हेल्थ इंश्युरंस मध्ये Employerची Policy आहे. मग स्वतःची Policy कशाला?
“माझ्या ऑफिसकडून ₹१० लाखांचं health insurance आहे. मग मी वेगळी personal health insurance policy कशाला घ्यायची?”
असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर employerकडून मिळणारं health insurance cover ही खूप चांगली सुविधा आहे. कंपनी तुमच्यासाठी premium भरते आणि एखाद्या मोठ्या medical emergencyच्या वेळी ते cover मोठी आर्थिक मदत करू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ऑफिसकडून मिळणारं insurance cover हे तुमचं कायमस्वरूपी insurance cover नसतं. ते तुमच्या नोकरीशी जोडलेलं असतं.
समजा एखाद्या व्यक्तीला कंपनीकडून ₹१० लाखांचं health insurance cover मिळतं. अनेक वर्षं तो त्या coverवर निर्धास्त असतो. पण वयाच्या ५८व्या वर्षी तो retirement घेतो. नोकरी संपली आणि त्याबरोबर employerकडून मिळणारं ते coverही संपलं. आता त्याच्याकडे स्वतःची कोणतीही health insurance policy नाही.
तेव्हा तो विचार करतो, “आता personal policy घेऊ.” पण इथेच सगळं गणित बदलू शकतं.
कारण वयाच्या ३०-३५व्या वर्षी health insurance घेणं आणि वयाच्या ५८-६०व्या वर्षी पहिल्यांदा health insurance घेणं यात मोठा फरक असतो. वाढतं वय, आधीचे आजार, medical history आणि सध्याची health condition यांचा policyच्या underwritingवर परिणाम होऊ शकतो.
समजा retirementच्या काही वर्षं आधी त्याला diabetes झाला. त्यानंतर blood pressureची समस्या सुरू झाली. किंवा एखाद्या तपासणीत हृदयाशी संबंधित समस्या आढळली. आता retirementनंतर तो personal health insurance घेण्यासाठी गेला तर insurer त्याची medical history आणि health condition पाहून निर्णय घेईल.
Policy मिळेलच असं नाही. मिळाली तरी काही आजारांसाठी permanent exclusion लागू होऊ शकतो, premiumमध्ये loading होऊ शकतं किंवा policyच्या अटी त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या असू शकतात. काही परिस्थितींमध्ये प्रस्ताव नाकारलाही जाऊ शकतो.
आता एक परिस्थिती कल्पना करा.
वयाच्या ४५व्या वर्षी त्याच्याकडे employerकडून ₹१० लाखांचं cover आहे आणि तो पूर्णपणे निरोगी आहे. त्याच वेळी त्याने स्वतःची ₹१५ लाखांची personal health insurance policy घेतली. पुढची अनेक वर्षं तो ती policy renew करत राहिला. वयाच्या ५५व्या वर्षी त्याला एखादा आजार झाला तरी त्याच्याकडे स्वतःची policy आधीपासून अस्तित्वात आहे. त्याचं insurance फक्त नोकरीवर अवलंबून नाही. याउलट दुसऱ्या व्यक्तीने विचार केला, “आत्ता ऑफिसची policy आहे ना. नंतर personal policy घेऊ.” आणि नंतर health condition बदलली, तर त्यावेळी policy घेणं पूर्वीसारखं सोपं असेलच असं नाही.
यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही retirement घेतली नाही तरी employerची policy कायमची तुमच्याबरोबर राहीलच असं नाही. तुम्ही नोकरी बदलली तर नवीन कंपनीकडून मिळणारं cover कमी असू शकतं. कंपनी insurer बदलू शकते. Group policyचे terms आणि benefits बदलू शकतात. काही कंपन्यांमध्ये retirementनंतर मिळणारं coverही मर्यादित असू शकतं किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतं. तसचं मोठा मेडिकल खर्च आला तर अनेकदा ऑफिसचा ५ ते १० लाखांचा इंश्युरंस कमी पडू शकतो. हल्ली लहानश्या आजारास्ठी पण खर्च मोठा येऊ शकतो. अश्या वेळी स्वतःची मोठी पॉलिसी उपयोगी पडते. मेडिकल खर्च दर वर्षी साधारण १४% वाढतो आहे. म्हणजेच आज एखाद्या आजाराला जो खर्च येतो त्याहून दुप्पट खर्च आठ दहा वर्षांनी येईल.
म्हणून employerकडून मिळणारं health insurance cover नक्कीच वापरा. ते तुमच्यासाठी एक महत्त्वाचं protection आहे. पण तेच तुमचं एकमेव protection असणं धोकादायक ठरू शकतं. हे अगदी घराच्या सुरक्षेसारखं समजा. ऑफिसची policy म्हणजे तुमच्या नोकरीच्या काळात मिळालेली एक सुरक्षा आहे. पण तुमच्या आयुष्यभराच्या medical expensesसाठी स्वतःच्या नावावर असलेली policy म्हणजे वेगळी आणि अधिक स्थिर सुरक्षा. आज तुम्ही निरोगी आहात, premium तुलनेने परवडणारं आहे आणि policy मिळण्याची शक्यता चांगली आहे, तेव्हा personal health insurance घेण्याचा विचार करणं अधिक योग्य ठरू शकतं.
थोडक्यात वैयक्तिक health insuranceची खरी गरज पडते तेव्हा policy विकत घेणं नेहमीच सोपं असेल असं नाही. Employerचं cover असू द्या. पण त्यासोबत तुमच्या स्वतःच्या नावावरची personal health insurance policyही असू द्या. कारण नोकरी बदलू शकते. Retirement येऊ शकतं. कंपनीची policy बदलू शकते. पण तुमची health insuranceची गरज मात्र retirementनंतर संपत नाही. उलट, वय वाढल्यानंतर ती अधिक महत्त्वाची होत जाते.
क्रमश:
