गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

….दुसऱ्या दिवशी तेजस त्याच्या केबिन मध्ये बसला होता. रिसेप्शन वर असलेल्या कॅमेरावर त्याची नजर होती. मुग्धा ऑफिसात यायची तो वाट बघत होता. बरोब्बर साडे नऊला मुग्धा रिसेप्शन वर आली. तेजसचा प्लान रेडी होता. तो घाईत उठला आणि निघाला. त्याने केबिनचा दरवाजा उघडला आणि तो समोरून आत येत असलेल्या आर्यावर जोरात आपटला. त्याच्या धक्क्याने पडत असलेल्या आर्याला त्याने सावरली. त्याच्या मजबूत बाहूत असलेल्या आर्याच्या मनात  तेजस आरपार घुसला होता. एकमेकांकडे बघत असलेल्या तेजस आणि अर्याला पाहून अर्याबरोबर आलेली राधिका खुश होऊन हसत होती. इथे रिसेप्शन वर मुग्धाची रवानगी induction साठी एका कॉन्फरन्स रूम मध्ये झाली होती.

आर्या  तेजसचा आधार घेत उभी राहिली. तिच्या उभारांचा स्पर्श तेजसच्या दंडाला जाणवला होता. तेजसने तिला आधार देताना घट्ट धरलेला तिचा toned दंड अजून सोडला नव्हता. दोघे त्याच पोझिशन मध्ये काही क्षण उभे होते. ते बघून खुश झालेली राधिका म्हणाली-

राधिका- एक्स्क्यूज मी….हेलो….

ते ऐकून भानावर आलेल्या तेजसने आर्याचा दंड सोडला. तिचा दंड  त्याची बोट उमटून लाल झाला होता. तेजसला काय रीएक्त करायचं तेच सुचत नव्हत.

तेजस- i am sorry…मी घाईत होतो आणि तुम्हाला धक्का लागला.

राधिका- तेजस प्लीज. अरे तिला अहो जाओ काय करतोस? ती लहान आहे वयाने तुझ्याहून. मीच घेऊन आले आहे तुझी ओळख करून द्यायला.

ते तिघे तेजसच्या केबिन मध्ये परत आले. दोघी तेजसच्या समोर बसल्या. तेजसचं लक्ष आर्यांच्या लाल झालेल्या दंडाकडे होत. आर्या होतीच इतकी आकर्षक की तेजसला कळत नव्हत की तो त्या दंडाकडे का बघतोय? तिला आपल्यामुळे लागल्याचा गिल्ट म्हणून की तो स्पर्श आवडला म्हणून. त्याची दंडावर असलेली नजर आर्याच्या लक्षात आली.

आर्या- तुझी ग्रीप सॉलिड होती हा. हा बघ माझा दंड अजून लाल आहे. पण तू धरलं नसतंस तर मी नक्की पडले असते. बाय द वे…मी आर्या….

आर्याने shake hand साठी हात पुढे केला. तेजसने shake hand करत “i am तेजस” अशी स्वतःची ओळख करून दिली.

राधिका- तेजस, आर्या माझी भाची आहे. स्कल्प्चर आर्टिस्ट आहे.

तेजस- wow…मस्तच…

राधिका- आज मला भेटायला ऑफिसला आली सो मी म्हणाले तुझीही ओळख करून देते. तुलाही पेंटिंग आणि स्कल्प्चर मधलं कळत ना म्हणून. तुम्ही बसा बोलत. मी आलेच. एक नवीन जोईनी आहे. तिच्या इंडक्शनच पहिलं सेशन माझं आहे.

तेजसला परत मुग्धाची आठवण झाली. पण आता राधिका तिथे जात असल्याने तो जाऊ शकत नव्हता. त्याला वाट बघण्यावाचून पर्याय नव्हता. राधिका गेली. तेजसने आर्याला कॉफी ऑफर केली. आर्या तिच्या आर्ट बद्दल बोलू लागली. तिचं aggression, confidence, style तेजसला आवडली होती. तो बोलण्यात हरवून गेला.

इथे मुग्धा कॉन्फरन्स रूम मध्ये बसली होती. इतकी मोठी ती रूम, तिथलं फर्निचर, touch  pad ने adust होणारे दिवे आणि एसी चे तापमान वगैरे पाहून ती भारावून गेली होती. इतक्यात राधिका तिथे आली.

राधिका- हाय मुग्धा. Welcome aboard.

मुग्धा- हाय राधिका.

राधिका- तुझं इंडक्शन शेड्युल मिळालं ना?

मुग्धा- हो.

राधिका- पहिलं सेशन माझं आहे. मी तुला कंपनीची हिस्टरी आणि management team बद्दल माहिती देणार आहे. सुरुवात करुया?

मुग्धा- शुअर.

राधिकाने रूम मधले लाईट्स बंद केले आणि तिची कंपनी हिस्टरी ची पीपीटी सुरु केली. मुग्धा लक्ष देऊन ऐकू लागली.

तेजसच्या केबिन मध्ये आर्याने तेजसला तिच्या हुशारी आणि रूपाने चांगलंच इम्प्रेस केलं होत. तेजस तिचं बोलण ऐकत होता.

आर्या- मी आणि मावशी…म्हणजे राधिका..कालच बोलत होतो की लग्न म्हणजे सर्वस्व नाहीये. आणि लग्न करायचं कशाला? सेक्स साठी की मुलांना जन्म द्यायला? ह्या दोन्ही गोष्टी लग्नाशिवाय होऊ शकतात. मग ते अनोळखी व्यक्तीशी आयुष्यभर ओळख करून घेत त्या बेडीत अडकून का पडायचं? हेलो…हे माझं मत आहे बर का? तुझं लग्न वगैरे झालं असेल तर प्लीज हे पर्सनली नको घेऊ.

तेजस- नो…इट्स ओके. आणि माझं लग्न झालेलं नाहीये अजून.

आर्या- ओह ग्रेट. आणि सेक्स?

तेजसला कळत नव्हत काय उत्तर द्यायचं ते.

आर्या- come on…तुझ्यासारखा handsome माणूस अजूनही सेक्स न करता राहिला असेल ह्यावर निदान मी तरी विश्वास ठेवणार नाही. आत्ता नको सांगू पण आपली मैत्री वाढली की नक्की कन्फेस करशील. बाय द वे…मी सेक्स ट्राय केलं आहे बर का?

तेजस- (थोडा अवघडून) अच्छा?…ओके…

आर्या- ए तुला काही काम नाहीये ना? मी सहज आले आहे. नाहीतर म्हणशील कोण ही मुलगी आणि माझा वेळ का फुकट घालवते आहे म्हणून.

तेजस- नाही. काही खास काम नाहीये. बोल तू.

आर्या- पण बोलायची फी लागेल.

तेजस- फी?

आर्या- हो. अजून एक black कॉफी…

तेजस- (हसून) ओह शुअर…

कॉन्फरन्स रूम मध्ये कंपनीची माहिती बघत असताना founder म्हणून दांडेकर काका काकू तसेच managing director म्हणून तेजसचा फोटो पाहून मुग्धा हादरली.

मुग्धा- हे…हे managing director आहेत?

राधिका- हो का? तू ओळखतेस तेजसला?

मुग्धा- न…नाही…

राधिका- खूप dynamic आहे तेजस. त्याने बिझनेस हातात घेतल्यापासून कंपनी दर वर्षी सरासरी ४०% ग्रो होते आहे.

राधिका पुढे काय बोलत होती ते मुग्धाला ऐकू येत नव्हत. तिला काल रात्री तेजस राधिकाला बघून पळून गेला हे लक्षात आलं होत. तिचं डोकं सुन्न झालं होत. आता आपला मित्र असलेल्या तेजसच्या कंपनीत काम करायचं की आपला boss असलेल्या तेजसशी मैत्री तोडायची? तेजस माझ्याशी खोट का बोलला? तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. राधिका तिला म्हणाली-

राधिका- काय झालं मुग्धा? तुझं लक्ष कुठाय?

मुग्धा- क…काही नाही. जरा गरगरल्या सारखं होतय. मी येऊ का जरा फ्रेश होऊन?

राधिका- ओके. आणि बर वाटत नसेल तर मी डॉक्टर ना फोन करते. आपल्याकडे on call डॉक्टर अव्हेलेबल आहेत.

मुग्धा- नाही नको. त्याची गरज नाही. आलेच मी.

मुग्धा उठून बाहेर गेली. राधिकाला आर्याची आठवण आली. राधिकाने आर्याला फोन लावला. आर्या तेजसशी गप्पात रंगली होती. तिचा फोन वाजला.

आर्या- (तेजसला) हा बघ मावशीचा फोन. आता कुठे जरा गप्पा रंगतायात तर हिने लगेच फोन केला. (फोन घेऊन) बोल मावशी.

राधिका- अजून गप्पा सुरु आहेत का?

आर्या- हो. म्हणजे काय? तेजस खूप interesting आहे. आम्ही सेक्स बद्दल बोलतोय.

हे बोलून आर्या तेजसकडे बघून हसली. तेजसने गोंधळून पुढे जाऊन तिचा फोन तिच्या हातातून काढून घेतला आणि तो म्हणाला-

तेजस- ए राधिका…ही उगाच काहीतरी सांगते आहे. ओके? you know me right?

राधिका- (हसून) I know you both. छान मैत्री होईल तुमची. मी सहज फोन केला होता. चालू देत तुमच्या गप्पा. बाय.

राधिकाने फोन कट केला. तेजस आर्याला म्हणाला-

तेजस- आर्या तू वेडी आहेस का? काहीही काय सांगतेस राधिकाला?

आर्या- मी खोट बोलले का? आपण सेक्स बद्दल बोललो ना?

तेजस- हो. पण काय सांगायचं आणि काय नाही हे मी शिकवायला हव का तुझ्या इतक्या मोठ्या मुलीला?

आर्या- हो. ह्यापुढे मला खरच सांगत जा. बाय द वे आज रात्री काय करतो आहेस? स्काय लाउंजला जाऊया का? आज माझा फेवरेट band लाईव्ह पर्फोर्म करणार आहे तिथे?

तेजस- हम्म..ओके….

आर्या- (उभी राहून) ओके. शार्प साडे आठला मी भेटते तुला तिथे. बाय.

त्याचा निरोप घेताना तिने त्याला मिठी मारून आपला गाल त्याच्या गालावर घासून त्याचा निरोप घेतला. त्याच्या उंची परफ्युमचा वास आणि त्याच्या दाढीचा राकट स्पर्श तिला सुखावून गेला. तिच्या शरीराच्या उभारांचा स्पर्श तेजसला जाणवला. आर्या निघून गेली. तेजस चेयर मध्ये डोळे बंद करून बसला. डोळे बंद केल्यावर त्याच्यासमोर मुग्धाचा चेहरा आला. तो दचकून उठला. इतका वेळ विसर पडलेली मुग्धा आता काय करत असेल हा विचार त्याच्या डोक्यात आला. तेजस घाईत आपल्या केबिन बाहेर पडला.

मुग्धा रेस्ट रूम मधून कॉन्फरन्स रूम कडे निघाली होती. तिचं डोकं पार सटकलं होत. ती आपल्याच तंद्रीत निघाली होती. ती तशीच चालत होती. चालताना समोर असलेला काचेचा दरवाजा तिच्या लक्षात आला नाही आणि ती त्या दरवाजावर जोरात आदळली. मोठ्ठा आवाज झाला. लोक जमा झाले. तेजस पण धावत तिथे पोहोचला. रीसेप्शनिस्तने आधार देऊन मुग्धाला उठवली. तिच्या डोक्यावर टेंगुळ आलं होत. कोणीतरी तिला पाणी आणून दिलं. पाणी पिऊन झाल्यावर ग्लास ठेवताना तिला तेजस दिसला. तिच्या डोक्यात परत एक तिडीक गेली. मुग्धा उठून रागाने त्याच्याकडे बघू लागली. तेजस तिथे काहीच बोलू शकत नसल्याने फक्त उभा होता. तेवढ्यात राधिका आणि आर्या आल्या.

राधिका- काय ग मुग्धा? काय झालं?

मुग्धा- म…मला बर वाटत नाहीये. मी निघते.

मुग्धाने तेजसाकडे एकदा रागाने बघितलं आणि ती निघून गेली.

आर्या- ही कोण आहे? आणि इतकी विचित्र का वागली ती?

राधिका- अग न्यू जॉईनी आहे. आजच जॉईन केलं तिने. सकाळी बरी होती आली तेव्हा. अचानक काय झालं माहित नाही.

आर्या- पण मावशी तुम्ही ही अशी sample hire करताच कशाला?

तेजस ते सर्व ऐकून आपल्या केबिन मध्ये गेला. त्याने मुग्धाला फोन लावला. मुग्धाने त्याचे सर्व फोन कट केले. तेजस स्वतःवरच जाम वैतागला. त्याने मुग्धाला मेसेज केला “मुग्धा प्लीज. माझ्याशी बोल. मी सगळं एक्स्प्लेन करतो. प्लीज बोल.” मुग्धा तो मेसेज वाचून रिक्षात हमसून हमसून रडत होती. इथे ऑफिसात आर्याने राधिकाला आज रात्री ठरलेल्या तिच्या आणि तेजसच्या भेटीची दिलेली माहिती ऐकून राधिका खुश होती. आणि नियती मात्र आपले पत्ते छातीशी कवटाळून पुढली चाल खेळायची तयारी करत हसत होती.

क्रमश:

© मंदार जोग

गुंतता हृदय…. (भाग १८)

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!