मृगजळ भाग १६
तो मेसेज वाचून मानसीने निर्विकारपणे रिप्लाय केला.
रिप्लाय- आज नको. मी दमलेली आहे. मी झोपणार आहे. गुड नाईट.
तिने मेसेज सेंड केला आणि दाराची बेल वाजली. मानसीने दार उघडलं. समोर handsome चेहऱ्याचा आणि तितक्याच सुंदर मनाचा श्रीरंग हातात १८ इयर्स ओल्ड स्कॉचची बाटली आणि मानसीला आवडणाऱ्या रजनीगंधाचा बुके हातात धरून हसत उभा होता. मानसी त्याच्याकडे बघत बसली.
श्रीरंग- मला माहित आहे की मी खूप handsome आहे आणि मनातल्या मनात तू माझ्यावर लाईन मारतेस. पण दारातच मारणार की घरात घेणार मला?
हे ऐकून मानसी थोडी गडबडली आणि म्हणाली-
मानसी- ओह sorry… ये ना, आत ये…
श्रीरंग घरात आला. त्याने घरभर नजर फिरवली आणि म्हणाला-
श्रीरंग- are you stressed?
ते ऐकून मानसी चकित होत म्हणाली-
मानसी- का? हे काय अचानक?
श्रीरंग- तुझ्या घराचा vibe मला सांगतोय की तू कोणत्यातरी स्ट्रेसमध्ये आहेस. आता कोणता स्ट्रेस ते तुलाच माहित असेल. पण तो आहे हे नक्की.
मानसी- नाही रे बाबा. मला कसला स्ट्रेस? नोकरी मस्त आहे. पैसे मस्त मिळतात. मुलगा नोकरीला लागला. डिव्होर्स झालेला आहे. काहीच जबाबदारी नाही आणि अपेक्षाही नाहीत. कॉलेजमध्ये होते तशीच free bird आहे मी. Free from everything.
श्रीरंग- ओह ग्रेट. म्हणजे इस कहानी में हिरो की म्हणजे माझी एन्ट्री सही समय पे हुवी है. हिरोईनला घेऊन अमेरिकेला उडून जाण्यासाठी.
मानसी- गप रे. काहीही बोलतोस. मी अमेरिका बिमेरिका कुठेही येणार नाहीये. आमचा देश आम्हाला प्रिय आहे.
श्रीरंग- तुला श्रीरंग आणि अमेरिका दोन्हीचा अनुभव नाही म्हणून तू हे बोलते आहेस. एकदा अनुभव घेतलास ना, की प्रेमात पडशील दोघांच्याही.
मानसी- तू आता फक्त फ्लर्ट करणार आहेस की जरा शांत पण बसणार आहेस?
श्रीरंग- ठीक आहे. बर्फ आणि ग्लास घेऊन ये. आता मी नाही, ही बाटली आणि तू बोला. मी ऐकतो. ओके?
मानसी हसली आणि किचनमध्ये गेली. श्रीरंग तीचं घर न्याहाळत होता. मानसी ग्लास आणि बर्फ घेऊन आली. बरोबर खायला पण काहीतरी घेऊन आली. तिने ग्लास टेबलवर ठेवले आणि तो समोरच्या सोफ्यावर बसली. श्रीरंगने दोघांचे ग्लास भरले. त्यात दोन-दोन बर्फाचे क्यूब टाकले. एक ग्लास मानसीच्या हातात देऊन तो चियर्स म्हणाला. मानसीने तिचा ग्लास त्याच्या ग्लासवर हलकेच आपटून चियर्स म्हणून एक घोट घेतला. ती चव मानसीला एकदम फ्रेश करून गेली.
मानसी- wow. This is magic.
श्रीरंग- yes it is…
त्यानंतर काही मिनिटं एकदम शांततेत गेली. कोणीच काहीच बोलत नव्हतं. शेवटी मानसी म्हणाली-
मानसी- रंगा, तू गप्प का? बोल की काहीतरी.
श्रीरंग- तूच मला गप्प बस म्हणाली होतीस ना? म्हणून मी ठरवलं की आता ही सिंगल मॉल्ट आणि तू बोलाल. मी ऐकेन. आणि मी गप्प नाहीये. मी तुझ्या ह्या घराशी बोलतोय. तुझ्या डोळ्यांशी, तुझ्या चेहऱ्याशी, तुझ्या हातांशी बोलतोय. ते मला खूप काही सांगतायत.
मानसी- अच्छा? बरं… काय सांगतायत माझं घर, माझे डोळे, माझा चेहरा, मला पण कळू दे जरा.
श्रीरंग- त्यांचा मुख्य मुद्दा आहे की आमच्या madam स्ट्रेसमध्ये आहेत. त्या दाखवत नसल्या तरी काहीतरी टेन्शन नक्की आहे. तू madam चा मित्र आहेस. कदाचित त्या तुला सांगतील. तेव्हा आम्हालाही कळेल, असं म्हणतायत.
मानसी- परत तेच. मी म्हणाले ना की काहीही टेन्शन नाहीये म्हणून. तू आता सतत हे बोलून मला टेन्शन देतो आहेस. दुसरा topic नाहीये का तुझ्याकडे बोलायला?
श्रीरंग- आहेत ना. खूप topic आहेत. अमेरिका, माझं करिअर, माझा सक्सेस, माझे पैसे, माझी अय्याशी, माझ्या मैत्रिणी, माझा व्हिला, माझ्या गाड्या आणि…
हे बोलून श्रीरंग थांबला. एक घोट घेऊन त्याने सिगारेट पेटवली.
मानसी- थांबलास का? तुझा व्हिला, तुझ्या गाड्या आणि काय?
श्रीरंग- आणि ह्या सगळ्या गदारोळात एकटा, अपूर्ण असलेला मी…
ते ऐकून मानसी शांत झाली. तिला कल्पना होती तो पुढे काय बोलणार आहे त्याची.
श्रीरंग- ए मुली… chill… मी तुझ्यासमोर मजनुगिरी अजिबात करणार नाहीये. तुझ्यापेक्षा दहा पट सुंदर मुली माझ्या आयुष्यात येऊन गेल्या आहेत. मला कमी नाहीये कशाचीच. आणि मी तुझा choice नाही तर नाही. पण म्हणून तू माझी choice आहेस हे सत्य बदलत नाही ना? मी मरेपर्यंत तुझ्यावर लाईन मारणार, हे नक्की आहे.
मानसी- रंगा, तू लग्न का करत नाहीस? हा जो एकटेपणा म्हणतो आहेस ना, तो दूर होईल कोणीतरी प्रेम करणारं भेटलं की.
श्रीरंग- करतेस तू लग्न? आत्ता ह्या क्षणी करूया. बोल, आहेस तयार?
मानसी- तू वेडा आहेस का?
श्रीरंग- तुझ्या प्रेमात आहे मी वेडा आणि मी ते अजिबात लपवत नाही. म्हणजे मला ते जमतच नाही. उगाच मैत्रीण म्हणायचं आणि मनातल्या मनात मात्र… you know what I mean… म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करण्याचा निष्काम कर्मयोग करतोय इतकी वर्षं… तुझ्याकडून शून्य अपेक्षा ठेवून. आणि प्लीज, हे मी सिम्पथी मिळवायला सांगत नाहीये. तुला हे आधीपासून माहित आहे. आता विषय निघाला म्हणून परत सांगितलं इतकाच. मेरा छोड, तेरा बता. तुला भेटला की नाही कोणी तुझ्या टाईपचा? माझ्यासारखा अजिबात नसलेला?
मानसी- मार तू taunt मार मला.
श्रीरंग- त्यात taunt काय? आहे ते आहे. मी तुझ्या टाईपचा असतो तर आज आपण इथे दारू पीत प्रेम ह्या विषयावर गोलमेज परिषद घेत नसतो. आत तुझ्या बेडरूममध्ये प्रेम करत असतो. Sorry, तुझ्या नाही. आपल्या बेडरूममध्ये अमेरिकेत प्रेम करत असतो आणि आपली आठ-दहा मुलं आज कामधंद्याला लागलेली असती. काही अजूनही शिकत पण असती. आणि आपण अजून काही चान्स घ्यायचा का ह्याचा विचार करत असतो.
हे ऐकून मानसीला प्रचंड हसू आलं. ती भरपूर हसून झाल्यावर म्हणाली-
मानसी- रंगा, तू कम्प्लीट गॉन केस आहेस. आठ-दहा मुलं? बापरे… आज किती दिवसांनी इतकी हसले मी… पोट दुखायला लागलं…
ती बोलत होती आणि श्रीरंग तिच्याकडे एकटक बघत होता. ते लक्षात आल्यावर मानसी त्याला म्हणाली-
मानसी- काय बघतो आहेस?
श्रीरंग- तू हसताना किती सुंदर दिसतेस ते बघत होतो. आज अनेक वर्षांनी ते बघायला मिळतंय म्हणून डोळ्यात साठवून घेतोय.
मानसी- thanks…
श्रीरंग- ए, पण खरं सांग… तुला कोणीच भेटला नाही का अजून? तुझा डिव्होर्स होऊन पण अनेक वर्षं झाली. Girl, find a decent guy and get married. अशी एकटी का राहतेस? I am sure Indiaमध्ये तुला तुझ्या आवडीचा माणूस भेटेल. आणि आश्चर्य पण वाटतं की तुला अजून कोणीच कसा भेटला नाही ह्याचं.
मानसी ते ऐकून गप्प बसली.
श्रीरंग- ए हेलो… तू इतकी सिरीयस का झालीस? काहीतरी स्टोरी आहे बॉस जी तू मला सांगत नाहीयेस.
मानसी- हम्म… आहे एक स्टोरी.
श्रीरंग- बघ… मी म्हणालो ना… काहीतरी स्टोरी आहे. काहीतरी आहे ज्याचा तुला स्ट्रेस आहे. सांगून टाक.
मानसी- मला माहित नाहीये की हे ऐकून तुला राग येईल की तू निघून जाशील इथून की काय करशील. प्लीज चिडू नको आणि गैरसमज करून घेऊ नको.
श्रीरंग- नाही घेणार. सांग जे आहे ते.
मानसी- मला काहीतरी confess करायचं आहे.
श्रीरंग- बोल यार… किती ताणतेस. मी promise करतो, मी चिडणार नाही.
मानसी- रंगा, मला वचन दे. मी जे सांगणार आहे ते ऐकून तू माझ्या आयुष्यातून निघून जाणार नाहीस. आपली मैत्री अशीच राहील.
श्रीरंग- प्रॉमिस. बास? आता सांग.
मानसी- रंगा, हे का आणि कसं घडलं ते मलाही कळलं नाही. माझ्या नकळत ते घडून गेलं.
श्रीरंग- काय?
मानसी उठली. खिडकीजवळ जाऊन तिने सिगारेट पेटवली. श्रीरंग अस्वस्थ होत उठून तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला-
श्रीरंग- प्लीज सांग मानसी, काय झालंय नक्की.
मानसी वळून त्याच्या समोर उभी राहिली. त्याच्या नजरेत नजर मिसळत म्हणाली-
मानसी- मला खूप गिल्टी वाटतंय तुला हे सांगताना… पण सांगते… प्लीज चिडू नको तू.
श्रीरंग- आता सांगितलं नाहीस तर मी नक्की चिडेन.
मानसी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली-
मानसी- आंबट कढीत मीठ बहुतेक जास्त झालंय. तू प्लीज चिडू नको, रंगा…
तीचं हे बोलणं ऐकून श्रीरंग दोन क्षण स्तब्ध झाला. आणि मानसीने त्याची विकेट काढल्याचं त्याच्या लक्षात आल्यावर जोरात ओरडला-
श्रीरंग- what the fu@k? तू… तू… तुला ना सोडणार नाहीये मी…
असं म्हणून तो तिला पकडायला गेला. ती निसटून पळाली. तो तिच्या मागे पळाला. ती सोफ्याच्या मागे गेली. तो सोफ्यावर चढून पलीकडे गेला. ती डायनिंग टेबलच्या मागे गेली.
रंगा- तू मेलीस आता… बघच तू…
मानसी- का, आता का? मी टेन्शनमध्ये आहे, माझं घर टेन्शनमध्ये आहे, माझा चेहरा टेन्स आहे आणि तू एकटा एकदम खुश आणि मजेत आहेस ना? आता सांग, कोण मजेत आहे ते…
रंगा- तू माझ्या हातात तर ये मग, दाखवतो तुला…
असं म्हणून रंगा डायनिंग टेबलवर चढला. आणि उडी मारून तिला पकडणार इतक्यात मानसी निसटली आणि धावत जाऊन पळून जायला म्हणून तिने घराचा दरवाजा उघडला आणि बघते तर समोर सौरभ उभा होता. ती तिथेच थबकली. इतक्यात मागून धावत आलेल्या रंगाने तिला मागून मिठी मारली आणि म्हणाला-
श्रीरंग- आता तुला माझ्या हातून कोण सोडवतं बघतो.
इतक्यात त्यालाही समोर उभा असलेला सौरभ दिसला. सौरभ आणि श्रीरंग एकमेकांकडे बघत होते. मध्ये अडकलेल्या मानसीला काय करायचं कळत नव्हतं.
क्रमश:
मृगजळचा पहिला भाग. मृगजळ …भाग १नवीन वाचकांनी कथा सलग वाचायला वरील लिंक क्लिक करून पहिल्या भागापासून वाचा.
मृगजळ सगळ्या भागांच्या लिंक- मृगजळ- सर्व भाग
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण
