मराठी रोमँटिक कथा - ही वाट दूर जाते भाग ९

ही वाट दूर जाते भाग 9: शेवटचा भाग | मराठी प्रेमकथा

ही वाट दूर जाते भाग 9: शेवटचा भाग | मराठी प्रेमकथा

त्यानंतर आठवड्याभरात अविनाश भारतात आला. त्याचा जेटलॅग जरा उतरल्यावर दुसऱ्या दिवशी अश्विनीने त्याला डिनरला बाहेर जायचे सुचवले. अविनाश आनंदाने तयार झाला. दोघे एका ओपन रेस्टॉरंटमध्ये गेले. अविनाशने ड्रिंक ऑर्डर केले. तो एका शब्दाने माफी न मागता अश्विनी अमेरिकेत किती खुश असेल हे सांगत अमेरिकेतील मस्त आयुष्याचे वर्णन करत होता.

इतक्यात पेपरात बांधलेले काहीतरी हातात घेतलेला आदित्य त्याच रेस्टॉरंटमध्ये येताना त्याला दिसला. त्याला तिथे बघून अविनाशला आश्चर्य वाटले आणि त्याने प्रणवला फोन केला नव्हता हे आठवून रागही आला.

अविनाश- हा इथे काय करतोय?

अश्विनी- कोण?

अविनाश- आदित्य. माझा मित्र आहे. आपल्या लग्नात आला होता. Hope he does not see us.

अश्विनी- ओह. आदित्य आला वाटत? Good.

अश्विनी उठून आदित्यकडे गेली. अविनाश काहीच कळत नसल्याने गोंधळून बघत होता. अश्विनी आदित्यला बरोबर घेऊन आली. शेजारच्या खुर्चीत बसायला सांगितले. त्याने हातातील पार्सल बाजूला ठेवले आणि शांतपणे बसला. अश्विनी पण बसली.

अविनाश- Whats happening Ashwini?

अश्विनी- आदित्यला मीच इथे बोलावले आहे. (आदित्यकडे वळून) Aditya meet my husband Avinash. (अविनाशकडे बघत) and Avinash meet MY friend Aditya! (आदित्यला) आदित्य हा तोच आहे ज्याने अमेरिकेतील एका मैत्रिणीच्या नादाला लागून, तिथल्या नागरिकत्वाचा सोपा मार्ग मिळाल्याने त्या मार्गातील मोठा अडसर, म्हणजे मला बाजूला करायची सुपारी तुझ्या करावी प्रणवला दिली होती!

अविनाशच्या पायाखालून जमीन सरकली.

अविनाश- (उसने अवसान आणून) हे काय बोलते आहेस तू अश्विनी? आणि आदित्य तू माझा विश्वासघात केलास?

अश्विनी- (शांतपणे) अविनाश इथे एकतर मी खोटे बोलते आहे किंवा आदित्यने तुझा विश्वासघात केला आहे ह्यापैकी एकच सत्य असू शकते. नीट विचार करून सांग की सत्य काय आहे?

अविनाश- (चिडून) What the hell is all this? Are you trying to frame me?

अश्विनी- Oh not at all. I am going to frame something else by the end of this conversarion. You will come to know about that very soon. So coming back to the point, सत्य काय आहे अविनाश?

अविनाश- मी कोणतेही उत्तर द्यायला बांधील नाही. मी तुला डिव्होर्स देणार आहे हे सांगितले होते. आदित्यकडे मदत मागितली होती. So what? पण आता नेतोय ना तुला युएसला? मग हा काय नवा ड्रामा आहे?

अश्विनी- तू कित्ती स्वार्थी आहेस अविनाश! मला बरोबर नेणे शक्य नाही हे आधीच माहिती असताना ते लपवून आणि आयत्यावेळी सांगून, आमच्या अगतिकतेचा फायदा घेऊन माझ्याशी लग्न केलेस. मग अमेरिकेत कोणीतरी पोरगी भेटल्यावर निर्लज्जपणे मला घटस्फोट द्यायची तयारी केलीस, तिने तुला डंप केल्यावर जणू काहीच झाले नाही असे भासवत मला उपकार केल्यासारखी अमेरिकेला न्यायला भारतात आलास! ह्यात मी कुठे आहे अविनाश? तू अमेरिकेला जायच्या आधी तू उपभोगलेल्या…हो तूच उपभोगलेल्याच काही इंटिमेंट क्षणांच्या पलीकडे माझे तुझ्या आयुष्यात स्थान किंवा अस्तित्व काय आहे? आणि आता देखील तुझ्याबरोबर अमेरिकेला का यायचे मी? तुझ्या रात्री सजवायला की तुझ्या अमेरिकन मैत्रिणीसमोर तुझी हक्काचे सेक्स टॉय म्हणून पेश करून तिला जळवायला?

अविनाश- अच्छा! तर गोष्टी ह्या थराला गेल्या आहेत तर. खूपच घट्ट मैत्री झालेली दिसते तुमची? काय रे आदी किती रात्री काढल्यास माझ्या बायकोबरोबर? आणि अश्विनी तू? नवरा काही महिने लांब गेल्यावर संयम सुटला वाटत तुझा लगेच? वा! आपला व्यभिचार लपवायला मला व्हीक्टीम करायची आयडिया मस्त आहे!

अश्विनी- (टाळ्या वाजवते आणि हसते) There you go! The selfish corrupted mind! Avinash grow up. जे आपण करतो ना तीच अपेक्षा आपण जगाकडून करतो. व्यभिचार तू केलास, मला दूर करायचा प्लॅन तू केलास आणि आम्ही व्यभिचारी? तू एक फोन करून घटस्फोटाचा निर्णय मला सांगितलास. माझं काय होईल ह्याचा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही! माझे नैराश्य, माझे दुःख मला आत्महत्येच्या विचारांपर्यंत घेऊन गेले ह्याची कल्पना देखील आहे तुला? त्यातून मला बाहेर ह्या तुझ्या मित्राने काढले. आणि बदल्यात अपेक्षा काय? फक्त माझे भले? कोण होता तो माझा? कोणीच नाही. फक्त लग्नात एकदा भेटलेला माझ्या नवऱ्याचा मित्र!

अविनाश- पण…

अश्विनी- (डोळ्यातून आग ओकत) Now keep quiet and listen to me. Just keep quiet!

तिचा अवतार बघून अविनाश वरमला. गप्प बसला.

अश्विनी- आयुष्याच्या साथीदाराकडून मला प्रेम आणि आदर इतक्याच अपेक्षा होत्या. माझ्या लग्नाच्या आईबाबांना असलेल्या टेन्शनमुळे, लग्न जमत नसल्याने कुठेतरी मनात मूळ धरलेल्या न्यूनगंडामुळे नाही म्हणणे शक्य असताना मी तुला होकार दिला. परिस्थितीने माझ्या भावनांवर, माझ्या इच्छाशक्तीवर मात केली. पण तो निर्णय किती चुकीचा होता हे तू लगेच दाखवून दिलेस. मी खूप खचले. एकाकी झाले. पण माणुसकी, नशीब आणि पुरुषांवरून उडालेला माझा विश्वास आणि आत्मविश्वास मला आदिने परत मिळवून दिला.

अविनाशने आदित्यकडे पाहिले. आदित्य शांत बसलेला होता.

अश्विनी- आता नीट ऐक. मी हे तुला फोनवर सांगू शकत होते. पण तुला प्रत्यक्ष सांगून तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे दुःख, मला प्रचंड यातना देणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरील यातना बघायची संधी मला सोडायची नव्हती. तू मगाशी काय म्हणालास? मी आणि आदिने किती रात्री एकत्र काढल्या? एकही नाही. आमच्यात आणि तुझ्यात हाच फरक आहे. मी दिलेली, तुझ्यासारखा कोणताही स्वार्थी पुरुष हसत मान्य करेल अशी लिव्ह ईन ची ऑफर ह्या वेड्याने नाकारली!

अविनाश प्रचंड आश्चर्याने आदित्यकडे बघत होता. त्याचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आदित्य तितक्याच शांतपणे बसलेला होता.

अविनाश- अश्विनी हे काय बोलते आहेस तू? How can you…

अश्विनी- (त्याला मधेच तोडत) Why not? Just because I am a woman? तू पुरुष आहेस म्हणजे अमेरिकेत किंवा कुठेही तू काहीही करायचे, मनात येईल तेव्हा घटस्फोट द्यायचा, ते जमलं नाही की निर्णय फिरवून हक्काच्या बाईला वाट्टेल तेव्हा आणि तसे झुकवायचे, वापरायचे? ही तुझ्यासारख्या काही स्वार्थी पुरुषांची मानसिकता आहे. आणि ती मला स्त्री म्हणून मान्य नाही. (आदित्यकडे वळून) आदि ते चित्र उघड.

आदित्यने पेपरात बांधून आणलेलं त्या दोघांची चित्र एकत्र करून तयार केलेलं चित्र टेबलवर मधोमध ठेवलं. अविनाशने ते चित्र पाहिले.

अश्विनी- हे मी आणि आदिने एकत्र तयार केलेलं चित्र आहे. हे चित्र आमच्या मैत्रीचं प्रतिक आहे. त्याचा एकलकोंडेपणा आणि तू माझ्यावर लादलेला एकाकीपणा ह्या चित्राने संपवला. आता नीट ऐक. तू मला डिव्होर्स देणार होतास ना? आता त्याची गरज नाही. आता मीच तुला डिव्होर्स देणार आहे. तोच प्रणव आता तुला नोटीस पाठवेल. तू एक्सेप्ट कर किंवा चॅलेंज कर. I don’t care!

हे ऐकून प्रचंड हादरलेल्या अविनाशच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाही. त्याने मान खाली घातली आणि तो बसून राहिला. अश्विनीने आदित्यला हाताला धरून उभे केले.

अश्विनी- आदि. लिव्ह ईन म्हणजे आत्ता ज्या स्थितीत हे चित्र आहे ती अवस्था. दोन चित्र एकत्र येऊन एक खूप छान चित्र बनले आहे. पण त्याला सजवणारी, सांभाळणारी चौकट, फ्रेम नाहीये. म्हणून मी आपल्या नात्याला तू सांगत असलेल्या लग्नाच्या फ्रेममध्ये बसवायला तयार आहे. मी जगातील पहिली मुलगी असेन जी आपली नवऱ्यासमोर दुसऱ्या पुरुषाला लग्नाची मागणी घालते आहे. पण तडा गेलेली फ्रेम किंवा तडा गेलेले नाते निरर्थक असते असे म्हणतात. मग ते टाकून द्यायच्या आधीच जर काहीतरी शाश्वत असे समोर दिसत असेल तर त्याचा स्वीकार करण्यात चूक काय आहे? चांगल्या माणसांनी स्वार्थी लोकांशी थोडे स्वार्थी वागण्यात पाप काय आहे? आणि तसे असेलही तर I don’t care!

अविनाशला जिथे फक्त एक चित्र दिसत होते त्याच चित्रात आदित्य आणि अश्विनीला आपले सुंदर भविष्य दिसत होते आणि दिसत होता आपल्या निळ्या डोळ्यातून हसत असलेला पांढरी दाढीवाला विल्यम्स!

समाप्त

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

सगळे भाग एकत्र – ही वाट दूर जाते – सर्व भागांची लिंक

आधीच्या भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ८ – आय लव्ह यु – मराठी कथा

हे पण वाचा-

कादंबरी- सख्या रे …

कादंबरी- ट्वेंटी थ्री

वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved