विमान रन वे वरून ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर वेगाने धावू लागले. मोहित खिडकीतून बाहेर बघत होता. विमानाने हलकेच हवेत झेप घेतली. खिडकीच्या काचेतून मोहितला टुमदार गोवा आणि समुद्र दिसत होते. त्या अथांग समुद्राबरोबर त्याच्या मनात गोव्यातील गेल्या दीड वर्षाच्या वास्तव्याच्या अनेक कटुगोड आठवणी आणि त्या दरम्यान भेटलेले लोक होते. विमान हळूहळू आकाशात स्थिरावले. गोवा केव्हाच ढगांच्या खाली लपून गेले. पण आठवणी मात्र त्याच्या मनःपटलावर तश्याच ताज्या होत्या. अगदी काल रात्री सर्वांनी त्याला दिलेल्या हृदय फेअरवेल पर्यंतच्या आठवणी! साला पाच मर्डर आणि पंधरा हाफ मर्डर केलेला, एरवी तांबरलेल्या डोळ्यांच्या रान डुकरासारखा दिसणारा बेंजो भाई पण ढसाढसा रडला! त्याच्याबरोबर जे इतर रडले त्यात छत्तीस एन्काऊंटर केलेले एसीपी कांबळे उर्फ दबंग साहेब पण होते. त्या आठवणीने मोहितच्या निळ्या कोकणस्थी डोळ्यात पाणी येऊन ते त्याच्या गोऱ्या गालांवर ओघळल! त्याने हाताने डोळे पुसून गॉगल लावला आणि खिडकीतून विमानाच्या पंखांच्या हालचालीकडे बघितलं!

मोहीत लेले. श्रीमंत घरातील मुलगा. खानदानी गोरेपणा, आजोबांकडून मिळालेले वडिलोपार्जित निळे डोळे, सहा फूट उंची, खर्जातला आवाज, कुरळे केस ह्यांचा मेळ असलेलं प्रचंड आकर्षक व्यक्तिमत्व. अश्या व्यक्तिमत्वाला शोभेसा उमदा आणि दिलदार स्वभाव. शिक्षण संपल्यावर पाचेक वर्ष आयुष्यात मजा करून झाल्यावर तो जॉईंट फॅमिली बिझनेस मध्ये लक्ष देऊ लागला. झोकून काम करणे, आपल्या नॉलेजचा कंपनीला उपयोग करून देणे ह्यापालिकडे पैसा ही त्याची प्रायोरिटी कधीच राहिली नाही. सर्व स्टाफशी चांगली वागणूक, अडीअडचणीला स्वतःच्या खिशातून त्यांना आर्थिक मदत करणारा मोहित काही वर्षांत स्टाफचा सर्वात लाडका बॉस बनला.

बिझनेस एक्सपांशन हा त्याचा हातखंडा आणि आवडीचा विषय होता. अनेक नवनवीन कल्पना सुचवून त्या प्रत्यक्षात आणणे ही त्याची पॅशन होती. त्याने व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर गेल्या दहा वर्षांत कंपनीची पाच पट वाढ झाली होती. लेले टूल्स म्हणजे मोहित लेले अशी त्याची ओळख होती. खर तर लेले टूल्सची मोहित लेलेची कंपनी अशी ओळख तयार झाली होती. मोहितचे लवकर लग्न होऊन त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी होती. पांचेचाळिशीत असलेल्या मोहितची दोन्ही मुले कॉलेजला होती! बायको डॉक्टर असून तिची उत्तम प्रॅक्टिस होती!

व्यवसाय वाढत होता, मोहितच वय वाढत होत आणि त्याची जनमानसात, व्यावसायिक तसेच मीडिया मध्ये असलेली फेस ऑफ लेले टूल्स ही प्रतिमा वाढत होती. व्यवसाय वाढल्यावर त्याच मीडिया प्लॅनिंग बदललं. टीव्ही कमर्शियल, इव्हेंट्स, प्रेस पब्लिसिटी अनिवार्य झाली. शेवटी फॅमिली बिझनेस असल्याने मोहितच्या काकांची मुलं देखील त्याच व्यवसायात होती. भागीदार होती. पण मोहित इतकी प्रसिद्धी कोणालाच मिळत नव्हती. मोहित मार्केटिंग, प्रेस ह्याची स्ट्रॅटेजी आणि एक्झिक्युशन करत असे. सहाजिकच त्याचे फोटो आणि मुलाखती सर्वत्र छापून येत. त्यामुळे इतर भागीदार आणि विशेषतः त्यांच्या बायकांच्या पोटात दुखायला लागलं. मोहित सर्वत्र पुढेपुढे करतो अशी कुजबुज घरगुती कार्यक्रमात होऊ लागली.

एक दिवस सर्व भाऊ अर्थात पार्टनर्सची मिटिंग होती. त्या मिटिंग मध्ये आयुष्यात पहिल्यांदाच मोहितने सुचवलेले मीडिया प्लॅनिंग इतर पार्टनर्सनी मेजोरीटीने रिजेक्ट केले. मीडिया आणि मार्केटिंग एका बाहेरील एजन्सीला आउट सोर्स करायचा निर्णय घेऊन मोहितने एमआयडीसी मधील फॅक्टरी मध्ये लक्ष घालावे असे सुचवण्यात आले. ते मेजोरीटी डिसीजन असल्याने ते मान्य करण्यावाचून मोहितकडे काहीच पर्याय नव्हता. मुळात सुस्वभावी असलेल्या त्याला त्यात खरच काही वावग पण वाटलं नाही. तो रोज इमानदारीत वन वे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रवास करून तळोजाच्या एमआयडीसी मधल्या फॅक्टरी मध्ये जाऊ लागला. तिथेही काही दिवसात तो स्टाफ मध्ये लोकप्रिय झाला. तिथे असलेल्या मोहितच्या एका काझीनच्या मर्जीतील फॅक्टरी मॅनेजरने घेतलेले निर्णय स्टाफ मोहितने ओके केल्याशिवाय स्वीकारत नसे. त्यामुळे तो मॅनेजर आणि तो ज्याचं प्याद होता तो मोहितचा चुलत भाऊ सुरज लेले फार बेचैन होते!

आक मोहितच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस. मोहित, त्याची बायको मोहिनी, मुलं मिहिका आणि मानस एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवायला गेले होते. मस्त शांत वातावरण होत. एक गायक छान आवाजात जगजीच्या गझल गात होता. माहोल जमला होता. काराओके नाईट असल्याने ओपन माईक झाल्यावर कास्टमर्स देखील एकेक करून गायची हौस भागवून घेत होते. साडेतीन ग्लेनफिडीच नंतर रिलॅक्स झालेल्या मोहितने हातात माईक घेऊन मोहिनीकडे बघत “जब कोई बात बिगड जायें” गायला सुरुवात केली. रिझर्व्ह स्वभावाच्या मोहिनीला मोहितच्या स्वभाव आणि वागण्यातील इतर अनेक गोष्टींबरोबर प्रेमाचे हे असे सार्वजनिक प्रदर्शन अजिबात आवडत नसे! ती हे सहन न होऊन उठून रेस्टरूम गेली. मुलांना आईच्या तिरसट वागण्याची इतक्या वर्षांनी सवय असल्याने मुलं मस्त एन्जॉय करत होती.

मोहित मनापासून गात होता. आणि इथे टेबलावर त्याच्या सायलेंटवर ठेवलेल्या फोनवर त्याच्या कझीनचा व्हाट्सअप्प मेसेज आला होता. त्यात लिहिले होते “अप्पा आत्ताच हार्टफेलने गेले. घरी ये!”-©मंदार जोग

क्रमशः

ट्वेंटी थ्री- (दीर्घ कथा- भाग २ ©मंदार जोग)

……. मोहित मनापासून गात होता. आणि इथे टेबलावर त्याच्या सायलेंटवर ठेवलेल्या फोनवर त्याच्या कझीनचा व्हाट्सअप्प मेसेज आला होता. त्यात लिहिले होते “अप्पा आत्ताच हार्टफेलने गेले. घरी ये!” मानसने मेसेज वाचला आणि मोहितला हात केला. मोहितने येऊन मेसेज वाचला. त्याला प्रचंड धक्का बसला. सगळे घरी निघाले.

मोहितच्या घरापासून पन्नास किलोमीटर दूर मिरारोड मध्ये एका वन बीएचके भाड्याच्या फ्लॅट मध्ये राखी आणि तिच्या दारुड्या नवऱ्याचं भांडण सुरू होत. वादाचा विषय एकच नवरा तिच्यावर घेत असलेला संशय आणि त्या बदल्यात सतत मागत असलेले पैसे. राखी रेकी तसेच ऍक्युप्रेशर स्पेशालिस्ट होती. म्हणजे तीच विश्वजीतशी लव्ह मॅरेज झालं तेव्हा ती फक्त विश्वजितवर जळणाऱ्या लोकांची संख्या काही लाखांवर नेऊन ठेवणारी एक बारावी पास सुंदर मुलगी होती. पण नव्याची नवलाई काही वर्षात संपली. ती संपेपर्यंत तिच्या पदरात एक मुलगा आला होता. विश्वजित फुटकळ उद्योग करून फार काही कमावत नसे. बारीक सारीक कर्ज केली होती. दारू आणि डान्स बार नामक व्यसन लागलं होत. त्यात मुंबईतील वडिलोपार्जित घर आणि राखीच्या वडिलांनी दिलेले सर्व दागिने फुकून झाले. मुलगा लहान असल्याने राखी विश्वजीतला सोडून कुठे जाऊ पण शकत नव्हती. मग मुंबईच्या बाहेत मीरारोड, भाईंदर, नायगाव अश्या ठिकाणी भाड्याच्या जागेत विंचवासारखा पाठीवर बिर्हाड घेऊन संसार सुरु झाला. पण पैसे कमावणे, मुलाचे शिक्षण अनिवार्य असल्याने राखीने एका मैत्रिणीच्या ओळखीतून रेकी तसेच अक्यू प्रेशर असे कोर्स केले होते. त्यातून तिला उत्तम पैसे मिळत असत पण विश्वजीत बहुतेक पैसे लुबाडत असे. त्यासाठी शिव्या आणि मारहाण ठरलेली होती. मुलगा आता बारावी झाला होता. त्याचाही कल बापाकडे होता. हल्ली तो बापाचं ऐकून राखीला बिनधास्त बोलत असे. चाळीशीची असून सहज तिशीची दिसणारी राखी कातावली होती.

मोहित काकांच्या घरी आला. लेले टूल्स चे शेवटचे फाउंडर त्याच्या समोर निचेष्ट पडले होते. त्याला लहानपणीपासून काकांबरोबर घालवलेले अनेक दिवस, क्षण आठवून डोळ्यात पाणी आलं. काका कृतार्थ जीवन जगून शांत चेहर्याने दुसर्या जगात निघून गेले होते. सगळे विधी करून घरी यायला मोहीतला पहाट झाली. फक्त देह नाही तर काकांबरोबर एक पर्व चितेत दहन करून खूप रित्या मानाने तो घरी आला होता. आणि पहाट म्हणजे साधारण सहा वाजले असतील सकाळचे. रात्रभराच्या जागरणाने थोडी ऍसिडिटी झाली होती. तो घरी पोहोचला तेव्हा मोहिनीचा योगा जस्ट संपला होता. मोहितने तिला थोडा आलं लिंबाचा रस द्यायला सांगितला. त्यावर “झेपत नाही तर प्यायची कशाला? मुलांचा वाढदिवस असो की काका गेलेले असो. प्यायची संधी सोडायची नाही. मग ऍसिडिटी होते, वजन वाढलं अश्या तक्रारी करत बसायचं. मी हजारदा सांगितलं की संगत सुधार. पण नाही. तेच शाळेपासूनच मित्र. जरा स्टेटस बघ तुझं आणि त्यांचं. माझ्या भावाचं उदाहरण देते मी नेहमी ते उगाच नाही. निर्व्यसनी आणि आपल्या तोलामोलाच्या लोकात रमणारा आहे तो. मी का देऊ आलं लिंबाचा रस? जो करेल तोच भरेल. तूच घे बनवून. फ्रीजमध्ये आहे बाटली!” अशी गरळ ओकून, त्याच्या मानसिक स्थितीची जराही कदर न करता मोहिनी जॉगिंगला निघून गेली. आणि हो तिच्या ज्या भावाचं उदाहरण ती देत होती तो मोहीतनेच आपले वजन खर्च करून लावलेल्या एका नोकरीत गेली अनेक वर्ष त्याच पदावर नोकरी करत होता. मोहीतचा महिन्याचा पेट्रोलचा खर्च त्याच्या पगाराच्या दुप्पट होता. निर्व्यसनी असणे हि त्याची आवड नाही तर आर्थिक अगतिकता होती असं मोहीतच स्पष्ट मत होत. मोहिनीच्या ह्या इगोइस्टीक आणि विक्षिप्त वागण्याची सवय असलेला मोहित उठला. आलं लिंबाचा रस पिऊन बेडरूम मध्ये येऊन पडला. त्याला झोप लागली आणि त्याचा काकांचा मुलगा सुरजचा मेसेज होता. “आज दोन वाजता मिटिंग आहे. भेटूया.”

सकाळचे सात वाजले. शक्ती अण्णाला झोप अनावर झाली होती. त्याने स्टाफला सूचना दिल्या आणि तो आपल्या स्कुटरला किक मारून निघाला. वय चाळीसच्या पुढेमागे. डोक्याला अर्धे टक्कल. कपाळावर, सोनेरी चष्म्याच्या फ्रेमच्या वर लाल कुंकू लावलेलं. नेहमी पांढरी पँट, पांढर्या चपला आणि त्यावर पांढरा शर्ट असा पोशाख. चेहर्यावर सतत हसू. त्याच्या मातृभाषे व्यतिरिक्त साऊथ इंडियन अक्सेंट मिश्रित हिंदी, इंग्रजी, मराठी आणि इतकी वर्ष गोव्यात राहून कोकणी अश्या भाषा अण्णा बोलू शकत असे.

अन्नाने पंधरा वर्ष गोव्यात काढली असली तरी अजूनही तेथील काही लोकल लोकांना तो परप्रांतीय वाटत असे. अन्नाची त्याला काहीच हरकत नव्हती. तो तरी स्वतःला कुठे गोवन समाजात होता? मंगलोर जवळ असलेल्या आपल्या गावी असलेल्या आईवर त्याची श्रद्धा होती. रोज दुपारी उठल्यावर दीड क्वार्टर आरसी पोटात ढकलायच्याआधी तो आईला फोन करत असे. बायको सरकारी नोकरीत होती. शाळेत जाणारी दोन लहान मुलं होती. सरकारी आणि शाश्वत नोकरीमुळे बायको गोव्यात येऊन सेटल होऊ शकत नव्हती. मग अन्नाचं दोनेक महिन्यातून एकदा गावाला जाऊन नवरा असल्याचा हक्क बजावून येई. आणि मग बाकी दिवस गोव्यात दिसणाऱ्या फिरंग आणि तोकड्या होत पँट घातलेल्या आहेकी भारतीय टुरिस्टना बघत गरम उच्छवास सोडत असे.

पण अण्णा मनाचा चांगला होता. कधीच त्याने एकाही बाईची छेद काढली नाही. किंवा वाईट बोलला नाही. त्याच दुःख त्याच्याजवळ. तरतीनेक महिन्यांपूर्वी समोरच्या त्यांच्या प्लॉटवर स्थानिक लोकांनी कचरा कुंडी सुरु केली. आता स्थनिकांचा विरोध कसा करणार म्हणून अण्णांने एक क्लुप्ती लढवली. त्या प्लॉटवर साईबाबांच्या एका मूर्तीची स्थापना केली आणि बाजूला एक क्रॉस पण लावला. रोज त्यांना फुल अर्पण करू लागला. आपोआप तिथे कचरा येणं बंद झालं. अन्नाने स्कुटर त्या मूर्तीजवळ थांबवली. हातात असलेली फुल घेऊन तो मूर्तीकडे निघाला. इतक्यात मागून कोणीतरी त्याला धक्का दिला. अण्णा रस्त्यावर आडवा पडला. तोंडावर रुमाल बांधलेले तिघे होते. त्यातील एकाने मागे पॅण्टमध्ये खोचलेला कोयता काढला. “मेरा सुपारी देता है मदरचोद?” असे म्हणत अन्नाच्या डाव्या पायावर कोयत्याचा वार करून तिघे पळून गेले. अण्णा वेदनेने कळवळत होता!

इथे मीरारोडला विश्वजीत राखीने संडासाच्या टाकीत लपवलेले, महिन्याच्या घर खर्चाचे पैसे घेऊन दारू ढोसायला निघून गेला होता. त्यांचा मुलगा बेडरूम मध्ये एसी लावून शांत झोपला होता. भिंतीवर आपटल्याने काळंनिळं झालेलं डोकं हातात धरून एक हात जोरात बसलेल्या लाथांनी दुखत असलेल्या पोटावर दाबून धरत राखी गुरासारखी ओरडत होती. @ मंदार जोग

क्रमशः

ट्वेंटी थ्री (भाग 3- ©मंदार जोग)

एकोणीसशे एकोणसत्तर आणि सत्तर साली नेपियन सी रोड वरच्या खानदानी बंगल्यात जन्म झालेल्या त्या दोघींची नाव आई वडिलांनी अंबा आणि अंबालिका अशी ठेवली होती. पण त्याचं ह्या जगात यायचं टायमिंग चुकलं होतं! पंचाहत्तर साली लहानश्या आजाराने वडील अचानक गेले! व्यवसायात काहीच कळत नसलेल्या आईकडून त्यांच्याच काकाने पाचेक वर्षात व्यवसायाची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याच बरोबर आईने जे अनेक पेपर्स विश्वासाने साइन केले त्यात बंगलाही नकळत काकांच्या नावावर केला! मग जवळजवळ काकाच्या गुलामीत उतरणीच्या वयातील आई आणि वयात येणाऱ्या मुली राहू लागल्या! आई अगतिक पणे स्वतःवर आणि मुलींवर होणारे अत्याचार बघत ह्यातून सुटका कधी होईल ह्याचा विचार करत नशिबाला दोष देत राहिली!

ह्या दोघी वयात आल्यावर जेमतेम मार्क मिळवून किरकोळ कॉलेज मध्ये जाऊ लागल्या! अंबा आक्रमक, अविचारी आणि रिबेलस तर अंबालिका फारशी न बोलणारी पण विचार करणारी. अंबाला रॉनीच्या रूपाने एक बॉयफ्रेंड भेटला. रॉनी कुठल्यातरी गँगशी अटॅच असल्याने कॉलेज मध्ये खिशात चाकू ठेऊन फिरत असे. हुशार अंबालिकाला त्याच्या रुपात सुटकेचा मार्ग दिसला! तो तिने अंबाला सांगितला! मग मढ आयलंड मधील एका चादर बदलू हॉटेलात रॉनीला खुश केल्यावर त्याच धुंदकीत असलेल्या रॉनीला अंबाने आपल्या काकांची कहाणी सांगून मुक्तीची याचना केली! रागाने लाल झालेला रॉनी तयार झाला!

त्या रात्री अंबालिकाने काकाला खुश करत खूप दारू पाजली. काका पूर्ण नशेत गेल्यावर रात्री उशीरा अंबाने रॉनीसाठी बंगल्याचे दार उघडले. रॉनीने काकांच्या मानेवर धारदार सुरा अलगद फिरवत एक राक्षस संपवला! बंगल्याच्या मागच्या बागेत दहा फूट खोल पुरलेल्या काकांच्या देहावर आज एक वडाचा वृक्ष उभा आहे. काका कुठे गेला हे जगाला पडलेलं कोड कधीच सुटलं नाही! काकाने बराचसा पैसा आणि धंदा संपवला होता! एकमेव आधार असलेला रॉनी एन्काऊंटर मध्ये अचानक मारला गेला! पोरीचं कॉलेज संपून दोन वर्षे झाली होती! आईने जावई शोध सुरू केला! अंबा ला लग्न अजिबात करायचं नव्हतं. अंबालिका ने आईने शोधलेल्या चिराग नामक शेयर दलालाशी लग्न केलं. अंबा ने बंगल्यातच आपलं पार्लर थाटल. काही वर्षे जेमतेम शांत गेली आणि चिरागभाई ने त्याच्या वंशाला अंबालिका दिवा देऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यावर भरपूर पैसे देऊन तिच्याशी काडीमोड घेतला. अंबालिका परत आली! एका पार्लरवर तिघींचा उदरनिर्वाह, त्यात आता आईच्या तब्बेतीच्या तक्रारी, तिची औषध आणि त्या प्रचंड बंगल्याचा मेंटेनन्स कठीण होऊ लागला. ह्या दोघींचीही आता चाळीशी उलटली होती. मग निर्णय झाला. एका डेव्हलपरला बंगला विकून काही कोटींची पूंजी इन्व्हेस्ट करून त्या व्याजावर मजेत जगू लागल्या! पण आयुष्यात फक्त दुःख, यातना देणाऱ्या ह्या शहरात त्यांचं मन लागत नव्हतं! निदान चाळीशी नंतर तरी आयुष्य मजेत जगावं ह्या विचाराने त्यांनी जीवाचा गोवा करायचा निर्णय घेतला! तिघी एक दिवस सकाळची फ्लाईट पकडून नेसल्या कपड्यानिशी हातात फक्त करोडोच्या इन्व्हेस्टमेंट चे पेपर्स असलेली बॅग घेऊन दाबोलीम एअरपोर्टवर उतरल्या! तोकडे कपडे, चेहऱ्यावर मेकअपचे थर, डोळ्यावर अवाढव्य गॉगल आणि हातात बेंसन लाईटचे पाकीट अश्या अवतारात म्हातारीला बरोबर घेऊन त्या इस्टेट एजंटच्या ऑफिसला निघाल्या!

वसंतचा जन्म गिरगावच्या खेतवाडी चौदाव्या गल्लीतला. गिरगावकर म्हणजे शोले मधल्या “होश संभालतेही अपने पैरों पे खडा” होणारा, दुनियादारी जन्मतः शिकलेला माणूस. त्यात वसंत म्हणजे जुगाडू डोक्याचा. कॉलेज मध्ये जिच्याशी जमलं तिच्याशी लगेच लग्न केलं. सरकारी बँकेत नोकरी. त्याला गण्या वाजवण्याची भयंकर आवड. फावल्या वेळात ऑर्केस्ट्रा मध्ये गाणी गायचा, काही वाद्य वाजवायचा. भरपूर इन्व्हेस्टमेंट करून हाताशी पैसा धरून होता. त्याच्या चाळीशीत पोरांचं शालेय शिक्षण संपल. त्याचाही रुटीन मधला इंटरेस्ट संपला. मग एक दिवस गोव्यात एक प्लॉट घेतला. व्हीआरेस घेऊन सरकारी घबाड आणि पेन्शन नावावर करून गोव्याला गेला. तिथे आपल्या प्लॉटवर लहानसे घर आणि आउट हाऊस बांधले. मुंबईची जागा सोन्याच्या भावात विकून सहकुटुंब गोएकर झाला! पेन्शन, व्याज ह्याच बरोबर आउट हाऊस फिरंग लोकांना भाड्यावर देऊन लय पैसे कमवत मज्जानी लाईफ तो जगत होता. काही वर्षांत मुलीचे लग्न लावून दिले. पन्नासाव्या वर्षी आजोबा झाला. मुलगा गोव्यात रियल इस्टेटचा धंदा करत सेटल होता आणि वसंत आपला गायनाचा छंद जोपासत रोज रात्री काराओके हॉटेलात जाऊन दोन पेग आरसी ग्लासात अर्धी ओतून त्याचे चार पेग करून पीत चार तास मनसोक्त गाणी गात होता!

काळ पुढे सरकत होता. अनेक वेगवेगळ्या पात्रांना दुनियेच्या रंगमंचावर वेगवेगळ्या रुपात, विविध ठिकाणी नाचवत असलेल्या विधात्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवत होती! तो आपल्या ह्या पात्रांच्या नाटकाचा नवा अंक लिहीत होता. अजून काही पात्र बाकी होती. पण रंगमंच ठरला होता. त्याच नाव होतं ट्वेन्टी थ्री! पडदा लवकरच वर जाणार होता!-©मंदार जोग

क्रमश:

ट्वेंटी थ्री (भाग – 4 © मंदार जोग)

ट्वेंटी थ्री! म्हणजे तेवीस. दिवसातील तेवीस तास सुरू असलेले रेस्टोरण्ट म्हणून त्याचे नाव ट्वेंटी थ्री असे लोकांना वाटायचे. पण खरं कारण शकुरला माहीत होतं. सॉरी शकुर शेठ ला. रात्रीचे साडे अकरा वाजले असतील. समोर ठेवलेली तंदुरी आणि फ्रेश लाईम सॉल्टड कडे बघत आपल्याच हॉटेलात काराओके ऐकत एका टेबलावर शांत बसलेल्या साठ वर्षांच्या शकुर शेठला भूतकाळ आठवत होता. फाळणीनंतर त्याचा बाप लाहोरवरून भारतात आला. कारण शकुरची आई हिंदू होती. कुठेच काहीच नसलेल्या माजिदने कोकणात असलेल्या मामुजानच्या सल्ल्यानुसार गोवा नावाची सेफ जागा राहायला निवडली. मजीद, बायको आणि दोन मुलं शकुर आणि सादीया गोव्यात एका मुस्लिम शेतकऱ्याच्या शेतावर राबू लागले. जमिनीत काम करतानाच शकुरला जमिनीचा लळा लागला. जमिनीत पुरलेला पैसा आणि त्याची प्रचंड ताकद हळूहळू तारुण्यात प्रवेश करणाऱ्या शकुरच्या लक्षात येऊ लागली होती. गोव्यात अनेक स्थित्यंतर होत होती. शकुरने लँड डिलिंगचा धंदा सुरू केला!

जमिनीच्या दलदलीत मिळणारा पैसा तो जमिनीतच घालू लागला. मग जमीन मिळवून तिथे एसके प्रॉपर्टी असा बोर्ड लावायचं त्याला व्यसनच जडलं. मग कधी खोटे कागद बनवून, कधी बळजबरीने तर कधी एखाद्या गराजूला पिळून त्याने एसके प्रॉपर्टीजचा विजयरथ सुरूच ठेवला. पण त्याने नाडलेल्या कोणाची तरी हाय लागली असावी. एका साथीच्या रोगात त्याचे आई, वडील आणि सादीया पंधरा दिवसांच्या अंतराने गेले. त्यानंतर हाय खाल्लेल्या शकुरने एक गुंठाही जमीन विकत घेतली नाही. पण आधी घेतलेली जमीन इतकी होती की ती मिळवताना सुरुवातीला शकुरचा शकुर भाय आणि सातबाराऱ्यांची फाईल त्याच्या शरीरा इतकीच लठ्ठ झाल्यावर शकुर भाय चा शकुर शेठ कधी झाला ते त्यालाच कळलं नव्हतं!

तोवर लग्न होऊन तीन मुलं झालेल्या शकुरने जमिनीत पुरलेला पैसा जमिनीतच वाढवायचा प्लान बनवला. गोवा टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारूपाला येत होतं. प्रचंड थंडीत “स्वस्त” म्हणून गोव्यात येऊन राहणारे भिकारड्या रशियन हिप्पी लोकांव्यतिरिक्त इतर अनेक देशातील पर्यटक तसेच भारताच्या कानाकोपर्यातील देशी लोक देखील गोव्याला बीचवर उंडारत दारू ढोसायला गोव्यात येऊ लागले होते. काळाची पावलं ओळखून शकुरने तीन मोक्याच्या जागांवर रिसॉर्ट बांधले तसेच चार रेस्टोरण्ट सुरू केली. ट्वेंटी थ्री त्यापैकीच एक! शकुरला जमिनीच्या व्यवहारात लागलेली हाय अजूनही न सुटल्याची सल होती. त्याचा मोठा मुलगा गावातील एका पोरीच्या प्रेमात पडून तिच्या भावाच्या नादाने कायमचा अबुधाबीला स्थाईक झाला होता. तो त्याच्या बेगम, मुलं, नोकरी आणि संसारात खुश होता. त्याने गोवा, शकुर, त्याची करोडोची इस्टेट ह्यावर प्रेमाखातर पाणी सोडलं होत. आणि दुसरा मुलगा फरीद ड्रग्सच्या आहारी गेला होता. ड्रॅगच्या नशेत तो करत असलेली लफडी, मारामाऱ्या, बीएमडब्ल्यू गाडी ठोकून त्याने केलेले अपघात निस्तारताना शकुरचे खूप पैसे आणि सामाजिक वजन खर्च होत होतं!

सर्व रिसॉर्ट, रेस्टोरण्ट उत्तम सुरू होती. पैसा पाण्यासारखा वाहात शकुर शेठच्या ओथंबून वाहणाऱ्या तिजोऱ्या रोज आणखी भरत होता. पण शकुर नंतर आपण पोरके होणार का ह्या चिंतेने सगळी रिसॉर्ट आणि रेस्टोरण्ट चिंताग्रस्त होती. हे सत्य फक्त शकुर जाणत होता. आणि अजून एक हुशार माणूस ही प्रचंड संधी हेरून होता! तो माणूस म्हणजे आपल्या शक्ती अण्णाला ट्वेंटी थ्रीची जबाबदारी देणारा त्याचा चुलत भाऊ रंगा अण्णा. तो शकुर शेठ ची दोन रिसॉर्ट आणि तीन रेस्टोरण्ट कॉन्ट्रॅक्टवर चालवत असे! त्याने आपल्या ओळख, नात्यातील शक्ती अण्णासारखी गरजू आणि इमानदार लोक मॅनेजर म्हणून बसवली होती. स्टाफ पण त्याच्याच गावचा आणि गोतावळ्यातला होता. एक दिवस शकुर शेठची जायदाद आपली करून आपणही रंगा शेठ व्हायचं ही सुप्त इच्छा मनात बाळगून असलेला बेरकी धंदेवाईक रंगा!

शकुर तंद्रीत हरवून तंदूरी चिवडत होता. त्याला त्या अवस्थेत बघून त्याच्या डोक्यात काय वादळ सुरू आहे ह्याचा अंदाज आल्याने रंगा त्याच्या शेजारी येऊन बसला.

रंगा- क्या सेट तुम कायकू टेंसन लेता? ए रंगा है ना. मै सब संभालेग. आप आराम करो. ए तंबी एक पापलेट फ्राय लाव सेठ के लिए!

शकुर- तू है रे अन्ना! लेकीन फरीद धंदे पे कभी बैठेगा क्या मालूम! मेरे जाने से पहले उसे सब सिखाना है!

ते ऐकून रंगा मनातल्या मनात चरफडला. उगाच पापलेट ऑफर केलं अस वाटून आणखी वैतागला. आधीच हा एक तंदुरी आणि फ्रेश लाईम फुकट पितो आहे ह्याचा त्याला राग आला. इतक्यात शकुरला पोलीस स्टेशन मधून फोन आला की फरीदने परत काहीतरी राडा केला आहे! शकुरच्या डोळ्यात राग उतरला! “हरामखोर” इतकच बोलून शकुर निघाला! त्याला त्रासलेला बघून रंगा खुश झाला! इतक्यात काराओके गायला एक काळीसावळी पण परफेक्ट मापात असलेली, ओल्ड मॉंक विथ सुरमई सारखी आकर्षक वाटणारी वीशीतली मुलगी “रात बाकी बात बाकी” गाणं गाऊ लागली! इतकावेळ ट्वेन्टी थ्रीला आलेली मरगळ क्षणात नाहीशी झाली! रात्री बारा वाजता ट्वेन्टी थ्री शेकडो लोकांसह थिरकू लागलं! रंगाने एका वेटरला बोलावून विचारलं की ही कोण आहे? टुरिस्ट आहे का? वेटर म्हणाला माहीत नाही. एकटीच आहे! ते ऐकून रंगाने एक ओल्ड मॉंक विथ सुरमई मागवली आणि गोल्ड फ्लेक शिलगवून तो तीच गाणं “बघू” लागला!

ट्वेन्टी थ्री – भाग – ५ (©मंदार जोग)

सुरज लेले ने ‘लेले टूल्स’ मधून बेदखल केल्यावर मोहित घरी प्रेम आणि आधार शोधत होता. पण मोहिनीच्या कुजकट आणि टोमणे मिश्रित बोलण्याने तो आणखी निराश होत होता. कौशल्य असूनही संधी मिळत नव्हती. कोणीही नोकरीला ठेवत नव्हतं. मोहिनीच्या पैशांवर घर चालत होत! त्याच काळात त्याचा एक मित्र अनेक दिवसांनी भेटला. त्या मित्राचा ऑर्केस्ट्रा होता, तो नाटक निर्माता होता, सिनेमाचं प्रॉडक्शन आऊटसोर्स करायचा अबी अश्या अनेक धडपडी करायचा. त्याने वेळ जाण्यासाठी मोहितला ऑर्केस्ट्राचे सूत्र संचालन करायची कल्पना सुचवली. तीन महिने घरी बसून कावलेल्या मोहितला ती कल्पना आवडली. तो नियमित सूत्रसंचालन करू लागला. त्यातून मिळणारी किरकोळ नाईट त्याला काहीतरी कमावत असल्याचं समाधान देत होती आणि त्या बरोबरच मोहिनीला ओकण्यासाठी गरळ पुरवत होती! मग निवेदनाबरोबर तो गाऊही लागला, काहीतरी परफॉर्म करू लागला.

एका रात्री घरी आल्यावर मोहिनी त्याला अपमानकारक बोलली. आज मोहिनीच्या तोंडाला जणू कुत्रे बांधले होते. मोहिनी बोलत होती आणि मोहित मनातील राग ओल्ड मॉंक मध्ये बुडवत ऐकून घेत होता. पण एक क्षण आला जेव्हा मोहितसारख्या शांत माणसाचा तोल गेला. तो ताडकन उठून जोरात ओरडत मोहिनीला म्हणाला ” आज माझी जी काही इस्टेट आहे ती सगळी, ह्या घरासकट उद्या तुझ्या नावावर करून मी निघून जाणार आहे. तुझ्या आणि मुलांच्या खर्चाला पुरतील इतके पैसे दर महिन्याला पाठवेन. पण आपला संबंध संपला!”

दुसऱ्या दिवशी मोहितने वकिलांच्याया करवी त्याचे सर्वस्व मोहिनीच्या नावे केले. ऑर्केस्ट्रावाल्या मित्राला म्हणाला की मला ह्या शहरात पण राहायचे नाही. मग त्या मित्राने ट्वेन्टी थ्री चा मॅनेजर असलेल्या त्याच्या मित्राला म्हणजे शक्ती अण्णाला फोन लावला. अण्णा म्हणाला आमच्या हॉटेलात निवेदक कम गायक कम काराओके जॉकीची एक जागा आहे. रात्रीचे जेवण आणि दारू फुकट असेल. पगार साठ हजार! मोहित त्याच रात्रीच्या लेट नाईट फ्लाईटने गोव्यात दाखल झाला. अन्नाच्या ओळखीने एका भाड्याच्या खोलीत व्यवस्था झाली!

आज मोहित पहिल्यांदा ट्वेन्टी थ्री मध्ये आला. रेस्टोरण्ट हळू हळू भरत होत. अन्नाने जुजबी माहिती दिली. मोहितचा शो सुरू झाला. एकामागे एक रिक्वेस्ट येत होत्या. मोहित ट्रॅक लावत होता. हौशे नौशे टुरिस्ट येऊन गळा साफ करत होते. इतक्यात ट्वेन्टी थ्रीच्या दारातून फुलाफुलांचा शॉर्ट स्पॅगिती फ्रॉक घातलेल्या राखीने एंट्री घेतली. डीजे कंसोल मध्ये अंधारात बसलेल्या मोहितला फक्त तिचे ताशीव, घट्ट, गव्हाळ रंगाचे पाय दिसले. त्याने डोळ्यासमोर असलेला बोर्ड दूर करून नीट बघितलं तर त्याला शिसवी शरीराची अख्खी राखी दिसली! ती येऊन पहिल्याच टेबलवर बसली. तिने न मागवता वेटरने किंग्सची पाईंट तिच्यासमोर आणून ठेवली. तिने बेंसन लाईट शिलागवली आणि उजव्या हातावर हनुवटी रेलून ती समोर गात असलेल्या एका ढेरपोट्या, हनिमूनला आलेल्या गुज्जूभाय कडे रोखून बघू लागली. तस बसताना तिने नेमकी बियरची पाईन्ट मागपासून मोहित ज्यात सखोल बुडाला होता त्या तिच्या तुकतुकीत क्लीव्हेज समोर ठेवली आणि मोहित त्या व्यत्ययाने भानावर आला!

हळू हळू बार पूर्ण भरला. मोहितची राखीत रुतलेली नजर अजिबात हलत नव्हती. तिला त्याची कल्पनाही नव्हती. तिचे तीनेक पाईंट झाले होते. इतक्यात वेटरने येऊन “राखी मॅडम ने सलाम ए इष्क लगाने को बोला है” अशी फर्माईश सांगितली. ही राखी कोण विचारल्यावर वेटरने समोर बसलेल्या राखीकडे बोट दाखवलं. मोहितने बाकी सर्व रिक्वेस्ट बाजूला सारत पुढला ट्रॅक सलाम ए इष्क सिक्वेन्स केला. ट्रॅक सुरू झाल्यावर राखी नजाकतीने चालत स्टेजवर आली. “ईश्कवालों से न पुछो उनकी रात का आलम” असा सूर तिने डोळे मिटून धरला आणि मोहित तिच्या आवाजाच्या प्रेमात पडला. गाणं सुरू होत. राखी बेभान होऊन डोळे मिटून गात होती. त्यातल्या दुसऱ्या अंताऱ्याच प्रिल्युड म्युझिक झाल्यावर “इसके आगे की अब दासतां मुझसे सुन” हे बोल पुरुषाच्या आवाजात ऐकू आल्यावर राखीने डोळे उघडून मागे बघितलं. मागे सहा फूट उंचीचा, गोरा, निळ्या डोळ्यांचा, कुरळ्या केसांचा मोहित ते कडवं गात होता. दोघांची नजरानजर झाली. स्माईल एक्स्चेंज झाली. गाणं तुफान रंगल. वन्स मोअर मिळाला. दोघांनी परत दोन कडवी म्हटली.

गाणं झाल्यावर राखी जागेवर जाऊन बसली. मोहित त्याच्या कंसोल मध्ये आला. त्याची नजर आता राखीवरून हलत नव्हती. आजपर्यंत आयुष्यात, ऑफिसात अनेक बायका त्याने बघितल्या होत्या. मोहिनीच्या विक्षिप्त स्वभावामुळे मॅरीड लाईफ थोडं डिस्टरब असूनही त्याला कोणत्याही बाई बद्दल अस आकर्षण कधीच वाटलं नव्हतं! राखीने चौथा पाईंट मागवला. थंड बीयर घशात उतरल्यावर अजून एक बेंसन लाईट शिलागवली. तिच्या धुरात ती कंसोलच्या अंधारात मोहितला शोधू लागली. इतक्यात मागून आवाज आला “हाय आय एम मोहित. मे आय जॉईन यु?” राखीने वळून बघितलं. ती शोधत असलेला मोहित तिच्या समोर उभा होता. ती “प्लीज डू” म्हणाली आणि मोहित तिच्या समोर बसला. त्याची नजर त्याच्याही नकळत तिच्या अंगावरून फिरत होती. राखी हसून म्हणाली “ह्या शरीराच नाव राखी आहे!” ते ऐकून मोहित प्रचंड ओशाळला! पण राखला फार राग आला नव्हता किंवा आश्चर्य वाटलं नव्हतं! राखी म्हणाली “ही जागा बोलायची नाही तर म्युझिकची आहे. बोलायचं असेल तर शो संपल्यावर माय डेन!” मोहितला काय रिएक्त करावं सुचलं नाही. तो फक्त ओके म्हणून परत कंसोल मध्ये गेला!

जसजशी रात्र चढत होती तसतशी गाण्यांची लय वाढत होती. राखी अजून दोन पाईंट घेऊन जरा मदहोश झाली होती. आता क्राऊडला बसायलाही जागा नव्हती इतकं रेस्टोरण्ट फुल झालं होतं! मोहितने त्या धुराने भरलेल्या माहोल मध्ये शेवटच सॉंग दम मारो दम लावलं! क्राऊड फुल बेहोश होता! आपल्या उदरात नाती फुलवायला प्रसिद्ध असलेलं ट्वेन्टी थ्री मोहित आणि राखीची नेत्रपल्लवी बघत खुदकन हसत होत!

क्रमशः (© मंदार जोग)

ट्वेंटी थ्री- भाग 6 (©मंदार जोग)

आता तुरळक लोकल पोर सोडली तर ट्वेंटी थ्री रिकाम होतं. साधारण अडीच वाजता राखी उठून निघाली. निघताना मोहितकडे एक कटाक्ष टाकला. मोहितची ऑफिशियल ड्युटी एक वाजताच संपली होती. तो फक्त राखीच्या निघायची वाट बघत होता. तिने कटाक्ष टाकल्यावर हातातील ग्लास एका झटक्यात संपवून समोरच्या ऍश ट्रे मध्ये सिगारेट दाबून तो तिच्या मागे निघाला. राखीने बाहेर येऊन स्कुटर सुरू केली आणि मोहितकडे बघितलं. मोहित मागे बसला. राखीने एकदा गचका देत गाडी पळवली. त्या गचक्याने हादरलेल्या मोहितने तिच्या खांद्याला धरलं. वारा जोरात होता. राखीचे उडणारे केस मोहितच्या चेहऱ्यावर येत होते. त्यांचा वास इतका मस्त होता की मोहित ते अजिबात बाजूला करत नव्हता. निर्जन रस्त्यावर त्यांची स्कुटर धावत होती.

इथे ट्वेंटी थ्री मध्ये दुपारपासून उभा असलेला आणि अखंड ओरडत सूचना देत असलेला शक्ती अन्ना आरसी आणि काजू घेऊन काउंटर वर निवांत बसला होता. पायाची जखम आता बरीच भरली होती. आता तो सरळ चालुही लागला होता. एक वेटर त्याच्या पायाशी बसून बँडेज बदलत होता. अन्ना आरसी चे घोट घेत बेंजो भाईला शिव्या देत होता. त्याला सगळा घटनाक्रम काल झाल्यासारखा आठवत होता…..

इतर वेळी फारसे कोणाच्या लफडयात न पडता आपापसात भंकस करत दारू पिणारे आणि बेंजो भाईच्या बेसूर गाण्यावर नाचून पैसे उडवणारे त्याचे चेले त्या रात्री जरा जास्त टाईट होते. त्यांचे चढलेले आवाज रेस्टोरण्ट मध्ये बसलेल्या कास्टमर्स ना थोडा डिस्टरब करत होते. पण बेंजो आणि त्याच्या पंटर ना बोलणार कोण? एकामागे एक गाणी वाजत होती. कस्टमर एन्जॉय करत होते. एक हनिमून कपल जरा हाय झाले होते. विशेषतः बायको. ती कोणीही गात असलं तरी स्टेजवर येऊन धुंद होऊन नाचत होती. हे नेहमीचे असल्याने कोणालाच त्यात काही वावगं वाटत नव्हतं. सगळे त्या दोघांना प्रोत्साहन देऊन एन्जॉय करत होते. कपल चांगलं घरचं होत आणि हनिमूनला आलेलं होत हे सर्वांना सहज लक्षात येत होतं. ट्वेन्टी थ्री च्या स्टाफला आठवड्यात किमान दोन तरी अश्या प्रकारची कपल्स बघायची सवय होती. भरपूर नाचून, गाऊन, पिऊन दोघे निघाले. त्यांची भाड्याची स्कुटर बेंजोच्या गँगच्या स्कुटरच्या बाजूला पार्क केलेली होती. स्कुटर काढताना त्या मुलाच्या हातून गँगच्या एका बाईकला धक्का लागून ती आडवी झाली. त्यानंतर गँग ने पोराला गुरासारखा धुवायला सुरुवात केली. ती पोरगी मध्ये आल्यावर तिलाही मारायला लागले. मग शक्ती अन्ना समजवायला गेला तर बेंजोने त्याच्या कानाखाली वाजवली. इतक्यात पोलिसांची गाडी राउंड अप ला आल्यावर हे सटकले. ती गाडी आली नसती तर ती पोरगी हनिमूनलाच विधवा झाली असती हे नक्की होत!

अन्ना रागाने थरथरत होता. इतक्या वर्षांची ओळख, रोज रात्री ट्वेंटी थ्री मध्ये पिणाऱ्या बेंजोने अन्नाला त्याची औकाद दाखवून दिली होती. अन्नाने पोलिसांना बेंजो आणि गँग ने हे केल्याची टीप दिली. मग बेंजो आणि गँग दोनेक महिने अंडरग्राउंड होते. आणि मग अचानक त्या सकाळी साईबाबांच्या मूर्तीला फुल वाहायच्या आधी पायावर झालेले कोयत्याचे वार! अन्ना बेंजो आणि गँग ची कम्प्लेन करणार होता पण शकुर सेठ आणि रंगा अन्ना ह्यांनी त्याला थांबवला. म्हणजे शकुरने मनात आणले असते तर बेंजो आणि गँगला तो एका रात्रीत कायमचे गोव्याबाहेर हाकलायची व्यवस्था करू शकत होता. पण धंद्याच्या दृष्टीने अशी प्यादी पाळायचा त्याला शौक होता! शेठ लोकांच्या समोर शक्ती अन्नाचे काही चालले नाही. शकुरने त्याचा हॉस्पिटलचा खर्च, दहा दिवस भर पगारी रजा आणि अर्ध्या महिन्याचा पगार असा इंसेंटिव्ह दिला. अन्ना आनंदी नसला तरी समाधानी होता. आता पायाबरोबर मनातील जखमही भरत आली होती. काळ रात्रीच रंगा अन्नाने शक्ती आणि बेंजोची दिलं जमाई करून त्याच्यातर्फे एकेक शिवास पाजून सेलिब्रेट केलं होतं! शक्ती अन्नाच बँडेज बदलून झालं. आरसी क्वार्टर संपली होती. तो समोर ठेवलेला कोळंबी राईस हाताने चिवडत जेवत होता!

मोहित आणि राखी तिच्या घरी आले. साधं पण खूप आस्थेटीकली सजवलेलं आणि राखीसारखच उबदार अस तिचं लहानसं घर होत. मोहितला एक पाईंट देऊन राखी पटकन शॉवर घेऊन चेंज करून आली. कॉटनची ढगळ अबी आखूड शॉर्टस आणि वर ढगळ गंजी अश्या पोशाखात ती मोहित समोर येऊन बसली. मोहितची नजर तिच्यावरून हटत नव्हती. मग एक पाईंट उघडून बेंसनचा झुरका घेत तीच म्हणाली-

राखी- मी तुला सॉलीड सेक्सी, चालू, धंदेवाली वगैरे वाटते आहे का? आणि घरी बोलावलंय म्हणजे रेट फिक्स झाला की मी झोपणार अस पण वाटत असेल ना?

मोहित- नाही. तस काहीच नाही. इन फॅक्ट तू तशी वाटली असतीस तर मी आलोच नसतो तुझ्याबरोबर.

राखी- मग कशी वाटते आहे मी?

मोहित- (तिच्या डोळ्यात बघत) सेक्सी…व्हेरी व्हेरी सेक्सी! पण त्या ही पलीकडे जाऊन थोडी गूढ, जिच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल अशी!

राखी- हम्म…लाईक आय सेड माझं नाव राखी. आडनाव तुला आवडेल ते समज. चुकीच्या माणसाशी लव्ह मॅरेज, मग त्याने दिलेल्या यातनांच्या रुपात मी केलेल्या चुकीचं प्रायशचित्त. माझा होप माझा मुलगाही बापाच्या बाजूचा! मग एक दिवस सोडलं त्याच घर आणि आले गोव्यात. इथे गोऱ्या लोकांना रेकी आणि ऍक्युप्रेशर ट्रीटमेंट देते. भरपूर कमावते आणि भरपूर उडवते. तरीही पैसे उरतात. आता पैसे कोणासाठी उरवू? आहे कोण माझ?

राखीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मोहितने पुढे होऊन तिला रुमाल दिला. तिने अश्रू पुसून एका झटक्यात स्वतःला सावरलं आणि प्रश्न केला-

राखी- तू हँडसम आणि आकर्षक आहेसच आणि गोव्यात मी रोज सहा फूट उंच आणि प्रचंड आकर्षक फिरंगी पुरुषांना ऍक्युप्रेशर देताना स्पर्श करते. सो द थिंग इज मी तुला इथे घरी त्या कारणाने नाही बोलावलं. तुझ्या डोळ्यात मला एक पेन जाणवली जी माझ्या मनातही आहे. म्हणून मी तुला बोलावलं आहे. व्हॉट इज युअर स्टोरी?

मोहित त्याची स्टोरी सांगू लागला.

अंबा आणि अंबालिकाची आई गेले काही दिवस बेड रिडन होती. तिला बहुतेक गोव्याची हवा मानवली नव्हती. झोपेच्या गोळ्यांचा अंमल उतरला की जागी झालेली म्हातारी रात्रभर कण्हत असायची. ह्या दोघींना झोपताही येत नसे. नर्स ठेवली तर म्हातारी नर्सला अंगाला हात लावू देत नसे. डॉक्टर म्हणाले अजून पंधरा दिवस लागतील तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला. मग तोवर हा दोघी म्हातारीच्या शेजारी डोळे उघडे ठेवून छताकडे बघत रात्र काढायच्या. पहाटे चार पाच वाजता तिघीही दमून झोपायच्या. आजची रात्रही तशीच गेली. अंबा अंबालिकाला म्हणाली नाहीतरी म्हातारी झोपल्यावर ते चार तास आपण काही करत नाही ना? मग आज पासून करू. रात्री दहा ते दोन आपण जीवाचा गोवा करू. त्या आनंदात दोघी झोपी गेल्या.

मोहितची स्टोरी ऐकून राखीला खूप वाईट वाटलं. तिने उठून त्याच्या जवळ येऊन त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाली “तू घरी जा आणि आराम कर दमला असशील. मी तुला रेकी देते. उद्या भेटू ट्वेंटी थ्री ला. एक नवा दिवस आणि एक नवी सुरुवात घेऊन!” मोहितने तिला फक्त एक मिठी मारली. तिथे येताना खूप बाल्यावस्थेत असलेलं आकर्षण आता प्रगल्भ झालं होतं. क्षणिक सुखापलिकडे असू शकत असलेलं एक दीर्घकाळ टिकणारं नातं दोघांना दिसत होतं. मोहित निघाला. राखीने दार उघडलं. मोहित मागे वळला. त्याच्या मनाची घालमेल राखीच्या लक्षात आली. तिने त्याच्या गालावर ओठ ठेऊन एक चुंबन घेतलं आणि गोड हसत म्हणाली “गो नाऊ. डोन्ट बी ग्रीडी!” मोहित हसला आणि निघाला!

दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण दोनच्या सुमारास मोहित झोपून उठला. मोबाईलवर राखीचा मेसेज होता “कशी लागली झोप. माझी रेकी उपयुक्त ठरली का?” मोहितला खरच खूप दिवसांनी इतकी गाढ झोप लागली होती. त्याने रिप्लाय केला “येस. थँक्स. संध्याकाळी भेटू ट्वेन्टी थ्री ला” तिचा लगेच रिप्लाय आला “येस बेब्स”. तो वाचून मोहितला हुरूप आला. तो उठून फ्रेश झाला. अजून काहीच जिन्नस आणले नसल्याने त्याने सरळ मॅगी खाऊन लंच केला. मग खाली जाऊन धान्य आणि इतर आवश्यक सामान आणलं. जरा वेळ टीव्ही बघून अंघोळ करून तो ट्वेन्टी थ्रीला निघाला.

आज क्राऊड कमी होता. लोकल लोकांची सर्व फर्माईश पुरी करता येत होती. मोहितने ट्रॅक लाईन अप केले आणि तो राखीच्या टेबलवर येऊन बसला. दोघे एकमेकांच्या नजरेत नजर मिसळत बोलत होते. मोहित मधेच उठून नवीन फर्माईश प्रोग्रॅम करत होता. इतक्यात डोक्याला बंडाना, हातावर टॅटू, हाय हिल बुट्स, निमुळती जीन्स, त्यावर ढगळ शर्ट आणि त्यावर लेदर जॅकेट अश्या पेहरावात असलेला वसंत आला आणि त्याने दर्द ए दिलं, दर्द ए जिगर प्रायोरिटी वर घ्यायला सांगितलं. मोहितने शक्ती अन्नाकडे बघितलं. अन्नाने हो अशी मान हलवली. इतर क्यु मागे सारून पुढलं गाणं वसंतच लागणार होतं. त्याने बारच्या बाजूच्या उंच टेबलवर बसून भरपूर पाणी मिसळलेल्या आरसीचे चार घोट घेतले आणि तो गायला तयार झाला. त्याच वेळी पहिल्या लायनीत राखी आणि मोहितच्या शेजारच्या टेबलवर नखशिखान्त मेकअप करून चंदेरी कपडे घातलेल्या अंबा आणि आणि अंबालिका येऊन बसल्या. मोहितने पुढल्या गाण्यासाठी वसंतच नाव अनाऊन्स करून ट्रॅक सुरू केला. आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये वसंतने एंट्री घेतली. आपल्या सुरल्या गळ्यातून दर्द ए दिल, दर्द ए जिगर म्हणून “दिलं में जगाया आप ने” म्हणताना त्याचा हात नेमका अंबालिकाच्या दिशेला वळला. दोघांची नजरानजर झाली. मग पुढे वसंत गात होता पण लक्ष अंबालिकाकडे होत!

आता रेस्टोरण्ट भरत होतं. क्राऊड येत होता. माहोल बनत होता. सगळे गात होते. नाती जोडणे आणि तोडणे हा खेळ वर्षानुवर्षे खेळत असलेलं ट्वेंटी थ्री आज नवीन डाव मांडत होत! अजून एक धुंद रात्र सुरू झाली होती!

क्रमश: (©मंदार जोग)

Top of Form

ट्वेंटी थ्री- भाग 7 (© मंदार जोग)

वसंत गात होता. अंबालिकाशी नजरबंदी झाल्यावर एक स्मित एक्शचेंज झालं. ह्या वयातही हंटर असलेल्या वसंतने ते शिताफीने हेरलं. मग पुढील अख्ख गाणं तो ऋषि कपूर आणि अंबालिका टिना मुनीम झाले होते. काय सुरू आहे ते अंबाच्या लक्षात आलं होतं. पण ह्या परक्या मुलुखात बहिणीच सेटिंग जमल्यास तिला आनंदच होता. ती इतरत्र नजर फिरवत सेटिंग शोधू लागली.

मोहित आणि राखी त्यांच्या टेबलवर बसले होते. शब्दांऐवजी त्यांचे डोळे बोलत होते. शेवटी राखी म्हणाली-

राखी- काय बघतो आहेस?

मोहित- काहीतरी खूप आवडलेलं.

राखी- काय वाटतंय?

मोहित- खरं सांगू? थोडं वेड्यासारखं वाटेल पण तेच खरं आहे.

राखी- हो. खरच सांग. खोटं बोलायला मी तुझी बायको नाहीये.

मोहित- तुला मिठीत घेऊन चावावं अस वाटतंय!

ते ऐकून राखी जोरात हसली.

राखी- you are mad!

मोहित- मी म्हणालो होतो ना वेड्यासारखं वाटेल म्हणून? तरीही खरं बोललो.

राखी- okay your wish is granted tonight!

ते ऐकून मोहितने अविश्वासाने तिच्याकडे बघितलं. राखीने हळूच त्याचा हात हातात घेत त्याच्या हाताचं बोट हलकेच चावलं! आता मोहित ड्युटी संपायची वाट बघू लागला!

वसंत सराईतपणे गाणं संपवून अंबा आणि अंबालिकाला जॉईन झाला होता. फॉर्मल ओळख झाल्यावर त्या दोघींना सिल्व्हिया आंटीच्या लहानश्या हॉटेलातील पोर्क डेलिकासी खिलवायच्या निमित्ताने त्यांना घेऊन बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने काउंटर वरच्या शक्ती अन्नाला डोळा मारला आणि शक्ती शेजारी असलेल्या वेटरला म्हणाला-

शक्ती- ये बुढा घोडा लंबी रेस खेलता है! सेटिंग भि ऐसी जो फल भी दे और साया भी!

वेटर- मतलब?

शक्ती- तेरे समझ में नही आयेगा. तू टेबल नंबर बारा पे कपडा मार.

रेस्टोरण्ट हळूहळू भरत होतं. रंगेल रंगा अण्णा त्याच्या कोपऱ्यातल्या खास टेबलवर मचाणावर बसलेल्या पोलिसासारखा बसला होता. काळोखात बसून राखीच घोटीव शरीर न्याहाळत होता. इतक्यात स्टेजवर त्या दिवशी रात बाकी बात बाकी गाणारी ओल्ड मॉंक विथ सुरमई वाटलेली परफेक्ट मापातली वीशीतली काळी सावळी मासोळी लैला मैं लैला गाऊ लागली. रंगा अन्नाच्या तोंडातून लाळ गळू लागली. गाणं झाल्यावर ती बार जवळ जाऊन बसली. आपलं स्टफ मागवून सिगारेटचे झुरके घेऊ लागली. अंगाला घट्ट बसणारा शेंद्री टीशर्ट आणि घट्ट थ्री फोर्थ जीन्स असा साधा पेहेराव. पण त्या सदगी मध्ये असलेली कायामत की अदा पारखी लोकांच्या नजरांनी अचूक हेरली होती. रंगा आता पस्तिशी ओलांडलेल्या राखीचा नाद सोडून त्याच्या मुलीच्या वयाच्या त्या पोरीवर डोळे खिळवून होता. इतक्यात तिची एक मैत्रीण येऊन तिला जॉईन झाली. बॉय कट, गंजी आणि जीन्स असा पेहेराव, चेहऱ्यावर बेफिकिरी. तिनेही आपलं स्टफ मागवलं. रंगा अजून खुश झाला!

सिल्व्हिया आंटीच्या घराच्या व्हरांड्यात जेमतेम पाच टेबल्स ठेऊन सुरू केलेल्या रेस्टोरण्ट मध्ये वसंत, अंबा आणि अंबालिका तिनेच बनवलेल्या पोर्क डेलिकसीचा आस्वाद घेत होते. साथीला फेणीचे ग्लास होते. गप्पांचा विषय गाणी, लता, आशा, रफी, किशोर असा जनरीक होता. बोलता बोलता अंबालिका तिची माहिती देत होती आणि वसंत माहिती मिळत असल्याने खुश होत होता. त्या दोघींचा भूतकाळ माहीत असलेली अंबा वसंतच्या आधाशीपणाला हसत होती. वसंतला अजून एक शिकार जाळ्यात येत असल्याचा आनंद होत होता आणि अंबा आपल्या बहिणीने टाकलेल्या जाळ्यात वसंत सारखा नॉन कमिटल मासा सहज अडकल्याच्या समाधानात फेणी सिप करत होती!

बिल आल्यावर अंबालिकाने आनंदाने बिल दिलं. सेटिंग परफेक्ट लागल्याचा आनंद वसंतच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो म्हणाला उद्या येणार ना ट्वेंटी थ्री ला?

अंबालिका- हो. उद्याही दोन सुंदर गाणी, पोर्क डेलिकसी आणि फेणी असेल तर नक्की येणार!

वसंत- उद्या इथे अजून लवकर येऊ. आंटीने मागच्या साईडला श्याक बांधले आहेत. तिथे बसू. मी गिटार वाजवत स्पेशल गाणी म्हणेन.

अंबा- उद्या मला नाही जमणार. एक काम आहे. तुम्ही दोघेच भेटा.

ते ऐकून वसंत अजून खुश झाला. तिघे निघाले. वसंत त्याच्या बाईकवर आणि ह्या दोघी त्यांच्या गाडीतून आपापल्या घराकडे निघाले!

ट्वेंटी थ्री आता फुल झालं होतं. टुरिस्ट आणि लोकल्स गाणी पेश करत होते. मोहित आणि राखी त्याची ड्युटी संपायची वाट बघत टेबलवर बसल्याबसल्या कॉलेजात असलेल्या मुलांसारखे चाळे करत होते. मोहित आपल्या पायातील बूट काढून आपला पाय तिच्या पायावर घासत तिच्या मांडीपर्यंत नेत होता. मग राखी हळूच त्याच्या पायाला धक्का देऊन आपला स्कर्ट सारखा करत होती!

रात्री कराओकेचे शेवटचे गाणे सुरू असताना मुफ्ती मध्ये असलेल्या एसीपी कांबळे उर्फ दबंग कांबळेची एंट्री झाली. बरोबर सिव्हिल मधले त्यांच्या मर्जीतले दोन हवालदार. आजवर छत्तीस एन्काऊंटर त्यांच्या नावावर होते. त्यांना बघताच बेंजोची तिथे बसलेली दोन पोर कल्टी झाली! कांबळे साहेब टेबलवर बसल्याबरोब्बर रंगा अण्णा लोचट हसू चेहऱ्यावर घेऊन समोर उभा राहिला. त्याने बारच्या दिशेने एक रागीट कटाक्ष टाकला. एव्हाना शक्ती अन्नाने पिटाळलेला वेटर शिवासचे तीन ग्लास, खारवलेले काजू, चीज आणि बेंसन लाईटचे पाकीट असा सरंजाम घेऊन येत असलेला दिसल्यावर रंगाच्या जीवात जीव आला. शक्ती अन्नाने किंग प्रॉन फ्रायची ऑर्डर किचनमध्ये देऊन टाकली होती. वेटर ग्लास ठेऊन गेल्यावर रंगा अन्नाने स्वतःच्या हाताने त्यात बर्फ घातला. साहेबांना ऑन द रॉक्स लागते हे माहीत असल्याने फक्त हवालदारांच्या ग्लासात सोडा ओतला. स्टररने ड्रिंक्स ढवळून साहेबांच्या हातात ग्लास दिला. पाकीट उघडून एक बेंसन साहेबांना देऊन आपल्या हाताने शिलगवून दिली! साहेबांनी एक दम मारून अन्नाच्या चेहऱ्यावर धूर सोडला. एका घोटात थर्टी एमएल गिळून त्याला सवाल केला-

साहेब- क्या रे वो बबलू काल्या दिखा क्या इधर तेरे को?

अन्ना- नाही साब! आप के डर से कल्टी हो गया लगता है.

साहेब- ज्यादा शानपट्टी मत चो@. मेरे को टीप है के वो गोवा में है और अपने एरिया में है! तेरा गाववाला है ना? तू उसको मदत किया ऐसा मालूम पडा ना तो तेरेको उलटा लटकाके गां# में काठी घुसा के मुंह से बाहर निकालुंगा याद रख!

तो हग्या दम ऐकून रंगा अन्नाला लघवीला लागली. तो साहेबांची परवानगी घेऊन गेला. साहेबांची सराईत नजर बार मध्ये फिरली. हव्या त्या गोष्टींची नोंद झाली. इतक्यात रंगा अन्ना आला. तोवर किंग प्रॉन फ्राय येऊन टेबलवर सेटल झालं होतं. अन्ना एका खुर्चीच्या कडेवर जेमतेम ढुंगण टेकून बसला. साहेब त्या विशीतल्या दोघींकडे बघत होते. ते लक्षात आल्यावर अन्ना लुबरेपणाने म्हणाला-

अन्ना- नयी है दोनों. टुरिस्ट लगती है!

साहेब- अन्ना तू खाली हॉटेल संभाल. ये सब मेरे पे छोड दे!

अन्ना- म्हणजे?

साहेब- ऑरेंज टीशर्ट मध्ये आहे तिचं नाव रुखसार आणि तिच्या बरोबर छोटे केस वाली आहे ती शर्मिला. रुखसार गेल्या महिन्यात लखनौ वरून आली गोव्यात. महिन्याभरात खूप नाव आणि पैसे कमावले आहेत. तुला हवी असेल तर तासाचे दोन हजार दे. खुश करून टाकेल. दिवसा तीन चार तास धंदा करते. पण सिरीयस अफेयर पण आहे तिचं!

अन्ना- अफेयर? कोणाबरोबर?

साहेब- शर्मिला बरोबर!

अन्ना आ वासून त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला.

साहेब- शिवास रिपीट!

अन्नाला ऐकू गेलं नाही. साहेबांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची थंड नळी त्याच्या उजव्या कानाच्या वर टेकवली! अन्ना बार कडे बघत किंचाळला-

अन्ना- शक्ती थ्री शिवास रिपीट!

ट्वेन्टी थ्री मध्ये माहोल जमला होता! रात्र जवान होत होती! नवी नाती, नवी समीकरण जुळत होती! सर्व पात्रांना आपल्या उदरात सामावून ट्वेन्टी थ्री ची वास्तू थिरकत होती!

क्रमशः (©मंदार जोग)

ट्वेंटी थ्री- भाग 8 (©मंदार जोग)

ड्युटी संपल्यावर मोहित आणि राखी तिच्या बाईकवरून निघाले. आज मोहित तिला खेटून बसला होता. त्याचे दोन्ही हात तिचा तोकडा स्कर्ट स्कुटरवर बसल्यावर वर झाल्यानंतर उघड्या पडलेल्या तिच्या मांड्यांवर होते. आज वारा जोरात होता. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. घर मागे पडून आता नागमोडी रस्ता शेतातून जात होता. रस्त्यावर दिवे नव्हते. वर चंद्र होता. कधी समोरच्या शेतावर पसरलेलं निळसर चांदण तर कधी नारळाच्या झावळ्यातून डोकावणारा त्याचा प्रकाश! मोहितचे हात आता स्वस्त बसत नव्हते. राखीलाही लांब राहणं अनावर झालं होतं. एका क्षणी तिने एका झाडाखाली स्कुटरचा ब्रेक मारला. हेडलाईट बंद करून, स्कुटर साईड स्टँडवर लावून ती मोहित समोर उभी राहिली. झाडांच्या पानातून गळून खाली आलेल्या चांदण्यात ती अप्रतिम दिसत होती. मोहित पुढे झाला. तिच्या मऊ केसातून त्याने बोट फिरवली. तिच्या गोबर्या नितळ गालावर डाव्या हाताने गोंजारून उजवा हात तिच्या नाजूक कमरेत घालून एका झटक्यात तिला आपल्याकडे ओढली. आता दोघांना एकमेकांचे आतुर चेहरे दोन इंचावर दिसत होते. राखीने अनाहूतपणे टाचा वर केल्या आणि डोळे बंद केले. पानातून चांदणे सांडत असलेला चंद्र एका सुंदर जोडीचा प्रणय बघायला सारसावून बसला. त्याचे चांदणे जरा प्रखर झाल्यासारखे वाटले. मोहितने तिच्या रसाळ ओठांवरून आपलं बोट फिरवलं. राखीने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या सर्वांगावर रोमांच फुलले! आकाशात चंद्र आणखी खाली वाकला! इतक्यात राखीच्या पर्स मधला फोन खणखणला. ती दचकली. डोळे उघडून मागे झाली. मोहितची पकड ढीली झाली. झाडाच्या पानांनी परत त्यांच्यावर सावली धरली. फोन राखीच्या नवऱ्याचा, विश्वजीतचा होता. त्याने नेहमीप्रमाणे पैसे मागितले. फोनवर वाद झाला. फोन ठेवल्यावर राखी रडू लागली. मोहितने तिला सावरली. आता मोहित बाईक चालवत होता आणि राखी त्याच्या पाठीवर डोकं टेकवून बसली होती.

मोहितने बाईक तिच्या घराबाहेर पार्क केली. तिने लॅच उघडून दिवा लावला. दोघे घरात आले. मोहित समोर अंथरलेल्या इंडियन सिटिंग गादीवर बसला. राखी आतमध्ये जाऊन चेंज करून फ्रेश होऊन आली. येताना दोन पाईंट घेऊन आली. एक पाईंट मोहितला देऊन त्याच्या शेजारी बसली. मोहितने त्याचा पिळदार उजवा हात तिच्या मागून नेऊन तिच्या खांद्यावर ठेवला. ती एक बेंसन शिलगावून त्याच्या कुशीत शिरली. दोघंही काहीच बोलत नव्हते. ती मोहितच्या केसाळ हातावरून आपली बोट फिरवत होती आणि तो तिच्या गालावर आपल्या उजव्या हाताने गोंजारत होता.

राखी- कंटाळले आहे मी मोहित. माझं कोणीही नाही. मी मस्त पैसे कमावते आणि खर्च पण करते. पण ही जुनी, मी माझ्यातर्फे संपवलेली नाती अशी अचानक समोर येतात. नाही. माझी पैसे द्यायलाही ना नाही. पण त्यातून येणाऱ्या संपर्कातून भयानक दिवसांच्या जखमा आठवतात. माझी वाया गेलेली वीस वर्षे आठवतात. मला या आठवणी नको आहेत आता.

मोहित काही बोलला नाही. ऐकत होता. त्याने तिच्या हातातून लिपस्टिकचा रंग लागलेली बेंसन घेऊन एक झुरका मारला आणि आपली मिठी थोडी घट्ट केली. परत एक शांतता होती. दोघांची बीयर पिऊन झाली. दोघे तसेच पसरले होते. राखीने डोळे वर करून त्याच्याकडे बघितलं. बसल्याबसल्या घसरलेली ती वर सरकून बसली. आता मोहितकडे बलून डाव्या कुशीवर स्थिरावली. मोहित तिच्याकडे बघत होता. दोन बटणे उघडी असलेल्या त्याच्या केसाळ छातीवर तिने उजव्या हाताच्या तर्जनीने मोहित असं लिहिलं आणि प्रेमाने त्याच्याकडे बघितलं. तो सिगारेट ओढत लांब कुठेतरी बघत होता. राखी उठून बसली. त्याच्या तोंडातून सिगारेट काढून ash tray मध्ये विझवून ती त्याच्याकडे तोंड करून त्याच्या मांडीवर बसली. आपले दोन्ही दंड त्याच्या खांद्यांवर ठेऊन ती त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागली. मोहित तिला बाजूला करून उठला.

राखी- काय झालं मोहित?

मोहित- not tonight.

राखी- पण झालंय काय?

मोहित- उद्या बोलू.

मोहित पुढे काही न बोलता निघून गेला. राखी बाथरूम मध्ये जाऊन थंड शॉवर खाली बसली!

सकाळी वसंत दचकून उठला तो अंबालिकाच्या फोन मुळे. “आंबेवाला अंबर” अश्या नावाने सेव्ह केलेल्या नंबर वरून आलेला तो कॉल बायको समोरच असल्याने वसंतने घेतला नाही. त्याने मेसेज केला “काय काम आहे?” आंबलिकाचा रिप्लाय आला की “आज आधी सिल्व्हिया आंटीच्या हॉटेलवर जाऊ आणि मग ट्वेन्टी थ्री. मला पत्ता पाठव. मी शार्प आठला तुला पिकअप करते”.” वसंत शाट पत्ता देऊ इच्छित नव्हता. त्याने रिप्लाय दिला “मी थॉमस चर्चच्या गेटजवळ भेटतो शार्प आठ वाजता ” आज रात्री किती प्रोग्रेस करायची ह्या विचारात तो असताना ज्यूडी नावाच्या त्याच्या रशियन मैत्रिणीचा फोन आला. तिने त्याला तिच्या कॉटेजवर बीयर प्यायला बोलावला होता. आता रात्रीबरोबर दिवसही उत्तम जाणार हे लक्षात आलेल्या वसंत ने बायकोला चहाची ऑर्डर सोडली.

संध्याकाळी मोहित ट्वेन्टी थ्री मध्ये आला. रुटीन सुरू झालं. कस्टमर हळू हळू येत होते. सेटल होत होते. मोहित एकेक ट्रॅक सिक्वेन्स करत होता. तेवढ्यात राखी ऑफ शोल्डर असलेला फुलफुलांचा आखूड फ्रॉक घालून पंचवीशीतल्या एका चिकण्या फॉरेनर मुलाबरोबर आली. दोघे तिच्या नेहेमीच्या टेबलवर बसले. मोहित बघत होता. त्या दोघांनी आपापली ड्रिंक्स ऑर्डर केली. तिने धुराच्या पलीकडे दिसत असलेल्या मोहितला हात करून हाय म्हटले. मोहितने ते न दिसल्यासारखे करून प्रतिसाद न देता प्लेलिस्ट परत एकदा बघितली. ट्वेंटी थ्री हळू हळू भरत होत.

अचानक गेटवरील गार्ड पासून किचन मध्ये भांडी घसणाऱ्यापर्यन्त सगळा स्टाफ अलर्ट झाला. त्याला कारणही तसंच होत. आज खूप महिन्यांनी शकुरशेठ चा फुकट गेलेला मुलगा फरीदची रेंज रोव्हर गेटजवळ थांबली होती. पांढरा पठाणी आणि दोन किलो सोन ल्यालेला फरीदने त्याच्या चार चमच्यांबरोबर एंट्री घेतली. दोघे अन्ना त्याच्या स्वागताला शक्य तितके झुकून उभे होते. फरीद येऊन बसला. दोन चमचे बसले आणि दोघे मागे उभे राहिले. फरीदने रंगा अन्नाला इशार्याने बसायला सांगितलं. अन्ना खुर्चीच्या कडेवर अर्धवट ढुंगण टेकवून बसला. फरीदची नजर रेस्टोरण्ट भर फिरत होती. ती फिरंग बरोबर बसलेल्या राखीवर स्थिरावली. तिला आपादमस्तक न्याहाळून त्याने ब्लॅक डॉगचा एक सिप घेतला आणि तिलाच बघत तो गाणी ऐकू लागला.

वसंत आणि अंबालिका सिल्व्हिया आंटीच्या हॉटेलवर पोर्क हादडून निघाले. गाडीत बसल्यावर वसंत ने अंबालिकाचं कौतुक करत धागे विणायला सुरुवात केली. अंबालिका जाळ्याची वाट बघत असल्याने तयारच होती. तिने ट्वेन्टी थ्री कडे निघालेली गाडी वळवून प्रिन्सेस स्ट्रीट वरून सरळ बीचच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर घेतली. बीचला टच असलेल्या अंधाऱ्या गल्लीत गाडी उभी करून हेडलाईट बंद केले आणि वसंतकडे एक आव्हानात्मक कटाक्ष टाकला. वसंतच्या डोक्यात असलेली फुल लेंथ फिल्म शॉर्ट फिल्म बनून डायरेक्ट क्लायमॅक्स आल्यामुळे खिलाडी असलेला वसंत बवचळला. पण आता कंट्रोल अंबालिकाकडे होता. शिकारी स्वतः शिकार होत होता!

ट्वेंटी थ्री मध्ये त्या फिरंग बरोबर दोन ड्युएट इंग्रजी गाणी गाऊन राखी त्याच्याशी गप्पा मारत खिदळत बसली होती. तो असल्याने आज मोहित राखीशी एक शब्दही बोलला नव्हता. फरीद राखीलाच बघत होता. इतक्यात स्टेजवर रुखसार “दिलं चीज क्या है आप मेरी जान लिजीए” म्हणू लागली. फरीदची नजर आता राखीला सोडून तिच्यातून तरुण असलेल्या रुखसार वर खिळली!

फरीद- अन्ना ये कौन है? टुरिस्ट है की लोकल?

अन्नाला खर तर दबंग साहेबांकडून रुखसारची सगळी स्टोरी कळली होती. पण रंगा अन्ना मोठा चालू माणूस. तो म्हणाला-

अन्ना- फरीद सेठ सेटिंग लागवू क्या?

फरीद- ऐसा? अन्ना ये सेटिंग तू लागाया ना तो अगले कॉन्ट्रॅक्ट में तेरेकू दस दिन एक्स्ट्रा और फ्री.

अन्ना- लेकीन सेठ थोडा खर्चा आयेगा. लाडकी अच्छे घरकी लगती है.

फरीद- अमाउंट बोल.

अन्ना- समझो ना पचास हजार में काम हो जाएगा. कल रात आपके फार्म हाऊसपर होगी ये लडकी. अन्ना का प्रॉमिस.

फरीदच्या चमच्याने दोन हजाराच्या पंचवीस नोटा अन्नाच्या खिशात कोंबल्या. रुखसार कडे एकदा बघून फरीद अन्नाला म्हणाला-

फरीद- कल रात नऊ बजे ये लडकी फार्म हाऊस में होगी या तू होगा!

फरीद चमच्यांबरोबर निघून गेला. उद्या रुखसार नाही गेली तर तो आणि फरीद फार्म हाऊसवर असे भयानक दृश्य नजरेसमोर आल्याने त्याने फरीदचा बाकी राहिलेला पेग ग्लास तोंडाला लावून रिकामा केला आणि गाणं संपवून बार जवळ बसलेल्या रुखसारकडे तो गेला. रुखसार ला बाजूला बोलावून त्याने वीस हजार आणि त्याचा पत्ता लिहिलेला कागद तिच्या हातात दिला. रुखसार जागेवर येऊन बसली. रंगा अन्नाच्या पोटात फुलपाखरं उडू लागली होती!

शेवटचा ट्रॅक सेट करून मोहित बाहेर आला. शक्ती अन्नाला बाय करून निघाला. तो निघालेला राखीच्या लक्षात येईपर्यंत त्याने स्कुटर सुरू केली होती. राखी ते बघून जाम चिडली.

इथे रुखसार ने शर्मिलाला आज तिला अन्नाकडे जायच असल्याचं सांगितलं. शर्मिला ते ऐकून चिडली. रुखसार तिला समजावत होती. शेवटी उद्या रात्री रुखसारने कुठेही न जाता त्या दोघीनी शर्मिलाच्या वाढदिवसाची ती रात्र एकत्र घालवायची असे वचन रुखसार ने दिल्यावर शर्मिला तयार झाली! रंगा अन्नाला उद्या काय होणार ह्याची कल्पना नव्हती!

राखीने फिरंग मित्राला टाटा केला आणि मोहितला लगेच माझ्या घरी ये असा मेसेज करून ती निघाली. तेव्हा वसंत आणि अंबालिकाने ट्वेन्टी थ्री मध्ये एंट्री घेतली! नाती बनत होती, बदलत होती, विस्कटत होती! ह्या साऱ्यांचा साक्षीदार असलेले ट्वेंटी थ्री थिरकत होत!

क्रमशः

©मंदार जोग

ट्वेंटी थ्री- भाग 9 (©मंदार जोग)

वसंत खुश होता. गाडीत बघितलेल्या ट्रेलर वरून अंबालिका त्याच्या अपेक्षेपेक्षा बरीच जास्त रसिक असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. त्याला आता फुल सिनेमा पहायची इच्छा होती. अंबालिकाला वसंतच्या रूपाने सेफ पुरुष भेटला होता. सेफ अश्याया दृष्टीने की जो जगभर बोभाटा करणार नाही. कारण तो स्वतः फॅमिलीवला होता. तसही आता कितीही भडक मेकअप केला तरी निदान गोव्यात तरी अंबालिकाकडे तरुण पोरांचं लक्ष जाणं शक्य नव्हतं. ज्याचं लक्ष जाऊ शकत होत ते फक्त बघण्यापुरते उरले होते. अश्या वेळी आजच्या गाडीतल्या ट्रेलर मध्ये वसंत बघण्यापालिकडे उपयुक्त आहे हे अंबालिकाला लक्षात येऊन आनंद झाला होता. थोडक्यात आजचा ट्रेलर दोघांच्या मनात फुल सिनेमाची शक्यता आणि शाश्वती निर्माण करून गेला होता. वसंतने त्या खुशीत आज दोघांसाठी जेडी ऑर्डर केली!

मोहित घरी आला आणि त्याने बाईक पार्क केली. फोन मध्ये राखीचा मेसेज वाचला. मेसेज इग्नोर करून तो दार उघडणार इतक्यात राखीचा फोन आला. “लगेच घरी ये” हे एक वाक्य बोलून राखीने फोन ठेवला. मोहित चरफडत निघाला.

रंगा अन्ना त्याच्या खोलीभर रूम फ्रेशनर मारून, सिंगल पलंगावर अनेक दिवसांनी धुतलेली चादर घालून, स्वच्छ अंघोळ करून, आपल्या काळ्या कभिन्न शरीरावर स्वस्तातला डियो मारून, कमरेला लुंगी आणि वर सँडो बनियन घालून व्हाट्सअप्प वर आलेल्या अश्लील क्लीपिंग बघत रुखसारच्या येण्याकडे डोळे लावून बसला होता. फरीदकडून घेतलेल्या पैशात अन्नाला रुखसार फुकटात पडली होती. नाहीतर अर्धा पगार खर्च झाला असता तिच्याबरोबर एका रात्रीसाठी. दाराची बेल वाजली. रुखसार आली. अन्नाच्या शरीरात 440 वोल्टचा करंट धावू लागला. त्याने तिचे स्वागत करत सिगल बेडवर बसायला सांगितलं. रुखसार बसल्यावर तो आत जाऊन ब्लॅक लेबलचा खोका घेऊन आला. दोघांसाठी ऑन द रॉक्स तयार करून रुखसारच्या शेजारी खेटून बसला. तिचा ग्लास तिला देताना हळूच तिला स्पर्श केला.

रुखसार- काय शेठ तुम्ही एकटेच राहता का इथे?

अन्ना- हो.

रुखसार- आणि फॅमिली?

अन्ना- गावाला?

रुखसार- बराच उपास घडत असेल ना?

अण्णा- हो. म्हणून तर तुला बोलावली आहे.

हे बोलून अन्नाने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ खेचली. तिच्या गालाचा मुका घेतला. तिनेही अन्नाच्या गालाचा मुका घेतला. अन्ना आता चेकाळत होता. तो तिला आणखी जवळ घेणार इतक्यात रुखसार उठून खिडकीजवळ गेली. खिडकी उघडून ग्लास खिडकीत ठेऊन तिने सिगारेट शिलागवली.

राखीच्या घराची बेल वाजली. राखी आतून म्हणाली “मोहित ये दार उघडच आहे”. मोहित दार ढकलून आत आला. राखी शांत बसली होती. मोहित लांब समोर बसला.

राखी- काय नाटक चालली आहेत?

मोहित- कुठे काय?

राखी- सरळ बोलणार आहेस का? तर बोलू नाहीतर मी झोपते. मला आधीच खूप त्रास आहेत डोक्याला.

मोहित- बोल तू.

राखी- मी विचारलं आहे जे विचारायचं ते. तू उत्तर दे.

मोहित- नाटक कसली? तू तुझ्या नव्या फ्रेंड बरोबर आली होतीस. ड्रिंक्स घेतली, गाणी म्हटली तुम्ही. मी उगाच डिस्टरब केला नाही. मग तुम्हाला रात्रीही एकत्र राहायचं असेल हे लक्षात घेऊन मी निघून गेलो तुम्हाला डिस्टरब न करता. Thats it. ह्यात नाटक काय?

राखी- ओह. म्हणजे मी रात्री त्याच्याबरोबर झोपणार होते ही खात्री होती तुला? वा. काय विचार आहेत! आता नीट ऐक. त्याच नाव रसेल. तो ब्रिटिश आहे. माझा स्टुडंट आहे. आज त्याचा बर्थडे आहे. त्याच कोणीच इथे नसल्याने मी त्याला ट्वेन्टी थ्रीला घेऊन आले. Just to make him happy on his birthday! उद्याच्या फ्लाईट ने तो परत जाणार आहे. आणि तू तसाही जेलस का होतोस? तुला काळ जे सहज मिळणार होत ते तर तू धुडकावून गेलास. का?

मोहित- ओह. मला माफ कर राखी. मी उगाच संशय घेतला, उगाच पझेसिव्ह झालो. आणि काल रात्रीच म्हणशील तर काल तुला नवऱ्याचा फोन आल्यावर तू ज्या फ्रेम ऑफ माईंड मध्ये होतीस ती खूप वीक होती. त्या अवस्थेत एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाणे म्हणजे तिच्या मानसिक अवस्थेचा गैर फायदा घेणे आहे असं मला वाटलं. सो मी मनावर कंट्रोल करून निघालो. मला तुझ्या जवळ यायचं आहे तू आनंदात असताना, विचारपूर्वक तयार असताना!

राखी- अच्छा अस आहे तर! ओके. आज मी खूप आनंदात आहे. तुझाच विचार करते आहे. दिसतंय का तुला? नाही? थांब.

राखी उठून येऊन दोन्ही पाय दोन बाजूला टाकून त्याच्याकडे तोंड करून त्याच्या मांडीवर बसली. आपल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात आरपार बघत हळूच बोलली-

राखी- दिसतंय का मी किती खुश आहे ते? मला अजून खूप खुश व्हायचं आहे. करशील?

मोहितने इतकावेळ सोफ्यात रूतवून ठेवलेले हात तिच्या पाठीवर ठेऊन तिला मिठीत घेतली.

रुखसारची सिगारेट ओढून संपत होती. तेवढ्या वेळात अन्नाने अजून एकेक पेग भरून अर्धा केला होता. तो पलंगावर बसून आधाश्या सारखी रुखसारची वाट बघत होता. रुखसारने सिगारेट ऍश ट्रे मध्ये विझवली. हातातील ग्लास रिकामा केला. ती येऊन पलंगावर बसली. आता अन्नाचा धीर सुटला होता. त्याने रुखसारला बेडवर आडवी केली. आपला सँडो बनियन काढताना रुखसारला अजून खुश करायला अन्ना म्हणाला-

अन्ना- रुखसार आज मला डबल खुश कर. माझ्याकडे उद्या तुझ्यासाठी एक मोठी ऑर्डर आहे. पैसे मिळतील आणि त्याच्या अनेक पट टीप पण मिळेल.

इतके बोलून शंभर किलोचा ढेरपोट्या अन्ना तिच्या अंगावर आडवा झाला. असे अनेक अन्ना पचवलेल्या रुखसारला काहीच फरक पडत नव्हता. पण अन्ना काय म्हणाला ते ऐकून तिला काहीतरी आठवलं. अन्ना तिच्या कापड्यांशी खेळत होता.

रुखसार- पण अन्ना उद्या शक्य नाहीये. उद्या मला काम आहे.

अन्ना- बाकी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर. उद्या रात्री नऊ पासून रात्रभर तुझ्यासाठी काम आहे माझ्याकडे.

रुखसार- ते शक्य नाही.

अन्ना- (तिचा टीशर्ट काढायच्या प्रयत्नात) काय शक्य नाही? नाटक नको करू जास्त.

रुखसारने एका धक्क्यात अन्नाला लांब केला. अन्ना लुंगी सावरत उभा राहिला.

अन्ना- काय झालं?

रुखसार- उद्या मला शक्य नाही म्हणाले ना मी? मग तो विषय सोड. आज काय करायचं हे ते करून घे.

अन्ना- पण का शक्य नाही?

रुखसार- तुला काय करायचंय? तुझा संबंध आजच्या रात्रीपुरता आहे. काम संपव. फालतू चौकश्या नको.

अन्ना- ए रुखसार औकादीत रहा. मी कोण आहे माहित्येय ना?

रुखसार- ए अन्ना. तू काय आहेस ते माहिती आहे मला. तोंड उघडायला लावू नको. ज्या कामाला आले आहे ते कर आणि झोप गपचूप.

अन्ना- माझ्याशी वैर महाग पडेल.

रुखसार- हो काय? बरं. आता हेच तू दबंग साहेबांना सांग. तुला घरातून उचलतील.

रुखसार फोन लावते. दबंग साहेबांच नाव ऐकून अन्नाची तीन हात फाटते. अन्ना तिचा फोन डीसकनेक्ट करतो.

अन्ना- ए सोड ना. सिरीयस काय होतेस तू? (काकुळतीला येऊन) पण उद्या प्लीज जमव ना.

रुखसार- ए अन्ना तुला झाली आहे किंवा तू दलाली सुरू केली आहे. एकदा सांगितलं ऐकू नाही का आलं? उद्या नाही म्हणजे नाही. आता चल काम सुरू कर पटापट.

रुखसार पलंगावर आडवी होऊन अन्नाची वाट पाहू लागली. अन्ना रुखसारला विसरला होता. त्याला डोळ्यासमोर तो आणि फरीद फार्म हाऊसच्या बेडरूम मध्ये आहेत असे भयानक स्वप्न जागेपणी दिसू लागलं होतं. तो शांतपणे रुखसारला म्हणाला-

अन्ना- तू जा.

रुखसार- मी जाऊ? म्हणजे काम न करताच जाऊ?

अन्ना- हो. जा तू. प्लीज.

रुखसार- ओके. पण रात गई बात गई. नंतर कधीच आजचे पैसे वसूल करायला येणार नाही. तेव्हा नवा हिशोब हे लक्षात ठेव अन्ना.

रुखसार निघून गेली. अन्ना पलंगावर आडवा झाला. अख्खी खोली त्याच्या भोवती फिरत होती!

क्रमशः (©मंदार जोग)

ट्वेंटी थ्री- भाग 10 (©मंदार जोग)

सकाळी मोहितला उशिरा जाग आली. राखी केव्हाच उठून मेडिटेशन करून ग्रीन टी सिप करत खिडकीजवळ बसली होती. खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप तिच्या तुकतुकीत त्वचेवर पडून तिला अधिकच मोहक बनवत होती. रखीला परत मिठीत घ्यायचा मोह मोहितने आवरला. त्याला घरची अर्धवट राहिलेली काम आणि संध्याकाळची ड्युटी आठवत होती. त्याला बाहेर आलेला बघून राखी उठून पुढे आली.

राखी- काल बर्याच दिवसांनी उपास सोडलास वाटत?

मोहित- हम्म. आणि तो सोडताना रुचकर जेवणाचा सेव्हन कोर्स डिनर केला.

राखी- खूप हावरट आहेस तू.

मोहित- आत्ताही भूक मारतोय. समोर ताट वाढून ठेवलं असताना घरी जातोय.

राखी- (त्याच्या डोळ्यात बघत) मन मारू नये. संधी सोडू नये. आहेस तर पटकन ब्रेकफास्ट तरी करून जा.

आता मात्र मोहितचा संयम सुटला. त्याने रखीला उचलली आणि तो बेडरूमकडे जाऊ लागला!

रंगा अन्नाचा रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. पहाटे केव्हातरी त्याला झोप लागली आणि दहा वाजता तो दचकून जागा झाला. त्याला फरीद आणि तो फार्म हाऊसवर अस दृश्य परत डोळ्यासमोर दिसलं आणि पोटात जोराची कळ आली. तो बाथरूम कडे धावला. पोटातली दारू आणि चिकन कमोड मध्ये रिकामे करताना त्याचा मेंदू सतत विचार करत होता. फरीदला काय सांगायचं ह्याचे ऑप्शन शोधत होता. गरज ही जशी शोधाची जननी असते तशीच ती काही वेळा असत्यालाही जन्म देते. अन्नाला फरीदला मॅनेज करायची आयडिया सुचली होती.

अंबा खरी तर अंबालिका पेक्षा दिसायला उजवी. ह्या वयातही आकर्षक बांधा, मेकअप शिवायही तसा बरा असणारा तुकतुकीत चेहरा आणि कोणत्याही पुरुषाला आव्हान देईल अशी नजर! अंबाला गोव्यात एक प्लॉट घेऊन खानावळ सुरू करायची इच्छा होती. तिने पेपरातून जाहिराती बघून एक फोन केला. अभिजित रियलटी. अंबा गजबजलेल्या पणजी मार्केट मध्ये त्या ब्रोकरच्या ऑफिसात आली. दोन मुली कॉम्प्युटर वर पत्ते खेळत होत्या. एक मुलगा फेसबुक बघत होता. तिने काय कामाला अली आहे हे सांगितल्यावर “शेठ येतील दहा मिनिटात” असे उत्तर त्या मुलाने कॉम्प्युटर मधून मान वर न करता दिले. अंबा लहानश्या रिसेप्शन मध्ये सोफ्यावर बसली. काही वेळात एक तरुण तरतरीत हँडसम मुलगा ऑफिसात आला. सर्व कॉम्प्युटर्स वर कामाचे स्क्रिन आले. मुलाने हात पुढे करून इंट्रो दिला.

मुलगा- हाय मी अभिजित. आपण मिसेस अंबा ना?

अंबा- हो मी “मिस” अंबा.

अभिजित- या ना आत या. सॉरी थोडा उशीर झाला. तुम्हाला वाट बघावी लागली.

अंबा- चांगल्या गोष्टी सहज मिळत नाहीत.

अभिजित- नक्कीच. मी आपल्याला उत्तम प्लॉट मिळवून देईन.

अंबा- (त्याच्या डोळ्यात बघत) मला खात्री आहे.

अभिजित ने तिच्यासाठी चहा मागवला. मग तिला विक्रीला असलेल्या वेगवेगळ्या प्लॉटस ची माहिती देऊ लागला.

इथे मोहितचा पाय राखीच्या घरून निघत नव्हता. शेवटी राखीने जबरदस्तीने त्याला कपडे घालून ढकलत बाहेर आणला आणि म्हणाली मी ब्रेकफास्ट म्हणाले होते. सेव्हन कोर्स डिनर नाही. जा आता. रात्री भेटू. मलाही रेकीच्या अपॉइंटमेंट आहेत. मोहित निघाला. आज खूप वर्षांनी त्याला कोणीतरी इतकं प्रेम दिलं होतं, जवळ घेतलं होतं, समाधान दिलं होतं. घरी येऊन त्याने वॉशिंग मशीन लावलं, भांडी धुवायला घेतली, घर आवरायला सुरुवात केली. गेले कित्येक दिवस तशीच असलेली बेड वरची चादर आणि उश्यांचे अभरे बदलले. आज रखीला आपल्या घरी बोलवायचा त्याचा बेत होता. त्याने तयारी सुरू केली.

रंगा अन्नाने त्याच्या घरापासून दहा किलोमीटर दूर असलेल्या एका पीसीओ वरून पोलिसांना निनावी फोन करून खबर दिली की आज रात्री ट्वेंटी थ्री मध्ये फरीद ड्रग्सच कंसाईनमेंट घेऊन एक डील करणार आहे. मग मोबाईल वरून फरीदला फोन करून सांगितलं की रुखसार आज ट्वेन्टी थ्री मध्ये येणार आहे. तिथे त्याला भेटेल. मग तिला फार्म हाऊसवर घेऊन जा. फरीद ओके म्हणल्यावर अन्नाने चेहऱ्यावरचा घाम पुसला!

संध्याकाळ सरून रात्र होऊ लागली. ट्वेन्टी थ्री मध्ये नेहमीचे आणि नवे पाहुणे जमू लागले. मोहित मस्त मस्त ट्रॅकस वाजवत होता. गेस्ट गाणी गात होते. आज राखी खूप आकर्षक दिसत होती. तिला बघून न राहावून त्याने “भीगे होंट तेरे प्यासा दिलं मेरा” म्हटलं आणि राखी चक्क लाजली. ते पाहून मोहित वेडा झाला. गाणं संपल्यावर खाली येऊन त्याने तिला आज रात्री त्याच्या घरी यायचं आमंत्रण दिलं. ती हो म्हणाली.

तेवढ्यात फरीद त्याच्या चमच्यांबरोबर आला. ठरलेल्या टेबलवर बसला. त्याची नजर रुखसार ला शोधत होती आणि काउंटर मागे लपलेल्या रंगा अन्नाची नजर त्याच्यावर होती. मॅनेजर शक्ती अन्नाला काहीतरी लोचा आहे ह्याची जाणीव झाली. रंगा अन्ना अचानक पुढे गेला. फरीदच स्वागत केलं. त्याच्यासाठी ड्रिंक मागवले. फरीदने रुखसार कुठे आहे असं विचारलं. अन्ना म्हणाला येईलच इतक्यात. आणि खरच रुखसार शर्मिला बरोबर ट्वेन्टी थ्री मध्ये आली. आज एकदम शॉर्ट स्कर्ट, ऑफ शोल्डर टॉप अश्या आकर्षक वेशात होती ती. शर्मिलाच्या बर्थ डे साठी शर्मिलाला आवडणाऱ्या पोशाखात. तिला बघून फरीद अन्नाला म्हणाला “आता वेळ फुकट नको घालवू. तिला गाडीत बसव माझ्या!” अन्नाच्या पायाखालून जमीन सरकली. तो तिच्याशी बोलायला म्हणून उठला आणि आत आलेल्या दहा पोलिसांनी फरीद आणि त्याच्या चमच्यांना धरले. त्यांना काही बोलू न देता गाडीत कोंबून घेऊन गेले! ते जायला आणि वसंत अंबालिकाने एंट्री घ्यायला एकच गाठ पडली. रंगा अन्ना टेन्शन रिलिव्ह झाल्याने मागे असलेल्या केबिन मध्ये एसी लावून बसला.

आता काही हनिमून कपल्स, काही लोकल कपल्स, मोहित राखी, वसंत अंबालिका, रुखसार शर्मिला अश्या प्रेमळ लोकांनी ट्वेन्टी थ्री सजून गेलं होतं. वातावरणात आणि सगळ्या गाण्यातही प्रेम आणि रोमांस भरून राहिले होते. आज ट्वेंटी थ्री गुलाबी वाटत होतं. वसंत त्याच गाताना नेहमी घालायचं खास लेदर जॅकेट स्कुटरच्या कप्प्यात विसरला होता. अंबालिकाला सांगून तो जॅकेट घ्यायला बाहेर आला. जॅकेट काढून घेऊन त्याने एक सिगारेट शिलागवली. सहज समोर बघितल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो हादरला. अंबा आणि वसंतचा मुलगा अभिजित हातात हात घालून ट्वेन्टी थ्री मध्ये एंट्री घेत होते! आज गुलाबी रंगात न्हालेलं ट्वेंटी थ्री गुलाबी हसत होतं! नवी नाती बनत होती, काही दृढ होत होती तर काही विस्कटत होती! ट्वेंटी थ्री मध्ये अजून एक रात्र रंगत होती! ©मंदार जोग

क्रमशः

ट्वेंटी थ्री…(भाग- 11 © मंदार जोग)

अंबा आणि अभिजीतला हातात हात घालून येताना पाहून वसंत हादरला. हातातली सिगारेट पायाखाली विझवून तो गाडीमागे लपला. आत परत जायची त्याची हिम्मत होत नव्हती. अंबा आणि अभिजीत ट्वेंटी थ्री मध्ये आत शिरले. अंबाला एका टेबलवर एकटीच बसलेली अंबालिका दिसली. ती अभिजीतला घेऊन त्याच टेबलवर जाऊन बसली. अभिजीतची अंबालिकाशी ओळख करून दिली. अंबा वसंत कुठे आहे विचारणार इतक्यात कोणीतरी गेस्ट “वादा करो नहीं छोडोगे तुम मेरा साथ” गाऊ लागले. अंबाच फेव्हरेट गाणं. तिने अभिजीतचा हात धरला. दोघे स्टेजसमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन डान्स करू लागले. ते बघून वसंत ने अंबालिकाला फोन केला. ती म्हणाली कुठे आहेस? वसंत म्हणाला लगेच बाहेर ये. अंबालिका म्हणाली अंबा तिच्या बॉय फ्रेंडला घेऊन आली आहे. तू ये. तुझी पण ओळख होईल. मग आपण वीकएंड चा जो प्लान केला आहे तिथे चौघे जाऊ. वसंत म्हणाला तू आधी बाहेर पड तिथून. अंबालिका निघाली.

अभिजीत आणि अंबाला डान्स करत असलेले बघून शक्ती अन्नाला काय गेम झालाय ते लक्षात आलं. तो शेजारच्या वेटरला म्हणाला पण “आज अपना रंगा अन्ना बच गया और ये साला वसंत भी. लेकीन दोनों फसेंगे एक दिन!”

अंबा आणि अभिजीतला नाचताना बघून मोहित कांसोल मधून बाहेर आला. त्याने राखीला हाताने इशारा केला. राखी उठून आली. ते दोघे नाचू लागले. त्यांना बघून रुखसार आणि शर्मिला उठल्या. त्या दोघी नाचू लागल्या. मग हळू हळू सगळीच कपल्स डान्स करू लागली. एकामागे एक ट्रॅक वाजत होते. गेस्ट गात होते. सगळे नाचत होते. वातावरण मदहोश होत. इतक्यात काहीतरी जोरात अपटल्याचा आवाज आला. गाणी थांबली. सर्वजण आवाजाच्या दिशेने बघू लागले. बेंजो भाई स्वतः त्याच्याच गँग मधल्या एकाला आत्ताच जमिनीवर आपटून तोडलेल्या खुर्चीच्या पायाने मारत होता. तोंडातून शिव्यांची लाखोली सुरू होती. दोनेक मिनिटे मार खाल्ल्यावर त्या पोराची शुद्ध हरपली. रक्ताचे पाट वाहू लागले. पण बेंजो थांबत नव्हता. इतर सर्वांच्या अंगावर शहारे आणणार तडा दृश्य शक्ती अन्ना समोर असलेले चणे चिवडत आरसी सिप करत आनंदाने बघत होता. कारण त्याला मारणाऱ्या पोरात आज मार खाणारा पोरगा सर्वात पुढे होता. अन्ना खुश होता.थोड्या वेळाने बेंजो मारून मारून दमला आणि थांबला. पोरांनी त्या मारलेल्या पोराला उचलून समोरच्या फुटपाथवर फेकला. बेंजो जोरात ओरडला “अरे बजाओ” मोहितने एक ट्रॅक सुरू केला. त्यावर बेंजो भसड्या आवाजात गाऊ लागला. त्याची पोर शेजारी नाचू लागली. सर्वांचा मूड ऑफ झाला होता. ट्वेन्टी थ्री शांत झालं होतं.

थोड्या वेळात पोलिसांची गाडी आणि अम्ब्युलन्स आल्या. तोवर बेंजो आणि त्याची पोर सटकली होती. नेहेमीप्रमाणे कोणीच काहीच पाहिलं नव्हतं. पोलिसांनी हॉटेल बंद करायचा हुकूम दिला. शक्ती अन्नाने देखील सेक्शन गरम आहे लक्षात घेऊन शटर डाऊन केलं. सगळे मूड ऑफ होऊन निघाले.

मोहित स्कुटर चालवत होता. राखी त्याला बिलगून बसली होती. थोड्या वेळापूर्वी केलेला स्लो डान्स दोघांना आठवत होता. आता घरी जाऊन एकमेकांच्या बहुत हरवायला दोघे आतुर होते!

रुखसार आणि शर्मिला घरी पोहोचल्या. रुखसार आज खूप आकर्षक दिसत होती. रुखसारने केक एका टेबलवर ठेवला. केकवर आणि घरभर मेणबत्त्या लावल्या. शर्मिलाने मेणबत्ती विझवून केक कापला. रुखसारने आपल्या हाताने शर्मिलाला केकचा एक तुकडा भरवला आणि उरलेला केक घेऊन ती आत गेली. शर्मिला सिगारेट ओढत बसून राहिली. दहा मिनिटं गेली. खोलीत सुगंधी मेंबत्त्यांचा सुगंध भरून राहिला होता. त्यांचा शीतल प्रकाश खोलीत पसरला होता. अचानक रुखसार बाहेर आली. शर्मिलाच्या वाढदिवसाच्या केकचे वस्त्र लेवून. शर्मिलाच बर्थ डे गिफ्ट बनून. तिला बघून शर्मिला उभी राहिली. चालत रुखसार जवळ गेली. रुखसार तिला म्हणाली “हॅपी बर्थ डे डार्लिंग. हिअर इज युअर गिफ्ट. हॅव इट” शर्मिलाने तिला मिठीत घेतली आणि शर्मिला केक खाऊ लागली. मेणबत्त्या हळू हळू वितळून विझणार होत्या!

वाटेत दोन दोन बीयर घेऊन अभिजीत आणि अंबा अंबाच्या घरखाली आले. अभिजित निघाला. अंबाने त्याला जवळ घेऊन एक दीर्घ चुंबन घेतले. आता अभिजीत वेडा झाला. अंबा म्हणाली

अंबा- इथे रस्त्यात इतकच. अजून काही हवं असेल तर वर घरी ये माझ्या. अभिजीत- घरी? पण बाकी लोक असतील ना घरी?

अंबा- आई आहे पण ती तिच्या रूम मध्ये झोपली असेल. बहीण कुठे आहे माहीत नाही. आणि ती आली तरी तिच्या बॉय फ्रेंड्सला घेऊन तिच्या रूम मध्ये जाईल. आपल्याला त्रास नाही.

अभिजीतने गाडी लॉक केली. दोघे लिफ्टमध्ये शिरले आणि बिल्डिंग जवळ वसंतची बाईक आली. आज तो अंबालिकाच्या घरी राहणार होता. दोघे निघाले आणि वसंत ला अभिजीतची गाडी दारात पार्क असलेली दिसली. वसंतची तीन हात फाटली. तो अंबालिकाला काहीही न सांगता बाईकला स्टार्ट मारून पळाला. अंबालिका आश्चर्याने बघत राहिली!

मोहित आणि राखी त्याच्या घरी आले. दोघे शॉवर घेऊन फ्रेश झाले. वन फॉर द नाईट म्हणून एकेक पाईंट सिप करत एकमेकांना न्याहाळत बसले होते. आता दोघांनाही एकमेकांच जणू व्यसन लागलं होतं. आता पाईंट संपली की मुख्य व्यसन करायच्या आशेत दोघंही होते. रात्रीचे साधारण दोन वाजले असतील. एकमेकांना मस्त मसाज देऊन रिलॅक्स करायचा प्लान त्यांनी येताना रस्त्यातच ठरवला होता. तेवढ्यात मोहितच्या फोनचा मेसेंजर वाजला. मोहितने इतक्या रात्री कोण म्हणून सहज फोन बघितला. तर मेसेज त्याच्या बायकोचा, मोहिनीचा होता. तिने काही फोटो पाठवले होते. मोहितने फोटो डाउनलोड केले. ते त्याचे आणि राखीचे आज स्लो डान्स करताना एकमेकांच्या मिठीत असतानाचे, एक तर त्याने हळूच तिला किस केला होता त्याचे होते. मोहिनीचा मेसेज आला “ही कोण आहे?” मोहित हादरला. त्याने रिप्लाय केला हे फोटो तुला कोणी दिले? मोहिनी म्हणाली “सगळ्या जगाने बघितले आहेत हे. ती बघ सर्वात पुढे ब्लु ड्रेस मध्ये जी मुलगी आहे ना ती माझ्या फ्रेंड ची फ्रेंड आहे. तिने तिचे फोटो अपलोड करून मझ्या फ्रेंडला टॅग केलं. म्हणून मला तुझे प्रताप कळले. ती कोण आहे मोहित?” मोहितला काय उत्तर द्यावे सुचत नव्हतं. इतक्यात मोहिनीचा मेसेज आला “मी उद्याच्या फ्लाईट ने गोव्याला येत आहे!” तो मेसेज वाचून मोहित हादरला! राखी शांतपणे बीयर पीत होती!

आज ट्वेंटी थ्री लवकर बंद झालं तरी नाती बनवणे आणि बिघडवणे हा त्याचा आवडता खेळ खेळायला चुकलं नव्हतं! रात्र हळू हळू सरत होती. येणारा दिवस मुठीत बरंच काही साठवून रात्रीच्या पदारामागे लपून एखाद्या खट्याळ मुलासारखा हसत होता!

क्रमश:

©मंदार जोग

ट्वेंटी थ्री…(भाग- 12 © मंदार जोग)

इतक्यात मोहिनीचा मेसेज आला “मी उद्याच्या फ्लाईट ने गोव्याला येत आहे!” तो मेसेज वाचून मोहित हादरला! राखी शांतपणे बीयर पीत होती! तिला टेन्स झालेला मोहित दिसला. तिने विचारलं-

राखी- काय झाल?

मोहित- मोहिनी येते आहे गोव्याला….उद्या सकाळच्या फ्लाईटने.

राखी- का? सहज की…

मोहित- राडा घालायला.

राखी- का?

मोहित- तिने आपले फोटो सोशल मिडीयावर बघितले. तिच्या एका मैत्रिणीने अपलोड केलेल्या फोटो मध्ये आपण दोघे जरा जास्त क्लोज आहोत. सो मोहिनी चिडली आहे.

राखी- का चिडली आहे ती? तिचा काय संबंध आहे तुझ्याशी आता?

हे ऐकून मोहित क्षणभर चक्रावला. म्हणाला-

मोहित- come on राखी. ती बायको आहे माझी.

राखी- आणि मी कोण आहे?

मोहितच्या डोळ्यात रोखून बघत राखीने विचारलेल्या ह्या प्रश्नाचं उतार मोहितला सापडत नव्हत. तो काहीतरीबोलायचं म्हणून म्ह्नानाला-

मोहित- तू…तुझी केस वेगळी आहे बेब्स.

राखी- काय वेगळी केस आहे माझी? मी तुझ्यावर प्रेम करते, तुझ्या बरोबर वेळ घालवते, तुझी काळजी करते, तुझ्या बरोबर झोपते तरीही मी तुझी राखेल आहे आणि ती मोहिनी जिने तुला torture करून करून तुझा सर्वस्व ओढून घेऊन इथे गोव्याला यायला लावलं ती अजूनही तुझी बायको आहे? आणि कारण काय तर तुम्ही लिगली सेपरेट झालेले नाही म्हणून?

मोहित- राखी प्लीज यार. मी अस काहीच म्हणालो नाहीये.

राखी- बोलला नाहीस तरी अर्थ तोच आहे ना मोहित?

मोहित तिच्या जवळ गेला. तिला मिठीत घेऊन तिच्या केसातून हात फिरवत बोलू लागला.

मोहित- ऐक ना…मी काय म्हणतो तू ना पुढले दोन तीन दिवस ट्वेंटी थ्री मध्ये येऊ नको….प्लीज…

राखी- का?

मोहित- आग ती मोहिनी माहित नाही तुला. तुला तिथे पाहिलं की उगाच राडा घालेल. तुला वाटतील ते बोलेल.

राखी- आणि तुला काय वाटत? मी ऐकून घेईन? नाही तिची इज्जत ट्वेंटी थ्री च्या स्टेजवर बांधली ना तर राखी नाव सांगणार नाही.

मोहित- मला हेच तर नकोय यार. कशाला उगाच तमाशा? मी तिला बरोबर handle करतो. तू गोव्यात नाहीयेस हे सांगून शांत करून पाठवून देतो. जे शांतपणे होऊ शकता त्यासाठी वाद कशाला?

राखी- हे बघ मोहित ती मोहिनी तुझी बायको आहे. तू तिला सांभाळ. ती येणार म्हणून मी घाबरून घरात लपून राहणार नाही. माझ्या वाटेला आली तर तिला बेकार उत्तर देणार मी हे नक्की आहे. बाकी तुम्ही बघा काय करायचं ते.

मोहितने तिच्या मानेच चुंबन घेतलं आणि आणखी जवळ जात म्हणाला-

मोहित- किती रागावातेस यार तू…प्लीज समजून घे ना मला.

राखी त्याच्यापासून लांब होत उठली आणि म्हणाली-

राखी- मोहित प्लीज I am leaving ….

हे अपेक्षित नसलेला मोहित आश्चर्याने म्हणाला-

मोहित- काय?

राखी- I said I am leaving. मला एकटीला राहायचं आहे थोडा वेळ…so….

मोहित- अग पण…

राखीने दार उघडल आणि म्हणाली-

राखी- नंतर बोलू आपण…बाय……

हे बोलून राखी दाराजवळ उभी राहिली. मोहित पुढे गेला तर राखी बाहेर पडली आणि तिने दरवाजा बाहेरून ओढून घेतला. राखी गेली. मोहित डोक्याला हात लावून बेडवर बसला. त्याला झोप कधी लागली ते त्याच्याही लक्षात आल नाही. त्याला सकाळी जाग आली ती दाराची जोरजोरात वाजत असलेली बेल ऐकून. त्याने उठून घाई घाईत दार उघडल. दारात मोहिनी उभी होती. एक टक त्याच्याकडे बघत. तो म्मोहीनिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता.

मोहित- अरे वा…आलीस पण तू? ये ना आत ये.

मोहिनी तिची bag घेऊन आत आली. आत येऊन तिची नजर मोहितच्या घरात फिरू लागली. टिपिकल bachelor pad असलेल ते घर family रहात असलेल्या घरापेक्षा थोड अस्ताव्यस्त होत.

मोहिनी- असा राहतोस तू?

मोहित- असा म्हणजे?

मोहिनी- (त्याच्याकडे बघत) हा असा….

मोहित- जे आहे ते आहे. बस तू. Hope you had a good flight….चहा करू?

मोहिनी- मोहित ती मुलगी कोण आहे?

अचानक हा प्रश्न ऐकून मोहित थबकला.

मोहित- कोण मुलगी?

मोहिनी- तीच…जिचे फोटो बघून मी गोव्याला आले ती.

ह्यावेळी मोहितच्या डोक्यात असंख्य विचार पिंगा घालत होते. काय सांगाव हिला. खर सांगाव की खोट बोलून वेळ मारून न्यावी? पण एक खोट बोललो तर पुढे हजार बोलावी लागतील. आणि आमच्यात आता सर्व संपल आहे. मग मी का घाबरू?

तो हे विचार करत असताना मोहिनी परत म्हणाली-

मोहिनी- मी काय विचारते आहे मोहित? कोण आहे ती मुलगी?

मोहितने क्षणभर विचार केला. आता त्याच्या डोक्यातील सर्व कन्फ्युजन दूर झाल होत. तो शांतपणे म्हणाला-

मोहित- तीच नाव राखी.

मोहिनी- ओह…कुठे भेटली?

मोहित- तुला संध्याकाळी नेतो आम्ही भेटलो त्या जागी आणि ओळख पण करून देतो तुम्हा दोघींची. Okay? आता कॉफी घेणार की चहा ते सांग.

मोहिनी- एक black coffee..

मोहित कॉफी बनवायला किचन मध्ये गेला. मोहिनी त्याच घर बघू लागली.

इथे पहाटे झोप लागलेल्या शर्मिला आणि रुख्सार अजूनही एकमेकींच्या मिठीत होत्या.  रुख्सारचा फोन वाजला आणि त्यांना जाग आली. फोन गंजूचा होता. गंजू गोव्यात दलाली करत असे. मोठमोठ्या रिसोर्ट मध्ये जीवाचा गोवा करायला आलेल्या श्रीमंत पोरांची टोळकी हेरून त्यांना “आयटम दाखवायला” वेगवेगळ्या पब्स आणि डिस्को मध्ये नेऊन स्वतःच्या  दारू आणि डिनरची सोय करत असे. मग त्या पब मध्ये रुख्सार आणि तिच्या सारख्या दोन चार “प्रोफेशनल” पोरी “टुरिस्ट” बनून एन्ट्री मारत. मग गंजू सेटिंग लावतो सांगून ह्या पोरींना येऊन बकरे फसल्याच सांगत असे. मग त्या पोरांच्या पैशाने मजा करून ह्या पोरी ती रात्र बक्कल पैसे उकळून त्या पोरांच्या संगतीने घालवत. त्या पोरांना गोव्यात मुलगी “पटवून” भोगल्याच समधान मिळत असे, गन्जुला दलालीचे काही हजार सुटत आणि पोरी भरपूर पैसे कमावून आनंद साजरा करत. “व्यवहार” दिसत नसलेल्या ह्या “व्यवहारात” सगळेच खुश असत. रुख्सार ने फोन घेतला.

रुख्सार- बोल गंजू….

गंजू- आज आहेस ना रात्री ट्वेंटी थ्री ला?

रुख्सार- का रे?

गंजू- दोन शेठ आलेत राजस्थान वरून. त्यांना गोव्यात मुलगी पटवायची आहे.

रुख्सार- अजून कोण आहे माझ्याबरोबर?

गंजू- कोणी नाही. तुलाच डबल पेमेंट.

रुख्सार- ए तू पागल ही क्या? दोघांबरोबर मी एकटी नाही जाणार.

गंजू- विचार कर. एकाचे पंचवीस हजार मिळतील. वरून दारू आणि जेवण सुटेल ते वेगळ. आणि पन्नाशी ओलांडलेले आहेत दोघंही. दहा मिनिटात खेळ खलास करू शकतेस तू.

हे ऐकून क्षणभर विचार करून रुख्सार म्हणाली-

रुख्सार- ए गंजू हे लास्ट टाईम ओके? हे दोन दोन लोक मला झेपत नाहीत.

गंजू- ओके. भेटू संध्याकाळी ट्वेंटी थ्रीला.

रुख्सार फोन कट करून अंगावर उरलेलं चोकलेट धुवायला बाथरूम मध्ये गेली.

राखी घरी गेल्यावर प्रचंड चिडली होती. मोहित ने तिला खूप चुकीच वागल्याची भावना तिच्या मनात होती. धड न जेवता ती झोपी गेली ती थेट संध्याकाळी उठली. मोबाईल हातात घेतल्यावर तिला मोहीतचा मेसेज दिसला. त्यात लिहील होत “आज ट्वेंटी थ्रीला ये. मोहिनी आणि मी तुझी वाट बघत असू.” हा मेसेज वाचून राखीला आश्चर्य वाटलं. पण नंतर मोहिनीला कॉम्प्लेक्स देण्याच्या हेतूने तिने आज तिचं hottest best दिसायचा निर्धार केला आणि ती तयार होऊ लागली.

हळू हळू संध्याकाळ गोव्यात अवतरली. रंगा अन्ना आज आनंदात होता. फरीद तुरुंगात गेल्यावर त्याच्यावर आलेलं संकट दूर झाल होत. तो आज जातीने ट्वेंटी थ्रीच्या देव्हार्यात लावलेल्या बाबाजींच्या फोटोला हार घालून पूजा करत होता. शक्ती अन्ना ते बघत होता. इथे पैसे दाबून तुरुंगातून बाहेर पडणार्या फरीदला इन्स्पेक्टर ने खास खबर म्हणून रंगा अन्नाने त्याची टीप दिल्याची टीप दिली. फारीद्च्या डोळ्यात खून चढला. तो पंटर ना घेऊन गाडीतून ट्वेंटी थ्रीच्या दिशेने निघाला.

आज ट्वेंटी थ्री परत एकदा सजल होत. सावकाश पसरत जाणारी रात्र अनेक अकल्पित घटना आपल्या उदरात दडवून ट्वेंटी थ्री मध्ये अवतरत होती. हळू हळू लोक जमा होत होते. मोहितने पहिला track लावला आणि तो गाऊ लागला…गाण्याचे बोल होते “जिंदगी कैसी ये पहेली हाये…कभी ये हसाये कभी ये रुलाये…” हे ऐकत समोरच्या टेबल वर बसलेली मोहिनी घड्याळात बघत होती आणि तेव्हाच संपूर्ण ट्वेंटी थ्री ला आग लावणाऱ्या लूक मध्ये सिझलिंग हॉट दिसत असलेली हॉट pant घातलेली राखी ट्वेंटी थ्री मध्ये एन्ट्री घेत होती. अजून एका नाट्यपूर्ण रात्रीचे स्वागत करायला ट्वेंटी थ्री सजल होत.

ट्वेंटी थ्री…(भाग- 13  © मंदार जोग)

राखीने एन्ट्री घेतल्यावर आत बसलेलं पब्लिक माना वळवून वळवून तिला न्याहाळू लागल. लोकल, टुरीस्ट आणि काही फिरंग देखील राखीला बघून येडे झाले. राखी येऊन मोहिनीच्या समोरच्या टेबलवर बसली. मोहित गात असलेलं जिंदगी कैसी ही पहेली सुरुच होत. राखीने बसल्यावर मोहितला एक छान स्माईल दिल. मोहितने देखील त्याला छान रिस्पोन्स दिला. ही बाब मोहिनीच्या नजरेतून सुटली नाही. आणि बाब मोहिनीच्या नजरेतून सुटली नाहीये हे मोहितच्या नजरेतून सुटलं नाही. मोहिनीने राखीला एका फटक्यात ओळखली होती. राखी आपल्यापेक्षा फोटोत वाटली त्याहूनही कित्येक पट आकर्षक आहे हे पण तिच्या लक्षात आल होत. मोहिनी आता हिला मोहितच्या आयुष्यातून कशी बाहेर काढायची ह्या विचारत होती आणि इथे राखीने तिची पाईंट बियर ऑर्डर केली होती.

रुख्सार आज खास कामावर जायचा ड्रेस घालून आली होती. नॉर्मली “ऑर्डर” असेल तेव्हा ती स्कर्ट आणि गंजी घालून येत असे. उगाच घट्ट कपडे काढण्यात अंगाला खरचटायला नको म्हणून. आज दोन मारवाडी शेठ ना खेळवायच आहे ह्या विचाराने तिने एक लार्र्ज पेग मागवला. तिचा हिशोब सिंपल होता. डोक्यात नशा असली की शरीर बधीर होत. जाणीवा डायरेक्ट सकाळी निर्माण होतात. आणि तोवर रात्र सरून गेलेली असते. रुख्सारचा पेग आला. तिने सिगारेट लाईट करून एक घोट घेतला आणि तिचा “दिवस” सुरु झाला.

शक्ती अन्नाच्या घरून त्याला फोन आला. फोनवर बायको होती. तिने तिला दिवस गेल्याच सांगितल. आता हे ऐकून खुश व्हावं की चिडाव हेच शक्ती अन्नाला कळत नव्हत. तो म्हणाला पण हे कस शक्य आहे. आपण काळजी घेतली घेतली होती ना?” बायको चिडली आणि म्हणाली “तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी खोट बोलते आहे? हे मुल तुमचं नाहीये?” शक्ती अन्ना म्हणाला “मी अस कधी म्हणालो? मी फक्त आठवत होतो की आपली काही चूक झाली का.” बायको म्हणाली “उद्या पैसे पाठवा. मला आता डॉक्टर कडे जाऊन टेस्ट करून घ्याव्या लागतील.” अन्ना घाबरून म्हणाला “म्हणजे? तू मुलाला जन्म देणार? कशाला? आता वय राहील का आपलं? उद्याच डॉक्टर कडे जा आणि पाडून टाक.” बायकोने चिडून फोन कट केला. अन्नाच्या डोक्याला आता नवीन शॉट लागला होता. त्याने त्याचा राग बार टेंडर वर काढला आणि “ पेग बराबर भरनेका मादर$@. ये गिराता ही वो दारू तेरे बाप कि ही क्या? “ अस बोलून तो मोहित म्हणत असलेल्या गाण्यात स्वतःला गुंगवू लागला. इतक्यात मोहितच गाण संपल. मोहित पुढला track लावून बाहेर आला. आपला ग्लास घेऊन मोहिनी समोर येऊन बसला आणि म्हणाला “कस काय वाटल गाण?” मोहिनी म्हणाली “ठीक होत” तिचं हे उत्तर मोहितला नवीन नव्हत. मोहितला तिने कधीच तोंड भरू कौतुक केल्याच आठवत नव्हत. मोहित म्हणाला –

मोहित- ह्या गाण्यांसाठी लोक वेडे होतात. मला टिप्स देतात.

मोहिनी- अरे वा. लेले टूल्स चा एकेकाळचा मालक मोहीत लेले आता कशाने खुश होतो तर दारुड्या लोकांनी दिलेल्या टिप्स घेऊन. छान प्रगती आहे मोहित.

मोहित काही बोलणार इतक्यात मोहिनी म्हणाली-

मोहिनी- तुझ्या बरोबर फोटोत असलेली चीप मुलगी तीच आहे ना समोरच्या टेबल वर बसलेली?

मोहित- हो तीच आहे पण ती चीप नाहीये.

मोहिनी- पर पुरुषाबरोबर अंगाला अंग घासत आणि पाप्या घेत फोटो काढणारी बाई संत आहे अस म्हणू का मी?

मोहित- मोहिनी प्लीज. ती माझी चांगली फ्रेंड आहे आणि तू तिच्याबद्दल हे अस बोललेलं मला आवडत नाहीये. सो प्लीज इथेच थांब आणि हा विषय सोड.

मोहिनी- अच्छा इतक झोंबतय का? बापरे. मग तुझ्याशी नाही बोलत मी. सरळ जाऊन तिच्याशीच बोलते.

अस म्हणून मोहिनी राखीच्या टेबल वर जाऊन भांडण उकरायला निघाली. पण तितक्यात राखीचा track सुरु झाला आणि ती स्टेजवर गेली. मोहिनी चिडून परत आपल्या जागेवर बसली. पण आज हि इथे राडा घालणार ह्याची कल्पना आल्याने मोहित वैतागला. त्याने अजून एक लार्ज मागवला आणि तो त्याच्या कन्सोल मध्ये जाऊन बसला.

इथे गंजू दोन गुजराती शेट लोकांना घेऊन आला होता. शेट लोक दारू पिता पिता रुख्सरला न्याहाळत आता रात्री काय काय करायचं ह्याची स्वप्न पापलेट चिवडत बघत होते. गंजू त्यांना भेटवून देऊन शेट कडून रोकडा घेऊन ट्वेंटी थ्री च्या मागे असलेल्या विस्तीर्ण मैदानात जोईंट  मारत बसला होता. इथे शेट लोक रुख्सारशी संवाद साधू बघत होते. तुझ नाव काय, कुठून आलीस वगरे रुख्सरला सवय असलेले प्रश्न विचारून झाल्यावर एका शेट ने टेबलाखाली हळूच रुख्सारच्या मांडीवर हात फिरवायला सुरुवात केली. रुख्सार जरी धंदा करत असली तरी तिने रस्त्यावर चादर पसरली नव्हती. ती वैतागून म्हणाली-

रुख्सार- ए शेट हात हटा. क्या करता है?

शेट- क्या करता है म्हणजे? पन्नास हजार दिलेत तुझ्यासाठी. काय पायजे ते करू आम्ही आज रात्री.

रुख्सार- (त्याचा हात मोठ्या मुश्किलीने बाजूला सारत) पैसा वसूल रूम मी करने का इधर नही. इधर इज्जत ही मेरी.

हे ऐकून दोघे शेट जोरजोरात हसले. दुसरा म्हणाला-

शेट- तेरी? और इज्जत? अब जादा अक्कल मत सिखा हमको. आम्ही दुनिया फिरतो आ नि अनेक बायका उपभोगल्या आहेत तुझ्यासारख्या. तू आम्हाला इज्जत चे धडे देऊ नको. पाहिजे तर दहा हजार जास्त घे. पण आम्हाला फुल मजा यायला पाहिजे.

रुख्सारचा नाइलाज होता. इथे भांडण झाल तर बदनामी तिची होणार होती. हे दोघे उद्याच्या फ्लाईट ने परत जातील  पण आपल्याला इथेच राहायचं आहे ह्या विचाराने रुख्सार म्हणाली-

रुख्सार-  ठीक है  लेकीन वो कोनेवाले टेबल पर बैठते ही. उसके नीचे किसीको दिखता नही.

मग तिघे उठून एका कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसले. दोन्ही शेट आता रुक्सारचा स्कर्ट वर करून तिच्या मांड्यात आपली माश्यांच्या तेलात रंगलेली बोट रुतवत होते. रुख्सार तिचे अश्रू टिश्यू पेपरला पुसत शांतपणे तिचं ड्रिंक सिप करत होती.

तोवर राखीच गाण गाऊन झालं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. राखी परत येऊन तिच्या टेबलवर बसली. तिने अजून एक बियर मागवली. इतक्यात मोहिनी तिच्या समोर येऊन बसली आणि म्हणाली-

मोहिनी- हाय मी मोहिनी. मोहिनी लेले. मोहित लेले ची बायको.

राखी- ओह हाय. What a pleasant surprise. तुला भेटून बर वाटल. मोहित तुझ्याबद्दल बोलतो कधीकधी.

मोहिनी- काय बोलतो? की I am not good in bed?

हा अनपेक्षित प्रश्न ऐकून राखी दोन क्षण स्तब्ध झाली. तिने कन्सोल मध्ये बसलेल्या मोहितकडे वळून बघितलं. मोहितला काय होतंय हे माहिती होत. त्याचा अंदाज साफ चुकला होता. त्याला वाटल होत की ट्वेंटी थ्री च्या वातावरणात मोहिनी थोडी सोबर वागेल. राखीशी  नीट बोलेल. पण आता जे होणार आहे ते त्याला आधीच दिसत होत आणि तो त्याचा सामना करायला तयार होता. इथे मोहिनीने तलवार पाजळली होती.

मोहिनी- सांग  ना राखी. काय म्हणतो मोहित माझ्याबद्दल?

राखी- नाही हे बेड वगैरे बद्दल काहीच बोलत नाही तो. तो जनरली तुमच लग्न, मुलं ह्याबद्दल बोलतो.

मोहिनी- कधी बोलतो? दिवसा, की रात्री? तुझ्या घरी की त्याच्या घरी. नशेत असताना की शुद्धीत?

राखी- हे बघ तुझा काहीतरी गैर समज झालेला आहे.

मोहिनी- जे डोळ्यासमोर दिसतय त्याला आमच्यात गैर समज म्हणत नाहीत. पण ते तुला नाही कळणार. त्यासाठी मुळात सभ्य घरात जन्म आणि संस्कार व्हावे लागतात.

इथे राखी तिला nasty उत्तर देणार होती. पण तिला प्रचंड टेन्शन मध्ये बसलेला मोहित दिसला. तिच्याही मनात रुख्सारच्या मनात आलेला विचार आला की “ ही आज उद्या जाईल. पण इथे मला आणि मोहितला यायचं आहे. मोहितची तर इथे रोजी रोटी आहे. इथे तमाशा केला तर दोघांची इज्जत आणि मोहिताची नोकरी जाऊ शकेल!” असा विचार करून राखीने तोंडात आलेले शब्द बियरच्या मोठ्या घोटाबरोबर गिळून टाकले. त्या नंतर मोहिनी ओकत असलेली गरळ राखी शांत बसून ऐकत होती. तिने डोळ्यात येणारे अश्रू रोखून धरले होते. रुक्सारच्या शरीराचे लचके तोडले जात होते आणि राखीच्या मनाचे. पण ट्वेंटी थ्री मधली इजात दोघींना त्या दु:खापेक्षा जास्त प्यारी होती!

हळू हळू भारत असलेल ट्वेंटी थ्री बघून खुश होत असलेला रंगा अन्न लांबूनच रुख्सारला गिर्हाईकाबरोबर बघून खुश होत होता. मला नाही मिळाली तरी कोणीतरी तिचा वापर करेल आणि ती त्याच धंद्यात आणखी एकदा भोगली जाईल ह्या असुरी आनंदात रांगा अन्ना असतानाच त्याच्या खांद्यावर फरीदचा लुसलुशीत, मोठा पठाणी हात पडला. मागून आवाज आला-

फरीद- क्यो बे हरामी मेरी टीप देता ही पुलिस को?

रंगा- अरे नही भाई मी क्यो टीप देगा आपकी. कूच misunderstanding हुवा ही भाय आपको.

फरीद- ऐसा? मेरे को चुत्या समझता है?

अस म्हणून फरीदने अन्नाची मान धरली आणि मागून ती आवळायला सुरुवात केली. फारीद्च्या त्या प्रचंड हातात अन्नाची मान बिन पिसाच्या कोंबडीच्या मानेसारखी वाटत होती. अन्नाची नस दाबली जाऊन वेदना मेंदूत पोहोचली होती. फरीदला त्याची जाणीव होती. तो त्याची मजा घेत होता. इतक्यात त्याची नजर रुख्सार वर गेली. त्याच्या डोक्यात जोरात चक्र फिरली. तो अन्नाला म्हणाला-

फरीद- चल तेरेको छोड देता हु. मेरा पचास हजार और वो लाडकी मेरे को अभी के अभी दे.

अन्ना तयार झाला. गल्ल्यातून पन्नास हजार काढून उद्या भरण्याचा वादा करून तो रुख्साराच्या टेबल जवळ आला.

अन्न- ए रुख्सार इधर आ. एक काम है.

आता शेट दारू पिऊन आणि रुख्साराच्या मांड्यांच्या स्पर्शाने बेभान झाले होते. त्यातील एक जण अन्नाला  म्हणाला-

शेट-  ए तुमको समझता नही क्या? ये हमारे साथ है.  चल निकल.

अन्ना- मेरे को रुख्सार से बात करनेकी है. तुम बीच मे मत पडो.

शेट- ए चल. तुम जनता नही है हम को. एक फोन करेगा ना…

इतक्यात त्या शेटच्या खांद्यावर फरीदच्या हाताची पकड बसली.

फरीद- कर डाल तू वो फोन. चल. अभीच कर डाल.

नशेत असलेल्या शेट ने आपल कोपर मागे करत फारीद्च्या नाकावर मारलं. त्यातून बारीक रक्त आलेलं बघून त्याचे पंटर पुढे झाले आणि त्या दोन्ही शेट ना हॉटेलच्या बाहेर नेऊन कुत्र्यासारखे तुडवून मागच्या शेतात फेकून दिले. इथे अन्ना रुख्सारला म्हणाला-

अन्ना- रुख्सार आज प्लीज फरीद भाई  के साथ जा. जो पैसा मागता ही वो मै देता है. खाली ना मत बोल तू.

रुख्सार- अन्ना आज मेरेको पैसा नही मंगता. मै ऐसेच जायेगी फरीद शेट के साथ.

अन्ना- लेकीन कायको? तेरा तो धंदा है ना?

रुख्सार- हा रे. धंदा तो है. लेकीन आज धंदा नही. आज ये सेठ पे प्यार आया है मेरेको. मै रंडी सही लेकीन औरत भी हु. चलो सेठ. आज तुमको खुश नही किया तो मेरा नाम रुख्सार नही.

फरीद आणि रुख्सार त्याच्या फार्म हाऊस वर निघून गेले. पन्नास हजार गेले तरी रुख्सारला द्यावे लागणारे  वीस पंचवीस हजार वाचल्याने रंगा अन्ना खुश झाला आणि त्याने गल्ल्यावरच शिवासचा एक लार्ज on the rocks एका घोटात मारला.

मोहिनीचे बोचरे बोल ऐकून आणि ते सहन न होऊन राखी तिथून उठून निघाली. नेमका त्यावेळी मोहित गात होता त्यामुळे त्याला गाण  सोडून जाता आल नाही. राखीने स्कूटर सुरु केली आणि ती घराकडे निघाली. तिच्या डोळ्यात इतकावेळ रोखून धरलेल्या अश्रूंना तिने आता वाट करून दिली. इथे मोहिनी स्वतःवर खुश होत ट्वेंटी थ्री ची अंतर्गत सजावट बघत होती आणि मोहित हेल्पलेस होऊन गात होता. गाण्याचे बोल होते “ओ साथी रे…तेरे बिना भी क्या जीना….” ट्वेंटी थ्री हळू हळू भरत होत. अजूनही पूर्ण रात्र बाकी होती आणि ट्वेंटी थ्री ला रात्रीच नवनवी सरप्राईज द्यायची वाईट सवय होती.

क्रमश:

ट्वेंटी थ्री…(भाग- 14  © मंदार जोग)

त्या रात्री मोहितने बाईक वरून मोहिनीला घरी सोडली. तिला घराची चावी देऊन तो निघाला.

मोहिनी- हे काय? इतक्या रात्री कुठे?

मोहित- काम आहे.

मोहिनी- काय काम? त्या राखीला भेटायला जातो आहेस ना?

मोहित- चल बर झाल तू ओळखलस ते.

मोहिनी- तुला लाज नाही वाटत मोहित मी इथे असताना तू त्या चीप बाईला भेटायला जातो आहेस ह्याची?

मोहित- तुला लाज वाटली का जेव्हा तू माझी मनस्थिती, माझी परिस्थिती समजून न घेता मला वाट्टेल ते टोचून बोललीस? ते पण इतकं की मी घर सोडून इथे गोव्यात आलो. तुला आज लाज वाटली का जेव्हा तू बिचार्या राखीला वाट्टेल ते बोललीस. खर तर तुझा माझा आता संबंध काय आहे? लीगली आपण नवरा बायको आहोत ते आपल्या मुलांसाठी. पण बाकी आपल्यात काहीच नात नाहीये. हे माहित असून देखील तू इथे येणार म्हटल्यावर मी ये म्हणालो. मला वाटल तू थोडी सुधारली असशील. पण नाही.

मोहिनी- अच्छा म्हणजे तू हा जो व्यभिचार करतो आहेस त्याचं justification तुझी वाईट बायको अस दिल आहेस का त्या चीप बाईला? वा. मग आता तिथे गेल्यावर काय करणार? ती असेलच पाय फाकवून तयार.

मोहित- (रागाने थरथरत ओरडून) मोहिनी बास…नाहीतर माझा हात उठेल. उद्याच्या फ्लाईट ने तू चालती हो इथून आणि परत कधीच येऊ नको माझ्या आयुष्यात. Just get out…..

हे बोलून मोहित निघून गेला. मोहिनी रागाने थरथरत उभी होती. त्याच्या गाडीचा टेल लाईट नजरेआड झाल्यावर तिने रूमच दार उघडलं. ती प्रचंड frustrate झाली होती. आयुष्यभर तिला उलट उत्तर न देणाऱ्या मोहितने आज तिचा अपमान करून तिला झिडकारली होती. मोहिनीने स्वतःची bag भरली. मग मोहितचे सगळे कपडे, पुस्तकं, कागद, फोटो हॉलच्या मधोमध जमा करून त्यावर माचिसची काडी टाकली. सगळा ऐवज भक्क्न पेटला. त्या आगीला आपल्या नजरेत जमा करून मोहिनी घरातून बाहेर पडली.

पहाट व्हायला आली होती. फरीदच्या फार्म हाउस वरच्या बेडरूम मध्ये फरीद थकून आणि तृप्त होऊन अस्ताव्यस्त पडला होता. त्याला पूर्ण खुश करणारी रुख्सार अजूनही अंगावर हात फिरवत “क्या सेठ इतना जल्दी क्या सोता है?’ म्हणत त्याला आव्हान देत होती. आज फरीद ने जे केलं त्यावर तिच्यातली बाई फिदा होती. आणि वेश्येची जागा बाईने घेतल्यामुळेच फरीदला बाजरी संभोग न मिळता प्रेम मिळाल होत. फरीदला शांत झोप लागलेली बघून रुख्सारने आपले कपडे एक एक करत गोळा केले आणि एक सिगारेट शिलगावून ती बाथरूम मध्ये गेली.

राखीच्या घरी मोहितने तिची समजूत काढली होतो. राखी म्हणाली पण-

राखी- मोहित ह्यात तुझी काहीच चूक नाहीये हे मला कळतंय. पण माझं तुझ्या आयुष्यात जे स्टेटस आहे ना ते मला आवडत नाहीये.

मोहित- म्हणजे? कसलं स्टेटस?

राखी- मी कोण आहे तुझी सांग?

मोहित- तू माझी मैत्रीण आहेस, माझी प्रेयसी आहेस….

राखी- हे तू म्हणतोस. पण जग काय म्हणत असेल?

मोहित- काय?

राखी- हेच की मी तुझी ठेवलेली बाई आहे. तुझ्या मनात येईल तेव्हा तुला सुख देणारी.

मोहित- तू मूर्ख आहेस का थोडी? हे काय बोलते आहेस आज? प्रेयसी, मैत्रीण आणि राकेल ह्यात काहीच फरक नाही? म्हणजे जे प्रेमच नात लग्नात convert होऊ शकत नाही राखेल आणि गिऱ्हाइकाच नात होत अस तुला म्हणायचं आहे का? मग ठीक आहे. हे घाणेरड नात आत्ता इथेच संपवूया. बाय…

हे बोलून मोहित उठून जाऊ लागला. राखीने त्याचा हात धरला. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली-

राखी- मोहीत मी काय करू? माझ तुझ्यावर प्रेम पण आहे आणि ह्या नात्याबद्दल मनात वेगवेगळे विचार पण येतात.

मोहितने तिचा चेहरा ओंजळीत धरला आणि म्हणाला-

मोहित- मी तुझ्याशी ह्या क्षणी लग्न करायला तयार आहे बेबी. पण लिगली त्या लग्नाला अर्थ असेल का? उलट तो एक crime ठरेल कारण मी टेक्निकली अजूनही married आहे. आणि तुला माहित आहे की मुलांच्या फ्युचर साठी मी कितीही इच्छा असली तरी मोहिनीला devorce देऊ शकत नाही. सो…जे आहे ते हेच आहे. I am helpless. पण मी तुझी मनस्थिती पण समजू शकतो आणि त्याचा आदरपण करतो. तुला ह्या नात्यात नसेल राहायचं तर माझी काहीच हरकत नाहीये…..

इतक्यात मोहितला शेजाऱ्याचा फोन आला. त्याने मोहितला त्याच्या घरात आग लागल्याचं सांगितल. ते ऐकून मोहित प्रचंड हादरला आणि राखीचा निरोप देखील न घेता निघाला.

आज अंबालिकाचा वाढदिवस आहे. तिने सकाळीच वसंतला फोन केला आणि म्हणाली-

अंबालिका- आज दिवस भर माझ्या घरी यायचं आहे तुला आणि रात्री ट्वेंटी थ्री मध्ये मोठी पार्टी देणार आहे मी.

वसंतला अभिजित तिच्या घरी केव्हाही टपकेल ह्याची भीती होती. बर तो बाप असूनही अभिजितला फार काही बोलू शकत नव्हता कारण तस केल्याने त्याच स्वतःच बिंग फुटायची जास्त शक्यता होती. तो विचारात हरवला.

अंबालिका- काय झाल वसंत? आहेस ना तू की फोन कट झाला?

वसंत- अ..आहे ना…मी आहे…ऐकतोय.

इतक्यात अभिजित त्याच्या रूम अम्धून बाहेर आला आणि वसंतला म्हणाला-

अभिजित- मी आज दिवभर एका फ्रेंडकडे जाणार आहे. आज आई पण नाहीये. घरी तुम्ही एकटेच असाल. जेवणाच काय करणार?

वसंत- मी बघतो. तू जा…तू कधी येणार? आणि कुठे जातो आहेस?

अभिजित- मला लेट होईल. मी आरपोरा भागात जातोय. बाय…

हे बोलून अभिजित हातात चावी फिरवत निघून गेला. आरपोरा म्हणजे अंबा अंबालिका राहतात तो एरिया हे वसंतला माहित होत.

अंबालिका- काय रे काय झाल? तू कोणाशी बोलतो आहेस? मला नीट ऐकू येत नाहीये.

वसंत- ए…एक काम करूया. तू…तू माझ्या घरी का येत नाहीस? इथे आज कोणीच नाहीये. आपल्याला छान वेळ घालवता येईल. तुझा बर्थ डे मस्त सेलिब्रेट करू.

अंबालिका- ठीक आहे. येते मी एक तासात.

मोहित घरी पोहोचला तेव्हा बहुतेक सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. भिंती आणि छत काळ ठिक्कर पडलं होत. घरभर जळलेल्या कपडे आणि कागदांचे तुकडे पसरले होते. मोहितने बथारून मधून बादलीभर पाणी आणून धुमसत असलेल्या निखार्यावर ओतल आणि frustrate होऊन तो तिथेच खाली बसला. त्याचे कपडे आणि अंग राखेने काळे झाले. तो जवळजवळ अर्धा तास तसाच बसून होता. मग स्वतःला सावरत त्याने मोहिनीला फोन लावला. तिचा फोन रिचेबल नव्हता. बहुतेक तिच्या फ्लाईट ने टेक ऑफ केला होता. त्याने दुसरा फोन राखीला लावला आणि म्हणाला-

मोहित- तू आपल नात संपवलस आणि मोहिनीने माझ्या वस्तू जाळून तिच्या आयुष्यातील माझ अस्तित्व  आजच संपवलं. आता मी तरी जागून काय करू? मी पण संपेन लवकरच.

राखी- (प्रचंड घाबरून) मोहित क..काय झालय? एक मिनिट हे बघ तू असा काहीतरी विचार करू नको. मी येते आहे तिथे ओके? I am coming. मी निघते आहे लगेच. ऐक माझ…थांब…प्लीज मोहित….

राखीने फोन कट केला आन्ही गाडीची चावी घेऊन ती धावत घराबाहेर पडली.

आजचा संपूर्ण दिवस अभिजितने अंबाच्या सहवासात तिच्या घरात घालवला. तरुण कोवळा अभिजित आणि चाळीशी ओलांडलेली अंबा ह्याचं हे विचित्र नात पुढे कुठे जाणार ह्याची दोघांना पर्वा नव्हती. ते भविष्याचा विचार न करता वर्तमानात जगत होते. वसंतच्या घरी तो आणि अंबालिका आज प्रेमात आकंठ न्हाऊन निघत तिचा वाढदिवस सेलिब्रेट करत होते. त्यातच संध्याकाळ झाली. अंबालिकाने ट्वेंटी थ्री मध्ये जायचा हट्ट सुरु केला. पण अभिजित आणि अंबा तिथे यायची शक्यता लक्षात घेऊन अंदाज घ्यायला वसंत ने अभिजीतला फोन केला. अभिजित म्हणाला आज मी आणि माझे फ्रेंड्स हेवन डिस्कोला जाणार आहोत. ती खातरजमा झाल्यावर वसंत अंबालिका बरोबर ट्वेंटी थ्रीला जायला तयार झाला.

मोहितच्या घरी पोहोचलेल्या राखीला त्याच्या घराची हालत बघून प्रचंड शॉक बसला. तिने आगीत वाचलेलं  समान एका bag मध्ये भरलं आणि मोहितला हात धरून तिथून बाहेर काढला. आपल्या गाडीवर बसवून स्वतःच्या घरी आणला. त्याला परत नॉर्मलला आणण्यात तिचा सबंध दिवस गेला. मोहितला छान अंघोळ घालून तिने तयार केला. त्याच्यासाठी नवीन शर्टस आणि pants ती स्वतः जाऊन घेऊन आली. आता मोहित बराच सावरला होता. दोघे ट्वेंटी थ्री ला जायला तयार झाले होते. राखीने मोहितला कडकडून मिठी मारली आणि म्हणाली-

राखी- मोहिनी काय तू दहा बायकांशी लग्न कर नाहीतर अफेयर कर. तू मला जितका आवडतोस तितकाच आवडत राहशील. माझ तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते कधीच कमी होणार नाही.

तिचे पुढले शब्द मोहितने स्वतःच्या ओठांनी गिळून टाकले.

आज ट्वेंटी थ्री परत एकदा गेस्टच स्वागत करायला सज्ज झाल होत. शक्ती अन्नाची बायको मुल पाडायला तयार झाल्याने तो आज खुश होता. मोहित आणि राखी ने एन्ट्री मारली. राखी तिच्या रोजच्या टेबल वर बसली. मोहित त्याच्या dj कन्सोल मध्ये गेला. एका मागे एक track लावू लागला. त्याने आणि राखीने दोन duet पण गायली. आज रुख्सार फरीद शेठ बरोबर ट्वेंटीथ्री ला आली असल्याने तिच्या बरोबर एक रात्र काढायची स्वप्न बघणारा रंगा अन्ना आज स्वतः तिची सिगारेट शिलगावत होता. त्याला choice नव्हता. बार काउंटर जवळच्या उंच टेबलवर बसलेले वसंत आणि अंबालिका तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये धुंद होते. तेव्हाच फ्रेंड्स हेवन मध्ये काहीतरी राडा होऊन आज तो डिस्को बंद झाल्यामुळे तिथून निघालेले अभिजित आणि अंबा ट्वेंटी थ्रीच्या दारातून एन्ट्री घेत होते. रोज रात्री काहीतरी नाट्य इर्मान करायचं व्यसन असलेल ट्वेंटी थ्री आता आजच्या नव्या नाटकाची नांदी सुरु झालेली बघून सरसावून बसलं होत.

क्रमश:

ट्वेंटी थ्री…(भाग- 15  © मंदार जोग)

अंबा आणि अभिजित येऊन बसले. दोघांनी आपापली ड्रिंक्स ऑर्डर केली. आज दोघे खूप खुश होते. सबंध दिवस त्यांनी एकत्र घालवला होता. अभिजित अंबाला म्हणाला-

अभिजित- तू ह्या वयात पण कमाल आहेस.

अंबा- बाई ह्या वयातच कमाल असते. अनुभवी असते. Matured असते. पुरुषाच्या जातीला ओळखून असते. म्हणूनच आनंद देऊ आणि मुख्य म्हणजे घेऊ सुद्धा शकते.

अभिजित- पटलय हे लॉजिक. बर परत कधी भेटायचं ही आनंदाची देवाण घेवाण करायला?

अंबा- आनंद असा ठरवून नाही मिळवता येत. तो जितका अचानक आणि unplanned असेल ना तितका जास्त असतो.

अभिजित- ठीक आहे. तू म्हणशील तसं.

अस म्हणून अभिजितने अंबाचा हात हातात घेतला आणि दोघे सुरु असलेल्या गाण्याचा आनंद घेऊ लागले.

फरीदने रुख्सार साठी खास मालकाच्या stock मधली ग्लेन्फिडीच मागवली होती. ती सिप करत असलेल्या रुख्सारला तो प्रेमाने बघत होता. काल रात्री तिने त्याला इतका खुश केला होता की तो तिला आजही सोडायला तयार नव्हता. रुख्सारच त्याच्याकडे लक्ष गेल. तो आपल्याला न्याहाळतो आहे हे लक्षात येऊन ती म्हणाली-

रुख्सार- क्या देख रहे हो सेठ?

फरीद- तेरेकू देख रहा हू. साली इत्तीसी है लेकीन बिस्तर में आने के बाद शाणे से शाणे को पिघला देती ही तू.

रुख्सार त्याच्याकडे बघून फक्त हसली.

फरीद- आज भी आणे का ही मेरे साथ. एक काम कर. तेरा पुरे साल का package भाव बोल. मै आजीच रोकडा दे डालता ही तेरेको. सो ये रोज का झंझट नही.

रुख्सार- सेठ. कल किसने देखा है? आज की रात अपनी है. उसको एन्जोय करो ना.

फरीद- ये लो. अभी मेरेकू तेरेसे ये सब भी सिखना पडेगा? चल कोई बात नही. अपुन का दिल आ गया है तेरे पे. एक गाना गानेका तेरे लिये और फिर अपुन कल्टी होते है इधर से.

रुख्सार ने परत एकदा एक स्माईल दिल. फरीद ने रंगा अन्नाला इशारा करून बोलावला.

इथे वसंत ने त्यांच्या टेबल वर अंबालिकासाठी केक मागवला होता. वेटर ने तो केक आणून ठेवला. शक्ती अन्ना आणि काही स्टाफ त्यांच्या टेबल जवळ येऊन उभे राहिले. शेजारच्या टेबल वरचे काही फिरंग पण तिथे आले. सर्वांनी अंबालिकाला विश केलं. अम्बालीकाने केक कापला. लगेच मोहित ने ठरलेलं “बार बार ये दिन आये” हे गाण प्ले केल. अंबालिकाने वसंत ला केक भरवला आणि champagne ऑर्डर केली. फुकटात champagne मिळणार म्हणून वसंत खुश झाला. मग वेटर तो केक घेऊन गेले.

वसंत- आजचा तुझा वाढदिवस माझ्या लक्षात जास्त राहील.

अंबालिका- माझा कोणताच वाढदिवस इतका छान सेलिब्रेट झाला नव्हता. दिवस तुझ्याबरोबर खूप मस्त गेला आणि ही रात्र तर झकास सुरु आहे. Thanks वसंत माझ्या आयुष्यात इतका आनंद आणल्या बद्दल.

अस बोलून अंबालिकाने तिचा हात वसंतच्या हातावर ठेवला. इतक्यात वेटर champagne घेऊन आला. अंबालिकाने सराईतपणे त्याचा कॉर्क उघडला आणि वेटरने ती दोन ग्लासात पोअर केली. दुसरा वेटर अंबालिकाच्या वाढदिवसाच्या केकचे तुकडे करून तो ट्रे सर्व टेबल्स वरच्या कस्टमर समोर धरत होता. वेटर अभिजीत आणि आंबाच्या टेबल जवळ आला. आंबा आणि अभिजित नि एकेक तुकडा घेतला.

अंबा- आज माझ्या बहिणीचा पण वाढदिवस आहे.

अभिजित- मग तू तिच्याबरोबर असायला हव ना? इथे काय करते आहेस?

अंबा- अरे ती तिचा वाढदिवस तिच्या बॉय फ्रेंड बरोबर साजरा करणार आहे.

अभिजित- ओह म्हणजे तिलाही बॉय फ्रेंड आहे?

अंबा- नुसता आहे नाही. तुझ्यासारखा तो देखील बेड मध्ये सॉलिड आहे. फक्त वयाने मोठा आहे.

अभिजित- तुम्ही दोघी बहिणी अश्याच आहात का? बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या?

अंबा- अभि, आम्ही लहान वयात इतकं सोसलंय, इतकी दुनिया बघितली आहे ना की आता फक्त आनंदी राहायचं ठरवलं आहे. जो दिवस येईल तो आपला. काही लोक आम्हाला चालू समजू शकतात. पण आम्ही ह्या अश्याच आहोत. सुख देणार्या आणि घेणार्या. बाकी काय आहे आयुष्यात तूच सांग.

अभिजित तिच्या डोळ्यात हरवून गेला. त्याने आपल्या हाताने तिच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसले.

एका बेसूर टुरिस्टला दिल लेना खेल है दिलदार का हा track लावून देऊन मोहित राखीच्या शेजारी येऊन बसला. तिच्याच ग्लासातली बियर पिऊ लागला.

राखी- अरे ए…माझी बियर काय पितोस? तुझी मागव की.

मोहित- छे. तिला तुझी चव नसेल ना? तुझ्या बियरचा एक सिप पण नशा देतो.

राखी- हे जरा जास्त नाही का होतंय?

मोहित- प्रेम जास्त किंवा कमी नसत. ते असत किंवा नसत आणि माझ तुझ्यावर प्रेम आहे and that’s it.

राखी- हम्म…बर वाटतय तुला सावरलेला बघून.

मोहित- म्हणजे काय? आधार कोणाचा होता? द ग्रेट राखी चा ना?

राखी- हम्म…पण एक सांग मोहित.

मोहित- काय?

राखी- आपल पुढे काय होणार?

मोहित- तुला जे आवडेल ते होणार.

राखी- are you serious?

मोहित- (तिच्या हातावर हात ठेऊन तिच्या डोळ्यात बघत) हो….

राखी- then marry me….

मोहितने तिचा हात सोडला.

राखी- काय झालं?

मोहित- राखी तुला माहित्येय काय सिच्युएशन आहे ते. तरीही?

राखी- मला सर्व माहित आहे. पण ह्यातून मार्ग काढायचा आहे मला. मला तुझ्या चार मुलांची आई व्हायचं आहे. देशील मला तो हक्क? तू तयारी दाखव. मी मरेपर्यंत थांबायला तयार आहे.

मोहित- ४ मुलांची ऑफर फार tempting आहे. मी नाही म्हणूच शकत नाही. आज रात्रीच तयारी सुरु करुया जुळ्याची.

राखी- (त्याच्या हातावर मारत लाडाने) you dog. मी काय बोलते आहे आणी तू काय बोलतो आहेस?

मोहित- अग खरच. चार मुल चार वेळा कशाला? दोन वेळा होऊ देत. पण जुळी होऊ देत ना. त्यासाठी प्रयत्न नको का करायला?

राखी- त्या आधी लग्न करायला हव मिस्टर आणि त्यासाठी आपल्या दोघांना डिव्होर्स घ्यायला हवा.

मोहित- ओके. Lets do it. मी उद्याच वकिलांशी बोलतो. In fact आपण दोघे जाऊया. शक्ती अन्नाला विचारतो मी आज कोणी वकील असेल तर.

राखी- I love you मोहित.

मोहित- me too babes.

आज बेंजो भाई बर्याच दिवसांनी ट्वेंटी थ्री मध्ये आला. बरोबर पंटर होतेच. नेमके  तो आणि पंटर वसंतच्या टेबलच्या शेजारच्या टेबलवर बसले. आपापली दारू मागवून झाल्यावर त्यांच लक्ष वसंतकडे गेल.

बेंजो- काय रे वसंत काय बोलतो?

वसंत- मस्त भाई.

वसंतला संकटाची जाणीव झाली होती. तो हळूच अंबालिकाला म्हणाला-

वसंत- आपण इथून निघतोय. लगेच. तू उठ आणि बाहेर जा. मी अन्नाला सांगून येतो. पेमेंट उद्या करू.

हे बोलून वसंत उठून शक्ती अन्नाशी बोलायला बार counter वर गेला. अंबालिका champagne ची बाटली घेऊन निघाली. तिला निघालेली बघून बेंजो म्हणाला-

बेंजो- आयला champagne? आम्हाला नाही देणार? फक्त वसंतला देणार का तू?

हे ऐकून अंबालिकाची सटकली.

अंबालिका- तुझ्या आईला जाऊन विचार ना तुला देते का ते……champagne…

हे बोलून अंबालिका दाराकडे जाऊ लागली. बेंजोचा असा अपमान आजवर कोणीच केला नव्हता. बेंजो तिच्या मागे आला आणि तिला गर्रकन वळवली आणि म्हणाला-

बेंजो- काय बोलीस तू हरामी?

अस म्हणून त्याने अंबालिकाच्या पोटात आपला गुढगा मारला. अंबालिका कळवळत खाली कोसळली. ट्वेंटी थ्री मध्ये अचानक गोंधळ उडाला. बेंजो त्याच्या जागेवर येऊन बसला आणि फंटरना म्हणाला-

बेंजो- देऊन आलो तिला टोचन.

सगळे चमचे जोरात निर्लज्ज हसले. इतक्यात बेन्जोला त्याच्या डोक्यात काहीतरी जोरदार बसल्याची जाणीव झाली आणि त्याच्या डोक्यातून अचानक रक्ताचे ओघळ वाहू लागले.  डोक्यात असह्य वेदना होऊ लागल्या. त्याने तिरमिरत मागे बघितल तर हातात त्याच्या डोक्यावर फोडलेली champagne ची बाटली धरलेली अंबालिका रागाने थरथरत उभी होती. तिला बघून बेंजो अडखळत उभा राहिला आणि “मादरचोद” अशी शिवी हासडून त्याने त्याच्या बुटाची लाथ तिच्या पोटात मारली. अंबालिका भेलकाडत लांब जाऊन पडली. इतक्यात बेन्जोला त्याच्या मागून कोणाची तरी लाथ बसली. बेंजो खाली कोसळला. त्याला लाथ मारणारा वसंत होता.

वसंत- काय रे ए भडव्या..कुत्र्या…हीच तुझी मर्दानगी? बाई ला लाथ मारतोस? हे वाक्य संपेपर्यंत gang त्या पोरांनी वसंतला लोळवला होता. ते त्याला लाथा बुक्के आणि खुर्च्यांनी बुकलू लागले. सबंध हॉटेलात एकाच गोंधळ माजला होता. इतक्यात बेंजो हातात एका खुर्चीचा रॉड तोडून घेऊन आला. म्हणाला-

बेंजो- आज ह्याला घालतोच.

अस म्हणून बेंजो पुढे सरकला. आता गेम होणार हे लक्षात येऊन फंटर मागे झाले. बेंजो चालत पुढेह येऊन जमिनीवर पडलेल्या वसंत समोर उभा राहिला. त्याने तो रॉड दोन्ही हातात धरून बसंतच्या कपाळाच्या वर उंच धरला. आता फट एक वार आणि वसंतचा मेंदू बाहेर. इतक्यात बेंजोच्या पाठीवर चॉपरचा वार झाला. त्याच्या हातातून रॉड गळून पडला. फंटर लोक त्याला आधार देऊ लागले. दोघे गाडी आणायला पळाले. चकित झालेल्या वसंत ने डोळे उघडून बघितल तेव्हा हातात रक्ताने माखलेला चॉपर धरलेला अभिजित जमिनीवर पडलेल्या बेंजो कडे बघत रागाने थरथरत होता.

आज रक्ताची धुळवड खेळलेलं ट्वेंटी थ्री आणखी एका नाट्यमय  रात्रीच स्वागत करत हसत उभं होत.

क्रमश:

ट्वेंटी थ्री…(भाग- 16  © मंदार जोग)

बेंजोला शुद्ध आली ती हॉस्पिटल मध्ये. जखम खोल होती पण मणका जेमतेम वाचला होता. लोबो वगळता बाकी सगळे फंटर अंडर ग्राउंड झाले होते. बेंजोवर वार झाले ही खबर गोव्यात सर्वत्र पसरली होती. आणि बेंजोवर पण वार होऊ शकतात हे लोकांना कळल होत. ते करणारा अभिजित सारखा एक सामान्य पोरगा होता हे ऐकून सर्वांनाच अभिजितच कौतुक वाटत होत. बेंजोच स्टेटमेंट घेऊन इन्स्पेक्टर सावंत निघाले. बेंजो ने कोणी वार केले माहित नाही अस स्टेटमेंट दिल होत. म्हणजे हा नक्की बदला घेणार हे सावंत जाणून होते. सावंतांची जीप पोलीस स्टेशनकडे निघाली.

पोलीस स्टेशन मध्ये अभिजित लॉकअप मध्ये होता. इतकी मोठी घटना पण साक्ष द्यायला कोणीच पुढे येत नव्हत. पोलीस स्टेशन बाहेर मात्र गोवेकरांनी गर्दी केली होती. अभिजित सुटायला हवा अस सर्वांनाच वाटत होत. पण बेंजोवर वार करणाऱ्या अभिजितच्या बाजूने किंवा विरुद्ध साक्ष द्यायला कोणीच पुढे येत नव्हत. सावंतांच्या जीपच्या मागे एक कॅब पोलीस स्टेशनच्या आवारात शिरली. त्यातून अंबा, अंबालिका आणि वसंत उतरले. लोकात कुजबुज झाली. तिघे एक क्षण लोकांकडे बघून आत गेले. वसंत लॉकअप जवळ गेला आणि अभिजीतला म्हणाला-

वसंत- हे बघ तू समजतोस ना तसं नाहीये. म्हणजे…

अभिजित ने काहीही न बोलता त्याला हाताने आत्ता नको असा इशारा केला. त्याच्या मागे असलेल्या अंबा आणि अंबालिकाला एक लूक दिला. ते तिघे सावंत समोर येऊन बसले.

वसंत- सावंत साहेब मी बोललो ना तुम्हाला…चूक अभिजितची नाहीये. त्या बेन्जोने सुरुवात केली.

अंबालिका- हो साहेब. माझ्या पोटात इथे लाथ मारली त्याने. काय संबंध माझा त्याचा? मग हा मध्ये पडला तर ह्याच्या डोक्यात rod घालणार होता तो.

सावंत शांतपणे म्हणाले-

सावंत- बेंजो ने स्टेटमेंट दिल आहे की त्याच्यावर हल्ला कोणी केला हे त्याला माहित नाही म्हणून आणि अभिजितला हल्ला करताना पाहिलेला एकही साक्षीदार नाहीये. मग तुमचं स्टेटमेंट घेऊ का रेकॉर्ड वर?

वसंत- (आश्चर्याने) म्ह…म्हणजे बेंजो शुद्धीवर आला? बरा आहे तो? आणि….

इतक्यात दबंग कांबळे तिथे आले. सावंत आणि सर्वांनी उठून त्यांना कडक सल्युट केला. कांबळे सावंतांच्या खुर्चीवर बसले पिस्तुल टेबलवर ठेऊन म्हणाले-

कांबळे- बेंजो बरा आहे. चार दिवसात डिस्चार्ज मिळेल त्याला. अभिजितला आम्ही आता सोडतो. पण बेंजो खुन्नस ठेवणार. तुम्हा दोघांवर कधीतरी हल्ला करणार.

वसंत- पण साहेब हे तुम्ही सांगताय? तुम्ही त्याला अरेस्ट का करत नाही?

कांबळे- कोणत्या गुन्ह्यासाठी?

अंबालिका- माझ्या पोटात लाथ मारली त्यासाठी.

कांबळे- करतो. पण तुम्ही नंतर मागे हटायचं नाही.

अंबालिका- नाही हटणार.

कांबळे- ठीक आहे. डिस्चार्ज मिळाला की बेन्जोला अरेस्ट करतो मी. तुम्ही निघा. सावंत अभिजितला सोडा.

अभिजित लॉकअप मधून बाहेर आला. वसंत आणि अंबालिकाला एक लुक देऊन निघून गेला. त्या एका रात्रीत वसंतच सगळ आयुष्यच हादरल होत.

वसंत आणि अभिजित भेटले. घरी शक्य नव्हत म्हणून वसंत नडे त्याला बाहेर एका हॉटेल मध्ये बोलावलं. अभिजित येऊन बसला.

वसंत- thanks….

अभिजित- मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला लाज कशी वाटली नाही?

वसंत- (शांतपणे) तुला वाटली?

अभिजित- माझ लग्न नाही झालेलं अजून….

वसंत- म्हणून तुझ्या दुप्पट वयाच्या बाई बरोबर संबंध?

अभिजित- विषय तुमचा सुरु आहे.

वसंत- नाही. विषय आपल्या दोघांचा आहे. चूक असेल तर चुकलो दोघेही आहोत. कोणी जास्त आणि कोणी कमी. पण गिल्टी दोघेही आहोत. कारण दोघे पुरुष आहोत.

अभिजित- what do you mean?

वसंत- I mean what I said. तुझं लग्न झाल नाहीये म्हणून तुला पर स्त्री बद्दल कुतूहल आहे आणि माझ लग्न होऊन अनेक वर्ष झाल्यामुळे मला पर स्त्री बद्दल कुतूहल आहे. पुरुषाच्या आयुष्यात हेच होत. फक्त काहीना संधी मिळते कुतूहल शमवायची जशी आपल्याला मिळाली आणि काहीना मिळत नाही इतकंच. पण संधी मिळाली की प्रत्येक पुरुष पुरुषासारखाच वागतो.

अभिजित- पण आई….

वसंत- ती आहे कि सुखात. तिला काय कमी पडू दिलंय मी किंवा तुला पण. तुला हे कळल नसत तर आयुष्य मस्त सुरु होत ना तुमचं? आणि आता हे कळल्यावर अचानक मी व्हिलन झालो? का? तुला urge आहे तर मला का असू नये? काही गोष्टी लीगलच्या पलीकडे असतात. मी माझं stray वागण justify करत नाहीये. ते चूकच आहे. पण तू पण केली आहेस की ती चूक. आणि आपल्या दोघांच्या चुकीला एक कारण आहे. आपल्यालाच पुरुष म्हणून कळेल आणि पटेल अस कारण.

हे बोलून वसंत उठून लांब जाऊन उभा राहिला. अभिजित ने मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला-

अभिजित- आता पुढे काय?

वसंत- काही नाही. मी अंबालिकाला सांगणार आहे की केस मागे घे. उगाच फालतू कॉम्प्लिकेशन नकोत.

अभिजित- आणि पुढे?

वसंत- पुढे काय? Leave it to the destiny.

अभिजित वसंत च्या डोळ्यात बघत होता. त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला-

अभिजित- ठीक आहे. Let the destiny decide….

त्या रात्री ट्वेंटी थ्री परत एकदा कस्टमर्स नि फुलून गेल होत. मोहित कस्टमर्सच्या रिक्वेस्ट घेत होता. राखी ब्रीझर पीत त्याला बघत होती. रात्र चढत होती आणि राखीचा फोन वाजला. फोन राखीच्या मुलाचा होता. राखी हॉटेलच्या गोंगाटापासून दूर बाहेर गेली आणि तिने फोन घेतला.

राखी- हेलो…काय झाल?

मुलगा- बाबा गेला….उद्या सकाळी अंत्यसंस्कार आहेत….तू…तू येशील ना?

राखी सुन्न होती. प्रयत्न करूनही डोळ्यात अश्रू येत नव्हते. मुलगा फोनवर हेलो हेलो म्हणत होता. एक मोठा श्वास घेऊन राखी म्हणाली-

राखी- नाही….मला इथे काम आहे…..आणि मला परत फोन पण करू नको ह्यापुढे…

राखीने फोन कट केला आणि ती आत येऊन टेबल वर सुन्न बसली. त्याच वेळी मोहित ने “जिंदगी कैसी है पहेली हाए….” गायला सुरुवात केली होती. राखी विश्वजीत म्हणजे तिच्या नवर्याच्या उरल्या सुरल्या भल्या बुर्या आठवणी नुकत्याच पेटवलेल्या सिगारेटच्या धुरात कायमच्या विसरून जात होती. ट्वेंटी थ्री मात्र उद्याच्या सकाळची वाट बघत आजची रात्र एन्जोय करत होत.

क्रमश:

ट्वेंटी थ्री…(भाग- 17  © मंदार जोग)

रात्री राखी तिच्या घरी खिडकीत बसली होती. हातात वाईनचा ग्लास आणि बोटात सिगारेट होती. वेळ साधारण रात्री साडेतीन चारची. लांब दिसत असलेल्या रिकाम्या रस्त्यावर दोन कुत्री सोडली तर फक्त शांतता होती. अंधारात रोजची झाड काळी आणि विक्राळ दिसत होती. त्या रस्त्यावर राखीला ती आणि विश्वजीत दिसत होते. त्याचं लग्न, मुलाचा जन्म, मग झालेली भांडणे, डोमेस्टिक व्होयलंस…सगळ…तिच्या डोळ्यात अश्रू डचमळत होते. हातातल्या ग्लासात वाईन डचमळत होती. ती त्या रस्त्याकडे भकास बघत उभी होती. आयुष्यातील एक अध्याय संपला होता. तिने केव्हाच झुगारलेल एक बंधन आज तुटून एक औपचारिकता पूर्ण झाली होती. डोक्यात विचारांचं काहूर आणि छातीत धुरांची वलय होती. इतक्यात मागून तिच्या कमरेत आलेला मोहीतचा गात फिरत फिरत तिच्या नितळ पोटावर विसावला. त्याची बोट तिच्या बेंबीच्या भोवती वर्तुळ काढू लागली. त्याचे ओठ तिच्या मानेवरच्या tattoo च चुंबन घेताना त्याची दाढी तिला टोचू लागली. ती तशीच उभी होती. इतर वेळी ह्या कृतीनंतर झर्रकन वळून मोहितच्या बाहूत सामावणारी राखी आज थंड आहे हे जाणवून मोहित मागे झाला. दंडाला धरून तिला वळवून त्याने विचारलं-

मोहीत-  काय झाल बेब्स? बर वाटत नाहीये का?

राखी काही न बोलता मान खाली घालून उभी होती.

मोहित- तू मधेच अचानक निघून का आलीस? काय झालय? मला सांगणार नाही का?

राखी काहीच न बोलता जाऊन लो सिटींग वर बसली. मोहित तिच्या शेजारी जाऊन बसला. तिचा हात हातात घेऊन मोहित म्हणाला-

मोहित- राखी प्लीज बोल. सांग मला काय प्रोब्लेम आहे ते. माझ काही चुकलय का? प्लीज यार. बोल ना.

राखी निर्विकार चेहऱ्याने म्हणाली-

राखी- विश्वजीत गेला मोहित……

हे ऐकून मोहित हादरला. तिच्या हातावरची त्याची पकड सैल  झाली. काय बोलाव हे त्याला सुचत नव्हत. शब्दांची जुळवाजुळव करत मोहित म्हणाला-

मोहित- क..काय? विश्वजित? You mean your husband?….प…पण कसा…आय मीन कधी….तुला कस कळल?

राखी- (कोरडेपणाने) घरून फोन आला होता. काही तासांपूर्वी गेला तो.

मोहित- ओह….मग तुला जायचं असेल ना? मी काढतो फ्लाईटच तिकीट लगेच.

हे बोलून मोहित मोबाईल मध्ये तिकीट काढायला सरसावला. इतक्यात राखीचा निर्धारपूर्वक आवाज आला.

राखी- नको मोहित….मी जात नाहीये.

हे ऐकून मोहित आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. आणि म्हणाला-

मोहित- राखी अग पण तो तुझा नवरा….

राखी- ते फक्त एक नाव होत. नात केव्हाच संपल होत मोहित. मी माझ्या हाताने संपवलं होतं. आज फक्त नाव मेल.  नात्याला मी केव्हाच अग्नी दिला होता. मग आज का जाऊ?

मोहीत- अग पण….

राखी- मोहित do you love me?

मोहित चिकित होत म्हणाला-

मोहित- य…yes I do….

राखी- then show it to me…make love to me like never before……मला एकटीला सोडू नको कधीच…..

मोहितला हे अपेक्षित नव्हत. राखी काय बोलते आहे हे त्याला कळत नव्हत.

राखी- नाही ना सोडणार मला तू कधीच? मोहित मी खूप एकटी आहे रे. मला साथ हवी आहे तुझी. मला हा एकटेपणा सहन नाही होणार. प्लीज मोहित…show me that you love me….i beg of you…प्लीज….

मोहितने तिला शांत करायला तिच्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवला. राखी अचानक उठून त्याच्या मांडीवर बसली. दोन्ही पाय त्याच्या दोन बाजूला टाकून त्याला आपल्या कवेत घेत त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागली. वेड लागल्यासारखी. त्याच्या चेहरा ओला करत ती म्हणत होती-

राखी- मोहित प्लीज मला कधीच सोडू नको…मी मरून जाईन मोहित…..माझ्यावर प्रेम कर मोहित प्लीज…मी खूप खूप एकटी आहे मोहित….i need you baby…..

राखीने मोहितचा शर्ट ओरबाडून त्याला बेडवर आडवा केला. आपले कपडे काढून फेकून देत ती त्याच्या पोटावर बसली. त्याच्या छातीवर बोट फिरवत हळू हळू त्याच्यावर झुकली. त्याच्या ओठांवर ओठ टेकून त्याला जणू शोषून घेऊ लागली. मोहितची बोट तिच्या गोर्या उघड्या पाठीत रुतु लागली. एका क्षणी मोहितने कूस बदलत तिला आपल्या बाहूत घेतली. मग सकाळ होईपर्यंत दोघे प्रेमाच्या सागरात डुंबले. राखीला हवा असलेला आधार, विश्वास,  सहवास मोहितने तिला भरभरून दिला होता. त्या आनंदाच्या गुंगीत विवस्त्र झोपलेल्या राखीच्या अंगावर चादर घालून मोहित उठला आणि खिडकीत जाऊन त्याने सिगारेट पेटवली. मग दार उघडून दुधाची पिशवी आणि पेपर घेतले. किचन मध्ये जाऊन चहा आणि ओम्लेट बनवले. मग बाहेर येऊन राखीच्या केसातून हात फिरवत तिला हळूच जागी केली. राखी जागी झाल्यावर नशिल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत thanks म्हणाली. त्याला आपल्या मिठीत घेत त्याच जोरदार कीस घेऊन म्हणाली-

राखी- मोहित तू खरच प्रेम करतोस ना रे माझ्यावर?

मोहित- नाही. असाच मजा मारायला येतो मी मला गोव्यात दुसरी बाई मिळत नाहीये म्हणून.

राखी तशीच उठून उभी राहिली आणि म्हणाली-

राखी- माझ्यात काय कमी आहे रे की तुला दुसर्या बाईची गरज लागेल?

मोहितने पुढे होऊन तिच्या अंगावर चादर लपेटली आणि म्हणाला-

मोहित- तुला झालय काय राखी? विश्वजित गेल्याचा इतका धसका घेतला आहेस की वेड्यासारखी वागते आहेस.

राखी- (सिगारेट पेटवत) हो घेतलाय धसका. कारण एकदा धोका खाल्ला आहे. तरीही तो होता तेव्हा नवरा हे नाव तरी अस्तित्वात होत. उपयोग शून्य असला तरी त्या शून्याची किंमत होती. आता तो नाही कळल्यावर खूप अधांतरी वाटतंय रे. म्हणून तू हवा आहेस. म्हणून तुझ्याकडून प्रेमाची कबुली मागते आहे. मी तुला हव ते देईन पण मला सोडून नको जाऊ तू.

मोहित- तू शांत हो आधी. मी चहा आणतो तो पी मस्त आणि मग ओम्लेट sandwich देतो ती खा. You will feel better. मग शावर घे आणि चक्क आराम कर. रात्री झोपली नाहीयेस आणि मेहेनत खूप झाली आहे.

राखी- (हसून) मेहनत तर तू केलीस. मी काय नुसती पडून होते.

मोहित- माझ्या बरोबर पडून रहायला देखील stamina लागतो madam.

राखी- हा ते आहेच. म्हणून तर आवडतोस मला इतका.

अस म्हणून तिने त्याला मिठीत घ्यायला हात पसरले. तो तिला नमस्कार करून आत गेला आणि चहा घेऊन आला. तिला चहा देऊन परत आत जाऊन त्याने sandwich बनवली आणि ती घेऊन बाहेर आला. दोघांनी बसून चहा आणि sandwiches खाल्ली. मोहित निरोप घेत म्हणाला-

मोहित- सी यु स्वीट हार्ट. रात्री भेटू ट्वेंटी थ्री ला.

मोहित निघाला. राखीने त्याचा हात धरला. मोहित थांबला. राखीने त्याला अलगद मिठी मारली आणि म्हणाली-

राखी- thanks मोहित….आणि प्लीज माझ्याबद्दल गैरसमज नको करून घेऊ की काल रात्री हिचा नवरा गेला आणि लगेच ही मुलगी….

मोहितने तिच्या ओठावर बोट ठेवलं आणि म्हणाला-

मोहित- कळतंय मला सगळ. I am with you…

इथे राखीचा बांध फुटला. ती मोहितच्या खांद्यावर डोक टेकून ओक्साबोक्शी रडली. त्याचा उजवा खांदा तिच्या अश्रूंनी भिजून गेला. तिचा आवेग ओसरल्यावर तिला थोपटून मोहित म्हणाला-

मोहित- आता शावर घे आणि झोप ओके? रात्री भेटूया. बाय

मोहित गेल्यावर मिटणे दार लावून घेतलं आणि खिडकीत येऊन सिगारेट शिलगावली. काल रात्री निर्मनुष्य आणि अंधारलेला रस्ता आता वर्दळीचा आणि स्वच्छ प्रकाश असलेला दिसत होता!

फरीद्च्या फार्म हाउसवर रुख्सार फरीदला मस्त हेड मसाज देत होती.

फरीद- तेरे हाथो में जादू ही रुख्सार.

रुख्सार- और आपके दिल में इंसानियत है. इतना बडा आदमी होके भी नेक इन्सान है आप. मै आप के लिये कुछ भी करेगी.

फरीद- देख हा मी कुछ भी बोल सकता है. मै थोडा हटेला भी है.

रुख्सार- बोल के तो देखो.

फरीद- वादा?

रुख्सार- वादा सेठ. मांगो तो सही.

फरीद- मेरे साथ निकाह कर तू.

हे ऐकून त्याला हेड मसाज करणाऱ्या रुख्सारचे हात थांबले. तिचा कानांवर विश्वास नव्हता.

रुख्सार- सेठ ये क्या बोले आप. ये नही हो सकता.

रुख्सार उठून लांब गेली. फरीद उठून तिच्या समोर उभा रहात म्हणाला-

फरीद- तुने अभीच वादा किया है मेरेकू.

रुख्सार- सेठ मंगता है उतनी नाईट मांगो. मै फ्री में सोएगी तुम्हारे साथ लेकीन…

तिचं वाक्य संपायच्या आधी तिच्या गालावर फरीदचा हात पडला. कानात दडा बसला. रुख्सार भेलकांडली. आधीच गोरा असलेला फरीद  रागाने लाल होऊन थरथरत होता.

फरीद- तू नाईट सोएगी मेरे साथ? तेरेकु रंडी बनाकेच लाया था मै लेकीन प्यार हो गया मेरेकू तेरे से. क्या करू मै? तेरे को अकेला मर्द नही चलेगा क्या? रोज रात अलग मर्द की आदत पड गयी है ना?

रुख्सार- नही सेठ. ऐसा मत बोलो. लेकीन मेरी औकाद नही है. किधर आप इतना बडा सेठ और किधर मै….

फरीद- ए हिंदी फिल्लम के डायलॉग मत मार मेरेकू. शादी करेगी के नही ये बता.

रुख्सार त्याच्याकडे अविश्वासाने बघत सुन्न उभी होती. फरीद पुढे झाला. तिला मिठीत घेऊन म्हणाला-

फरीद- साली तुने मेरे को पागल कर दिया है. रुख्सार ने आपले दोन्ही हात त्याच्या भोवती आवळले. डोळ्यातून आनंदाश्रू येत असताना तिला डोळ्यसमोर शर्मिला दिसत होती.

रात्री ट्वेंटी थ्री रोजच्या सारख सजल होत. लोकांच्या जीवनात काहीही उलथापालथ झाली तरी ट्वेंटी थ्रीला त्याची तमा कधीच नसे. ते रोज रात्री सजून येणाऱ्या ग्राहकांच स्वागत करायाल सज्ज होत असे. रोजचे लोकल  पंटर आणि नवे टुरिस्ट हळू हळू जमू लागले होते. मोहित मस्त गाणी लावत होता. हौशी टुरिस्ट कारओके गात गळा साफ करत होते. गोव्यात येऊन चेकाळलेल्या त्यांच्या बरणी बायका शोर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस घालून दोन बियर मध्ये टाईट होऊन नवऱ्याच्या बेसुर्या गाण्याला टाळ्या वाजवून दाद देत होत्या. हे रोजच दृश्य बघणार्या स्टाफला त्यात काहीच वावग वाटत नव्हत. फक्त एखाद्या बाईने तिथेच ओकारी करू नये इतकीच प्रार्थना स्टाफ अन्नाकडे बघत करत होता. शक्तीं अन्ना गल्ल्यावर बसून मजा बघत होता. राखी तिच्या रोजच्या टेबलला होती आणि एका कोपर्यात  फरीद रुख्सारला घेऊन बसला होता. त्याचे फंटर शेजारच्या टेबलला होते. आज रुख्सार जाळ दिसत होती. फरीद शेठ ने तिच्यासाठी घेतलेला एक महागडा शोर्ट ड्रेस तिने घातला होता. सगळा माहोल सेट होता. तेवढ्यात दबंग कांबळे ने आज लवकर एन्ट्री घेतली. त्याला पाहून रंगा अन्ना जातीने येऊन एक डोळा फरीद शेठ वर ठेवत साहेबाची जातीने चौकशी करू लागला. वेटर ने अदबीने स्कॉच आणि खरे काजू आणून ठेवले. किचन मध्ये तंदुरी फिश चढवला गेला. दबंग साहेबाने चार घोट घेतले आणि तो डीजे कन्सोल वर गेला. मोहितला त्याने फर्माईश सांगितली. एक लुकड्या टुरिस्ट गात असलेल गाण अचानक बंद करून मोहित ने साहेबाचा track सुरु केला. दबंग कांबळे गाऊ लागला.

दारातून आत आलेल्या शर्मिलाला रुख्सारने पाहिलं. फरीदचा निरोप घेऊन ती शर्मिलाला भेटली. दोघी एका टेबल वर बसल्या. फरीद त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. रुख्सार ने हळू हळू शर्मिलाला ती आणि फरीद लग्न करणार असल्याच सांगितल. ते ऐकून शॉक झालेली शर्मिला म्हणाली-

शर्मिला- मग माझ काय? रुख्सार तुला पुरुष पण चालतात ग. पण मला फक्त तू लागतेस. प्रेम आहे माझ तुझ्यावर आणि तुझ पण माझ्यावर होत ना? मग?

रुख्सार- हो शर्मिला. अजूनही आवडतेस की तू मला. आपण बेस्ट फ्रेंड आहोत आणि राहू. पण आपल नात अनैसर्गिक आहे. ते आपण उघडपणे जगासमोर अनु शकत नाही. मला नशिबाने फरीद भेटला आणि मला आयुष्यात सेटल व्हायची संधी मिळते आहे .मी जशी आहे तशी त्याला मान्य आहे. तू पण कोणीतरी चांगला मुलगा बघ आणि सेटल हो शर्मिला.

शर्मिला- मला पुरुष नाही आवडत. माझ तुझ्यावर प्रेम आहे रुख्सार. मला आठवतात त्या आपण दोघींनी एकत्र जागवलेल्या रात्री. प्लीज मला सोडू नकोस.

रुख्सार- ऐक शर्मिला. प्लीज. तू समजून घे. हे आपल नात आता पुढे नाही जाऊ शकत. आपल्या ते इथे आणि आज संपवायला हव. आपण चांगल्या मैत्रिणी राहू. पण तेवढंच. प्लीज मला माफ कर आणि हे नात इथेच संपव. I am sorry….

इतक म्हणून रुख्सारने शर्मिलाच्या हातावर हात ठेऊन दिलासा दिला आणि ती उठून तिच्या टेबलवर जाऊ लागली. शून्यात बघत असलेल्या शर्मिलाने रुख्सार जात असलेल्या दिशेला नजर वळवली. तिला तिने आणि रुख्सारने एकत्र घालवलेल्या intimate रात्री डोळ्यासमोर तरळू लागल्या. डोळ्यात अश्रू जमा झाले. रुख्सार जागेवर येऊन बसणार इतक्यात मोठा आवाज झाला. दबंग कांबळे आणि सगळे कस्टमर आवाज आला त्या दिशेला बघू लागले. दबंग कांबळेने गायला जाताना त्याच्या टेबल वर विसरलेलं त्याचं सर्व्हिस  रिव्होल्वर घेऊन शर्मिलाने आपल्या डोक्यात मारलेली गोळी डोक्याच्या दुसर्या बाजूने बाहेर पडली होती. शर्मिला तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली. ट्वेंटी थ्री मधील प्रत्येक माणूस हादरला होता. स्मशान शांतता होती. रुक्सार घाबरून थरथरत होती. त्या शांततेत मोहितने ट्यून केलेल्या पुढील गाण्याचा track आपोआप सुरु झाला होता….बोल होते-

तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं

तेरी जान के सदके मैं, कुछ ऐसा कर जाऊं

तूने क्या कर डाला मर गयी मैं मिट गयी मैं

हो री हा हा री हो गयी मैं

तेरी दीवानी… दीवानी तेरी दीवानी… दीवानी….

स्तब्ध झालेलं ट्वेंटी थ्री आणखी एक नात घडताना आणि बिघडताना बघत हसत होतं!

क्रमश:

ट्वेंटी थ्री…(भाग- 18  © मंदार जोग)

पोस्ट मार्टेम होऊन शर्मिलाची बॉडी मिळेपर्यंत दुसर्या दिवशीचे दुपारचे दोन वाजले. ट्वेंटी थ्री चे नेहमीचे पंटर स्मशानात होते. शर्मिलाचे आईवडील तिच्या गावावरून आले होते. आई हंबरडा फोडून रडत होती. “मी नको म्हणत होते तरी एकट्या पोरीला गोव्याला पाठवली तुम्ही” अस म्हणत शर्मिलाच्या वडिलांना दुषणे लावत होती. समोर चितेवर शर्मिलाचा देह जळत होता आणि प्रचंड गिल्ट मनात असलेली रुख्सार रात्रभर झालेल्या जागरणाने आणि रडल्यामुळे लाल झालेल्या डोळ्यांनी विषण्णपणे त्या चीतेकडे बघत होती. स्मशानात वसंत, अभिजित, अंबा, अंबालिका आले होते. इतक्यात बेंजो पण त्याच्या पंटर लोकांबरोबर आला. पाठीवर टाके तसेच होते. मधेच ते ओढले हेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती. चीतेकडे बघून त्याने स्वतःच्या नाकावरून छातीवर हात आणत छातीवर क्रॉस काढला आणि चीतेकडे बघत उभा राहिला. त्या जाळाच्या पलीकडे उभे असलेले वसंत आणि अभिजित त्याला दिसले. बेंजोच्या चेहऱ्यावर विकृत हास्य आल. त्याने पंटर लोकांना इशारा केला. मोहितच्या ते लक्षात आल. त्याने वळून पाहिलं. त्याला वसंत आणि अभिजित दिसले. बेंजो चे पंटर हळू हळू गर्दीतून त्या दोघांच्या मागे जाऊन उभे राहिले. त्यांच्या खिशातल्या सायकल चेन मुठीभोवती आवळल्या गेल्या. जीन्सच्या पुढल्या भागात ठेवलेल्या घोड्याच्या ट्रिगर वर ग्रीप घटत करून बेंजो पुढे सरसावला. आता इथे लफडा होणार ह्याची कल्पना आलेले लोकल्स हळू हळू कल्टी झाले, जाताना दोघांनी शर्मिलाच्या आई वडिलांना पण बरोबर ओढून नेलं. आता स्मशानात बेंजो, त्याचे पंटर, वसंत, अभिजित, अंबा, अंबालिका, मोहित आणि राखी उरले.

बेंजो ने घोडा उजव्या हातात घेऊन वसंत च्या कानशिलावर लावला. त्या थंड नळीच्या स्पर्शाने वसंत घाबरला. बेंजो म्हणाला-

बेंजो- ए वसंत तू आणि तुझा हा पोरगा गोव्याचे भाई झालात काय? डायरेक बेंजो भाई वर वार? आणि ते पण ह्या हवा गेलेल्या टायर्स साठी?

आपल्याला हवा गेलेले टायर्स म्हटलेलं अंबा अंबालिका दोघींना फारसं आवडलं नाही. पण बेंजोच्या हातात घोडा आणि डोक्यात बदला होता. दोघी गप्प राहिल्या. बेंजो ने घोड्याच्या चापावर बोट ठेवलं. वसंत ने घाबरून डोळे बंद करून घेतले.

अभिजित- ए बेंजो त्याला सोड. काय करतोय तू?

इतक्यात पंटर लोकांनी अभिजितच्या मुसक्या आवळल्या. बेंजो आता चाप ओढणार इतक्यात मोहित म्हणाला-

मोहित- ए बेंजो तू कधी प्रेमात पडला आहे का?

हा अनपेक्षित प्रश्न ऐकून बेंजो मोहितच्या दिशेला वळला. म्हणाला-

बेंजो- काय? काय बोलला तू?

मोहीत- मी विचारलं तू कधी प्रेमात पडला आहेस का?

बेंजो मोहितच्या दिशेने चालत येऊ लागल्यावर राखी घाबरून मोहितच्या मागे त्याला धरून उभी राहिली. बेंजो मोहितच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला-

बेंजो- तुला काय करायचं आहे. हा आमचा matter आहे. तू निघ तुझ्या आयटम ला घेऊन. नाहीतर तुला पण इथेच घालीन.

मोहित- माझ्या प्रश्नाच उत्तर दे. मी जातो.

बेंजो- ए हिरो, मी तुझ्या बापाचा नोकर नाहीये उत्तर बित्तर द्यायला. चल निघ.

मोहित- सत्य स्वीकारायची भीती वाटते सांग की.

आता बेन्जोची सटकली. त्याने पिस्तुलाची नळी मोहितच्या कपाळावर टेकवली आणि म्हणाला-

बेंजो- तू स्वतःला स्मार्ट समजतो काय रे भेंचोद?

मोहित त्याच्या डोळ्यात शांतपणे बघत म्हणाला-

मोहित- माझ्या प्रश्नच उत्तर दे, खर उत्तर. मग तुला कळेल मी काय म्हणतो आहे ते. मायकल तू प्रेमात पडला आहेस का कधी?

आपल्याला मायकल ह्या नावाने कोणीतरी हाक मारल्याच ऐकून बेंजो चकित झाला. म्हणाला-

बेंजो- क..काय बोलला बे तू?

मोहित- मी विचारलं, मायकल तू प्रेमात पडला आहेस का कधी?

मोहित शांतपणे त्याच्या डोळ्यात बघत होता. बेंजो च्या नजरेतील राग जाऊन तिथे थोडा त्रास आणि दु:ख दाटून आल.  तो म्हणाला-

बेंजो- केलं ना. आपण पण प्रेम केल. आपण भाई आहे म्हणजे माणूस नाहीये काय? केल आपण त्या डायस अंकलच्या पोरीवर, जेनी वर प्रेम केल. पण डायस ने तिला जबरदस्ती लग्न करून दुबईला पाठवायचा प्लान केला. जेनी विष पिऊन मेली. मी डायस अंकल चे दोन्ही पाय तलवारीने उडवले. तेव्हापासून हा मायकल बेंजो भाय झाला.

बेंजो जेनी च्या आठवणीने ढसा ढसा रडू लागला. सगळे पंटर त्याला रडताना बघून आवाक झाले होते. मोहित पुढे आला. बेन्जोला थोपटून म्हणाला-

मोहित- तुझ्या जेनी च्या पोटात कोणी लाथ मारली असती तर?

बेंजो उसळून उभा राहिला आणि म्हणाला-

बेंजो- त्या मादरचोदची आतडी बाहेर काढली असती मी.

मोहित- मग वसंतच काय चुकल? तू जिच्या पोटात लाथ मारलीस ती त्याची जेनी आहे. आणि आपल्या बापावर हल्ला होतोय हे जाणवल्यावर अभिजित ने मुलगा ह्या नात्याने जे केल ते कसं चुकल तूच सांग.

बेंजो निरुत्तर झाला. फाडफाड गालावर मारून घेत मोहित समोर रडत सॉरी म्हणाला. मग वसंत आणि अभिजितची माफी मागून निघून गेला. मोहित आणि राखी वसंत आणि अभिजितला एक स्माईल देऊन स्मशानातून निघून गेले. स्मशानात आता वसंत. अभिजित, अंबा, अंबालिका आणि एक ओक्वर्द सायलेन्स उरले होते.

अंबालिका- वसंत… मला वाटत आपण इथेच थांबण योग्य ठरेल.

वसंत चकित होऊन म्हणाला-

वसंत- what? का?

अंबा- कारण आम्ही दोघी खरच तो बेंजो म्हणाला तसे हवा गेलेले टायर्स आहोत. आणि वसंत तू पण. अरे आपण आपलं आयुष्य बर वाईट जसं होत तस जगलो आहोत. भविष्य ह्या तुझ्या अभिजितच आहे.

अंबालिका- आपल्या चौघात जे गुंतागुंतीच नात तयार झाल आहे त्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम अभिजितच्या भविष्यावर होणार आहे. आणि आम्ही तुमच्या आयुष्यात आलो ते ठरवून नाही. भेटी झाल्या, मैत्री झाली, आकर्षण वाढलं आणि आता आपण इथे आहोत.

अंबा- पण आकर्षण हाच एखाद्या नात्याचा बेस असू शकत नाही ना? आणि आपल्या नात्यात तोच बेस आहे आणि त्यामुळे वसंत तुझ्या family life वर त्याच्या impact होतो आहे.

अंबालिका- आम्ही दोघी कश्याही असलो तरी एखादा संसार मोडून आपला आनंद मिळवणाऱ्या नक्कीच नाही आहोत. सो अंबा I think आपण गोवा सोडून जाणं जास्त योग्य ठरेल.

अंबा- हो. आपण जाऊ. आपल्याला काय? कुठेही राहू आपण. पार्टी करणे आणि आयुष्य फुल on जगणे हेच तर करायचं आहे.

वसंत- पण….

अंबालिका- वसंत यार इमोशनल व्हायचं नाही ओके? ए अभिजित पटलय का? आता पुढे ह्या अंबा सारखी aunty नको शोधू. तुझ्या वयाची पकड एखादी आणि लग्न कर. फुल भरलेल्या टायरची गाडी चालवून बघ. हवा गेलेले टायर विसरशील.

ह्या जोकवर डोळ्यात आलेले अश्रू पुसत चौघेही हसले.

वसंत- पण गर्ल्स तुम्ही गोवा सोडून जाई पर्यंत आपण चौघे फ्रेंड असू. मस्त मजा करू ओके?

दोघी- ओके.

चौघे स्मशानातून निघाले. आता चिता पण विझायला आली होती…

तो दिवस तसाच भकास गेला. पण प्रत्येक रात्र फक्त पार्टी करणार ट्वेंटी थ्री आज रात्री देखील गजबजलेलं होत. आज रात्री काय घडणार हे माहित असलेली नियती सरसावून टपून बसली होती. ट्वेंटी थ्री मध्ये गर्दी हळूहळू वाढत होती.

क्रमश:

ट्वेंटी थ्री…(भाग- 19  © मंदार जोग)

मोहीतचा मूड आज ऑफ होता. काहीतरी मिसिंग होत. काय नक्की ते कळत नव्हत. तो स्लो गाणी लावून शांतपणे गात बसला होता. लोक देखील येऊन सेटल होत मंद गाण्यांचा आस्वाद घेत होते. फरीद येऊन त्याच्या टेबल वर न बसता आज गल्ल्यावर बसला होता. त्यामुळे रंगा  अन्ना फार इंसिक्योर झाला होता. ह्याने जर धंदा सांभाळला तर आपल काय होणार ह्या विचाराने तो टेन्स होता. शेवटी न राहवून फरीद जवळ येऊन अन्ना म्हणाला-

अन्ना- सेठ आप बैठो. आपके टेबल पे. मै है ना गल्ला सम्भालने को.

फरीद- नही. तुम्हाला contract अगले महिनेसे खतम. अभी अपुन सब हॉटेल संभालेगा.

त्याच्या तोंडून हे स्पष्ट ऐकल्यावर अन्नाला सोन्याच अंड देणारी कोंबडी हातातून निसटताना दिसू लागली.

अन्न- क्या सेठ. अपना इतने साल का रिलेशन ही आप के साथ आप के पिताजी के साथ.

फरीद- अन्ना अपुन रुख्सार के साथ निकाह करनेवाला है. उसके वास्ते अपुन सब उलटा काम छोडके घर के धंदे मी ध्यान देगा. तुम को इसमे रहनेका ही तो थोडा अलग contract बनाना पडेगा. मंगता ही तो किसी को भेज के मेरी गाडी से मंगा लो. चलेगा तो बोलो.

इक्यात त्याला रुख्सार येताना दिसली. फरीद ने तिला हात करून आपल्या शेजारी बसायला बोलावली. अन्ना ने अदबीने तिला स्टूल रिकाम करून दिल आणि तो फारीद्च्या गाडीतून पेपर्स आणायला गेला.

फरीद- देख रुख्सार. तू ये गम मी से बाहर निकल फिर मेरे को बोल. अपन निकाह करेंगे. ठीक है?

रुख्सारच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तिने मानेने होकार दिला. इतक्यात वसंत, अभीजीत, अंबा आणि अंबालिका फुल ऑन पार्टी मूड मध्ये आले. विकास ने पुढे येत माईकचा ताबा घेतला. फास्ट बीटची गाणी गात त्याने माहोल बदलून टाकला. मग दुसरा एक माणूस गायला लागल्यावर मोहितने त्याला विचारलं-

मोहित- काय रे विकास आज एकदम मूड मध्ये? आणि बाप बेटा दोघे आपापल्या मैत्रीणीना घेऊन एकत्र?

विकास- हो यार. ह्या दोघी उद्या चालल्या गोवा सोडून.

मोहित- what?

विकास- हो. हमारा साथ इतना ही था.

मोहित- कुठे चालल्या?

विकास- हैदराबाद.

मोहित- पण का?

विकास- आता तू पण का विचारतोस? माझ्यात आणि अभिजित मध्ये लोचे होऊ नयेत म्हणून.

मोहित- ओह…ओके….

विकास- इतक्या बायका फिरवल्या मी. पण साला ह्या दोघी बहिणी वेगळ्याच आहेत रे. म्हणून आज रात्री फुल धमाल करणार आम्ही चौघे. सकाळी त्यांना एअर पोर्टवर सोडल्या की मग परत कधीच इथे येणार नाही मी. मन उडेल माझ इथून.

मोहित- हम्म…एक announcement मी पण करतोय. ऐक.

विकास त्याचा निरोप घेऊन जागेवर जाऊन बसला आणि राखीने एन्ट्री घेतली. राखी आज स्लीव्हलेस ब्लाउज आणि साडी नेसून आली होती. येऊन नेहमीच्या टेबल वर बसून तिने मोहितला एक फ़्लाईन्ग कीस फेकला. मोहितने तो झेलत माईक हातात घेतला.

मोहित- गाईज मी मोहित लेले. जवळ जवळ गेल दीड वर्ष मी इथे तुमची करमणूक करतोय. इथेच ह्या ट्वेंटी थ्री मध्ये मला अनेक दोस्त मिळाले.

तो हे बोलत असताना बेंजो आणि gang येऊन बसले. दबंग कांबळे पण आले. मोहित बोलत होता.

मोहित- हे हॉटेल म्हणजे फक्त हॉटेल नाहीये. ही एक family आहे. ह्या वस्तूला नाती घडवायची आणि बिघडवायची वाईट सवय आहे. माझच बघा. मी इथे आलो. माझ सर्वस्व संपल्यावर आलो. पण मला ह्या हॉटेलने आधार दिला, आश्रय दिला, नोकर्फी दिली. त्यासाठी मी फरीद शेठ आणि दोन्ही अण्णांचा आभारी आहे. मग इथेच मला राखी भेटली. राखी प्लीज वर ये.

राखी त्या लहानश्या डान्स फ्लोर कम स्टेजवर गेली. मोहितच्या शेजारी उभी राहिली. तिचा हात आपल्या हातात धरत मोहित म्हणाला-

मोहित- राखी भेटली आणि माझ्या आयुष्यात निर्माण झालेली एक रिकामी पोकळी तिने तिच्या अस्तित्वाने, प्रेमाने भरून काढली. आम्ही दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालो. आम्हाला आमचे वैयक्तिक प्रॉब्लेम, past होत आणि अजून देखील आहे. पण तरीही त्यातून मार्ग काढून आम्ही दोघांनी एकत्र फ्युचर लिहायचा निर्णय घेतला आहे.

सगळे उत्कंठेने ऐकत होते.

मोहित- आणि त्याच्या दृष्टीने पाहिलं पाउल म्हणून मी ही नोकरी उद्यापासून सोडणार आहे. माझ फरीद शेठशी बोलण झाल आहे आणि त्यांनी मला परवानगी दिली आहे त्यासाठी त्यांचे आभार. मी उद्या सकाळच्या फ्लाईट ने मुंबईला जाणार आहे. काही लीगल इश्यू आहेत ते सोर्ट करून दोन दिवसांनी परत येणार आहे. मग मी आणि राखी….राखी तू सांग.

राखी- मोहित परत आला की मी आणि मोहित आमचं स्वतःच एक फिटनेस लाऊंज सुरु करणार आहोत. तिथे दिवसा फिटनेस, योगा ह्याचे क्लासेस असतील आणि रात्री एक authentic goan food देणार restaurant असेल. तिथे सर्व्ह होणार जेवण ग्राहकांच्या हेल्ठ्ला पूरक अस असेल. आणि आमच्या ह्या स्वप्नाला देखील फरीद शेठ ह्यांच्या वडिलांचा शकूर शेठ ह्यांचा पाठींबा आणि आधार आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.

आता मोहित आणि राखीने हात जोडले. सर्व लोकांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. त्याना फेअरवेल दिल.  त्या रात्री ट्वेंटी थ्री नव्या आनंद आणि उत्साहाने भरून राहील होत. पहाटे पर्यंत सगळे बेहोष होऊन जल्लोष करत होते. एक रात्र संपून सर्वांच्या आयुष्यात एक नव्या सुखाची पहाट येऊ घातली होती. काही नाती संपली होती काही दृढ झाली होती. पूर्वेच्या आकाशात लाली पसरली होती.

सकाळी विमान रन वे वरून ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर वेगाने धावू लागल. मोहित खिडकीतून बाहेर बघत होता. विमानाने हलकेच हवेत झेप घेतली. खिडकीच्या काचेतून मोहितला टुमदार गोवा आणि समुद्र दिसत होते. त्या अथांग समुद्राबरोबर त्याच्या मनात गोव्यातील गेल्या दीड वर्षाच्या वास्तव्याच्या अनेक कटुगोड आठवणी आणि त्या दरम्यान भेटलेले लोक होते. विमान हळूहळू आकाशात स्थिरावले. गोवा केव्हाच ढगांच्या खाली लपून गेल. पण आठवणी मात्र त्याच्या मनःपटलावर तश्याच ताज्या होत्या. अगदी काल रात्री सर्वांनी त्याला दिलेल्या हृदय फेअरवेल पर्यंतच्या आठवणी! साला पाच मर्डर आणि पंधरा हाफ मर्डर केलेला, एरवी तांबरलेल्या डोळ्यांच्या रान डुकरासारखा दिसणारा बेंजो भाई पण ढसाढसा रडला! त्याच्याबरोबर जे इतर रडले त्यात छत्तीस एन्काऊंटर केलेले एसीपी कांबळे उर्फ दबंग साहेब पण होते. त्या आठवणीने मोहितच्या निळ्या कोकणस्थी डोळ्यात पाणी येऊन ते त्याच्या गोऱ्या गालांवर ओघळल! त्याने हाताने डोळे पुसून गॉगल लावला आणि खिडकीतून विमानाच्या पंखांच्या हालचालीकडे बघितलं! त्याला गोव्याला परत यायचं होत. एक नवीन आयुष्य आणि राखी त्याची वात बघत होते.

समाप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!