………तेजस ते सर्व ऐकून आपल्या केबिन मध्ये गेला. त्याने मुग्धाला फोन लावला. मुग्धाने त्याचे सर्व फोन कट केले. तेजस स्वतःवरच जाम वैतागला. त्याने मुग्धाला मेसेज केला “मुग्धा प्लीज. माझ्याशी बोल. मी सगळं एक्स्प्लेन करतो. प्लीज बोल.” मुग्धा तो मेसेज वाचून रिक्षात हमसून हमसून रडत होती. इथे ऑफिसात आर्याने राधिकाला आज रात्री ठरलेल्या तिच्या आणि तेजसच्या भेटीची दिलेली माहिती ऐकून राधिका खुश होती. आणि नियती मात्र आपले पत्ते छातीशी कवटाळून पुढली चाल खेळायची तयारी करत हसत होती! मुग्धा त्याच तिरमिरीत घरी आली. अमेय बिल्डींग मध्ये क्लासला गेला होता. मुग्धा तशीच बेडवर पडली. तिला तेजस बरोबर घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोर येत होते. तिला तेजसचा प्रचंड राग आला होता. त्या रागातच तिला झोप लागली. तेजस तिला फोन करून थकला. मग परत कामात अडकल्यावर त्याच्या स्वभावानुसार तो ही घटना तेवढ्यापुरती विसरून गेला. संध्याकाळी घरी जाताना त्याला मुग्धा आठवत होती. पण ती फोन घेणार नाही हे माहित असल्याने त्याने उद्या ऑफिसात तिच्याशी बोलायचा निर्णय घेतला.
आर्या स्काय लाउंजच्या लॉबी मध्ये बरोब्बर ८.२५ ला हजर होती. तिथून येणाऱ्या जाणार्या प्रत्येक पुरुषाची नजर तिच्यावर खिळून रहात होती. इतकी की दोन जण समोरून येणाऱ्या माणसांवर आदळले देखील. आर्याने गडद जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस घातला होता. गळ्यात एक साधासाच डायमंड नेकलेस होता. त्या नेकलेस पासून होणारी पाहणार्याची नजरबंदी तिच्या शरीराची घाटदार वळण घेत तिच्या गुडघ्याच्या सहा ते आठ इंच वर संपणाऱ्या त्या ड्रेसखाली गेल्यावर तिच्या उघड्या ताशीव पायांवर येऊन घसरगुंडी सारखी घसरून तिच्या हाय हिल मधून दिसत असलेल्या लाल नेल पॉलिश लावलेल्या निमुळत्या बोटांवर येऊन परत नेकलेस वर उडी घेत होती. दोष बघणार्याचा नव्हताच. दोष तिच्या गहूवर्णी आरडीएक्स शरीराचा होता. तिचं सौंदर्य पारंपारिक नाजुकपणा सोडून आव्हान देणारं होतं. त्यात असलेल रांगड आवताण फक्त पुरुषच imagine करून हळहळू शकत होते. ती अशी आग लावत उभी असतानाच तेजस तिथे आला. त्यानेही नजरबंदीच्या घसरगुंडीवर दोन राउंड मारल्या आणि स्वतःला सावरून तो पुढे झाला.
तेजस- हाय आर्या. मी पाच मिनिटं लेट आलो. सॉरी.
आर्या- मला “लेट येणारे” पुरुष आवडतात.
ह्यात तिने “लेट येणारे” ह्या शब्दांवर जोर देत तेजसकडे सूचक नजरेने बघितलं. ते लक्षात येऊन तेजस म्हणाला-
तेजस- oh interesting…पण आर्या मी नको तिथे लेट करत नाही आणि गरज आहे तिथे उशीरा येतो…खूप उशिरा….
आर्या- time will prove it….आपण वर जाऊया? पर्फोर्मंस सुरु होईल कोणत्याही क्षणी.
दोघे लिफ्टकडे निघाले. चालताना आर्याने सहजच तेजसचा दंड धरला. लिफ्ट मध्ये तिची बोट त्याच्या दंडावर फिरत होती. आर्या त्याच्याकडे रोखून बघत होती. तेजस तिची नजर अव्होइड करत होता. लिफ्ट बाविसाव्या मजल्यावरच्या ओपन स्काय लाउंज मध्ये उघडली. दोघे चालत पुढे आले. कडक युनिफोर्म मधल्या वेटरने त्यांना अदबीने एक टेबल ऑफर केलं. बसतानाच तेजसने पाचशेची एक नोट वेटरच्या खिशात कोंबली. आता सर्व्हीस personalised होणार होती. तेजस ने स्वतःसाठी black dog ऑर्डर केली आणि अर्याला वाईन की बियर असं विचारलं. अर्याने वेटरला “एक जेडी” अशी ऑर्डर दिली. वेटर गेल्यावर तेजस तिला म्हणाला-
तेजस- वा आर्या चक्क जेडी?
आर्या- येस.
तेजस- अग पण मग निदान स्कॉच तरी मागवायची.
आर्या- नाही तेजस. स्कॉच मध्ये एक स्मूदनेस असतो. टिपिकल युरोपियन सभ्यपणा. पण जेडी ची बातच और आहे. तिच्यात मला अमेरिकन बेफिकिरी आढळते. Raw, wild and free of any inhibitions. जेडी मला माझ्यासारखी वाटते. एकदा ट्राय करून बघ तू…
हे ऐकून तेजस ने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.
आर्या- मी जेडी बद्दल बोलते आहे. तुला काय वाटलं?
आपल्या ह्या जोकवर आर्या हसली. तिचा हा आक्रमकपणा तेजसच्या मनात कुतूहल निर्माण करत होता. त्यांची ड्रिंक्स आली. इतक्यात लाईव्ह पर्फोर्मंस सुरु झाला. दोघे ते ऐकू लागले. मंद वाऱ्यावर एक धुंद मैफल सुरु झाली.
मुग्धाच्या घरी अमेय जेऊन झोपी गेला होता. मुग्धा खिन्न बसली होती.उद्या ऑफिसात जायचं की नाही ह्याचा विचार करत होती. तिने डोळे मिटून घेतले. तिला परत तेजस बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवले. मग मनात विचार आला की तेजस आपल्याशी खोट का बोलला. त्याला सर्व माहित होत तरी तो असं का वागला? मग ती आठवू लागली कि तिने त्याला ती दांडेकर इंडस्ट्री मध्ये जॉईन करणार आहे हे कधी सांगितलं. खूप प्रयत्न करून देखील तिला ते आठवत नव्हत. ती स्वतःशी म्हणाली “म्हणजे तेजसला हे माहीतच नव्हतं? नसणारच. मी सांगितलंच नाही तर त्याला माहित कसं असेल? म्हणजे मग मी उगाच त्याच्यावर रागावले का?….हो….काहीच गरज नव्हती मला त्याच्यावर रागवायची. तो काय सांगतोय ते ऐकून तरी घ्यायला हवं होतं. तो माझा मित्र आहे आणि आता माझा बॉस देखील. कोणत्या तोंडाने मी उद्या ऑफिसात जाऊ? मी…मी त्याला मेसेज करते सॉरी म्हणून. त्याने रिप्लाय केला आणि माफ केलं तरच ऑफिसला जाईन. नाहीतर नको ती नोकरी.” मुग्धाने घाईत फोन हातात घेऊन तेजसला मेसेज केला “तेजस मला माफ करा. माझा गैरसमज झाला. प्लीज मला माफ करा. तुम्ही माफ केलंत तरच मी ऑफिसला येईन नाहीतर मी ही नोकरी करणार नाहीये. मला प्रचंड गिल्टी वाटतं आहे. तुमच्या रिप्लायची वाट बघते आहे.” तिने सेंड केलेला मेसेज डिलिव्हर झाला नव्हता. कारण तेजसने त्याचा फोन एअर प्लेन मोडवर ठेवला होता. मुग्धा प्रचंड बेचैन होती.
इथे स्काय लाउंज मध्ये live band संपला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच कौतुक केलं. आर्या आणि तेजसची अडीच ड्रिंक झाली होती. अर्धे ग्लास अजून भरलेले होते. त्या उच्चभ्रू वातावरणात आता स्लो म्युझिक सुरु झालं. ड्रिंक्सचा हलका अंमल चढून धुंद असलेली कपल्स एकमेकांना खेटून डान्स करू लागली. डान्स फ्लोअर वर लाईट डीम होऊन फक्त सहा इंचांवरचे दिसेल इतकाच उजेड उरला. आर्याने तेजसचा हात धरला आणि त्याला डान्स फ्लोअर वर नेला. आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात अडकवून ती तेजसला चिकटली. नकळत तिच्या कंबरेला तेजसच्या बाहूंचा विळखा पडला. दोघांचे गाल एकमेकांच्या गालावर घासले जाऊ लागले. आर्याची निमुळती बोट तेजसच्या केसात फिरू लागली. तेजसची तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट झाली. आर्या त्याच्या कानात म्हणाली “तेजस मला तुझी उशिरा यायची सवय बघायची आहे. आज….माझ्या घरी.” अस म्हणून तिने तेजसचे केस आपल्या उजव्या हातात धरले आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले! तिच्या ओठांची चव क्षणार्धात त्याच्या घशात उतरली. त्याला अचानक त्याच्या बंद केलेल्या डोळ्यांसमोर मुग्धा दिसू लागली….. डीझेल इंजिन सारखी दमल्यावर खरा पर्फोर्मंस देणारी मुग्धा…..त्याच्या नवनवीन fantasies त्याच्यासाठी प्रत्यक्षात आणणारी मुग्धा……मुग्धाचा तो स्पर्श, तो गंध, ती तिच्या ओठांची चव….त्याला अचानक काहीतरी जाणवलं….ही…ही चव…हा स्पर्श…हा गंध मुग्धाचा नाहीये…..मग…त्याने खाडकन डोळे उघडले. त्याच्या ओठात रुतलेल्या आर्याच्या दातातून आपला ओठ सोडवून घेत त्याने आर्याला मागे ढकलली. तो डान्स फ्लोअर वरून निघून टेबलाजवळ आला. उरलेली स्कॉच एका घोटात पिऊन त्याने बिल मागवलं. आर्या आश्चर्याने त्याच्या मागे आली.
आर्या- काय झालं तेजस? माझं काही चुकलं का? हे बघ…please dont get me wrong. It just happened…आणि तू पण involve होतास ना तेजस? मग अचानक काय झालं?
तेजस- आर्या प्लीज. आपण निघूया का? आपण उद्या बोलू. and I am sorry for this.
तेजस बिलाचे पैसे भरून निघाला. आर्या त्याच्या मागे निघाली. दोघे तेजसच्या गाडीत बसले. अर्याने ड्रायव्हरला तिचा पत्ता सांगितला. सबंध वेळ दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाही.निघताना मात्र आर्याने “गुड नाईट तेजस. काळजी घे. मी सकाळी फोन करते!” अस म्हणून त्याच्या निरोप घेतला. त्याची गाडी दिसेनाशी होईपर्यंत आर्या बिल्डींगच्या गेट जवळ उभी होती. तिला कळत नव्हतं की नक्की काय झालंय. मग तिला तेजसचा स्पर्श, ते चुंबन सर्व आठवलं. तेजस तिला हवा असलेला पुरुष होता. आर्या स्वतःशी म्हणाली “तेजस मला माहित आहे तू माझ्या इतका फास्ट नाहीस. पण मी म्हणाले ना? मला उशिरा येणारे पुरुष आवडतात म्हणून? आपण तुझ्या पेस ने जाऊ.” इतकं म्हणून एक उसासा सोडून ओठावर झालेल्या बारीक जखमेवर जीभ फिरवून आर्या बिल्डींग मध्ये शिरली!
तेजसने गाडीत फोन एअर प्लेन मोड वरून नॉर्मल मोड वर आणला. भसाभस असंख्य इमेल आणि मेसेजीस त्यात जमा झाले. तेजस शांतपणे एक एक मेसेज बघत होता. त्याला अचानक मुग्धाचा मेसेज दिसला. त्याने घाई घाईत तिला रिप्लाय दिला “मला अजिबात राग नाहीये मुग्धा. मी माफ वगैरे करायचा प्रश्नच नाहीये. तू प्लीज उद्या ऑफिसला ये. आपण निवांत बोलू.” तिला मेसेज सेंड केल्यावर तेजस डोळे मिटून शांत बसला. त्याला स्काय लाऊंज मध्ये अर्याबरोबर व्यतीत केलेले तास आठवले. मग तो डान्स फ्लोअर वरचा प्रसंग. तिचं जवळ येण, तो passionate कीस आणि अचानक त्याला मुग्धा आठवणं. त्याने खाडकन डोळे उघडले. तो विचार करू लागला की मी मुग्धाच्या जवळ कधीच गेलेलो नाही तर मग मला तिचा स्पर्श, गंध, तिचा कीस ह्या गोष्टी अनुभवल्या सारख्या का जाणवल्या? त्याला काहीच कळत नव्हतं. आता डोळ्यावर झोप देखील आली होती. त्याने सीटवर डोकं टेकवलं. त्याला क्षणात झोप लागली.
मुग्धाला रात्री जाग आली. बाथरुमला जाताना तिने घड्याळात पाहिलं तर साडेचार वाजले होते. तिचं लक्ष फोनवर गेलं. त्यात मेसेज आल्याचा लाईट ब्लिंक होतं होता. तिने मेसेज पाहिला. तेजसचा रिप्लाय बघून तिला समाधान वाटलं. तिने ऑफिसात जायचा निश्चय केला. त्या नंतर तिला झोप लागलीच नाही. ती साडेपाचला मस्तपैकी वॉक करून आली. मग अमेयचा डबा करून त्याला बस मध्ये बसवलं. मग स्वतः तयार झाली. आणि ऑफिसला निघाली.
तेजस आज लवकर ऑफिसला आला होता. तो ऑफिसच्या मेन डोअर वरच्या कॅमेरा वर नजर ठेऊन होता. त्याला मुग्धा आलेली दिसली आणि त्याच्या जीवात जीव आला. मुग्धा रिसेप्शन वरच थांबली. तिने रीसेप्शानिस्तला आपण आल्याच राधिकाला कळवायची विनंती केली. ती तिथेच वाट बघत बसली. ते पाहून तेजसने राधिकाला फोन लावला.
राधिका- हाय तेजस. गुड मॉर्निंग.
तेजस- हाय. ऐक ना राधिका. आज काही induction sessions आहेत का? मला आज जरा स्वतः induction करायचा मूड आहे.
राधिका- ओह…thats lovely. in fact काल ती मुलगी आजारी पडली म्हणून घरी गेली ना ती आज आली आहे. तिचं सेशन घ्यायला मला वेळ नाहीये. माझ्या back to back मिटींग्स लागल्या आहेत. तू तिचं सेशन घेतलंस तर उलट मला मदतच होईल.
तेजस- बघ मी तुझी किती मदत करतो ते. बर ऐक ना. त्या मुलीला ना माझ्या केबिन मध्ये पाठव प्लीज. मला त्या बोर्ड रूम मध्ये वगैरे जरा ऑड वाटेल. मी माझ्या स्टाईनने तिचं इंडक्शन करतो.
राधिका- ओके चीफ. as you wish and thanks again.
राधिकाने रिसेप्शनवर फोन करून मुग्धाला तेजसच्या केबिन मध्ये पाठवायला सांगितलं. रीसेप्शानिस्त स्वतः उठून मुग्धाला तेजसच्या केबिन पर्यंत घेऊन गेली. मुग्धाने दारावरचा बोर्ड पाहिला. त्यावर तेजस दांडेकर, managing director and ceo असं लिहिलेलं होतं. मुग्धाने हळूच दार ढकललं आणि विचारलं-
मुग्धा- may I come in sir?
तेजसने वळून तिच्याकडे बघितलं. तिला समोर बघून तेजसला आनंद झाला.
तेजस- प्लीज कम इन मुग्धा.
मुग्धा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली.
तेजस- प्लीज बस मुग्धा.
त्या प्रशस्त केबिन मध्ये मुग्धा अंग चोरून बसली. तेजसने त्याच्या सेक्रेटरीला फोन लावला.
तेजस- मी एका महत्वाच्या मिटिंग मध्ये आहे. कोणतेही कॉल किंवा व्हिजिटर नकोत. ओके?
मग तेजसने त्याचा मोबाईल एअर प्लेन मोडवर टाकला आणि मुग्धाला म्हणाला-
तेजस- येस मुग्धा. तुझा गुन्हेगार तुझ्या समोर बसला आहे. शूट मी…..
इथे आर्याने तेजसला मेसेज केला “आय होप तुला आता बर वाटतंय. आज डिनरला जायचं का? तुझा ओठ झोंबत नसेल तर. ;-)” तिचा मेसेज डिलिव्हर झाला नाही. ते पाहून टेन्स झालेल्या आर्याने राधिकाला फोन लावला. मिटिंग मध्ये असलेल्या राधिकाने तिचा फोन घेतला नाही. इथे तेजस मुग्धाला म्हणाला” मुग्धा, मी तुझं ऐकली सगळं आणि मला पटलं देखील आहे. आता मी सांगतो ते ऐक.” तेजस मुग्धकडे बघत उभा राहिला. त्याला काल अर्याला झिडकारताना अनुभवलेला मुग्धाचा स्पर्श, गंध आणि तिच्या ओठांची चव आठवत होती. पुढे होऊन त्याने स्लीव्हलेस ड्रेसमधून दिसणाऱ्या तिच्या खांद्यावर हात ठेवला.
क्रमश:
© मंदार जोग
