ही वाट दूर जाते भाग 6: उधाण | मराठी रोमँटिक कथा
ही वाट दूर जाते भाग 6: उधाण | मराठी रोमँटिक कथा
दुसऱ्या दिवशी अश्विनी आणि आदित्य आपापली चित्रं घेऊन वर्कशॉपला आले. विल्यम्स इतरांनी काढलेल्या चित्रांवरून नजर फिरवत होता. प्रत्येकाच्या कॅनव्हासवर एकाच विषयाची वेगवेगळी, काहीतरी नवीन सांगणारी रूपं आकार घेत होती.
विल्यम्स अश्विनी आणि आदित्यजवळ आला.
विल्यम्स – काय काढलंय तुम्ही दोघांनी? दाखवा बघू.
दोघांनी आपापले कॅनव्हास बाहेर काढून त्याच्यासमोर ठेवले. त्यांची चित्रं पाहून विल्यम्सच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
विल्यम्स – As expected!
एवढंच म्हणून तो त्यांच्याकडे वळला.
विल्यम्स – कालच मी ओळखलं होतं की तुम्हा दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. एकटेपणा! मला तुमची पार्श्वभूमी फारशी माहिती नाही आणि ती जाणून घ्यायचीही नाही. पण हा एकटेपणा तुम्ही तुमचा वीक पॉइंट बनवला आहे. खरं तर You, me and us हा विषय तुम्हा दोघांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आपापला एकटेपणा घालवून एकत्र काहीतरी क्रिएट करण्याची. पण त्यासाठी you will have to make your loneliness your strength and not your weakness.
अश्विनी आणि आदित्यने एकमेकांकडे पाहिलं.
विल्यम्स – So now work together and make the “us” from these you and me pictures.
दोघांनी आपापले कॅनव्हास समोरच्या स्टँडवर लावले आणि त्यांच्याकडे बघू लागले. एका बाजूला एकटी उभी असलेली तरुणी आणि दुसऱ्या बाजूला एकटा उभा असलेला तरुण. You आणि me!
परिस्थिती जरा अवघडलेली होती. दोघंही दोन्ही चित्रांकडे निरखून बघत होते. मधेच एकमेकांकडे बघून हलकंसं हसत होते. पण पुढाकार मात्र कुणीच घेत नव्हतं.
इतक्यात आदित्यचा फोन वाजला. अविनाशचा फोन होता. आदित्यने फोन अश्विनीला दाखवला. तो पाहून ती दचकली. खरं तर तिची प्रतिक्रिया नेमकी काय होती, हे तिलाही कळायच्या आत आदित्यने फोन उचलला.
आदित्य – बोल अविनाश! How are you? अरे, आहेस कुठे?
अविनाश – All good, dude. Just caught up with some work. I need your help, dude.
आदित्य – Anytime. Tell me.
अविनाश – तुझा तो वकील मित्र कोण आहे? फॅमिली कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारा? आपल्याला सुनीलच्या पार्टीत भेटला होता बघ.
आदित्य – अरे, तो? तो प्रणव. का रे?
अविनाश – अरे, जरा काम होतं त्याच्याकडे. त्याचा नंबर जरा मेसेज करशील?
आदित्य – Oh sure! But anything serious, if I may ask?
असं विचारत त्याने अश्विनीकडे पाहिलं.
अविनाश – Nothing serious, dude. I want to consult him for a divorce.
आदित्य – कोणाचा डिव्होर्स करवतो आहेस बाबा? (हसत) तो प्रणव साला एकदा केस हातात आली ना, की नवरा-बायकोला सेपरेट करूनच सोडतो.
आदित्य जोरात हसला.
अविनाश – ह्यावेळी त्याचा क्लायंट मी आहे, and I hope he does a good job!
आदित्य – (अविश्वासाने) What???
अविनाश – Yes, dude. Long story. फुरसतीत सांगेन. आत्ता ऑफिसला पळतो. तो नंबर मेसेज कर without fail. Good night!
अविनाशने फोन कट केला. आदित्यने फोन कानाजवळ तसाच धरून ठेवला आणि तो आश्चर्याने अश्विनीकडे बघू लागला.
अश्विनी – काय म्हणाला अविनाश?
आदित्य तिच्याकडे बघतच राहिला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. जणू तिचा प्रश्न त्याच्या कानापर्यंत पोहोचलाच नव्हता. अश्विनीने त्याच्या हातातला फोन काढून घेतला. तेव्हा तो भानावर आला.
अश्विनी – मी विचारलं, काय म्हणाला अविनाश?
आदित्य – (सारवासारव करत) काही विशेष नाही. जनरल हाय-हॅलो.
अश्विनीला तो काहीतरी लपवतोय, हे लक्षात आलं होतं. तरीही तिने जास्त खोलात जाणं टाळलं.
अश्विनी – Oh okay. Looking at your face, मला वाटलं की त्याने तुला एखादी हॉरर स्टोरी सांगितली!
आदित्य – No. Nothing like that.
इतक्यात विल्यम्स पुन्हा त्यांच्याजवळ आला.
विल्यम्स – So guys, what have you decided? अजून एक रेषसुद्धा काढली नाही तुम्ही. हरकत नाही. चित्र हे कवितेसारखं असतं. ते ठरवून काढता येत नाही. आणि एकदा कॅनव्हासवर उतरायला लागलं की पूर्ण झाल्याशिवाय समाधान देत नाही. Take your time. पण हे चित्र एक सुंदर स्टोरी सांगू दे. तुम्हा दोघांची! हवं असल्यास हे कॅनव्हास इथेच ठेवून तुम्ही दोघं आज निघा. एकत्र वेळ घालवा. एकमेकांचा एकटेपणा कमी करा. एकमेकांना आणखी ओळखा. मग बघा, उद्या हेच चित्र किती छान रूप घेतं!
विल्यम्सचं बोलणं ऐकून दोघं तिथून निघाले. हॉलच्या बाहेर येऊन ते आदित्यच्या गाडीत बसले. आदित्यने गाडी सुरू केली. दोघंही एक शब्द बोलत नव्हते.
शेवटी आदित्यनेच शांतता मोडली.
आदित्य – त्या विल्यम्सने सांगितल्याप्रमाणे आपण जरा चित्राबद्दल बोलूया का?
अश्विनी – (समोरच्या रस्त्याकडे बघत) हम्म.
आदित्य – आज लवकर निघालोय. कॉफी पीत बोललो तर चालेल ना तुला? उशीर नाही ना होत?
अश्विनीने रस्त्यावरची नजर न हटवता नकारार्थी मान हलवली.
आदित्यने गाडी एका कॉफीशॉपजवळ थांबवली. दोघं आत गेले आणि एका टेबलावर बसले. आदित्यने कॉफीची ऑर्डर दिली.
आदित्य – So, what do you have to say about the painting? कसं पूर्ण करायचं आपण ते?
अश्विनी काही न बोलता मेन्यू वाचत बसली.
आदित्य – (तिच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवत) Hello, I am talking to you. Please answer my question.
अश्विनीने त्याच्या डोळ्यांत पाहिलं.
अश्विनी – तू जो प्रश्न विचारायला मला इथे आणलं आहेस, तो प्रश्न विचार.
तिच्या थेट बोलण्याने आदित्य थोडा गोंधळला. त्याने नजर खाली वळवली.
आदित्य – विचारला ना.
अश्विनी – आदित्य, अविनाश तुला काय म्हणाला?
आदित्य – (तिच्याकडे बघत) मी म्हणालो ना, जनरल हाय-हॅलो.
अश्विनी – प्रणव, डिव्होर्स… हे सगळं काय आहे?
आदित्य – So, you heard it, is it? Okay. तो आमच्या एका कॉमन फ्रेंडच्या डिव्होर्सबद्दल बोलत होता. Nothing serious.
अश्विनी – (त्याच्या डोळ्यांत बघत) तो आमच्या डिव्होर्सबद्दल बोलत होता, हे मला माहिती आहे.
आदित्य – (आश्चर्याने) तुला कसं माहीत? I mean…
अश्विनी – अविनाशनेच मला सांगितलं आहे की तो मला डिव्होर्स देणार आहे. त्याची अमेरिकेत एक गर्लफ्रेंड आहे. अमेरिकन! तो तिच्याशी लग्न करून तिथला नागरिक होणार आहे आणि तिथेच सेटल होणार आहे!
आदित्य – What???
अश्विनी – Yes.
आदित्यच्या चेहऱ्यावर आश्चर्याबरोबरच संतापही दिसू लागला.
आदित्य – पण हे खूप चुकीचं आहे. मी त्याला फोन करून शिव्या घालतो. समजावतो त्याला.
अश्विनी – उपयोग होणार नाही. ऐक माझं. त्याला हवं ते करू दे. तुझ्याकडून जी मदत हवी आहे, ती त्याला दे. मला आता त्रास होत नाही. I have come to terms with this reality of my life. I am ready to face it.
आदित्य – But how can he…
अश्विनी – (निग्रहाने) Aditya, forget what he can and leave it to him. Let us focus on what “we can” do to complete our picture.
हे बोलताना नकळत अश्विनीने टेबलावर ठेवलेल्या आदित्यच्या हातावर आपला हात ठेवला होता. आदित्यनेही नकळत प्रतिसाद म्हणून तिच्या हातावर आपला हात ठेवला.
क्षणभराने दोघांच्याही ते लक्षात आलं. दोघांनीही लगेच हात मागे घेतले. अचानक निर्माण झालेल्या त्या अवघडलेल्या परिस्थितीत आता कुणी काय बोलावं, हेच दोघांना सुचेना.
त्यानंतर दोघंही काही बोलले नाहीत. बिल देऊन ते गाडीत बसले.
गाडी मरीन ड्राइव्हवरून जात होती. दोघंही रस्त्याकडे नजर लावून बसले होते. कुणीच काही बोलत नव्हतं. क्वीन्स नेकलेसमधला हिरा असलेला एकेक दिवा मागे पडत होता. पलीकडचा समुद्र मात्र त्या दिवशी उधाणाला आला होता.
तिकडे विल्यम्स दोन्ही चित्रं समोर ठेवून बसला होता. त्या चित्रांमधल्या समुद्रालाही उधाण आल्याचा त्याला भास होत होता.
हॉटेलच्या खोलीतल्या आरामखुर्चीत बसून तो काचेच्या खिडकीतून दिसणारा फेसाळ समुद्र बघत होता. हातातल्या ग्लासातली फेसाळलेली बीयर तो हळूहळू पीत होता. त्याचे निळे डोळे लुकलुकत होते आणि ओठांवर मिश्किल हसू उमटलं होतं.
त्याच्या समोर एक चित्र आकार घेत होतं!!!
क्रमश:
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ७ – Aपूर्ण – मराठी कथा
आधीच्या भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ५ – कॅनव्हास – मराठी कथा
हे पण वाचा- वेळ
