रिफ्लेक्शन | Mandar Jog

रिफ्लेक्शन भाग ५

लंच टाईम मध्ये राधिका स्वप्नीलला कॅफेटेरियामध्ये भेटते. स्वप्नील आपण होऊन तिच्या टेबलाजवळ जातो.

स्वप्नील- Hi Gorgeous.

राधिका- (खुश होऊन) हाय हँडसम. आज एकदम कौतुक कसं काय माझं?

स्वप्नील- करायलाच पाहिजे. प्रोजेक्टची पहिली फेज यशस्वी केलेली आहेस तू. शिवाय बॉसच्या मर्जीत आहेस. उद्या COO बनू शकतेस. घाबरून राहायला पाहिजे तुला. (हसून तिच्या समोर बसतो)

राधिका- (खुश होऊन) येस. मी COO नक्की बनणार. Harshad is very happy with my performance so far. तरी अजून त्याने राधिकाचा खरा “परफॉर्मन्स” बघितलाच नाहीये. (डोळा मारते)

स्वप्नील- अरे वा. आम्हाला पण एखादी झलक दिसू दे कधीतरी.

राधिका- दिसेल. राधिकाच्या मर्जीत राहिलास तर नक्की दिसेल. पण सध्या हर्षदला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. Everything is fair in love and war and corporate ladder is nothing less than a war. What say?

स्वप्नील- Bingo! पण प्रत्येक वॉर एकाच ट्रेटजीने जिंकता येत नाही.

राधिका- स्ट्रॅटेजी एकच. Atom bomb. एकदा तो पडला की कोणीच वाचू शकत नाही. (त्याच्या डोळ्यात मादक नजरेने बघत) Hope you know what I mean.

स्वप्नील- Indeed. पण बॉम्ब टाकायला निदान वेळ तरी योग्य शोधावी लागते.

राधिका- (प्रचंड आत्मविश्वाने) Tonight!

स्वप्नील- (आश्चर्याने) काय सांगतेस? Where?

राधिका- Z grill आणि नंतर…(अचानक लक्षात येऊन) तू कशाला इतक्या चौकश्या करतो आहेस पण?

स्वप्नील- हम भी तो कतार में है! ध्यान रखना और कभी हमें भी मौका देना!

राधिका- (त्याला आपादमस्तक न्याहाळून, खुश होऊन) येईल तुझा नंबर नक्की येईल.

स्वप्नील- I shall look forward to it. Have a great day and the night too! (इतके म्हणून हसत तिला डोळा मारून निघतो.)

लंच नंतर मानसी हर्षदच्या केबिन मध्ये येते. दारातून विचारते-

मानसी- Hi. Are you busy?

हर्षद- (थोड्या आश्चर्याने तिच्याकडे बघत) No please come in.

मानसी- काही खास काम नाही. काल नीट विश करता नाही आलं म्हणून आज पर्सनली भेटून विश करायला आले.

मानसी त्याच्या जवळ जाऊन शेकहँड करायला आपला नाजूक हात पुढे करते. इतके दिवस तणावपूर्ण असलेले वातावरण अचानक बदलल्याचे लक्षात आल्याने हर्षदही थोडा चक्रावतो. तिच्याकडे बघत शेकहँड करायला तिचा हात हातात घेतो. तिचा मऊ, गुलजार हात हातात धरल्यावर त्याच्या मनात उगाच गुदगुल्या झाल्यासारखं वाटत.

मानसी- Congratulations for the success of the first phase. फक्त एक सजेशन आहे. पुढल्या फेज मध्ये मॅनपॉवरची गरज वाढेल. पण बजेट कन्सट्रेन असेल. त्यामुळे युटीलायझेशन ऑप्टिमाईज करा. परफॉर्मन्स इन्सेंटिवाईज करा. आहेत त्याच लोकांकडून जास्त काम करून घ्यावं लागेल. त्यांना मोटिव्हेट करणं हे महत्वाच ठरेल.

हर्षद तिचा हात हातात धरून ऐकत असतो. त्याला मनात ते पटत असत. तिच्या हुशारीच आणि दूर दृष्टीच कौतुक वाटत असत. इतक्यात ती हळूच हात सोडवून घेते.

मानसी- I am sure की राधिकाने ह्यावर विचार केला असेल. पण “मी आणि स्वप्नील” आज एचआर बजेट डिस्कस करत होतो तेव्हा हा पॉईंट महत्वाचा वाटला. Swapnil I must say is an intelligent guy. We both seem to think alike.

हे ऐकून हर्षद मूळ पदावर येतो. त्यात तिच्या तोंडून स्वप्नीलचे नाव आणि त्याचे कौतुक ऐकून त्रासतो.

हर्षद- Of course. राधिकाने हा पॉईंट केव्हाच हायलाईट केला आहे. We are pretty much on track. But thanks for your wishes!

मानसी त्याच्या डोळ्यात बघून हसते आणि निघते. तो तिच्या पाठमोऱ्या शेलाट्या आकृतीकडे बघत रहातो. इतक्यात दार उघडून राधिका येते. मानसी दाराजवळ तिला “हाय” म्हणते, मागे वळून हर्षदकडे पाहून गोड हसते आणि जाते.

राधिका- हिने काय काम काढलं अचानक?

हर्षद- Nothing serious. तू सांग.

राधिका- हर्षद आपल्याला नेक्स्ट फेज मध्ये रॅम्प अप करावे लागणार आहे. माणसांची गरज पडणार आहे. मी प्लॅन तयार केला आहे. तुला मेल करते. ते एकदा बघून अप्रूव्ह कर म्हणजे एच आर ला पाठवता येईल.

राधिका आपण किती मस्त प्लॅन केला आहे ह्याची शाबासकी हर्षदच्या तोंडून ऐकायला आतूर असते. हर्षदला आत्ताच मानसीने दिलेली सूचना आठवते. त्याला राधिकाच्या मादक चेहऱ्यावरील मठ्ठ भाव आज प्रकर्षाने जाणवून त्या राग येण्यासारख्या परिस्थितीतही हसायला येते. त्याला हसताना पाहून राधिका अधिकच खुश होते.

हर्षद- (रागावर, हसण्यावर नियंत्रण ठेऊन शक्य तितक्या शांतपणे) राधिका तू बेसलाईन बघितलीस का? ह्या एक्स्ट्रा मॅन पॉवर साठी बजेट आहे का?

राधिका- (भांबाऊन) Of course. म्हणजे तसं बघितलंय मी. पण let me have another look and come back to you.

हर्षद- No need. Do as I say. एक रिवॉर्ड अँड रेकग्निशनचा प्लॅन बनव. आहे त्याच टीमसाठी.We have to pull this through with the existing team without a single addition and drop out!

राधिका- Oh thats fantastic. You are a genius Harshad. मी उद्या देते प्लान. (मग लाडेलाडे हसत, त्याच्या नजरेत नजर रोखत) पण आजचं लक्षात आहे ना? We will have a momorable night!

हर्षद- Yes I remember that.

राधिका- (शेक हँड करायला त्याचा हात हातात घेऊन त्यावर दाब देत) Z grill. 8pm sharp.

हर्षद- Sure!

हर्षद हात सोडवून घेतो. राधिका मादक हसत निघते. तिला पाठमोरी पहात असताना हर्षदच्या डोळ्यासमोर मगाशी पाहिलेली मानसी येते. केबिनचा दरवाजा बंद होतो!

राधिका पावणे आठ पासून Z grill च्या लॉबीमध्ये जाळ करत उभी असते. येणारा जाणारा प्रत्येक माणूस तिला पाहून उसासे सोडत असतो. ती हे अटेंशन एन्जॉय करत असते. आठ पाच होऊन देखिल हर्षद न आल्याने तिची घालमेल सुरु होते. ती दहा मिनिटात त्याला चार फोन करते. पण हर्षद उचलत नाही. ती प्रचंड बेचैन होते. बरोब्बर साडे आठला हर्षद येतो. देखणा, रुबाबदार पोशाख करून. त्याला बघून राधिकाच्या जीवात जीव येतो. हर्षद किलर दिसत असतो. राधिका पूढे होऊन त्याचा हात धरते.

राधिका- (त्याचा दंड धरून त्याचे कोपर आपल्या अंगाला लागेल ह्याची दक्षता घेत) Harshad, where were you? I called four times. I was worried.

हर्षद- Traffic!

राधिका- No problems. मी काळजीने विचारलं. Let’s go.

राधिका त्याचा दंड धरून त्याच्या खांद्यावर डोके घासत निघते. तिच्या स्पर्शाने आणि परफ्युमच्या वासाने हर्षद सुखावतो. दोघे आत शिरतात. आत मंद दिव्यात टेस्टफूली सजवलेलं एथनिक रेस्टोरण्ट त्यांचं स्वागत करत असत. शांत वातावरणात अनेक कपल्स कँडल लाईटचा आनंद घेत जेवत असतात. स्वागतिका पूढे होऊन त्यांना “गुड इव्हिनिंग” म्हणते. हर्षद पाचशेची नोट तिच्या हातात सारत “टेबल फॉर टू” सांगतो. स्वागतिका हसून “this way sir” म्हणून निघते. ते दोघे तिच्या मागे निघतात. ती कोपऱ्यात असलेलं, थोडा एकांत देणारं, ठेवणीतलं टेबल त्यांना दाखवते. हर्षद हसून “Thanks” म्हणतो. स्वागतिका जाते. दोघे स्थानापन्न होतात. राधिका हर्षदच्या शेजारी त्याला खेटून बसते. दोघे ड्रिंक आणि स्टार्टर ऑर्डर करतात. हर्षद एक सिप घेतो. राधिका मूड मध्ये येते. त्याला आणखी बिलगून बसते.

इतक्यात आपले आरस्पानी सौंदर्य अधिक खुलवणाऱ्या झुळझुळीत इव्हिनिंग गाऊनमध्ये मानसी स्वप्नीलबरोबर तिथे येते. ते दोघे लांबच्या टेबलवर बसतात. हर्षदच्या कानात स्वीट नाथिंग्स सांगणाऱ्या राधिकाला ह्याची कल्पनाही नसते. पण त्यांना तिथे एकत्र बघितलेल्या हर्षदला बरोबर असलेल्या राधिकाचा विसर पडलेला असतो. तो फक्त त्या दोघांना बघत असतो. हर्षद ग्लासातील ड्रिंक एका घोटात संपवून रिपीट ऑर्डर करतो. राधिकाला थोडं आश्चर्य वाटत पण ती दुर्लक्ष करून आपले जाळे विणत बसते. मानसी आणि स्वप्नीलच्या मध्ये असलेल्या कँडलचा धूर हर्षदच्या मनात साचत असतो!

क्रमश:

आमच्या इतर प्रेम कथा – प्रेम कथा

आमच्या दीर्घकथा – गुंतता हृदय…(भाग 1)

आमच्या व्यक्तिरेखा- व्यक्तिचित्रण

आमच्या भयकथा भयकथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “रिफ्लेक्शन भाग ५”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!