hands forming a heart shape with sunset silhouette. Copy space text.

……. राधिका टेरेसवर आली. तिने तेजसचा नंबर फिरवला. मुग्धाच्या टेबलपासून काही अंतरावर असलेल्या तेजसचा फोन वाजला. त्याने घाईत फोन कट केला आणि तो खांबामागे लपला. तेजसने फोन का कट केला ह्या विचारात राधिका परत निघाली. इथे समोर दिसत असलेल्या मुग्धाकडे बघून आर्याने एक छान स्माईल दिलं. मुग्धाही तिच्याकडे बघून हसली. खांबामागे लपलेल्या तेजसला कळत नव्हतं की आता काय करायचं. इतक्यात राधिका परत आली. मुग्धा एकटीच बसली होती. तिला तेजस अचानक कुठे आणि का गुल झाला हे कळत नव्हत. राधिका येऊन अर्यासमोर बसली. मुग्धा तिच्याकडे बघून कसनुस हसली. तेजस हळूच बाहेर गेला आणि त्याने मुग्धाला मेसेज केला “हॉटेलातून बाहेर ये. आपण दुसरीकडे जाऊ. मी वाट बघतोय.” तो मेसेज वाचून मुग्धा निघाली. तिला जाताना बघून राधिकाने विचारलं-

राधिका- काय ग मुग्धा निघालीस का?

मुग्धा- हो….माझ्या फ्रेंड ने बाहेर बोलावलं आहे.

इतक बोलून मुग्धा निघाली. घाईत तिची पर्स तिथेच राहिली. मुग्धा बाहेर आली. तेजस अस्वस्थ होऊन व्हाले मधून गाडी यायची वाट बघत होता. मुग्धा आल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

तेजस- बर झालं तू लगेच आलीस ते. आपण दुसऱ्या हॉटेलात जाऊया.

मुग्धा- का? इथे काय वाईट आहे?

तेजस- मला इथला ambience नाही आवडला.

मुग्धाला ते फार पटल नाही. पण ती काही न बोलता गाडीची वाट बघत उभी राहिली.तेजसची चलबिचल तिच्या नजरेतून सुटली नाही. इथे आत मुग्धाची राहिलेली पर्स राधिकाला दिसली. राधिका पर्स घेऊन मुग्धाला द्यायला घाईत निघाली. इथे बाहेर व्हाले गाडी घेऊन आला. त्याने दार उघडून तेजसला बसायला जागा करून दिली. तेजसने पाचशेची नोट त्याच्या हातात कोंबली. त्याने अदबीने दार लावले आणि तो मुग्धसाठी दार उघडायला दुसऱ्या बाजूला येऊ लागला. त्याच वेळी हॉटेलच्या भव्य दारातून बाहेर येणारी राधिका तेजसला दिसली. त्याने panic होत गाडी सुरु करून तिथून पळ काढला. त्याला गेलेला बघून मुग्धा प्रचंड शॉक झाली. तिला तेजस अस का वागतोय हेच कळत नव्हत. इतक्यात राधिका तिथे आली.

राधिका- हाय मुग्धा.

मुग्धा- (आश्चर्याने) हाय…तुम्ही?

राधिका- अग ही तुझी पर्स तू आत विसरून आली होतीस. ती द्यायला आले.

मुग्धा- ओह thanks.

राधिका- काय झालं? मैत्रीण कुठे आहे तुझी?

मुग्धा- म…मैत्रीण? हो मैत्रीण…ती येते आहे. गाडी घेऊन येते आहे.

राधिका- ओके. मी जाऊ की थांबू?

मुग्धा- तू…तुम्ही जा….येईलच ती इतक्यात….

राधिका परत गेली आणि मुग्धाला तेजसचा फोन आला.

तेजस- हाय….i am so sorry मुग्धा….

मुग्धा- काय झालं? तुम्ही असे पळताय का? काय प्रोब्लेम आहे?

तेजस- सांगतो. तू एक काम कर. चालत बाहेर ये आणि रस्ता क्रॉस कर. मी तुला पिकप करतो.

मुग्धा कन्फ्युज्ड होऊन निघाली.

इथे आत राधिका आणि आर्या वाईन सिप करत बोलत होत्या.

राधिका- हे अस किती दिवस जगणार आहेस तू?

आर्या- अस म्हणजे?

राधिका- हेच अस एकटीने किती दिवस जगणार आहेस तू?

आर्या- मी एकटी कुठाय? आई वडील आहेत, तू आहेस, फ्रेंड्स आहेत, क्लाएन्त आहेत. अजून काय पाहिजे?

राधिका- आर्या तुला माहित्येय मी कशाबद्दल बोलते आहे ते.

आर्या- मावशी मग तुलाही माझं उत्तर माहित आहे. तू कशाला तोच विषय काढतेस? त्या पेक्षा आपण माझ्या नव्या क्रिएशन बद्दल बोलू, नाहीतर मुवीज बद्दल बोलू, नाहीतर मस्त bitching करू नाहीतर सेक्स बद्दल बोलू. तू तुझ्या टिप्स दे मला.

राधिका- तुला काय करायच्या आहेत सेक्सच्या टिप्स?

आर्या- I may be unmarried but it doesn’t mean that I cannot or do not have sex मावशी. Sex is my physical need and not an emotional dependence.

राधिका- एक दिवस फसशील ह्यात. त्या पेक्षा लग्न करून टाक.

आर्या- मावशी हल्ली लग्नाआधी सगळेच सेक्स करतात. फरक इतकाच आहे की मी सांगते आणि लोक सांगत नाहीत…..

तेजस शांतपणे गाडी चालवत होता. आर्या त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. गाडी हळू हळू शहराची हद्द सोडून हायवेला लागली. गाडीच्या वरच्या सन रूफ मधून आजचा पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. मुग्धाने नजर रस्त्यावर वळवली. आता तेजस हळूच तिच्याकडे बघू लागला. चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा प्रचंड आकर्षक दिसत होता. इतका की गाडी बाजूला थांबवून तिचा जोरात कीस घ्यावा हा विचार तेजसला अस्वस्थ करू लागला. त्याने मनावर ताबा मिळवत रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. मुग्धाला कळत नव्हत की ते कुठे जात आहेत. तेजस देखील रस्ता जाईल त्या दिशेने गाडी चालवत होता. दोघांनाही तो दिशाहीन प्रवास आवडू लागला होता. आकाशात चंद्र आणि गाडीत शांतता होती.

इथे हॉटेलात राधिका आर्याला म्हणाली-

राधिका- पण तुला लग्न का नाही करायचं?

आर्या- मला handle करू शकेल असा माझ्याहून सटकलेला माणूस मला अजून भेटला नाहीये. मी सामान्य माणसाशी लग्न केलं तर मी त्याला एका महिन्यात सोडून देईन. मावशी माझी भूक मोठी आहे. मानसिक, आर्थिक आणि शारीरिक देखील. मला पुरा पडेल असा पुरुष मला भेटला की मी लग्न करेन नक्की.

राधिका- आणि असा एखादा पुरुष मी तुला दिला तर?

आर्या- तर मी आमच्या हनिमूनचा व्हिडीओ काढून तुला thank note बरोबर पाठवून देईन.

राधिका- तू कम्प्लीट वेडी आहेस आर्या.

आर्या- माहित आहे ना? मग कशाला लग्न लावतेस माझं?

राधिकाने शांतपणे तेजसचे काही फोटो पर्स मधून काढून आर्याच्या समोर ठेवले. ते पाहून अर्याच्या तोंडून नकळत शिट्टी बाहेर पडली.

आर्या- he is hot….

राधिका- and he is rich too. तुला सर्वार्थाने पुरा पडेल.

आर्या- (फोटोवरची नजर न हटवता) कोण आहे हा?

राधिका- ह्याच नाव तेजस. तेजस दांडेकर. दांडेकर इंडस्ट्रीचा एकुलता एक वारस.

आर्या- you mean तुझा बॉस?

राधिका- येस आर्या.

आर्या- मग त्याला इतके दिवस कुठे लपवून ठेवला होतास?

राधिका- आवडला ना?

आर्या- येस. Worth looking at.

राधिका- मग उद्या ये ऑफिसला. मी ओळख करून देते.

आर्या- कूल. मावशी तुला एक वाईन माझ्यातर्फे.

राधिका हे ऐकून खुश होती.

तेजसने गाडी एका मोकळ्या पठारावर थांबवली होती. तो खाली उतरला. हवेत प्रचंड गारवा होता. तो गाडीला टेकून उभा राहिला. त्याने अंग मोकळे करायला आळस दिला. मुग्धा पण गाडीतून बाहेर आली. थंड हवेने तिच्या अंगावर काटा आला. ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली.

मुग्धा- इथे आहे का डिनर?

तेजस- (हसून) सॉरी मी डिनर प्लानची वाट लावली.

मुग्धा- का?  काय झालं अचानक की तुम्ही तिथून पळ काढलात?

तेजस- मला कंटाळा आला अचानक. आणि मी निघालो. sorry about that…

मुग्धा- ठीक आहे. पण आता जेवणाचं काय? मी घरी जाऊन काहीतरी करून खाईन पण तुमचं काय?

तेजस- मला काही नको. ही वातावरण बघूनच माझं मन आणि पोट भरलंय. तुला इथे अश्या ठिकाणी, अश्या वेळी ओक्वर्द वाटत नाहीये ना?

मुग्धा- खर तर खूप ओक्वर्द वाटतंय. पण इलाज नाहीये.

तेजस- ओह…मग आपण लगेच निघुया.

मुग्धा- त्याची गरज नाहीये. ओक्वर्द म्हणजे भीती नाही तेजस. मला तुमच्याबरोबर भीती अजिबात वाटत नाही. थांबूया आपण इथे. खूप शांत वाटतंय मलाही आज अनेक दिवसांनी. सगळी माणस, तो कोलाहल, जबाबदाऱ्या ह्यापासून लांब हि शांतता मला आवडते आहे. उद्यापासून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे मी.

तेजस- कोणता प्रवास?

मुग्धा- उद्यापासून मी नोकरी जॉईन करणार आहे. दांडेकर इंडस्ट्री मध्ये.

तेजस- (आश्चर्याने) तू…तू उद्यापासून जॉईन करणार आहेस? मला कस माहित नाही?

मुग्धा- तुम्हाला मी बोललेच नाही तर कसं माहिती असेल?

तेजस- (सावरून घेत) अरे हो…तू मला बोललीच नाहीस ना.

तेजस चालत आणखी पुढे गेला. हवेतला गारवा आता बोचरा झाला होता. मुग्धा थंडीने कापू लागली. तेजसच्या ते लक्षात आल्यावर त्याने गाडीत hanger ला लावलेला त्याचा ब्लेझर काढून तिच्या अंगावर घातला. तो ब्लेझर घालत असताना झालेल्या त्याच्या स्पर्शाने मुग्धा रोमांचित झाली. त्या ब्लेझरची कॉलर नीट करताना जाणवलेल्या मुग्धाच्या त्याच परफ्युमच्या वासाने तेजसने दोन क्षण डोळे बंद करून घेतले. तिच्या मानेवर टेकायला अधीर झालेल्या ओठांना काबूत आणत तो क्षणार्धात तिच्यापासून लांब गेला. तरी मुग्धाला त्याच्या उष्ण श्वास त्या थंडीत तिच्या मानेजवळ जाणवला. काही मिनिट अशीच गेल्यावर अचानक तेजस म्हणाला-

तेजस- चल निघूया. उद्या तुला ऑफिस आहे ना? शार्प साडेनऊला पोहोचावं लागेल.

मुग्धा- (आश्चर्याने) तुम्हाला काय माहित तिथलं टायमिंग?

तेजस- (सावरून घेत) अग म्हणजे सगळी ऑफिस नॉर्मली साडे नऊ किंवा दहालाच सुरु होतात ना? म्हणून म्हणालो.

दोघे गाडीत बसले. गाडी शहराकडे परत निघाली. गाडीत दोघेही काहीच बोलत नव्हते. पण गाडीत एक प्रचंड आकर्षण दोघांनाही जाणवत होते. हा प्रवास असाच सुरु राहिला तर आपला तोल जाईल ही भीती तेजसला वाटत होती. त्याने गाडीचा वेग वाढवला. बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीजच ते प्रचंड ताकदवान इंजिन रस्त्याला झपझप मागे टाकत पळत होत. गाडी मुग्धाच्या बिल्डींग जवळ आली. मुग्धा तशीच बसली होती. तेजसने तिच्या दंडाला स्पर्श करून घर आल्याच सांगितलं. संपू नये असा प्रवास संपल्याची तिला जाणीव झाली. मुग्धा उतरली. तेजस तिला बाय म्हणून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी तेजस त्याच्या केबिन मध्ये बसला होता. रिसेप्शन वर असलेल्या कॅमेरावर त्याची नजर होती. मुग्धा ऑफिसात यायची तो वाट बघत होता. बरोब्बर साडे नऊला मुग्धा रिसेप्शन वर आली. तेजसचा प्लान रेडी होता. तो घाईत उठला आणि निघाला. त्याने केबिनचा दरवाजा उघडला आणि तो समोरून आत येत असलेल्या आर्यावर जोरात आपटला. त्याच्या धक्क्याने पडत असलेल्या आर्याला त्याने सावरली. त्याच्या मजबूत बाहूत असलेल्या आर्याच्या मनात  तेजस आरपार घुसला होता. एकमेकांकडे बघत असलेल्या तेजस आणि अर्याला पाहून अर्याबरोबर आलेली राधिका खुश होऊन हसत होती. इथे रिसेप्शन वर मुग्धाची रवानगी induction साठी एका कॉन्फरन्स रूम मध्ये झाली होती.

© मंदार जोगगुंतता हृदय….(भाग १५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!