चियर्स…सिनियर सिटीझन.
हा अनुभव सर्वांनाच येत असेल. बहुतेक वेळेला घरात किंवा क्वचित प्रसंगी सार्वजनिक जीवनात सुद्धा. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेले ज्येष्ठ नागरिक, आपले आजी आजोबा, आमच्या सारख्यांचे आई वडील काका ही मंडळी अनेकदा त्यांचे एखाद्या बाबतीतील मत ठासून सांगतात…गोष्टी कश्या केल्या की त्या योग्य हे सांगयाचा प्रयत्न करतात. अगदी साध उदाहरण द्यायच झाल तर कामवाल्या बाईला सोफ्याख़ालून पुसून घे सांगणे, कपडे वाळत घलताना तिला ‘घडी घालू नको’ पासून कुठले कपडे कुठल्या दोरीवर घाल इथपर्यंत सूचना देणे, ब्यांकेतील कारकुनाला “काउंटरवर चांगली पेन ठेवणे परवडत नाही का ब्यांकेला?” असले प्रश्न विचारणे!!
ह्याकड़े बऱ्याचदा म्हातारपण म्हणजे दूसरे बालपण गृहीत धरून हा वयस्कांचा बालिशपणा आहे असे पाहिले जाते. काही वेळा त्याला “म्हातारचळ” असे नाव देऊन थट्टा केली जाते. बहुतेकवेळेला घरातील त्यांची इंव्होल्व्हेमेन्ट, पोटतिडकिने आणि अनुभवाच्या आधारावर दिलेले सल्ले हे लुडबुड किंवा इंडलजन्स वाटून त्यांना अपमानित सुद्धा केले जाते! मान्य घरातील ज्येष्ठांचे अस्तित्व, वावर आणि अती इंव्होल्व्हेमेन्ट कधीकधी इरिटेट करू शकणारी असू शकते. पण त्या मागील भावना किंवा कारण समजून घेतल्यास त्यांचे वागणे तितकेसे त्रासदायक वाटणार नाही तसेच त्या वागण्याची क्वचित होणारी थट्टा होणार नाही!
उतार वयात आर्थिक स्वावलंबन असलेले अनेक वृद्ध भावनिक आणि शारीरिक दृष्टीने मुलांवर थोडेफार अवलंबून असतात. ह्यातील भावनिक भाग खूप जास्त असतो. आपले मूल विशेषत: मुलगा मोठा झाला, सेटल झाला की त्याचा फुलणारा संसार पहायचे स्वप्न त्यांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले असते. मग त्या मुलाच्या बरोबर रहाताना भावनिक आनंद घेत असताना बुद्धिशी द्वंद्व सुरु असते ते “आपण कुठेतरी परावलंबी तर नाही ना? मुलावर आणि त्याच्या कुटुंबावर ओझे तर नाही ना?” मग त्यातून ‘अक्टिव्ह पार्टिसिपेशन’ ची भावना निर्माण होत असते. मग नकळतपणे आपला अनुभव आणि सल्ले हे आपले “कॉन्ट्रिब्यूशन” म्हणून ते वापरत असतात अनेकदा तसे करताना ज्याला / जिला सल्ले दिले त्यांना त्याची गरज नव्हती, ती अतिशय बेसिक गोष्ट होती ह्याचा त्यांना विसर पडतो. त्यांना समाधान असते ते अक्टिव्ह पार्टिसिपेशनचे! सार्वजनिक जीवनात देखील आपण कुठेतरी इग्नोर होत आहोत अशी काहीतरी भावना आणि त्यातून आपल्या अस्तित्वाची, मी जूना असलो तरी “कालबाह्य” नाही हे लोकांना आणि स्वत:ला पटवून द्यायचा प्रयास असावे असे मला वाटते!
वाईन जितकी जूनी तितकी तिची टेस्ट आणि किम्मत जास्त! ओल्ड वाईनचा आस्वाद घेताना ठराविक आकाराचा ग्लास घेतात, त्यात ओतली जाणारी वाईन डोळ्याने पहातात, ग्लास हलवून तिचा रंग पारखून मग तिचा वास घेतात. एक सीप घेऊन तो तोंडात घोळवून तिचा अस्वाद घेऊन मग तो घोट घशाखाली उतरतो आणि “Divine” अशी दाद नकळत येते! मग तशीच गोड असणारी आणि क्वचित चुरचुरणारी ओल्ड माणसे समजून घ्यायला काय हरकत आहे? त्याना थोडा क्वालिटी टाइम द्यावा, गप्पा माराव्या, महिन्यातून एखाद्या डिनरला त्यांना सुद्धा न्यावे, तब्बेतीची औषधांची चौकशी करावी, जुन्या आठवणीत त्यांच्याबरोबर कधीतरी रमावे, ते अजूनही किती महत्वाचे आहेत हे त्यांना जाणवून द्यावे, कधी त्यांचे सल्ले आपणहून विचारावे, आपण त्यांच्यात थोडी “प्रोएक्टिव्ह इंव्होल्व्हमेंट” करावी! असे केल्यास ओल्ड वाईन सारखीच ओल्ड जनरेशनची गोडी कळून येईल आणि “Divine, awesom” बरोबरच तोंडातून आपसूक “Thank you” बाहेर पडेल आणि सीनियर सिटीझनच्या चेहऱ्यावर एक चमक येईल…..वाईनच्या चकचकत्या ग्लासासारखी…..चियर्स!!!! तमाम ज्येष्ठ नागरिकांना आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या घरात, नात्यात, ओळखीत सिनियर सिटीझन असतील तर पोस्ट खाली असलेले शेयर बटण दाबून ही पोस्ट तुमच्या वॉल वर, समूहात, व्हॉट्सअँप वर अवश्य शेयर करा. त्यांना वाचून दाखवा आणि आजच्या सिनियर सिटीझन दिनाच्या त्यांना शुभेच्छा द्या.
आमचे इतर ललित लेख- ललित
आमच्या लघु कथा लघुकथा
आमच्या दीर्घकथा – दीर्घ कथा
सिनेमाविषयक लेख- फिल्लमबाजी

khup chhan lihilet sir tumche mhanne agadi barobar aahe ….
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व भावना खूपच छान शब्दांत व्यक्त केल्या आहेत धन्यवाद सरजी
खूपच सुंदर लिहिले आहे अगदी सत्य पण मी माझ्या भावांपेक्षा नशीबवान की मला असे आयुष्य माझ्या दोन्ही आईबाबा म्हणजे सासू सासरे व आई वडील या दोघांसोबत छान घालवल्याचे समाधान आहे, माहेर एकाच गावात त्यामुळे कुठेही त्यांना सहभागी करून घेणे सासरच्या मंडळींसोबत मला सोपे जायचे प्लस आवडायचे आम्ही उत्तम काळ सोबत घालवला आणि चौघेही जण खूप छान आयुष्य जगले याचे मला कौतुक आणि थोडा अभिमान पण वाटतो, त्यांची आता उणीव मात्र पदोपदी जाणवते की आता अजून कौतुकाने मी रिटायर झाल्यावर त्यांना फिरवले असते सोबत quality time घालवला असता असो…पण त्यांचे सोबत त्यांना समजून घेऊन राहणे आणि त्यांचे मार्गदर्शन मिळणे या सारखे भाग्य नाही इतके मी निश्चित सांगू शकेन…सर्व ज्येष्ठ व्यक्ती ना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻💐