ही वाट दूर जाते भाग 8: आय लव्ह यू | हृदयस्पर्शी मराठी कथा
ही वाट दूर जाते भाग 8: आय लव्ह यू | हृदयस्पर्शी मराठी कथा
ही वाट दूर जाते – भाग ८ – आय लव्ह यु – मराठी प्रेमकथा
दुसऱ्या दिवशी आदित्य ऑफिसात काम करायचा प्रयत्न करत विचारमग्न बसलेला होता. इतक्यात अश्विनीचा मेसेज आला-
अश्विनी- Need to talk.
आदित्य- Tell me
अश्विनी- Need to ‘talk’ not chat.
आदित्य- Okay. 6.30@ Orchid.
अश्विनी- Okay.
आदित्य दिवस कसाबसा ढकलत होता. बरोब्बर 6 वाजता त्याने गाडी सुरू केली आणि 6.25 ला ऑर्किडला पोहोचला. त्यांच्या ठरलेल्या टेबलावर अश्विनी बसलेली होती.
आदित्य- हाय (तिच्या समोर बसला)
अश्विनी- हाय. काय घेणार?
आदित्य- (तिच्या मूडचा अंदाज घेत) Order the usual आणि काय बोलायचे आहे ते सांग. (वातावरण हलके करायला) आज सकाळपासून सस्पेन्स सिनेमा बघतोय असं वाटतंय.
अश्विनी- (त्याच्या डोळ्यात बघत शांतपणे) आदि, सिनेमा सस्पेन्स नाही तर ट्रॅजिक आहे.
आदित्य- (सिरीयस होत) काय झालंय?
अश्विनी- अविनाश येतोय!
आदित्य- What?
अश्विनी- Yes. काल रात्री त्याचा मेसेज आला. (आदित्यला मेसेज दाखवला)
आदित्य- Oh thats a great news. You are all set for America. I am so happy for you!
अश्विनी- (त्याच्या डोळ्यात बघत) नक्की?
आदित्य- Of course.
इतके म्हणून आदित्यने वेटरला बोलावले. नेहमीची ऑर्डर दिली. विषय बदलला.
अश्विनी- झालं?
आदित्य- काय?
अश्विनी- विषय बदलायचा, टाळायचा प्रयत्न करून झाला का?
आदित्य- मी कुठे विषय टाळला? तुला उत्तर दिलं की.
अश्विनी- मला खरं उत्तर हवंय.
आदित्य- मी योग्य उत्तर दिलंय.
अश्विनी- मी तेच म्हणते आहे. मला खरं उत्तर हवय. मग ते अयोग्य असलं तरी. कारण योग्य आणि अयोग्य हे व्यक्ती आणि परिस्थिती सापेक्ष असतं.
आदित्य- अश्विनी प्लिज. मी खुश आहे खरंच. माझा मित्र अविनाश आणि त्याची बायको अश्विनी हे फायनली एकत्र येणार हे ऐकून मी खुषच व्हायला हवे ना? मी आहे खुष.
अश्विनी- ओके. आता अचानक मी “मित्राची बायको” झाले का? एका दिवसात किती लांब गेलास तू आदि! बरं मैत्री बाजूला ठेव तुझी आणि अविनाशाची तसंच तुझी आणि माझी देखील…आज सकाळपर्यंत असलेली…. आणि मला उत्तर दे. एक त्रयस्थ म्हणून. मला एकटीला सोडून, अमेरिकेत लफडी करून, मला डिव्होर्स नोटीस पाठवायची तयारी करणाऱ्या माणसाबरोबर निव्वळ त्याची इच्छा म्हणून मी अचानक सर्व विसरून अमेरिकेला जावे का? उत्तर हो असेल तर का?
आदित्य- नाही
अश्विनी- मग मी काय करायचं? त्याला नाही म्हणायचं. मोठं भांडण करायचं. त्याच्या डिव्होर्सच्या निर्णयाबद्दल तुझ्याव्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही. म्हणजे मी सर्वांच्या नजरेत दोषी आणि आरोपी व्ह्यायच? ते पण गुन्हेगार तो असताना? आणि त्याची स्वेच्छेने अमेरिकेला न गेलेली बायको म्हणून उरलेलं आयुष्य सर्वांचे टोमणे झेलत जगायचं? सांग ना आदि!
आदित्य- मी काय बोलू? I have my limitations. माझी पोझिशन खूप विचित्र आहे. मी नाही बोलू शकत. तुझ्या ह्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. मी हो पण म्हणू शकत नाही आणि नाही पण म्हणू शकत नाही!
अश्विनी- ठीक आहे. थँक्स!
इतक्यात वेटरने कॉफी आणून ठेवली. दोघेही आपापल्या कॉफीच्या मग्सकडे बघत बसले. अश्विनीच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. वेळ हळूहळू सरकत होती. कॉफी थंड होत होती. इतक्यात आदित्यचा फोन वाजला. त्यावरील अविनाश हे नाव अश्विनीला दिसले. आदित्यने फोन घेतला-
आदित्य- हाय
अविनाश- हाय डूड. सांगितलंस ना तू प्रणवला not to proceed?
आदित्य- येस
अविनाश- Cool! What did he say?
आदित्य- All okay.
अविनाश- ग्रेट! Thanks a ton bro! See you soon. Bye.
आदित्य- बाय
आदित्यने फोन ठेवला.
अश्विनी- अविनाश?
आदित्य- येस!
अश्विनी- काही सिरीयस? नाही तुझ्या चेहऱ्यावर अचानक भीती दिसली म्हणून विचारते आहे. बाकी तुझ्या “मित्राच्या बायकोला” तुम्हा मित्रांच्या चर्चेत इंटरेस्ट नाही. आणि एक आयडिया आहे. आजपासून तू मला “वाहिनी” म्हणायला लाग. म्हणजे कसं आपल्या नात्याला एक गोंडस नाव मिळेल आणि तुझा हा वैचारिक गोंधळ संपेल. अमेरिकेला आमच्या घरी आलास की मी भावोजीना आवडणारे पदार्थ करून खायला घालेन. What say?
आदित्य- Ashwini please stop this. काल रात्री अविनाशने मला फोन केला होता. प्रणव आज तुला डिव्होर्स नोटीस पाठवणार होता. त्याला नको पाठवू असे सांगायला फोन केला होता.
अश्विनी- अरे वा! मग काय केलं ह्या मित्राने? मैत्रीला जागला की नाही?
आदित्य- हो!
अश्विनी- शाब्बास! थँक्स आदि! सॉरी आदित्य भावोजी. निघते मी आता.
अश्विनी जायला उठली. आदित्यने तिचा हात धरला. अश्विनीने अविश्वासाने वळून त्याच्याकडे पाहिले.
आदित्य- Please sit down. (अश्विनी बसली. आदित्यने हात सोडला) मी मैत्रीला जागलोय पण कोणाच्या हे विचारलं नाहीस!
अश्विनी- What do you mean?
आदित्य- अश्विनी मी एक खूप एकलकोंडा मुलगा होतो. फारसा कोणात न मिसळणारा. कोणात न अडकणारा! माझं मस्त चाललं होतं. अचानक तू आयुष्यात आलीस. एकाकी पडलेली. विल्यम्स म्हणाला त्याप्रमाणे आपल्या एकटेपणाने आपल्यात मैत्री निर्माण केली. पण त्या मैत्रीला सुरुवातीपासूनच एक बंधन होते, सीमा होती…आहे! त्यामुळे ती मैत्री एखाद्या तळ्यासारखी साचून राहू शकते. नदीसारखी स्वच्छंदी वाहात जाऊ शकत नाही हेच सत्य आहे! पण तरीही मी आज त्या मैत्रीला जागलो. मी प्रणवला फोन नाही केला!
अश्विनी त्याच्याकडे अविश्वासाने बघत होती. तो एका घोटात कॉफी पिऊन दुसरीकडे बघत होता.
अश्विनी- So you want my marriage to break? Why?
आदित्य- Because I love you Ashwini! I had to say this sometime and I did! हे अयोग्य आहे, ह्याला भविष्य नाही हे सर्व जाणतो मी. But I am helpless! उद्यापासून मी तुला भेटणार नाही. तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईन. मला हे सांगायचे नव्हते! पण…
अश्विनीने त्याच्या हातावर हात ठेवला!
अश्विनी- Relax Adi! And look at me.
आदित्यने नजर चोरत तिच्याकडे पाहिले.
अश्विनी- जे तुला वाटतंय ते मलाही वाटतंय. I know की मी एक विवाहित मुलगी आहे. आपले नाते खूप विचित्र आहे. पण मी माणूस आहे आणि तू देखील. मैत्री तळ्यासारखी सिमीत ठेवता येते पण त्याच प्रेमात रूपांतर झालं की तेच तळे किनाऱ्याला, सर्व बंधनांना तोडून, झुगारून नदीचे रूप घेऊन वाहू लागते. त्याला बांध घालणे अशक्य असते! आपलंही तेच झालंय.
आदित्य- अश्विनी!! I will marry you. तू प्रणवच्या नोटीस नंतर कंसेन्ट दे. डिव्होर्स घे!
अश्विनी- No. No more marriage in my life! Let me see how I handle the divorce notice पण मी परत कधीच लग्न करणार नाही. मी आत्ता ह्या क्षणी घर सोडून तुझ्याबरोबर राहायला यायला तयार आहे. पण लग्न शक्य नाही. आपण मित्र, प्रेमीक म्हणून एकत्र राहू. अगदी नवरा बायको सारखे. We will live in! But no marriage for me anymore!
आदित्य- मला तुझे मन कळते आहे. त्याचा आदरही आहे. पण मी तुला लग्न करूनच आपलेसे करेन. Live in is an opportunity for any man. But you are not an opportunity for me. You are my love. I will wait for you. तू तुझे आयुष्य, ही सिच्युएशन तुला योग्य वाटेल त्या पद्धतीने हँडल कर. मी तुला मदत करेन. पण लिव्ह ईन नाही. तुझे मत परिवर्तन होईपर्यंत तुझी वाट बघेन. तोवर आपली मैत्री, नाते जसे आहे तसेच सुरु राहील.
इतके म्हणून आदित्यने अश्विनीच्या हातावर हात ठेवला. अश्विनीने आपला दुसरा हात त्यावर ठेवला. दोघे एकमेकांच्या डोळ्यात रोज जाणवत असलेले प्रेम आज व्यक्त होताना पाहत होते!
तिथे अमेरिकेत अविनाशला प्रणवचा मेसेज मिळाला. “तुझा मेसेज अगदी वेळेत वाचला म्हणून बरं झालं. मी नोटीस पाठवली नाहीये. प्रणव” ते वाचून अविनाश स्वतःशी बोलला, “Adi , my friend, why?!!!”
क्रमश:
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ९ – शेवटचा भाग – मराठी कथा
आधीच्या भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ७ – Aपूर्ण – मराठी कथा
सगळे भाग एकत्र – ही वाट दूर जाते – सर्व भागांची लिंक
हे पण वाचा-
कादंबरी- सख्या रे …
कादंबरी- ट्वेंटी थ्री
आमचे channel जॉईन करा- whatsapp.com
