गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

…….इथे आर्याने तेजसला मेसेज केला “आय होप तुला आता बर वाटतंय. आज डिनरला जायचं का? तुझा ओठ झोंबत नसेल तर. ;-)” तिचा मेसेज डिलिव्हर झाला नाही. ते पाहून टेन्स झालेल्या आर्याने राधिकाला फोन लावला. मिटिंग मध्ये असलेल्या राधिकाने तिचा फोन घेतला नाही. इथे तेजस मुग्धाला म्हणाला” मुग्धा, मी तुझं ऐकली सगळं आणि मला पटलं देखील आहे. आता मी सांगतो ते ऐक.” तेजस मुग्धकडे बघत उभा राहिला. त्याला काल अर्याला झिडकारताना अनुभवलेला मुग्धाचा स्पर्श, गंध आणि तिच्या ओठांची चव आठवत होती. पुढे होऊन त्याने स्लीव्हलेस ड्रेसमधून दिसणाऱ्या तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने मुग्धा दचकली. तेजसने हात काढून घेतला.

तेजस- मुग्धा खर बोलू की खोटं?

मुग्धा- तुम्हाला जे योग्य वाटेल ते बोला.

तेजस- ओके. खरं हेच आहे की तू इथे जॉईन करणार आहेस हे मला माहित होतं.

मुग्धाने अविश्वासाने त्याच्याकडे बघितलं.

तेजस- हो मुग्धा. पण तरीही मला तुझ्याशी मैत्री करायची इच्छा   होती सो मी तुला त्यावेळी काहीच सांगितलं नाही. नाहीतर आपली मैत्री झाली नसती अशी भीती होती मला. आणि trust मी, काल मी तुला हे सर्व स्वतः सांगणार होतो पण ती आर्या आली आणि मी अडकलो.

मुग्धा- कोण आर्या?

तेजस- अग राधिकाची भाची आहे. स्कल्पचर करते. ती बोलत बसली होती आणि त्यात वेळ गेला. पण तू प्लीज रागावू नको. हे बघ ऑफिसात आपण कलीग्स आहोत आणि राहू. पण आपली मैत्री बाहेर कायम राहील. तू प्लीज ह्याच टेन्शन घेऊ नको.

मुग्धा- पण तेजस मला हे खूप कठीण जाईल. मित्राच्या कंपनीत नोकरी आणि बॉस बरोबर मैत्री.

तेजस- कारण तू उलटा विचार करते आहेस. तू असा विचार कर की बॉसच्या ऑफिसात नोकरी आणि मित्राबरोबर मैत्री. मग तुझा हा असा गोंधळ होणार नाही.

त्याने तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला.

मुग्धा- ठीक आहे. मी प्रयत्न करते.

तेजस- thats like a good girl. मग आज ऑफिसच्या पहिल्या दिवसाच्या आनंदात डिनर?

मुग्धा- आज?

तेजस- हो आज. उद्या कोणी बघितलाय? हो की नाही बिनधास्त सांग.

मुग्धा- हो.

तेजस- ग्रेट. तुझं इंडक्शन झालं. आता तू कामाला सुरुवात कर.

मुग्धा- हे इंडक्शन?

तेजस- हो हे मित्राने घेतलेलं मैत्रीच इंडक्शन. बाकी काम शिकवायला स्टाफ आहेच.

मुग्धा- तुम्ही पण कमाल आहात तेजस.

इतकं बोलून मुग्धा जायला निघाली.

तेजस- मुग्धा आपली मैत्री फक्त आपल्यातच असू दे. ऑफिसात आपण कलीग्स आहोत. कळतंय ना तुला?

मुग्धा- हो तेजस. तुम्ही काळजी करू नका.

मुग्धा बाहेर गेली. तेजस खुश होता. गैरसमज दूर झाल्यामुळे आनंदी होता. त्याने फोन सुरु केला आणि त्याला आर्याचा मेसेज मिळाला.

तेजस- (स्वतःशी) आर्या तू हे का करते आहेस. ह्यातून काहीच साध्य होणार नाहीये. आपल्यात फक्त आकर्षण असू शकतं प्रेम नाही कारण मी प्रेम करतो ते फक्त मुग्धावर….

स्वतःच्या तोंडून हे ऐकून तेजस स्तंभित झाला. आपण काय बोलून गेलो ह्याचा विचार करू लागला. इतक्यात त्याला आर्याचा फोन आला.  

आर्या- हाय तेजस.

तेजस- बोल आर्या…

आर्या- आज एकदम बिझी का?

तेजस- हो…जरा एक मिटिंग सुरु होती…

आर्या- तरीच माझा मेसेज डिलिव्हर झाला नाही.

तेजस- हो. just मिळाला मला तुझा मेसेज. मी रिप्लाय करणारच होतो इतक्यात तुझा फोन आला.

आर्या- ओके. मग कुठे जाऊया आज? आणि हे बघ ते ड्रिंक वगैरे नको आज. उगाच मग लिमिट क्रॉस होते. मस्त शांत डिनर करू आणि गप्पा मारू ओके?

तेजस- not possible आर्या.

आर्या- का?

तेजस- मला रात्री एक महत्वाची मिटिंग आहे.

आर्या- मिटिंग की डेट? डेट असली तरी हरकत नाही. ती झाल्यावर भेट. आपण लेट डिनर करू.

तेजस- नाही आर्या. आज खरच जमणार नाही. मला वेळ लागेल मिटिंग संपवायला.

आर्या- तुला “वेळ लागतो” हे माहित्येय म्हणून तर इतकी मागे लागले आहे भेटायला आणि तू आहेस जो मला avoid करतो आहेस.

तेजस- तस काही नाहीये आर्या. some other time okay?

आर्या- okay तेजस. हरकत नाही. बाय.

तेजसने फोन कट केला आणी कामात डोकं घातलं.

मुग्धाला तिचं क्युबिकल मिळालं होतं. एका कलीग ने तिला त्यांच्या जॉब पोर्टल मध्ये आलेले सीव्ही sorting करायचं काम दिलं होतं. मुग्धाला ते काम नवीन असलं तरी फार कठीण वाटत नव्हतं. ती कामात गर्क झाली. दुपारी लंच नंतर राधिका तिला भेटायला आली. मुग्धा उठून उभी राहिली.

राधिका- सो…induction कसं होतं?

मुग्धा- मस्त.

राधिका- तू लकी आहेस हां मुग्धा. तुझं induction डायरेक्ट सिईओ ने केलं.

मुग्धा- हम्म…

राधिका- मग…काय शिकवलं तेजस ने induction मध्ये?

मुग्धाला आता काय उत्तर द्यायचं हे सुचत नव्हतं. इतक्यात तेजसचा आवाज आला.

तेजस- राधिका माझं knowledge टेस्ट करते आहेस का?

राधिका- ओह come on तेजस. मी तिला सहज विचारात होते.

तेजस- i know. मी तिला आपले बेसिक रुल्स आणि history सांगितली. she is bright. चांगलं हायरिंग आहे हे. ह्यासाठी तुला अप्रेजल मध्ये एक बोनस पोइंट  माझ्याकडून.

राधिका- ओह..thats lovely. आणि एका पोइंट ची किंमंत किमान ५ डीजीट salary hike असा अर्थ काढू ना मी?

राधिका हसली.

तेजस- (मुग्धाकडे बघत) काही गोष्टी पैशात नाही मोजता येत. anyway.चालू दे तुमचं. बाय मुग्धा.

तेजस गेला. राधिका पण मुग्धाचा निरोप घेऊन निघाली. मुग्धा कामात गुंतली पण तिला तेजसच “काही गोष्टी पैशात नाही मोजता येत” हे वाक्य आठवत राहिलं.  

संध्याकाळी मुग्धाने अमेयला जेवायला घालून झोपवला. तरी अमेय विचारात होताच की तू इतक्या रात्री कुठे जाते आहेस? मुग्धाने त्याला ऑफिसच्या कामाला असं सांगून झोपवला. मग स्वतः तयार होऊन निघाली. निघताना तिला प्रशांतचा फोटो दिसला. ती चांगल्या भावनेने जेवायला जात असल्याने मनात कुठेही गिल्ट नव्हती. ती फोटोकडे बघून छान हसली आणि निघाली. बिल्डींग मधून चालत चौकात आल्यावर तेजसची गाडी उभीच होती. ती गाडीत बसली. तेजस स्वतः गाडी चालवत होता. मुग्धाला कळत नव्हत की कितीही स्वच्छ मानाने ती तेजसला भेटली तरी प्रत्येक वेळी तिच्या मनात त्याला भेटल्यावर एक आकर्षण किंवा मैत्री पलीकडच काहीतरी दाटून का येतं? मग त्यातून निर्माण होणारी ती गिल्ट. मुग्धा परत आपल्या विचारांच्या कोशात गेली. तेजस तिच्याकडे बघत होता. पण त्याने मुग्धाला डिस्टर्ब केलं नाही.

रेस्तोरंतच्या valet ला गाडी सोपवून दोघे आत गेले. तेव्हा त्यांच्या पाठलागावर आलेल्या रोहितने देखील गाडी valet च्या सुपूर्द केली आणि रेस्तोरंत मध्ये हळूच प्रवेश केला. त्या महागड्या रेस्तोरंत मध्ये फार गर्दी नव्हती. तेजस ने कोपर्यातलं एक शांत टेबल निवडलं. दोघे तिथे बसले. रोहित त्यांच्यापासून लांब एका टेबलवर चेहरा झाकून बसला. मुग्धा अजूनही स्वतःच्या विचारात हरवलेली होती.

तेजस- काय झालं मुग्धा? any problem?

मुग्धा- न…नाही काही नाही.

तेजस- हे बघ जे असेल ते सांग. बोलून मन मोकळ करावं.

मुग्धा- कसं आणि काय सांगू तुम्हाला?

तेजस- (तिचा हात हातात धरून) हे बघ आपण फ्रेंड आहोत ना? मग काय हरकत आहे बोलायला?

मुग्धा- तेजस आपण फ्रेंड आहोत ना? मग तुम्ही फ्रेंड म्हणून माझा हात धरल्यावर मला गिल्टी का वाटतं? माझ्या मनात पाप आहे का?

तेजसने  हे ऐकून तिचा हात सोडला.

तेजस- (आश्चर्याने) क…काय म्हणालीस तू?

मुग्धा- तेज जे ऐकून तुम्ही पण घाबरलात. पण तेजस तुम्ही जे ऐकून घाबरलात ते मी जगते आहे. काय करू मी सांगा ना?

मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहित ते बघत होता. तेजसने आपला रुमाल तिला दिला. तिने डोळे पुसले आणि म्हणाली-

मुग्धा- आठवतं तुम्हाला? तुमचा हाच रुमाल माझ्या घरी राहिला होता ते?

तेजस – हो? मग?

मुग्धा- मग काही नाही. तेजस आपल्या मैत्रीमुळे माझ्या मनात सतत एक गिल्ट असतो. खरं तर तसं वाटायची काहीच गरज नाहीये. आपली मैत्री मैत्रीच्या परिघातच आहे. पण तेजस मी प्रशांतवर खूप खूप प्रेम केलं आणि अजूनही करते. त्याच्या शिवाय दुसर्या कोणत्याही पुरुषाला माझ्या आयुष्यात, मनात किंवा विचारात स्थान नव्हतं आणि नसेल.

तेजस- ग्रेट. मग प्रॉब्लेम काय आहे?

मुग्धा- खरच मलाही माहित नाहीये की प्रॉब्लेम काय आहे. पण तुम्हाला भेटल्यावर मला उगाच गिल्टी वाटतं. मी प्रशांतशी प्रतारणा करते आहे असं वाटतं.

तेजस- what? आणि ते का बरं वाटतं?

मुग्धा- मी म्हणाले ना की माझं मलाच कळत नाहीये म्हणून? मी काय करू सांगा. आणि आता तर आपण रोज भेटणार?

तेजस- हे बघ मुग्धा. तू ऑफिसचं बोलत असशील तर मला वाटत नाही तो प्रॉब्लेम एरिया आहे. कारण as i told you आपण ऑफिसात फक्त कलीग्स आहोत आणि असू. बाकी मित्र म्हणून भेटताना तू हे विचार मनात आणूच नको. आणि आता तू मला हे सांगितलं आहेस ना? मग मी पण काळजी घेईन आपण भेटल्यावर तुझ्या मनात असे विचार येऊ नयेत ह्यासाठी तुला खुश ठेवायची. ओके?

मुग्धा- ओके. आणि thanks मला समजून घेतल्याबद्दल. खूप मोठं ओझं उतरलं माझ्या मनावरचं.

तेजस- बर मग आता पोटासाठी काहीतरी ओझं मागवूया का?

मुग्धा- (हसून) हो. मी विसरलेच बोलण्याच्या नादात.

तेजसने जेवणाची ऑर्डर दिली. जेवताना दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. रोहित एक बियर सबंध वेळ सिप करत त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. तेजसला मुग्धाचा प्रामाणिकपणा, तिचा innocense आवडला होता. जेवण झाल्यावर डेझर्ट ऑर्डर केल्यावर तेजस मुग्धाला म्हणाला-

तेजस- मुग्धा एक सांगू? एकदम frank ओपिनियन?

मुग्धा- सांगा ना.

तेजस- मुग्धा तू म्हणजे जगात खूप rare असलेलं स्त्रीच एक अफलातून कॉम्बिनेशन आहेस.

मुग्धा- म्हणजे?

तेजस- म्हणजे normally सुंदर आणि सेक्सी बायका तुझ्या इतक्या इनोसंट नसतात आणि तुझ्या इतक्या इनोसंट बायका फार सेक्सी नसतात. तू म्हणजे ह्या दोन टोकांच कॉम्बो आहेस. सेक्सी इनोसंट बाई. खल्लास.

मुग्धा- (लाजून) शी. काहीही बोलता तुम्ही.

तेजस- अग खरंच. लकी आहे तुझा प्रशांत की त्याला इतकी सॉलिड कॉम्बो वाली लॉयल बायको मिळाली.

मुग्धा- हो. अनलकी मी आहे की प्रशांत माझ्या आयुश्यातून इतक्या लवकर गेला.

मुग्धा थोडी भावून झाली. तेजस आपला हात तिच्या हातावर ठेऊन तिचा हात थोपटू लागला. तेवढ्यात त्या रेस्तोरंत मध्ये आर्या तिच्या दोन फ्रेंड्स बरोबर आली. तिने तेजस आणि मुग्धाला बघितलं. तिला प्रचंड आश्चर्य वाटलं. ती फ्रेंडस ना आलेच सांगून ह्या दोघांच्या टेबल जवळ आली.

आर्या- हाय तेजस? महत्वाची मिटिंग लवकर संपली की हीच ती महत्वाची मिटिंग आहे?

तिला आलेली बघून तेजसने मुग्धाचा हात सोडला.

तेजस- आर्या तू? इथे?

आर्या- अरे सांगायचं ना मला डेट वर जातो आहेस ते. आणि ही कोण? wait…I think मी हिला पाहिलं आहे आधी. wait let me remember….yes….तुमच्या ऑफिसातली new recruit. पहिल्याच दिवशी आजारी पडली ती मुलगी. right?

हे ऐकून मुग्धा घाबरली.

आर्या- ओह…सो तेजस you are dating the new recruit? wow. एन्जोय.

तेजस- हे बघ आर्या तू समजते आहेस तास काही नाहीये. आम्ही दोघे फक्त चांगले फ्रेंड्स आहोत.

आर्या- हो ते बघितलं मी. candle light डिनर, हातात हात, नजरेत नजर आणि just good friends. पण no worries. मला काहीच प्रोब्लेम नाहीये. have fun. मी फक्त हाय म्हणायला आले. बाय.

इतकं बोलून आर्या निघून गेली. मुग्धा भीतीने थरथरत होती.

तेजस- मुग्धा इतकी काय घाबरतेस? dont worry. मी आहे ना?

मुग्धा- तेजस आपण प्लीज घरी जाऊया का?

तेजस- अग पण…

मुग्धा- तेजस प्लीज…

तेजसने बिल मागवलं. बिल पे करून दोघे निघाले. रोहित बघत होता. गाडीतून घरी जाताना मुग्धा एक शब्दही बोलत नव्हती. तेजस पण तिला समजवयच्या मूड मध्ये नव्हता. त्याने मुग्धाला बिल्डींगच्या गेट जवळ सोडली. मुग्धा मागे न बघता निघून गेली. तेजस रिकाम्या रस्त्यावर सावकाश गाडी चालवत आज मुग्धा जे काही बोलली त्याचा अर्थ लावत  घरी निघाला. इथे रेस्तोरांत मध्ये आर्या फ्रेंड्स बरोबर गप्पा मारत एन्जोय करत होती. अचानक तिच्या खांद्यावर एक हात पडला. तिने वळून पाहिलं. समोर रोहित होता. ती त्याला बघून कन्फ्युज झाली.

आर्या- excuse me…मी तुम्हाला ओळखते?

रोहित- नाही आर्या. पण मी तुला ओळखतो. मी रोहित.

रोहितने shake hand साठी पुढे केलेल्या हातात आर्याने आपला हात दिला. तिचा मऊ हात हातात घेतल्यावर रोहितच्या अंगातून एक शिरशिरी उमटली. आर्या त्याच्या डोळ्यात कन्फ्युज होऊन बघत होती. रात्र हळू हळू गहिरी होत होती.

क्रमश:

© मंदार जोग

गुंतता हृदय…. (भाग २०)

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!