२७ मार्च २०१४ ची रात्र. रात्रीचे बारा वाजायला काही मिनिटं बाकी होती. अंकिता तिच्या बेडवर शांत झोपली होती. खोलीत एसी १८ वर ठेवलेला होता. खिडकीच्या काचेतून येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे खोलीत डोळ्याला दिसेल इतका उजेड होता. झोपेत सुद्धा अंकिताच्या चेहऱ्यावरचे चिडके, आढ्यताखोर भाव तसेच होते! अगदी वीस वर्षांपूर्वी २८ मार्च १९९४ मध्ये तिच्या आणि सौरभच्या लग्नाच्या वेळी होते तसेच! लग्नानंतर उलट तिच्या गर्विष्ठ स्वभावात, समोरच्याला अत्यंत तुच्छ समजून आपण किती हुशार आणि शहाणी असं वाटण्याच्या वृत्तीत दिवसेंदिवस वाढच होत गेली होती. सौरभ मुळातच मनाने खूप चांगला, सरळ, कनवाळू आणि प्रेमळ असल्याने त्याने वीस वर्ष काढली होती तिच्या बरोबर. दुसरा कोणी असता तर लग्नानंतर एका वर्षाच्या आत हाकलून दिली असती तिला!
अंकिता आत गाढ झोपलेली असताना सौरभ मात्र त्याने अंकितासाठी आणलेल्या चांदीच्या पैंजणांना त्यांच्या अठरा वर्षाच्या मुलाबरोबर, हर्षद बरोबर गिफ्ट warp करत होता.
सौरभ- हर्षु, अरे लवकर कर. चार मिनिट बाकी आहेत बारा वाजायला.
हर्षद- हो बाबा. Don’t worry. झालंच packing.
सौरभ- आय होप तुझ्या आईला आवडेल माझ गिफ्ट.
हर्षद- त्याची काही ग्यारेंटी नाही. तुम्ही तिला ओळखता ना? कदाचित गिफ्ट बघून ती म्हणेल “हे काय? इतकंच? मला वाटलं तू मला कार घेऊन देशील”.
सौरभ- (सिरीयस होत) हम्म… होती ना कार आपल्याकडे तू जन्माला आलास तेव्हा? तुला चांगल्या शाळेत घातला, आपण तिघे कुठे कुठे holiday ला गेलो. पैसे होते तेव्हा सगळं केलं मी. पण मग मध्ये तो bad patch आला आणि सगळंच बदललं. तुझी आई ट्युशन घेऊ लागली ती तेव्हाच.
हर्षद- आईने बिझनेस स्टार्ट करून पण दहा वर्ष झाली असतील ना?
सौरभ- हम्म…
हर्षद- time flies. पण आता तुमची नोकरी मस्त सुरु आहे. आईचे क्लासेही जोरात आहेत.
सौरभ- हो. पण तेव्हा आमच्यात जी दरी निर्माण झाली ना ती परत कधीच भरून नाही निघाली. ती मला अगदीच निकम्मा, निरुपयोगी, खायला काळ भुईला भार समजू लागली होती तेव्हा. तेव्हाच आम्ही खूप दुरावलो एकमेकांपासून.
हर्षद- मला ह्यात आईची चूक वाटते. तुमची नोकरी सुटल्यावर तिने ट्युशन सुरु करून घर संभाळल ह्यासाठी तिला full marks. पण ते करायलाच पाहिजे होतं ना? माझं शिक्षण संपल की मी पण कमवायला लागेन. पण म्हणून मी तुम्हाला ill treat नाही करणार ना? We are family ना बाबा.
सौरभ- तू समजूतदारपणाच्या बाबतीत माझ्यावर गेला आहेस म्हणून अस बोलतो आहेस. पण तुझी आई वेगळी आहे हर्षु. सोड. झालं का ते गिफ्ट wrap? दे इथे. अकरा एकोणसाठ झालेत. तुझ्या आईला गिफ्ट देऊया. चल.
दोघेही हळूच अंकिताच्या बेडरूमचा दरवाजा ढकलून आत गेले. हर्षदने दिवा लावला. तोवर बारा वाजले होते. हर्षद आणि सौरभ एकतर जोरात ओरडले “happy anniversary”. त्या आवाजाने अंकिता दचकून जागी झाली आणि चिडून म्हणाली-
अंकिता- हर्षु हा काय फालतूपणा आहे. लहान आहेस का तू? आता adult झाला आहेस. आणि सौरभ तुला अक्कल नाही का? झोपलेल्या माणसाला अस उठवतात? अरे heart fail झाला असता ना माझा. एकतर दिवसभर ट्युशन घ्या, घरच बघा, नातेवाईक सांभाळा, पैसे कमवा आणि जरा झोपले कि तुमची ही नाटकं. आणि anniversary गेली वीस वर्ष येते आणि जाते आहे. त्यासाठी रात्री आरडओरडा करायची काय गरज? सकाळी wish करायचं ना.
सौरभ आणि हर्षद दोघे जरा खट्टू झाले. खर तर अनपेक्षित अस काहीच झालं नव्हत. अंकिताचा खत्रूड स्वभाव त्यांना इतकी वर्ष माहीतच होता. पण आज ती जरा बरी वागेल अशी अपेक्षा होती जी तिने खोटी ठरवली.
सौरभ- sorry अंकिता. तुझी झोप disturb केली. झोप तू. Good night.
अस हणून दोघे बाहेर जायला वळले.
अंकिता- आता sorry म्हणून काय फायदा? आता परत बाम लावावा लागेल मला कपाळावर. मग अर्ध्या तासाने लागली तर झोप लागेल. द्या. ते काय गिफ्ट आहे ते द्या. बघू तरी सौरभ रावांनी त्यांच्या लाडक्या बायकोसाठी काय ताजमहाल बांधला आहे तो.
सौरभ ने पुढे होत गिफ्ट असलेला बॉक्स तिच्या हातात दिला. तिने घाई घाईत वरचा कागद फाडून बॉक्स उघडला. त्यातून चांदीचे पैजण काढून डोळ्यासमोर धरले आणि त्याकडे तुच्छतेने बघत म्हणाली-
अंकिता- चांदीचे पैजण? शी. मला वाटलं कि हिर्याची अंगठी दिली असेल. पण नाही. मित्रांवर आणि दारूवर उडवायला पैसे आहेत. पण मला मात्र हे फालतू चांदीचे पैजण! आणि हे पण खरे आहेत कि aluminium वर चांदीचा वर्ख लावला आहे?
तिचे शब्द सौरभच्या कानातून हृदयाला चिरत त्याच्या मनाला टोचले.
हर्षद- आई प्लीज. हे तू काय बोलते आहेस?
अंकिता- हर्षा तू गप्प बस. उद्या कॉलेज आहे ना? जाऊन झोप. शहाणपणा नको करू.
अस म्हणून तिने सौरभ ने दिलेले पैजण ड्रेसिंग टेबलवर भिरकावले आणि त्यांच्याकडे पाठ करून बेडवर पडली.
अंकिता- जाताना दिवा बंद करा.
सौरभ आणि हर्षद दिवा बंद करून तिच्या रूम मधून बाहेर पडले.
हर्षद- happy anniversary बाबा.
सौरभ- thanks.
हर्षद- आता तुम्ही पण झोपा. उद्या संध्याकाळी पार्टी आहे ना?
सौरभ- हम्म…मी फक्त अटेंड करणार आहे. गेस्ट सगळे तुझ्या आईचे आहेत.
दोघे आपापल्या खोलीत गेले.
बेडवर पडल्यावर सौरभला दहा वर्षां पूर्वीचे ते दिवस आठवले जेव्हा त्याची नोकरी गेली होती आणि अंकिताने घर चालवायला ट्युशन सुरु केल्या होत्या. अंकिता शिकवायची झकासच. त्यामुळे सौरभची नोकरी सुटल्यावर गरज म्हणून सुरु केलेल्या ट्युशन आता तिचा उत्तम व्यवसाय बनल्या होत्या. दोन वर्षातच तिचा जम बसला. ती कचकून फी घेत असे आणि दिवसभर मुलांचा घरात राबता असे. सकाळी आठला सुरु होणार्या ट्युशन तरी आठ पर्यंत चालत. तिने आता इतर शिक्षकही नेमले होते. हळूहळू त्या होम ट्युशन न राहता कोचिंग क्लास झाले होते. फरक इतकाच की ते क्लास अंकिताच्या घरात सुरु असयेचे. अंकिता त्यातून लाखो रुपये कमावत होती. त्यामुळे आधीच उच्चीचा असलेला तिचा इगो आता आकाशाला गवसणी घालू लागला होता. तिचा उर्मटपणा अधिकाधिक वाढला होता. विशेषतः सौरभ, त्याचे नातेवाईक ह्यांच्याशी तर ती विशेष अपमानास्पद वागत असे. दिवसभर क्लासेस घराच्या हॉल आणि दोन बेडरूममध्ये सुरु असत. तेव्हा सौरभ एका बेडरूम मध्ये स्वतःला कोंडून घेत असे. अखेर पाच वर्षांपूर्वी जागा कमी पडू लागल्यावर क्लासेस नव्या जागेत शिफ्ट झाले. पुढे सौरभला देखील नोकरी लागली. पण त्याच्या वाईट दिवसात तिने दिलेली वागणूक, तिच्या यशामुळे तिच्या डोक्यात हवा जाऊन आधीच उर्मट असलेली अंकिता आजवर अत्यंत मुजोरपणे जे वागत होती त्यामुळे सौरभ एकाच छताखाली राहूनही तिच्यापासून खूप लांब गेला होता!
दुसर्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी वीस पंचवीस गेस्ट आले होते. अंकिताने तिचे नातेवाईक, जवळचे मित्र मैत्रिणी ह्यांच्यासाठी तिच्या विसाव्या लग्न वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. ड्रिंक्स, जेवण, स्टार्टर सगळा सरंजाम होता. सगळे तिला आणि सौरभला शुभेच्छा देत होते. सौरभ देखील चेहऱ्यावर उसने हसू आणून सगळ्या शुभेच्छा स्वीकारत होता. अंकिता नवीन साडी, तिने स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेला हिर्याचा सेट घालून मिरवत होती. तो तिने स्वतःच्या पैशांनी कसा घेतला आहे, self-made women वगैरे विषयांवर बोलत स्वतःभोवती आरत्या ओवाळून घेत होती. तेवढ्यात गेस्ट पैकी अंकिताची एक मैत्रीण म्हणाली-
मैत्रीण- अंकिता, तू माझी कविता म्हणणार आहेस ना आज? मग म्हण कि.
अंकिता- कशी म्हणू? तू कविता पाठवलीस कुठे?
मैत्रीण- ओह…मी सांगायला विसरले. मी ना चुकून अंकिता ऐवजी अंकिता husband सौरभ ला पाठवली ती कविता. सौरभ ने दिली नाही का तुला?
अंकिता- सौरभ च लक्ष असेल तर ना? (सौरभला) सौरभ प्लीज मला ती कविता पाठव ना.
सौरभ त्याचा फोन शोधू लागला.
सौरभ- ओह..मी..मी पाहिलाच नाही हिचा मेसेज. माझा फोन बहुतेक बेडरूम मध्ये आहे. आलोच मी.
सौरभ फोन आणायला आत जाऊ लागला.
मैत्रीण- ए सौरभ, तू आम्हाला एक मस्त गाण ऐकाव तोवर. अंकिता तू त्याचा फोन घेऊन ये आणि कविता वाचून दाखव. मी त्याला whatsapp केली आहे. सौरभ, बायकोला जरा तरी काम करू दे यार. तू गाण सुरु कर.
हे ऐकून सौरभ थबकला. अंकिताला मैत्रिणीचा आगाऊपणा अजिबात आवडला नव्हता. पण सर्वांसमोर काही बोलता आलं नाही म्हणून ती तशीच आत गेली. इथे सौरभ गाण गाऊ लागला. अंकिता बेडरूम मध्ये गेली. तिने सौरभचा फोन घेतला. त्यात whatsapp उघडल. तर त्यात मानसी ने सौरभला पाठवलेले काही फोटो होते. मानसी म्हणजे सौरभची कलीग. अंकिताने ते फोटो डाउनलोड केले. त्यात सौरभ आणि अंकिता एकमेकांच्या हातात हात घातलेले, एकमेकांशी हसत बोलत असलेले, त्यांच्या ऑफिसच्या ऑफ साईट मधले त्या दोघांचे असे दहा बारा फोटो होते. आणि मेसेज होता. “सौरभ, तुला गिफ्ट काय देऊ सुचत नव्हत. आज तुझी काय अवस्था असेल ह्याचा मला अंदाज आहे. म्हणूनच माझी मैत्री तुला गिफ्ट म्हणून ह्या फोटोंच्या रूपाने पाठवत आहे. लक्षात ठेव. ह्या जगात तुझं कोणीही नसेल तेव्हाही तुझी ही मैत्रीण मानसी तुझ्या बरोबर असेल!” ते फोटो आणि मेसेज पाहून अंकिताच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलले. चेहरा लालबुंद झाला. कपाळाच्या शिरा तटतटू लागल्या. ती रागाने फोनकडे बघत होती. डोळ्यात अंगार फुलला होता.
आज २८ मार्च २०२४. माचल मध्ये नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या त्या तंबू मध्ये विवस्त्र बसून तंबूच्या वर असलेल्या जाळीतून दिसणाऱ्या चंद्राकडे बघत मानसीने तिच्या शेजारी पडून सिगारेट ओढणाऱ्या सौरभची सिगारेट त्याच्या हातातून घेतली आणि एक कश मारत ती म्हणाली-
मानसी- हम्म…तुमच्या त्या anniversary ला पण आज दहा वर्ष झाली. आजही तुमची anniversary आहे आणि मी तुझ्या जवळ आहे. तेव्हा फोटो आणि मेसेज मधून होते आज इथे हिमालयात तुझ्या शेजारी आहे.
सौरभ- हम्म…पण गेल्या दहा वर्षात बरच काही बदललं आहे. माझ आणि अंकिताच नात, माझ आणि हर्षदच नात, माझ आणि माझ्या नातेवाईकांच नात, अंकिता आणि माझ्या नातेवैकांच नात, माझ आणि अंकिताच्या नातेवैकांच नात…बदलली नाहीये ती फक्त एक गोष्ट…तुझं माझ्यावर असलेल प्रेम आणि तुझा भक्कम आधार…
मानसी- hmm…पण काय रे, त्या दिवशी जर अंकिताने माझा तो मेसेज आणि फोटो पाहिले नसते तर?
सौरभ- तर आपलं अफेअर झालंच नसत. कारण तेव्हा आपली फक्त छान मैत्री होती. तू तुझ्या संसारात होतीस. मी माझ्या संसारात होतो. माझे प्रोब्लेम मी तुझ्याशी शेअर केले इतकंच आणि तू मला मैत्रीण म्हणून मोराल सपोर्ट करत होतीस. पण अंकिताने गैरसमज करून घेतला ते फोटो आणि मेसेज पाहून.
मानसी- hmm and then all the hell broke loose..
सौरभला डोळ्यासमोर दहा वर्षांपूर्वीची ती भयानक रात्र दिसू लागली जिने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकल……
क्रमश:
पुढील भागाची लिंक- मृगजळ – भाग २
मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

Very absorbing narration. Waiting for part 2
thanks
Waiting for part 2
yes
खूप छान सर
thanks
Waiting for Part Two
yes
Flash back and twist. Carving for next parts.
yes
Interesing 💕
thanks
कथा एकदम मस्त चालूय.
धन्यवाद. वाचनाची आवड असलेल्या आपल्या ओळखीतील लोकांना पोर्टलची लिंक पाठवा.