मृगजळ सीझन २ भाग १२- शेवटचा भाग
मानसी किचन मध्ये सकाळी चहा करत असताना श्रीरंगचा मेसेज आला.
मेसेज- हाय मानसी. आज रात्री मी परत जातोय. तू विश्वास ठेवणार नाहीस हे माहित्येय. तरीही सांगतो. मी जे केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं. तू स्वतःला विचार की रंगा ठरवून, जाणून बुजून माझं वाईट व्हावं अशी एखादी गोष्ट करेल का? तुझं मन तुला जे उत्तर देईल ना तेच खरं, तेच सत्य आहे. हो, मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा होती, अजूनही आहे आणि आयुष्यभर असेल. मी ती कधीच लपवून ठेवली नाही. तुला स्पष्टपणे सांगितली आहे. त्यामुळे मी तुला सत्य काय आहे हे सांगायला केलेल्या प्रयत्नात तुला सत्य कळल्यावर तू सौरभला सोडून माझ्याशी लग्न करशील ही इच्छा देखील होतीच; पण तो मुख्य हेतू नव्हता. Anyway…आता तो विषय संपला आहे. तू सौरभ बरोबर खुश रहा. तुझ्या आनंदातच माझाही आनंद आहे. बाकी कधीही माझी गरज लागली तर हाक मार. I am just a flight away. Take care Manasi.
तो मेसेज वाचून मानसीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पटकन श्रीरंगला फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. तिने दोन तीन वेळा प्रयत्न केला पण त्याने तिचा फोन घेतला नाही. तिने मेसेज केला.
मेसेज- तू माझा फोन का घेत नाहीयेस? मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला भेटायचं आहे. प्लीज माझा फोन घे.
त्याने मेसेज वाचल्याचं पाहून तिने परत फोन केला. त्याने फोन घेतला नाही. मानसीने चिडून परत मेसेज केला.
मेसेज- तू माझा फोन का घेत नाहीयेस? हा किती वेडेपणा आहे रंगा. हे तू मला मुद्दाम त्रास द्यायला आणि इमोशनल black mail करायला, मला guilt द्यायला करतो आहेस ना? मला त्रास होऊ नये म्हणून सगळं करतोस ना तू? मग माझा फोन न घेऊन मला किती त्रास देतो आहेस माहित्येय ना? माझा फोन घे लगेच.
तिचा मेसेज पाहून डोळ्यात आलेलं पाणी पुसून रंगाने रिप्लाय लिहिला-
रिप्लाय- तुझा फोन घेतला, तुझा आवाज ऐकला तर मी परत जाऊ शकणार नाही आणि तू सौरभला निवडल्यावर मी इंडिया मध्ये राहू शकणार नाही. प्लीज मला नको अडकवू. Let me go….
तो मेसेज पाहून मानसीला आत कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. तिच्या डोळे भरुन आले. त्याच वेळी सौरभ किचन मध्ये आला. आळस देत म्हणाला-
सौरभ- babe ब्रेकफास्टला काय केलं आहेस?
ती तशीच उभी होती. तिला रडताना पाहून सौरभ तिच्या जवळ गेला आणि म्हणाला-
सौरभ- काय झालं? तू रडते का आहेस?
तिच्या हातातला फोन पाहून त्याने फोन काढून घेतला आणि श्रीरंगचा मेसेज वाचला. तो वाचून चिडून सौरभ म्हणाला-
सौरभ- कसला चीप माणूस आहे हा. इमोशनल मेसेज पाठवून तुला त्रास देतोय. तो जातोय तर जाऊ दे. मला कधीच आवडला नाही तो. तुझ्याकडे बघायची त्याची नजरच इतकी घाण होती ना…तू मध्ये होतीस म्हणून. नाहीतर त्याला असा तुडवला असता ना..आता तो जातोय ते बरं आहे. त्याला सांग, परत कधीच फोन करू नको आणि इंडियात येऊ नको म्हणून. त्याला सांग माझा सौरभ आहे माझी काळजी घ्यायला समर्थ. असह्य, फालतू माणसासाठी रडू नको यार. तू ना ब्रेकफास्ट साठी मस्त ओम्लेट कर आणि ऑफिसला जायच्या आधी माझ्यासाठी जेवण बनवून जा. मला बाहेरचं खायला कंटाळा येतो. मी आलोच shower घेऊन. मग मस्त ब्रेकफास्ट करू. ओके. त्या फालतू माणसाला विसर आता. आता आपण दोघे आहोत ना?आयुष्यभर एकत्र राहू. ओके?
अस म्हणून तो तिच्या कपाळाचं चुंबन घेऊन बाथरूम मध्ये गेला. मानसी तशीच विचार करत किचन मध्ये उभी होती. तिने यांत्रिकपणे ओम्लेट केलं, बाकी स्वयंपाक केला आणि तयार होऊन ती ऑफिसला गेली. सौरभ त्याच्या क्लायंटसशी फोन करून नववनीन स्कीम सांगत होता. दिवस तसाच पुढे जात होता.
इथे क्लास मध्ये अंकिताने सगळ्या स्टाफला लंच ब्रेक मध्ये मुद्दाम बोलावून घेतलं आणि ती त्यांना सांगू लागली.
अंकिता- आज मी खूप महत्वाचं काहीतरी सांगणार आहे तुम्हा सर्वांना. हा क्लास म्हणजे आपण सर्वांच दुसरं घर आहे, इथे शिक्षक म्हणून आपल्या ज्ञानाची सरस्वती आणि उत्पन्नाचा सोर्स म्हणून आपली लक्ष्मी एकत्र वास करतात. आपण सगळेच एका कुटुंबासारखे इथे असतो. आणि कुटुंबापासून काहीही लपवायचं नसतं म्हणून मी तुम्हाला आज काहीतरी महत्वाचं सांगायला इथे बोलावलं आहे. मी कधीच माझं personal life जगासमोर मांडलं नाही. पण त्याचा अर्थ मी खुश होते, सगळ आलबेल होतं असं नाही. खरं तर सगळ आलबेल नव्हतं त्यातूनच ह्या क्लासची सुरुवात झाली. त्या नंतर आयुष्य कधीच आलबेल नव्हत. फार खोलात जाणार नाही. मी माझ्या घरापासून, माझ्या नवऱ्यापासून वेगळं राहायचा निर्णय घेतला आहे. आणि मी माझ्या आयुष्याचा नवा साथीदार म्हणून आपल्या उमेश सरांची निवड केली आहे.
सगळे आश्चर्याने बघू लागले.
अंकिता- मला माहित्येय की तुम्हा सर्वाना हा shock आहे. हेच सत्य आहे. मी माझं घर सोडून आता उमेश सरांच्या बरोबर राहणार आहे, आणि हो मी माझ्या नवऱ्याला म्हणजे सौरभला डिव्होर्स देत नाहीये. ते लग्न न मोडता मी उमेश सरांच्या बरोबर राहणार आहे. कदाचित भविष्यात मी ते नातं तोडून उमेश सरांशी लग्न देखील करेन. मात्र आज मी माझ्या काही कारणांमुळे सौरभला डिव्होर्स देणार नाहीये. सुरुवातीला म्हणाल्या नुसार आपण सगळे एक कुटुंब आहोत म्हणून मी तुम्हाला हे स्पष्ट सांगत आहे. आता हे ऐकून तुम्ही मला काय म्हणाल, माझ्याबद्दल काय मत बनवता ते मी तुमच्यावर सोडते. तुम्ही मला ओळखता गेली अनेक वर्ष. त्यामुळे तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा आहे. ज्यांना मी चालू, लफडेबाज, slut वगैरे वाटत असेन त्यांच्या मताचाही आदर आहे. रिक्वेस्ट इतकीच आहे की मी आणि उमेश सरांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम क्लासच्या वातावरणावर आणि मुख्य म्हणजे विध्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला मला चालणार नाही. आमच्या नात्याबद्दल जे बोलायचं असेल ते माझ्याशी मोकळेपणाने बोला. तुमच मत मला बिनधास्त सांगा. मलाही माहित्येय एका लग्नात असताना एक बाई दुसऱ्या माणसाबरोबर राहते तेव्हा समाज काय म्हणतो, पण तुम्ही समाज नाही आहात. तुम्ही माझे जवळचे आहात. मला आणि उमेश सरांनाही ओळखता म्हणून मी आज तुम्हाला जे आहे ते सांगते आहे. आमच्यावर,आमच्या चारित्र्यावर, आमच्या संस्कारांवर विश्वास असेल तर तुम्ही आमच्या ह्या निर्णयाचा, मनात कोणताही संशय न ठेवता, स्वीकार कराल अशी अपेक्षा आहे. ज्यांना हे स्वीकार नसेल त्यांच्याही मताचा आदर आहे. माझं असं मत आहे की आपल्याला जे काही वाटतं ते क्लासच्या बाहेर बोलावं, क्लास हे मुलाचं मंदिर आहे. आपले विचार इथे बोलून मंदीराचं वातावरण खराब करू नये अशी माझी विनंती आहे.
इतकं बोलून अंकिता थांबली. सगळेच थक्क होऊन बघत होते. इतक्यात त्यांच्या क्लास मध्ये math teacher म्हणून नवीनच जॉईन झालेल्या रितिका नावाच्या gen z मुलीने पुढे येत अंकिताला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली-
अंकिता- mam, we trust you and love you. We are with you ..always..बरोबर ना guys?
सगळे एकदम म्हणाले- yes mam…
मग सगळा स्टाफ तिला आणि उमेशला congrats म्हणत अभिनंदन करत होता. उमेश आणि अंकिता एकमेकांकडे बघत स्माईल करत असताना त्यांचे डोळे भरून आले होते.
संध्याकाळी साधारण साडेसात वाजता श्रीरंगची कॅब डिपार्चर टर्मिनल च्या दरवाजा बाहेर थांबली. Bags ट्रॉली वर टाकून तो गेटकडे निघाला इतक्यात त्याला हाक ऐकू आली-
आवाज- रंगा…..
आवाज ओळखीचा होता. श्रीरंग थबकला. त्याने मागे वळून पाहिलं तर मानसी तिथे उभी होती.
श्रीरंग- मानसी? तू? इथे?
मानसी रागाने थरथरत होती. ती धावत पुढे आली आणि त्याला घट्ट मिठी मारून जोरजोरात रडू लागली. रडताना बोलू लागली-
मानसी- का..का रंगा? तू…तू मला न भेटता, माझ्यावर जराही न चिडता परत एकदा परत जाणार होतास? तू इतका चांगला का आहेस? माझ्यावर कधीच का चिडत नाहीस? मला का रागवत नाहीस? मी सांगेन ते ऐकतोस? मी मागेन ते देतोस? आणि माझा नकारही आनंदाने स्वीकारतोस? इतकं प्रेम करतोस माझ्यावर?
श्रीरंग तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला-
श्रीरंग- हो. प्रेम करतोच…आणि लपवून वगैरे नाही… openly तुला सांगून.
मानसी- आणि जिच्यावर प्रेम करतोस तिला दुसऱ्याच्या हवाली करून जाताना लाज वाटत नाही का? राग येत नाही का?
श्रीरंग- खूप राग येतो. म्हणजे तू मला नकार देऊन त्या यतीनशी लग्न केलंस तेव्हा राग आला होता. वाटलं होतं की संपवून टाकावं यतीनला आणि तुला आणि स्वतः देखील जीव द्यावा. नंतर ह्या विचाराचे माझं मलाच हसू आलं. मी स्वतःला विचारलं की जर मानसीवर प्रेम करतोस तर तिला आनंदी ठेवशील की त्रास देशील? तुझा आनंद जर यतीन आहे तर मी त्यात आनंद मानायला हवा. हेच तर प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? तर आपल्या लाडक्या व्यक्तीला आनंदी, सुखी ठेवण्याच्या प्रयत्नातून, ती व्यक्ती आनंदी आणि सुखी असलेली पाहून मिळणारा आनंद. त्यामुळे तेव्हाच एक गोष्ट शिकलो. प्रेम करणारी व्यक्ती कधीच त्रास देत नाही आणि त्रास देणाऱ्या व्यक्तीचं आपल्यावर कधीच प्रेम नसतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणून तुझ्या सुखात मी माझं सूख मानलं. माझ्या स्वतःच्या आनंदापेक्षा तुला आनंदी बघण्यात मला जास्त आनंद वाटला. तू सौरभ बरोबर सुखात आहेस ह्यात मला आनंद आहे. तुला आनंदी पाहणं हेच माझं तुझ्यावर असलेल प्रेम आहे.
मानसी- तू स्वतःला खूप शहाणा, matured, sorted आणि हुशार समजतोस ना?
श्रीरंग- मी समजत नाही. मी आहेच matured, sorted आणि हुशार.
मानसी- मला मूर्ख, impulsive, हट्टी, स्वतःच खरं करणारी मुलगी समजतोस ना?
श्रीरंग- समजत नाही, तू आहेसच तशी; पण त्यात एक addition आहे. तू मूर्ख नाही पण थोडी वेडी, impulsive, हट्टी, स्वतःच खरं करणारी आहेसच पण तू खूप प्रेमळ, स्वच्छ मनाची, sensitive आणि दिसायला hot पण आहेस. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तू जशी आहेस तशी मला गेली कित्येक वर्ष आवडतेस आणि हवी आहेस.
मानसी- thanks माझी इतकी स्तुती केल्याबद्दल.
श्रीरंग- आणि तुलाही thanks मला drop करायला आल्याबद्दल. एकटीच आलीस? सौरभ जीजू नाही आले बरोबर?
हे ऐकून मानसी जाम वैतागली आणि म्हणाली-
मानसी- तू ना सुधारणार नाहीस. किती नालायक आहेस तू रंगा. तुला हे अस सुचू कसं शकतं? मी इतकी इमोशनल होऊन इथे आले आणि तू ..तू..जीजू…तू मेलास आता.
अस म्हणून ती त्याला मारायला लागली. तो स्वतःला वाचवायला पळू लागला. डिपार्चर गेट जवळ येणारे सगळे लोक त्यांना बघत होते पण त्यांना फरक पडत नव्हता. तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड तिथ येत मानसीला म्हणाले
गार्ड- काही प्रॉब्लेम mam. हा माणूस तुम्हाला त्रास देतोय?
मानसी- हो. ह्याने मला लग्नाचं प्रॉमिस दिलं आहे, मी प्रेग्नंट आहे आणि हा अमेरिकेला पळून जातोय. मला वाचवा प्लीज.
हे ऐकून श्रीरंग घाबरला आणि म्हणाला-
श्रीरंग- नाही सर..असं काही नाहीये. ही..ही खोटं बोलते आहे.
मानसी- मग सर ह्याला विचारा हा माझ्याशी लग्न करेल?
गार्ड- काय रे?
श्रीरंग- मी तर कधीपासून तयार आहे. हीच मला गेली २० …२५ वर्ष… टोलवते आहे!
गार्ड- काय हो?
मानसी- आता मी तयार आहे.
श्रीरंग- हिला विचारा सौरभचं काय करायचं?
मानसी- ह्याला सांगा माझे डोळे उघडले आहेत. मी मृगजळाच्या मागे धावत होते माझ्याकडे इतका मोठा तलाव असताना.
श्रीरंग- नाही. माझा विश्वास नाहीये. ही..ही पलटी मारते.
मानसी- नाही साहेब. ह्याला विचारा किस घेऊन प्रूव्ह करू का?
हे ऐकून गार्ड गांगरला आणि म्हणाला-
गार्ड- ते तुमचं जे एकाही आहे ते घरी जाऊन solve करा. इथे प्लीज न्युसंस करू नका.
मानसी- ठीक आहे सर. Thank you.
गार्ड निघून गेला. ते दोघे एकमेकांकडे बघत होते.
श्रीरंग- तू काय म्हणालीस? कसं प्रूव्ह करणार आहेस?
मानसी- ओह..ते तर मी असंच म्हणाले गार्ड ने तुला अरेस्ट करु नये म्हणून.
श्रीरंग- अच्छा म्हणजे तुझी एक पाउल पुढे आणि दोन मागे ही नाटकं सुरूच राहणार आहेत तर. मग जा त्या सौरभ बरोबर रहा. मी चाललो यूएसला.
तो वळून जाऊ लागला. मानसी एका जागी उभी होती. त्याच्याकडे बघत होती. श्रीरंग थांबला. मागे वळला आणि त्याने दोन्ही हात पसरले. मानसी धावत त्याच्या मिठीत गेली आणि तिने त्याच्या ओठांवर ओठ ठेवले. ते पाहून गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणाला-
गार्ड- अगले हफ्ते छुट्टी लेकर गांव हो आता हुं…
श्रीरंग आणि मानसी एकमेकांच्या मिठीत हरवले होते.
त्या घटनेनंतर एक महिन्या नंतर मानसी आणि श्रीरंग त्याच डिपार्चर टर्मिनलच्या गेट बाहेर किस करत होते. त्यांना पाहून तोच गार्ड चकित झाला. दुसऱ्या गार्डला म्हणाला-
गार्ड- हे दोघे किस करायला सारखे इथे का येतात?
त्याती तरी काय चूक! त्याला माहित नव्हतं की आता मानसी श्रीरंगची लग्नाची बायको होती. चारच दिवसांपूर्वी त्यांच लग्न झालं होतं. मानसीने श्रीरंग अमेरिकेला जाऊन मानसीच्या visa ची प्रोसेस सुरु करणार होता. तो मिळेपर्यंत तिला इथेच राहायचं होतं. पण आता मिसेस मानसी श्रीरंग म्हणून. आज श्रीरंगला निरोप द्यायला मानसी बरोबरच मानसीचा मुलगा आदित्य, अंकिता, उमेश आणि हर्षद देखील आले होते. सर्वांनी त्याचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी अंकिता तिच्या cabin मध्ये बसलेली असताना कुरियर कंपनीचं पार्सल डिलीव्हर झाल्याचा मेसेज आला. तिने उमेशला फोन करून बोलावून घेतला. उमेश आला. अंकिताने उठून केबिनचा दरवाजा lock केला आणि उमेशला मिठी मारून त्याच्या ओठांचा एक किस घेतला आणि त्याला म्हणाली-
अंकिता- माझी डिव्होर्स नोटीस सौरभला त्याच्या गावातील घरी डिलिव्हर झाली आहे. सहा महिन्यात डिव्होर्स होईल आणि आपण लग्न करू. लग्न करशील ना माझ्याशी?
उमेशने तिला घट्ट मिठी मारली.
इथे मानसी सौरभचे तिच्याकडे असलेले फोटो, त्यांचे chat सगळं delete करत होती. समोर श्रीरंगचा आणि तिचा लग्नातला फोटो फ्रेम मध्ये ठेवलेला होता. मृगजळ संपून मानसीला तिचा खऱ्या पाण्याचा झरा श्रीरंगच्या रुपात मिळाला होता.
समाप्त.
मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ११- घराबाहेर
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
मृगजळ सीझन २ चे सर्व भाग – मृगजळ- सिझन २- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

Thank you हा भाग कमी वेळा मध्ये पोस्ट केल्याबद्दल. कथा सुंदर झाली होती.
Part 2 मध्ये उत्सुकता छान टिकून होती. पण मध्येच कथेची पकड कमी झाल्यासारखी वाटली.
अर्थात लेखक म्हणून तुमचा विचार नक्कीच आदरणीय.
khup chhan shevat …. dhanyawaad