……ते आठवून मुग्धाने मंगळसूत्र हात लावून तपासलं. ते व्यवस्थित होत. मुग्धाला बरं वाटलं. ती आनंदाने पुढे झाली. निपचित पडलेल्या प्रशांतच्या छातीवर डोकं ठेवलं. खूप रडली. पण आशा कायम होती. मंगळसूत्राच्या धड असण्याने. ती रोहित आणि डॉक्टरना नकार देऊन वाट बघायचा निर्णय घेऊन डोळे पुसत उठली. उठताना तीच मंगळसूत्र प्रशांतला लावलेल्या असंख्य नळ्यापैकी एका नळीत अडकल! तुटून प्रशांतच्या अंगावर पडलं! ते लक्षात आल्यावर मुग्धा नखशिखांत हादरली! तिला प्रशांतने उत्तर दिलं होतं! ती वळून रोहित आणि डॉक्टरला म्हणाली “कंसेंट फॉर्म द्या! मी तयार आहे!” डॉक्टर आणि रोहितच्या आनंदाला पारावर नव्हता! मुग्धाच्या डोळ्यासमोर प्रशांतचा धूसर होत जाणार हसरा चेहरा होता! तिचं तुटलेलं मंगळसूत्र घरंगळुन प्रशांतच्या हाताला लटकत होतं!
मुग्धाने कंसेंट फॉर्मवर सही केली. रोहितने आधीच काढून ठेवलेले दहा लाख तिला दिले. मुग्धा म्हणाली “रोहित मला हे पैसे नको. ते परत देऊन टाक. माझ्या प्रशांतची आठवण ह्या जगात कुठेतरी जिवंत राहील ह्याचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. असे एखाद्याला मदत करण्यासाठी पैसे घेतलेले प्रशांतला पण आवडले नसते. तुला माहीतच आहे.” लगेच ते पैसे परत बॅगेत ठेवत रोहित म्हणाला “अगदी बरोबर. मलाही तेच वाटत होतं!” मी परत करतो हे पैसे. त्याने डॉक्टरला एक लुक दिला. आणि म्हणाला “डॉक्टर तुम्ही प्रोसिजर सुरू करा. मी पुढल्या विधींची तयारी करतो.” मग उठून मुग्धाच्या दोन्ही खांद्यांवर आपले दोन्ही हात दाबत तिच्या कानाला आपले ओठ चिकटवून म्हणाला “मुग्धा I am proud of you! तू बाहेर बस. मी सर्व फॉर्मलिटी संपवतो. स्मशानात इंफॉर्म करतो. तुमच्या शेजारच्या प्रतिकला संगतो की अमेयला डायरेक्ट स्मशानात घेऊ ये म्हणून!” हे सर्व ऐकून मुग्धाच्या घशातून हुंदका बाहेर पडला. रोहितने डॉक्टरला जायचा इशारा केला. डॉक्टर आपल्या पुढल्या कामाला आयसीसीयू मध्ये गेला. रोहित मुग्धाच्या शेजारी बसला. तिला जवळ घेऊन समजावू लागला “मुग्धा हे बघ नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही. प्रशांत माझाही खूप जवळचा मित्र होता. त्याच्या अश्या अचानक जाण्याचा मलाही धक्का बसला आहे. पण आपण हतबल आहोत. तुझ्या आणि माझ्यासमोर आयुष्य पडलं आहे. अमेयच शिक्षण आहे, बाकी सगळं आहे. तू स्ट्रॉंग राहा. बाकी मी आहेच.” मुग्धाने त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकल. रोहितला पुढली स्वप्न पडत होती! लहानग्या अमेयने चितेभोवती खांद्यावर मडके धरून प्रदक्षिणा घातल्या. मडके मागे टाकून बोंब ठोकली आणि सश्रु नयनांनी प्रशांतच्या हृदय नसलेल्या चितेला अग्नी दिला! स्मशानात जमलेले लोक त्याला आणि त्याच्या मागे उभा असलेल्या रोहितला नमस्कार करून निरोप घेत होते. चिता हळू हळू धगधगू लागली होती.
बंगलोर मध्ये डॉक्टर सुब्रमन्यम त्यांच्या टीम सह एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत गुंतले होते. दांडेकर दांपत्य शांतपणे त्या पॉश हॉस्पिटलच्या थंड लॉबीत बसले होते. अनेक तास गेले. दोघंही जागेवरून हलले नाहीत किंवा कोणाशीही एक शब्दही बोलले नाही. दांडेकर काकू संबंध वेळ हातातील माळ ओढत जप करत होत्या. त्यांना गेल्या सहा महिन्यात त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या वावटळीची आठवण झाली. तेजस त्यांचा एकुलता एक मुलगा. म्हणजे त्याच्या आधी तेजश्रीचा जन्म झाला होता. पण नंतर अनेक वर्षांनी नवस वगैरे करून तेजस झाला होता. तेजश्री लग्न व्हायच्या आधी म्हणायची देखील की तेजस झाल्यावर तुम्ही मला विसरलात. पण तसं नव्हतं हे तिलाही माहीत होतं. दांडेकरांनी मोठ्या थाटामाटात तिचं लग्न लावून दिलं होतं. तेजस अमेरिकेत जाऊन एमएस आणि पीएचडी करून आला आणि दांडेकर इंडस्ट्रीची धुरा त्याने खांद्यावर घेतली. पाच वर्षात व्यवसाय दुप्पट केला. तिशीचा तेजस भरपूर व्यायाम करून कमावलेल्या शरीर आणि देखण्या चेहऱ्यामुळे अनेक मुलींच्या हृदयाची धडकन असलेला most eligible bachelor होता. सगळं उत्तम सुरू होत! एक दिवस अचानक जिम मधून बेंच प्रेस मारताना त्याच्या छातीत कळ आली. पुढे तपासण्या केल्यावर त्याच हृदय कमकुवत असून खूप हळू चालत असल्याचं लक्षात आलं. उत्तम डॉक्टर दिमतीला असल्याने त्यांनी त्याला प्रचंड काळजी घेऊन जिवंत ठेवला होता. पण हृदय ट्रान्सप्लांट हा एकच मार्ग उरला होता. काल रोहितचा फोन आल्यावर त्याने मागितलेली रक्कम घेऊन दांडेकर दाम्पत्य हॉस्पिटल मध्ये गेले आणि प्रशांतच्या हृदयाचा सौदा करून आले. तेजसला जगवण्यासाठी! दांडेकर काकू शांतपणे माळ ओढत होता. दांडेकर काका त्यांची करारी नजर शून्यात लावून वाट बघत होते. काही तासांनी डॉक्टर सुब्रमण्यम बाहेर आले. दांडेकर काका शांतपणे उभे राहिले. डॉक्टर म्हणाले सर ऑपरेशन सक्सेस आहे. Congrats. हे ऐकून इतका वेळ धरून ठेवलेल्या अश्रूंना आणि ताणाला दांडेकर काकांनी वाट करून दिली. डॉक्टरांचा हात आपल्या हातात घेत “thanks डॉक्टर” इतकंच म्हणाले!
इथे प्रशांतच्या घरात बेडरूम मध्ये बेडवर पडून मुग्धा त्यांचे अल्बम बघत होती. अमेय शेजारी झोपला होता. रात्रीचे नऊ वाजले असतील. बेडरूमच दार हळूच उघडलं. रोहित आत आला. त्याला बघून मुग्धा सावरून बसली. म्हणाली “तू कसा आलास? आय मीन चावी?” तो म्हणाला मगाशी अमेयला प्रतीक घेऊन आला ना तेव्हा त्याच्याकडून घेतली. तीच परत करायला आलो आहे in fact. अमेय झोपला वाटत?” मुग्धा हो म्हणाली. रोहित म्हणाला “तुला झोप येत नाहीये वाटत? हम्म..ही बेडरूम, इथला प्रशांतचा वावर, तुमच्या मोमेंट्स आठवत असतील ना?” मुग्धा उभी रहात म्हणाली “चल ना आपण बाहेर बसू. मी कॉफी करते.” रोहित म्हणाला “काही नको. तू बस इथेच शांत.” त्याने तिला हाताला धरून बेडवर बसवली. मग समोर भिंतीवर असलेल्या प्रशांतच्या फोटोला त्याने बरोबर आणलेला चंदनाचा हार घातला. मग मुग्धाला त्या फोटोजवळ नेऊन तो फोटोला म्हणाला “मित्रा तू मुग्धाची काळजी करू नको. मी आहे. मी तिची व्यवस्थित काळजी घेईन.” त्या फोटोकडे पाहून आणि रोहितच बोलणं ऐकून मुग्धाला रडू येऊ लागल. ती म्हणाली “थँक्स रोहित. तू खरच खूप चांगला आहेस.” रोहितने तिला वळवून आपल्या समोर धरली. तिचे दोन्ही गाल आपल्या हातात धरले. जरा अवघडलेली मुग्धा मागे सरकली. पण मागे भिंत होती. मुग्धा आता प्रशांतच्या फोटोच्या बरोब्बर खाली होती. रोहित पुढे सरकला. म्हणाला “काय झालं मुग्धा?” मुग्धा तिघून निघू लागली. रोहित आता भिंतीला टेकला आणि त्याने मुग्धाचा हात धरला. म्हणाला “काही चुकलं का माझं मुग्धा?” मुग्धा म्हणाली “नाही रोहित तास नाही पण…” रोहितने तिला आपल्या जवळ ओढली आणि म्हणाला “मुग्धा मी आहे म्हणालो ना? मग का टेन्शन घेतेस? मी इतका का वाईट आहे?” मुग्धाला त्याला दुखवयाच नव्हतं. ती म्हणाली “तस नाहीये रोहित…” रोहितने तिला मिठीत घेतली आणि म्हणाला “तू अजिबात टेन्शन नको घेऊ. मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेन.” हे बोलून त्याने आपले पंजे तिच्या पाठीत रोवले. मुग्धा त्यातून सुटायचा प्रयत्न करत होती. पण रोहितची पकड मजबूत होती! इतक्यात त्याचा फोन वाजला. फोन दांडेकरांचा होता. ते म्हणाले “आमचं काम झालं. थँक्स. आता हा नंबर मी डिलीट करतोय आणि तुम्हीही करा. ह्यापूढे आपला संबंध नाही.” दांडेकरांनी फोन कट केला. रोहित भांबावून थरथर कापत असलेल्या मुग्धाकडे आसुसलेल्या नजरेने बघत होता. तिला मिठीत घ्यायला तो पुढे जाणार इतक्यात प्रशांतचा फोटो खिळा निखळून रोहितच्या डोक्यावर पडला. त्याची काच रोहितच्या कापळात घुसून रक्त वाहू लागल. रोहित रक्त पाहून भांबावला आणि निघून गेला. मुग्धा जमिनीवर पडलेल्या प्रशांतच्या फोटोकडे बघत होती. तिथे बंगलोर मध्ये तेजसला जस्ट शुद्ध आली होती! ©मंदार जग
क्रमशः

