रिफ्लेक्शन | Mandar Jog

रिफ्लेक्शन भाग ४

मानसीचा निर्णय झालेला असतो. ती ऑफिसला येऊन राजीनाम्याचे मेल टाईप करून ठेवते. ते हर्षदला सेंड करण्याआधी कॅफेटेरियामध्ये येते. ब्लॅक कॉफी घेऊन काचेजवळच्या टेबलावर बाहेर बघत बसते. डोक्यात सुरु असलेल्या विचारांच्या चक्राबरोबर हातातील मग गोलगोल फिरवत असते. “विचारचक्र, चक्रावून टाकत एकदम” मागून आवाज येतो. ती वळून पहाते. हातात कॉफीचा मग घेऊन मागे स्वप्नील उभा असतो.

स्वप्नील- हाय गुड मॉर्निंग!

मानसी- (हसून) गुड मॉर्निंग!

स्वप्नील- कसलं चक्र सुरु आहे डोक्यात?

मानसी- Nothing serious.

स्वप्नील- (हसून) थोडक्यात None of your business असे सौम्य शब्दात म्हणते आहेस! नो प्रॉब्लेम!

मानसी- अरे तसं नाही.

स्वप्नील- मग कसं?

मानसी- (थोडा विचार करून. स्वप्नीलच्या डोळ्यात बघत) I have decided to put my papers.

स्वप्नील- आयला हे तर मला माहिती होतं. मला वाटलं अजून काही आहे की काय.

मानसी- (आश्चर्याने) तुला कसं माहीत? I mean I have not told anyone about this!

स्वप्नील- मॅडम मी HR मध्ये आहे. वरून कालच्या पार्टीला हजर होतो. आणि मी बेसिकली हुशार आहे. फक्त दाखवत नाही. (जोरात हसतो)

मानसी- (त्याच्या हास्यात सामील होत) Oh I have no doubt about your intelligence especially after today’s guess!

स्वप्नील- एक विचारू?

मानसी- काय?

स्वप्नील- Resignation देऊन तू काय साधणार?

मानसी- (पटकन उत्तर न सुचल्याने शांत)

स्वप्नील- सांग सांग विचार करून सांग. आणि हे बघ हे HR head म्हणून कौंसिलिंग नाहीये. एक मित्र म्हणून चर्चा आहे.

मानसी- Of course I know that.

स्वप्नील- Great then. Your answer please.

मानसी- स्वप्नील तू काल पार्टीत काय झालं ते पाहिलेस.

स्वप्नील- हो पाहिलं मग?

मानसी- I felt insulted.

स्वप्नील- Why?

मानसी- What do you mean by why?

स्वप्नील- तुला इन्सल्टेड का वाटलं ते कळलं नाही मला.

मानसी- मी हर्षदसाठी आणलेला बुके त्याने राधिकाला द्यायला लावला. Isn’t it insulting?

स्वप्नील- (तिच्याकडे रोखून बघत) I don’t think so.

मानसी- (आश्चर्याने) What?

स्वप्नील- येस. प्रोफेशनली बघता मला त्यात अपमानास्पद काहीच वाटलं नाही. हर्षदला राधिकाचं कौतुक करायचं होतं. तू सिनियर मॅनेजमेंट टीमची मेम्बरं आहेस. त्याने तुझ्या हस्ते तिचा सत्कार केला इतकंच. आता राधिकाचा सत्कार करणं योग्य की अयोग्य, तिचं प्रोजेक्टमधील काँट्रीब्युशन काय हे मुद्दे वादग्रस्त ठरू शकतात. In fact I told you my views last night only. पण तरीही professionally तुझा अपमान कसा झाला ह्याचा मी विचार करतोय. हां आता पर्सनल राग असेल तर गोष्ट वेगळी.

मानसी- (उद्वेगाने) There is nothing personal. Its just that Radhika..

स्वप्नील- (तिला मधेच तोडत तिच्याकडे रोखून बघत) Is Radhika personal?

मानसी त्याच्या नजरेत नजर न देता आल्याने मान वळवून बाहेर बघू लागते.

स्वप्नील- राग नक्की कसला आलाय मानसी? राधिकाला तुझ्याहस्ते बुके द्यायला लावल्याचा की राधिकाचे काहीच काँट्रीब्युशन नसताना तिचे कौतुक झाल्याचा की तू खास हर्षदसाठी आणलेला बुके ‘राधिकाला’ मिळाल्याचा की एकूणच राधिका तुझ्या आयुष्यात, सॉरी ऑफिसात आल्याचा?

मानसी- (गोंधळून त्याच्याकडे बघत) What do you mean?

स्वप्नील- (शांतपणे) I mean exactly what I said! There is nothing professional in your decision. आणि वैयक्तिक कारणासाठी नोकरी सोडणे unprofessional होईल असे मला वाटते. वरून तसे केल्याने प्रॉब्लेम संपणार नाही तर उलट वाढेल.

मानसी- (नजर चोरत) कसला प्रॉब्लेम? What are you talking about?

स्वप्नील- I am talking about the fact that you are trying to avoid talking about! And that fact is you are fond of Harshad!

मानसी अविश्वासाने त्याच्याकडे बघते.

स्वप्नील- Manasi I am a blunt guy. जे वाटतं ते स्पष्ट बोलतो. तू सांग की मी म्हणालो ते चूक आहे. मी माझे शब्द मागे घेईन. तुझी माफी मागेन.

मानसी काही न बोलता खाली बघत रहाते. डोळ्यात आलेले अश्रू लपवायचा प्रयत्न करते.

स्वप्नील- मानसी माझा एक आवडता डायलॉग आहे अग्निपथ सिनेमातला. त्यात अमिताभ म्हणतो “कहनेको तो ये शहर है| लेकिन यहां जंगल का कानून चलता है|….” ताकदवान माणूस दुर्बलावर विजय मिळवतो. मग ते कॉर्पोरेट असो किंवा वैयक्तिक आयुष्य! तू इतकी हुशार, स्मार्ट, विचारी असूनही दुर्बल कशी काय झालीस? Love should make you strong and not weak!

मानसी- (स्वप्नीलकडे बघत. डोळ्यातले अश्रू तसेच वाहू देत) स्वप्नील….

स्वप्नील- Oh come on. मैदान सोडून पळून जाण्यात काय मजा आहे. मजा मैदानात टिकून युद्ध जिंकण्यात आहे.

मानसी- हम्म

स्वप्नील- आणि युद्ध रडून नाही तर टफ राहून जिंकता येतात. ज्या इगो आणि जेलसीमुळे माणसं तुटतात त्याच इगो आणि जेलसीमुळे ती जवळही येऊ शकतात. फक्त योग्य अप्लिकेशनची गरज असते. आपल्या विकनेसला आपली strength बनवायची गरज असते. We will fight this war together. I am with you.

मानसी- (डोळे पुसत, मनापासून स्मित करत) स्वप्नील thanks for being such a great friend.

स्वप्नील- आभार प्रदर्शन इतक्यात नको. ये तो सुरुवात है| हिरॉईन के मन में क्या है मालूम पडा है! लेकिन हिरो के मन की बात अभी जाननी है!

मानसी लाजून हसते. दोघे मग्स ठेऊन आपापल्या केबिनमध्ये परततात. हर्षदच्या केबिनमध्ये राधिका येते. त्याचा हात हातात घेऊन-

राधिका- Thanks so much Harshad for the appreciation! I want to take you out to celebrate this. आज डिनरला जायचं का?

हर्षद तिच्याकडे बघत असतो. हातात असलेल्या तिच्या हातातून ती जे सांगत असते ते समजून घेत असतो. इतक्यात त्याच्या लॅपटॉपमध्ये मानसीचे “Congratulations” लिहिलेले मेल येते. हर्षदची राधिकाच्या हातावरील पकड क्षणभर ढीली पडते. हर्षद विचार करतो. राधिकाचा हात परत घट्ट पकडून लॅपटॉपमध्ये बघत “Lets go” म्हणतो. मेलमध्ये त्याला मानसीचा चेहरा दिसत असतो. तो लॅपटॉप बंद करतो.

क्रमश:

पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ४

रिफ्लेक्शन भाग १ ची लिंक. रिफ्लेक्शन भाग १

ही कथा सलग वाचण्यासाठी वरील लिंक क्लिक करून पहिल्या भागापासून वाचा. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढील भागाची लिंक आहे. ती क्लिक करून सगळे भाग सलग वाचा.

आमच्या लघुकथा- लघुकथा

आमची प्रसिद्ध दीर्घकथा गुंतता हृदय – गुंतता हृदय…(भाग 1)

आमची कादंबरी ट्वेंटी थ्री- ट्वेंटी थ्री

लोकप्रिय कादंबरी सख्या रे- सख्या रे …

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “रिफ्लेक्शन भाग ४”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!