गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

…. इथे रेस्तोरांत मध्ये आर्या फ्रेंड्स बरोबर गप्पा मारत एन्जोय करत होती. अचानक तिच्या खांद्यावर एक हात पडला. तिने वळून पाहिलं. समोर रोहित होता. ती त्याला बघून कन्फ्युज झाली.

आर्या- excuse me…मी तुम्हाला ओळखते?

रोहित- नाही आर्या. पण मी तुला ओळखतो. मी रोहित.

रोहितने shake hand साठी पुढे केलेल्या हातात आर्याने आपला हात दिला. तिचा मऊ हात हातात घेतल्यावर रोहितच्या अंगातून एक शिरशिरी उमटली. आर्या त्याच्या डोळ्यात कन्फ्युज होऊन बघत होती.

आर्या- तुम्ही कसे ओळखता मला?

रोहित- तू स्कल्पचर करतेस ना?

आर्या- हो. पण तुम्हाला काय माहित?

रोहित- मी आर्ट कलेक्टर आहे. वेगवेगळ्या प्रदर्शनात फिरून चांगले artists शोधून त्यांच्या कलाकृती विकत घेत असतो. मी तुझी पण काही प्रदर्शनं बघितली आहेत. पण मला आवडलेली सर्व स्कल्प्चर आधीच विकली गेली होती त्यामुळे मला विकत नाही घेता आली.

आर्या- oh. is it? pleasure meeting you. माझ्या पुढल्या प्रदर्शनाला तुम्हाला नक्की आमंत्रण देईन. पहिल्या दिवशीच या. हे माझं कार्ड.

रोहित- हे माझं. आणि प्रदर्शना व्यतिरिक्त तुझी कलाकृती बघायची असेल तर कुठे भेटता येईल?

आर्या- कुठेच नाही. मी प्रदर्शना व्यतिरिक्त माझी आर्ट डिसप्ले करत नाही. पण dont worry. माझी pr टीम तुम्हाला नक्की contact करेल पुढल्या प्रदर्शनाच्या आधी. good night. nice meeting you.

रोहित- (ह्या अनपेक्षित निरोपाची अपेक्षा नसल्याने) ओह ओके…good night. सॉरी मी तुला disturb केल त्यासाठी.

आर्या- its okay.

आता आर्या फुटवते आहे हे लक्षात आल्यावर रोहित समोर तिथून निघाण्यावाचून पर्याय नव्हता. तो निघाला. तो गेल्यावर आर्यांच्या एका मैत्रिणीने विचारलं-

मैत्रीण- कोण ग होता?

आर्या- (त्याच्या कार्ड कडे बघत) रोहित something. थोडा sly वाटला मला. सो मी कटवला.

मैत्रीण- आर्या तू ना जाम बेक्कार आहेस. बरा होता की दिसायला.

आर्या- बरे अनेक असतात. but आर्या goes only for the best. मला खूप एक्सक्लुझीव्ह वस्तू आणि माणसं आवडतात. बर्यांना मी बघत पण नाही.

मुग्धा बेडवर डोळे सताड उघडे ठेऊन छताकडे बघत पडली होती. तिला झोप अजिबात येत नव्हती. हॉटेलात घडलेला सबंध प्रसंग तिला परत परत आठवत होता. इतक्यात तेजसचा मेसेज आला.

तेजस- झोपली आहेस की जागी आहेस?

मुग्धाने रिप्लाय दिला.

मुग्धा- झोप येत नाहीये.

तेजस- का?

मुग्धा- खूप भीती वाटते आहे?

तेजस- कसली?

मुग्धा- भविष्याची.

तेजस- जे माहीतच नाहीये त्याची भीती कशी वाटू शकते?

मुग्धा- ते माहित नाहीये म्हणुनच वाटते.

तेजस- काही प्रॉब्लेम होणार नाही. माझ्यावर विश्वास आहे ना?

मुग्धा- आहे पण माझ्या नशिबावर नाहीये.

तेजस- नशिबावर कधीच विश्वास ठेवायचा नसतो. जर नशीब विश्वासार्ह असतं तर जगात दु:ख कुठेच नसतं. ऐक माझं. शांत झोप आता. फार विचार करू नको. मी सगळं नीट करेन ओके?

मुग्धा- हम्म…

तेजस- उद्या ऑफिसात भेटू ओके?

मुग्धा- ओके.

तेजस- बाय…झोप शांत.

मुग्धाला त्याच्याशी chat करून बराच आधार वाटला. तिने शेजारी झोपलेल्या अमेयचं पांघरूण नीट केलं आणि डोळे मिटले. तिला क्षणार्धात झोप लागली.

दुसर्या दिवशी तेजस ऑफिसला आल्या बरोब्बर राधिकाच्या केबिन मध्ये गेला. त्याला तिथे बघून राधिकाला आश्चर्य वाटलं.

राधिका- काय तेजस आज सकाळी सकाळी आमच्या दिवान-ए-आम मध्ये कसा काय आलास?

तेजस- राधिका तुला ना समाधान नाही हेच खरं. इतकी प्रशस्त केबिन, त्याचं इतकं चांगलं डेकॉर तरी तू त्याला दिवान-ए-आम म्हणणार.

राधिका- अरे तसं नाही. प्रत्यक्ष सिईओ साहेब माझ्या केबिन मध्ये आले म्हणून म्हणाले गंमतीत. पण आज इथे दौरा कशासाठी?

तेजस- तुला हे देण्यासाठी.

तेजसने हातात असलेली channel coco परफ्युमची बाटली तिच्या समोर धरली.  ती पाहून खुश झालेली राधिका म्हणाली-

राधिका- हे माझ्यासाठी?

तेजस- अर्थात.

राधिका- wow thanks. पण का?

तेजस- तू एक महत्वाच काम खूप चांगल्या पद्धतीने केलंस म्हणून.

राधिका- (कन्फ्युज होऊन) काय काम?

तेजस- माझ्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मध्ये होऊ शकणारा प्रोब्लेम तू सोडवलास म्हणून.

राधिका- तेजस नीट सांगणार का काय म्हणायचं आहे ते.

तेजस- सांगतो. तुझी नवीन रिक्रुट. लक्षात आहे का?

राधिका- तेजस गेल्या वीक मध्ये मी पन्नास ऑफर्स रोल आउट केल्या आहेत. तू कोणाबद्दल बोलतोयस?

तेजस- ती एक मुलगी. तुझ्या एच आर टीम मध्ये हायर केलीस ती.

राधिका- (आठवून) let me remember…हम्म…मुग्धा? मुग्धा साठे?

तेजस- right. तीच.

राधिका- तिचं काय?

तेजस- सांगतो. actually मुग्धा प्रशांतची बायको आहे. प्रशांत माझा मित्र होता. एका accident मध्ये गेला तो.

राधिका- तिचा नवरा accident मध्ये गेला हे माहित आहे मला. पण तो तुझा मित्र होता? तू हे आधी कधी बोलला नाहीस.

तेजस- मी तुला माझ्या फ्रेंड्सची लिस्ट देऊ का आता?

राधिका- तसं नाही. पण मुग्धाची हायरिंग प्रोसेस सुरु होती तेव्हाही तू बोलला नाहीस किंवा ती पण काही म्हणाली नाही.

तेजस- मीच तिला सांगितलं होतं की नको बोलू. मुळात तिला नोकरी तिच्या हिंमतीवर हवी होती. माझ्या उपकाराने नाही. सो ती संपूर्ण हायरिंग प्रोसेस मधून गेली आणि तिने नोकरी मिळवली.

राधिका त्याच्याकडे अविश्वासाने बघते.

राधिका- are you seri ous तेजस?

तेजस- जाऊ दे. गिफ्ट परत दे.

राधिका- नको. i trust you.

तेजस- अग खरी गंमत तर पुढेच आहे. काल मुग्धा मला ट्रीट देत होती तर तिथे आम्हाला कोण भेटलं असेल?

राधिका- कोण?

तेजस- आर्या…

राधिका- you mean आर्या….माझी भाची?

तेजस- yes. ती पण योगायोगाने त्याच हॉटेलात आली जिथे मी आणि मुग्धा होतो. मुग्धाला बऱ्याच दिवसांनी बाहेर गेल्यामुळे प्रशांतची आठवण येत होती. ती जरा इमोशनल झाली होती. मी तिच्या हातावर हात ठेऊन तिला धीर देत होतो तेवढ्यात आर्या आली. आणि काय म्हणाली माहिती आहे?

राधिका- काय?

तेजस- ती म्हणाली तुला डेट वर जायचं होतं तर तसं सांगायचं ना? डेट? मुग्धाबरोबर डेट? oh give me a break. आर्या बेसिकली रागावली कारण तिने मला काल डिनरला इन्व्हाईट केलं होतं आणी मी तिच्याबरोबर न जाता मुग्धाबरोबर गेलो. these women are crazy. पण राधिका माझ्या मित्राच्या बायकोला कोणताही वशिला वगैरे न वापरता तिच्या मेरीट वर तू हायर केलंस त्यासाठी हे परफ्युम तुला बक्षीस. बाय.

तेजस हसत निघून गेला. राधिका तो गेला त्या दिशेने बघत होती.

राधिका- तेजस…मुग्धा….मित्राची बायको…?? बात कुछ हजम नही हुवी. आर्याशी बोलायला हवं एकदा.

तेजसने केबिन मध्ये आल्यावर लगेच मुग्धाला फोन लावला.

तेजस- कुठे आहेस?

मुग्धा-  ऑफिसच्या बिल्डींगच्या lobby मध्ये आहे.येतेच आहे वर.

तेजस- ऐक. प्रशांत आणि मी मित्र होतो. तो गेल्यावर तुला तुझ्या हिंमतीवर नोकरी हवी होती म्हणून मी तुला ओळखत असल्याचं ऑफिसात आधी सांगितलं नाही. हे लक्षात ठेव.

मुग्धा- (कन्फ्युज्ड) हे काय आहे?

तेजस- तू वर ये आपण बोलू. पण मी ही स्टोरी आत्ताच राधिकाला विकून आलोय. तिला हे पण माहिती आहे की काल अर्याने आपल्या दोघांना हॉटेलात पाहिलं. आपण हॉटेलात तुझ्या नोकरीच्या ट्रीट साठी गेलो होतो.

मुग्धा- पण तेजस….

इतक्यात मुग्धाच्या लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि फोनची रेंज गेली. मुग्धा लिफ्ट मधून उतरून, बायोमेट्रिक एन्ट्री करून रिसेप्शन वर आली इतक्यात रीसेप्शानिस्त ने तिला तेजस बोलावत असल्याचा निरोप दिला. मुग्धा तेजसच्या केबिन मध्ये गेली. इथे राधिकाने आर्याला फोन लावला.

आर्या- बोल मावशी.

राधिका- काल रात्री काय झालं?

आर्या- ए मावशी रोज रात्री काहीतरी व्हायला माझं लग्न नाही झालेलं.

राधिका- आर्या i am serious. काल रात्री तुला हॉटेल मध्ये कोण भेटलं होतं?

आर्या- (सिरीयस होऊन) तुला कोणी सांगितलं?

राधिका- प्रश्न मी विचारलाय आर्या. तू उत्तर दे. उलट प्रश्न नको.

आर्या- मला तेजस आणि तुम्ही नवी रिक्रूट मुग्धा भेटले.

राधिका- काय करत होते ते?

आर्या- काही खास नाही. एकमेकांचे हात हातात घेऊन बसले होते. मला तेजसने सांगितलं होतं की त्याला रात्री मिटिंग आहे. पण तो तिच्या बरोबर होता. its okay. मी त्याला उगाच हवा भरली की तुमची डेट सुरु आहे and all. कारण परवा रात्री आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो.

राधिका- (घाबरून) म्हणजे परवा रात्री…

आर्या- ए मावशी  लगेच टोक गाठू नको. खरं तर मला गाठायचं होतं टोक परवा रात्रीच पण तेजस मागे हटला like a gentleman. आणि त्यामुळे मला तो जास्तच आवडला. he comes late.

राधिका- (घाबरून) how the hell do you know that unless…

आर्या-  अग त्यानेच सांगितलं की तो कुठे जायचं आहे हे बघून वेळेवर जायचं की उशिरा ते ठरवतो. पण तू आज इतकी जेम्स बॉंड का झाली आहेस? any problem?

राधिका- अजून तरी नाही पण होऊ शकतो. ती मुग्धा म्हणे तेजसच्या late मित्राची बायको आहे.

आर्या- oh no wonder तो तिला समजावत होता. sad ना. इतक्या सुंदर मुलीचा नवरा इतक्या लवकर गेला. बर झालं ना मी लग्नच केलं नाहीये ते.

राधिका- (चिडून) आर्या तुला कधी अक्कल येणार?

आर्या- का मावशी काय झालं आता?

राधिका- तुला तेजस आवडतो ना?

आर्या-yes he is damn hot…

राधिका- hot पावभाजी पण असते. तुला लग्न करायचं आहे ना तेजसशी?

आर्या- असं मी कधी म्हणाले?

राधिका- असं तू नाही मी म्हणते आहे.

आर्या- पण का? मला तर् लग्न न करता पण त्याच्या बरोबर…

राधिका- मार खाशील हा आर्या. मी सांगते तसंच करायचं. तुझं आणि तेजसचं लग्न झालंच पाहिजे. पण त्यात ही मुग्धा कुठून मध्ये आली तेच कळत नाहीये. मी हायर केली आहे ना तिला? आता मीच घालवते बघ. चल बाय. मी कामाला लागते. तू फक्त लग्नाचं लक्षात ठेव. बाय.

आर्याने फोन ठेवला आणि तिच्या whatsapp वर मेसेज आला-

मेसेज- हाय आर्या. मी रोहित. काल आपण भेटलो होतो. मला स्कल्पचर बद्दल तुझ्याशी जरा डिटेल मध्ये बोलायचं होतं. आज भेटू शकशील का तासभर?

ते वाचून आर्या वैतागली. म्हणाली-

आर्या- काय pile on आहे. शी.

तिने नाही असा रिप्लाय केला आणि त्याचा नंबर whatsapp ला block करून टाकला.

तेजसच्या केबिन मध्ये त्याने मुग्धाला सगळं सांगितलं होतं. मुग्धा सुन्न बसून होती.

तेजस- काय झालं मुग्धा? मी sort केलंय ना सगळं? मग आता हस ना.

मुग्धा- तेजस एक खोट बोलायला अजून एक खोट आणि मग अजून एक असं होतंच. त्या पेक्षा तुम्ही खरं काय आहे ते का सांगितलं नाही?

तेजस- काय खरं सांगू की मुग्धा नावाच्या एका मुलीशी माझी मैत्री आहे. आम्ही दोघं भेटतो. बोलतो. एकत्र जेवायला जातो. आणि ती मुलगी माझ्याच ऑफिसात माझ्या हाताखाली काम करते? come on मुग्धा. मी ह्यात खोटं काय बोललोय? इतकचं ना की मी आणि प्रशांत मित्र होतो म्हणून? मग ठीक आहे ना. होतो आम्ही मित्र. मला तर कधीही न भेटता प्रशांत खरोखरच  खूप जवळचा आणि ओळखीचा वाटतो. माझी त्याची खूप चांगली ओळख होती असं वाटतं. तू समोर असताना कधीकधी मीच प्रशांत आहे अस काहीतरी विचित्र वाटतं.

हे ऐकून मुग्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघते.

तेजस- खरच मोहीनी. trust me.

त्याच्या तोंडून मोहीनी ऐकून मुग्धाच्या अंगावार सर्रकन काटा आला. ती अविश्वासाने घाबरून उभी राहिली. म्हणाली-

मुग्धा- क…काय म्हणालात तुम्ही आत्ता?

तेजस- काय? मी म्हणालो माझ्यावर विश्वास ठेव मुग्धा…

मुग्धा- नाही. तुम्ही मुग्धा नाही म्हणालात!

तेजस- मग मी काय म्हणणार?

मुग्धा- तेच मी विचारते आहे तुम्हाला. तुम्ही मला काय हाक मारली?

तेजस- तू वेडी आहेस का मुग्धा? मी तुला मुग्धा नाही म्हणणार तर काय कथरीना कैफ म्हणेन का? come on. तू मुद्दा समजून घे. नावात काय आहे. मी सांगायचा प्रयत्न करतोय की माझं हे खोट बोलणं आपले बरेच प्रॉब्लेम solve करणार आहे. तुला आधी का सांगितलं तर ती राधिका तुला नक्की विचारेल. तेव्हा तू हे सर्व लक्षात ठेऊन त्यानुसारच उत्तरं दे. ओके?

मुग्धा तिच्या ट्रान्स मध्ये होती. तिला फार काही ऐकू येत नव्हतं.

तेजस- काय झालं मुग्धा? इतका सिरीयस विचार नको करू. जा आता कामाला लाग आणि अजिबात काळजी करू नको ओके?

मुग्धा यंत्रवत उठली आणि निघाली. तिच्या जागेवर येऊन काम करू लागली. काम होत होतं पण तेजसने तिचा “मोहीनी” म्हणून केलेला उल्लेख तिच्या डोक्यात काहूर माजवत होता. लंच टाईम मध्ये तिने काहीच खाल्लं नाही. ती कोणाशीही फार बोलत नव्हती. शांतपणे काम करत होती.

तेजस त्याच्या केबिन मध्ये कामात गढून गेला होता. महत्वाची काही टेंडर्स आणि इतर डॉक्युमेंट सही करून झाल्या. दोन मिटींग्स पण झाल्या. इतक्यात त्याला अर्याचा फोन आला.

तेजस- बोल आर्या.

आर्या- मी काय बोलणार? तू बोल. तुझ्या गर्ल फ्रेंड्स मधून आज रात्री वेळ काढणार का माझ्यासाठी हे विचारायला फोन केलाय.

तेजस- गप ह. काहीही काय? कसल्या गर्ल फ्रेंड्स?

आर्या- अरे असू देत की. मी जेलस वगैरे नाही होत अजिबात. ते सोड. आज रात्री ड्राईव्हला नेणार आहेस का मला? मस्त लोणावळ्याला जाऊ. दोन दोन ड्रिंक मारू आणि परत येऊ. बोल are we on?

तेजस थोडा विचारात पडतो.

आर्या- नाही असेल तर सांग बिनधास्त. मला राग नाही येणार. पण हो असेल तर मला तयारी करावी लागेल ना. परवा अर्धवट सोडलेली स्टोरी कदचीत आज पूर्ण करू आपण….गाडीतच!

ते ऐकून तेजसच्या डोळ्यासमोर तो आणि आर्या गाडीत सन रूफ मधून दिसणाऱ्या चंद्राच्या साक्षीने एकत्र आले आहेत असं दृश्य दिसू लागलं.

आर्या- काय रे विचारात हरवलास का? काय करायचं आहे?

तेजस- जाऊया आज.

आर्या- बघ हा. दुसर्या एखादीला वेळ दिलेली असशील. नीट विचार करून सांग.

तेजस- तू भेट ग मग बघतोच मी तुला.

आर्या- बघ हा. नक्की बघावं लागेल.

तेजस- ठेव आता फोन. शार्प साडेसात ला तुला पिकप करतो.

तेजस फोन ठेऊन परत कामात गुंतला. दिवस हळूहळू कलला. मुग्धा घरी आली. तिच्या डोक्यात अजूनही तेजसने तिला मारलेली मोहीनी ही हाक होती. अमेय जेऊन खाली मित्रांशी खेळायला गेला होता. मुग्धा प्रशांतच्या फोटो समोर उभी राहिली. तिला प्रशांत आणि तिच्यातील धुंद प्रणयाचे प्रसंग आठवत होते. अश्या प्रसंगी अधीर झालेला प्रशांत तिला मोहिनी म्हणत असे. तो नेहमी म्हणायचा “मुग्धा तुझी दोन नावं आहेत. एक बेडच्या बाहेरचं मुग्धा आणि एक बेडमधलं मोहिनी…मला वेड लावणारी मोहिनी!” आज अचानक तेजसच्या तोंडून ते नाव कसं आलं ह्याचं तिला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. ती स्वतःशी बोलत होती-

मुग्धा- तेजस  खरंच मला मोहिनी म्हणाला की तो भास होता? पण मी माझ्या कानांनी ऐकलं आहे. तो मला मोहिनी म्हणाला. पण त्याला हे नाव कसं माहित असेल? आणि तो पण म्हणाला ना की त्याने मला मुग्धा अशीच हाक मारली. म्हणजे मला भास झाला असणार.

तिने प्रशांतच्या फोटोकडे बघितलं. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मुग्धा ढसा ढसा रडत फोटोकडे बघत म्हणाली-

मुग्धा- का गेलास प्रशांत? हा सगळा डाव अर्धवट टाकून का असा अचानक गेलास तू मला सोडून?

लोणावळ्यात दोन दोन ड्रिंक घेऊन डिनर करून तेजस आणि आर्या परतीच्या प्रवासाला लागले. गाडीच्या सनरूफ मधून आर्याच्या चेहऱ्यावर पडणारं चांदणं तिला खूप आकर्षक बनवत होतं. गाडी एक्स्प्रेस वे वर सुसाट निघाली होती. जवळ जवळ रात्रीचा  एक वाजला होता. आर्याने  तेजसचा डावा दंड दोन्ही हातांनी धरून आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकलं आणि नशिल्या डोळ्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. तिची बोटं त्याच्या दंडाला गुदगुल्या करत होती. काही मिनिटं अशीच गेल्यावर तेजसने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि आर्याला म्हणाला-

तेजस- accident करायचा आहे का?

आर्या- नाही. पण गाडी थांबली नसती तर accident नक्की झाला असता.

तेजस- का?

आर्या- कारण मी अजून काहीतरी केलं असतं.

तेजस- काय?

आर्या उठून त्याच्या आणि steering wheel च्या मध्ये शिरली. तेजसने तिला जागा व्हावी म्हणून आपली सीट मागे घेतली. आर्या आता दोन्ही पाय दोन बाजूला सोडून तेजसच्या मांडीवर बसली होती.

आर्या- (तेजसच्या कानात) मी अशी बसल्यावर तू गाडी चालवू शकला असतास का?

तेजस- कदाचित.

अर्याने त्याच्या गळ्याला आणि कानाला हलका चावा घेतला आणि त्याच्या कानाला ओठ टेकवून म्हणाली-

आर्या- मी असं केल्यावर तुझा कंट्रोल राहिला असता का?

तेजस- कदाचित.

अर्याने त्याच्या नजरेत नजर मिसळून त्याच्या सीटची पाठ मागे पूर्ण झोपवली आणि त्याचा एक प्रदीर्घ कीस घेऊन म्हणाली-

आर्या- आता तुला गाडी चालवता येईल का?

तेजस काहीही बोलायच्या अवस्थेत नव्हता. त्याच्यावर अर्याचा पूर्ण अंमल चढला होता. आता दोघे एकमेकांच्या मिठीत हरवत होते. तेवढ्यात तेजसचा फोन वाजला. तेजसचं लक्ष विचलित झालं. तेजस फोन घ्यायला उठू लागला.

आर्या- बेबी इतक्या रात्री फोन काय घेतोस आणि ते पण आपण असे असताना?

तेजसला कळत नव्हतं की त्याला तो फोन का घ्यावासा वाटतोय. फोन सतत वाजत होता. तेजसने आर्याला बाजूला केली आणि सीट सरळ करून फोन बघितला. फोन मुग्धाचा होता. त्याला आश्चर्य वाटलं.

आर्या- (स्वतःच्या शर्टची बटण लावत) कोण आहे इतक्या रात्री?

तेजस- आलोच मी.

तेजस त्याचा टी शर्ट नीट करत गाडीतून बाहेर पडला आणि त्याने मुग्धाचा फोन घेतला.

तेजस- बोल मुग्धा. इतक्या रात्री फोन? all okay?

मुग्धा- (जोरजोरात रडत) नाही तेजस. काही okay नाहीये. मला झोप येत नाहीये. वेळ लागायची पाळी आली आहे. तुम्ही मला मोहिनी का म्हणालात ते सांगा? हे नाव तुम्हाला कसं कळल सांगा. प्लीज सांगा तेजस…मी तुमच्या पाया पडते.

मुग्धा फोनवर ढसाढसा रडत होती. तेजसला काय करायचं कळत नव्हतं. गाडीतून बाहेर आलेल्या आर्याने एक सिगारेट शिलगावली होती. रात्र गडद झाली होती. आकाशात चंद्र हसत होता.

क्रमश:

© मंदार जोग

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय…. (भाग २१)

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “गुंतता हृदय…. (भाग २०)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!