health insurance मंदार जोग

Sum Insured म्हणजे पूर्ण संरक्षण आहे का?

आपल्याकडे ₹१० लाखांचा Health Insurance आहे म्हटलं की अनेकांना वाटतं, आता ₹१० लाखांचं बिल आलं तरी आपल्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत. पण खरं तर Sum Insured हा सुरुवातीचा आकडा आहे, अंतिम उत्तर नाही. Hospital bill ₹१० लाखांचं आलं तरी policyमधील eligibility, exclusions, deductibles, co-pay आणि admissibility यानुसार insurerकडून मिळणारी रक्कम कमी होऊ शकते. म्हणून “माझ्याकडे ₹१० लाखांचं cover आहे” यापेक्षा “₹१० लाखांचा medical expense झाला तर माझ्या खिशातून किती पैसे जाऊ शकतात?” हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.

समजा hospital bill ₹१० लाखांचं आलं. त्यापैकी policyनुसार admissible treatment ₹८.५० लाखांचं असेल आणि त्यावर co-pay किंवा non-payable expenses लागू झाले, तर insurerकडून मिळणारी रक्कम ₹८.५० लाखांपेक्षाही कमी असू शकते. हा फक्त उदाहरणासाठी घेतलेला हिशोब आहे. याचा अर्थ प्रत्येक ₹१० लाखांच्या billमध्ये असंच होईल असं नाही. मुद्दा एवढाच आहे की Sum Insured म्हणजे insurerकडून मिळणाऱ्या रकमेची कमाल मर्यादा. प्रत्येक claimमध्ये तेवढीच रक्कम मिळेल याची हमी नाही.

म्हणून policy घेताना फक्त त्यात कोणते features आहेत हे पाहून उपयोग नाही. एखादा benefit कागदावर आहे म्हणजे तो प्रत्येक परिस्थितीत मिळेलच असं नाही. त्या benefitसाठी कोणत्या अटी आहेत, कोणती मर्यादा आहे आणि claimच्या वेळी कोणती कागदपत्रं किंवा प्रक्रिया आवश्यक आहे हेही समजून घ्यावं लागतं.

यासाठी एक साधा प्रयोग करा. तुमची policy समोर ठेवा आणि या लेखात आलेले शब्द शोधा. त्या शब्दाची definition वाचून थांबू नका. त्याखाली किंवा पुढे दिलेल्या conditionsसुद्धा वाचा. शक्य असेल तर स्वतःच्या भाषेत दोन प्रश्नांची उत्तरं लिहा. हा benefit मला कधी मिळेल आणि कधी मिळणार नाही? हे दोन प्रश्न स्पष्ट झाले की policyचा अर्थ समजायला खूप मदत होते.

दुसऱ्याच्या claimचा अनुभव ऐकून आपल्या policyबद्दल निष्कर्ष काढताना मात्र काळजी घ्या. दोन policies एकाच insurerच्या असल्या तरी product, policy year, version, endorsements आणि terms वेगळे असू शकतात. एखाद्याला ₹५ लाखांचा claim मिळाला किंवा त्याचा claim कमी झाला म्हणून आपल्या policyतही तसंच होईल असं मानता येत नाही. आपल्या policyचा schedule आणि policy wording हाच आपल्या claimसाठी महत्त्वाचा संदर्भ आहे.

Hospitalisationच्या वेळी policy document पहिल्यांदाच उघडून या सगळ्या गोष्टी समजून घेणं अवघड असतं. त्यामुळे आजच घरात किमान दोन व्यक्तींना policy number, insurerचं नाव, Sum Insured, renewal date आणि claimच्या वेळी कुठे संपर्क करायचा याची माहिती असू द्या. ज्यावेळी रुग्णालयात धावपळ सुरू असते, त्यावेळी ही छोटी तयारी खूप उपयोगी पडते.

कुटुंबाच insurance planningही वर्षानुवर्षे तेच ठेवायच नसत. घरात नवीन सदस्य आला, एखादा सदस्य employerच्या coverमध्ये गेला, employer coverमध्ये बदल झाला किंवा आर्थिक परिस्थितीत मोठा बदल झाला तर आपली सध्याची insurance व्यवस्था पुरेशी आहे का हे पुन्हा पाहणं गरजेचं आहे. Health Insurance हा एकदा घेतला आणि विषय संपला असा निर्णय नाही. परिस्थिती बदलते तशी protectionची गरजही बदलू शकते.

आणि शेवटी Health Insuranceचा खरा उद्देश समजून घेणं महत्त्वाचं आहे. Insurance म्हणजे प्रत्येक medical billची पूर्ण रक्कम मिळवण्याची हमी नाही. मोठा आणि अचानक आलेला medical expense झाल्यावर आपल्या savings, investments किंवा retirementसाठी ठेवलेल्या पैशांना मोठा धक्का बसू नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे policyची खरी ताकद तिच्यावर लिहिलेल्या मोठ्या Sum Insuredमध्ये नाही, तर मोठा hospital expense आल्यानंतर तुमच्या खिशातून जाणारी रक्कम ती किती कमी करू शकते यात आहे.

म्हणून आज एकदा तुमची policy उघडा आणि स्वतःला चार प्रश्न विचारा. काय covered आहे? कशावर मर्यादा आहे? Claimच्या वेळी मला काय करावं लागेल? आणि मोठा claim झाला तर माझ्या खिशातून किती पैसे जाऊ शकतात?

या चार प्रश्नांची उत्तरं स्पष्ट असतील तर तुमच्याकडे फक्त Health Insurance policy नाही, तर तुमच्या policyचं खरं protection किती आहे याचीही कल्पना तुम्हाला येईल. आणि उत्तरं अजूनही स्पष्ट नसतील, तर ती समजून घेण्याची वेळ आज आहे. Claimच्या दिवशी नाही.

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!