hands forming a heart shape with sunset silhouette. Copy space text.

….दांडेकरांनी फोन कट केला. रोहित भांबावून थरथर कापत असलेल्या मुग्धाकडे आसुसलेल्या नजरेने बघत होता. तिला मिठीत घ्यायला तो पुढे जाणार इतक्यात प्रशांतचा फोटो खिळा निखळून रोहितच्या डोक्यावर पडला. त्याची काच रोहितच्या कापळात घुसून रक्त वाहू लागल. रोहित रक्त पाहून भांबावला आणि निघून गेला. मुग्धा जमिनीवर पडलेल्या प्रशांतच्या फोटोकडे बघत होती. तिथे बंगलोर मध्ये तेजसला जस्ट शुद्ध आली होती!

तेजसला शुद्ध आल्याचं नर्सने डॉक्टरना सांगितलं. डॉक्टरांनी येऊन त्याला तपासलं. बाहेर बसलेल्या दांडेकर दाम्पत्याला तेजस शुद्धीवर आल्याची वर्दी दिली. ते दोघे सावकाश चालत तेजसला ठेवलेल्या स्वीट रूम मध्ये आले. तेजस बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता. दांडेकर काकूंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर अंगारा लावला. डॉक्टर म्हणाले “ह्यांना रिकव्हर व्हायला वेळ लागेल. ऑर्गन शरीरात सेटल होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल. औषध घ्यावी लागतील.” दांडेकर काका शांतपणे म्हणाले “आम्ही तेजसला घरी कधी नेऊ शकतो?” डॉक्टर म्हणाले “किमान वीस दिवस लागतील.” दांडेकर काका ठीक आहे म्हणाले. तेजसच्या चेहऱ्याकडे बघून निघाले. काकू पण त्यांच्या मागे बाहेर पडल्या.

त्या दिवशी प्रशांतचा फोटो डोक्यात पडल्यापासून रोहित जरा टरकून होता. मुग्धाशी जवळीक करायची इच्छा झाली की त्याच्या कपाळावरील जखमेत कळ येत असे आणि तो दोन पावलं मागे सरकत असे. त्यामुळे त्याने  मुग्धाच्या असहायतेचा फायदा न घेता तिच्या मनात स्थान, आकर्षण निर्माण करून तिच्या संमतीने तिला आपली करायचा निर्णय घेतला. मग रोहित प्रशांतच्या इन्श्युरन्स क्लेम, फंडाचे पैसे, इतर गुंतवणुकी मुग्धाला मिळाव्या ह्यासाठी मदत करू लागला. कामाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीमध्ये तिचा होणारा ओझरता स्पर्श त्याच्यासाठी incentive ठरत होता.

प्रशांतचे सगळे दिवस मुग्धाने यथासांग पार पाडले. तिला त्याच्या इन्श्युरन्स पॉलिसीचे वीस लाख मिळाले. तिने पीएफसाठी केलेला अर्ज गहाळ झाला. प्रशांत ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीच हेड ऑफिस बंगलोरला असल्याने तिला बंगलोर मधील पीएफ ऑफिसात जावं लागणार अशी परिस्थिती उद्भवली. सरकारी काम असल्याने वेळ काढून जावं लागणार होतं. किमान तीन दिवस तरी. तिने रोहितला रेल्वेचे तिकीट काढायची विनंती केली. रोहनला ह्यात संधी दिसत असल्याने तो म्हणाला “ट्रेन वगैरे नको. आपण फ्लाईट ने जाऊ. मी तिकीट काढतो.” मुग्धा म्हणाली “फ्लाईट नको. खूप महाग पडेल.” रोहित म्हणाला ” तुझ्यासाठी मी इतकं का करू शकत नाही? मला असा परका नको करू अचानक!” मुग्धा म्हणाली “ठीक आहे. अमेयाची परीक्षा दोन दिवसांनी संपेल. त्याला शेजारच्या रोहिणीकडे ठेवते आणि आपण जाऊ” रोहित म्हणाला “मुग्धा एक सांगू का? रागावू नको. पण प्रशांतला जायचं होतं आणि तो गेला. पण तुझ्यापुढे संबंध आयुष्य पडलं आहे. तू आरशात बघ काय दशा झाली आहे तुझी ते. प्लीज ह्या बंगलोर ट्रिपच्या निमित्ताने स्वतःला सावर. पूर्वी सारखी राहा जरा.” मुग्धा म्हणाली “कोणासाठी छान दिसू मी आता?” रोहित बोलून गेला “माझ्यासाठी” मग सावरून घेत म्हणाला “आय मीन मी आहे, अमेय आहे, बाकी जग आहे. आम्ही तुला अशी कोमेजलेली नाही बघू शकत. प्लीज!” मुग्धा म्हणाली “बघते. पण इच्छा होत नाहीये!”

बंगलोरला जायचा दिवस आला. अमेयला शेजारी ठेऊन मुग्धा घरी आली. बॅग भरून तयार होती. आज खूप दिवसांनी तिने हलका मेकअप केला होता. गेल्या वाढदिवसाला प्रशांतने दिलेला ड्रेस घातला होता. ती प्रशांतच्या फोटोकडे बघत होती. इतक्यात बेल वाजली. रोहित आला होता. मुग्धाला बघून खुश होत म्हणाला “wow. आता कसं. किती छान दिसते आहेस. प्रशांत पण बघ फोटोत खुश आहे! निघुया?” मुग्धाने तिची बॅग उचलली. रोहित म्हणाला “मी आहे ना. त्याने तिच्या हाताला स्पर्श करत तिची बॅग उचलली. दोघे निघाले.  आपल्या मोबाईल मधील फालतू जोक्स दाखवायच्या निमित्ताने कॅब मध्ये रोहित शक्य तितका तिच्या जवळ बसला. तिच्या उघड्या दंडाचा ओझरता थंड स्पर्श त्याला सुखावत होता. विमानातील गीचमीड सीटवर देखील तो शक्य तितका स्पर्श करून सलगी करत होता.

बंगलोरला उतरल्यावर दोघे थेट पीएफ ऑफिसात गेले. आश्चर्य म्हणजे त्यांचं काम एका तासात झालं. परतीच तिकीट परवाच होत. मुग्धा दोन दिवस काय करायचं ह्या विवंचनेत होती आणि रोहित दोन रात्री काय काय करायचं ह्याचे इमले रचत होता. मग जेवून संध्याकाळी एमजी रोडवर फेरफटका करून दोघे हॉटेलवर आले. तिथे रोहितने दोघांसाठी एकच रूम बुक केल्याच लक्षात आल्यावर मुग्धाला आश्चर्य वाटलं. रोहित म्हणाला “मुग्धा हे पॉश हॉटेल आहे. एक रूम सहा हजाराची आहे. दोन करण जरा एक्सपेन्सिव्ह झालं असतं. आणि स्वस्त हॉटेलात मी राहात नाही. सो..पण डोन्ट वरी. आपला स्वीट आहे. मी बाहेर झोपेन आणि तू बेडवर झोप आरामात. हवं तर मधलं दार लावून घे. ओके?” आधीच सगळा खर्च रोहित करत असल्याने मुग्धा काही बोलू शकली नाही. दोघे रूमकडे निघाले.

रूम फार सुंदर होती. आल्या आल्या रोहितने फ्रीज उघडून दोन बियरचे कॅन बाहेर काढले. एक कॅन मुग्धाला देत म्हणाला “चियर्स” मुग्धा म्हणाली “मला नको रोहित. मी घेत नाही.” रोहित म्हणाला “come on. हे इतर कोणाला सांग. मला नाही. तू मी आणि प्रशांतने किती पार्टी केल्या आहेत एकत्र। बीयर नको असेल तर ब्रीझर पण आहे!” मुग्धा म्हणाली “ते प्रशांतला कंपनी म्हणून मी कधीतरी घेत असे. पण आता…” रोहित म्हणाला “मग आज मला कंपनी दे. जाम दमलोय दिवसभर. जरा रिलॅक्स करू. आणि एका बीयर मध्ये तू टाईट नाही होणार आणि मी काही अतिप्रसंग नाही करणार!” ह्या जोकवर तो जोरात हसला. दोघे बीयर पिऊ लागले. मुग्धाला प्रचंड गिल्टी वाटत होतं. पण ती नाही म्हणू शकली नाही. संबंध वेळ रोहित काहीतरी जोक सांगत तिला हसवायचा प्रयत्न करत होता. मुग्धा मात्र प्रशांतच्या आठवणीत हरवल्याने त्याच्याकडे तीच लक्षही नव्हतं!

रात्र झाल्यावर मुग्धा बेडवर पडून होती. रोहित बाहेर बीयर ढोसत होता. बीयर झाल्यावर रोहित उठला. बेडरूमच दार ढकलून आत आला. त्याला बघून मुग्धा सावरून बसली. रोहित पुढे आला. म्हणाला “मुग्धा प्रशांतच्या आठवणीत तू संबंध आयुष्य असंच फुकट घालवणार का? तो गेला पण तू आहेस. तुझ्या गरजा आहेत. मी मित्र म्हणून तुझया सर्व गरजा पूर्ण करेन.” हे बोलताना त्याने “सर्व” ह्या शब्दावर दिलेला जोर मुग्धाच्या लक्षात आला. तिच्या मेंदूवर त्या एका बियरचा हलका अंमल झाला होता. प्रशांत गेला त्या दिवसापासून असलेला स्ट्रेस तिला घालवून टाकायचा होता. रोहित सावकाश पुढे झाला. हळूच बेडवर बसला. सावकाश त्याने मुग्धाचा हात हातात घेतला. मग तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाला “मी तुला कशाचीही कमी भासू देणार नाही. अगदी प्रशांतची पण!” ते ऐकून मुग्धाने त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं. रोहितने तिच्या चेहऱ्यावर आलेली तिची बट हलके बाजूला केली. आपला हात तिच्या गालावर फिरवला. मुग्धाने ग्लानीने डोळे मिटून घेतले. ती संबंध रात्र दोघांनी जागवली!

रोहितच्या बोटात धरलेली सिगारेट फिल्टर पर्यंत जळली होती. त्याच्या बोटाला लागलेल्या चटक्याने रोहित भानावर आला. मुग्धा बरोबर रंगवलेल्या रात्रीच तो बघत असलेलं स्वप्न संपून त्याला सत्याची जाणीव झाली. पण आता जागेपणी पाहिलेलं स्वप्न सत्यात जगायची अतीव इच्छा त्याला स्वस्त बसू देत नव्हती. हातातली बीयर संपवून रोहित उठला. त्याने बेडरूमचा दरवाजा किलकीला केला. त्याला बेडवर झोपलेली मुग्धा दिसली. झोपेत अस्ताव्यस्त झालेल्या तिच्या गाऊन मधून दिसणारं तीच अंग त्याला वेड लावू लागलं. डोक्यातील बियरची नशा शरीरात आग लावत होती!

©मंदार जोग

क्रमशःगुंतता हृदय…(भाग – ५.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!