रिफ्लेक्शन भाग ३
राधिका खरच तीन दिवसात जॉईन झाली. इंडक्शन वगैरे सोपस्कार पूर्ण होऊन आठवड्याभरात सिस्टीममध्ये रुळली. तिचे केबिन हर्षदच्या बाजूलाच होते. सदर प्रोजेक्ट हर्षदचे बेबी असल्याने तिचा दिवसातील बराच वेळ हर्षदबरोबर जायचा. तिच्या परफ्युमचा वास, तिचे दिसून न दिसणारे आणि न दिसून दिसणारे अंगप्रत्यांग, दिवसभरात होणारे किंवा केले जाणारे कधी ओझरते तर कधी ठळक स्पर्श हर्षदचे लक्ष विचलित करायचे. त्याला डोळे उघडे ठेवले की राधिका आणि मिटले की मानसी दिसे. पुढाकार हर्षदलाच घ्यायचा होता. पण सध्या त्याच्या डोक्यात प्रोजेक्ट यशस्वी करणे हीच प्रायॉरीटी होती.
काही दिवसात राधिकाच्या कामातील मर्यादा हर्षदच्या लक्षात आल्या. म्हणजे त्याला त्या माहीतच होत्या. फक्त त्यावर शिक्कामोर्तब झालं. काही इमेल आणि मीटिंग्स मधील इंटरेक्शन मधून ही बाब मानसी आणि देशपांडे ह्यांच्याही लक्षात आली. पण कोणी काहीच बोलत नव्हते. काही महिन्यात राधिका फक्त हर्षदचे इमेल बनून राहिली. म्हणजे मेल्स, इन्सट्रक्शन तिच्या असत पण त्यातील भाषा, विचार, स्ट्रॅटेजी मध्ये हर्षद सहज दिसत असे.
तीन महिन्यांनी प्रोजेक्टच्या पहिल्या फेजची सक्सेस पार्टी होती. हर्षदने खरच आपले कौशल्य पणाला लावून, मानसीच्या मुद्द्यांवर योग्य उपाय शोधून इथवर प्रोजेक्ट यशस्वी केला होता. मानसीला हर्षदच्या हुशारीचे कौतुक होते. हट्टी पण हुशार, कर्तबगार हर्षद तिच्या मनात कुठेतरी घर करू लागला होता. आज रात्री ऑफिसच्याच लॉन वर पार्टी असणार होती.
मानसीने एक छान लाल गुलाबांचा बुके हर्षदसाठी ऑर्डर करून ठेवला. मानसी आज वेस्टर्न ड्रेसमध्ये अफलातून दिसत होती. सकाळपासून तिला पहाणाऱ्या सर्वांच्या नजरा एकदा तरी परत वळत होत्या. देशपांडे म्हणाले देखील “आज विशेष नटून आली आहेस. सक्सेस पार्टीसाठी की…?” मानसी त्यांना तोडून म्हणाली “Of course. Its our success. साजरा करायलाच हवा!” देशपांडे चष्मा काढून डोळ्यापासून लांब धरत त्यातून तिच्याकडे बघत “हम्म” इतके म्हणाले. मानसी लाजेने दुसरीकडे बघू लागली.
रात्री सर्वजण हळू हळू टेरेसवर जमले. मानसी हुशारी आणि सौंदर्याच्या तेजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. बायका एकमेकांचे ड्रेस आणि मेकअपची तारीफ करत बार जवळ उभ्या असलेल्या पुरुषांबद्दल दबक्या आवाजात चर्चा करत फुसफुसत होत्या. बहुतांश पुरुष मंडळी बार टेंडरला ड्रिंक्सच्या रिपीट ऑर्डर देत होती. वेटर स्टार्टर्स घेऊन फिरत होते. मानसीची नजर हर्षदला शोधात होती तर राधिका देखील अजून आलेली नाहीये ही गोष्ट देशपांडयांच्या लक्षात आली होती!
अर्ध्या तासाने हर्षद आणि राधिका एकत्र आले. राधिकाचा लोssss नेक स्पॅगिटी टॉप आणि तीव्र मायक्रो मिनी पाहून काही पुरुष मंडळींची नशा धाडकन उतरली तर काही जणांना अचानक चढली. हर्षद काळ्या ब्लेझरमध्ये आकर्षक दिसत होता. आतापर्यंत मानसीच्या स्कॉच सौंदर्याने भरलेला माहोल राधिकाच्या येण्याने देशी नशा झाला!
सर्वांनी पुढे होत हर्षदचे अभिनंदन केले. हर्षदने माईक हातात घेतला. मानसीने पुढे होऊन बुके हर्षदला देत ” congrats” म्हटले. तो देऊन ती निघाली. हर्षदने तिला थांबवले-
हर्षद- Manasi please wait. (मानसी आश्चर्याने मागे वळली) इथेच थांब. (मानसी थांबली. हर्षद माईकवर बोलू लागला) My dear colleagues! आज आपला नवा प्रोजेक्ट सुरु होऊन फेज 1 च्या सक्सेसची पार्टी आहे. ह्यात तुम्हा सर्वांचा सहभाग आहे. सो ही पार्टी तुमच्या यशाची आहे. अजून बराच पल्ला बाकी आहे. पण आपण तो यशस्वी करूच. (मानसीकडे बघत) ह्या प्रोजेक्टच्या सुरुवातीला मला, माझ्या स्ट्रॅटेजीला विरोध झाला. But I pulled it through! आणि ह्यात मला महत्वाची मदत राधिकाने केली आहे. (राधिकाकडे बघून) Radhika please join me. (राधिका पुढे येते. हर्षद हातातील बुके मानसीला परत देतो.) मानसी ह्या बुकेवर हक्क राधिकाचा आहे. Why don’t you give her this bouquet on behalf of all of us and appreciate her contribution to the project?
मानसीच्या डोळ्यात दुःख आणि अविश्वासाने अश्रू उभे रहातात. ती थरथरत्या हातांनी राधिकाला बुके देते. हर्षद राधिकाला शेकहँड करून अभिनंदन करतो. राधिका त्याला मिठी मारून त्याच्या कानात ओठाचा स्पर्श करत “Thanks so much Harshad” म्हणते. सगळे टाळ्या वाजवतात. डान्स फ्लोर ओपन होतो. राधिका हर्षदला डान्स फ्लोरवर घेऊन जाते!
माहोल जल्लोषाचा असतो. हर्षद दोन ड्रिंक्सनंतर रिलॅक्स असतो. राधिका त्याच्या गळ्यात पडून डान्स करत असते. हर्षद डान्स तिच्याबरोबर करत असला तरी त्याचे लक्ष मानसीवर असते. फारशी ड्रिंक न करणारी मानसी बार जवळ जाऊन एक ब्रीझर घेते. त्या ब्रीझर बरोबर दुःख, संताप, अपमान गिळून टाकते. त्या बरोबरच तिने निर्णय घेतलेला असतो. इतक्यात बारच्या तिच्या बाजूच्या उंच स्टूलावरून आवाज येतो “Breezer contains 4.8% alcohol. Don’t have more.”
मानसी आवाजाच्या दिशेने वळून बघते. तिच्या शेजारी त्यांचा HR head स्वप्नील बसलेला असतो. सहा फूट उंच, गोरा, कमावलेले शरीर असलेला स्वप्नील मितभाषी असल्याने ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त फारसे बोलणे झालेले नसते. स्वप्नील शांत हसतो-
स्वप्नील- I am serious. ब्रीझर अचानक हिट करते. घेताना लक्षात येत नाही. जसे काही लोक कळायला वेळ लागतो तसंच.
मानसी- (हसते) hmm I know. Thanks.
स्वप्नील- (मानसीच्या डोळ्यात बघत) तुला काय वाटत? राधिकाचं खरच इतकं काँट्रीब्युशन आहे ह्या प्रोजेक्टमध्ये?
मानसी- (थोडा विचार करून) असेलही. If Harshad feels so.
स्वप्नील- Thats a typical diplomatic corporate reply. Don’t worry. मी आपले संभाषण रेकॉर्ड वगैरे करून ऐकवणार नाहीये कुणाला. मला विचारशील तर I find her just above average. This success is all because of Harshad’s intelligence and strategy.
अगदी आपल्या मनात येत असलेले विचार कोणीतरी बोलून दाखवत असल्याने मानसी मनातल्या मनात थोडी सुखावते. हसते.
मानसी- अरे वा. बिनधास्त बोलतोस की तू. ऑफिसमध्ये मात्र काम से काम ठेवतोस.
स्वप्नील- I told you. काही लोक ब्रीझर सारखे असतात. कळायला वेळ लागतो.
मानसी- हम्म! इंटरेस्टिंग!
स्वप्नील- Would you mind if I request you for a dance?
मानसी चमकून त्याच्याकडे बघते. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि आत्मविश्वास असतो. जणू तो म्हणत असतो “तुला काय होतंय ते मला कळतंय. विसरून जा!” मानसी क्षणभर विचार करून हात पुढे करून म्हणते “Lets go!”
दोघे हातात हात घेऊन डान्सफ्लोरवर जातात. ब्रीझरची धुंदी, हर्षदचा राग आणि स्वप्नीलने त्यावर घातलेली हळुवार फुंकर ह्यांचा एकत्र परिणाम असल्यासारखी मानसी बेधुंद नाचते. स्वप्नील बरोबर असतोच. आता जवळजवळ राधिकाच्या बाहुपाशात अडकलेला हर्षद ते पाहून सैरभैर होतो. राधिकाला बाजूला सारून बारकडे जातो. राधिका मागे जाते. डान्सफ्लोरवर मंद म्युझिक सुरु होते. मानसी दोन्ही हात स्वप्नीलच्या गळ्यात अडकवते. स्वप्नील मात्र योग्य अंतर ठेऊन सावकाश डान्स करत असतो. हर्षद ड्रिंक रिपीट करत ते बघत असतो.
दूर कोपऱ्यात काजू खात खात ज्यूस घेत असलेले देशपांडे हे सर्व पहात असतात. त्यांची हुशारी आणि अनुभव त्यांना येणाऱ्या काळाची पुसटशी कल्पना देत असतात. देशपांडे चस्मा पुसून, तो दूर धरून त्याच्या काचेतून एकदा मानसी आणि एकदा हर्षदला बघतात. दोन काजू तोंडात टाकून दुसरे ज्यूस घ्यायला बारकडे जातात. पार्टी उत्तरोत्तर रंगत जाते!
क्रमश:
पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ४
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ३ […]
सुंदर रंगत चाललीय कथा.पुढील भागाची उत्कंठा आहे.
thanks
Khup chhan rangi aahe katha ..waiting for part 4
thanks.
रंगत चालली आहे कथा
thanks. पोस्टची लिंक अवश्य whatsapp वर शेयर करा.
Wah.. surekh… pahilya 2 part peksha ha bhag agadich mast jamlay..
thanks