Gen Z आणि Shame Z-

काल एका अत्यंत उर्मट, मुजोर, फ्रस्ट्रेटेड, नैराश्य आणि न्यूनगंड ह्या मानसिक तसेच काही शारीरिक व्याधींनी ग्रस्त वाटणाऱ्या, स्थूल, कदाचित नशेत असलेल्या, तिशीच्या आसपास असेल अशी दिसणाऱ्या आणि स्वतःला जेन झी म्हणवणाऱ्या ढालगज बाईचा द्रास कारगिल भागातील मिनिमार्ग चेक पॉईंट जवळ सैनिकांशी हुज्जत घालत त्यांना घाण बोलत असतानाचा व्हिडिओ पाहिला.  कालच सेम त्याच वृत्तीची असलेल्या पण लुकड्या आणि स्वतःला जेन झी न म्हणवणाऱ्या बाईचाच ट्रेन मधे एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना घाण बोलत असतानाचा व्हिडिओ पण पाहिला. 

दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ट्रेन मधील त्या भिकार बाईने बाई असल्याचा फायदा घेत बोलण्याची मर्यादा ओलांडल्यावर त्या तरुणाने त्या तरुणाने त्या बोलभांड बाईच्या कानाखाली सर्वांच्या समोर जे जाळ काढले ते पाहून रेल्वेतील इतर प्रवासी खुश झाले. त्या व्हिडिओ वर आलेल्या कॉमेंट मधे सर्वांनीच त्या मुलाच्या हिंमतीचे कौतुक केलं. त्याच कौतुक करणाऱ्या बायकांच्या कॉमेंट जास्त होत्या. आणि हो बराच वेळ सभ्यपणे ती बाई असल्याचा सन्मान करत ती बोलेल ते निपुटपणे ऐकणारा आणि मर्यादा ओलांडल्यावर तिला धडा शिकवणारा तो मुलगा जेन झी वाटत होता!

पण पहिल्या व्हिडीओमध्ये त्या मुजोर बाई समोर भारतीय जवान होते. तेच जवान जे सीमेवर आपल्या प्राणाची बाजी लावून लढतात म्हणून ह्या अशा बायका आणि त्यांचे कमनशिबी आईबाप आपापल्या घरात डांग वर करून शांतपणे झोपू शकतात. सैनिक बाजूला झाले तर ज्या सीमेवर ती म्हैस रेकत होती त्या सीमेपलिकडून येणारे रेडे हिची जी हालत करतील तिची तिला स्वतःला कल्पना नाहीये. तिच्या आई बाबांनी फक्त मुजोरपणाचे संस्कार तिच्यावर केलेले असणार जेणेकरून ती भारतीय सैन्याचा अपमान करायची हिंमत करू शकली!

ती जिथे पर्यटक म्हणून फिरायला गेली होती तिथे एका ठिकाणी सैन्याने सुरक्षेच्या कारणामुळे पुढे जाण्याचा रस्ता काही काळ बंद केला होता. त्याचा राग म्हणून सैनिकांशी हुज्जत घालत ती बाई “तुमच्यावर खर्च आमच्या करातून होतो, आम्ही इथे फिरायला आलो आहोत, तुम्हाला टोलेरेट करायला नाही, ह्यांनी काश्मीर मधील लोकांना जे वागवलं ते आता इथेही वागवत आहेत, आम्ही एक पाऊलही मागे जाणार नाही. मी जेन झी आहे.” असं बरळत होती! तिथे असलेल्या इतर लोकांना चिथावणी देत होती. समोर सैनिक होते, सभ्य होते म्हणून शांत होते. अन्यथा ज्यांना मारण्याचंच ट्रेनिंग देऊन मारण्यासाठीच ज्यांची नियुक्ती केली आहे अश्या सैन्याने ती सुजलेली बेडकी एका चिमटीत चिरडली असती! पण त्यांनी संयम ठेवला. कारण ती कितीही हरा@ वागत असली तरी त्यांच्या दृष्टीने ते रक्षण करत असलेल्या देशाची ती कन्या होती!

तो प्रसंग पाहून एक प्रश्न मनात आला. आता “मी जेन झी आहे” हे सांगणं “माझ्याकडे license to kill आहे, मी देशविघातक उक्ती किंवा कृती करू शकतो/ शकते” असा काही जणांचा समज झाला आहे का? हे अस झाल्यास तरुणाईला उद्देशून कौतुकाने वापरला जाणता जेन झी हा शब्द अशा भिकार लोकांमुळे शिवी बनून जाईल! त्या वयोगटात असलेले सभ्य, सज्जन, सुसंकृत, सुशिक्षित तरुण तरुणी स्वतःला जेन झी म्हणून घ्यायला तयार होणार नाहीत! बहाकलेल्या, मार्ग भटकलेल्या, चुकीची श्रद्धास्थाने आणि आदर्श बाळगणाऱ्या मूठभर तरुणांमुळे आणि त्यांच्या भिकार वागणुकीमुळे हल्ली समस्त जेन झी पिढीच बदनाम होते आहे! त्या बाई सारख्या दळभद्री लोकांना GenZ नाही तर ShameZ म्हणायला हवं. ShameZ चे हे तमाशे खऱ्या भारतीय GenZ ने मनावर घेऊन त्यांच्याच माध्यमातून, त्यांच्याच भाषेत भंगार ShameZ ना उत्तर देऊन संपवायला हवेत.

बाकी त्या बाईवर संरक्षण आणि गृह मंत्रालयाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप ठेऊन योग्य ती कारवाई करून त्याबद्दल समस्त माध्यमातून जनतेला माहिती द्यावी. जेन झी शब्दाची शिवी बनवणाऱ्या त्या उद्दाम बाईला आणि अशा प्रकारच्या मनोवृत्तीच्या सर्वांनाच सरकार आणि लष्कराने “आमचा संयम म्हणजे सभ्यपणा आहे, कमजोरी नाही” हे दाखवून द्यावे! ते जमत नसल्यास ज्या सीमेवर तिने जवानांचा अपमान केला त्या सीमेपलीकडे हळूच सोडून द्यावे.

जय हिंद.

मंदार मायक्रोस्कोप मधील इतर लेखांची लिंक- मंदार मायक्रोस्कोप

आमची व्यक्ती चित्रे- व्यक्तिचित्रण

आमच्या लघुकथा- लघुकथा

आमच्या दीर्घकथा- दीर्घ कथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

4 thoughts on “Gen Z आणि Shame Z”
  1. खूप छान.. genz समोर त्यांचा वयाचे किंवा मिलिनियम जनरेशन अथवा जनरेशन एक्स मधील असलेल्या व्यक्तीचे योग्य आणि संयत असे आदर्श नाही आहेत.. त्यामुळे ते बेताल वागत आहेत.. आपल्या पिढ्यांसमोर इतिहासातील जे आदर्श व्यक्तिमत्व होती त्या इतिहासापासून, त्या सामाजिक परिस्थिती किंवा त्या संस्कारांमधून ही genz मानसिकदृष्ट्या पूर्ण अलिप्त आहे.. आजच्या पिढीतील योग्य आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्यापुढे निर्माण होत नाहीत ही खंत वाटते

  2. यावर सरकारतर्फे काय अधिकृत कृती/कारवाई केली जाते ते सर्वांना समजणे आवश्यक आहे.

  3. यांना सामान्य जनतेनी तिथल्या तिथे चपलेने बडवून काढले पाहिजे कारण सुरक्षा यंत्रणा कायद्याने बांधलेल्या असतात आपण करू शकतो,पालक संस्कार करायला चुकले असतील तर ते संस्कार जनतेनी करायला हवेत,एका दोघांचे अंतिम संस्कार केले तरी चालतील

  4. सैनिक बाजूला हटले तर सीमेपलिकडून येणारे दहशतवादी काय करतील ते त्या बाईंना ठाऊक नाही हे आश्चर्य आहे. पहलगामचे ते हृदय विदारक व संतापजनक व्हिडिओ त्यांनी बघितलेच नाहीत की काय? की त्यांना ते सीमेपलिकडच्या नव्हे तर आतल्याच अतिरेक्यांचं कृत्य वाटतंय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!