रिफ्लेक्शन भाग ७ (शेवटचा भाग)
मानसीचे मेल बघून स्वप्नील तिच्या केबिनमध्ये आला. मानसी शांत बसली होती.
स्वप्नील- So you did it finally?
मानसी- Yes!
स्वप्नील- मी कारण नाही विचारणार. आज तुमची मीटिंग आहे म्हटल्यावर मला अपेक्षा होतीच की काहीतरी घडणार. Anyway. If you have taken the decision, I am with you. उद्या पार्टीला येणार की नाही मग?
मानसी- Don’t be silly Swapnil. I have resigned.
स्वप्नील- So? आणि तुझं रेझिग्नेशन अजून एक्सेप्ट झालेले नाही. HR and your reporting manager are yet to accept or even act on your resignation. तू अजूनही एम्पलॉई आहेस आणि रहाशील. So you are coming for the party tomorrow.
मानसी- No I won’t Swapnil! मला यायची इच्छा नाहीये. I don’t deserve anymore insults.
स्वप्नील- What insults? एक ऐक. तू रेसिग्नेशन देऊन मनाने बाहेर पडली आहेस ना?
मानसी- हो.
स्वप्नील- मग झालं तर. उद्या प्रेक्षक म्हणून ये. आपण धम्माल करू. And you know that I am an optimistic guy. I believe in miracles and I expect one tomorrow.
मानसी- Oh come on Swapnil. Its over. सगळं संपल आहे. And I am fine with it. I gave Harshad some peace of mind today. सुरुवात त्याने केली होती. शेवट मी केला.
स्वप्नील- Your wish! But let me tell you हा शेवट नसेल आणि नवी सुरुवात असू शकेल. Think about it. I will wait for you tomorrow. Hope to see you setting the party on fire! Bye!
स्वप्नील जातो. मानसी डोकं घट्ट धरून बसून रहाते. मग लॅपटॉप बंद करून निघते. वाटेत देशपांडे भेटतात.
देशपांडे- स्वप्नीलने मला सांगितलंय. जा घरी आणि आराम कर.
मानसी- हम्म
देशपांडे- तू युद्धभूमी सोडली आहेस पण युद्ध अजून संपले नाहीये. उद्या पार्टीत तुझी वाट बघतो आम्ही.
इतके बोलून तिच्या उत्तराची वाट न पाहात देशपांडे निघतात. मानसी गाडीत बसून घराकडे निघते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला ऑफिसला जायची ईच्छा होत नाही. ती तशीच पडून रहाते. अक्खा दिवस आळसात आणि विचार करण्यात जातो. साधारण पाच वाजता स्वप्नीलचा मेसेज येतो “See you at the party!” मानसी मनाशी निर्धार करून उठते. तिला स्वप्नीलचे शब्द आठवतात की “प्रेम माणसाला वीक नाही तर स्ट्रॉंग बनवते. जे वीक बनवते ते प्रेम नसते.” मानसी तयार होऊन निघते. आज मानसी आपल्या सौंदर्याने खरच पार्टीत आग लावणार असते!
पंचतारांकीत हॉटेलातील बँक्वेट हॉलमध्ये उत्साहाचं वातावरण असत. प्रोजेक्टच्या यशाने सगळेच आनंदी असतात. तमाम सप्लायर्स, व्हेंडर्स आणि कास्टमर्स आलेले असतात. देशपांडे कोपऱ्यात बसून आपले लिंबूपाणी पीत, काजू खात मानसीची वाट पहात असतात. स्वप्नील सर्वांशी बोलत असला तरी लक्ष दरवाज्याकडे असते. हर्षद सर्व पाहुण्यांशी बोलत असतो. पण कुठेतरी हरवलेला असतो. राधिका नेहमीप्रमाणे त्याच्या मागेपुढे करत त्याच्यासकट पाहुण्यांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असते. इतक्यात दरवाजा उघडतो. डार्क निळ्या इव्हिनिंग गाऊनमध्ये अप्रतिम दिसत असलेली मानसी प्रवेश करते. राधिकासकट सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळतात. तिची आणि हर्षदची नजरानजर होते. ती एक जळजळीत कटाक्ष टाकून दुर्लक्ष करते. हर्षद समाधानाने हसतो.
मानसी स्वप्नीलला शोधून त्याच्याशी गप्पा मारत उभी रहाते. काही पाहुणे आणि कलीग्सशी हाय हॅलो एक्स्चेंज होतात. मानसी सावकाश ब्रीझर घेत पार्टीत आग लावत उभी असते. आज ती विशेष सुंदर आणि आकर्षक दिसत असते. एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद तिच्या वागण्यातून दिसत असतो. पार्टीला रंग चढत असतो.
स्वप्नील- (तिला आपादमस्तक न्याहाळत) आज विचार काय आहे?
मानसी- काय?
स्वप्नील- आज इथे काही हृदय बंद पडणार नक्की!
मानसी- उगाच मला झाडावर चढवू नको. (राधिकाकडे बघत) तो बॉम्ब बघ.
स्वप्नील- अगं बॉम्ब कितीही छान असला तरी हुशार माणूस त्याला घरात आणत नाही कारण बॉम्ब फक्त विनाश करतो. तू सुंदर तेवणाऱ्या पणती सारखी दिसत आहेस. घरी न्यावीशी वाटणारी. आपल्या उजेडाने घराच्या कानाकोपऱ्यात उजेड पसरवणारी!
मानसी- आज चक्क फ्लर्ट? लाईन मारायला लागलास की काय माझ्यावर?
स्वप्नील- How I wish! पण अडकलोय ना दुसऱ्या पणतीमध्ये! आणि ती पण तुझ्याइतकीच माल दिसते. You have met her damn it.
मानसी- Of course. Swati is beautiful. पण हे “माल” विशेषण मी तिला सांगणार आहे.
स्वप्नील- Please go ahead. In fact तीच मला म्हणाली होती की “मानसी खरच काय माल दिसते!” म्हणून!
मानसी- (जोरात हसून) You both are mad and made only for eachother!
स्वप्नील- हम्म! Let’s see who is made for you.
इतके बोलून स्वप्नील हर्षदकडे बघतो आणि मानसीला डोळा मारतो. मानसी त्याला एक जोराचा चिमटा काढते. स्वप्नील कळवळतो आणि चिमटा काढलेला हात चोळत “सॉरी यार! It hurts” इतके म्हणतो. इतक्यात हर्षद डायसवर येऊन माईक हातात घेतो. –
हर्षद- Your attention please ladies and gentlemen!
म्युझिक बंद होत. लोकांच्या गप्पात खंड पडून सगळे त्याच्याकडे बघू लागतात. हर्षद बोलत असतो-
हर्षद- मित्रांनो प्रत्येक प्रोजेक्ट बंद होताना आपण “lessons learnt” ची नोंद करतो. प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. आपण केलेल्या चूका देखील लक्षात आणून देतो. आपण ह्या सर्वांची नोंद अश्यासाठी करतो की जे चांगलं झालय ते भविष्यात आणखी सुधाराव, ज्या चुका आहेत त्या भविष्यात टाळाव्या आणि नवीन चुका कराव्या!
सगळे मनापासून हसतात.
हर्षद- (हसत) Seriously I mean it. As they say to err is human, we all have the right to make the new mistakes. पण जुन्या चुका सुधारून नवीन करणे हे प्रगतीचे लक्षण आहे. जुन्या चुका न सुधारणे इगो किंवा मूर्खपणाचे लक्षण आहे.
हे वाक्य बोलून तो मानसीकडे बघतो. मानसी नजर फिरवते. स्वप्नील दोघांकडे एक एकदा बघतो. कोपऱ्यात बसलेले देशपांडे हर्षदच्या तोंडून हे अनपेक्षित वाक्य ऐकून सावरून बसतात.
हर्षद- मूर्खपणाला इलाज नाही पण ईगोवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. फक्त कोणीतरी आपल्याला आरसा दाखवणे आवश्यक असते. ईगो असलेल्या माणसाचे त्यात दिसणारे प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन खूप भयानक दिसते. त्या व्यक्तीला स्वतःला घाबरवणारे. पण असा आरसा दाखवणारी व्यक्ती खूप नशीबवान लोकांनाच भेटते.
हर्षद परत मानसीकडे हसत बघतो. ह्यावेळी मानसी वळून त्याच्याकडे बघते. तो हळूच हसतो. मानसी परत मान फिरवते. स्वप्नील आणि देशपांडे सरसावून ऐकत असतात.
हर्षद- तर आजचा हा यशाचा दिवस मी काही चुका सुधारून साजरा करणार आहे. तुम्हाला त्याची कल्पना लवकरच येईल. So its time to announce the awards.
हे ऐकून राधिका हातातील ग्लास बाजूला ठेऊन मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यात बघत मेकअप ठीकठाक असल्याची खात्री करून घेते. आजूबाजूला असलेल्या लोकांकडे एक कटाक्ष टाकून उठायची तयारी करते.
हर्षद- पाहिलं बक्षीस आहे ह्या प्रोजेक्ट मधील outstanding contribution साठी. And the award goes to …
मानसी पाठमोरी असली तरी ऐकत असते. ती मुद्दाम वळत नाही. राधिकाचा चेहरा बघायची तिची इच्छा नसते. स्वप्नील पुढचे ड्रिंक घेतो आणि ऐकत असतो. राधिका उभी राहून चार पावले पुढे चालत जाते.
हर्षद- And the award for the outstanding contribution goes to Swapnil!
हे ऐकून मानसी अविश्वासाने गररकन वळते. स्वप्नीलला ड्रिंक घशात अडकून ठसका लागतो. देशपांडे चार काजूंचा बकाणा भरून उभे रहातात. राधिका जागीच थिजून उभी रहाते.
हर्षद- (हसत स्वप्नीलकडे बघत) Swapnil please come and collect your award!
स्वप्नील जातो. हर्षदला शेकहँड करून बक्षीस स्वीकारतो. तिथूनच मानासीला डोळा मारतो. मानसी टाळ्या वाजवत असते. स्वप्नील परत येतो. मानसी त्याला मिठी मारून त्याच अभिनंदन करते. हर्षद हे पाहून हसतो.
हर्षद- This is not it. अजून एक स्पेशल अनाउन्समेन्ट आहे.
सगळे शांत होऊन ऐकू लागतात. हर्षद शांतपणे बोलत असतो-
हर्षद- मी ह्या प्रोजेक्टची पहिली मीटिंग घेतली तेव्हा एका मुलीने त्याला सर्वांसमक्ष विरोध केला. पण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास होता म्हणून मी तिचा विरोध न जुमानता प्रोजेक्टला गो अहेड दिला. And here we are. (मानसी ऐकत असते.) पण जसा ह्या प्रोजेक्टला विरोध करणारी एक मुलगी होती तशीच हे प्रोजेक्ट यशस्वी व्हावं म्हणून झटून काम करणारी एक मुलगीच होती. (हे ऐकून राधिका खुश होते. कुत्सितपणे मानसीकडे बघते. मानसी दुर्लक्ष करते) त्या मुलीने हे प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण व्हावं म्हणून against all odds आपले contribution दिले. तिला बक्षीस मिळणे अनिवार्य आहे.
हे ऐकून राधिका जवळजवळ डायसवर पोहोचते.
हर्षद- पण त्या आधी त्याहूनही महत्वाची एक घोषणा. आपल्या व्हीपी फायनान्स मानसी ह्यांनी राजीनामा दिला आहे!
एकदम कुजबुज सुरु होते. उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती मानसीकडे बघत असते. मानसीला हा धक्का अनपेक्षित असतो. ती स्वप्नीलकडे बघते. तो पण गोंधळलेला दिसत असतो.
हर्षद- पण…मित्रानो पण मी तो राजीनामा स्वीकारलेला नाही. (मानसीकडे बघत) मानसी तुला काय वाटत की तू सुरुवातीला प्रोजेक्टला विरोध करून आता प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर माझ्या तोंडावर राजीनामा फेकून सहज जाऊ शकतेस? मग तू हर्षदला अजून ओळखले नाहीयेस. मी तुझा राजीनामा स्वीकार करत नाही पण तुला ह्या क्षणापासून व्हीपी फायनान्स पदावरून टर्मिनेट करतो! (स्वप्नीलकडे बघत) Swapnil please note this as an HR head of the organisation!
संबंध पार्टीत पिन ड्रॉप शांतता पसरते. राधिकाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो. देशपांडे चष्मा काढून पुसतात. मानसी डोळ्यात आलेले पाणी लपवत खाली बघत रहाते. स्वप्नीलला देखील हा शॉक असतो!
हर्षद- तर आता अवॉर्ड. त्या मुलीला जिच्याबद्दल मी मगाशी बोललो. जिच्याशिवाय हा प्रोजेक्ट कधीच यशस्वी झाला नसता. ती मुलगी आजपासून ह्या कंपनीची CEO आहे. तसेच माझ्या घराची चेअर पर्सन आहे. (राधिकाकडे बघत) Radhika will you please come here?
राधिका आनंदाने वेडी होऊन धावत त्याच्याजवळ पोहोचते. मानसी हातातील बाटली ठेऊन निघते. स्वप्नील तिचा हात घट्ट धरून ठेवतो. मानसी रडत त्याच्याकडे बघते. स्वप्नील नजर वळवून हर्षदकडे बघतो. हाताची पकड घट्ट करतो.
हर्षद- (मानसीकडे बघत) Manasi will you please come here for the last time before you leave the post of vp finance?
मानसी अविश्वासाने त्याच्याकडे पहाते. राधिका शेजारी उभी राहून विजयी हसत असते. सगळे मानसीकडे बघत असतात. मानसी स्वप्नीलकडे बघते. स्वप्नील तिचा हात सोडतो. मानसी आपले अश्रू लपवत हर्षदजवळ पोहोचते.
हर्षद- तर मित्रांनो ही आहे मानसी. माझ्या प्रोजेक्टला सर्वांसमोर विरोध करणारी. मला इगोइस्टिक म्हणून माणूस म्हणून सुधारण्याची गरज आहे असे सांगणारी. माझ्या तोंडावर राजीनामा फेकणारी. द ग्रेट हर्षदला न घाबरणारी! मानसी तुला काय वाटलं तू काल जे काय बोललीस ते मी सिरियसली घेईन? आणि बदलेन? मला फार पश्चाताप होईल? माझा सो कोल्ड ईगो जाईल? बोल ना मानसी?
मानसी मान खाली घालून उभी असते. त्या अपमानाने थरथरत असते. हर्षद बोलत असतो-
हर्षद- आता गप्प का? I asked you a question. But let me answer it. तुला जर मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर हो असं वाटत असेल तर तुला बरोबरच वाटतंय!
मानसीचा कानावर विश्वास बसत नाही. ती अविश्वासाने त्याच्याकडे बघते. स्वप्नील आनंदाने शिट्टी वाजवतो. देशपांडे बोलमधील सर्व काजू घशात ओततात.
हर्षद- (लोकांकडे बघत) Friends मी कंपनी सुरु केली. खूप मोठी केली. पण मला माझ्या तोंडावर बिनधास्त माझी चूक सांगायची हिम्मत मानसीच्या आधी कोणीच केली नव्हती. तिने प्रोजेक्टला विरोध करताना मांडलेले मुद्दे अचूक होते. पण माझ्या इगोमुळे मी प्रोजेक्ट लॉन्च केला. मानसीला शह द्यायला राधिकाला हायर केले. पण मानसी तिचे काम शांतपणे करत होती. तिने संबंध प्रोजेक्टमध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी निभावली. तिच्याशिवाय प्रोजेक्ट यशस्वी होणे अशक्य होते. तसेच मला मोठ्या बिझनेसमन पासून “यशस्वी” व्यावसायिक आणि माणूस व्हायचा मार्ग दाखवला. मला आरसा दाखवला ज्यात माझ्या इगोमुळे माझेच रिफ्लेक्शन खूप कुरूप दिसत होते. मला न घाबरणारी, स्वतःचे ठाम आणि रास्त विचार असणारी, हुषार, कर्तृत्ववान आणि अप्रतिम सुंदर मानसी आजपासून ह्या कंपनीची CEO आहे आणि मानसी let me say this, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला हा सुंदर आरसा माझ्या घरात, माझ्या व्यक्तिगत जीवनात माझे प्रतिबिंब, माझे रिफ्लेक्शन आयुष्यभर दाखवायला हवा आहे. मला यशस्वी बनवणारी मानसी मला व्यवसायात आणि आयुष्यात पार्टनर म्हणून हवी आहे. Manasi, will you marry me?
हे ऐकून सगळे स्तंभित होतात. मानसीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात असतात. राधिका काहीच लक्षात न आल्याने तोंड उघडे ठेऊन ऐकत असते. हर्षद राधिकाकडे वळतो.
हर्षद- राधिका, मानासीला CEO म्हणून अपॉइंटमेंटच लेटर तू तुझ्या हस्ते देशील प्लिज?
राधिका समोर असलेले एनव्हलप मानसीला देते. स्वप्नील शिट्टी वाजवतो.
हर्षद- थँक्स राधिका. And the last thing. तुला काल आणायला सांगितलेली ती रिंग देशील जरा?
राधिका पर्समधून अंगठीचा बॉक्स काढून देते. हर्षद त्यातून एक सोलिटेअर रिंग काढतो. रिकामा बॉक्स परत राधिकाच्या हातात देतो. एक गुढगा जमिनीवर टेकवून खाली बसतो. मानसीचा मऊ हात हातात घेतो. तिच्या लांबसडक बोटात ती अंगठी सरकवतो. मानसी लाजून चुर्रर्र होते. सर्व लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. आज देशपांडे लिम्बु सरबत सोडून एक व्हिस्की घेतात. राधिका आपण कुठेच नाही आहोत हे लक्षात येऊन एक कोपरा धरते. स्वप्नील लांबूनच मानसीला एक फ्लाईंग किस फेकतो आणि एक पटियाला बॉटम्सअप मारतो! हॉलमधील लाईट मंद होतात. स्लो गाणी सुरु होतात. लोक डान्स फ्लोर गाठतात. हर्षद आणि मानसी एकमेकांच्या डोळ्यात बघत डान्स करत असतात. हर्षदला तिच्या डोळ्यातील आपले रिफ्लेक्शन खूप स्वच्छ आणि यशस्वी दिसत असते! एक नवा प्रवास सुरु झालेला असतो!
समाप्त
कथा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा.
आधीच्या भागाची लिक- रिफ्लेक्शन भाग ६
रिफ्लेक्शन कथेचा पहिला भाग. कथा इथून वाचा – रिफ्लेक्शन भाग १
हे पण वाचा-
आमच्या लघुकथा –लघुकथा
आमची व्यक्तिचित्रे – व्यक्तिचित्रण

Atishay surekh katha malika shevat khupach goddd….khup avadli katha
Khup chan. Apratim katha. Khup aawdli
कथा अप्रतिम… शेवट उत्तम
[…] पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ७ (शेवटचा भाग) […]
Happy ending…👌👍👌👍👌
रिफ्लेक्शन खूप आवडली. अतिशय रंजक..अपेक्षित शेवट असूनही ज्या पध्दतीने तिथे पर्यंत पोचवलीत ते खूप आवडलं