मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

अंकिता तिच्या स्कूटरवर बसून क्लासला निघाली होती. अंकिता एकूणच सगळ्या जगावर रुसलेली असायची. तिला तिच्याव्यतिरिक्त बाकी सगळे मूर्ख, बेजबाबदार, बेअक्कल वाटत. त्यामुळे जनरली लोकांशी बोलताना देखील तिचा टोन अत्यंत मुजोर असायचा. त्यात तिची वहिनी, म्हणजे अजयची बायको अजिता थेट तिच्यासारखी ठकास महाठक होती. त्यामुळे तिचं आणि अंकिताचं फार पटत नसे. त्यामुळे अजयची मात्र बायको आणि बहिणीच्या मध्ये पंचाईत व्हायची. अंकिता आणि अजिता समोरासमोर आल्या की ठिणग्या पडायच्या. अंकिता अजयला नेहमी म्हणायची की तुझी बायको तुला तिच्या तालावर नाचवते. तिला मुठीत ठेव. आणि अजिता पण त्याला म्हणायची, आता बहिणीच्या पदराखालून बाहेर पड. तुझाही संसार आहे. अजय दोघींनाही हो म्हणून वेळ मारून न्यायचा. आजही अंकिता मनातल्या मनात अजिताला शिव्या घालत स्कूटर चालवत होती.

गोव्यात सौरभ आणि मानसी काळ्याच्या रिसॉर्टवर पोहोचले. काळ्या आणि रोझी दोघेही त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. रिसॉर्ट खरंच खूप सुंदर होतं. भरपूर झाडं, मोठ्या स्वच्छ रूम्स. प्रत्येक रूमला बाल्कनी. बाहेर गच्च झाडी आणि त्यापलीकडून ऐकू येणारी समुद्राची गाज. सौरभ आणि मानसी बघताक्षणी त्या रिसॉर्टच्या प्रेमात पडले. आता काळ्या मालक आणि हे गेस्ट असल्याने फोटो आयडी वगैरे देण्याचा प्रश्नच नव्हता. रोझी खरं तर काळ्यापेक्षा हुशार, दिसायला कडक आणि स्मार्ट होती. सौरभ त्याच्या कानात म्हणाला देखील, “काळ्या, ही रोझी म्हणजे तुला लॉटरी लागलेली आहे.” त्यावर काळ्या पण म्हणाला, “जशी ही मानसी तुझी लॉटरी आहे तशीच.” त्या दोघांना त्यांच्या रूममध्ये सोडून काळ्या आणि रोझी निघून गेले. सौरभने रूमचा दरवाजा बंद केला आणि पाठमोरी उभी असलेल्या मानसीला मागून घट्ट मिठी मारली.

मानसी- हे काय?

सौरभ- माहित नाही?

मानसी- आताच तर आलोय आणि लगेच?

सौरभ- का? असा काही नियम आहे का की हॉटेलमध्ये आल्यावर अमुक मिनिटं किंवा तास थांबव आणि मग प्रेमाला सुरुवात करावी?

मानसी- नाही. पण असंही कुठे लिहिलेलं नाहीये की हॉटेल रूममध्ये आल्याबरोबर प्रेमाला सुरुवात करावी.

सौरभ- मग ते आपण लिहूया.

मानसी- तुला जरा उसंत नाहीये ना? अजून मी रूम नीट पाहिली देखील नाही. आणि काय रे, तू त्याच्या कानात काय बोललास आणि तो काय बोलला?

सौरभ- ते आमचं boys secret आहे.

असं म्हणून सौरभ तिच्या मानेला किस करू लागला.

मानसी- सौरभ…

सौरभ- हम्म…

मानसी- तू अंकिताला आपल्याबद्दल कधी सांगणार आहेस?

हे ऐकून सौरभ वैतागला आणि तिच्यापासून दूर झाला.

सौरभ- हे काय नाटक आहे यार?

मानसी- नाटक काय त्यात? तू जे मान्य केलं आहेस त्याबद्दल मी विचारलं. तू गोव्याला आल्यावर सांगणार म्हणाला आहेस ना?

सौरभ- मी गोव्याहून परत जायच्या आधी सांगेन असं म्हणालो आहे. जाऊ दे. माझा सगळा मूड गेला. सोड…

मानसी- मूड का गेला? आणि तुझा मूड जसा महत्त्वाचा आहे तसा माझाही मूड लक्षात घे तू. तू अंकिताला आत्ताच का सांगून टाकत नाहीस? I mean, ते सांगितल्यावर मला बरं वाटेल. अंकिताला दोन दिवस cool off व्हायला मिळतील आणि तू घरी परत जाशील तेव्हा ती बऱ्यापैकी शांत झालेली असेल.

सौरभ- मानसी, प्लीज मागे नको लागू. मी सांगेन म्हणालो आहे ना? मग सांगेन मी. आता कधी सांगायचं ते तू नको ठरवू.

मानसी- नाही सौरभ. मला हल्ली खूप टेन्शन येतं. खूप गिल्टी वाटतं की मी एका लग्न झालेल्या माणसाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. ताई आणि जीजाजी मधूनच माझ्या लग्नाचा विषय काढतात आणि मी तो टाळते. मला हे pressure नकोय. प्लीज. आधीच ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे.

सौरभ- मग नोकरी बदल ना.

मानसी- नोकरीत स्ट्रेस आहे म्हणून नोकरी सोडू? आणि तुझ्यामुळे जो स्ट्रेस आहे त्यासाठी तुला सोडू?

सौरभ- What?

मानसी- टेन्शनपासून पळून जाणं हा ऑप्शन नसतो सौरभ. ते face करून पुढे जाणं हाच योग्य मार्ग असतो. ऑफिसात मी ते करते आहे. पण आपल्या नात्यात पुढे तुला यायचं आहे. अंकिताला पार करून आणि मागे सोडून.

सौरभ- पण…

मानसी- ते काही नाही. तुझा फोन दे मला…

सौरभ- पण…

मानसी- दे म्हणाले ना?

तिने सौरभचा फोन घेतला. त्याच्या मांडीवर बसून तो unlock केला आणि अंकिताचा नंबर डायल केला.

अंकिता स्कूटरवर बसून क्लासला चालली होती. मनात अजिताला शिव्या घालत होती. फोन तिच्या पर्समध्ये होता आणि पर्स सीटच्या खाली ठेवलेली होती. तिला फोनची रिंग ऐकू आली नाही. फोन कट झाला.

सौरभ- झालं समाधान?

मानसी- हो झालं. तू फोन माझ्या हातातून काढून न घेता फोन लावू दिलास. ही हिंमत दाखवलीस त्यासाठी तुला एक बक्षीस.

असं म्हणून तिने त्याला एक किस दिला. पण सौरभ तिला बाजूला सारून लांब जात म्हणाला-

सौरभ- काही गरज नाहीये. माझा सगळा मूड ऑफ झाला आहे.

मानसी त्याला मागून येत मिठी मारत म्हणाली-

मानसी- मला तुझा मूड परत कसा आणायचा ते माहित आहे.

सौरभ- अच्छा? कसं काय?

मानसी- तुझ्या सगळ्या चाव्या माझ्याकडे आहेत ना? कुठली चावी फिरवली की तुझा मूड on होतो आणि कुठली फिरवली की तू प्रेमात वेडा होतोस हे मला माहीत आहे ना? म्हणून.

सौरभ- अच्छा? मग कर मला वेडा. बघूया तू कोणती चावी फिरवतेस ते.

मानसी- मला challenge? ठीक आहे. Accepted. फक्त तू चावी लागू देऊ नको. बघू किती कंट्रोल आहे तुझा स्वतःवर.

असं म्हणून तिने हाताला धरून सौरभला बेडवर बसवलं आणि एक एक करून स्वतःचे कपडे काढून त्याच्या तोंडावर फेकू लागली. कमी होणाऱ्या तिच्या प्रत्येक कपड्यागणिक सौरभची उत्तेजना वाढत होती. शेवटी मानसीचा भरगच्च गोरा विवस्त्र देह पाहून सौरभचा संयम सुटला. त्याने पुढे जाऊन तिला उचलून घेतलं.

मानसी- काय रे, काय झालं? चावी चांगलीच बसलेली दिसते.

सौरभ- दाखवतो तुला आता चावी किती बसली आहे ते.

असं म्हणून त्याने तिला बेडवर टाकलं आणि दोघे एकमेकांच्या बाहुपाशात हरवले. त्याच वेळी क्लासला पोहोचलेल्या अंकिताला सौरभचा मिस्ड कॉल दिसला म्हणून तिने त्याला फोन लावला. सौरभच्या फोनची रिंग वाजत होती. त्यावर अंकिताचं नाव दिसत होतं. पण सौरभला काहीच ऐकू येत नव्हतं. तो मानसीच्या रोमारोमात स्वतःचं नाव कोरण्यात हरवला होता. मानसीच्या तृप्त डोळ्यांत उद्याची आशा आणि स्वप्न देखील होतं. बाकी ती पूर्ण होणार की नाही हे येणारा काळच ठरवणार होता.

क्रमश:

सर्व भागांची एकत्र लिंक- मृगजळ- सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!