वेळ | Mandar Jog

वेळ

दोघे चालत तिच्या bus stop जवळ आले. संध्याकाळी ऑफिसातून निघाल्यावर दोघे भेटत. मुंबईच्या गर्दीत आढळणाऱ्या हजारो जोडप्यांसारखे. कधी मरीन ड्राइव्ह, कधी वाळकेश्वर, कधी दादर चौपाटी, कधी शिवाजी पार्क. दोघे भेटत. हातात हात गुंफून भविष्याची स्वप्न बघत. त्याला नोकरी लागून चार वर्ष झाली होती आणि त्याच्याच बँकेत ती फ्रेशर म्हणून लागली होती. दोन महिन्यात जमल दोघांच आणि ते जमून आता वर्ष व्हायला आल होतं. खर तर उद्याच त्यांची प्रपोजची anniversary होती.

बस stop वर आल्यावर थोड्याच वेळात ती जाणार ह्या जाणीवेने दोघे जरा खट्टू होते. हे रोजचं होतं. पाउल निघत नसे तिचं. किमान तीन बस सोडायची ती. उद्या काय स्पेशल ते अजून ठरलं नव्हत. तिने सहज विचारलं-

ती- उद्या काय?

तो- बघू. तुला किती वेळ आहे त्यावर अवलंबून असेल. तुला वेळ नसतो. मी रिकामाच असतो.

ती- अस काय रे sarcastic बोलतोस? मला वेळेवर घरी जायला नको का? आधीच बँकेच्या परीक्षेचे क्लास असतात असं खोटं सांगून तुला भेटते.

तो- म्हणूनच म्हणालो ना की उद्याच उद्या बघू.

इतक्यात तिच्या आईचा फोन आला. तिने फोन घेतला.

ती- बोल आई…हो येते ना ..तासाभरात पोहोचते…काय? जोश्यांचे लाडू? नलू अत्यासाठी? बर…आणते…ठीक आहे.

तिने फोन कट केला.

तो- काय म्हणाली आई?

ती- अरे काही नाही. आई आणि बाबा उद्या नलू आत्याकडे जाणार आहेत डोंबिवलीला. तिच्यासाठी लाडू आणायला सांगितले आई ने. तिला जोश्यांचे मोतीचुराचे लाडू आवडतात खूप.

इतक्यात तिची बस आली. ती बस मध्ये चढून निघून गेली. तो रेल्वे स्टेशन कडे निघाला.

दुसर्या दिवशी आई बाबा पहाटेच्या ट्रेन ने डोंबिवलीला गेले. ती ऑफिसला जायला तयार होत होती. आज स्पेशल दिवस म्हणून खास साडी आणि त्याला आवडणारा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता तिने. Gas वर गरम होत असलेला चहा घेतला की ती निघणार होती. तेवढ्यात बेल वाजली. ती जरा वैतागली ह्या घाईच्या वेळेला कोण म्हणून. दार उघडल तर समोर तो! ती चकित आणि तो खुशीत.

तो- आत येऊ ना?

ती- ह…हो ये ना…पण तू इथे आणि आत्ता?

तो- (सोफ्यावर बसत) हो. तुझे आईबाबा घरी नाहीत हे कळल्यावर आजचं स्पेशल दिवसाचं सेलिब्रेशन करायला तुझ्या घरी यायचा निर्णय घेतला.

ती- अरे पण ऑफिस.

तो- ऑफिसला मार गोळी आज.

ती- अरे पण…

तो- मी जाऊ का?

ती- (थोडी लाजत) मी अस कुठे म्हणाले? पण…

तो उठला. तिच्या जवळ गेला. खिशातून तिच्यासाठी आणलेली बारीक चेन तिच्या गळ्यात घातली आणि तिला घेऊन आरशासमोर गेला. ती पुढे आणि तो तिला बिलगून तिच्या मागे. आरशात बघू लागले. तिला चेन आवडली आणि त्याला चेन घातलेली ती.

ती- किती नाजूक आहे हि चेन…

तो- अगदी तुझ्या सारखी.

हे बोलून त्याने तिला मागून मिठी मारली आणि तिने डोळे बंद करून घेतले. त्याचे उष्ण श्वास तिला मानेवर जाणवले. तिच्या दंडावर फिरत असलेली त्याची बोट तिच्या शरीरात रोमांच निर्माण करू लागली. आणि……

……………

ती- (हसत) आणि काय? तो एक क्षण होता जो गेला आणि तू लांब होत परत सोफ्यावर बसलास. आणि काय म्हणालास आठवत ना?

तो- हो. मी म्हणालो की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आजचा वेळ आपण एकत्र घालवायचा आहे. पण गप्पा मारत, तुझ्या हातच जेवत आणि रात्री तुझे आईबाबा आले की मी आजच तुला मागणी घालणार आहे.

ती- आणि तू खरच रात्री दहा पर्यंत थांबलास. ए, मागणी घातल्यावर आई बाबांची रिएक्शन आठवते का तुला?

तो- म्हणजे काय? तुझे बाबा चिडले होते पण आई समजूतदार आहे तुझी. तिने माझी चौकशी केली. तुझ्याच बँकेत आहे कळल्यावर शांत झाली.

ती- आणि बाबांची ती flat ची अट?

तो- केली की पूर्ण. एका वर्षात वन बीएचके घेतला ना.

ती- आणि त्यांनी पण शब्द पुरा करत त्यांची मुलगी तुला दिली ना?

तो- हम्म..मग लग्नानंतर सवा वर्षात आपल्या दोन्ही मुलांचा जन्म. ती पण जुळी. एक मुलगा आणि एक मुलगी…पुढे त्यांच शिक्षण.

ती- माझी vrs आणि तुझी प्रगती.

तो- आणि here we are. हे डुप्ले पेंटहाऊस, परदेशी गाड्या, पैसे…

ती- ते तू तुझ्या हुशारीच्या आणि हिमतीच्या जोरावर मिळवलं आहेस. आज आपल्या बँकेचा सिईओ आहेस तू. मला आणि मुलांना अभिमान आहे तुझा. दोन्ही मुलं गेल्याच वर्षी परदेशात गेली शिकायला.   

तो- आणि आज परत तोच दिवस आहे.

ती- आपला प्रपोज डे…

तो- आणि आजही घरात कोणी नाहीये…

ती- हम्म…मग आजही मस्त गप्पा मारू, माझ्या हातच जेवायला वाढते.

तो हळूच उठला. साईड टेबलाच्या drawer मध्ये ठेवलेला हिर्यांचा नेकलेस तिच्या गळ्यात घालत तिला आरशासमोर घेऊन गेला. ती पुढे आणि तो तिला बिलगून तिच्या मागे. आरशात बघू लागले. तिला नेकलेस खूप आवडला होता आणि त्याला नेकलेस घातलेली ती.

ती- किती सुंदर आहे हा नेकलेस…

तो- अगदी तुझ्या सारखा…

हे बोलून त्याने तिला मागून मिठी मारली आणि तिने डोळे बंद करून घेतले. त्याचे उष्ण श्वास तिला मानेवर जाणवले. तिच्या दंडावर फिरत असलेली त्याची बोट तिच्या शरीरात रोमांच निर्माण करू लागली. अगदी पहिल्या वर्षाच्या सेलिब्रेशन सारखी…आणि…

ती- (हसत) आणि काय? तो एक क्षण होता जो गेला आणि त्या दिवशी तू लांब होत परत सोफ्यावर बसलास. आणि काय म्हणालास आठवत ना?

तो- हो. मी म्हणालो की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आणि आज ती योग्य वेळ परत एकदा आलेली आहे. मी वेळेचा किती पक्का आहे हे तू गेली वीस वर्ष अनुभवते आहेस…ह्याच दिवशी….दर वर्षी…

ती लाजली. तिने वळून आपले हात त्याच्या मानेभोवती गुंफले आणि खट्याळपणे त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली-

ती- वेळेचा पक्का आहेस ना मग वेळ फुकट घालवू नको बोलण्यात…

त्याने तिला उचलली आणि तो बेडकडे जाऊ लागला. ती हातात असलेल्या रिमोटने काचांवरचे पडदे बंद करत होती. दोघांनी परत एकदा त्यांच्या प्रपोज वेळ साधली होती…पाळली होती…अगदी लग्नाला बावीस वर्ष होऊन सुद्धा!  ©मंदार जोग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “वेळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!