गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

……… तेजस त्याचा टी शर्ट नीट करत गाडीतून बाहेर पडला आणि त्याने मुग्धाचा फोन घेतला.

तेजस- बोल मुग्धा. इतक्या रात्री फोन? all okay?

मुग्धा- (जोरजोरात रडत) नाही तेजस. काही okay नाहीये. मला झोप येत नाहीये. वेळ लागायची पाळी आली आहे. तुम्ही मला मोहिनी का म्हणालात ते सांगा? हे नाव तुम्हाला कसं कळल सांगा. प्लीज सांगा तेजस…मी तुमच्या पाया पडते.

मुग्धा फोनवर ढसाढसा रडत होती. तेजसला काय करायचं कळत नव्हतं. गाडीतून बाहेर आलेल्या आर्याने एक सिगारेट शिलगावली होती. रात्र गडद झाली होती. आकाशात चंद्र हसत होता.

तेजस- मुग्धा तू प्लीज रडू नको. हे बघ ऐक माझं. मला माहित देखील नाहीये की मी तुला काही वेगळ्या नावाने हाक मारली. आणि त्याचा तुला इतका राग आला सेल, इतका त्रास झाला असेल तर look I am sorry okay?

आर्या हे सर्व ऐकत होती.

मुग्धा- नाही तेजस मला राग नाही आलेला मला शॉक बसलाय.

तेअज्स- कसला शॉक मुग्धा?

मुग्धा- तेजस मला मोहिनी ह्या नावाने फक्त प्रशांत हाक मारत असे. ते पण फक्त आमच्या दोघांच्या अश्या खूप intimate क्षणात. आणि आज तुम्ही….

तेजसला ते ऐकून धक्का बसला.

तेजस- ओह…पण मुग्धा मी खरच मुद्दाम तुला तसं काही बोललो नाही. In fact like I said मला आठवत पण नाहीये मी तुला तश्या नावाने हाक मारल्याच. माझ ऐकशील जरा? प्लीज?

मुग्धा- हम्म…

तेजस- तू आता शांत झोप. आपण उद्या ऑफिस मध्ये बोलू ओके?

मुग्धा- हम्म…आणि तेजस मला माफ करा. मी इतक्या रात्री तुम्हाला फोन करू हे सर्व बोलले.

तेजस- मुग्धा….इट्स ओके. आपण मित्र आहोत ना? झोप आता ओके? ठेऊ फोन?

मुग्धा- हम्म…

तेजसने फोन कट केला.

आर्या- ती प्रेमात आहे का तुझ्या?

हे ऐकून तेजस गर्रकन वळला.

तेजस- क…काय म्हणालीस तू?

आर्या- तेच जे तू ऐकलंस. Is that woman in love with you?

तेजस- Oh come on आर्या. काहीही काय?

आर्या- मग तिचं इतक्या रात्री फोन आणि तुझं हे गुडी गुडी बॉय फ्रेंड सारखं समजावण  ह्याचा अर्थ काय काढायचा तेजस?

तेजस- तू काय झालं ते तर ऐक. ती म्हणते आहे की मी तिला मोहिनी नावाने हाक मारली. तिचा नवरा म्हणे त्यांच्या intimate क्षणात तिला मोहिनी म्हणायचा. Now how the f#@k would I know that? मी तिला त्या नावाने हाक का मारेन? In fact माझी त्या नावाची कोणी मैत्रीण पण नाहीये. सो ती जरा अपसेट आहे. बाकी काही नाही. प्रेम कसलं आलंय ह्यात. ती काही प्रेमात वगैरे नाहीये.

आर्या- मग तू आहेस का तिच्या प्रेमात?

तेजस ने अर्याकडे आश्चर्याने बघितलं. आर्या सिगरेटचा धूर नाकातून सोडत त्याच्याकडे रोखून बघत होती. तेजसने नजर चोरली आणि म्हणाला-

तेजस- हे काय सुरु केलं आहेस तू प्रेम वगैरे? ती माझ्या मित्राची विडो आहे and thats it.

आर्या- हो? नक्की?

तेजस- नक्की.

आर्या- तेजस मला हे ऐकून काय वाटत माहित्येय?

तेजस- काय?

आर्या- ती मुग्धा तुझ्यात तिचा नवरा शोधते. म्हणून तिला असे भास होतात किंवा ते झाल्याचं ती तुला सांगते.

तेजस- काहीही काय आर्या?

आर्या- ते तसचं आहे तेजस. एक खूप गमतीदार इक्वेशन निर्माण झालंय.

तेजस- कसलं इक्वेशन?

आर्या- तुला मुग्धा हवी आहे. पण तू मान्य करत नाहीयेस. मुग्धाला तुझ्यात तिचा नवरा हवाय पण तिला ते कळत नाहीये. आणि मला हे दोन्ही कळत असूनही  मला तू हवा आहेस आणि मी ते मान्य पण करते आहे.

हे ऐकून तेजसने अविश्वासाने तिच्याकडे बघितलं.

आर्या- हो तेजस. आपण तिघेही वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन एकतर्फी प्रेम किंवा आकर्षणात आहोत. खूप interesting इक्वेशन आहे हे. ह्यात एकतर तू आणि मुग्धा एकत्र याल किंवा मी आणि तू. निर्णय तुला घ्यायचा आहे. बाकी तू घेशील तो निर्णय मला मान्य असेल. मुग्धाला तुझं प्रेम देऊन फक्त तू माझा झालास तरी तू मला हवा आहेस.

तेजस- हे…हे काय बोलते आहेस तू आर्या?

आर्या चालत त्याच्या जवळ आली. म्हणाली तेजस तुला कल्पना नाहीये तू मला किती आवडला आहेस ह्याची. मला तू हवा आहेस. तुझ्या प्रेमासकट किंवा प्रेमाशिवाय. असं म्हणून आर्याने तेजसचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि आपले ओठ त्याच्या ओठात गुंफले. काही क्षण गाडीच बॉनेट दोन्ही हातांनी घट्ट धरून असलेल्या तेजसचा ताबा सुटला. त्याच्या हातांची घट्ट पकड अर्याला तिच्या पाठीवर जाणवली. दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. अर्याच्या मानेला हलका चावा घेत तेजस म्हणाला-

तेजस- I  love you मोहिनी…..

ते ऐकून आर्याच्या  अंगावर सर्रकन काटा आला. त्याच्या अंगावरची तिची पकड क्षणात सैल झाली. ती लांब झाली. म्हणाली-

आर्या- तेजस…तू…तू काय म्हणालास?

तेजस- काय?

आर्या- तू म्हणालास मोहिनी आय लव्ह यु. मी माझ्या कानांनी ऐकलं. हे…हे काय आहे तेजस? त्या मुग्धाचा नवरा तिला intimate क्षणी ज्या नावाने हाक मारायचा त्या नावाने तू मला का हाक मारतो आहेस?

तेजस- (घाबरून) म…मला खरच माहित नाही आर्या. मला मी हे बोललो हे पण लक्षात नाहीये. प्लीज…समजून घे…

असं म्हणून तेजसने तिला परत मिठीत घेतली. आर्या म्हणाली-

आर्या- नको तेजस प्लीज. आपण निघूया…प्लीज….

दोघे गाडीत बसून निघाले. आर्याला आपल्या कानांनी जे ऐकलं ते खरं की भास हेच कळत नव्हतं. तेजस गाडी चालवत मोहिनी हे नाव त्याच्या तोंडी का आलं ह्याचा विचार करत होता.

दुसऱ्या दिवशी मुग्धा ऑफिसला जायला तयार होत होती. आरशात बघताना तिला तेजसने तिला मोहिनी म्हटल्याचं आठवलं. तिच्या अंगावर उगाच एक शिरशिरी आली. आरशात तिला अंगावर फुललेले रोमांच दिसले. तिला डोळ्यासमोर तेजस दिसत होता आणि मोहिनी ह्या हाकेचा आवाज मात्र प्रशांतचा होता. तिच्याही नकळत ती आज खूप छान नटली. ऑफिसला जायला म्हणून तिने दरवाजा उघडला तर दारात रोहित उभा होता. त्याला बघून मुग्धा वैतागली.

रोहित- हाय मुग्धा. मला विसरलेली दिसतेस श्रीमंत मित्राच्या उबेत.

मुग्धा- रोहित तोंड सांभाळून बोल.

रोहित- मी तोंड सांभाळायच आणि तू कुठेही तोंड घालायचं ते चालतं का?

मुग्धा- शी. किती चीप आहेस तू. तू परत इथे येऊ नको.

रोहित- हो आता काय श्रीमंत झाड मिळालं आहे तुला. हवी तितकी गोड फळ मिळतात. फक्त झाडाच्या मुळाला मनसोक्त खतपाणी घातलं की झालं.

मुग्धा- enough रोहित. मी कोणाला भेटते, काय करते ह्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये.

रोहित- मग ठेव ना संबंध. मी तेच तर सांगतोय. मी पण खर्च करेन थोडाफार. तुझ्या बागेत अजून एक झाड रुजव. फळ मिळतीलच.

हे ऐकून मुग्धाने त्याच्या सणसणीत कानफटात मारली. रोहित भेलकांडला. मग उभा रहात त्याने मुग्धाला घरात ढकलली आणि दार लावून घेतलं. तिच्या केसांना धरून त्याने तिचा एक हात पिरगळला. मुग्धा कळवळली-

रोहित- ए मुग्धा…मला पाहिजे ना तर आत्ता, ह्या क्षणी, इथे तुझ्या घरात तुला नासवू शकतो मी. बघायचं आहे?

मुग्धाने दुसर्या हाताने त्याच्या हनुवटीवर प्रहार केला आणि स्वतःची सुटका करून घेतली. तिने हातात आलेली छत्री उचलली आणि म्हणाली-

मुग्धा- रोहित तू इथून गेला नाहीस तर मी ह्या छत्रीने मारेन तुला.

रोहीच्या डोळ्यात आता अंगार आणि वासना फुलली होती.

रोहित- मार…मार मला. पण मी मेलो नाही ना आत्ता तर तू मात्र सुटणार नाहीस. किती वर्ष नजर आहे माझी तुझ्यावर. प्रशांत गेल्यावर वाटलं होतं आता माझा नंबर लागेल. पण तू पैसेवाला गाठलास. ये ना ये. मार मला.

मुग्धाने त्याला मारायला छत्री वर केल्यावर रोहितने तिच्या पोटात जोरात लाथ मारली. मुग्धा कळवळून भेलाकाटत भिंतीवर जाऊन आदळली. तिच्या हातातली छत्री उडाली. ती दुखरं पोट हातानी दाबून गुरासारखी रडू लागली. ते पाहून रोहितच्या मनात सैतान संचारला. त्याने आपला शर्ट काढला. आपली pant काढली. आणि तो तिच्या जवळ येऊ लागला. मुग्धा आपलं दुखरं पोट दाबून त्याला येताना अगतिकपणे बघत होती. रोहित तिच्या अगदी जवळ आला. त्याने तिच्या ओढणीला हात घातला आणि कुठून कशी माहित नाही पण मुग्धाच्या अंगात एकदम ताकद आली आणि तिने अचानक उठून आपल्या उजव्या गुढग्याने बेसावध रोहितच्या दोन मांड्यांच्या मध्ये जोरात प्रहार केला. रोहित कळवळत खाली पडला. मुग्धाच्या डोळ्यात अंगार पेटला होता. ती म्हणाली-

मुग्धा- ए हरामखोरा  प्रेमाने वागणाऱ्या, आदर करणाऱ्या पुरुषाला बाई आपलं सर्वस्व आनंदाने समर्पित करते. पण तुझ्यासारख्या लांडग्यांना त्यांची जागा दाखवते. ह्यापुढे माझ्या वाटेला गेलास ना तर आज जिथे लाथ मारली आहे तिथे सुरा चालवीन. लक्षात ठेव. चल निघ आता.

रोहितने अवघड जागी झालेली दुखापत कशी बशी सहन करत, कळवळत जेमतेम कपडे घातले आणि तो निघून गेला. तो गेल्यावर मुग्धाने तोंड धुतलं. ड्रेस बदलला. हलकासा मेकप केला आणि ती ऑफिसला निघाली.

तेजस त्याच्या केबिन मध्ये बसला होता. समोर असलेल्या रायटिंग pad वर त्याने मोहिनी हे नाव किमान पन्नास वेळा लिहिलं होतं. त्याला त्या नावाचं कोडं पडलं होतं. त्याला मुग्धा फोनवर काय बोलली ते आणि त्या नंतरचा आर्या बरोबरचा प्रसंग आठवत होते. त्याच आज कामात लक्ष लागत नव्हतं. इतक्यात त्याला रिसेप्शनच्या कॅमेरा मधून मुग्धा आलेली दिसली. मुग्धा डेस्कवर बसली आणि तिचा डेस्क फोन खणाणला.

मुग्धा- हेलो…

मोहित- हाय. आलीस ऑफिसला?

मुग्धा- हो…just आले.

मोहित- केबिन मध्ये येशील?

मुग्धा- नंतर बोलूया का? आता बर वाटत नाहीये.

तेजस- (काळजीने) का काय झालंय? थांब मी येतो तिथे.

मुग्धा- न…नको…मी येते. थांबा.

मुग्धा फोन ठेऊन निघाली. तेजसच्या केबिन मध्ये पोहोचली. तेजसने तिला बसायला सांगितलं. ती बसली.

तेजस- मुग्धा काल रात्री मी तुला म्हणालो ना आपण ऑफिस मध्ये बोलूया म्हणून? सो मी तुला बोलावलं आहे. before we start, मला सांग काय घेणार तू? चहा की कॉफी?

 मुग्धा- खरच काही नको.

तेजस- जेव्हा काही नको असतं तेव्हा कॉफी मागवायची. हे कोण म्हणालं आहे माहित्येय?

मुग्धा- नाही.

तेजस- स्वामी तेजसानंद.

तेजस त्याच्या जोकवर हसला. मुग्धा शून्यात बघत होती. तेजसने फोन करून दोन कॉफी मागवल्या. मग मुग्धाला म्हणाला-

तेजस- हे बघ मुग्धा मी मान्य करतो की काल माझ्या तोंडून मोहिनी हे नाव निघालं असेल ओके. I admit. पण ते का आणि कसं आलं ते मला खरचं माहित नाही. ह्या नावाची माझी कोणी मैत्रीण पण नाहीये. सो….

मुग्धा काही न बोलता बसून होती.

तेजस- आता नेमका त्याच नावाने प्रशांत तुला हाक मारायचा तुमच्या intimate क्षणी हा योगायोग असू शकतो ना? सो तू ह्यावर फार विचार करू नको ओके?

मुग्धा शांत बसून होती. इतक्यात कॉफी आली. तेजसने कॉफीचा एक कप मुग्धाच्या पुढ्यात सरकवला.

तेजस- मुग्धा माझा राग कॉफीवर नको काढू आणि मुळात माझ्यावर पण नको रागावू कारण as i said मी तुला मोहिनी मुद्दाम नाही म्हणालेलो and you know that. आता मस्त कॉफी पी की बर वाटेल तुला. मग मस्त हास आणि कामाला जा ओके?

मुग्धा अजूनही शून्यात बघत होती. ते पाहून तेजस तिच्या जवळ आला आणि त्याने तिचा दंड धरला. म्हणाला-

तेजस- आता कॉफी पिणार की मी पाजू माझ्या हातांनी?

मुग्धा अचानक उठली. तिच्या दंडावरचा त्याचा हात झिडकारून रागाने थरथरत उभी राहिली आणी म्हणाली-

मुग्धा- काय करणार तुम्ही? जबरदस्ती करणार ना माझ्यावर? करा. घ्या ना. करा जबरदस्ती. घ्या सगळ ओरबाडून एकदाचं. मग समाधान मिळेल ना तुम्हाला? घ्या ना घ्या.

अस म्हणून तिने आपली ओढणी खेचून बाजूला टाकली आणि तेजस समोर उभी राहिली. तिचं हे अनपेक्षित वागणं आणि अवतार पाहून तेजस घाबरला. तिच्याकडे घाबरून बघू लागला. त्याला बघताना पाहून मुग्धा म्हणाली-

मुग्धा- बघताय काय? फडा ना माझा ड्रेस? की मी फाडू तो पण? म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होईल माझे लचके तोडणं. थांबा. मीच फाडते.

असं म्हणून मुग्धाने स्वतःचा ड्रेस फाडायला ड्रेसच्या गळ्याला हात घातला आणि तिच्या गालावर तेजसच्या राकट हाताची एक चपराक बसली. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. तिने खुर्चीचा आधार घेतला आणि ती उन्मळून खुर्चीत बसली.

तेजस- (प्रचंड संतापाने) काय समजतेस तू स्वतःला आणि मला? मी काय तुझ्या शरीराचा भुकेला आहे? कधी मी तुला असं भासू दिलं ते तरी सांग. मान्य मी चुकून तुला मोहिनी नावाने हाक मारली. मान्य त्यामुळे तू डिस्टर्ब आहेस. सगळं मान्य. पण हे काय आहे? मी कशाला तुला ओरबडेन? मी असं केलंय काय की तू आज माझ्याशी असं वागलीस मुग्धा? तुला सांगावच लागेल.

मुग्धा चेयर मध्ये बसून ढसा ढसा रडत होती. तेजसला काय करायचं सुचत नव्हतं. त्याने टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास तिच्या पुढे केला. मुग्धाने पाणी प्यायल. तेजस जाऊन केबिनच्या काचेतून दिसणारी स्काय लाईन बघू लागला. मुग्धा थोडी सावरली. चालत तेजसच्या मागे आली. म्हणाली-

मुग्धा- तेजस मला माफ करा. प्लीज….हवं तर मला नोकरी वरून काढून टाका. मी जे बोलले ते तुम्हाला नव्हतं. पण तुम्ही कॉफी द्यायला माझा दंड धरलात आणि मला आज सकाळचा प्रसंग आठवला.

तेजस- (मागे वळून आश्चर्याने) सकाळचा प्रसंग? कोणता?

मुग्धाने रडत रडत तेजसला आज रोहितने काय केलं ते कथन केलं. ते ऐकत असताना तेजसच्या कपाळावरची शीर ताड ताड उडत होती. मुग्धाच सांगून झाल्यावर तेजस आपल्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला-

तेजस- कुठे राहतो हा माणूस?

मुग्धा- जाऊ दे तेजस. मी त्याला शिक्षा दिली आहे. तो परत माझ्या वाटेला जाणार नाही.

तेजस- (खूप कडक आवाजात) मुग्धा मला रोहितचा पत्ता हवा आहे.

त्या आवाजातली जरब ऐकून मुग्धानेघाबरत  रोहितचा पत्ता त्याला सांगितला.  तेजसने मोबाईल वरून एक फोन लावला.

तेजस- जब्बार भाई…तेजस बोलतोय….एक पत्ता लिहून घ्या. नाव रोहित…flat नंबर…….हो….मी निघतो लगेच.

रोहित- चल मुग्धा.

मुग्धा- पण कुठे?

रोहित- चल मग कळेल.

तेजस निघाला. मागे मुग्धा निघाली. मुग्धा टेन्स होती. लिफ्टने दोघे खाली आले. ड्रायव्हरने गाडी पोर्च मध्ये आणली होती. तेजस गाडीत बसला. मुग्धा बाजूला बसली. गाडी निघाली.

मुग्धा- आपण कुठे जातोय तेजस? आणि जब्बार भाई कोण? ते रोहितला मारणार आहेत का? म्हणजे मारून टाकणार का?

तेजस- नाही. तो मेला तर सुटेल. अश्या लोकांना जिवंत ठेवायचे असतात आयुष्यभर रोज मरण्यासाठी. तू मजा बघ आता.

गाडीने वेग घेतला. मुग्धा प्रचंड घाबरलेली होती. गाडी एका मैदानाजवळ येऊन थांबली. काही मिनिटात तिथे एक जीप येऊन थांबली. त्यातून सहा माणस उतरली. त्यांनी हात मागे बांधलेल्या रोहितला जीप मधून उतरवला. तेजसने गाडीची काच थोडी खाली करून दोन हजारचबंडल हातात धरलं. त्यांच्यापैकी एक माणूस चालत आला आणि ते बंडल घेऊन त्याने तेजसला सलाम केला. तेजस म्हणाला-

तेजस- लेफ्ट और राईट.

माणूस सलाम करून गेला. हात मागे बांधलेल्या रोहितला त्या सहा जणांनी लाथांनी तुडवला. ते बघवत नसलेल्या मुग्धाने डोळे बंद करून घेतले. तेजन मात्र थंड डोळ्यांनी त्याचा आनंद घेत होता. रोहितला पाच मिनिट तुडवून झाल्यावर त्या लोकांनी त्याचा उजवा हात खांद्यापासून पिरगळून मोडला आणि डाव्या पायाच्या गुधाघ्यावर गाडीची दोन चाकं चाडवून गाडी निघून गेली. विव्हळत पडलेल्या रोहितला डोळे भरून बघून तेजस निघाला.

तेजस- मुग्धा एक काम करणार का?

मुग्धा- काय?

तेजस- मला एक कॉफी मिळेल का तुझ्या हातची? आता ऑफिसला जायचा मूड नाहीये.

मुग्धा- हो मिळेल. पण त्या रोहितला किती क्रूर पणे मारल्त्या लोकांनी.

तेजस- He deserved it. जो स्त्रियांना प्रेम आणि सन्मान देत नाही उलट तुझ्याशी जसा वागला तसा वागतो त्याला हीच शिक्षा योग्य आहे.

मुग्धातेजसकडे बघत होती. तिला ती हिमालया इतका उंच वाटतं होता.

तेजस- कॉफीच काय?

मुग्धा- चला. देते कॉफी. आणि तेजस thanks…

तेजसने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. मुग्धा लाजली. तेजसची गाडी तिच्या इमारतीच्या आवारात उभी राहिली. बाल्कनीत उभे असलेल्या डोम कावळ्यांची नजर त्यांच्यावर पडली. पण मुग्धाला आता भीती ऐवजी खूप सुरक्षित वाटत होतं. दोघे घरी आले. मुग्धाने त्याला पाणी दिलं आणि मग ती कॉफी करायला किचन मध्ये गेली. तेजस बाहेर बसून होता. तो अमेयची इतस्ततः पसरलेली खेळणी उचलून बघत होता. त्यांच्याशी खेळत होता. तेवढ्यात मुग्धा कॉफी घेऊन आली. तेजसच्या हातात तेव्हा नेमकी एक खेळण्यातली गाडी होती. ते पाहून मुग्धाला हसू आलं. ती खूप जोर जोरात हसू लागली. हसून झाल्यावर तिने कॉफीचा मग तेजसच्या हातात दिला आणि म्हणाली-

मुग्धा- सॉरी हा मी इतकी हसले. पण मी तुम्हाला नाही हसले. ती गाडी तुमच्या हातात बघून हसले.

तेजस- खूप छान दिसतेस तू हसताना मुग्धा. परत एकदा हास ना तशीच.

मुग्धा- असं कसं परत हसता येईल?

तेजस- येऊ शकतं.

मुग्धा- नाही.

तेजस- लागली पैज?

मुग्धा- लागली. दाखवा मला हसवून.

तेजस- बघ हा. मग माघार नाही चालणार.

मुग्धा- नाही घेणार. हसवा मला.सांगा काहीतरी सॉलिड जोक. मी नाही हसणार.

तेजसने त्याचा कॉफी मग बाजूला ठेवला. मुग्धाच्या हातातला मग बाजूला ठेवला. मुग्धाला आश्चर्य वाटलं. तेजस- मुग्धा तुला गुदगुल्या होतात का?

मुग्धाला गुदगुल्या शब्द ऐकून नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होत.

मुग्धा- होतात. पण प्लीज करायच्या नाहीयेत. मला जाम हसू येत.

तेजसने आपली दोन बोट तिच्या पोटावर ठेऊन थोड्या गुदगुल्या केल्या. मुग्धा वेड्यासारखी हसू लागली आणि उठून पळू लागली. तेजसने तिचा हात धरला आणि तिला त्याच्या जवळ ओढली आणि तो तिच्या कंबरेवर गुदगुल्या करू लागला. मुग्धा हसून बेभान होत होती.

मुग्धा- ओके मी हसरे तेजस…पण बास प्लीज.मी मरेन….

तेजस- मी नाही मारू देणार तुला….

ते ऐकून मुग्धा हसायची थांबली. लांब जाऊ लागली. तेजसने त्याच्या हाताची पकड घटत केली. मुग्धाच अंग थरथरत होतं. तेजसने तिला आपल्या जवळ घेतलं. तिचे दोन्ही दंड धरले. मुग्धा जमिनीकडे बघत होती.

तेजस- तू लाजताना पण फार गोड दिसतेस. बघू एकदा मला. प्लीज.

तेजसने तिची हनुवटी आपल्या बोटाने वर करून तिचा चेहरा आपल्या समोर आणला. मुग्धाने डोळे मिटून घेतले होते. तेजस तिला बघून म्हणून गेला-

तेजस- मोहिनी….मला वेड लागेल….

त्याच्या तोंडून मोहिनी ऐकून मुग्धाने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि ती त्याच्या दोन्ही पावलांवर उभी राहिली. त्याचे केस मागून धरून तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकले. तेजसला तो स्पर्श ती चव ओळखीची वाटत होती. मुग्धाला ती प्रशांतच्या मिठीत असल्याची गोड जाणीव होत होती. भिंतीवरच्या फोटो मधून प्रशांत आशीर्वाद देत होता.

क्रमश:

© मंदार जोग

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय…. (भाग २२)

सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “गुंतता हृदय…. (भाग २१)”
  1. कुठल्याही कथेचा भाग १ पसून कसे वाचता येईल ?

    1. सर्च मध्ये भाग १ शोधा. उदा. “गुंतता हृदय भाग १” . पहिला भाग वाचून झाल्यावर सर्वात खाली पुढील भागाची लिंक आहे. ती क्लिक करून पुढचा भाग वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!