रिफ्लेक्शन | Mandar Jog

रिफ्लेक्शन भाग ६

स्वप्नील आणि मानसीला Z grill मध्ये एकत्र बघुन हर्षदचा मूडच जातो.

हर्षद- राधिका I am not feeling well. Let’s go.

राधिका- (आश्चर्याने) काय झालं?

हर्षद- सांगितलं ना मला बरं नाही वाटतंय. जाऊया आपण.

राधिका- पण हर्षद…

हर्षद- I said let’s go.

ते दोघे निघतात. हर्षद राधिकाला घरी सोडून आपल्या घरी परततो. स्वप्नील आणि मानसी प्लॅन यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करतात.

दुसऱ्या दिवसापासून हर्षद मानसीशी बोलणे किंवा तिला भेटणे टाळू लागतो. मानसी आणि स्वप्नीलची मैत्री गहिरी होत असते. प्रोजेक्ट पुढे सरकत असतो. हर्षद मानसीने दिलेले व्यवहारीक सल्ले वापरून, राधिकाचं केपेबल नसणं स्वीकारून काम करत असतो. प्रोजेक्ट यशस्वी करणं हे एकमेव ध्येय सर्वांसमोर असल्याने वैयक्तिक संबंध एखाद्या प्रेशर कुकरमध्ये ठेवल्यासारखे दबावाखाली असतात. कोणीच काहीच बोलत नसत. एक दिवस मानसीचा धीर सुटतो. ती स्वप्नीलशी बोलते-

मानसी- Swapnil, I don’t know where all this is heading. हर्षद माझ्याशी कामापुरतेही बोलत नाही. त्याच्या मनात काय चाललाय ह्याचा थांग लागत नाही. I think I should move on. मी नोकरी सोडते. मला हे सहन नाही होत.

स्वप्नील- नोकरी सोडशील पण हर्षदच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा संपेल का?

मानसी- नाही!

स्वप्नील- मग ते जाणून घे. नोकरी आपोआप सुटेल.

मानसी- म्हणजे?

स्वप्नील- म्हणजे जर त्यालाही तू आवडत असशील, which I am sure is a fact, तर तू कंपनीची मालकीण होशील. नोकरी सुटेल. आणि तसे नसेल तर तू लगेच नोकरी सोडशील पण तुला उत्तर मिळालेले असेल.

मानसी- (विचार करत) Hope that day comes soon. I cannot take this pressure anymore.

स्वप्नील- Relax. The day will come and very soon!

प्रेशर कुकर अवस्थेत काही महिने जातात. प्रोजेक्ट लास्ट स्टेजला असतो. देशपांडे, हर्षद आणि राधिका कॉन्फरन्स रूम मध्ये बसलेले असतात. प्रोजेक्ट रिव्ह्यू सुरु असतो. इथवर प्रोजेक्ट प्रचंड यशस्वी झाल्याने पुढेही तो यशस्वी पूर्ण होणार ह्याची खात्री असल्याने हर्षद खुश असतो.

हर्षद- बघितलंत देशपांडे, I did it. मी हे करून दाखवलं. आठवतो तो दिवस जेव्हा ह्या प्रोजेक्टला काही लोकांनी विरोध केला होता? हर्षद काय चीज आहे हे त्यांना आता कळेल.

राधिका- Yes Harshad. You are a genius!

देशपांडे- (नाकावर ठेवलेल्या चष्म्यातून हर्षदकडे बघत) नक्कीच. तुझ्या हुशारीबद्दल वादच नाही. पण मानसी आणि स्वप्नीलचे काँट्रीब्युशन देखील कौतुकास्पद आहे.

हे ऐकून राधिकाच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात.

राधिका- त्यांनी काय केलंय ह्या प्रोजेक्ट मध्ये? Its my baby. मी आणि हर्षदने हा प्रोजेक्ट सक्सेस केला आहे. ते दोघे तर कॅफेटेरियामध्ये गुलुगुलु गप्पा मारण्यापालिकडे काहीच करत नाहीत. And she is such a b…

हर्षद- (तिला मध्येच तोडत करारी आवाजात) राधिका! (राधिका थांबते. हर्षद देशपांड्यांना उद्देशून) I agree that she gave some valuable suggestions. (त्या दोघांचा एकत्र उल्लेख हर्षदला खटकलेला असतो त्यामुळे विषय बदलत)Let us get ahead with the review.

शेवटचा एक महिना धावपळीत जातो. प्रोजेक्ट यशस्वी झालेला असतो. मानसीचे त्यातील योगदान वादातीत असते. फायनल फायनान्शियल क्लोजरसाठी हर्षद आणि मानसीची एक मीटिंग अनिवार्य असते. तो दिवस आज उगवतो. आज अनेक महिन्यांनंतर मानसी आणि हर्षद समोरासमोर भेटणार असतात. त्याच प्रोजेक्टच्या यशाबद्दल चर्चा करायला जो हर्षदच्या आत्मविश्वासामुळे आणि कौशल्यामुळे पूर्ण झालेला असतो. मानसीने योग्य सल्ले देत, योग्य चेक ठेवत त्याच्या यशात महत्वाची भूमिका बजावलेली असते. मानसी हर्षदच्या केबिनमध्ये येते.

मानसी- (दारातून) Good morning Harshad.

हर्षद- (तिला बघून खूप खुश होत पण लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवत) Good morning. Please come in.

मानसी आत येऊन त्याच्या समोर बसते. कामाचे रिपोर्ट, ऍनलिसिस ह्यावर चर्चा होते. उद्या प्रोजेक्ट सक्सेसची मोठी पार्टी असते. सर्व क्लाएंट, सप्लायर्स आणि स्टाफला आमंत्रण असते. हर्षद इंटरकॉम वरून राधिकाला इन्सट्रक्शन देतो.

हर्षद- राधिका सर्वांना आमंत्रण पोहोचली आहेत ह्याची खात्री करून घे. This is a big one. No scope for any error. (फोन ठेऊन मानसीकडे बघत) Radhika has done a splendid job. ह्या प्रोजेक्टच्या यशात तिचा मोठा वाटा आहे.

मानसी- (शांतपणे) Yes I agree. She is a gem.

हर्षद- (ह्या अनपेक्षित उत्तराने थोडा चिडून) तुला आठवत असेल तर तू ह्या प्रोजेक्टला विरोध केला होतास.

मानसी- हो लक्षात आहे.

हर्षद- But I was confident. I pulled it through successfully.

मानसी- I agree. पण original plan मध्ये अनेक बदल झाले. अर्थात प्रोजेक्टच्या यशासाठी आवश्यक. ते बदल राधिकानेच सुचवले असणार. She is amazing!

हर्षद- (मानसीने सुचवलेले बदल ती राधिकाच्या नावावर टाकत असल्यामागचा उपाहास लक्षात येऊन चिडून) You don’t have to be so sarcastic. चांगल्या कामच आणि माणसांचं कौतुक करायला शिक.

मानसी- Oh of course. राधिका बरोबरच स्वप्नीलच्या योगदानाचही कौतुक आहे मला. He is too good as a colleague, as a friend and as a human being.

हर्षद- (तिच्या तोंडून स्वप्नीलचे नाव ऐकून चवताळून) We are here to work and not to get personal with people. मी तुझ्या आणि स्वप्नीलबद्दल बरंच ऐकून आहे. And I do not appreciate it!

मानसी- (शांतपणे) तूच म्हणालास ना की चांगल्या कामाचं आणि लोकांच कौतुक कर. म्हणून केलं मी. बाकी तू काय ऐकलस ह्यापेक्षा कोणाकडून ऐकलस ह्यावर त्या ऐकण्यातील खरं खोटं अवलंबून आहे. असो निघू मी?

हर्षद- What is your problem Manasi?

मानसी- What? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे प्रोजेक्ट यशस्वी झालं ह्याच पूर्ण श्रेय मी तुला देते. माझा सुरुवातीचा अंदाज तुझ्या अनुभवपुढे कमी पडला हे मान्य करते. पण thats it. राधिकाचं काँट्रीब्युशन मला मान्य नाही. मी आणि स्वप्नीलने ह्या प्रोजेक्टमध्ये काय केलंय ते तू जाणतोस.

हर्षद- हो. तू आणि स्वप्नील काय करताय ते माहीत आहे मला. You are on a wrong track. Swapnil is not a right guy for you.

मानसी- Now you are getting personal Harshad! Swapnil is a great guy and a great friend. Please त्याला वाईट म्हणू नको. निघू मी?

हर्षद- Oh इतका राग येतो का त्याच्याबद्दल बोलल्यावर? वा! आणि माझ्या प्रोजेक्टला ऑब्जेक्ट करताना विचार केला होता का? तुला काय वाटलं होतं की तुझं ऐकून मी माझा प्लॅन मागे घेईन? मी हर्षद आहे. मी अशक्य ते शक्य करून दाखवतो. तू माझ्या प्रोजेक्टला मुद्दाम आक्षेप घेतलास. आता जे स्वप्नील बरोबर करते आहेस ते देखील मुद्दाम आहे. तुला माहीत आहे माझ्या मनात काय सुरु आहे.

मानसी- (त्याच्या डोळ्यात रोखून बघत) काय?

हर्षद- (आपण काय बोलून गेलो ह्याची जाणीव होऊन पण रागाने) Why do you want to hear it from my mouth? मला हरवायची अजून एक संधी मिळवायला? पण मी हरणार नाही. I will fire Swapnil! You wait and watch. I will never lose!

हे ऐकून मानसी प्रचंड संतापते.

मानसी- Harshad if this is the case then let me tell you upfront. मला तुझ्या मनात काय सुरु आहे ते सर्व माहीत आहे. तुझा शत्रू तुझा इगो आहे. मी सर्वांसमोर प्रोजेक्टबद्दल उपास्थित केलेले मुद्दे तुला पटले तरी तू ते मान्य न करता प्रोजेक्ट सुरु केलास. तुझ्या कौशल्याबद्दल वादच नाही, पण प्रोजेक्ट मध्ये जे बदल केले ते शेवटी मी सुरुवातीला, त्या मीटिंगमध्ये सांगितलेले धोके टाळण्यासाठीच होते. म्हणजे तू, तुझा विश्वास, तुझी हुशारी योग्य असले तरी मी पण चूक नव्हते. पण तुझा इगो तुला ते मान्य करण्यापासून रोखत होता…आहे!

हर्षद मानसीचे हे रूप बघून हादरतो. हात वर करून तिला थांबवायचा प्रयत्न करतो-

मानसी- Let me speak Harshad! त्या इगोमुळे तू राधिकाला हायर केलंस. मला शह देण्यासाठी. अरे तू मालक आहेस कंपनीचा आणि मी एम्पलॉई! आपली तुलना होऊ शकते का? पण तुझ्या इगो ने तुला ते पाऊल उचलायला लावलं. मग त्या पार्टीत तू माझा अपमान केलास. मुद्दाम! तेव्हा मी विखुरले होते. तेव्हा मला स्वप्नील एक मित्र म्हणून भेटला. त्याने मला नैराश्यातून बाहेर काढले. त्याच्यामुळेच मी आजवर इथे टिकून आहे. नाहीतर मी केव्हाच सोडणार होते हा मनस्ताप. तेव्हाही तुला आनंदच झाला असता. पण मी राहिले. शांतपणे माझे काम करत राहिले. तू करत असलेले दुर्लक्ष, तू राधिकाशी वाढवत असलेली जवळीक सहन करत. प्रेमात पडले होते ना मी तुझ्या!

हर्षद अविश्वासाने तिच्याकडे बघतो. तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात-

मानसी- Yes I fell in love with you. I love your confidence, your attitude, youe zeal for success and everything about you! पण तू तुझ्या इगोमध्ये मश्गुल राहिलास. मला कमी दाखवायची संधी शोधत राहिलास. तू खूप मोठा माणूस आहेस हर्षद! हर्षद द ग्रेट बिझनेसमन! पण माणूस म्हणून तितकाच मोठा होशील, इगो विसरून माणसांची किंमत करायला शिकशील तेव्हा खरा “यशस्वी” होशील! मी एक फालतू एम्पलॉई आहे जिचे अस्तित्व तू एका ओळीच्या termination मेल ने संपवू शकतोस. पण तुला मी ती संधी, तो आनंद देणार नाही. मी आत्ता ह्या क्षणी resign करते आहे. तसाही प्रोजेक्ट संपला आहे. तुझ्यादृष्टीने नसलेली पण कंपनीच्या दृष्टीने असलेली माझी गरज संपली आहे. I wish you all the best! माझे resignation पाच मिनिटात तुला मिळेल!

मानसी डोळ्यातून वाहात असलेले अश्रू पुसून निघून जाते. हर्षद सुन्न होऊन त्याच्या खुर्चीत बसतो. डोळे मिटतो. त्याला समोर मानसी दिसत असते. इतक्यात लॅपटॉप मध्ये मानसीचे एका ओळीचे resignation येते with cc to Swapnil! हर्षद डोळे मिटून घेतो!

क्रमश:

पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ७ (शेवटचा भाग)

आधीच्या भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ५

रिफ्लेक्शन कथा सुरुवातीपासून इथून वाचा- रिफ्लेक्शन भाग १

आमची कादंबरी- सख्या रे …

आमची कादंबरी- ट्वेंटी थ्री

आमच्या दीर्घ कथा दीर्घ कथा

आमच्या लघु कथा – लघुकथा

सिनेमाविश्व- फिल्लमबाजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

4 thoughts on “रिफ्लेक्शन भाग ६”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!