मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

तिने सांगितलेला नंबर अजयने लगेच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. अंकिताने फोन कट केला आणि ती अजयबरोबर स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली. सौरभ हताश होऊन बसला होता. तिकडे मानसीही स्तिमित होऊन शून्यात बघत बसली होती.

त्याच वेळी स्वस्तिक बारमध्ये बसलेल्या यतीनच्या फोनची रिंग वाजू लागली. त्यावर unknown नंबर दिसत होता. यतीन ने फोन घेतला.

यतीन- हेलो…

अंकिता- कोण यतीन राव का?

आपल्याला कोणीतरी बाई राव म्हणत आहे हे ऐकून यतीनची थोडी उतरली. उगाच चेहरा वगैरे हाताने साफ करत तो म्हणाला-

यतीन- हो..कोण बोलतंय?

अंकिता- मी तुमच्या बायकोच्या याराची बायको बोलते आहे.

यतीनला कक्षणभर कळलंच नाही त्याने जे ऐकल होतं ते. तो म्हणाला-

यतीन- क..काय?

अंकिता- मी तुमच्या बायकोच्या याराची बायको बोलते आहे. म्हणजे तुमच्या बायकोचं, मानसीच ज्या माणसाशी लफड आहे ना त्याची बायको बोलते आहे मी.

यतीन हे ऐकून शॉक झाला होता.

यतीन- हे..हे काय बोलताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? आणि कोण यार?

अंकिता- ते तिलाच विचारा. म्हणाव की आज ज्याला चार चौघात मिठी मारलीस तो सौरभ तुझा कोण लागतो. आणी एक लक्षात ठेवा. तुमच्या बायकोला तुम्ही कंट्रोल मध्ये ठेवा. ती जर परत सौरभला भेटली तर मी तिला आणि तुम्हाला दोघांनाही पोलिसात देईन.

इतकं बोलून अंकिताने फोन कट केला. यतीनची सगळी दारू उतरली होती.

यतीन- म्हणजे मानसीच अफेयर आहे?

तो तिथून रागानेच बाहेर पडला. त्याने थेट मानसीच घर गाठलं. दाराची बेल वाजवली. मानसीने दार उघडल. तो रागाने थरथरत घरात शिरला. मानसी जणू त्याची वाटच बघत होती. तिने शांतपणे विचारलं-

मानसी- तू इथे? ह्या वेळी? काही काम आहे का?

यतीन- तुझं सौरभ नावाचा माणसाबरोबर लफड आहे का? खर सांग.

मानसी त्याच्याकडे शांतपणे बघत होती. यतीन ओरडला-

यतीन- बोल की. तुझं सौरभ बरोबर लफड आहे कि नाही? मान्य कर. नाहीतर…

मानसी- नाहीतर काय?

यतीनला तो प्रश्न अपेक्षित नव्हता. त्याच्याकडे उत्तर नव्हत. काय कराव न कळल्याने तो मानसीच्या अंगावर धावून गेला. पण त्याने तिच्यावर हात उचलायच्या आत मानसीने त्यच्या कानाखाली लगावली. तो भेलकांडला.

मानसी- तुझी माझ्या अंगाला हात लावायची लायकी कधीच नव्हती. पण मी लग्न करून तुला तो लावू दिला. पण आता तू तो हक्कही घालवून बसला आहेस. लवकरच डिव्होर्स होऊन त्यावर कायद्याची मोहोर उमटेल. पण ह्यापुढे कधीही माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केलास ना तर मी हात तोडेन तुझा. आणि तू काय विचारत होतास मला? माझं आणि सौरभच लफड आहे का म्हणून? तर ऐक. हो आहे माझं आणि सौरभच अफेयर. म्हणूनच मी तुला डिव्होर्स देते आहे. झालं समाधान? मग आता जा आणि सगळ्या नातेवाईकात, शेजारी आणि ओळखीच्या लोकांमध्ये जाऊन दवंडी पीट. चल निघ आता. मला झोपायचं आहे. मला उद्या ऑफिस आहे. तुझ्यासारखी रिकामी नाहीये मी.

मानसीचा हा अवतार पाहून आणि तिने जे सांगितल ते ऐकून हबकलेला यतीन काहीही न बोलता मान खाली घालून तिथून निघून गेला. दराचा आवाज आल्यावर मानसी पायातली ताकद गेल्यासारखी तिथेच जमिनीवर बसली आणि हमसून हमसून रडू लागली. रडू ओसरल्यावर ती तिथेच भीतीला टेकून शांत बसून होती. नजर शून्यात लावून. इतक्यात फोन मध्ये अलर्ट आला. तिने पाहिलं. सौरभचा मेसेज होता.

मेसेज- हाय…झोपली आहेस का? कि फोन करू?

मानसीने क्षणभर विचार केला. त्याचा मेसेज पाहून ती जरा भानावर आली. अचानक तिला आधार मिळाल्यासारख वाटलं. तिने डोळे पुसून आत जाऊन बेडवर पडत रिप्लाय केला-

रिप्लाय- कर फोन.

पुढ्या क्षणी तिचा फोन वाजला. त्यावर सौरभ नाव होतं. तिने फोन घेतला. सौरभ त्याच्या बिल्डींगच्या गच्चीत उभा होता.

सौरभ- sorry…

मानसी- hmm…but you don’t have to be..

सौरभ- no…i feel sorry….अंकिताने…

मानसी- यतीन आला होता इथे…

सौरभ- (काळजीने) shit…काय म्हणाला? I am so sorry की तुला माझ्यामुळे..

मानसी- माझ्यावर हात उचलत होता तो..

सौरभ- (रागाने) what? त…त्याने तुला मारलं?

मानसी- नाही. मी मारलं त्याला…

सौरभ- what? Seriously?

मानसी- हम्म…मला विचारत होता की तुझं आणि सौरभच लफड आहे का म्हणून.

सौरभ- अंकिताने त्याला सांगितल असणार फोन करून…पण तू त्याला स्पष्ट सांगितलंस ना की अस काही नाहीये…हा सगळा एक गैरसमज आहे म्हणून? बोल ना मानसी…

मानसी- (शांतपणे) मी आरोप मान्य केला.

सौरभ- (शॉक होत) काय?

मानसी- (सिगारेट पेटवत) हो..मी म्हणाले त्याला की हो आहे माझ आणि सौरभच लफड…आणि ते आहे म्हणूनच मी तुला डिव्होर्स देते आहे.

सौरभ- what? पण…

मानसी- पण काय सौरभ? तुझी बायको मला फोन करून धमक्या देते. माझा नवरा दारू पिऊन माझ्या घरी येऊन माझ्या अंगावर हात टाकतो. आणि ते सर्व कशासाठी? तर त्यांना अस वाटत की माझा एक कलीग, जो माझा चांगला मित्र पण आहे त्याच्याशी माझ लफड आहे म्हणून? त्याच संशयातून तू तुझो नोकरी घालवून बसला आहेस. तुझ्या नातेवाकांना तुझ्या मुह फट बायकोने आपल्याबद्दल सांगितल असेलच आणि आता माझा नवरा पण उद्या गावभर हे सांगत फिरेल. मग मी लफड आहे हे मान्य न करून कोणाला फरक पडणार आहे? तुला आणि मलाच ना? पण आपल्याला तर आधीपासून माहित आहे की आपलं लफड नाहीये…

सौरभ हे ऐकून सुन्न झाला. त्याला शब्द सुचत नव्हते. मानसीच पुढे बोलू लागली-

मानसी- सौरभ, you know what…i really don’t give a f@ck to who feels what anymore…मी स्वतः उद्या आदित्यला हे सांगणार आहे. आदित्य समजूतदार मुलगा आहे. आणि मला तोच matter करतो. बाकी कोणाचीही मला पर्वा नाहीये. माझ आणि सौरभच लफड आहे म्हणता ना? मग घ्या भेंचो…आहे आमच लफड. Happy?

मानसीने रागात सिगारेट ash tray मध्ये विझवली.

सौरभ- मानसी…प्लीज शांत हो. तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. हे बघ उद्या ना मी अंकिताला समजावतो. If needed मी यतीनला भेटून सगळ एक्स्प्लेन करेन.

मानसी- त्याची काहीच गरज नाहीये सौरभ. संशय कॅन्सर सारखा असतो. तात्पुरता बारा झाला वाटत पण दुसरीकडे परत वर येतो. त्यावर इलाज नाही आणि आपण तो करायला जाऊ पण नये. अंकिता आणी यतीन आणि ज्यांना ज्यांना आपलं लफड आहे अस वाटते त्या सगळ्यांना त्याच गैरसमजात राहू देऊया आपण.

सौरभ- तुझा आदित्य समजूतदार आहे. पण हर्षद आत्ताच घरी आला. अंकिता आणि अजय त्याला सगळ चुकीच सांगत आहेत खाली. अंकिताने त्याला माझ्या विरोधात केला आहे. माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय.

मानसी- that’s the destiny सौरभ. आपला त्यावर कंट्रोल नाहीये.

सौरभ- हम्म…पण मला वाईट वाटत की तू विनाकारण ह्या सगळ्यात अडकलीस…

मानसी- विनाकारण नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असत. काही वेळा ते आपल्या लक्षात उशिरा येत.

सौरभ- तरीही i am sorry…

मानसी- sorry se काम नही चलेगा. उद्या मला दारू पाजावी लागेल.

सौरभ- what?

मानसी- अरे बाबा आपलं affair सेलिब्रेट करुया उद्या डिनर घेऊन.

सौरभ- (थोडा काळजीत) पण…

मानसी- पण पैसे नाहीत अस ना? ते मी देते. तू एक डायरी कर आणि हे सगळे खर्च लिहून ठेव. तुझा म्युच्युअल फंड बिझनेस सेट झाला आणि तुला नोकरी लागली की माझे सगळे पैसे परत कर. ओके?

सौरभ- वेडी आहेस तू. ठीक आहे. भेटू उद्या. झोप आता.

सौरभ फोन कट करणार इतक्यात मानसी म्हणाली-

मानसी- thanks सौरभ…

सौरभ- thanks?? का?

मानसी- तू मला आता फोन केलास म्हणून. खूप छान वाटलं. सेफ वाटलं…i was disturbed…मला वाटलं नव्हत तू मला कॉल करशील म्हणून…

सौरभ- (एक pause घेऊन) मला माहित होतं की तू डिस्टर्ब असणार. म्हणूनच फोन केला. त्यासाठी thanks म्हणायची गरज नाही. आपलं लफड आहे ना afterall आणि लफड्यात असे फोन करावेच लागतात.

हे ऐकून मानसी जोरात हसू लागली. तिला हसत्ना ऐकून सौरभच्या चेहऱ्यावर पण हसू आलं. सौरभने फोन कट केला आणि आकाशात असलेल्या चंद्राकडे पाहिलं. मानसीने देखील खिडकीतून दिसत असलेल्या चंद्राकडे बघत डोळे मिटले.

क्रमश:

मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “मृगजळ भाग ६”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!