मृगजळ सीझन २ भाग ३
मानसी- रंगा..मी खूप दमले आहे…I am too tired..मला असं जगायची अजिबात इच्छा नाहीये. मला जायचं आहे.
असं म्हणून तिने हातात धरलेली सुरी फोन धरलेल्या हाताच्या मनगटाजवळ आणली. तिचा चेहरा निर्विकार होता. ते पाहून श्रीरंग हादरला.
श्रीरंग- मानसी…एक..एक मिनिट…ऐक माझं…
मानसी ट्रान्समध्ये गेल्यासारखी फोनमध्ये बघत होती. श्रीरंग भीतीने थरथरत होता. सुरी मानसीच्या मनगटाजवळ आली होती. ते पाहून श्रीरंग जोरात ओरडला-
श्रीरंग- मानसी थांब…प्लीज…ऐक माझं..मी..मी येतोय इंडिया मध्ये…तू असं काही करणार नाहीयेस. तुला शपथ आहे माझी. प्लीज मानसी…प्लीज…
हे ऐकून मानसी थांबली. तिने श्रीरंगकडे पाहिलं. आणि म्हणाली-
मानसी- रंगा…तू नक्की येशील ना?
श्रीरंग- हो मानसी मी शक्य तितक्या लवकर येतो. पण तू शांत रहा. हा वेडेपणा करू नको. मी आलो की सगळं नीट करून देईन ओके? मी आहे तुझ्या बरोबर. तू एकटी नाहीस. ओके?
मानसीने काहीही न बोलता फक्त होकारासाठी मान हलवली.
श्रीरंग- तू ठीक आहेस ना आता? मी..मी कोणाला फोन करू का?
मानसी- नाही नको…मी ठीक आहे. झोप तू..आणि sorry मी तुला ह्यावेळी फोन केला…पण मला कळत नव्हतं मी काय करू, कोणाला सांगू ते…म्हणून…
श्रीरंग- इट्स ओके मानसी..मला सगळं कळतंय. तू कधीही कोणत्याही वेळी मला फोन करू शकतेस. माहित्येय ना?
मानसी- हम्म…
श्रीरंग- बाय…मी येतोय ओके?
मानसी- हम्म…लवकर ये..बाय..
अंकिताला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. उमेश सकाळीच हॉस्पिटलमध्ये बुके घेऊन आला. अंकिताच्या रूममध्ये knock करून आत आला. अंकिता आता उठून बसलेली होती.
उमेश- गुड मॉर्निंग madam. आता अगदी टवटवीत दिसताय. ही फुलं तुमच्यासाठी.
त्याने तिला बुके दिला. अंकिताने बुकेचा वास घेतला. त्या वासाने तिला खूप प्रसन्न वाटलं.
अंकिता- सर तुम्ही कशाला इतकं..
उमेश- कशाला म्हणजे? तुम्ही आमच्या अन्नदात्या आहात. तुमची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा.
ते ऐकून अंकिताला खूप awkward वाटलं. ती लगेच म्हणाली-
अंकिता- प्लीज सर अहो असं काय बोलता? आपण सगळेच शिक्षक आहोत आणि आपल्या क्लासमध्ये शिकवतो. असं अन्नदाता वगैरे म्हणून मला कानकोंड करू नका. बाकी फुलं खूप छान आहेत.
उमेश- चला मी डिस्चार्ज formality बघतो काय आहेत ते.
अंकिता- नको सर…अहो हर्षद आणि सौरभ येतील थोड्या वेळात.
उमेश- ते तुम्हाला घरी घेऊन जातील. पण ते यायच्या आधी मी बाकी सोपस्कार तर करून ठेवतो. आणि हो. हॉस्पिटलचं बिल इंश्युरन्स कंपनी भरेल. मी आपल्या क्लासच्या ग्रुप इंश्युरन्स एजंटला कालच बोलावून सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त उठायचं आणि घरी जायचं आहे.
हे ऐकून अंकिताला खूप छान वाटलं. उमेश इतकी वर्षं तिच्या बरोबर काम करत होता. पण आज तिला एक वेगळाच उमेश बघायला, अनुभवायला मिळत होता. तिची काळजी घेणारा, तिचं कौतुक करणारा…तिला त्याचं हे रूप भावलं होतं. इतक्यात नर्स आली. अंकिताने अजूनही दूध प्यायलेलं नाही पाहून ती रागावली आणि गेली. उमेशने थर्मासमधून दूध ग्लासात ओतलं आणि अंकितासमोर धरलं.
उमेश- दूध…
अंकिता- नको ना सर..मला ना दूध अजिबात आवडत नाही.
उमेश- हे दूध नाहीये. हे औषध आहे असं समजून प्या.
अंकिता- पण सर…
उमेश- ते काही नाही. दूध प्यावंच लागेल तुम्हाला.
असं म्हणून तो बेडवर तिच्या शेजारी बसला आणि त्याने ग्लास तिच्या तोंडासमोर धरला.
उमेश- म्याडम प्लीज प्या..
अंकिताने वळून त्याच्याकडे पाहिलं. तो पहिल्यांदाच तिच्या इतक्या जवळ बसला होता. तरी त्याच्या डोळ्यात कुठेही आकर्षण, लालसा दिसत नव्हती. तिने त्याच्या हातून ग्लास घेतला आणि दूध पिऊन टाकलं. ग्लास त्याला परत दिला. तिला दुधाची मिशी आली होती. ते पाहून उमेश जोरात हसू लागला. तो का हसतोय हे न कळल्याने अंकिता थोडी चकित झाली.
उमेश- काय झालं सर?
उमेश- म्याडम तुम्हाला दुधाची मिशी आली आहे.
हे ऐकून अंकिता एकदम लाजली आणि ड्रेसच्या बाहीने ते पुसायला जाऊ लागली इतक्यात उमेशने आपला रुमाल तिच्या समोर धरला आणि म्हणाला-
उमेश- रुमालाने पुसा. मी वापरलेला नाहीये. अगदी स्वच्छ आहे.
तिने रुमाल घेतला आणि ओठावर लागलेलं दूध पुसलं. त्याच्या रुमालाला येणारा मोगऱ्याच्या अत्तराचा वास तिला आवडला. तिने डोळे मिटून दोन सेकंद तो वास नाकात भरून घेतला.
उमेश- मोगरा आहे. माझा आवडता इसेन्स. तुम्हाला पण आवडला ना?
अंकिता- हम्म…खूप छान आहे वास.
तेवढ्यात हर्षद आणि सौरभ आले. हर्षद उमेशला तिथे पाहून थोडा थबकला. अंकिताने त्याला आत यायला सांगितलं.
अंकिता- अरे ये हर्षद..हे उमेश सर आहेत. आमच्या क्लासमध्ये शिकवतात. काल ह्यांनी आधार दिला नसता तर मी पडले असते. डोक्याला मार लागला असता. कदाचित हाड पण मोडलं असतं माझं. ह्यांनीच मला इथे admit केलं.
हर्षद- ओके…thank you सर…
उमेश- अरे आभार काय त्यात. मी एक कलीग म्हणून माझं कर्तव्य केलं. बर madam मी निघतो. माझी लेक्चर आहेत. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आराम करा. क्लासची काळजी करू नका. हर्षद आईची काळजी घे. आणि सौरभ सर…तुम्हीही ह्यांना अजिबात काम करू देऊ नका काही दिवस..येतो मी.
उमेश निघून गेला.
सौरभ- हर्ष, तू खाली जाऊन बघ discharge formality काय आहेत ते.
हर्षद- ओके…
हर्षद खाली गेला. रूममध्ये सौरभ आणि अंकिता दोघेच उरले. ते दोघे असे एकत्र एकाच रूममध्ये खूप काळानंतर होते. घरी सौरभ शक्यतो तिच्या समोर थांबत नसे. कामापुरतं बोलून निघून जात असे. ती देखील विनाकारण संभाषण टाळायची. आणि आज दोघेही एका रूममध्ये एकत्र एकमेकांच्या बरोबर होते. दोघे विरुद्ध दिशांना बघत बसले होते. एक awkwardness होता. तेवढ्यात दोघांची नजरानजर झाली. सौरभ फोरमल हसला. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला-
सौरभ- ह्या हॉस्पिटलच्या रूम फारच गार असतात ना? तुला थंडी वाजली असेल ना रात्री?
अंकिता- नाही..blanket आहे ना…त्यामुळे थंडी नाही वाजली…
सौरभ- अरे हो…ते आहे ना..माझ्या लक्षातच आलं नाही…बाकी तुझी तब्येत ठीक आहे ना आता?
अंकिता- हम्म…ठीक आहे…
सौरभ- गुड..ते उमेश सर मस्त आहेत…किती वर्षं आहेत ते तुझ्या क्लासमध्ये?
अंकिता- लक्षात नाही. पण बरीच वर्षं आहेत.
सौरभ- हम्म…ओके…
तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. फोन मानसीचा होता. तिचं नाव वाचून सौरभ घाबरला. त्याने घाईत फोन कट केला. त्याने फोन कट केल्याचं लक्षात येऊन मानसी जाम वैतागली. कालपासूनच तिची जरा सटकलेली होती. तिने परत फोन लावला. सौरभचा फोन वाजला. अंकिता पुढ्यात होती. त्याने परत फोन कट केला.
अंकिता- काय झालं? फोन घे तू…
सौरभ- न..नको..क्लायंटचा फोन आहे. उगाच चौकश्या करून डोकं खातो हा. इन्व्हेस्टमेंट अजिबात करत नाही.
सौरभ कसाबसा आत्मविश्वास जमा करून बोलला आणि त्याला मानसीचा परत फोन आला. तो आता चिडला. अंकिताला म्हणाला-
सौरभ- आलोच मी.दोन मिनिटात…
हे बोलून तो कॉरिडोरमध्ये आला आणि त्याने फोन घेतला.
सौरभ- हे काय नाटक आहे मानसी?
मानसी- नाटक? What नाटक? नाटक तू करतो आहेस. कालपासून. काल आपल्या valentine date मधून अचानक निघून गेलास. त्यानंतर फोनवर धड बोललेला नाहीस. आज मी फोन करते आहे तर माझा फोन घेत नाहीयेस. हे नाटक आहे. आणि मला विचारतोस नाटक काय म्हणून?
सौरभ- तुला अक्कल नाहीये का जराही? इथे माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. आणि तू सारखे फोन करते आहेस. माणुसकी नावाची काही भावना आहे तुझ्याकडे की विसरली आहेस?
मानसी- माणुसकी? Look who is talking…एका मुलीला लग्नाचं वचन देऊन अमानुषपणे बारा वर्षं झुलवत ठेवणारा माणूस आज माणुसकीच्या गप्पा मारतोय.
सौरभ- अमानुष? मी? तुझं डोकं फिरलं आहे का? जरा कमी पीत जा तू.
मानसी- ए मी माझ्या पैशाची पिते. तू किंवा तुझी लाडकी बायको पैसे नाही देत मला दारू प्यायला. आणि पिते ती सर्वांच्या समोर पिते. तुझ्यासारखी लपून छपून खोटं बोलून काहीही करत नाही.
तिचा चढलेला आवाज आणि स्वर ऐकून सौरभ जरा वरमला आणि म्हणाला-
सौरभ- प्लीज बेबी…समजून घे ना…मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. अंकिताचा डिस्चार्ज घेतोय…संध्याकाळी आपण भेटूया ना.
मानसी- अच्छा? मला कशाला भेटतोस संध्याकाळी? जिचा डिस्चार्ज घेतो आहेस तिलाच भेट. झोप तिच्या बरोबर रात्री. अजून एक मूल होऊ दे तुला. मला काय? ह्यापुढे माझ्याशी तुझा काहीही संबंध नसेल. Its over between us you coward…Go fuck your wife…
तिने फोन कट केला. सौरभने अजूनही फोन कानावरून बाजूला केला नव्हता इतक्यात त्याच्या खांद्यावर मागून एक हात पडला. सौरभ दचकला आणि मागे वळला. हर्षद होता.
हर्षद- काय झालं बाबा. इतके दचकताय कशासाठी?
सौरभ- न..नाही…दचकलो कुठे? बोल…बोल तू…काय झालं?
हर्षद- काही नाही. बिल कॅशलेस मध्ये सेटल झालं आहे. आपण आईला नेऊ शकतो.
सौरभ- ओके..चल मग…
अंकिताला घरी आणल्यावर हर्षद लगेच संध्याकाळच्या बसने पुण्याला परत गेला. सौरभ गच्चीत उभा राहून सिगारेट ओढत मानसीला फोन लावत होता. मानसीने त्याचा नंबर block केला होता. त्यामुळे तिला मेसेज किंवा फोन काहीच करता येत नव्हते. सौरभची चिडचिड होत होती. त्याची आई तिच्या खोलीत पोथी वाचत होती. सौरभ मानसीवर प्रचंड चिडला होता. तो राग तिच्याशी भांडून बाहेर काढता येत नसल्याने आणखी frustrate होत होता. सिगारेट विझवून तो तिरमिरीत त्याच्या बेडरूममध्ये आला. त्याच वेळी अंकिता अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आली. तिचे निथळत असलेले केस, उघडे दंड, खांदे आणि पाय…सुंदर दिसणारा तिचा चेहरा पाहून सौरभ स्तिमित झाला. त्याच्याही नकळत त्याने मागच्या मागे बेडरूमचा दरवाजा लावून lock केला आणि तो अंकिताकडे बघत तिच्या जवळ जाऊ लागला. त्याने पुढे होत तिला मिठी मारली. आज अनेक वर्षांनी सौरभ आणि अंकिता एकमेकांच्या जवळ आले होते. अंकिताच्या अंगातून विजेचा झटका लागावा असं काहीतरी होऊ लागलं. तिचा टॉवेल गळून पडला. सौरभने तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला जवळ घेतलं तेव्हा तिचा फोन वाजत होता. त्यावर उमेश सर असं नाव डिस्प्ले होत होतं आणि त्याच वेळी श्रीरंगच्या मुंबईकडे निघालेल्या विमानाने धावपट्टी सोडून हवेत झेप घेतली होती.
क्रमश:
मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग २ | गिफ्ट
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ३- आकर्षण […]