत अनुच्या घरी राहता येईल का हे विचारलं. अनु आनंदाने तयार झाली. नेहाची मुंबईला परतल्यावर कुठे राहायचं ह्याची काळजी काही दिवस तरी मिटली होती. एअर पोर्टला जायच्या आधी वेळ होता म्हणून नेहा मुंबई मध्ये रेंटल घर वेगवेगळ्या साईट वर शोधू लागली.
दुपारी लंच नंतर नैना स्पा मध्ये गेली. निरंजन झोपायच्या बहाण्याने खोलीतच राहिला. नैना गेल्याची खात्री पटल्यावर निरंजन रूम मधून बाहेर आला आणि त्याने नेहाच्या रूमची बेल वाजवली. नेहाने दार उघडताच तो घाई घाईने आत आला आणि त्याने दार लावून घेतलं. नेहा काही न बोलता रूम मध्ये येऊन सोफ्यावर बसली. निरंजन तिच्या समोर येऊन उभा राहिला. नेहा काहीच बोलत नव्हती.
निरंजन- काय झालं नेहा?
नेहा- काही नाही. तुम्ही जा प्लीज…
निरंजन- पण नेहा माझं ऐकून तर घे…
नेहा- प्लीज निरंजन…नैना mam ला तुम्ही इथे आलेलं आवडणार नाही. कोणत्याही बायकोला ते आवडणार नाही.
निरंजन- आणि निशिकांतच्या बायकोला? तिला हे आवडत आहे की नाही?
नेहा- ……..
निरंजन तिच्या शेजारी बसला. त्याने तिचा हात हातात घेतला.
नेहा- प्लीज निरंजन नको…आधीच माझ्या लाईफ मध्ये खूप प्रोब्लेम्स आहेत. त्यात हे नको.
निरंजन- पण नेहा तू यमी आणि मी शिरप्या आहोत..आपण एकत्र येण्यासाठीच जन्माला आलो आहोत.
नेहा- यमी आणि शिरप्या कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. यायचं असत तर ते गेल्या जन्मीच एकत्र आले असते. विरह हीच आपली destiny आहे…प्रत्येक जन्मात…म्हणून मला पुढला जन्म पण नकोय…
निरंजन- नाही नेहा. आपण ह्या जन्मी एकत्र यायलाच भेटलोय. नाहीतर इतक्या मोठ्या जगात, अब्जो लोकांच्या मध्ये, वेगवेगळ्या देशात असलेले आपण भेटलोच नसतो.
नेहा- आपण हेच सिद्ध करायला भेटलो की आपण एकत्र येऊ शकत नाही. नियतीने हेच दाखवून द्यायला आपली भेट घडवली आहे.
निरंजन ने पुढे होऊन नेहाला मिठीत घेतली. नेहा त्याला झिडकारून उठून बाजूला झाली.
नेहा- निरंजन प्लीज…नको अडकुया आपण ह्यात…तुम्हाला नैना madam सारखी सुंदर बायको आहे, संसार आहे. इथेच थांबूया आपण नाहीतर जे आहे ते पण गमावून बसाल तुम्ही. माझ्याकडे निदान गमावण्यासारख तरी काही नाहीये. प्लीज ऐका माझं आणि तुम्ही जा इथून. Mam कुठे आहेत?
निरंजन- ती स्पा मध्ये गेली आहे म्हणून मी आलो तुझ्याशी बोलायला. माझं ऐक प्लीज. आपण काहीतरी मार्ग काढू ह्यातून पण तू अशी लांब नको जाऊ नेहा. मी तुला जाऊ देणार नाही.
अस म्हणून निरंजन आवेगाने उठला आणि नेहाला आपल्या मिठीत घेऊन तिच्याशी बोलू लागला.
निरंजन- यमे….तुला कोण दिसतोय समोर? विसरलीस का तू मला?
नेहा- पण…
निरंजन ने तिच्या ओठातून बाहेर पडणारे पुढले शब्द गिळून टाकले. त्याच्या मिठीत नेहा वितळू लागली. शरीराने सिंगापूर मध्ये असलेले यमी आणि शिरप्या मानाने कित्येक वर्ष मागे कोंडीबाच्या डोंगराच्या झुडुपाच्या आडोश्याला गेले होते. भूत आणि वर्तमानाच्या त्या अद्भुत फेर्यात त्यांना सद्य काळाचं देखील भान राहिलं नाही. इतक्यात निरंजनचा फोन वाजला. त्याच्या रिंग ने दोघे भानावर आले. फोन नैनाचा होता. निरंजनच्या पोटात गोळा आला. नेहा प्रचंड घाबरून कपडे सारखे करत अंग चोरून उभी राहिली. निरंजन ने घाबरत फोन रिसीव्ह केला.
निरंजन- हाय…बोल नैना…
नैना- तू कुठे आहेस निरंजन?
निरंजन- म..मी…क..का ग? काय झालं? Any problem?
नैना- छे प्रोब्लेम काय? मी ना इथल्या india शॉप मध्ये तुझ्यासाठी एक मस्त कुर्ता बघितला आहे. तो तू ट्राय कारावास अस मला वाटल म्हणून…
निरंजन- ओह…ओके…मी आलोच खाली…तू दुकानातच आहेस ना?
नैना- अरे नाही. मी आपल्या रूम मध्ये परत आले. माझी पर्स राहिली होती ना. मग पेमेंट कस करणार? पण तू कुठे आहेस?
हे ऐकून निरंजन प्रचंड घाबरला. त्याला काय बोलाव सुचत नव्हत.
निरंजन- मी…मी स्विमिंग करायला आलो होतो. पण नाही करत आता. तू शॉप मध्ये जा. मी तिथेच येतो.
नैना- ओके..लवकर ये. ए ती तुझी कलीग नेहा आपल्या शेजारच्या रूम मध्ये आहे ना? मी तिला पण बरोबर घेते. आमच्यासाठी पण मस्त options आहेत Indian attire मध्ये. तू ये लवकर. बाय…
नैनाने इतक बोलून फोन कट केला. ती कोणत्याही क्षणी इथे येईल हे लक्षात येऊन निरंजन हादरला होता.
निरंजन- नेहा…मी..मी बाथरूम मध्ये जातो. नैना इथे येते आहे. तू तिच्या बरोबर जा. मी जॉईन होतो मग.
तो काय बोलला हे लक्षात यायच्या आत नेहाच्या रूमची बेल वाजली आणि निरंजन बाथरूम मध्ये पळाला. नेहाने कपडे व्यवस्थित करून एकदा आरशात बघितलं. तोवर बेल परत वाजली. नेहाने दार उघडलं. दारात नैना होती.
नैना- हाय नेहा.
नेहा- हाय mam…
नैना- ए इथे ना india शॉप आहे. तिथे काही मस्त options आहेत. मी निरंजन साठी पण कुर्ते सिलेक्ट केले आहेत. तू चल ना. तुलाही आवडेल कलेक्शन.
नेहा- ओके mam…आलेच मी.
नेहा पर्स घ्यायला आत वळली. नैना तिच्या मागे रूम मध्ये आली. नैनाला तिथे ओळखीच्या परफ्युमचा वास आला.
नैना- ए नेहा तू पुरूषांच कलोन वापरतेस?
हे ऐकून नेहा चपापली.
नेहा- न..नाही…मी माझ्या नवऱ्यासाठी घेतल होत ना ते जरा उडवून बघितलं.
नैना- हे awesome आहे. निरंजन च फेव्हरेट.
नेहा- ओह ओके…चला…
नैना- if you don’t mind..मी तुझ बाथरूम use करू का? परत माझी रूम उघडायला नको.
इतकं बोलून नैना बाथरूम कडे निघाली. तिला जाताना बघून नेहाच्या हृदयाचे ठोके वाढले.
नेहा- mam…
नैना वळली आणि म्हणाली-
नैना- yes नेहा…
नेहा- mam बाथरूम ला पाणी नाहीये…
नैना- what? Are you kidding me? हे सेव्हन स्टार हॉटेल आहे. इथे पाणी बंद झालं तर हॉटेल बंद होईल.
नेहा- नाही mam…खरच…सकाळी पाणी येत नव्हत.
नैना- in that case आपल्या दोन्ही रूमचा स्टे मी फ्री करून घेईन. मजा बघ. पण let me confirm this and take a video.
हे बोलून नैना बाथरूमकडे निघाली. नेहाला त्या एसीत देखील घाम फुटला. नैनाने निरंजनला बाथरूम मध्ये पाहिल्यावर काय होईल ह्या विचाराने नेहाला वेड लागायचं बाकी होत. नेहा मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. तिने डोळे बंद करून घेतले. नैनाने बाथरूमच्या दारच handle फिरवल आणि इतक्यात तिचा बेडवर ठेवलेला फोन वाजला. नैना थांबली. वळली. परत येऊन तिने फोन उचलला. फोन निरंजनचा होता. नैनाने फोन घेतला.
नैना- बोल रे…
निरंजन- कुठे आहेस तू? मी पोहोचलो पण india शॉप मध्ये.
नैना- अरे मी नेहाच्या रूम मध्ये आहे. तिला बरोबर घेऊन येते आहे.
निरंजन- नेहा फार चेंगट आहे. तिला सोड. तू ये आधी. इथे काय मस्त options आहेत. तू लगेच ये यार. त्या नेहाला गोळी मार…प्लीज बेबी…
निरंजन इतक्या प्रेमाने बोलावत आहे हे ऐकल्यावर नैना खुश झाली. फोन कट करून म्हणाली-
नैना- नेहा, निरंजन शॉप मध्ये पोहोचला आहे. मी लगेच जाते. तू ये तुझं आटोपलं की ओके?
हे बोलून नैना निघून गेली. ती गेल्यावर नेहा पायातली शक्ती गेल्यासारखी मटकन बेडवर बसली. तिने दोन्ही हातांनी डोकं दाबून धरल. इतक्यात तिच्या खांद्यावर निरंजनच्या हाताची पकड तिला जाणवली. नेहा उठून उभी राहिली. निरंजनला समोर बघून नेहाने त्याला मिठी मारली. त्याच्या मिठीत सगळा ताण गळून पडू लागला. नेहाला रडू फुटलं.
नेहा- श्री…मला हे टेन्शन सहन होत नाहीये….मी मरून जाईन. हे का होतंय?
तिच्या पाठीवर हात फिरवत निरंजन म्हणाला-
निरंजन- काळजी करू नको यमे…मी आहे ना? सगळ नीट होईल. आलोच मी.
निरंजन घाईत निघून गेला. नेहा शून्यात बघत सोफ्यावर बसली. इथे लिफ्ट मध्ये असलेल्या नैनाच्या मनात आश्चर्य होत की तिने निरंजनसाठी घेतलेलं, फक्त अमेरिकेच्या काही मोठ्या दुकानातच उपलब्ध असलेल लिमिटेड एडिशन कलोन सिंगापूर मध्ये कस काय उपलब्ध झालं? लिफ्टचा दरवाजा उघडत असताना नैनाने हे ते परफ्युम कोणत्या दुकानातून घेतलं हे नेहाला विचारायचा निर्णय घेतला होता.
क्रमश:
भाग २२
नैना इंडिया शॉप मध्ये पोहोचून निरंजनाला शोधू लागली. तिला निरांज दिसत नव्हता. निरंजन लिफ्ट मध्ये होता. नैनाने त्याला लावलेला फोन रिचेबल नव्हता. नैनाला थोड आश्चर्य वाटल. नैना बाहेर येऊन दुकानाच्या दारात उभी राहिली. लिफ्ट मधून बाहेर पडलेल्या निरंजनला दारात उभी असलेली नैना दिसली. त्याला आत्ता दुकानात शिरताना तिने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल हे त्याला पक्क ठावूक होत. निरंजन एका खांबाच्या आडोशाला उभा राहून विचार करू लागला. इतक्यात त्याला कल्पना सुचली. त्याने नैनाला फोन लावला.
नैना- हेलो…
निरंजन- आलीस का तू?
नैना- हो. पण तू कुठे आहेस?
निरंजन- अग काही नाही. जरा फॉरेक्स counter ला आलो होतो. आलोच मी.
अस बोलून त्याने फोन ठेवला आणि तो इंडिया शॉप कडे निघाला. दारात उभी असलेल्या नैनाला भेटून त्याने मिठी मारून तिचं स्वागत केलं. वाट बघायला लागल्याबद्दल तिला सॉरी म्हणाला. नैनाला हे नवीन होत. त्याने मिठी मारल्यावर त्याच्या कलोनचा वास नैनाला नेहाची आठवण देऊन गेला.
निरंजन- चल. शॉपिंग करुया.
नैना- नेहा अजून कशी नाही आली?
निरंजन- ती कशाला हवी तुला? आपण दोघे करुया ना मस्त शॉपिंग.
नैना- अरे तस नाही. मी तिला बोलावली आहे. थांब मी फोन करते.
अस म्हणून नैना फोन लावणार इतक्यात नेहा तिथे आली.
नेहा- हेलो mam…
नैना- शंभर वर्ष जगणार तू. मी तुलाच फोन लावत होते. अग किती वेळ? चला आता.
तिघे आत गेले. तिघे भारतीय कुर्ते असलेल्या सेक्शन मध्ये गेले. नैनाने पटापट तिने select केलेले काही कुर्ते निरंजन समोर ठेवले. निरंजन एक एक करून ते घालून येऊन नैनाला दाखवत होता. नैनाला सगळेच आवडत होते. निरंजन प्रत्येक वेळी हळूच नेहाकडे पण बघत होता. नेहाला कोणताच कुर्ता फार आवडलेला नाहीये हे त्याच्या लक्षात आल. मग आता सहा पैकी कोणते दोन घ्यायचे ह्यावर निर्णय होत नव्हता.
नैना- ए नेहा तूच सांग ह्यातला कोणता घेऊ? मला तर सगळेच आवडले आहेत. पण निरंजन दोनच घ्यायचे म्हणतोय. मी कन्फ्युज्ड आहे.
नेहा- mam त्या मागच्या बाजूला काही hand printed कुर्ते आहेत. खूप क्लासिक प्रिंट्स आहेत. त्यातले पण काही ट्राय करू द्या ह्यांना. कदाचित तुम्हाला ते पण आवडतील.
नैना- oh is it?
अस म्हणून नैना मागच्या सेक्शन मध्ये गेली.
निरंजन- कोणता आवडला तुला?
नेहा- honestly कोणताच नाही. पण हे माझं मत आहे. तुम्ही mam आणि तुम्हाला जे आवडतील तेच घ्या.
इतक्यात नैना हातात चार कुर्ते घेऊन आली आणि निरंजन ला परत ट्रायल करायला पाठवला. निरंजन एक एक करत कुर्ते घालून येत होता आणि नैनाला प्रत्येक कुर्ता परत एकदा आवडत होता. नैनाने मान्य केल की ते hand printed कुर्ते जास्त चांगले आहेत. आता दहा पैकी दोन निवडायचे होते.
नैना- ए नेहा आता मात्र तूच सांग काय करायचं ते. तूच हे कन्फ्युजन जास्त वाढवलं आहेस.
नेहा- नाही mam…तुम्ही दोघे तुम्हाला आवडेल ते घ्या. मी फक्त हा pattern साजेस्त केला.
नैना- केलास ना. मग आता फायनल चोईस पण सांग नाहीतर आम्ही दोघे संध्याकाळ पर्यंत इथेच राहू आणि डिसिजन होणार नाही.
नेहा नाईलाजाने पुढे झाली. तिने निळे प्रिंट्स असलेला केशरी आणि पिवळ्या रंगाचा प्लेन असे दोन कुर्ते निवडले. निरंजन ने आणखी एक प्लेन आणि प्रिंटेड कुर्ते निवडले. तो चार कुर्ते घेत असलेला बघून नैनाला आश्चर्य वाटल.
नैना- काय रे आज झालय काय? एकदम चार कुर्ते?
निरंजन- चांगला चोइस मिळतो आहे तर का सोडायचं? (नेहा कडे बघत) मला खरच खूप आवडले हे कुर्ते. ए आता तुम्ही पण काहीतरी घ्या ना स्वतःसाठी.
नैना- म्हणजे काय? घेणारच. पण इथे नाही. आम्ही काहीतरी वेस्टर्न घेऊ. काय नेहा?
नेहा- mam तुम्ही घ्या. मी माझ्या रूमवर जाते. रात्रीची फ्लाईट आहे. Packing करते.
नैना- नाही. अर्ध्या तासात करूया शॉपिंग. तू इतका चांगला कुर्ता निरंजन साठी साजेस्त केलास मग तुझ्यासाठी काहीतरी मस्त घेऊ दे मला. आपण एक काम करू. तू ते कलोन घेतलस ना त्या दुकानात जाऊ.
हे ऐकून नेहा चरकली. तिने घाबरून निरंजन कडे पाहिलं.
निरंजन- कोणत कलोन?
नैना- अरे तू मारतोस ना सेम तेच लिमिटेड एडिशन कलोन हिने घेतलं आहे तिच्या नवऱ्यासाठी. मगाशी तिच्या रूम मध्ये वास आला मला त्याचा.
हे ऐकून निरंजन पण घाबरला. नेहा त्याच्याकडे हेल्पलेस बघत होती.
निरंजन- oh that…ते आम्ही मीटिंग नंतर एका mall मध्ये गेलो होतो तिथे लकीली मिळालं. एकच बाटली होती. मला दिसली आणि मीच नेहाला सांगितल की हे मस्त आहे. तुझ्या नवऱ्यासाठी घे.
नैना- ओह अच्छा. मला तेच वाटल की इथे सिंगापूर मध्ये ते विकायला कस काय असेल?
निरंजन- त्या शॉप ओनर ने युएस वरून एक बाटली आणली होती सहज आणि नेहा लकी आहे की तिला ती मिळाली.
नैना- ओके. हरकत नाही. आपण वेस्टर्न वेअर च्या दुकानात जाऊया.
हे बोलून नैना निघाली देखील. नेहाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिचं वाढलेलं बीपी आता जरा नॉर्मल झालं. निरंजन नेहाला एक लूक देऊन नैनाच्या मागे गेला. नेहा स्वतःला ओढत त्यांच्या मागे दुकानातून बाहेर पडली.
वेस्टर्न वेअरच्या दुकानात नैनाने स्वतःसाठी दोन top सिलेच्त केले. नेहासाठी एक सिलेच्त केला. नेहा तो ट्राय करून आली.
नैना- आवडला ना?
नेहा- हो mam. पण जरा महाग आहे. सो…नको प्लीज…
नैना- तुला प्राईज tag कोणी बघायला सांगितला? हे माझ्यातर्फे गिफ्ट आहे तुला.
नेहाला प्रचंड awkward वाटत होत.
नेहा- नको mam. खरच नको…
नैना- ते मी ठरवते ओके? आवडला ना तुला?
नेहाने हळूच निरंजन कडे पाहिलं. त्याने नाही अशी मान डोलवली. आता काय करायचं नेहाला सुचत नव्हत.
नैना- काय ग आवडला ना?
नेहा- अ..हो..mam…मस्त आहे.
निरंजन- हा मस्त आहेच. पण हा पण try कर तू नेहा.
अस म्हणून त्याने एक बेज कलरचा हलकी flower प्रिंट असलेला top तिच्या समोर धरला. नेहा ने awkward वाटल्याने नैनाकडे बघितलं.
नैना- अग बघ try करून. कधी नव्हे तो निरंजन काहीतरी सजेस्ट करतोय. आणि त्याच्या चोइस चांगला आहे हे तुला माझ्याकडे बघून लक्षात आलच असेल.
नैना जोरात हसली. निरंजन आणि नेहाने पण स्मित केल. नेहा तो टोप ट्राय करून आली. तिला तो top प्रचंड आवडला होता. तिच्या डोळ्यात बघितल्यावर निरंजनाला ते लक्षात आल. त्याने हळूच तिला डोळा मारला. नेहा चक्क लाजली.
रूमवर आल्यावर नेहाने packing केल. नेहा एअर पोर्टला पोहोचली. इमिग्रेशन stamp झाल्यावर ती विमानाची वाट बघत शांत बसली. तिच्या मनात ही संपूर्ण तरीप, निरंजन बरोबर व्यतीत केलेले क्षण. नैनाच त्याच्या आयुष्यातील अस्तित्व हे सर्व विचार येत होते. इतक्या चांगल्या नैनाच्या नवर्याशी आपले संबंध असण चुकीच आहे हा प्रचंड गिल्ट तिला त्रास देऊ लागला. मग परत एकदा यमी, शिरप्या, कोंडीबाचा डोंगर नजरेसमोर दिसल्यावर तिला निरंजनच्या जागी शिरप्या दिसू लागला आणि मनात जमा झालेली गिल्ट शिरप्याच्या अस्तित्वाने निघून गेली.
इथे नैना निरंजनाच्या सहवासातील रात्र वाया जाऊ देणार नव्हती. समाधानाने तृप्त होऊन शेजारी झोपलेल्या निरंजनच्या दंडावर डोक ठेऊन ती पण तृप्त पडून होती. खोलीच्या काचेतून आत येत असलेल चांदण त्यांच्या अनावृत्त शरीरांना चमकवत होत. नैनाच मन आणि शरीर अजून भरलं नव्हत. तिने हळूच कुशीवर वळून निरंजन कडे बघितल. तो शांत झोपला होता. तिने हळूच आपला हात त्याच्या केसाळ छातीवर फिरवला. मग पुढे होऊन त्याच्या छातीवर हनुवटी ठेऊन ती त्याला न्याहाळू लागली. मग हळूच पुढे होत ती त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागली. त्या सुखाने जागा झालेल्या निरंजन ने तिला आपल्या मिठीत घेतली. नैना प्रचंड aggressive होत त्याच्याशी एकरूप होऊ लागली. त्या आनंदाच्या क्षणी आज पहिल्यांदाच निरंजनच्या तोंडून नैना ऐवजी “आय लव्ह यु यमी” असं बाहेर पडलं. हे ऐकून आवाक झालेली नैना अचानक स्तब्ध झाली. ती निरंजन कडे रोखून बघत होती. त्या अंधारातही तिची बोचरी नजर निरंजनला जाणवत होती. नैना बाजूला झाली. उठून खिडकीशी गेली. पर्स मधून सिगारेट काढून ती शिलगावून तशीच उभी राहून बाहेर बघू लागली. तिला लांब टेक ऑफ करणार विमान दिसलं. त्या विमानच्या खिडकीतून हळू हळू लहान होत जाणार सिंगापूर बघत असलेल्या नेहाला मात्र नैनाच्या डोळ्यातील संतापाचा थांगपत्ता नव्हता.
क्रमश:
भाग २३
नैना प्रचंड aggressive होत त्याच्याशी एकरूप होऊ लागली. त्या आनंदाच्या क्षणी आज पहिल्यांदाच निरंजनच्या तोंडून नैना ऐवजी “आय लव्ह यु यमी” असं बाहेर पडलं. हे ऐकून आवाक झालेली नैना अचानक स्तब्ध झाली. ती निरंजन कडे रोखून बघत होती. त्या अंधारातही तिची बोचरी नजर निरंजनला जाणवत होती. नैना बाजूला झाली. उठून खिडकीशी गेली. पर्स मधून सिगारेट काढून ती शिलगावून तशीच उभी राहून बाहेर बघू लागली. निरंजन उठून तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला.
निरंजन- नैना…
नैना त्याचा खांद्यावर ठेवलेला हात झिडकारून दूर जाऊन उभी राहिली. निरंजन तिच्या मागे गेला.
निरंजन- नैना काय झालं?
नैना- realization…
निरंजन- कसलं realization? Come on…
निरंजन तिचे दोन्ही खांदे हातानी दाबत तिच्या मानेचा कीस घेत म्हणाला.
नैना- यमी कोण आहे निरंजन?
निरंजन जरा चपापला.
निरंजन- कोण यमी?
नैना- मी तेच तुला विचारते आहे की कोण यमी.
निरंजन- मला खरच माहित नाही.
नैना- अच्छा. म्हणजे बायकोच्या मिठीत असताना तुला माहित देखील नसलेल्या बायका आठवतात तर. अश्या किती बायकांशी संबंध आहेत तुझे की कोणती कोण ते देखील आठवत नाही?
निरंजन- नैना तू वेडी आहेस का?
नैना- मी वेडी नाहीये हेच तुला सांगायचा प्रयत्न करते आहे मी. यमी कोण आहे निरंजन?
निरंजन मान खाली घालून उभा राहिला. नैना सिगारेट ash tray मध्ये दाबून सोफ्यावर बसली आणि म्हणाली-
नैना- निरंजन यमी कोण आहे हे कळल्याशिवाय आपण दोघंही सिंगापूर सोडत नाही आहोत. ओके?
इतकं बोलून नैनाने दुसरी सिगारेट शिलगावली. निरंजनच्या डोक्यात विचारांचं काहूर माजल होत. हिला काय सांगाव आणि काय सांगू नये? जे सांगेन त्यावर हिचा विश्वास बसेल का? ह्यातून पुढे काय निष्पन्न होईल? हे सांगून नेहाच्या आयुष्यात आपण प्रॉब्लेम निर्माण करू का? ह्या अश्या विचारांची लडी त्याच्या मेंदूत फुटत होती. नैना शांतपणे सिगारेट ओढत मोबाईल मधील मेसेज बघत होती. निरंजन तिच्या शेजारी येऊन बसला. तिचा फोन काढून त्याने बाजूला ठेवला. नैनाचा हात हातात घेऊन तो म्हणाला-
निरंजन- यमी शिरप्या ची प्रेयसी होती.
नैना- (प्रचंड आश्चर्याने) what? Come again…
निरंजन- I said यमी शिरप्या ची प्रेयसी होती.
नैना- कोण शिरप्या?
निरंजन- सांगतो….
ह्या नंतर निरंजन ने नैनाला शिरप्या आणि यमीची कहाणी ऐकवली. त्यांची स्वप्न त्याला कशी पडतात हे देखील सांगितलं. तोच गेल्या जन्मीचा शिरप्या आहे असं वाटत हे देखील सांगितल. ते ऐकून नैना आवाक झाली.
नैना- are you serious? हे असं असू शकत?
निरंजन- I really don’t know नैना. पण जे आहे ते मी तुला सांगितलं.
नैना- समजा हे खर असेल आणि तू गेल्या जन्मीचा शिरप्या असशील तर गेल्या जन्मीची यमी देखील आता वेगळ्या रुपात, वेगळ्या नावाने जन्माला आली असेल ना? तू तिला शोधलस का कधी?
हे ऐकून निरंजन थोडा गडबडला.
निरंजन- न…नाही…आणि हे स्वप्न आहे फक्त…ते खर नसेलही कदाचित…पण ते इतक खर वाटत कधीतरी की…
नैना- की बायकोच्या सहवासात यमी आठवते. ह्याच कारण काय आहे माहित्येय तुला?
निरंजन- काय?
नैना त्याच्या जवळ गेली. त्याच्या उघड्या अंगाला चिकटून म्हणाली-
नैना- त्याच कारण हे आहे की तू शिरप्याचा पुनर्जन्म असलास तर मी यमिचा पुनर्जन्म आहे. गेल्या काय, ह्या जन्माच देखील खूप प्रेम आपल्या हातून निसटून गेलय. चल ते वसूल करुया शिरप्या.
अस म्हणून नैनाने त्याच्या खालच्या ओठाचा चावा घेतला. मार्लबोरो सिगारेटचा ओळखीचा वास त्याच्या श्वासात मिसळला. दोघे आता परत एकरूप होऊ लागले. नैना मुद्दाम त्याचा उल्लेख शिरप्या असा करत होती. तिच्या ह्या रिएक्शनची कल्पनाही नसलेला निरंजन नैना मध्ये हरवलेला असताना यमीची आठवण काढत नेहाचा विचार करत होता. खिडकीतून लांबवर दिसणाऱ्या डोंगराच्या मागे आता लाल शेंदरी रंगाच्या छटा दिसू लागल्या होत्या. प्रत्यक्षात तृप्त होऊन शेजारी असलेली नैना, मनात रुजलेली नेहा आणि मेंदूला आव्हान देत असलेली यमी ह्यांच्या गराड्यात निरंजनला ग्लानी येऊ लागली. नैना आणि त्याला झोप लागली तोवर खिडकीतून उन्हाची तिरीप बेडवर आली होती.
नेहा अनुच्या घरात शांत बसली होती. फार नसला तरी थोडा जेट lag होता. विमानात झोप नीट झाली नव्हती. एकूण सिंगापूर ट्रीप मधील घटना आठवत ती बसली होती. इतक्यात अनु चहाचे मग्स घेऊन आली.
अनु- अनु के हाथ की गरमा गरम चाय लो…
अनु ने चहाचा मग नेहाच्या हातात दिला. नेहा अजूनही तिच्याच विचारात हरवली होती.
अनु- बेब्स काय झाल? Where are you lost? सिंगापूर मध्ये काही मस्ती नाही ना केली?
नेहाला गुदगुल्या करत अनु म्हणाली. त्यामुळे भानावर आलेली नेहा म्हणाली-
नेहा- ए गप ग. काहीही काय?
अनु- का? तुम्ही दोघे, नवा देश, ओळखणार कोणीच नाही…एकांत मग काय…
नेहा- तसं काही झालेलं नाहीये आणि for your information त्यांची बायको पण आली होती सिंगापूरला. सो चिल.
अनु- what? निरंजनची वाईफ? कशी आहे ती? As hot as you?
नेहा- shut up अनु. काहीही बोलतेस तू.
अनु- ओके ते सोड. पण तू अशी शांत का आहेस आल्यापासून?
नेहा- काय करू मग? घर नाहीये माझं. निशिकांत बरोबर नात संपलय आता. पुढे सगळा अंधार आहे.
अनु- अंधार का? सरळ डिव्होर्स फाईल कर. माझी मैत्रीण आहे family court मध्ये केसीस बघते. आजच जाऊया तिला भेटायला.
नेहाला काय रीएक्त करायचं कळत नव्हत.
अनु- sorry…हे तुझ personal matter आहे. तू ठरव काय करायचं ते.
इतकं बोलून अनु चहाचे मग्स घेऊन निघाली. इतक्यात मागून नेहा म्हणाली-
नेहा- अनु…जाऊया आपण. सगळंच complicate करण्यापेक्षा एक एक धागा सोडवला तर आयुष्याचा गुंता सुटेल. सुरुवात कुठेतरी करायला हवी. Lets go.
प्राजक्ता पाध्ये म्हणजे family court मध्ये प्रसिद्ध नाव. त्रासलेल्या, अन्याय झालेल्या, domestic violence ला बळी पडत असलेल्या स्त्रियांना लग्नाच्या जोखडातून भरपूर मोबदला, पोटगी घेऊन मुक्ती मिळवून देणार्या वकील म्हणून त्या प्रसिद्ध होती. काही बायकांच्या चिडलेल्या नवऱ्यांनी त्यांना धमक्या दिल्याने आणि दोन वर्षांपूर्वी कोर्टाच्या आवारात झालेल्या हल्याला विचारात घेऊन तिला कोर्टाने पोलीस संरक्षण दिले होते. ती तिच्या ऑफिसात बसून फोनवर बोलत होती-
प्राजक्ता- काय?…किती देणार मला? दहा लाख? अहो मग तेच तुमच्या बायकोला द्या ना डिव्होर्स नंतर…नाही…मला हे जमणार नाही….तुम्ही त्या बिचारीला कस वागवलं आहे ते विसरलात का?…नाही…सॉरी…सेटलमेंट आता कोर्टच करेल किंवा आज तुमचं फायनल हियारिंग सुरु व्हायच्या आधी मानसीला १ कोटींचा डीडी द्या. आम्ही पोटगीची डिमांड मागे घेतो…ठीक आहे…मला dd ची कॉपी मेसेज करा. डीडी मानसीच्या हातात मिळाला पाहिजे तुमच्या हियारिंग च्या आधी…नाहीतर…ओके ग्रेट…बाय…
प्राजक्ता ने फोन कट केला. स्वतःशी म्हणाली-
प्राजक्ता- साल्यांनो बायको म्हणजे माती वाटते का? त्या ठेवलेल्या बाईला प्रेम आणि पैसे देणार आणि घरातल्या बायकोला लाथा बुक्के? कारखानीस साहेब मानसीला एक कोटी कसे देत नाही तुम्ही ते मी बघतेच.
आता प्राजक्ता तिच्या समोर असलेले केस पेपर्स बघू लागली. इतक्यात तिला अनुचा फोन आला.
प्राजक्ता- बोल ग अनुडे…
अनु- ए प्राज तुझ ऑफिस a wing की b?
प्राजक्ता- माझं ऑफिस b for beauty मधेच असणार ना?
अनु- (हसून) yes डार्लिंग…मी आणि नेहा आलोय. खालीच आहोत. येतो दोन मिनिटात. बाय.
अनिने फोन कट केला आणि नेहाला म्हणाली b wing आहे. चल.
त्या दोघी लिफ्टच्या दिशेने निघाल्या. लिफ्ट मध्ये चढल्या. लिफ्ट वर जाऊ लागली.
इथे एअरपोर्ट च्या लिफ्ट मधून गेट नंबर चारकडे जाण्यासाठी निरंजन आणि नैना बाहेर पडले. नैना सहज त्याला म्हणाली-
नैना- सो शिरप्या, आपण इंडिया मध्ये गेल्यावर तुमच्या गावाला जायचं का? शिरप्या आणि यमी इन न्यू अवतार.
हाताने cabin bag ओढत असलेल्या निरंजन ला ते ऐकून काय बोलावं सुचल नाही. इतक्यात त्यांच्या विमानाची बोर्डिंग घोषणा झाली. दोघे गेटच्या दिशेने चालू लागले.
नेहाची आणि निशिकांतची संपूर्ण गोष्ट ऐकून प्राजक्ता विचारात पडली होती. नेहाच्या डोळ्यात रोखून बघत प्राजक्ता म्हणाली-
प्राजक्ता- नेहा…are you in love किंवा तुझं काही अफेयर वगैरे?
नेहा तिची नजर चुकवत खाली बघत म्हणाली-
नेहा- न…नाही… not at all…
तिच्या ह्या उत्तरानंतर प्राजक्ताच्या ऑफिसात एक सायलेन्स निर्माण झाला. इथे निरंजन आणि नैनाच्या विमानाने टेक ऑफ केला होता. पुढे जे घडणार होत ते माहित असलेला काळ पृथ्वीच्या कुशीत विसावून हसत होता.
क्रमश:
भाग २४
प्राजक्ता नेहाला एक टक बघत म्हणाली-
प्राजक्ता- नेहा डिव्होर्स का हवाय तुला? आय मीन निशिकांत ही चूक आहे आणि ती सुधारायला हवी हे कारण पुरेस आहे खर तर डिव्होर्सला. पण अजून काय आहे?
नेहा- खरच अजून काही कारण नाहीये.
अनु- अरे यार… मे बी ती प्रेमात आहे.
प्राजक्ता- मला वाटलंच ते. नेहा, दुसर लग्न करणार आहेस का तू?
नेहा- मला काही माहित नाहीये प्राजक्ता. ट्रस्ट मी. आणि ही अनु ज्या माणसाबद्दल बोलते आहे त्याच लग्न झालेलं आहे. बॉस आहे तो आमचा.
प्राजक्ता- ओह…इंटरेस्टिंग. म्हणजे त्याची बायको काही दिवसांनी माझ्याकडे येणार डिव्होर्स साठी.
नेहाला काय बोलावं सुचल नाही. ती गप्प बसून राहिली.
प्राजक्ता- अग गंमत केली मी. आपण तुझा डिव्होर्स करू. लवकरात लवकर करू. तुला मस्त पैसे पण मिळवून देते मी. काळजी नको करू.
नेहा- मला पैसे नको, काही नको. फक्त सुटका हवी आहे.
प्राजक्ता- बर. तुला पैसे मिळाले ना की ते मला देऊन टाक ओके?
नेहाने तिच्याकडे आश्चर्याने बघितल.
प्राजक्ता- आता का? म्हणे फक्त सुटका पाहिजे. सुटका तुझी नाही त्याची होईल. बहुतेक बायका हेच करतात. मला फक्त सुटका दे हा विचार करत नवऱ्याला सुटका देतात…पैशासकट. पण आपण नाही सोडायचं त्याला. आपलं भविष्य सिक्युर करायचं. घर आहे ना त्याचं? काही नाही मिळाल तर ते विकायला लावू. तू हे फॉर्म्स भर आणि शांत मनाने जा. बाकी मी बघते.
नेहाने शांतपणे सगळे फॉर्म्स भरले. सह्या केल्या आणि प्राजक्ताला thanks म्हणून ती आणि अनु निघाल्या. आज ऑफिसला रजा होती. अनुने सिनेमाचा प्लान आखला. दोघी सिनेमाला गेल्या. मग लंच वगैरे करून घरी यायला पाच वाजले होते. नेहा बर्यापैकी थकली होती. चेंज करून ती झोपी गेली. संध्याकाळी सातच्या सुमारास फोनचा मेसेज टोन ऐकू आला. नेहाची झोप चाळवली. तिने मेसेज पाहिला. मेसेज निरंजनचा होता. त्याने लिहील होत “उद्या ऑफिसला न जाता जरा बाहेर जाऊ. मला बोलायचं आहे. सकाळी ९ वाजता अप्सरा मॉलच्या बाहेर भेट.”
मेसेज बघून नेहा संभ्रमात पडली. तिला निरानाजनला भेटायचं होत, खूप बोलायचं होतं. पण लगेच डोळ्यासमोर नैना आली. सिंगापूर मधले टेन्शन वाले प्रसंग आले आणि तिने निरंजनला न भेटायचा निर्णय घेतला. नेहा उठली. थोडस जेवली. अनु बाहेर गेली होती. नेहाने टीव्ही लावला. पण मन कशातच रमत नव्हत. नेहा टीव्ही बंद करून बेडवर पडून राहिली. डोळ्यासमोर निशिकांत बरोबरचे दिवस आणि नंतर निशिकांत आयुष्यात आल्यावर अनुभवलेले क्षण येत होते. त्यातच यमी आणि शिरप्या आठवले. काय करायचं कळत नव्हत. उगाच तिला उकडत असल्यासारखं वाटलं. रूमची खिडकी सताड उघडून ती आत येणारी वार्याची झुळूक अंगावर घेत डोळे बंद करून उभी राहिली.
निरंजन त्याच्या अपार्टमेंटच्या खिडकीत उभा राहून दूरवर दिसणारा ट्राफिक बघत होता. इतक्यात मागून आलेल्या नैनाने त्याला मिठी मारली. निरंजन नैना आणि यमिच्या विचारात होता. नैनाच्या अनपेक्षित स्पर्शाने तो दचकला.
नैना- अरे शिरप्या मी आहे यमी. दचकतोस काय?
निरंजन वैतागून लांब जाऊन म्हणाला-
निरंजन- नैना प्लीज यार. सगळ्या गोष्टींची चेष्टा नको.
नैना- what चेष्टा? तू शिरप्या आहेस ना? मग तुझी यमी मीच असणार ना? (हसत) की आणखी कोणी सापडली आहे?
निरंजन- enough यार नैना. एक लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला.
नैना- ओके. पण प्रेमाला लिमिट नाही ना? मग लांब का पळालास? किती दिवसांनी भेटतोय आपण.
निरंजन- नैना…प्लीज..मला झोप येते आहे. मला झोपू दे. बाय…
हे बोलून निरंजन बेडरूम मध्ये निघून गेला. त्याच्या ह्या तुटक आणि विचित्र वागण्याने थोडी खट्टू झालेली नैना खिडकीजवळ आली. शांतपणे सिगारेट शिलगावून बाहेर बघू लागली. तिला सिंगापूर मधील सर्व प्रसंग आठवले. नेहा आठवली, तिच्या खोलीतील तो कलोनचा वास आवडला, दुकानातील सर्व प्रसंग आठवले. नैना ला लक्षात येत नव्हत की तिला नक्की काय वाटतय. इतक्यात मेसेज टोन ऐकू आला. नैना मागे वळली. समोर सोफ्यावर निरंजनचा फोन पडलेला होता. नैना सहज पुढे झाली आणि तिने फोन उचलला. त्याच्या नोटिफिकेशन स्क्रीन वर नेहाचा मेसेज दिसत होता. त्यात लिहील होत “मला हे सर्व योग्य वाटत नाही. सो प्लीज हे थांबवूया आपण.” हा मेसेज वाचून नैनाच्या पायाखालची जमीन सरकली. ती मटकन सोफ्यावर बसली. हातातील फोनवर दिसत असलेला तो मेसेज अनेकदा वाचत बसली. दोन बोटात धरलेली सिगारेट संपून तिला चटका बसल्यावर नेहा भानावर आली. तिने समोर असलेल्या ash tray मध्ये सिगारेट विझवली फोन सोफ्यावर भिरकावला आणि डोळे पुसून बेडरूम कडे निघाली.
बेडरूम मध्ये निरंजन छताकडे बघत बेडवर पडून होता. नैना आत आली. तिने निरंजनकडे एकदा बघितलं. मग शांतपणे येऊन त्याच्या शेजारी पडली. ती पण आता छताकडे बघत शांत पडली होती. काही वेळ तसाच शांततेत गेला. नैनाने प्रश्न विचारला-
नैना- निरंजन do you love me?
हा प्रश्न निरंजनला अनपेक्षित होता. त्याने तिच्याकडे वळून उत्तर दिल-
निरंजन- of course I love you. हे काय विचारते आहेस तू?
नैना- काही नाही. सहज कन्फर्म केलं. आहे प्रेम तर मग असा लांब का राहतोस हल्ली?
निरंजन- काहीही काय नैना? Whats wrong with you?
नैना- हेच मला तुला विचारायचं आहे की Whats wrong with you निरंजन? तू मला बदललेला का वाटतो आहेस?
निरंजन- (चपापून) तसं काही नाहीये बेबी..प्लीज…हे काय झालय तुला अचानक?
नैना- तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? मग आज मला ते दाखव. प्लीज…मला विश्वास दे…
अस म्हणून नैना त्याच्या पोटावर बसली. त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागली. नैनाला काय झाल होत हे तिलाच कळत नव्हत. आपल्या प्रेमाने ती लांब जात असलेल्या निरंजन ला परत मागे ओढत होती की तो आणखी पुढे जाऊ नये म्हणून त्याच्या भोवती आपल्या प्रेमाची भिंत उभी करत होती. पण तिने आज निरंजन वर तिच्या प्रेमाचा वर्षाव केला. निरंजन तृप्त झोपला होता तेव्हा नैना त्याच्या शेजारी पडली होती. डोळ्यात अश्रू होते आणि मनात नेहा होती.
सकाळी ब्रेकफास्ट करत असताना निरंजन ने फोन बघितला. नेहाचा मेसेज वाचला. नैनाच त्याच्याकडे लक्ष होतंच त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव ती बघत होती. आता निरंजन खाण्याकडे लक्ष न देता फोनवर chat मध्ये गुंतला होता. नैना त्याला बघत होती. निरंजन ने नेहाला मेसेज केला-
निरंजन- तू ये किंवा नको येऊ. मी नऊ वाजता अप्सरा mall ला येतो आहे.
नेहा- निरंजन प्लीज. मी काल मेसेज पाठवला तो वाचला ना तुम्ही. Lets stop it here.
निरंजन- पण का? काय झाल तुला अचानक?
नेहा- नैना mam खूप चांगल्या आहेत. मी तुम्हा दोघांच्या मध्ये येऊ इच्छित नाही.
निरंजन- तू आमच्या मध्ये येत नाहीयेस. आपण दोघे एकत्रच होतो. अगदी गेल्या जन्मी सुद्धा. ह्या जन्मी नैना नकळत आपल्या मध्ये आली आहे. मी तिची काळजी घेईनच. पण आपण दोघांनी एकत्र येण आवश्यक आहे.
नेहा- काय नाव देणार ह्या नात्याला? एक एक्स्ट्रा marital अफेयर? ह्यातून फक्त दु:ख निर्माण करू आपण सर्वांसाठी. सो हे नको. प्लीज…
निरंजन- हे सर्व भेटून बोलू शकतो ना आपण? मी ९ ला पोहोचतो आहे. बाकी तुझी मर्जी. बाय.
निरंजन ने फोन बाजूला ठेवला आणि तो पटापट ब्रेकफास्ट करू लागला.
नैना- काय रे आज इतकी घाई का?
निरंजन- एक महत्वाची मिटिंग आहे. ९ वाजता.
नैना- ओह…कुठे?
निरंजन- ब…बीकेसीला आहे.
नैना- ओह ग्रेट. मग मला सोड कलानगर ला.
हे ऐकून निरंजन घाबरला. कारण अप्सरा mall उलट्या बाजूला होता आणि कलानगर विरुद्ध दिशेला.
निरंजन- नको प्लीज…माझे काही कलीग्स पण येणार आहेत. मला त्यांना on the way पिक अप करायचं आहे. सो…
नैना- (त्याच्याकडे रोखून बघत) ओके…I will manage. पण मला मेन रोडला तरी सोडशील ना?
निरंजन- हो नक्की.
हे बोलून निरंजन बाथरूम मध्ये गेला. नैनाने मेन रोड वरच्या बिल्डींग बरून ८.४५ ला ओला पिकप बुक केला आणि ती तयार होऊ लागली. निरंजन ने नैनाला मेन रोडला सोडली. नैनाची ओला उभी होतीच. निरंजन गेल्यावर तिने लगेच ड्रायव्हरला त्याच्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला. नैनाची गाडी त्याच्या मागे निघाली. निरंजन अप्सरा mall च्या बाहेर येऊन थांबला. थोड्या अंतरावर नैनाची ओला थांबली. निरंजन ने नेहाला फोन लावला. नेहा फोन उचलत नव्हती. निरंजन ने दोन तीन वेळा प्रयत्न केला. पण नेहा फोन उचलत नव्हती. पंधरा मिनिट वाट बघितल्यावर सवा नऊ वाजता निरंजन तिथून निघाला. त्याच्या मागे नैनाची गाडी पण निघाली. निरंजन यु टर्न मारून परत mall समोर आला आणि त्याला फुटपाथ वर त्याची वात बघत असलेली नेहा दिसली. त्याने गाडी तिच्या समोर थांबवली. नेहा गाडीत बसली. निरंजनची गाडी निघाली. ते दोघे एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. निरंजन ने हळूच त्याचा हात नेहाच्या हातावर ठेवला. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्यावर नैना हे नाव दिसत होत. निरंजन ने दचकून नेहाचा हात सोडला आणि तो टेन्स होऊन फोन घ्यावा कि घेऊ नये ह्या विचारात हरवला. त्याचा फोन वाजत होता आणि मागे गाडीत असलेली नैना त्याने फोन उचलायची वाट बघत त्यांच्या गाडीवर नजर लावून होती.
क्रमश:
भाग २५
निरंजनची गाडी निघाली. ते दोघे एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. निरंजन ने हळूच त्याचा हात नेहाच्या हातावर ठेवला. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्यावर नैना हे नाव दिसत होत. निरंजन ने दचकून नेहाचा हात सोडला आणि तो टेन्स होऊन फोन घ्यावा कि घेऊ नये ह्या विचारात हरवला. त्यचा फोन वाजत होता आणि मागे गाडीत असलेली नैना त्याने फोन उचलायची वाट बघत त्यांच्या गाडीवर नजर लावून होती. निरंजन ने फोन रिसीव्ह केला. फोन गाडीतील ब्लू टूथ स्पीकर वर गेला. नेहा सगळ ऐकत होती.
निरंजन- हेलो…
नैना- कुठे आहेस निरंजन?
निरंजन- मी म्हणालो ना बीकेसी मध्ये मिटिंग आहे म्हणून? तिथेच जातोय मी. का काय झालं?
नैना- काही नाही. मी काय म्हणते आज संध्याकाळी आपण नेहाला घरी बोलवूया का डिनरला?
हे ऐकून निरंजन आणि नेहा दोघेही अलर्ट झाले.
नैना- हेलो…निरंजन आहेस ना तू?
निरंजन- हो आहे. बोल ना.
नैना- काय म्हणाले मी?
निरंजन- प..पण नेहाला कशाला बोलवायच उगाच? आय मीन…
नैना- अरे उगाच नाही. आमची चांगली मैत्री झाली आहे ना सिंगापूरला? उद्या माझ्या मिटींग्स झाल्या की संध्याकाळी मला थोड शॉपिंग करायचं आहे. मला तिची कंपनी होईल. आज रात्री आम्ही प्लान करू. प्लीज बोलाव ना तिला.
निरंजनने नेहाकडे पाहिलं. नेहा मानेने हो म्हणाली.
निरंजन- ओके. मी बघतो. बोलतो तिच्याशी. ठेऊ?
नैना- हे रे काय? लगेच ठेऊ काय?
निरंजन- बोलून झालं ना?
नैना- नाही…
निरंजन- काय बाकी आहे?
नैना- काल मजा आली ना?
निरंजन- कसली मजा?
नैना- अरे वेड्या काल रात्रीबद्दल बोलते आहे मी. कसा झोपलास गाढ दमून. म्हणजे मजा आलीच असणार.
हे ऐकून निरंजनला काय रीएक्त करावं कळत नव्हत. नेहाला पण अचानक कानकोंड झाल. निरंजन ने wifi बंद करून फोन हातात घेतला.
निरंजन- नैना ही वेळ आहे का हे सर्व डिस्कस करायची?
नैना- हे डिस्कस करायची काही ठराविक वेळ असते का?
निरंजन- नैना बाय. मला काम आहे. नंतर बोलू.
निरंजन ने फोन कट केला. नेहाकडे एक कटाक्ष टाकला. नेहा बाहेर बघत होती. निरंजनची गाडी आता हायवेला लागली. नैनाने त्यांना हायवेला सोडल आणि तिने गाडी वळवायची सुचना दिली. नैनाने गाडीची काच उघडून सिगारेट शिलगावली. तिला कळत नव्हत की निरंजन आणि नेहाच कस काय जमल? ती कुठे बायको म्हणून कमी पडली का? तर त्याच उत्तर निश्चितच नाही हे होत आणि ते तिला आणि निरंजनला देखील माहित आणि मान्य होत. मग हे अस का झाल असेल? हे आणखी वाढायच्या आधीच निरंजनशी बोलायचा निर्णय घेऊन तिने सिगारेट बाहेर भिरकावली आणि तिची गाडी निघून गेली.
हायवे वर निरंजन गाडी चालवत होता. नेहा बाहेर बघत बसली होती. कोणीच काहीच बोलत नव्हत. अचानक नेहा बोलली.
नेहा- नैना mam खूप चांगल्या आहेत…
निरंजन- हम्म…
नेहा- स्वभावाने, दिसायला छान आहेतच and I am sure that she is good in bed too…
निरंजन ने नेहाकडे एक कटाक्ष टाकला.
नेहा- बरोबर ना?
निरंजन- हम्म…हो…पण तू हे का बोलते आहेस नेहा?
नेहा- कारण मला प्रचंड गिल्टी वाटतंय. आपण हे जे करतोय ते चूक आहे. हि त्यांच्याशी प्रतारणा आहे. आपण ह्यापुढे भेटता कामा नये.
निरंजन- का?
नेहा- मी सांगितल ना का ते?
निरंजन- पण नेहा मी तुला आधीच सांगितल आहे की आपण एकत्र अनेक जन्म होतो. ह्या जन्मात ती आपल्या मध्ये आली आहे. आणि अजून एक. तुझ्यावर प्रेम केल म्हणून माझ नैनावर प्रेम कमी होणार नाहीये. So प्रॉब्लेम काय आहे?
नेहा- प्रोब्लेम हा आहे की आपल्या नात्याला काहीच status नाहीये आणि नैना madam ला ह्या बद्दल कळल तर त्या उध्वस्त होतील आणि त्यासाठी मी स्वतःला जबाबदार समजेन. आपण प्लीज इथेच थांबूया. मी दुसरी नोकरी बघते. ह्यापुढे आपण कधीच नको भेटूया.
निरंजन- जर तस असत तर आपण ह्या जन्मात भेटलोच नसतो. मी तिथे अमेरिकेत, तू इथे मुंबईत. तरीही भेटलो ना? म्हणजे त्या भेटीमागे नियतीच काहीतरी नियोजन आहे. आणि नियतीने घडवलेली भेट संपवायचा आपल्याला काहीच अधिकार नाहीये.
नेहा- मग काय करायचं आपण? हे अस लपून लपून भेटायचं आणि गेल्या जन्मात जोडीदार होतो म्हणून ह्या जन्मात एकमेकांचे illegitimate जोडीदार बनून एकमेकांशी संबंध ठेवायचे आणि आयुष्यभर टेन्शन मध्ये राहायचं?
निरंजन- नेहा प्लीज. हे बघ मी पुढल्या वीक मध्ये अमेरिकेला परत जातोय.
नेहा- (प्रचंड आश्चर्याने) काय?
निरंजन- हो नेहा. मला HO ला जाव लागणारच ना? ते माझं ऑफिस आहे. I belong there…
नेहा- मग बरच झालं. एका आठवड्याचा प्रश्न आहे फक्त. मी लीव्ह अप्लाय करते आणि ऑफिसात येत नाही. तुम्ही wind up करा आणि जा. मी त्याच्या दुसर्या दिवसापासून रिझ्युम करते.
निरंजन- नाही नेहा. Listen to me. I have a different plan.
नेहा- (आश्चर्याने) काय?
निरंजन- मी तुझी ट्रान्स्फर अमेरिकेला करणार आहे. तू तिथे ये आणि रहा.
नेहा- (शॉक होऊन) काय? अमेरिकेला? मी?
निरंजन- yes नेहा. तिथे वातावरण वेगळ आहे. तिथे तुमच्या personal आयुष्यात कोणालाही इंटरेस्ट नसतो. तुम्ही अफेयर करा, आणखी काही करा. जोवर तुम्ही लोकांना त्रास देत नाही तोवर nobody bothers to bother you. सो आपण मजेत राहू.
नेहा- आणि नैना mam? त्याचं काय?
निरंजन- तिचं काय? ती आहे आणि असेलच.
नेहा- आणि त्यांना कळल तर?
निरंजन- नाही कळणार नेहा. आपण सांगितल तरच कळेल ना? आणि आपण सांगू का तिला समोरून?
नेहा- नाही. मला somehow हे पटत नाहीये. तुमच लग्न नसत झालेलं किंवा डिव्होर्स झालेला असता ना तर मी तुमची मैत्रीण बनून राहिले असते. आयुष्यभर. अमेरिकेत किंवा भारतातही. इतक प्रेम आहे माझ तुमच्यावर आणि यमीच श्री वर. पण नैना mam वर अन्याय करून मी नाही राहू शकणार.
निरंजन- त्यात अन्याय काय?
नेहा- समजा उद्या नैना madam ना कोणी मित्र भेटला आणि त्याचं अफेयर जमल आणि ते तुम्हाला कळल तर तुमची रीएक्षन काय असेल?
निरंजन- come on नेहा. अस होऊच शकत नाही.
नेहा- आपल दोघांच जमेल अस नैना madam ला कोणी सांगितल तर त्या पण हेच म्हणतील “अस होऊच शकत नाही” पण तस झालय ना?
निरंजन- हे खूप hypothetical आहे नेहा.
नेहा- पण अशक्य नाहीये ना. सो त्याचं अफेयर आहे हे कळल्यावर तुमची रिएक्शन काय असेल?
निरंजन- मला नाही आवडणार ते.
नेहा- मग त्यांना तरी तुमच अफेयर कस आवडेल?
निरंजन आता वैतागला होता.
निरंजन- मग काय करायचं आपण?
नेहा- मी म्हणाले तेच. मी उद्यापासून रजेवर जाते. तुम्ही गेलात की जॉईन होते.
निरंजन- नेहा प्लीज. हा ऑप्शन नाहीये. तू अमेरिकेला येते आहेस. ह्या जन्मी शिरप्या आणि यमुना वेगळे होणार नाहीत. ते एकत्र येतील.
नेहा- नाही. यमुना आणि श्री एकत्र न यायला जन्म घेतात..परत परत. जन्माला येतात, भेटतात आणि वेगळे होतात. प्रत्येक जन्मात. हा जन्म पण त्याला अपवाद नाही. आपण हा नाद सोडूया. नियतीच्या विरोधात जाऊन कोणीच जिंकू शकत नाही. चला आपण परत जाऊ. मला घरी जायचं आहे.
आता निरंजन जाम चिडला.
निरंजन- नेहा प्लीज. मी इथे एकत्र यायचे प्लान करतोय आणि तू विरहाच्या गोष्टी करते आहेस. Why don’t you understand? प्लीज नेहा…
हे बोलून निरंजन ने नेहाचा हात घट्ट धरला. डाव्या हाताने तो तिला स्वतःच्या जवळ ओढू लागला. नेहा विरोध करत नव्हती पण घट्ट बसून होती.
नेहा- प्लीज मला सोडा…मी इथेच उतरते…
निरंजन- नाही नेहा…प्लीज…ऐक माझ…मी परत इंडिया मध्ये कधी येईन माहित नाहीये. मला तू माझ्या समोर हवी आहेस, माझ्या जवळ हवी आहेस. प्लीज अमेरिकेला चल.
नेहा- प्लीज मला सोडा….ऐका माझ.
निरंजन ऐकायला तयार नव्हता. आता आठवड्याभरात नेहापासून दूर जायचा विचार त्याला त्रास देत होता. नेहा येणार नाही हे ऐकून डोळ्यासमोर अंधारी आली होती. त्याने नेहाला समजवायला नेहाकडे बघितल आणि त्याची गाडी हायवेच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हाय एंड गाडी असल्याने एअर bags उघडल्या आणि निरंजन नेहा एकही ओरखडा न येता वाचले. ट्रकचा ड्रायव्हर आणि चार लोक मागे आले. नेहा आणि निरंजन दार उघडून जेमतेम बाहेर पडले. गाडीच्या bonnet चा चक्काचूर झाला होता. नेहा भीतीने थरथरत होती. ट्रक ड्रायव्हर म्हणाला-
ड्रायव्हर- काय भाऊ दिवसा टाकली काय? एवढा मोठा ट्रक दिसला नाही?
निरंजन- टाकली वगैरे काही नाहीये. माझा जरा कंट्रोल सुटला आणि गाडी आपटली.
निरंजन- (नेहाला न्याहाळत) असा कसा कंट्रोल सुटला भाऊ? काय करत होता गाडीत?
निरंजन हे ऐकून भडकला. ड्रायव्हरची कॉलर धरून म्हणाला-
निरंजन- ए तोंड सांभाळून बोल.
निरंजनच्या हिसक्याने ड्रायव्हर वरमला. म्हणाला-
ड्रायव्हर- मला काय? गाडीत तुम्ही काहीही करा. पण माझ नुकसान भरून द्या की झालं.
निरंजन- किती झालय नुकसान?
ड्रायव्हर- पन्नास हजार तरी झालं असेल.
निरंजन- ए पन्नास हजार तुझा वर्षाचा पगार तरी आहे का? हे घे पाच हजार आणि निघ.
ड्रायव्हर- (जमलेल्या लोकांना) बघितला का पैसेवाल्यांचा माज? एकतर गाडी ठोकायची आणि नुकसान भरपाई भिक दिल्यासारखी द्यायची.
निरंजन- ठीक आहे. नको ना तुला भरपाई? मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ. तिथे valuer येईल. इंश्युरंस क्लेम कर. मी एक पैसा देत नाही. चल पोलीस स्टेशनला.
ड्रायव्हरच्या लक्षात आल की निरंजन हुशार आहे. ड्रायव्हर म्हणाला-
ड्रायव्हर- ठीक आहे. पाच नाही दहा हजार द्या.
निरंजन- तीन हजार. आता पाच पण नाही. तीन हजार किंवा पोलीस स्टेशन. सगळे कागद आहेत ना? आणि ट्रक मध्ये माल काय आहे त्याची सगळी बिल्स आहेत ना? पोलीस मागतील म्हणून विचारतोय.
ड्रायव्हर काय ते समजून गेला. म्हणाला-
ड्रायव्हर- पाच हजार तरी द्या साहेब.
निरंजन- तीन चे दोन होतील आता.
ड्रायव्हर तीन हजार घेऊन ट्रक घेऊन निघून गेला. लोक पण पांगले. निरंजन towing van ला फोन करू लागला. नैना घाबरली होती. निरंजन ने van ला लोकेशन सांगितल. मग ऑफिसात फोन करून accident ची माहिती देऊन क्लेम टाकायला सांगितला. नेहा अजूनही खूप घाबरली होती.
निरंजन- नेहा नको घाबरू. काही झालेलं नाहीये. आपला जीव वाचला हे महत्वाच आहे. गाडीचा इंश्युरंस आहे. गाडी कंपनीची आहे. ती नीट होईल. Towing van आली की आपण निघूया.
त्याने हळूच नेहाच्या खांद्यावर हात ठेवला. नेहा पटकन लांब झाली. इतक्यात तिथून जात असलेली पोलिसांची जीप थांबली. त्यातून एक इन्स्पेक्टर उतरला. तरणाबांड, dashing…
इन्स्पेक्टर- काय झालं गाडीला?
निरंजन- काही खास नाही. थोडी टच झाली.
इन्स्पेक्टर ने गाडीभोवती फेरी मारली आणि म्हणाला-
इन्स्पेक्टर- टच झाली की मिठी मारली? बॉनेट पार गेल आहे. कोणाला ठोकली?
निरंजन- एक ट्रक होता पण तो गेला. Don’t worry we will manage. मी towing van बोलावली आहे. गाडी garage ला जाईल. इंश्युरंस आहे.
इन्स्पेक्टर ने आता नेहाकडे बघितलं. घाबरलेली नेहा बघून त्याच्या चाणाक्ष नजरेने जे ओळखायच ते ओळ्खल.
इन्स्पेक्टर- ह्या तुमच्या मिसेस का?
निरंजन- ह..हो…
इन्स्पेक्टर- अच्छा…लायसन्स आहे का तुमच्याकडे?
निरंजन- look officer its sorted…तुम्ही काळजी नका करू. मी सगळ manage केल आहे.
इन्स्पेक्टर- अहो दादा आम्हाला जनतेची काळजी करायचे आणि ती मिटवायचा पगार देत सरकार. (नेहाकडे बघत) बाकी तुम्ही खूप काही manage करताय हे पटतंय मला. लायसन्स द्या प्लीज.
निरंजन- look officer…
इन्स्पेक्टर- लायसन्स प्लीज gentleman.
निरंजन ने चरफडत लायसन्स दिल. इन्स्पेक्टर ने ते बघितल आणि म्हणाला-
इन्स्पेक्टर- अरे वा. मेड इन युएसए? देशी लायसन्स आहे का?
निरंजन- नाही.
इन्स्पेक्टर ने लायसन्स वरच नाव वाचल. निरंजनच्या चेहऱ्याकडे बगितल. काहीतरी विचार केला आणि नेहाकडे बोट करून म्हणाला-
इन्स्पेक्टर- ह्यांच नाव काय आहे?
निरंजन- हे बघा तिचा काही संबंध नाहीये. गाडी मी चालवत होतो.
इन्स्पेक्टर- कोणाचा काय आणि कसा संबंध आहे ते आम्हाला ठरवू दे. ह्याचं नाव सांगता का प्लीज.
नेहा- माझ नाव नेहा…
हे ऐकून इन्स्पेक्टर चकित झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक कनिंग हसू आलं. तो म्हणाला-
इन्स्पेक्टर- अरे वा. ओके…आलोच मी…(हवालदाराला) मी येईपर्यंत साहेब आणि madam ना जाऊ देऊ नको साळुंखे…
इन्स्पेक्टर जरा लांब गेला आणि त्याने फोन लावला-
इन्स्पेक्टर- हेलो…हर्षद…तुझ्या त्या बॉस आणि त्याची ऑफिस मधली आयटम ह्यांची नावं निरंजन आणि नेहा आहेत ना?
हर्षद- हो रे..का?
इन्स्पेक्टर- काही नाही. लगेच माझ्या पोलीस स्टेशनला ये. तेरा टाईम आ गया समज…
हर्षद- काय सांगतोस आशुतोष? आलोच मी..बाय…
इन्स्पेक्टर ने फोन कट केला आणि वळून तो चिंताग्रस्त चेहऱ्याने उभे असलेल्या निरंजन आणि नेहाला बघू लागला. आता पुढे काय होणार हे फक्त त्याला माहित होत.
क्रमश:
भाग २६
इन्स्पेक्टर ने फोन कट केला आणि वळून तो चिंताग्रस्त चेहऱ्याने उभे असलेल्या निरंजन आणि नेहाला बघू लागला. आता पुढे काय होणार हे फक्त त्याला माहित होत.
इन्स्पेक्टर- पोलीस स्टेशनला चला.
निरंजन- पोलीस स्टेशन? का? Its just an accident…
इन्स्पेक्टर- ए इंग्लिश सबटायटल ही तुझी अमेरिका नाहीये. माझी मुंबई आहे ही. गप गुमान येतोस का बेड्या घालून नेऊ?
नेहा- पण इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनला जायची गरज काय म्हणते मी? आम्हाला तक्रार करायची नाहीये. सो…
इन्स्पेक्टर- तक्रार तुम्हाला नाही मला करायची आहे. ड्रंकन ड्रायव्हिंग दिवसा ढवळ्या.
निरंजन- come on इन्स्पेक्टर. हे जरा अति होतय ओके? तुम्ही प्लीज तोंड सांभाळून बोला.
इन्स्पेक्टर- हो ना? मग ह्या चिकणीला सांग दोन पुरुष बोलत असताना मध्ये बोलायचं नाही म्हणून.
हे ऐकून निरंजनची सटकली.
निरंजन- इन्स्पेक्टर तोंड सांभाळ. आम्ही बोलत नाही म्हणजे तू काहीही बोलशील का? एका सभ्य बाई बद्दल अस बोलायला लाज वाटत नाही तुला?
इन्स्पेक्टर – सभ्य? कोण ही? दिवसा ढवळ्या गाडीत चाळे करून तुझ लक्ष इतक विचलित केल तिने की तू गाडी ठोकलीस. आणि तरीही ही सभ्य? अश्या किती गाड्यातून भटकत असेल ही…
हे ऐकून इन्स्पेक्टरच वाक्य पूर्ण व्हायच्या आत निरंजन ने त्याच्या कानाखाली लगावली. इन्स्पेक्टर झेलपाटून लांब जाऊन पडला. बरोबर असलेल्या हवालदारांनी निरंजन ला धरला. इन्स्पेक्टर उठून समोर आला आणी म्हणाला-
इन्स्पेक्टर- तुझ्या #डीला लई दात आलेत का भडव्या? माझ्या अंगावर हात उचलतोस? वर्दीवर हात उचलतोस?
असं बोलून त्या इन्स्पेक्टर ने निरंजनच्या दोन पायांच्या मधोमध लाथ मारली. निरंजन कळवळून वाकला आणि इन्स्पेक्टरचा गुढगा त्याच्या नाकावर बसला. नाकाचा घोणा फुटून रक्त आल.
इन्स्पेक्टर- हवालदार ह्याला गाडीत घ्या आणि ह्या आयटमला पण घ्या.
हवालदारांनी निरंजनला हाताला धरून गाडीत कोंबला. नेहा त्याच्या शेजारी बसली. ती प्रचंड घाबरली होती. पोलिसांची गाडी आता पोलीस स्टेशनकडे निघाली. नेहा निरंजनकडे हताशपणे बघत होती. आज पहिल्यांदा निरंजन तिला थोडा हेल्पलेस वाटत होता. जीप पोलीस स्टेशन कडे जात होती. तो इन्स्पेक्टर नेहाला न्याहाळत होता. त्याची नजर तिला आतापर्यंत बोचत होती. इतक्यात निरंजनचा फोन वाजला. फोन नैनाचा होता. निरंजन ने फोन answer करायला फोन खिशातून काढून हातात घेतला इतक्यात इन्स्पेक्टर ने फोन त्याच्या हातातून काढून घेतला आणि कट केला.
निरंजन- माझ्या बायकोचा फोन आहे. मला बोलू दे प्लीज.
इन्स्पेक्टर- ती बायको आहे मग ही कोण आहे रे?
निरंजन- that is none of your business.
इन्स्पेक्टर – ए मेड इन अमेरिका, मला इन्स्पेक्टर आशुतोष गायतोंडे म्हणतात. आझाद मैदान पोलीस स्टेशनच सगळ सेक्शन ह्या नावाने चड्डीत मुतत हे लक्षात ठेव. माझ्याशी बोलताना आवाज खाली नाहीतर ही काठी आहे ना ती घशातून घालून खालून बाहेर काढीन. मग खायचं कुठून आणि हगायचं कुठून हेच कळणार नाही तुला.
निरंजन- लूक इन्स्पेक्टर आम्हाला जाऊ दे. तुम्हाला हवे तितके पैसे देतो मी पण…
इन्स्पेक्टर- ए मी लाचखाऊ आहे पण आता तसा दिसायला पण लागलोय काय? किती देणार तू पैसे मला?
निरंजन- तुम्ही सांगा.
इन्स्पेक्टर- चल पाच पेटी आणि ही आयटम…मला आणी माझ्या मित्राला. (ड्रायव्हरला) ए शिंदे गाडी थांबव. (निरंजनला) जा तू…उद्या पैसे घेऊन ये आणि हिला घेऊन जा. तोवर आम्ही हिला वसूल करतो.
हे ऐकून निरंजन उठला आणि त्याने इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर बुटाची लाथ मारली. त्याचा ओठ फाटून रक्त येऊ लागल आणि त्याच्या डाव्या डोळ्यात रक्त साकळून तो लाल झाला. मग इन्स्पेक्टर आणी हवालदारांनी निरंजनला गाडीतच गुरासारखा बडवला. ते सहन न होऊन नेहा ओक्साबोक्शी रडत होती. गाडी पोलीस स्टेशनला आली. निरंजनला पोलिसांनी धरून आत नेला. नेहा मागे गेली.
इन्स्पेक्टर – ए ह्या भडव्याला Interrogation रूम मध्ये न्या. ह्याच्या अंगात जाम रग आहे. सगळी उतरवतो दोन दिवसात. पोलीस त्याला आत घेऊन गेले. इन्स्पेक्टर त्याच्या चेयर मध्ये बसला. सिगारेट पेटवून समोर उभ्या असलेल्या नेहाला न्याहाळू लागला. इतक्यात हर्षद तिथे आला. इन्स्पेक्टरला सुजलेला बघून म्हणाला-
हर्षद- ए आशु काय झाल यार तुला?
इन्स्पेक्टर – ह्या तुझ्या आयटम चा यार लई मादर#@ आहे. माझ्या थोबाडावर लाथ मारली साल्याने…
हर्षद- तुझ्या थोबाडावर लाथ? काय सांगतोस? आणि त्याला असाच सोडलास तू?
इन्स्पेक्टर- सोडेन कसा? गाडीत हनुमान केलाय. आता टायर मध्ये घेऊन गोरीला करतो त्याचा. हीच ना तुझ्या ऑफिसातली आयटम?
हर्षद ने नेहाकडे वळून पाहिलं. आश्चर्य वाटल्यासारख म्हणाला-
हर्षद- नेहा तू इथे? आत कोण आहे?
नेहा काही बोलली नाही.
इन्स्पेक्टर – अरे आत हिचा यार आहे. तुमचा अमेरिकन बॉस. निरंजन. मी हिला काय बोललो की आजची रात्र तू माझ्या आणि हर्षद बरोबर काढ. मी डायरी पण न बनवता सोडतो त्याला.
हर्षद- चांगली कल्पना आहे आणि मला खात्री आहे की निरंजन साठी नेहा नक्की आपल्याला को-ऑपरेट करेल. काय नेहा?
नेहा रागाने थरथरत होती पण लाचार होती. डोळ्यातून पाणी येत होत. इतक्यात इन्स्पेक्टरचा मोबाईल वाजला. त्याने नेहाला न्याहाळत फोन घेतला-
इन्स्पेक्टर- हेलो…स…सर…ह…हो सर….नाही…नाही सर…हो..सॉरी सर…हो लगेच…right सर…सस्पेंड…पण सर….ओके सर….मी येतो उद्या तुम्हाला भेटायला…येस सर…
इन्स्पेक्टरने फोन ठेवेपर्यंत त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता.
हर्षद- काय झालं?
इन्स्पेक्टर- ए हर्षद तू डोक्याची काशी नको करू प्रश्न विचारून? तू पोलीस स्टेशनला काय करतोयस? निघ तू…
हर्षद- अरे पण…
इन्स्पेक्टर- निघ म्हणालो ना? संध्याकाळी भेटू अड्यावर तेव्हा बोलू. सध्या तू लगेच निघ.
ह्या अचानक बदलाने हादरलेला हर्षद तिथून निघून गेला.
इन्स्पेक्टर- हवालदार निरंजन साहेबांना बाहेर काढ.
हा बदल बघून नेहा पण चकित झाली. निरंजन हवालदाराच्या आधाराने बाहेर आला.
इन्स्पेक्टर – सर मला माफ करा. तुम्ही आधी का नाही सांगितल की तुमची सीएम साहेबांशी मैत्री आहे म्हणून? त्यांनी cp साहेबांना फोन केला आणी साहेबांचा मला फोन. बेकार चढले माझ्यावर साहेब. सस्पेंड केला आहे मला. सर तुम्ही प्लीज सांगा ना की कारवाई करू नका माझ्यावर म्हणून…प्लीज सर…
हा बदल निरंजनला देखील नवीन होता.
निरंजन- सो आम्ही जाऊ आता?
इन्स्पेक्टर – हो सर…आमची जीप येईल ना तुम्हाला सोडायला.
निरंजन- नको thanks. We will manage.
निरंजन ने नेहाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो लंगडत निघाला. इथे इन्स्पेक्टर चेहऱ्यावरचा घाम पुसत मनातल्या मनात हर्षदला शिव्या घालत होता.
निरंजन आणि नेहाची कॅब हॉटेलच्या पोर्च मध्ये आली. निरंजन उतरला आणि नेहा निघून गेली. निरंजन त्याच अवस्थेत चालत लिफ्ट मधून त्याच्या खोलीजवळ आला. त्याने बेल वाजवली. नैनाने दार उघडलं. निरंजनला त्या अवस्थेत बघून नैना हादरली. त्याला आधार देत आत घेऊन सोफ्यावर बसवत ती म्हणाली-
नैना- निरंजन हे काय झालं? किती लागल आहे तुला…
निरंजन- हो…एक accident झाला.
नैना- काय? Accident? कुठे कसा?
निरंजन- हायवेला. मी गाडी एका ट्रक वर ठोकली.
नैना- पण तू हायवे ला का गेलास? तुझी मिटिंग तर town ला होती ना?
निरंजन- (दचकून) ह…हो…होती ना…पण client ने आयत्या वेळी व्हेन्यू चेंज केला सो हायवे…मग accident नंतर लोक जमले आणि as usual मला मारलं.
नैनाने त्याला प्रेमाने जवळ घेतला आणि म्हणाली-
नैना- ओह माय बेबी… दुखतय का फार?
निरंजन- हो थोड दुखणारच ना? But I am fine.
नैना- हम्म ओके. आता आराम कर तू.
निरंजन बेडवर आडवा झाला. त्याला लगेच झोप लागली. झोपेत परत तेच स्वप्न. शिरप्या, यमी. डोंगर, देऊळ….पण ह्यावेळी त्याला काहीतरी नवीन दिसलं. त्याला दिसलं की शिरप्या आणि यमीला एका कड्याजवळ उभ केल आहे. सगळे गावकरी हातात मशाल घेऊन उभे आहेत. रात्रीची वेळ आहे. त्या दोघांचा कडेलोट करायची शिक्षा त्यांना दिलेली आहे. शिरप्या ओरडून ओरडून सांगतोय की “मला शिक्षा द्या. यमीची काय बी चूक नाहीये. तिला सोडा.” पण गावकरी ऐकायला तयार नाहीयेत. शिरप्या आणि यमीचे हात मागे बांधलेले आहेत. चार जण पुढे होतात आणि दोघांना दरीत ढकलतात. शिरप्या आणि यमी हवेत तरंगत वेगाने खाली येऊ लागतात. काही फूट गेल की एखाद्या कातळावर आपटून कपाळमोक्ष. दोघ डोळे मिटून घेतात. इतक्यात दोघे पिसा सारखे हवेत तरंगू लागतात. तरंगत अलगद जमिनीवर उतरतात. त्यांना समोर एक धूसर आकृती दिसते….दोघे त्या आकृतीला नमस्कार करतात. ती आकृती नाहीशी होते.
आकृती नाहीशी झाली आणि नेहा झोपेतून जागी झाली. तिला हे संपूर्ण स्वप्न आठवत होत. आत्ताच पडलेलं. ती ह्या स्वप्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होती. पण तिला अर्थ लागत नव्हता. तिने न राहवून निरंजनला फोन केला. निरंजन झोपला होता. फोन वाजल्यावर शेजारी बसलेल्या नैनाने फोन घेतला. नेहा घाई घाईत म्हणाली-
नेहा- मला आत्ता एक स्वप्न पडलं.
नैना- काय स्वप्न?
नैनाचा आवाज फोनवर ऐकून नेहा घाबरली. आपण काय बोलून गेलोय हे लक्षात येऊन हादरली. पुढे काय बोलाव? जे बोललो आहोत ते कस cover up कराव अश्या प्रकारचे लाखो विचार तिच्या मनात एका क्षणात येऊन गेले.
नैना- नेहा अग काय स्वप्न पडलं तुला?
नेहा- म…मला स्वप्न पडलं की…की निरंजन सरांचा अपघात झाला आहे…सो मी…
नैना- ओह…काय सांगतेस? अग त्याचा खरच accident झालाय. देवाच्या दयेने he is safe…
नेहा- ओह…काय सांगता?
नैना- हो अग…बर ऐक…निरंजन ने तुला आज संध्याकाळ बद्दल सांगितलं का?
नेहा- आज संध्याकाळ? नाही…काय आहे आज संध्याकाळी?
नैना- बघ किती विसरभोळा आहे निरंजन. आज संध्याकाळी तुला डिनर साठी इन्व्हाईट करायला सांगितल होत मी त्याला. विसरला सांगायला. बर मी सांगते. आज ये हॉटेल वर. एकत्र डिनर करू.
नेहा- काही विशेष?
नैना- तसं समज हव तर…ये नक्की…साडेसात पर्यंत ये आणि direct रूम वर ये.
नेहा- ओके mam येते मी.
नैनाने फोन कट केला. मग स्वतःच्या फोनवरून एक फोन केला आणि म्हणाली-
नैना- हाय…आजच कन्फर्म आहे. मी सात सव्वा सात पर्यंत पोहोचते…बाय…
नैना फोन कट करून झोपलेल्या निरंजनकडे बघत विचारात हरवली होती. खिडकीतून दिसणाऱ्या समुद्रात सूर्य हळू हळू अस्ताला जात होता.
क्रमश:
भाग २७
नेहा विचारात पडली होती की रात्री जाव की जाऊ नये. आपल्याला अस अचानक का बोलावलं असेल? निरंजनला फोन करण आता शक्य नव्हत आणि ते चांगल देखील दिसलं नसत. नेहाने जायचा निर्णय घेतला. त्याच निमित्ताने निरंजनला बघता येईल. त्याच्या तब्बेतीची विचारपूस करता येईल ह्या विचाराने तिला बर वाटल. ती तयार होऊ लागली.
नैना आता बाहेर जायला पूर्ण तयार झाली होती. ती निरंजनला म्हणाली-
नैना- मी आलेच जाऊन.
निरंजन- कुठे?
नैना- अरे माझी मैत्रीण आहे ना शायरा? तिने घरी बोलावलं आहे अचानक. तिचा नवरा दुबई वरून आलाय आजच. सो तिने आजच ये अस सांगितल. मी नाही म्हणू शकले नाही. बघ ना काय गोंधळ घातलाय मी ते.
निरंजन- कसला गोंधळ?
नैना- अरे मी आपल्या नेहाला डिनर साठी इथे बोलावलं आणि मलाच जाव लागतंय.
निरंजन ते ऐकून चकित झाला.
निरंजन- नेहा इथे येणार आहे? डिनरला?
नैना- हो? पण तू इतका टेन्स का झालास? डीनरला येते आहे ती. तुझ्याशी लग्न करायला नाही.
हे बोलून नैना तिच्याच जोक वर जोरजोरात हसली. निरंजन वैतागून म्हणाला-
निरंजन- नैना this is not funny…काय बोलते आहेस तू?
नैना- chill baby…मी गम्मत केली. पण तू इतका सिरीयस का होतोस जस काय ती खरच लग्न करणार आहे तुझ्याशी. अरे मी इथे असताना कोण हिंमत करेल अशी?
निरंजन मनावर ताबा ठेवत डोळे मिटून बसला. नैना पुढे झाली. त्याच्या कपाळाची, मग गालाची पापी घेत त्याच्या मानेवर आपल्या लिपस्टिकची निशाणी देत म्हणाली-
नैना- रागावू नको रे…प्लीज…
निरंजन- आता तू जाते आहेस तर नेहा इथे येऊन काय उपयोग? तिला फोन करून प्लान cancel कर.
नैना- तू वेडा आहेस का निरंजन. किती विचित्र दिसेल ते? ती बिचारी निघाली पण असेल एव्हाना. And its ok. तू घेऊन जा ना तिला रूफ top रेस्तोरंतमध्ये. मी तुम्हाला जॉईन करते एक दोन तासात. चल आता तू उठ आणि तयार हो. नेहा केव्हाही येईल आता. आणि हो तो फुलांचा बुके मी तिच्यासाठी मागवला आहे. तो तिला नक्की दे. बाय बेबी.
निरंजन त्या बुकेकडे बघत असताना नैना रूम मधून बाहेर पडली. लिफ्टची वाट बघत उभी राहिली. घड्याळात वेळ बघितली. लिफ्टच्या चकचकीत दरवाज्यात दिसणार स्वतःच प्रतिबिंब न्याहाळून खुश झाली. इतक्यात वरून येत असलेली लिफ्ट थांबली. दार उघडल. नैना आत शिरल्यावर लिफ्ट निघाली आणि त्याच वेळी त्यांच्या मजल्यावर खालून आलेल्या लिफ्टच दार उघडलं आणि त्यातून नेहा बाहेर पडली. नेहाने आज साधा मोतिया रंगाचा शोर्ट ऑफ शोल्डर फ्रॉक घातला होता. ती चालत चालत निरंजनच्या रूम पर्यंत आली. रूमची बेल वाजवून वाट बघू लागली. नुकताच बाथरूम मध्ये गेलेल्या निरंजन ने बेल ऐकून बाहेर येऊन दार उघडलं. दारात नेहाला बघून तो काही क्षण बघतच राहिला. नेहा त्या सध्या ड्रेस मध्ये खूप आकर्षक दिसत होती. तो फक्त टॉवेल वर होता.
निरंजन- नेहा….ये..ये ना आत ये…
नेहा आत आल्यावर नजरेने नैनाला शोधू लागली. नैना न दिसल्यावर म्हणाली-
नेहा- नैना mam…
निरंजन- तिला अचानक जाव लागल. येणार आहे ती. आपण जाऊया वर डिनरला. बस तू मी आलोच.
इतक्यात त्याला बुकेची आठवण झाली. त्याने बुके नेहाला दिला आणि म्हणाला-
निरंजन- हा नैनाने दिला आहे. खास तुला.
नेहा- thanks….
आता दोघे एकमेकांसमोर जवळ उभे होते. मध्ये फक्त बुके होता. निरंजन नेहाला बघत होता. त्याच्या उघडा देह नेहाच्या मनात आणि शरीरावर रोमांच उभे करत होता. निरंजन ने बुके हळूच बाजूला ठेवला आणी नेहाला आपल्या मिठीत ओढली. नेहा त्याच्या मिठीत हरवली…विरघळू लागली. दोघे एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करू लागले. आता उभं राहून प्रेम करण अशक्य झालं. नेहा बेडवर आडवी झाली. निरंजन तिच्या अंगावर झोपला. इतक्यात त्याचा फोन वाजला. निरंजन भानावर आला. त्याने फोन बघितला. नैनाचा फोन होता.
निरंजन- ह…हेलो बोल नैना…
नैना- काय रे? नेहा आली का?
निरंजन टॉवेल नेसत म्हणाला-
निरंजन- ह..हो आली ना…ही काय माझ्या समोरच बसली आहे.
नेहा फ्रॉक सावरत उठून बसली. केस सारखे करू लागली.
नैना- तुझ्या समोर म्हणजे बाथरूम मध्ये?
हे बोलून नैना जोरात हसली. निरंजन चिडला.
निरंजन- हे..हे काय बोलते आहेस तू नैना आणि का?
नैना- अरे गंमत केली मी. मी निघाले तेव्हा तू बाथरूम मध्ये जाणार होतास ना? म्हणून म्हणाले मी. पण तू इतका edgy का झाला आहेस? Why cant you take a simple joke? काय प्रोब्लेम आहे निरंजन?
निरंजन- क…काही प्रॉब्लेम नाहीये. ठेऊ मी फोन?
नैना- ओके बाय. आणि हो रूम मध्ये दोघेच आहात. Don’t be naughty with that poor girl okay?
निरंजनची आता सटकली. पण नेहा समोर असल्याने तो काही बोलू शकला नाही.
निरंजन- बाय नैना…
निरंजन ने फोन कट करून बेडवर भिरकावून दिला. तो प्रचंड अस्वस्थ होता. नेहाच्या ते लक्षात आल.
नेहा- काय झाल?
निरंजन- ही नैना अशी का वागते आहे अचानक as if तिला काहीतरी माहित आहे…
हे ऐकून नेहा प्रचंड घाबरली. म्हणाली-
नेहा- मी जाते…प्लीज…
निरंजन ने तिचा हात धरला आणि म्हणाला-
निरंजन- नेहा..प्लीज यार. जातेस काय?
नेहा- नैना mam खरच खूप चांगल्या आहेत. त्यांना आपल्याबद्दल संशय जरी आला तरी त्या hurt होतील. So हे इथेच थांबवूया आणि तुम्ही दोघे युएस ला परत जा आणि मजेत जगा.
निरंजन- आणि तू? तू इथे मजेत असशील?
नेहा- माझं सोडा. प्लीज…माझी काळजी नका करू.
निरंजन- कशी नको करू मी तुझी काळजी? तू पण माझ्या बरोबर युएसला येते आहेस. मी तुझ्या visa ची व्यवस्था करतो. Priority appointment घेतो कोन्सुलेट मध्ये.
नेहा- नाही ते शक्य नाहीये आणि योग्यही नाहीये.
निरंजन- ते शक्य आहे आणि तेच योग्य पण आहे नेहा. ह्या जन्मात शिरप्या आणि यमी वेगळे होणार नाहीत. हा जन्म मिलनाचा आहे.
नेहा- प्लीज निरंजन…तुम्ही समजून घ्या. आपल्या मध्ये नियती आहे आणि ती आपल्याला कधीच भेटू देणार नाही. हेच गेल्या अनेक जन्मांच सत्य आहे. ते बदलण आपल्या हातात नाही. नियती समोर कोणाचही काही चालत नाही. प्लीज तुम्ही हट्ट करू नका. परत जा आणि नैना mam बरोबर संसार करा. मला विसरून जा.
निरंजन- ते शक्य नाहीये नेहा. कारण आता प्रश्न फक्त शिरप्या आणि यमीचा नाहीये तर निरंजन ला नेहा आणि नेहाला निरंजन आवडू लागल्याचा आहे.
नेहा- पण नैना mam तुमची बायको आहेत. त्यांच्यावर तुमच प्रेम नाहीये का?
निरंजन- नेहा मी हजारवेळा सांगून झालय तुला की नैना नैना आहे. तिचं माझ्या आयुष्यात असलेल स्थान, तिच्यावर असलेलं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. पण मी काय करू? मला अनेक जन्म सुरु असलेली आपली प्रेम कहाणी सुद्धा खुणावते, त्रास देते. माझी जन्मोजन्मीची प्रेयसी तुझ्या रूपात समोर उभी राहिल्यावर मी परत प्रेमात पडलो आहे तुझ्याही. मी तीन बायकांच्या प्रेमात आहे नेहा. त्या म्हणजे नैना, यमुना आणि तू….काय करू मी सांग?
नेहा- सगळ कळतय मला. माझा नवरा निशिकांत सारखा नसता तर कदाचित मी देखील तीन पुरुषांच्या प्रेमात असते. नवरा, श्री आणि तुम्ही. पण हे चूक आहे. हे आपण संपवूया. प्लीज.
निरंजन- ते शक्य नाहीये. Anyway मी आलो shower घेऊन. जेवायला जाऊ आणि जरा मोकळ्या हवेत बोलू.
निरंजन बाथरूम मध्ये गेला. नेहा कोचावर विचार करत बसली. शेजारीच नैनाने हौसेने ठेवलेला नैना आणि निरंजनचा फोटो तिला दिसला. तिने तो फोटो हातात घेतला. “किती सुंदर आणि सुखी दिसतात हे दोघ एकत्र!” असा विचार तिच्या मनात आला. तिने आपल्या रुमालाने तो फोटो पुसला. परत जागेवर ठेवला आणि उठून ती रूमच्या खिडकी जवळ उभी राहिली. खिडकीतून लांबवर दिसणारे गाड्यांच्या दिव्यांचे पुंजके बघत विचारांच्या वादळात हरवून गेली. इथे हॉटेलच्या लॉबी मध्ये बसलेल्या नैनाचे डोळे भरून आले. तिने त्या पुष्प गुच्छामागे टेबलावर लपवून ठेवलेल्या कॅमेराने टिपलेले सर्व क्षण तिला तिच्या मोबाईल मध्ये दिसत होते, ऐकू येत होते. नैना ने विषण्ण मनाने फोन बाजूला ठेवला. तिला आता अश्रू आवरण अशक्य झालं. ती उठून धावत लेडीज रूम मध्ये गेली. तिथे तोंडावर पाण्याचे हबके मारून त्याच्या आडोश्याला तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
इथे निरंजन आणि नेहा roof top रेस्तोरंत मध्ये पोहोचले. दोघेही फार बोलायच्या मूड मध्ये नव्हते. निरंजन ने रुटीन वाईन मागवली दोघांसाठी. दोघे शांत बसून मधोमध ठेवलेच्या कॅण्डलकडे बघत होते इतक्यात नैनाचा आवाज आला.
आवाज- हाय गाईज…
निरंजन आणि नेहा दोघांनी एकाच वेळी मागे वळून बघितलं. त्यांना हात दाखवत हसत असलेली नैना इतक्या लवकर परत आलेली बघून दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.
क्रमश:
भाग २८
निरंजन आणि नेहाला काय रिएक्त करायचं हे लक्षात यायच्या आधी नैना त्यांच्या समोर येऊन बसली देखील.
नैना- काय रे निरंजन wine मागवली असणार ना तू?
निरंजन- हो…येस…तुझ्यासाठी पण ऑर्डर करतो.
निरंजन ने नैना साठी पण wine ऑर्डर केली.
निरंजन- तू..इतक्या लवकर कशी…आय मीन…
नैना- का रे? मी आल्याचा आनंद झाला की तुम्हाला डिस्टर्ब केल त्याचा राग आला.
निरंजनला काय बोलाव ते न सुचल्याने त्याने नेहाकडे बघितल. नेहा खाली बघत बसली होती. इतक्यात wine आली. नैना ने एक ग्लास उचलून निरंजनला दिला. दुसरा नेहाला देऊन आपला ग्लास उचलून चियर्स म्हणाली. Wine चा एक घोट घेऊन सिगारेट शिलगावत नैना म्हणाली-
नैना- अरे निरंजन मी निघाले आणि वाटेतच शायराचा फोन आला. ती म्हणाली की अलीचे कझिन्स आले आहेत घरी अचानक. सो तुला out of place होईल. सो मी परत आले.
निरंजन- ओह ओके.
त्या नंतर कोणीच काहीच बोलत नव्हत. नैना मस्त सिगारेटचे झुरके घेत त्या दोघांकडे बघत होती. अचानक काहीतरी आठवल्यासारखी ती नेहाला म्हणाली-
नैना- नेहा तुझा पुनर्जन्म ह्या गोष्टीवर विश्वास आहे का?
हा अनपेक्षित प्रश्न ऐकून नेहा गडबडली. निरंजन ने नैनाला एक शार्प लूक दिला. निरंजन कडे दुर्लक्ष करून नैना म्हणाली-
नैना- ए नेहा बोल ना. आहे का तुझा विश्वास?
नेहा- न..नाही…तसा फार नाहीये.
नैना- तेच तर. पण हा निरंजन बघ. त्याचा विश्वास आहे. त्याला त्याच्या म्हणे गेल्या जन्मातले लोक, घटना वगैरे आठवतात. इतकंच नाही. त्याला तर त्याच गेल्या जन्मातल नाव पण आठवत. Can you beat that? ए निरंजन काय रे नाव होत तुझ गेल्या जन्मी?
निरंजन- नैना enough. तू का बोलते आहेस हे सर्व आत्ता? गरज आहे का त्याची?
नैना- गरज कशाचीच नाहीये निरंजन. पण मी आल्यावर तुम्ही दोघ अचानक इतके सिरीयस आणि शांत झालात की मला काहीतरी विषय काढून बोलण भाग पडलं. मी आल्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना झाला?
निरंजन- नैना बास आता…..
नैना- ओके. पण मला तुझं नाव आठवल आहे ते मला हिला सांगू दे. ए नेहा ह्याच गेल्या जन्मी नाव काय होत माहित्येय? शिरप्या.
हे बोलून नैना जोरात हसली. हसताना सिगारेटचा धूर घशात अडकून तिला खोकला आला. खोकून चेहरा लालबुंद झाला. निरंजन ने उठून तिला पाणी पाजल. ह्या सर्व प्रकारात दोन मिनिट गेली. नेहाला आता तिथे बसण मुश्कील होत होत. पण ती निघू शकत नव्हती. जरा आराम पडल्यावर नैना म्हणाली-
नैना- आणि ह्याच्या तेव्हाच्या गर्ल फ्रेंडच नाव यमुना. जी ह्या जन्मात मी आहे. काय रे निरंजन?
हे ऐकून नेहाने निरंजन ला एक shocked लूक दिला.
निरंजन- नैना प्लीज हा विषय थांबव.
नैना- come on निरंजन. नेहा परकी का आहे? आपलीच तर आहे. हो की नाही ग नेहा?
नेहा कसनुस हसली. मग अचानक सिरीयस चेहरा करून नैना म्हणाली-
नैना- निरंजन, आशुतोष गायतोंडे म्हणून एका इन्स्पेक्टरचा फोन आला होता मला.
हे ऐकून नेहाच्या हातातला wine चा ग्लास हातातातून सुटून खाली पडून फुटला. तिच्या मोतिया रंगाच्या फ्रॉक वर लाल wine चे डाग पडले.
नैना- काय ग नेहा? काय झालं? Are you all right?
नेहा- हो mam…ठीक आहे मी. आलेच…
अस म्हणून नेहा बाथरूम मध्ये गेली. निरंजन पण हादरला होता.
नैना- हिला काय झाल अचानक? इन्स्पेक्टर आशुतोष नाव ऐकून ती अशी घाबरली जशी तिला चोरी करताना त्या आशुतोष ने पकडली होती पूर्वी.
नैना परत हसली. निरंजनला म्हणाली-
नैना- तू ओळखतोस का इन्स्पेक्टर आशुतोषला?
निरंजन- क…कोण आशुतोष? मी कोणालाच ओळखत नाही. उगाच काय?
नैना- नक्की?
निरंजन- तू माझी उलट तपासणी घेते आहेस का?
नैना- अरे नाही. त्याचा काहीतरी गैर समाज झाला असावा मग.
निरंजन- गैरसमज? म्हणजे?
इतक्यात नेहा येऊन बसली.
नैना- गैरसमज म्हणजे तो म्हणत होता की काल गाडीत तू एकटा नव्हतास. बरोबर कोणीतरी बाई होती. तुम्ही पोलीस स्टेशनला पण गेलात म्हणून.
हे ऐकल्यावर नेहा आणी निरंजन जाम टेन्स झाले. सावरून घेत निरंजन म्हणाला-
निरंजन- पण हा जो कोणी इन्स्पेक्टर आहे त्याला तुझा नंबर कसा मिळाला? तुझा नंबर तर इथे इंडिया मध्ये hardly चार किंवा पाच लोकांकडे असेल.
नैना- true. मी पण तोच विचार करत आहे की त्याला माझा नंबर कसा काय मिळाला?
नैना- ह्म्म्म…पण मला सांग काल कोण बाई होती तुझ्या बरोबर आणि तू पोलीस स्टेशनला गेला होतास का?
आता काय उत्तर द्यायचं हे निरंजनला सुचत नव्हत.
निरंजन- छे…काहीही काय? कोण बाई? उगाच काय?
नैना- तेच तर. मी त्याला पण हेच म्हणाले की निरंजन एकटाच होता. त्याच्या गाडीचा accident झाला आणि लोकांनी बिचार्याला मारलं. तर मला म्हणतो कसा की मी खोट बोलतोय का? तुम्ही निरंजन समोर मला फोन लावा. मी बोलतो त्याच्याशी. मी म्हणाले ओके. फारच आगाऊ होता तो. एक काम करते. त्याला मी फोन लावते लगेच. तू बोल त्याच्याशी आणि चांगला सुनाव त्याला.
हे बोलून नैना ने फोन पर्स मधून बाहेर काढला. ते बघून नेहाला घाम फुटला. घामाचा ओघळ तिच्या पाठीवरून वाहात खाली गेलेला तिला जाणवला. न राहवून नेहा म्हणाली-
नेहा- नैना mam…काल ना actually मी होते ह्यांच्या बरोबर.
हे ऐकून निरंजनचा चेहरा पांढरा पडला. नैना आश्चर्य वाटल्याच भासवत म्हणाली-
नैना- काय सांगतेस नेहा? तू कशी ह्याच्या बरोबर? हा काहीच बोलला नाही मला.
नेहा- त्याच अस झालं की मिटींगला जाताना जे प्रेझेन्टेशन हव होत ते माझ्याकडे होत. म्हणून निरंजन नी मला बोलावून घेतलं. आम्ही दोघे गाडीत असताना तो अपघात झाला आणि नेमका इन्स्पेक्टर आशुतोष तिथे आला.
नैना- ओह…काय सांगतेस? काय रे निरंजन तू ह्यातलं काहीच बोलला नाहीस मला. चक्क खोट बोललास तू माझ्याशी? का?
निरंजनकडे ह्या का च उत्तर नव्हत.
नैना- बर मग पुढे?
नेहा- पुढे काही नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि….
नेहा थांबली. नैना अधीर होऊन म्हणाली-
नैना- आणी काय नेहा?
नेहा- पोलिसांनी ह्यांना वाटेत आणि तिथेही खूप मारलं.
नैनाने निरंजनकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.
नैना- निरंजन तुला पोलिसांनी मारलं? तू मला म्हणालास की तुला लोकांनी मारलं म्हणून? बर नेहा पुढे काय?
नेहा- पुढे काही नाही. त्याने आम्हाला सोडून दिल.
नैना- what? तुम्हाला एका अपघातासाठी घेऊन गेलेल्या पोलिसांनी तुम्हाला सोडून दिल? का?
नेहा- ते आम्हालाही माहित नाहीये.
नैना- पण ते मला माहित आहे.
आता निरंजन आणि नेहा तिच्याकडे शॉक होऊन बघू लागले.
नैना- तुम्ही दोघे तिथे असताना त्या आशुतोष ला कमिशनर ऑफिसातून फोन आला. तुम्हा दोघांना लगेच सोडून द्यायच्या ऑर्डर्स मिळाल्या. त्याला सस्पेंड पण केला आहे. बरोबर ना?
हे ऐकून निरंजन आणि नेहा आवाक झाले.
निरंजन- नैना हे…हे तुला कसं माहित?
नैना- निरंजन मला जे माहित आहे ना ते तुम्हा दोघांनाही माहित नाहीये. मी बायको आहे तुझी निरंजन. तुला पूर्ण ओळखते. तू खर बोलतो आहेस की खोट हे तुझ्या शब्दावरून नाही तुझ्या डोळ्यातून ओळखू शकते.
आता टेबल वर शांतता पसरली. नैना ने wine संपवून अजून एक ग्लास मागवला. शांतपणे सिगारेट शिलगावून ती म्हणाली-
नैना- निरंजन मला तुझ्या आणि नेहाबद्दल संशय सिंगापूर पासून आला होता. नेहा, मी तू निरंजनला पाठवलेला “मला हे सर्व योग्य वाटत नाही. सो प्लीज हे थांबवूया आपण.” हा मेसेज वाचला आणि माझी खात्री झाली की माझा संशय खरा आहे. अस काय सुरु आहे तुमच्यात जे तुला थांबवायचं होत नेहा?
नेहा काही बोलू शकली नाही. ती मान खाली घालून बसली होती.
नैना- मग मी माझ्या पद्धतीने तुझी सर्व माहिती मिळवली नेहा. अगदी निशिकांत बरोबर तुझ लग्न, तुमचं भांडण, तुमच current status, तुझी डिव्होर्स वकील आणि सगळी माहिती मिळाली मला.
हे एकून नेहा आणि निरंजन शॉक झाले.
नेहा- सो निरंजन तुला भेटायला जातोय हे मला माहित होत. मला त्याने वाटेत सोडल्यावर मी त्याचा पाठलाग केला. तुम्ही भेटलात, निघालात हे सर्व पाहिलं. मग माझी detective एजन्सी तुमच्या मागे असल्याची खात्री झाल्यावर मी पाठलाग सोडला आणि निघाले. इतक्यात मला detective एजन्सीचा फोन आला आणि त्यांनी accident बद्दल सांगितल. तुम्ही दोघे सेफ असल्याच पण सांगितल. मग तो आशुतोष आला आणि तुम्हाला घेऊन गेला हे पण मला माहित झालं. तुमच्या प्रत्येक मुव्हमेंट चे फोटो आहेत माझ्याकडे. तुम्हाला पोलिसांनी नेलय कळल्यावर मी भाग्यश्रीला फोन लावला. माझी इंडिया मधली मैत्रीण. तिचा नवरा cm चा सेक्रेटरी आहे. माझा फोन गेल्यावर तो पोलीस कमिशनरशी बोलला आणि त्यांनी आशुतोषला फोन करून तुम्हाला सोडायला सांगितल. माझ्या निरंजनच्या अंगाला हात लावणार्या त्या आशुतोषला मी सस्पेंड केला आहे. आणि आता त्याची बदली अश्या ठिकाणी होईल की तो पोलिसात का आलो म्हणून पस्तावेल. इतक प्रेम करते मी निरंजनवर.
नेहा आणि निरंजन मान खाली घालून प्रचंड चकित होऊन फक्त ऐकत होते.
नैना- आता बोला ना तुम्ही? काय झाल? बोलत का नाही?
दोघे गप्प होते. नैना ने सिगारेट समोरच्या ash tray मध्ये विझवली आणि म्हणाली-
नैना- आणि ही आजची तुमची भेट.
अस म्हणून नैनाने तिचा मोबाईल सुरु करून त्या दोघांच्या समोर ठेवला. त्यात त्या दोघांची आजची भेट शूट झालेली होती. निरंजन आणि नेहाला ते पाहून प्रचंड गिल्टी वाटू लागल. हॉटेलातील इतर लोक देखील ते बघत आहेत की काय ह्या भीतीने नेहाला तर मेल्याहून मेल्यासारखं होत होत. नैना एकीकडे बोलत होती.
नैना- मला बघायचं होत की तुमच्या दोघात नक्की काय सुरु आहे ते. म्हणून मी मुद्दाम तो बुके तुझ्यासाठी आणून ठेवला नेहा. त्याच्या मागे माझ्या detective एजन्सीने दिलेला कॅमेरा ठेवला आणि मी निघाले. मी कुठेही गेले नव्हते. खाली lobby मध्येच होते. रूम मध्ये सुरु असलेला तुमचा प्रेमाचा आविष्कार लाइव्ह बघत होते. सो निरंजन शिरप्या आहे आणि तू यमुना आहेस तर. इतके दिवस मला वाटत होत की मी यमुना आहे.
हे बोलून नैना जोरात हसली. हे असह्य झालेली नेहा ताडकन उभी राहिली आणि म्हणाली-
नेहा- नैना mam…प्लीज तुम्ही मला माफ करा. निरंजनचा ह्यात काही दोष नाहीये. ते तुमच्यावर अजूनही खूप प्रेम करतात. बघा तुम्ही ह्या व्हिडीओ मध्ये पण ते तेच म्हणाले आहेत. मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाते ह्या क्षणी. तुम्ही दोघे अमेरिकेत जा आणि मस्त आयुष्य जागा. प्लीज.
नैना- हे तू मला सांगते आहेस नेहा? लाज वाटते का तुला हे बोलायला? एका विवाहित पुरुषाशी संबंध ठेऊन वर आता त्याच्या बायकोला शिकवतेस काय करायचं आणि काय नाही ते? वा.
नेहाला अचानक खूप रडू फुटलं. नेहा तिथून निघून गेली. निरंजन तिला थांबवायला उठला. पण नैनाने त्याचा हात धरून त्याला थांबवला. नेहा लिफ्ट मधून बाहेर पडून लॉबी मधून धावत बाहेर आली. हॉटेलच्या मेन गेट मधून बाहेर पडून तिने रिक्षा पकडली. अनुच्या घरी येऊन रडत रडत बेडरूम मध्ये गेली आणि आपली bag भरू लागली. तिला बघून अनु म्हणाली-
अनु- काय ग नेहा. काय झाल? इतकी का रडते आहेस आणि कुठे निघालीस?
नेहा काही न बोलता रडत bag भरत होती.
अनु- ए मला सांग बघू आधी. काय झाल? निरंजन बरोबर भांडण झालं का?
नेहाने काहीही न बोलता bag lock केली.
नेहा- अनु प्लीज…मला जाऊ दे आता. काही विचारू नको प्लीज.
अनु- जाऊ दे? कुठे जाऊ दे? ते पण ह्या वेळी?
नेहा- प्लीज अनु. Let me go. मला थांबवलस तर मी जीवच काहीतरी बर वाईट करून घेईन. मला जाऊ दे.
अनु- पण कुठे जाणार तू?
नेहा- मला माहित्येय कुठे जायचं ते. बाय….
इतक बोलून नेहा तिची bag उचलून रात्रीच्या अंधारात निघून गेली. टेन्स असलेल्या अनु ने “नेहाच रक्षण कर” अस वर बघत देवाला सांगितल आणि दार लावून घेतलं.
नेहाने डोळे उघडले तेव्हा आरती नुकतीच संपली होती. सूर्याचे किरण गाभाऱ्यात शिरले होते. समोर गाभार्यात मयुरेश्वराची पिंड दिसत होती. तिच्यावर बेलांचा खच पडला होता आणि दुधाचा अभिषेक सुरु होता. घंटानाद आरती बरोबर थांबला होता. गावकरी ह्या नवीन मुलीला बघून चकित होत आपापल्या घराकडे निघून जात होते. शेवटी नेहा एकटी उरली. तिने डोळे मिटून मयुरेश्वराकडे प्रार्थना केली-
नेहा- देवा, आता हा जन्मोजन्मीचा प्रवास नको. मी इथेच तुमच्या पायाशी अन्नपाणी त्याग करून मरण स्वीकारणार आहे. मला शक्ती द्या. आणि मृत्यू नंतर मला मुक्ती द्या.
इतक्यात मागून आवाज आला.
आवाज- मुक्ती देव देत असला तरी त्या आधी नियतीने तिच्या फेऱ्यातून माणसला सोडण आवश्यक असतं आणि नियती तुला अशी सहज सोडणार नाहीये यमे.
हे ऐकून शॉक झालेल्या नेहाने मागे वळून बघितल. देवळाच्या दारात निरंजन आणि नैना उभे होते. त्यांना बघून नेहाला प्रचंड आश्चर्य वाटल. पुढे येत नैना म्हणाली-
नैना- ऐकलंस ना यामे? मुक्ती देव देत असला तरी त्या आधी नियतीने तिच्या फेऱ्यातून माणसला सोडण आवश्यक असतं आणि नियती तुला अशी सहज सोडणार नाहीये. निरंजन शिरप्या आणि तू यमी आहात ना? मग मला नाही का ओळखल तुम्ही?
नेहाने आश्चर्याने निरंजनकडे बघितलं.
नैना- काल तू निघून गेलीस. मी निरंजनशी बोलत राहिले. तुमचं आमच्या रूम मधलं शूट बघून मला निरंजनच माझ्यावर किती प्रेम आहे ह्याची खात्री पटली. तू सुद्धा का आणि कशी त्याच्या प्रेमात आहेस ह्याचा खुलासा झाला. आता जन्मजन्माच्या गाठी अश्या सहज सुटतात का? तुम्हा दोघांना मुक्ती एकत्र आल्यावरच मिळेल हे मला माहित आहे. पण इतके जन्म नियतीने ते घडू दिल नाहीये. मला तुला भेटायचं होत. आम्ही तुझ्या घरी गेली. तिथे अनु म्हणाली की तू निघून गेली आहेस. निरंजन म्हणाला त्याला माहित आहे तू कुठे असशील ते. मग आम्ही इथे आलो.
नेहा आवाक होऊन बघत होती. नैना पुढे म्हणाली-
नैना- मी काय विचारते आहे यमे? तू आणि ह्या शिरप्याने एकमेकांना ओळखल पण मला नाही ओळखल?
कन्फ्युज्ड नेहाने निरंजनकडे एक कटाक्ष टाकला. त्या ह्या चेहऱ्यावर स्मित होत. नेहा म्हणाली-
नेहा- न..नाही…आय मीन तुम्ही…?
नैना- मी आहे तुम्हा दोघांना प्रत्येक जन्मात दूर करणारी नियती.
हे ऐकून नेहाला सबंध देऊळ तिच्या भोवती गोलगोल फिरत असल्याचा भास झाला. नैना बोलत होती.
नैना- आणि ह्या जन्मात ह्या नियतीने तुम्हा दोघांना एकत्र आणून मोक्ष द्यायचा निर्णय घेतला आहे.
नेहा कन्फ्युज होऊन नैनाच्या चेहऱ्याकडे बघू लागली. नैना ने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाली-
नैना- नेहा, जर तू शिरप्या आणि निरंजन वर सारखंच प्रेम करू शकतेस. जर हा निरंजन माझ्यावर, यामीवर आणि तुझ्यावर देखील सारखं प्रेम करू शकतो तर मी तुझा स्वीकार का करू शकत नाही? मी नियती आहे. जर मी तुम्हाला इतके जन्म दूर ठेवत आले तर ह्या जन्मात तुमची कहाणी पूर्ण का करू शकत नाही. ह्या जन्मी मी पण जन्म घेतला आहे. कदाचित माझा जन्म तुम्हाला एकत्र आणण्यासाठीच झाला आहे.
नेहा- पण mam…
नैना- पण काही नाही. तू आमच्या बरोबर युएसला चल. आमच्या घरात रहा. माझी मैत्रीण आणि ह्या निरंजनची प्रेयसी म्हणून. माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर बन. मस्त मजा करू तिघे. मला मुल होतील. तुलाही होऊ देत. अमेरिकेत फालतू प्रश्न कोणी विचारत नाही. निरंजन म्हातारा होई पर्यंत आपण प्रत्येकी दहा मुलांना जन्म देऊ. काय म्हणतेस?
नेहाला काय बोलाव सुचत नव्हत. तिने देव्हार्यात बघितलं. पिडीवर वाहिलेल पांढर फूल खाली पडताना दिसलं. जणू तिला कौल मिळाला होता. नैना ने आपला हात पुढे केला. निरंजन ने त्यावर त्याचा हात ठेवला. नैनाने नेहाचा हात त्यांच्या हातात गुंफला. तिघांनी मयुरेश्वराला नमस्कार केला.
आता नेहा अमेरिकेत येऊन दोन वर्ष झाली. नैना जुळे मुलगे आहेत आणि नेहाला एका वर्षाच्या फरकाने झालेला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. मुलीच नाव यामिनी आणि मुलाच नाव श्री ठेवलं आहे. प्रत्येकी दोन मुल झाल्यावर दहा मुलांचा विचार नैना आणि नेहाने सोडून दिला आहे. त्यांचा बिझनेस वाढतो आहे. आज रविवार. मुल त्यांच्या बेबी सीटर बरोबर मजेत खेळत आहेत आणि आत बेडरूम मध्ये नेहा आणि नैना निरंजनला दमवत आहेत. आता नियतीच शिरप्या आणि यमिच्या कथेत सामील झाल्याने आकाशातून त्यांना बघत असलेला मयुरेश्वर त्यांना सुखी जीवन आणि मोक्षाचा आशीर्वाद देतो आहे.
समाप्त.
