मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मृगजळ भाग २२

खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सोनेरी सूर्यकिरणांनी चेहरा उजळून गेलेला श्रीरंग खूप handsome दिसत होता. मानसी त्याला बघण्यात हरवून गेली होती.
इतक्यात श्रीरंगने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. त्याने पाहिलेलं बघताच मानसीने नजर खिडकीकडे फिरवली. आता विमानाने देखील दक्षिण दिशेकडे वळून गोव्याच्या दिशेने प्रस्थान सुरू केलं होतं.

काळ्या आणि रोझी रिसॉर्टमध्ये तिघांच्या स्वागताला स्वतः हजर होते. त्यांना पाहून सौरभ म्हणाला-

सौरभ- काय रे? आज एकदम स्वागत वगैरे. आम्ही इतर वेळी येतो तेव्हा संध्याकाळी येता भेटायला. मग आज काय विशेष?

काळ्या- आज श्रीरंग पहिल्यांदा आलाय ना? मग त्याचं स्वागत नको करायला. Welcome श्रीरंग. ही आमाझी बायको रोझी… आणि रोझी हा श्रीरंग. मानसी वहिनीचा फ्रेंड.

श्रीरंग- हाय..

रोझी- हाय..

श्रीरंग- माझ्या इतक्या स्वागताची गरज नाही. Treat me like Saurabh and Manasi.

काळ्या- हो. पण अगदी सुरुवातीलाच इम्प्रेशन खराब कसं करायचं ना. म्हणून स्वागत केलं. परत जाईपर्यंत मित्र होशील आणि आमचे खरे रंग बघशील.

श्रीरंग- मला खात्री आहे तुझा बाहेरचा आणि आतला रंग एकमेकांच्या विरुद्ध असतील.

काळ्या- वा. ह्या वाक्यासाठी आमच्यातर्फे हे welcome drink.

सगळे हसले. वेटरने आणलेलं welcome drink प्यायले. सौरभ आणि मानसी त्यांच्या रूममध्ये गेले आणि श्रीरंग त्याच्या रूममध्ये गेला. श्रीरंगच्या रूमला बाल्कनी होती. श्रीरंग फ्रीजमध्ये ठेवलेला बिअरचा can घेऊन बाल्कनीत जाऊन उभा राहिला. त्याच्या शेजारच्या रूमची बाल्कनी त्याच्या बाल्कनीला लागून होती. श्रीरंग समोर दिसत असलेली झाडं आणि रस्ते बघत होता. इतक्यात एक पक्षी उडत जाताना त्याला दिसला. त्या पक्ष्याला फॉलो करत तो डावीकडून उजवीकडे मान वळवत होता. पक्षी उडून गेला आणि उजवीकडच्या बाल्कनीत उभी असलेली सुंदर मुलगी त्याला दिसली. वय तिशीच्या आत-बाहेर असेल. सोनेरी केस, गोरी पान, उत्तम फिगर.. बहुतेक साउथ अमेरिकन असावी असा अंदाज श्रीरंगच्या अनुभवाने बांधला. इतक्यात तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. श्रीरंगने स्माईल करत हातात can चिअर्स केल्यासारखा तिला दाखवला. तिनेही थम्स अप दाखवून स्माईल केलं. मग दोघे आपापल्या बाल्कनीत उभे राहून बाहेर बघू लागले.

सौरभ आणि मानसी त्यांच्या रूममध्ये बोलत होते.

सौरभ- श्रीरंग आपल्या बरोबर बोअर तर नाही ना होणार?

मानसी- छे. अजिबात नाही. तो फार accommodating आहे. तो एन्जॉय करेल ही ट्रीप.

सौरभ- तू फार खुश दिसतेस तो आपल्या बरोबर आला आहे म्हणून.

मानसी- फार खुश वगैरे नाही. पण he is a damn good company आणि माझा best फ्रेंड आहे. So तो आल्याचा आनंद आहे मला.

सौरभ- पण हा अचानक आलाय… म्हणजे तू कधीच त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस मला.

मानसी- कारण सांगण्यासारखं काहीच नव्हतं. तो कधीच माझ्या आयुष्यातून निघून गेला होता.

सौरभ- पण आता परत आलाय.

मानसी- हो आलाय ना. पण तू असा का बोलतो आहेस? काय प्रॉब्लेम आहे?

सौरभ- प्रोब्लेम आहे ना. माझ्या समोर दुसरं एक माणूस माझ्या गर्ल फ्रेंडच्या इतका क्लोज आहे हे पाहून मला प्रॉब्लेम वाटतोच. तुझ्या आयुष्यात फक्त मीच असायला हवा. तुला मी कोणाशीही शेयर नाही करू शकत.

हे ऐकून मानसी वैतागली आणि म्हणाली-

मानसी – शी किती घाण विचार करतोस तू. शेयर म्हणजे काय? मी त्याच्या बरोबर राहते की त्याच्या बरोबर झोपते? तुला नक्की काय म्हणायचं आहे? आणि तू जर इतका पझेसिव्ह आहेस आणि माझ्या आयुष्यात असलेला एक मित्र तुला इतका खुपतो. तर तुझ्या आयुष्यात तर एक अख्खी बायको आहे. जी तुझ्या घरात तुझ्या बेडरूममध्ये तुझ्या बरोबर झोपते, सोशल इव्हेंटमध्ये तुझी बायको म्हणून मिरवते, म्हणजे त्यात संशय नाहीये तर fact आहे. मी सहन करते आहे ना तुझं दोन दगडांवर उभं राहाणं गेली दहा वर्षं? मी तुझ्यासारखा घाण विचार केला नाही ना?

सौरभ- फरक आहे मानसी. प्लीज. माझं लग्न झालं आहे आणि तो श्रीरंग लग्न न करता तुझ्या आयुष्यात आलाय.

मानसी- तुला जर तुझ्या लग्नाचा इतका अभिमान आहे ना तर त्यातच राहायचं होतंस ना. माझ्या आयुष्यात का आलास? आणि आला आहेस तर मग त्या तुझ्या बायकोला जिने माझी बदनामी केली तिला सोडून का देत नाहीस? दहा वर्षं का लागतात तुला? एक तर माझं आणि रंगाचं असं काहीही नाहीये. आणि असतं ना तर त्याने जगासमोर ते मान्य केलं असतं. माझ्याशी लग्न केलं असतं. कारण तो तुझ्यासारखा फट्टू नाहीये.

हे ऐकून सौरभ चिडला आणि जोरात ओरडला-

सौरभ- मानसी…

मानसी- आवाज चढवू नको. आपण तुझ्या मित्राच्या रिसॉर्टमध्ये आहोत, तुझ्या घरात नाही. त्या मित्राला ऐकू गेलं तर तुझं खोटं उघडं पडेल. त्यालाही कळेल की तू इतकी वर्षं जिला बायको म्हणून त्यांच्या समोर आणलीस ती तुझी बायको नाहीये. मग तुझ्या त्या खोट्या रेप्युटेशनचं काय होईल?

सौरभ- बास मानसी. Enough.

मानसी- तेच मी तुला पण सांगते आहे enough. मी तुझी बायको नाहीये वाट्टेल ते ऐकून घ्यायला… आणि तिने तर तुझं काहीच ऐकून घेतलं नाही. म्हणून तर आपण इथे आहोत आज.

हे ऐकून सौरभ चिडला आणि रागाने रूममधून बाहेर गेला. जाताना जोरात दरवाजा लावून गेला. हे नेमकं त्यावेळी आपल्या रूममधून बाहेर येणाऱ्या श्रीरंगने पाहिलं.
तो त्यांच्या रूमजवळ आला आणि त्याने बेल वाजवली. मानसीने दार उघडलं. तिने डोळे पुसले असले तरी ती आत्ताच रडली असल्याचं श्रीरंगच्या लक्षात आलं. ते त्याच्या लक्षात येईल ह्याची खात्री असलेल्या मानसीने त्याच्यापासून नजर चोरली आणि ती आत निघून गेली. श्रीरंग तिच्या मागे आत आला.

श्रीरंग- काय झालं? सौरभ चिडून बाहेर गेलेला पाहिला मी. आणि तू पण रडलेली आहेस. भांडण झालं का?

मानसी- हम्म..

श्रीरंग- काय यार भांडता तुम्ही? लहान आहात का? इथे मस्त एन्जॉय करायला आला आहात ना? मग एन्जॉय करा. मी तर म्हणतो मस्त हनिमून साजरा करा.

मानसी- तू हे सांगायला आला आहेस इथे?

श्रीरंग- नाही. तू ठीक आहेस ना हे पाहायला आलोय.

मानसी- पाहिलंस ना? मग जा आता.

हे बोलून ती त्याच्याकडे पाठ करून बेडवर बसली. श्रीरंग तिच्या शेजारी बसला. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला-

श्रीरंग- तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. तू चिडलीस की सुंदर दिसतेस हे तुला मी सांगितलं ना तेव्हापासून मुद्दाम चिडून दाखवतेस मला. बरोबर ना?

हे ऐकून मानसीला हसू आलं. ती त्याच्याकडे वळून म्हणाली-

मानसी- रंगा तू एक नंबर वाईट आहेस. माझा मूड कसा चांगला करायचा हे तुला बरोब्बर कळतं.

असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि तितक्यात सौरभ रूममध्ये आला. त्या आवाजाने दचकून मानसी मागे होणार होती पण श्रीरंगने तिला घट्ट धरून ठेवली आणि सौरभकडे बघत तो म्हणाला-

श्रीरंग- काय रे सौरभ. माझ्या मैत्रिणीला रडवलंस तू. किती समजूत काढावी लागली मला तिची माहित्येय.

सौरभ- हो दिसताच आहे किती समजूत काढतो आहेस ते.

श्रीरंग- म्हणजे काय दिसायलाच पाहिजे. Dude… (बेडवरून उठत) she is a sweet girl. तिला hurt नको करू यार… मस्त एन्जॉय करा ट्रीप ओके? मानसी मी जातो. Have fun guys.

हे बोलून तो निघून गेला. सौरभ बाथरूममध्ये जात म्हणाला-

सौरभ- आपल्याला अर्ध्या तासात निघायचं आहे. काळ्या आणि रोझी वाट बघतायत. तयार हो.

सौरभ त्यांच्या रूमच्या बाहेर येऊन पायऱ्या उतरून खाली जायला निघाला तेव्हा त्याची फोरेनर शेजारीण पण खाली जात होती. दोघांची नजरानजर झाल्यावर स्माईल एक्स्चेंज झाली. श्रीरंगने हात पुढे केला आणि अमेरिकन accent मिश्रित इंग्रजीत म्हणाला-

श्रीरंग- हाय, मी श्रीरंग from NYC. तू साउथ अमेरिकन आहेस का?

मुलगी- (आश्चर्याने) तुला कसं माहित?

श्रीरंग- बहुतांश सुंदर मुली साउथ अमेरिकन असतात. किंवा असं म्हणूया की बहुतांश साउथ अमेरिकन मुली सुंदर असतात.

मुलगी खुश होत हसली आणि म्हणाली-

मुलगी- तुझा guess बरोबर आहे. मी एमिली.. from ब्राझील.

श्रीरंग- मला वाटलंच होतं. तुझी हाईट, स्कीनटोन आणि एकूण व्यक्तिमत्व तू ब्राझिलियन असणार हेच सांगत आहे.

मुलगी- अच्छा? That’s interesting.

श्रीरंग- मी माणूसच interesting आहे असं माझ्या ब्राझिलियन मैत्रिणी नेहमी म्हणतात.

मुलगी- अच्छा? अजून काय काय म्हणतात तुझ्या मैत्रिणी?

श्रीरंग- मला कथा सांगताना बियर लागते. आपण खाली रेस्तोरंटमध्ये बियर पीत बसुया का?

एमिली- good idea. मलाही गोष्टी ऐकताना बियर प्यायला आवडते. आणि कोणी ती पाजत असेल तर जास्तच आवडते.

श्रीरंग- ओह. Be my guest. लेट्स go…

त्याने हात पुढे केला. एमिलीने तिचा नाजूक हात त्याच्या हातात दिला. श्रीरंगचा फॉर्म्युला ४४ परत एकदा कामी आला होता. एमिली त्याचा गोव्यातील स्टे अविस्मरणीय करणार होती आणि कधीच विसरता न येणाऱ्या रंगाच्या आठवणी घेऊन आपल्या देशात परत जाणार होती.

मानसी आणि सौरभ वीस मिनिटांत तयार झाले. रिसेप्शन शेजारी असलेल्या काळ्याच्या ऑफिसात आले. काळ्या आणि रोझी तयारच होते.

काळ्या- अरे वा. वेळेत आलात एकदम. Good.

सौरभ- लेट्स go.

रोझी- श्रीरंग कुठे आहे?

सौरभ- माहित नाही. त्याला नसेल यायचं कदाचित. आपण जाऊया.

काळ्या- नाही असं कसं. थांब.

असं म्हणून त्याने बाहेर जाऊन रिसेप्शनवरून श्रीरंगच्या रूममध्ये इंटरकॉम केला. काहीच प्रतिसाद आला नाही. इथे मानसी पाणी प्यायला म्हणून ऑफिस शेजारीच असलेल्या रेस्तोरंटमध्ये गेली आणि तिथे एकमेकांशी गप्पा मारत खिदळत असलेल्या श्रीरंग आणि एमिलीला पाहून चकित झाली. तेवढ्यात श्रीरंगने तिला पाहिलं आणि हात दाखवून बोलावून घेतली.

श्रीरंग- हाय. मीट एमिली. माझी ब्राझिलियन मैत्रीण. आमच्या मैत्रीला ३० मिनिटं झाली. आणि एमिली ही मानसी माझी इंडियन मैत्रीण मानसी. आमच्या मैत्रीला ३० वर्षं झाली.

एमिली- हाय…

मानसी- हाय एमिली… रंगा, आपल्याला निघायचं आहे.

श्रीरंग- ओह yes… हम्म… एमिली… तुझा काय प्लॅन आहे?

एमिली- काही खास नाही.

श्रीरंग- मग तू चल ना आमच्या बरोबर. काय मानसी?

मानसी- हम्म.. पण संदीपला विचारायला..

श्रीरंग- ओह yes. गाडीत जागा नसली तर? एमिली, हे लोक गाडीने जातील. मी बाईक हायर करतो. आपण त्यांना फॉलो करू चालेल?

एमिली- मी ऑलरेडी रेंट केलेली बुलेट आहे. आपण ती वापरू शकतो.

श्रीरंग- ओह awesome. ग्रेट. मग निघूया आपण. ये तुझिया बाकी सर्वांशी ओळख करून देतो.

हे बोलून त्याने हात पुढे केला. एमिलीने तिचा हात त्याच्या हातात दिला.

श्रीरंग- (मानसीला) चला…

ते तिघे काळ्याच्या ऑफिसात आले. तिथे श्रीरंगने एमिलीची सर्वांना ओळख करून दिली. काळ्या आणि रोझीला गोव्यात राहून ह्याची सवय होती त्यामुळे त्यांना उलट कौतुकच वाटलं. सगळे निघाले. श्रीरंग आणि एमिली बाईकवर आणि बाकीचे काळ्याच्या गाडीत. गाडीत काळ्या आणि रोझी त्यांना गोव्यातल्या वेगवेगळ्या जागा, दिसणारी ठिकाणं ह्यांची माहिती देत होते. सौरभ ते ऐकून रीस्पोंड करत होता.
मानसी मात्र स्वतःच्याही नकळत गाडीच्या साईड मिररमधून दिसणाऱ्या श्रीरंग आणि एमिलीला बघत होती. एमिलीने आता हळूच त्याला मिठी मारली होती आणि त्याच्या खांद्यावर हनुवटी ठेवून ती त्याच्या कानात बोलत होती. मानसीला कळत नव्हतं की त्या दोघांना आनंदात पाहून तिच्या मनात जी भावना येत होती ती जेलसी होती की राग होता की दोन्ही? मानसी अस्वस्थ झाली होती. आणि सौरभच्या मागे बसलेली एमिली आता त्याला घट्ट बिलगून बसली होती. मानसी दोन्ही मुठी आवळून साईड मिररमध्ये बघत होती.

क्रमश:

पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग २३- शेवटचा भाग

मागील भागाची लिंक- मृगजळ भाग २१

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “मृगजळ भाग २२”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!